Friday, 9 December 2022
ब्राम्हणी (परंपरागत) बुद्धीजीवींचा तोरा - भाग एक
Sunday, 6 November 2022
ll सांडोनिया सुखाचा वाटा ... ll
Thursday, 20 October 2022
ll शहिद सरमद ll
आकडेवाल्यांचे शास्त्र - मटका जुगार
Tuesday, 18 October 2022
उत्सव बळीराजाच्या पुनरागमनाचा
Monday, 19 September 2022
♦️श्रमाची कदर नसलेला देश
नुकताच आम्ही पुर्णा तालुक्यातील सातेफळच्या कुंभार वस्तीला भेट दिली.सोबत होते महाराष्ट्र सरकारच्या मानव विकासचे आयुक्त मा.नितीन पाटील आणि त्यांचे इतर आधिकारी.विकासाच्या प्रक्रियेत न आलेल्या गरिब जाती जमातींसाठी काम करणारे हे आधिकारी कुंभार वस्तीत कुंभारकाम बघत होते.कुंभारकाम करणाऱ्या सर्व व्यावसाईकांना कशाप्रकारे मदत करता येइल जेणेकरून त्यांच्या व्यावसायात वृद्धी बरोबर नफाही जास्त कमावता येइल यासाठी सर्व आधिकारी आधिक माहिती देत होते.त्यांच्याकडील काही महत्वपूर्ण योजनाही सांगत होते.तशी चर्चाही करत होते.
मी अंगणात बसलेल्या एक दोन वृद्धांसोबत चर्चा करायला सुरुवात केली.बाजुला काही मडके वाळवत घातलेले होते.नवरात्रोत्सव जवळ आल्याने घटस्थापनेसाठी लागणारे ते छोटे आकाराचे गाडगे बनवले होते. मी म्हनालो " कितीला एक जाते हे मडके "
वृद्ध आज्जोबा म्हनाले ' पाच रुपायाला एक " मी आवाक झालो फक्त पाच रुपये किंमत.हल्ली काय येतेय हो पाच रुपायाला ? "
मी परत प्रश्न केला " यासाठी वेळ किती जातो , एक मडके बनवायला ? "
ते म्हनाले " माती भिजवने , मुरवने , चिखल घट्ट करणे ही चार पाच दिवसाची मोठी प्रक्रिया आहे. " एक गाडग्याच्या चिखलाला आकार द्यायला विचारत असाल तर आर्धा तास जातो."
आर्ध्या तासाच्या श्रमाचे फक्त पाच रुपये ??
ते म्हनाले " तिनशे मडके बमवायला सहा दिवस गेलेत.म्हणजे एका दिवसात ५० मडके बनवलीत.एक पाच रुपाला विकले जाते याप्रमाणे आम्हाला २५० रुपये रोज पडतो. "
मी म्हनालो " ही तर घोर निंदा आहे तुमच्या श्रमाची आणि कलेची." ते म्हनाले " साहेब या वंशाला घातलेय म्हणून करावे लागते बघा. नाहीतर कुनाला हौस आहे चिखल तुडवायची. आम्हाला पर्याय आहे का दुसरा काही , नाही ना . म्हणून हे सर्व . लोक भाव पाडून मागत्यात, उलटे रेटुन बोलतात . बरोबर वागणूक देत नाहीत. आमचे आम्हालाच माहिती आम्ही कसे जगतो ते. "
मी सिरिअस होतो आहे , हे लक्षात आल्यानंतर त्यांनी दुखातूनही हस्याची कमाई केलेली कला दाखवली.एक म्हातारा दुसऱ्या म्हाताऱ्याला म्हणाला " चोरी केली असती.पण आम्हाला करता येत नाही.आणि मार खाण्याजोगी तब्यतही नाही"
आम्ही सगळेचजन असलो.
तेवढ्या आपार मेहनतीतूनही ही मानसे आनंदी, सुखी रहातात.एकोप्याने रहातात.हसतात.दुख पोटात दाबुन ठेवतात.हजारो वर्षापासून अन्न खायला भांडी बनवून देनारा कुंभार आज व्यावसायाच्या रुपाने शेवटच्या घटका मोजत आहे.पाच रुपायासाठी तो चिखलाने हात भरवतो .तरी तो आनंदी रहातो. आणि इकडे नोकरदार वर्गाचा दोन महिने पगार नाही झाला तर बिपी वाढतो.
नितीन सावंत परभणी
9970744142
दिनांक २० सप्टेंबर २०२२
हस्तश्रमाने काम करणार्यांचे मोल करा
Saturday, 16 July 2022
कोण हे आहो सुखाचे सांगाती ? संत चोखोबाराय लेखमाला ३०
कोण हे आहो सुखाचे सांगाती ?
जन्मला देह पोशिला सुखाचा l काय भरवसा याचा आहे ll
ऐकलेची यावे ऐकलेची जावे l हेची अनुभवावे आपणची ll
कोण हे आहो सूखाचे सांगाती। अंतकाळी होती पाठमोरे ll
चोखा म्हणे याचा न धरी भरवसा । शरण जा सर्वेशा विठोबाशी ॥
शेवटच्या काळात संत चोखोबाराय अत्यंत एकटे पडले होते. त्यातूनच त्यांना अत्यंत करुणपणे मांडणी करणारा हा अभंग स्फुरला आहे. त्यांनी व्यक्त होने हा गुन्हा ठरला होता. त्यातून त्यांना आनखी एकटे पाडणारी परिस्थीती उद्दभवली होती. मंगळवेढ्याला वेशीच्या बांधकामासाठी त्यांना जावे लागले होते. त्यांच्या सर्व आशा, आकांक्षा स्वप्ने धुळीला मिळाली होती. त्यांचे निकटवर्ती संत मंडळ सोडून त्यांना ईच्छा नसतानाही वेठबिगारीच्या कामावर जाणे भाग पडले होते. या त्यांच्या जीवनात उद्धभवलेल्या या परिस्थीतून त्यांना हा अभंग स्फुरला आहे.
शेवटच्या काळात मन मारूण जगणे चोखोबारायांच्या वाट्याला आले होते. एकीकडे बडव्यांची पुरोहीतशाही तर दुसरीकडे वेठबिगारीच्या कामाला बळजबरीने नेनारी बिदरच्या राजाची सरंजामशाही, आशा दोनही व्यवस्थेचे. बळी चोखोबाराय ठरले होते.
