Thursday, 21 January 2021

- मजलिस ए-इन्सानियत -

!!!सहभागी व्हा!!!
- मजलिस ए-इन्सानियत  -
1. मजलिस ए इंसानियत ही एक सामाजिक संघटना आहे राजकीय पक्ष नव्हे.
2. अल्पसंख्याक समाजाच्या बाजूने लढणारी असून सुद्धा सर्वधर्मसमभाव जोपासनारी ही एक मानवतावादी चळवळ आहे.
3. अल्पसंख्याक समुहावर होणारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अन्याय, वाढता जातीयवाद, धर्माच्या नावे केली जानारी टार्गेटिंग , मारहाण आणि हत्याकांड , अल्पसंख्याकांमध्ये विशेष करून मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी वाढती उदासीनता, यांसारख्या अनेक प्रश्नांना नजरे समोर ठेवून ही संघटना काम करत असते.
4. अल्पसंख्याक समाजातील तरूणांना लोकशाही मार्गाने चालवण्यास प्रवृत्त करणे व त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळवून देणारी ही संघटना आहे.
5. सामाजिक सलोखा निर्माण करण्याकरिता व विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवीण्याकरिता अनेक स्पर्धा व कार्यक्रम आयोजित केले जातात.
6. लोकशाही मार्गाने जनआंदोलन उभा करणे व निवदनांद्वारे जनतेचे प्रश्न व मागण्या शासनदरबारी पोहचवणे हे कार्य सुद्धा संघटनेच्या उद्दिष्टांमध्ये समाविष्ट आहेत.
7. देशभर पसरलेल्या या धर्मनिरपेक्ष संघटनेने अनेक सामाजिक कार्य केलेले आहेत.
आपणही आवर्जून सहभागी व्हा या लोकचळवळी मध्ये 

Tuesday, 19 January 2021

मार्क्सवादी इतिहासाचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत ..

मार्क्सवादी इतिहासाचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत ..

कार्ल मार्क्स भौतिक अंगाने इतिहासाचे,मानवी उत्कर्षाचे काही टप्पे करतो.ते खालीलप्रमाणे आहेत.

१) आदिम साम्यवाद : येथे मानवी जीवणाचा भटकंतीचा टप्पा ते स्थीर होत जानारे मानवी जीवनाचा विचार केला जातो.या काळात साठवून ठेवण्यासाठी मानवी साधने तयार नसल्यामुळे आदि मानव आपली शिकार , कंदमुळे समान वाटुन खात असे.म्हणजे फळे कंदमुळे शिकार स्टोअर करण्याची साधने उपलब्ध नसल्यामुळे येथे नैसर्गिक समता साम्यवाद होता.येथे कुनीही गुलाम नाही मालक नाही.हाच आदिम साम्यवाद होय.या काळात नितीमुल्ये , जगण्याची सभ्य नियमावली अस्तित्वात नव्हती.

२) सरंजामशाही : हा इतिहासाचा मोठा कालखंड मानला जातो.यात दोन वर्ग अस्तित्वात आले.गुलाम आणि मालक.गुलामांना पकडुन अत्यंत कमी निकृष्ट दर्जाचे अन्न देवून त्याच्याकडून प्रचंड श्रम करुन घेतले जायचे.येथे साठवूनक वाढली.शोषण वाढले.
पुढे याच सरंजामशाहीच्या कालखंडात बडे जमिनदार हे गरीब शेतकऱ्यांना लुटायला लागले . मग राजेशाही आली त्यात शेतकऱ्यांच्याकडुन शेतसारा घेण्याची पध्दती आली.मग सैन्य आले.लूटमार आली.यातुन एका वर्गाचे प्रचंड शोषण चालु राहिले.गरिब श्रीमंत भेद वाढत गेला.येथे सरंजामीमुल्ये तयार केली गेली.जसे चोरी करणे पाप आहे वगैरे. 

३) भांडवलशाही : यात उत्पादन केवळ नफा मिळविण्यासाठी सुरु झाले.माणूस वस्तु बनला.नव्या बाजारपेठा शोधण्यासाठी स्पर्धा लागली.त्यातून कामगार मालक संघर्ष सुरु झाला.भारतात इंग्रजांच्या आगमनाने भांडवलशाही आली.येथे व्यक्तिस्वातंत्र्य वाढले.माणूस स्वतंत्र झाला.परंतू त्यात तुटलेपण आले.व्यवहारवादी नफ्या तोड्याच्या जगण्यात तो केवळ वस्तू बनला.

4)साम्रज्यशाही : यात एकच देश जगावर राज्य करायला बघतो.अनेक देश उध्वस्त केले जातात.उदा अमेरिका. 

५) कम्युनिझम : एक शासन यंत्रणा येवुन सर्वांना बरोबरीने वागवण्याचा प्रयत्न करते.येथे साम्यवादाला सुरुवात होते .कुनी कुनाचे शोषण करु नये अशी राज्ययंत्रणा आनली जाते.उदा समाजवादी लोकशाही वगैरे. 

६) साम्यवाद : असे राष्ट्र जिथे कोनीही गुलाम नाही मालक नाही. सगळे समान.शासन नाही प्रशासन नाही बंधने नाहित अशी व्यवस्था.. 

नितीन सावंत परभणी ..

देशीवादी अभ्यासविषय

१. प्राचीन भारतातील आणि महाराष्ट्रातील चलन
२. लोकगीते.
३. लोककला
४. लोकनृत्य 
५. भारतीय खाद्य संस्कृती
६. भारतीय वेशभूषा 
७. भारतीय शृंगार
८. देशी प्राणी आणि गावांची नावे
९. शिल्पकला
१०. प्राचीन शेती साधने आणि पद्धती 
११. देशी बी-बियाणे 
१२. गावातील माही, उत्सव, यात्रा, उरूस 
१३. म्हणी 
१४. विहीर शिल्पे 
१५. कातळ शिल्पे 
१६. ग्राम दैवते / लोकदैवते
१७. देशी वृक्ष 
१८. प्राचीन भांडी 
१९. प्राचीन उद्योग
२०. प्राचीन पर्यटनस्थळे 
२१. प्राचीन भारतातील निर्यात व्यवस्था
२२. प्राचीन भारतीय लेखन संस्कृती 
२३. प्राचीन दळणवळण साधने 
२४. देशी बाजार व्यवस्थापन 
२५. भारतीय भाषा
२६. प्राचीन भारतीय नद्या आणि संस्कृती
२७. भारतीय लग्न संस्कृती 
२८. प्राचीन वजन मापे 
२९. देशी धान्य ठेवायचे वस्तू, कृषी विषयक भांडी 
३०. भारतीय हत्यारे, शिकारी हत्यारे सापळे
३१. भारतीय वाद्ये 
३२. भारतीय वैदू उपचार पद्धती
३३. भारतीय कारागीर व जीवन 
३४. भारतीय मातीची भांडी 
३५. प्राचीन भारतातील लाकडी वस्तू 
३६. नक्षत्रे आणि म्हणी आणि कृषी संस्कृती
३७. भारतातील मातृसत्ताक संस्कृती
३८. भारतातील नाग आणि लोकजीवन 
३९. भारतातील खेडूत जीवन 
४०. प्राचीन भारतीय मंदिर व लेणी
४१.सुफी परंपरा.
४२.निसर्ग जतन संवर्धन
४३.भाषा,बोली आणि लिपी जतन संवर्धन
४४.जादुविद्या , गुढविद्या , रसविद्या