Sunday, 12 February 2017

फोटो कुनासोबत काढावेत ??

🤓सहज दिसले म्हनुन ....


आनेक ठिकाणी आनेकांच्या बैठकीत , होटेलात, दुकाणावर ,आलबममधे किंवा कुठल्याही दर्शनी भागात आनेकांनी आपल्या प्रिय राजकिय व्यक्तिबरोबर काढलेला फोटो लावलेला आसतो. 

यात गमतीचा भाग असा असतो की त्या आलबममधील फोटोत नगाने नेत्यांच्या हतात हात दिलेला आसतो.आपन साहेबांच्या खुप जवळचे ,परिचयाचे आहोत हे दाखवनारी ही धडपड आसते . या गडबडीत मात्र  नेत्याचे लक्षही नसते.फोटोत नेता मात्र दुसरीकडेच पहात आसतो . आणि आपले कार्यकर्ते मात्र फोटोकडे मस्त पोज देत आसतात.त्यांच्या घरातला तो फोटोच सांगत आसतो की यांची फारसी ओळख नाही.ते नेते आमच्या ह्या कार्यकर्त्याला ओळखत नाहीत.हे आपले आशीच डुप्लिकेट स्माइल देत फोटोत उभे आसतात. काहीजन स्टेजवर उगिच नेत्याच्या कानाला लागायला येतात.त्यामागेही गणित आसते. स्टेजसमोरल्या क्यामेर्यावाल्याला आधी सांगुन ठेवलेले आसते की मी कानाला लागलो की फोटो काढ. हा ही फोटो प्रकार डुप्लिकेट जवळीक दाखवनारा आसतो.आशेही फोटो बर्याच ठिकाणी पहायला मिळातात. 

यात खरा आनंद नसतो. हे असते सुप्त आकर्षण.सेलिब्रिटी , राजकारणी त्यांचा तामझाम डामडौल असे आकर्षण निर्माण करुन देतो.


          मानवी मन आपल्यापेक्षा वरचढ गोष्टींचे सुप्त आकर्षण बाळगत असते.हा सुप्त आकर्षणाचा अती हव्यास शेवटी स्पर्धेच्या चक्रव्यूहात आडकवुन सुखाच्या नरडीचा घोट घेतो. ग्रामीण भागात गरिबाच्या घरात वस्तू लावयला जागा नसेल पण  लग्नप्रसंगी डायनिंग टेबल , फ्रिज , आणि मोठे कपाड हामखास भेटवस्तू म्हणून दिली जाते.भांडवली आकर्षण चैनीच्या वस्तूची सर्वात जास्त विक्री करुन देते.

ही सुप्त आकर्षणाची चैनच असते.जसे कार्यकर्त्याला नेत्यासारखे कपडे घालण्याचे सुप्त आकर्षण निर्माण असते.तर त्याचा नेता फॉरेनचे आकर्षण आयत करत असतो.

        भांडवली , उच्चभ्रू प्रस्थापीतांची एक तामझाम बाळगणारी , डामडौलाची महागडी संस्कृती आहे.सर्वहरांच्या चळवळी चालवणाऱ्या सामंजस नेतृत्वाने त्या फसव्या आकर्षणात आडकावे का ? तर उत्तर आहे नाही.

            परंतू जागोजागी तुम्हाला यापेक्षा अत्यंत विपरीत दिसेल.पुरोगामी म्हणवुन घेणाऱ्या सर्वच पक्ष चळवळी संघटना,भांडवली उच्चभ्रू ढाचा कल्चर फॉलो करताना दिसतात.जसे सर्वहरांच्या चळवळी चालवणाऱ्याने भव्य स्टेज मोठमोठे हारतुरे आणि बडेजावपणाचे आकर्षण कशाला बाळगावे.

सतत सभोवती मेडिया असावा वाटणे कशाचे लक्षण आहे ?आकर्षणाचेच ना ? 

सर्वहरांच्या ग्रामीण बोलीच्या ऐवजी भांडवली भाषेचा हव्यास शत्रूच्या गटाला नेस्तनाबूत करु शकेल काय ? नाही ते ही एक ग्लोबल आकर्षणच , एवढेच काय भांडवली डिग्र्यांचा ऊहापोह हे तर भयाण आहे. 

परंतू भांडवली भाषा , रहाणीमान , बडेजावणा याचे टोकाचे आकर्षण बहुजनांना लागलेला शाप आहे.त्या शापात ते होरपळत आहेत.


    विषय फोटोवरुन निघाला होता तर मग फोटो कुणासोबत काढावेत ..? 

         एका दाण्या पासुन कनिस बनवनवुन आख्ख्याजगाला जगवनार्या  शेतकर्यांसोबत फोटो काढावा. 

        ओबडधोबड लाकडाला सुबक आकार देवुन नक्षीदार वस्तु बनवनार्या सुतारासोबत फोटो काढावा. 

       फिरत्या चाकावर चिखलाच्या गोळ्याला आकार देउन निर्गाबरोबर मानवी शराराच्या  गरजेनुसार पाणी थंड करनारे  फ्रिज बनवनार्या कुंभारासोबत फोटो काढावा. 

        दान पावलं म्हनत पुर्वजांचा वारसा सांगणार्या वासुदेवासोबत तर 

खंडोबा बहिरोबा जोतिबा आंबाबाई जोकाई जाकाई  ही आमची पुर्वज ब्राम्हणी पुस्तकांनी कधीच मांडली नाहीत. त्यांचा वारसा सांगणार्या वाघ्या मुरळी ,गोंधळी, याच्याबरोबर फोटो काढावा.

दुसर्याच्या आन्नावर जगनार्या आणि चेहर्याला काहीबाही लावुन नट्टापट्टा करनार्या फुकट्या नट्यांपेक्षा जिच्या कपाळावर घाम आसतो.जी शेतात राबते त्या 'माय' सोबत आपन फोटो काढावेत.

आणि आपल्या बैठकित ,दुकानावर दर्शनी भागात लावावेत. 

भांडवली आकर्षणाच्या फसव्या जगातून बाहेर यावे. 


नितीन सावंत ,परभणी

9970744142