आंबेडकरी चळवळीतील विद्वान आणि जेष्ठ लेखक ज. वि. पवार म्हणतात " निम्न जातीत जन्मलेल्या चोख्याने समताधिष्टीत समाजव्यवस्थेची अपेक्षा केल्यामुळे त्यांना भिंतीत चिरडून मारण्यात आले. ज. वि. पवारांसारखे अनेक दिग्गज लेखक चोखोबारायांची हत्याच झाली म्हणतात.फुले शाहु आंबेडकरी चळवळीचे लेखक, संघटक शुध्दोधन आहेर म्हणतात. " म्हणुनच चोखा डोंगा परि भाव नाही डोंगा अशी काळीज पिळवडून टाकणारी आर्त वेदना शब्दबध्द करणारा हा बंडखोर संत मंगळवेढ्याच्या बुरुजात जिवंत गाडला गेला. संत चक्रधरांचे शिष्यत्व पत्करणाऱ्या एका प्रवचनकार चांभाराला , देखील चुनखडीच्या खड्ड्यात बसवून आणि वरून असाहय्य वेदना, यातना देऊन ठार मारण्याची शिक्षा, देवगिरीच्या राजा रामदेवराय याच्या प्रधानाने, हेमाद्री पंडिताने दिली होती..... पुर्वास्पृश्य चोखामेळ्याला जिवंत गाडणे सहज शक्य आहे ! आशा तर्हेने या देशातील शुद्रातिशुद्रांनी आध्यात्मिक मुक्तीदेखील रक्त सांडवूनच मिळविली आहे. "
आशा पध्दतीने चोखोबारायांच्या अंतकाळी कुणीच जवळ नव्हते. यातून मन मारून चोखोबाराय जंगले आणि मेले. संत चोखोबारायांचे वारसदार म्हणुन पंढरपुरात सर्वगोड यांची घरे आहेत. सर्वगोड हे आडनाव पंढरपुर सोडून अख्या महाराष्ट्रात नाही. त्या काळी चोखोबारायांसारख्या अस्पृश्य जातींना आडनावे नव्हती. म्हणून त्याकाळी चोखोबारायांना चोखामेळा एवढेच म्हटले जाई. पुढे सर्व संतांनी त्यांचा 'चोखा चोखट निर्मळ' म्हणून, अभंग लिहुन गौरव केला आहे. चोखोबा भक्ती परंपरेत निर्मळ आहेत. संतांच्या या गोड संबोधनाने चोखोबांच्या नावातील मेळा ( मैला ) जावून चोखोबाराय शुद्ध झाले गोड झाले, असे संतांचे म्हनने होते.संत नामदेवांनी संत चोखोबारायांचे स्मारक बांधुन चोखोबाचा शेवट गोड केला.यातूनही कदाचीत सर्वगोड हे आडनाव पुढे आले असावे. आशाच कुठल्यातरी कारणाने भविष्यात संत चोखोबारायांच्या वारसदारांना' 'सर्वगोड' हे आडनाव मिळाले असावे. सर्वगोड हे अडनाव अत्यंत गौरवशाली आहे. संत चोखोबारायांची परंपरा सांगणारे आहे. "या बाबतीत पंढरपुरतील माजी नगराध्यक्ष सुनिल सर्वगोड म्हणतात
"आजवर सनातनी लोकांनी देव आपल्या हातात ठेवला, संतांना छळले. माझे तर असंही म्हणणं आहे की, सनातन्यांनी चोखोबांना मारले आणि त्यांचा मृत्यू, गावकुस पडुन झाला असं सांगितले. हा अन्याय किती दिवस सहनकरायचा. त्यापेक्षा बाबासाहेबांच्या वाटेने आम्ही चाललो आहोत" या पद्धतीने आंबेडकरी चळवळीतील दिग्गजांच्या भुमीका संत चोखोबारायांची वेस ढकलून किवा 'वेसीत गाडून हत्या केली गेली आशा स्वरूपाच्या आहेत.
येथील उच्चभ्रृ जातवर्गीय व्यवस्था आजुनही संत चोखोबारायांना न्याय दयायला तयार नाही. संत चोखोबारायांची झोपडी आणि त्यांनी स्वता बांधलेली दिपमाळेची जागा बळकावण्यात आली आहे. त्यांची शेवटची निषाणी सुद्धा सांभाळली गेली नाही. आजच्या पुराव्यानुसार मौजे शेगाव, सर्वे नंबर १० येथील ३० बिघ्याचे शेत चोखोबांचं होत." ती जमीन आज घडीला संत चोखोबारायांच्या वारसदारांकडे हवी होती.ती जमीन बळकावली गेली. ती चोखोबारायांच्या वारसदारांकडे नाही. इतर तिर्थक्षत्रांच्या ठिकाणी संत चोखोबारायाचे मंदिरे नाहीत.असेलच एखादे तर तेही उपेक्षीत दुर्लक्षीत आहे. " काही वारकरी म्हणवणाऱ्या काही फडांमध्ये आजही बहुजन जातीतील संतांचे अभंग घेवुन कीर्तन होत नाहीत. महिलांची प्रवचनं होत नाहीत. विठोबा बाटला म्हणून काही मोठमोठे महाराज आजही पंढरपुरच्या विठ्ठलमंदिरात जात नाहीत." ज्या अस्पृश्यतेच्या विरोधात, भेदाभेदाच्या विरोधात चोखोबारायांनी आणि सर्व संतांनी बंड केले ती अस्प्रश्यता,भेदाभेद तशीच चालू आहे.चोखोबारायांना काही न्याय मिळाला नाही.गावखेड्यातील बरेच जन म्हणतात आता कुठे राहिला आहे जातीवाद. आशांनी गावपातळीवर लक्ष ठेवून पहावे गावात ' एक गाव एक पाणवठा झाला पण आजूनही एक गाव एक मसणवाटा' होऊ शकलेला नाही, भेदभाव आजुनही तसाच आहे. त्या काळात संत चोखोबारायांना आपल्या सख्या पांडुरंगाची भेट घेता आली नाही. आणि आजही गाव पातळीवर मातंग, चर्मकारांना पारावर, मंदिरात का आले म्हणून मारले जाते.मंदिराच्या आडोशाला पावसाच्या बचावासाठी उभे असलेल्या परभणी जिल्यातील आंबादास सावणेला मंदिर बाटवले म्हणून जीवे मारले जाते. आजही किर्तनातून वक्ते महाराजांच्या सारखे कीर्तनकार जाहिररित्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची टिंगलटवाळी करतात. म्हणजे संत चोखोबाराय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मानापसून स्विकारायचेच नाहीत असे ठरवूनच टाकले गेले आहे.
जग एवढे पुढे गेले आहे, तरिही भारतीयांनी जुनाट, बुरसटलेल्या संकल्पना काही सोडलेल्या नाहीत. आजुनही आम्ही आजुबाजुच्यांकडे माणुस म्हणुन पहायला तयार नाहीत. आम्ही माणसाला जात, धर्म, वर्गाच्या चष्म्यातून पहातो. कधी बदलणार आपण? किती चोखोबारायांनी हळहळ व्यक्त करत, निकृष्ठ जीवन जगत मरायचे ? आजही भंगी, वडार, घिसडी, पारधी, ढोर, बेलदार, पथरवट यांसारख्या कितीतरी भटक्या विमुक्त जाती अत्यंत हालाखीचे जीवन जगत आहेत.आशा जातीना गावात प्रवेश सुद्धा दिला जात नाही. "कोण्याही जीवाचा न घडो मत्सर" ही संतांनी सांगितलेली शिकवण आपण विसरत चाललेलो आहोत का ?
आपल्या जगण्याचे मुख्य मूल्य माणुसकी असायला हवे.संतांनी माणुसकीच केंद्रबिंदू मानुन शिकवन दिली आहे. मग नेमकी ती माणुसकी तेवढी आपण सोडली आहे का ?
सर्व संत आणि त्या संतांची शिकवण आपल्याला बरोबरीची असावी. आपला परका भेद किमान संतांमध्ये तरी करू नये. ठरवीक सतांनाच प्रसिद्धी आणि संत चोखोबारायांसारखे मात्र उपेक्षीत, हे अन्यायकारक आहे. त्यांची जातीअंताची शिकवण आपण अंगी बाळगावी. जातीभेद अस्पृश्यता, बंद हावी. त्यासाठी आपण काम केले पाहीजेत. कुणाची घृष्णा करणे, द्वेष करणे, हिंगलटवाळी करणे, हिने लेखने हे थांबले पाहिजे. गोरगरीबांत आजुबाला चोखोबारायच वावरत आहेत , असे आपल्याला वाटले पाहीजे. सर्वांना समान बंधूभावाची वागणुक आपण दिली पाहिजे. हीच खरी संत चोखोबारायांना श्रध्दांजली असेल.
प्रस्तूत अभंगात संत चोखोबाराय म्हणतात " माणसाचे जीवन क्षणभंगुर आहे. माणुस कुठल्याही कारणाने ताबडतोब मरू शकतो. जगणे क्षणीक आहे. मृत्यू नग्न सत्य आहे.वास्तव आहे. माणुस जन्माला आल्यापासुन देहाचे भरणपोषण करत असतो. शरीराला सुख मिळावे म्हणून नाना प्रकार माणूस करत असतो. पण जीवनाची निश्चीती कुणाकडेच नाही." संत चोखोबाराय हे सत्य सांगताना म्हणतात
" की माणुस एकटाच येतो आणि एकटाच जातो. हे सदैव आपण लक्षात ठेवले पाहिजे. आपल्या वाईट प्रसंगी कुणीही साथ देत नाही अंतकाळी सर्वजन पाठमोरे उभे रहातात. लोक सुखाचे सांगाती असतात. दुख वाटुन घ्यायला कुणी नसते. म्हणुन कशाचाच आणि कुणाचाच भरोसा धुरु नये. देहाचा किंवा नातेवाईकांचा खात्रीशिर विश्वास धरू नये. सर्वांनी विठ्ठलाला शरण जावे."
संत चोखोबाराय वारकरी परंपरेबद्दल म्हणतात की आमचा समतेचा , माणुसकीचा हा प्रवाह आहे.कुनीही या आणि शुद्ध होऊन जा.
खटनट यावे शुद्ध होऊनी जावे l
दवंडी पिटी भावे चोखामेळा ll
नितीन सावंत परभणी
9970744142
मेहुणाराजा दर्शन संत चोखोबाराय लेखमाला २९
मध्ययुगीन भारताच्या पटलावर जातीव्यस्थेने बरबटलेल्या लोकमनावर संत नामदेवांनी समतेचा, एकोप्याचा मळा फुलवायला घेतला होता. लोकांना माणुसकीचा धर्म शिकविने, भेदाभेदाच्या पलीकडे जावून एकात्म बनविणे हे नामदेवांच्या संत चळवळीचा मुख्य गाभा होता.नामदेवांच्या या कार्याचा सहवास संत चोखोबारायांच्या संपूर्ण कुटूंबाला लाभला होता.या संत नामदेवांच्या कार्याची एक शाखा संत निर्मळा आणि संत बंका महाराज हे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील मेहुणाराजा गावी चालवत होते. संत नामदेवांनी महाराष्ट्राच्या बोहर अनेक राज्यात आपल्या कार्याची छाप सोडलेले पुरावे आजही आपल्याला सापडतात. संत नामदेवांच्या शिकवणुकीचा सर्वात मोठा प्रभाव पंजाबवर आणि शिख धर्मावर आहे. संत नामदेवांप्रमाणे चोखोबारायांचा प्रभाव समाज मनावर पडला की नाही? संत चोखोबाराय ज्या भागातून जन्माला आले त्या परिसरातील समाजव्यवस्थने चोखोबारायांना स्विकारले की नाही? त्यांच्या जन्मभुमीत त्यांच्याप्रती लोकांच्या काय धारणा, भुमीका आहेत ? हे समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. सवर्ण नामदेवांना कुठेही वावरणे आपली छाप टाकणे तितकेसे आवघड नाही परंतू अस्पृश्य मानलेल्या चोखोबांच्याप्रती भारतीय समाजमन कसे वागले, हे जगासमोर आले पाहीजे.
म्हणुन एकदा संत चोखोबारायांच्या जन्मभुमीला भेट देण्यासाठी अभ्यास दौराच ठेवला.स्थानिकच्या ग्रामीन लोकांच्या गाठीभेटी घेता येतील, सहज कुठेही थांबून चर्चा करता येईल या हेतूने भोकरदनहुन दोन मोटार सायकलवरून चोखोबारांचे जन्मगाव बघायला आम्ही तिन लोकं निघालो. भोकरदन तालुक्यातील बरंजाळा लोखंडे गावचे अनिल भुतेकर, बाभुळगावचे ह. भ. प. शंकर महाराज राऊत आणि मी, असे आम्ही तिघांनी खेड्यापाड्यांचा रस्ता तुडवीत देऊळगाव राजाहून मेहुणाराज गाठले. देउळगाव राजा ते देऊळगाव मही या दोन छोट्याशा शहरांच्या मधे मेहुणाराजा गावाची कमान रोडवरच लागते. कमानीवर " श्री संत चोखामेळा मेहुणाराजा जन्मस्थान " असे पांढऱ्या अक्षरात रंगवलेले आहे. आम्हाला त्या भागाची माहिती देण्यासाठी देऊळगाव महीचे शिक्षक संतोष नागरे आमच्या आधीच मेहुणराजाला येऊन दाखल झाले होते. आम्ही कमानीतून गावात शिरलो गाव सुरू व्हायच्या आलिकडेच संत चोखोबारायांचे छोटेसे मंदिर आहे. समोर छोटासा सभामंडप आणि रिकामे मैदान आहे. संत चोखोबारायांच्या मंदिराच्या मागेच अगदी लागून निर्मळा नदीचे पात्र आहे.या पात्रात संत बंका महाराज आणि संत निर्मळा महाराज या दोघांच्या समाध्या आहेत.हे दोघे संत चोखोबारायांची बहिण आणि मेहुणे होत.या नदीवर आम्ही जेव्हा पोहंचलो तेव्हा तिथे दशक्रिया विधी चालू होता. स्थानिकच्या बऱ्याच लोकांकडून नवीन माहिती मिळाली. सर्वांशी चर्चा करून आम्ही मुख्य गावाची वेस, महाद्वार पहाण्यासाठी निघालो. हे गाव अत्यंत जुणे असल्याकारणाने या गावाला सर्व बाजूनी अत्यंत सुंदर अशी दगडी तड़बंदी होती. गावकरी अभय जाधव बोलताना म्हनाले की या गावाला पुर्वी १२ दरवाजे होते. आता चार दरवाजे आस्तित्वात आहेत. २०२० - २०२१ साली या गावची लोकसंख्या तिन हजार असावी असा त्यांनी अंदाज व्यक्ता केला. मेहुणाराजा गावची पाहाणी, फोटोग्राफी करून आम्ही सर्वजन संतोष नागरे यांच्या सोबत देऊळगाव महीला प्रा. कमलेश खिल्लारे यांच्याकडे निघालो. प्रा. कमलेश खिल्लारे हे संत चोखोबारायांच्या साहित्याचे अभ्यासक आहेत. संत चोबोबारायांचा जन्मोत्सव साजरा करण्यात सरांचा मोठा सहभाग , वाटा आहे. १४ जानेवारीला दरवर्षी मेहुणाराजा गावी चोखोबारायांच्या जन्मोत्सवाला विविध कार्यक्रम असतात.त्यात सरांचे व्याख्याब व मार्गदर्शन असते. सबंध जिल्हाभर संत चोखोबारायांचे आभ्यासक म्हणून खिल्लारे सरांचा नावलौकीक आहे. खिल्लारे सरांच्या घरी गेल्यानंतर सरांनी पुस्तक देऊन छोटासा सत्कार केला. सरांच्या घरीच त्यांनी वाचनालय उभे केले. खिल्लारे सर याच भागात अनाथ , वृद्ध आणि निराधारांसाठी कबिरालय उभे करत आहेत. खिल्लारे सरांनी संत चोखोबारायांच्या संदर्भात बराचवेळ चर्चा केली. दरवर्षी होत असलेल्या चोखामेळा जन्मोत्सवाची माहिती दिली. काही क़िस्से सांगितले.राजकारणी वर्गही आता संत चोखोबारायांच्या जन्मभुमीत रमु लागला आहे. शिवाय वैचारिक , बुद्धीजीवी वर्गातील संत चोखोबारायांच्या बद्दल एक सकारात्मक चर्चा चालु आहे.असे सरांनी सांगितले.
बरिच चर्चा करुन प्रा. कमलेश खिल्लारे यांच्या घरून आम्ही संतोष नागरे यांच्या घरी जेवण करण्यासाठी निघालो. मी अनिल भुलेकर, ह.भ.प. शंकर महाराज राउत आदिंनी संतोष नागरे यांकडे जेवणे केली. भुसुर चर्चा झाली. आणि "आम्ही तिघेजन पुढील प्रवासाला निघालो बुलढाण्याकडे.
भारतात जातीव्यवस्था अस्पृश्यता इतकी टोकाची आहे की ती माणुसकीचे काम करणाऱ्या संतांच्या बाबतीतही पाळली जाते. इतर संतांचा जेवढा जयजयकार झाला किंवा होतो आहे.त्यातुलनेत चोखोबांच्या वाट्याला अवहेलनाच आलेली दिसते आहे.इतर संतांची नावे ठेवुन वारसा जोपासाण्याची परंपरा कायम असताना चोखोबा नाव ठेवने या आजच्या जातीग्रस्त समाजव्यवस्थेला सुट होत नाही. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकोबाराय यांच्या आळंदी , देहू पेक्षा संत चोखोबारायांचे जन्मस्थाळ उपेक्षीत का ठेवले गेले असावे? सर्व संत सारखेच ना? मग मेहुणाराजा गावच्या विकासासाठी २०२० - २०२१ का उजाडावे ? काही अपवाद सोडल्यास महाराष्ट्रभर तुम्हाला कुठेही चोखामेळा चौक , चोखामेळा संकुल,चोखामेळा कॉलेज असे काही दिसनार नाही. जातीग्रस्त समाजमान, जातीग्रस्त राज्यव्यवस्था याला जबाबदार आहे.
एकदा मी संत गोरोबाकाकांच्या जन्मगावी तेरला गेलो होतो.तिथेही संत गोरोबाकाकांच्या मंदिर वजा वाड्याच्या बाहेर , पायरीच्या बाजूलाच छोट्याशा मंदिरात उभी केलेल्या दगडी शेळेच्या स्वरूपात चोखोबा तिष्ठत उभा होता.आपल्या मित्राची भेट घेण्यासाठी.याही चोखोबाच्या मंदिराला रंगरंगोटी नाही.अगदी चोखामेळा मंदिर हे नाव मिटत आलेले आहे.महाराष्ट्रभर हा चोखोबा पायरीलाच उभा केला गेला. खिन्न मनाने मी चोखोबारायांचा निरोप घेतला. माझ्या समोर करुण स्वरूपात आर्त भावनेने गाणारा चोखोबा उभा राहिला.
उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जाती हीनl
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दिन ll
Friday, 15 July 2022
संत चोखोबाराय जीवनचरित्र प्रकरण २८ वे ll विठु पाटलाला जोहार !
सरंजामशाही आणि श्रौतस्मार्त धर्माविरूध्द अध्यात्मिक क्षेत्राचे बंड.
नितीन सावंत परभणी
मो: 9970744142
जोहार मायबाप जोहार l मी विठु पाटलाचा महार ll
हिशोब देतो ताबेदार l लंकेचा कारभार की जी मायबाप ll
संत एकनाथ महाराज
भारतीय सामंतशाहीने सुरवातीला ‘प्रवाही जातीव्यवस्था’ जन्माला घातली आणि मग सरंजामशाहीने ‘बंद जातीव्यवस्था'. सरंजामशाहीत शोषित-पीडितात समान हितसंबध असते तर या सरंजामशाहीत वर्ग बनले असते.पण,या देशात जातीतही पोटजाती निर्माण झाल्याने ‘क्रमीक असमानता’ (graded inequality) जन्माला अल्याने येथे वर्ग बनु शकले नाहीत.या सरंजामशाहीच्या शोषनाच्या काळातील सर्वात महत्वाची पदे होती ती कुलकर्णी,सरदेशपांडे, सरदेसाई,देशमुख आणि पाटील यांच्याकडे.पट,पटवारी पासुन पाटील पद बनत गेल्याचा इतिहास आलीकडे उजेडात येत आहे.सुरुवातीला ही पदे ग्राम संस्कृती वसवण्यासाठी,तिचे जतन संवर्धन करण्यासाठी,शांतता,न्याय आबाधीत ठेवण्यासाठी होती.नंतर पुढे हिच पदे शोषन-पिळवणूक करणारी बनली.हे जेव्हा मध्ययुगीन काळात, शिवाजी राजांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी हे सरंजामशाहीतील चालत आलेली पदे बरखास्त करुन रोख रकमेत कारभार सुरु केला होता.रांझ्याच्या पाटलाला महाराजांनी धडा शिकवला असल्याचे आपण जानतोच. पण,शिवपुर्व काळात,या सरंजामदारांच्या विरोधात कुनालाही आवाज उठवता येत नव्हता.तसे केल्यास भिंतीत जिवंत गाडले जाई. जाहीर हत्या केली जाई.
हे भौतिकवादी वास्तव लक्षात घेवून संतांनी आध्यात्मिक क्षेत्रात सरंजामशाही विरूध्द बंड उभे केले होते.मग हे आध्यात्मिक क्षेत्रातील बंड कुनाच्या विरूध्द होते ? तर पंढरपूरच्या विठु पाटला विरूध्द होते.यात सर्व संतांनी भूमिका अशी घेतली की आधी या विठु पाटलाला लाडिक जोहार घालून,ही सभोवतालची विषमता, भेदाभेद,अस्पृश्यता,जातीव्यवस्था, पिळवणूक लक्षात आणून द्यायचे.हे सर्व विठु पाटला समोर मांडायचे.नाही ऐकल्यास त्याच्या विरूध्द बंड करायचे.म्हणून सर्वच संतांनी आधी या विठु पाटलाला जोहार घातला.हा जोहार घालताना सर्व संत एकजात वेसकर बनले.हा लाडीक झगडा सुरु झाला तो विठु पाटलात आणि वेसकर संतांच्यात.
जोहार हे अभिवादन अस्पृश्य,निम्नजातीयांसाठी होते.अस्पृश्यांनी उच्चजातीयांना जोहार घालायचा असतो.आपण गुलाम, हरलेले आहोत ही त्या अभिवादनामागची भावना.आपली औकात सदैव लक्षात रहावी असे हे जोहार संबोधन.
पण सर्वच संतांनी भेदाभेदाच्या भिंतींच मोडल्या होत्या.निम्नजातीयांचा जोहार सर्व संतांनी आनंदने स्विकारला आणि हा जोहार विठू पाटलाला घातला.सर्व संत त्या विठुपाटलाच्या दारात गेले आणि जोहार म्हनत आपले गाऱ्हाणे मांडायला लागले.जातीव्यवस्थेत जोहार घालण्याचे खरे अधिकार फक्त चोखोबांनाच, पण संत मंडळात उच्चजातीय ज्ञानेश्वर,एकनाथ यांनी सुद्धा जोहार घातला आणि समतेची वाट अधिक भक्कम केली.कुठलाही भेद ठेवला नाही.
संत तुकोबाराय म्हणतात,
जोहार जी मायबाप जोहार I सारा साधावया आलो वेसकर ll
संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
जोहार मायबाप जोहार l मी कृष्णाजी घरचा पाडेवार ll
संत एकनाथ महाराजही ३० पेक्षा जास्त अभंगांतून स्वताला वेसकर संबोधतात.ते म्हणतात,
मी निर्गुणपुरीचा महार l करिती जोहार ll एका जनार्धनी महार l पायाशी केला जोहार ll
पण,हे संत काही जन्माने जोहार घालनारे वेसकर नव्हते की,अस्पृश्य नव्हते.पण त्यांना विठु पाटलाच्या वाड्यावर वैदिकांची फिर्याद न्यायची होती.धार्मीक दहशत मोडीत काढण्यासाठी त्यांना विठु पाटलाला समजून सांगायचे होते.सभोवतालची अस्पृश्यता,भेदाभेद लक्षात आणून द्यायची होते.धर्मपुरोहीतांचा छळ आणि देवा धर्माच्या नावे होनारी लुट संतांना विठू पाटलाच्या कानावर घालायची होती .
इतर संतांच्यापेक्षा संत चोखोबाराय मात्र त्या व्यथा वेदना जाणणारे खरेच अस्पृश्य होते.त्यांना जोहार काय असतो हे अनुभवातून माहिती होते.म्हणून संत चोखोबारायांचा जोहार मानवी हक्कांसाठी आहे.
चोखोबा हे खरच वेसकर होते. जन्माने अस्पृश्य महार होते.जोहार कसा घालतात हे चोखोबांना अभंग लिहीताना अवघड गेले नसनार. चोखोबा वास्तवात जगले.संत चोखोबाराय विठु पाटलाला जोहार घालताना म्हणतात,
जोहार मायबाप जोहार l तुमच्या महाराचा मी महार ll बहु भुकेला जहालो l तुमच्या उष्ट्यासाठी आलो ll
बहु केली आस l तुमच्या दासाचा मी दास ll
चोखा म्हने पाटी l आनिली तुमच्या उष्ट्यासाठी ll
किंवा,विठु पाटलाचा महार l चोखा मेळ्याचा जोहार ll सकळ संतांचा कारभार l मज नाफराचे शिरी की जी मायबाप ll
संत चोखोबारायांचा जोहार मानवी हक्कांसाठीचा आहे.अन्न, वस्त्र, निवारा या भौतिक गरजांच्या पुर्तीसाठी चोखोबा जोहार घालत आहेत. आमच्या पाटीत उष्ट्ये आन्न तरी टाका म्हनने ही मागणी अत्यंत हृदयद्रावक आहे.आता तरी विठु पाटलाला पाझर फुटायला हवा.एक विशेष असे की येथे संत चोखोबाराय अस्पृश्य असुन सर्व संतांचा कारभार बघत असल्याने निर्भयपणे सांगत आहेत.मानवी हक्कांसाठी चोखोबाराय जोहार घालत आहेत.
हा विठु पाटील कोण आहे?
खरे तर हा विठु पाटील म्हणजे सभोतालचे जग आहे.अन्याय अत्याचार करनारी सरंजामशाही आहे.शोषण पिळवणूक करनारे श्रौतस्मार्त (श्रुती व स्मृती या धर्मग्रंथावर आधारित धर्म ) धर्माचे दलाल आहेत.त्यांच्या समोर हे संत आधी जोहार घालताहेत.त्यांना आशा आहे ही व्यवस्था बदलेन. यांना थोडातरी पाझर फुटेल पण हे जेव्हा जोहारावर शक्य नव्हते, तेव्हा संतांनी विठु पाटला विरुद्ध बंडखोरी केली.जोहार घालुनही त्याला फरक पडत नसेल.मायबाप म्हणूनही तो बदलनार नसेल तर मग आपन पुढचे पाउल उचलले पाहिजे ही नवी भूमिका पुढे आली.
बंडाची मुख्य कळ काढुन दिली ती संत नामदेवांनी
आणि मग, संत नामदेव म्हनाले
पतीत पावन म्हणवूनी l आलो तुझिया दारा ll
पतीत पावन नव्हेसी म्हनोनी जातो माघारा ll
झेंगट घेवून हाती l दवंडी पेटवीन तिन्ही लोंकी ll
देवा पतीत पावन नव्हेसी l तु मोठा घातकी ll
.पुढे त्यांच्या या बंडात संत गोरोबा काका,संत सावता महाराज,संत जनाबाई,संत चोखोबाराय,संत सोयराबाई,संत निर्मळा,संत बंका,संत कर्ममेळा,संत जगमित्र,संत नरहरी सोनार,संत कबिर, संत ज्ञानेश्वर महाराज आदी वेसकरांनी (संतांनी ) हिरहीरीने भाग घेतला.
संत जनाबाई म्हनाल्या,
आरे आरे विठ्या l मुळ मायेच्या कारट्या ll
तुझी रांड रंडकी होवो l तुझे मढे बसो ll
संत चोखोबारायांची पत्नी संत सोयराबाई म्हनाल्या,
जन्म गेला तुमचे उष्टे खाता l लाज न ये तुझ्या चिता ll
हे विठु पाटला तुला लाज वाटत नाही का रे ? हा संत सोयराबाईचा सवाल आहे.
पुढच्या काळात संत एकनाथ महाराज संत तुकोबाराय यांनी सुद्धा या विठु पाटलाच्या विरोधात बंड चालु ठेवले.
संत तुकोबाराय म्हणतात,
हरी तु निष्ठुर निर्गुण l नाही माया बहु कठीन l
नव्हे ते करसी आण l कवने नाही केले ते ll
बळी सर्वस्वे उदार l जेने उभारीला कर l
करुनी कहर l तु पाताळी घातला ll
हे विठु पाटला तु निष्ठुर आहेस. तुझ्याकडे मायादया नाही.तु बळीराजाला पाताळात घातलेस.
या विठु पाटलाशी अजुनही बंड चालु आहे.हे बंड चालु ठेवले आहे वारकरी मंडळींनी.ते सुद्धा दरवर्षी पंढरीला जावुन त्या विठु पाटलाला जोहार घालतात.आता हे बंड लाखोंच्या संख्येने उभे राहिले आहे.प्रत्येक मंदिरात सकाळी जोहार ने बंडाचा घंटानाद होतो.हे बंड सुरु आहे जातवर्गस्त्रीदास्यांतासाठी.हे बंड सुरु आहे आधुनिक विठु पाटला विरूध्द.हा विठु पाटील म्हणजे निमभांडवली निमसरंजामी जातवर्गीय ब्राम्हणी व्यवस्था.या विठु पाटलाला आता हे महागात पडनार आहे.श्रौतस्मार्त (श्रुती व स्मृती या धर्मग्रंथावर आधारित धर्म ) धर्माव्यवस्था नामोहरम होण्याच्या मार्गावर आहे.जोहारचा लोकजागर आता प्रबोधनात्मक बनला आहे.
म्हणून या सर्व संतांच्या सोबत विठू पाटलाला आमचा जोहार.
Tuesday, 12 July 2022
संत चोखोबाराय जीवनचरित्र प्रकरण २७ वे ll संत चोखोबारायांच्या साहित्त्यातील घुसखोरी ll
संत चोखोबाराय जीवनचरित्र प्रकरण २६ वे चोखोबारायांचा अनोखा वारसदार
संत चोखोबाराय जीवनचरित्र प्रकरण २६ वे
चोखोबारायांचा अनोखा वारसदार
" अंत्यविधी म्हणजे शेवटचा निरोप ! "
- कृषीभुषण कांतराव काका देशमुख.
झरी हे परभणी जिल्हयातील , परभणी - जिंतूर रोडवरील २० हजार लोकसंख्येचे गाव. झरी हे गाव म्हणजे भारताची छोटी प्रतिकृतीच. या गावात सर्व जातींचे घरे, लोकवस्त्या आहेत. या गावच्या विकासात कृषीभूषण कांतराव काका देशमुख यांचा फार मोठा वाटा मानला जातो. आज घडीला ६८ वर्ष वय असलेले काका हे अनेक चांगल्या कामांमुळे महाराष्ट्रभर लोकप्रिय आहेत. त्यात त्यांनी केलेले शेतीविषयक प्रयोग असतील, किंवा निसर्गाचे जतन संवर्धन असेल. जलसंधारणाची कामे असतील किंवा ' एक गाव एक स्मशानभुमी' ही त्यांची लोकचळवळ असेल.विधवा भगीनींची भाऊबीज घेने असो किंवा वृक्षलागवडीची चळवळ उभारणे असो.अशा अनेक गोस्टींमुळे काका लोकप्रिय आहेत.
त्यांच्या इतर कामावर अन्यत्र चर्चा करता येईल. आज त्यांच्या समतेच्या , बंधुभावाच्या , जातीअंतक, माणुसकीच्या कामाचा आढावा घ्यायचा आहे.
भारतात लोकशाही आल्यानंतर पटापटा भेदभाव अस्पृश्यता कमी होईल असे वाटले होते. पण ते तितकेसे वेगाने झाले नाही. गावगाड्यांत भेदभेद,अस्पृश्यता तसीच राहीली.जन्मभर हिनत्वदर्शक वागणूक आणि मृत्यूनंतरही प्रेतांची विटंबना होत राहिली.आजही गावोगाव भटके विमुक्त , आदिवासी आणि माजी अस्पृश्य जातींना भेदभावी वागणूक तर मिळतेच शिवाय त्यांना प्रेते जाळण्यासाठी हक्काचे , स्वच्छ मसनवाटे सुद्धा नाहीत.शेतकरी जातीतल्याही गरिब शेतकऱ्यांचे हेच हाल आहेत.गरिबांना प्रेत उचलायला खांदेकरीही मिळत नाहीत.प्रेतांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी स्मशानभूमीवरच्या वादांवरल्या बातम्या रोजच पेपरात झळकतात.
कांतराव काका देशमुख हे झरी गावचे सरपंच म्हणून वयाच्या २२ व्या वर्षी गावच्या कारभारात हस्तक्षेप करायला सुरुवात करतात.तेव्हापासून गावातील प्रत्येकाच्या सुखदुःखात न चुकता आवर्जून सहभागी होने हे त्यांचे कर्तव्य बनते.आपला गावकरी म्हणून ते प्रत्येक अंत्यविधीला जातीपातीचा विचार न करता जेव्हा हजर होतात, तेव्हा त्यांना पहायला मिळते ते जातीजातींचे स्वतंत्र मसनवाटे आणि हगंदरीत होनारी प्रेतांची विटंबना.गरिब जातीला प्रेत जाळण्यासाठी पुरेसे लाकडे मिळत नसत.घानीने भरलेले लाकडे टाकुन तसेच प्रेत जाळले जायचे.
नदिपात्रात प्रेत जाळत असताना पुर आला तर अर्धवट जळालेले प्रेत वाहुन जायचे.सलग पावसाळ्यात उघड्यावर जाळलेले प्रेत तिन तिन दिवस आर्धवट भिजत पडुन रहायचे.गरिब जातींच्या या प्रेतांना कुनीही वाली नसे . कुनी मदत करत नसे . यामुळे प्रेतांची विटंबना होइ.काही वेळेला टायर टाकुन प्रेत जाळले जाई. काही गरिब जातींना प्रेत जळण्यासाठी हक्काची जागाही नसे.गावातील श्रीमंत लोक पावसाळ्यात नदीपात्रात अंत्यविधी करता येत नाही म्हणून आपल्या स्वताच्या शेतात अंत्यविधी करत असत, परंतु ज्या जातींना शेतच नसे त्यांच्या प्रेताचा जाळण्याचा प्रश्न नेहमी उभा राही.
तारुण्यात या सरपंच झालेल्या युवकाच्या मनावर ही समस्या अत्यंत खोलवर घर करुन गेली आणि त्यांनी तेव्हाच एक संकल्प सोडला की, भविष्यात आपल्या गावात सर्वांत सुंदर, स्वच्छ, रमणीय आणि अंत्यविधीला आलेले लोक शांततेत बसुन शकतील अशी एक स्मशानभूमी बांधायची.
पुढील काळात त्यांनी गावात दवाखाना आनला,गावच्या विकासासाठी अनेक संस्था, सरकारी कार्यालये गावात आनली.त्यात काही वेळा जमीन दानही द्यावी लागली.पुढील काळात मात्र त्यांना स्वप्नातील आदर्श स्मशानभूमीच्या उभारणीसाठी गावात सरकारी किंवा गायरान असलेली जमीन काही उपलब्ध झाली नाही.साडे बारा हजार एक्कर शेती क्षेत्रफळ असणाऱ्या या झरी गावाला गायरान जमीन किंवा सरकारी जमीन नव्हती.गावात सर्वप्रकारच्या सेवा सुविधा आल्यानंतर काकांनी या स्मशानभूमीच्या उभारणीला हात घातला.काकांनी स्वखर्चाने एक एक्कर जमीन विकत घेवुन भव्यदिव्य अशी भली मोठी स्मशानभूमी बांधुन काढली.नेहमी सरपंच असणाऱ्या काकाकडे नेमके यावेळी सरपंच पद नव्हते.तसे ते २५ वर्षे सरपंच पदावर होते.यावेळी मात्र गावासाठी हे महत्वाचे काम करायचे आहे म्हणून त्यांनी सरपंच पद नसतानाही फार मोठा खर्च केला.ह्या स्वखर्चाने विकत घेतलेल्या जमीनीवर, बांधलेल्या स्मशानभूमीत त्यांनी देशी वृक्षांची लागवड केली.वड , पिंपळ , चिंच , कवठ , कडुलिंब, बेल , चंदन ही ऑक्सिजन देनारी झाडे त्यांनी बांधलेल्या स्मशानभूमीत लावली.ऑक्सिजन पार्क त्यांनी उभा केला.अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्यांना शांततेत बसता येइल यासाठी त्यांनी स्मशानभूमीत भरपूर बाकडे टाकले.शेवटचा निरोप देताना लोकांना आरामात बसता येइल , याप्रकारची व्यवस्था काकांनी केली.कंपाऊड वालवर म्हणी पेंट केल्या. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.स्मशानभूमीत देखरेखी साठी पगारीवर एक कुटुंब नियुक्त केले.ज्या जातीत दफनविधी केले जातात त्यांनाही काकांनी जमीन उपलब्ध करुन दिली. प्रेते जाळण्यासाठी जास्त लाकूडफाटा लागु नये , विनाकारण वृक्षतोड होऊ नये म्हणून त्यांनी अंत्यसंस्कार होताना शवदाहिनीची व्यवस्था केली. ही स्मशानभूमी बांधताना त्यांनी पुढील ५० वर्षाचा विचार करुन ही उभारणी केलेली आहे.त्यांच्या गावी आज घडीला एका वर्षात ६२ ते ६३ लोक मृत्युमुखी पडतात.एका प्रेताचा अंत्यविधी होऊन राख उचलेपर्यंत किमान तिन दिवस लागतात.मग पुढील काळात ही संख्या वाढनार म्हणून त्यांनी एकाचवेळी पाच ते सहा प्रेते जाळता येतील अशीही व्यवस्था केलेली आहे. आणि याप्रकारे राज्यभर कौतुक होइल अशी सुंदर स्वच्छ स्मशानभूमी काकानी उभी केली.सर्व वृत्तपत्रे , चायनल एवढेच काय बीबीसी मराठीनेही त्यांच्या या माणुसकीच्या, निस्वार्थी कामाची दखल घेतली आहे.
एकदा सहज रस्त्याने जाताना स्वखुशाली विचारण्यासाठी काकांनी एकजनाला काय चाल्लेय ? कसे आहात ? हा प्रश्न केला.तेव्हा ती व्यक्ती म्हनाली वडिल वारले आहेत, परंतू अंत्यविधीचे सामान बांबू वगैरे आनण्यासाठी पैसे नाहीत.त्या अंत्यविधीला काकानी त्वरीत मदत केली. आणि लाकडी दांड्यांवर आणि बांबूवर होणारा खर्च टाळण्याच्या दृष्टीने काकानी गावला स्टीलची तिरडी तत्वरित दान दिली. परंतू त्यांच्या लक्षात आले की स्मशानभूमी दुर अंतरावर आहे.तिरडीवर प्रेत नेण्यासाठी खांदेकरी तयार होत नाहीत.आणि अल्पसंख्याक जातींना तर खांदेकरी मिळने मुश्किल.मोठ्या जातीतले कुनी वारले तर ते लोक शहरातून स्वर्गरथ मागवायला लागले.त्यासाठी पाच हजार रुपये द्यावे लागत.गरिबांना स्वर्गरथ कुठून परवडनार.हा सर्व वृत्तांत जानुन काकांनी गावाला स्वर्गरथ दान देण्याचे ठरवले.परंतू पुढे त्यांच्या मुलिने म्हणजे जिजामाता कृषीभुषण मेघा विलासराव देशमुख यांनी आपल्या दिगवंत पतीच्या नावे गावाला स्टिलचा मजबूत असा ' विलासरथ' नावाने स्वर्गरथ दान दिला.
पुढे ठरले असे की काकांच्याच पेट्रोल पंपावरुन स्वर्गरथाच्या ट्र्याक्टर मधे फ्रीमधे पेट्रोल भरुन , काकांनीच उभारलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करायचे आणि मृत व्यक्तिला शेवटचा हार कांकाच्या काकाकडून राहिल.
ज्यांना स्मशानभूमी नव्हती त्यांना हक्काची स्मशानभूमी तर काकांनी दिलीच.परंतू ज्यांना आयुष्यभर कुनी हारही घातला नसेल आशा गरिब ,वंचीत,शोषीत,शेतकरी , शेतमजूर पिडीताला शेवटचा हार मात्र काकांचाच असतो.हे फार मोठे आणि प्रेरणादायी काम आहे.मंगळवेढ्याच्या वेशीतील ढिगार्यातून संत चोखोबारायांचे हाडे शोधुन आनुन पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वारात संत नामदेवांनी चोखोबांची समाधी बांधली.आणि त्या समाधीवर पहिला हार संत नामदेवांनी घातला.कृषीभुषण कांताराव काका देशमुख म्हणजे आधुनिक नामदेवच. निराधार , गरिब, शोषीत , वंचीत समुहातील हजारो चोखोबांचे अत्यंत सन्मानाने अंत्यसंस्कार करणारे काका हे खरे वारकरी होत.संत चोखोबाराय ज्या आत्मसन्मानाची लढाई लढत होते. त्या लढाईला कांताराव काका देशमुख यांनी आपल्या हाती घेतले आहे. चोखोबारायांराख्या कलंकित जीवन वाट्याला आलेल्यांना मरताना तरी कलंकित्वात मरु देवु नये म्हणून काकांनी केलेले काम अत्यंत उंचीवरले आहे.
सुरुवातीला लोकांचा गैरसमज असा झाला की , ही उभारलेली स्मशानभूमी केवळ स्वजातीसाठीच आहे.गावात तशाप्रकारची सुप्त चर्चा होत राहिली.पुढे गावात बोद्ध समाजातील ग्रहस्थ होनाजीराव सावंत वारले. काका तेव्हा मुंबईतला होते.हातातील कामे टाकुन ते मुंबईतहुन गावी आले आणि होनाजीराव यांच्या कुटूंबातील सदस्यांशी बोलुन नव्या स्मशानभूमीत पहिला अंत्यविधी केला.पुढे लोक पुन्हा म्हनायला लागले की ही स्मशानभूमी मागासवर्गीयांसाठी बांधली आहे . नंतरच्या काळात काकांच्या कुटूंबातील व्यक्ती म्हणजे सख्खे भाऊ प्रसादराव देशमुख वारले.हा दुसरा अंत्यविधी करुन काकांनी ही स्मशानभूमी सर्वांसाठी आहे हे सिद्ध केले.त्यानंतर सर्वांचे अंत्यसंस्कार या स्मशानभूमीत व्हायला लागले.काकांच्या या स्मशानभूमीत पहिला अंत्यसंस्कार माजी अस्पृश्य जातीतला झाला, हे फार मोठे समतेचे माणुसकीचे पाऊल आहे.कारण याच परभणी जिल्ह्यात आजही मातंग , बोद्ध , चर्मकार, आणि भटक्या विमुक्त जातींना हक्काच्या स्मशानभूमी नाहीत.प्रेते जाळण्यासाठी सतत संघर्ष होतो.तासनतास प्रेत तसेच ठेवुन प्रचंड वाद होणाऱ्या घटना आजही घडतात.भांडणे विकोपाला जातात.त्या दृष्टीने हे काम मोठे महत्वाचे माणुसकीचे आहे.
दोन हजार साली सुरु केलेले हे काकांचे काम आज परभणी आणि मराठवाडाभर लोकचळवळ बनले आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गावांत आता 'एक गाव एक स्मशानभूमी' ही संकल्पना राबवली जात आहे.यासाठी अनेक गावांनी पुढाकार घेतला आहे.८० ते ९० गावांत या दृष्टीने काम सुरु आहे.झाडे लावुन , शवदाहिनी बसवुन , सर्व जातींना प्राधान्य देनार्या आणि काही अटिंची पुर्तता करणाऱ्या गावातील स्मशानभूमीला काकांनी १ लाख रुपयाचे बक्षिसही जाहिर केले आहे.खरे तर ही लोकचळवळ राज्यदरबारी जावी.बाबा आढाव यांच्या एक गाव एक पानवठा या लोकचळीसारखी याही संकल्पनेची दखल घेतली गेली पाहिजे.कृषीभुषण कांतराव काका देशमुख यांचे नाव देवुन एक गाव एक स्मशानभूमी ही योजना सरकारने कायदेशीररित्या राबवावी.प्रत्येक जातीच्या स्मशानभूमीला स्वतंत्र निधी देवुन जातीजातीत फुट पाडनारे जातीवादी काम सरकारने थांबवावे.आणि गाव तिथे एक स्मशानभूमी उभारणीला, समतेच्या मार्गाला सरकारने स्विकारावे.कांताराव काका देशमुख यांना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रभुषण देवुन त्यांचा सन्मान करावा.
काका म्हणतात " आपण जन्माला येताना काही कुठे अर्ज केला नव्हता की मी अमुक जातीतच जन्माला यावे.कोण्या जातीत जन्माला यावे हे आपल्या हतात नसते.जात ही अपघाताने मिळालेली असते.ती काही कर्तबगारी नव्हे.म्हणून ती मिरवण्याची गोस्ट नाही. जातीभेद करु नये.आणि मरताना कुणाच्याही प्रेताची विटंबना होऊ नये.मृत पावलेल्या देहाचे अत्यंत सन्मानाने अंत्यसंस्कार व्हावेत या मताचा मी आहे. अंत्यविधी म्हणजे शेवटचा निरोप ! "
काकांच्या या विचारांना साष्टांग दंडवत..
काकांचा संपर्क : मो : 9423776600
नितीन सावंत परभणी
9970744242
संत चोखोबाराय जीवनचरित्र प्रकरण २५ वे चोखोबांचे वारसदार
संत चोखोबाराय जीवनचरित्र प्रकरण २४ वे जातीअंताचे वारकरी शिलेदार
संत चोखोबाराय जीवनचरित्र प्रकरण २४ वे
जातीअंताचे वारकरी शिलेदार
संत नामदेव, संत चोखोबाराय आणि त्या काळातील समकालीन सर्वच संतांनी भेदभावावर आक्षेप नोंदवलेला आहे. अस्पृश्यता आणि जातीभेद संत नामदेव यांच्या संतमंडळाला मान्य नाही. जातीअंताची प्रखर भुमिका घेऊन हे सर्व संत उभे राहिले होते. म्हणुनच पुढच्या काळात हा जातीअंताचा केंद्रबिंदू पकडुन त्यावर अनेकांनी काम केले.संतांना केवल भक्तीच अपेक्षीत होती का ? तर नाही. वारकरी संतांना भक्तीचे माध्यम वापरून समतेचे ध्येय साध्य करायचे होते. भक्ती हे साधन होते, आदर्श समाज निर्मातीसाठी.आज घडीला मुख्य उद्देशापासुन वारकरी चळवळ जरी भरकटली असेल. तरही अनेकांनी मात्र जातीअंताचे काम केल्याचे दाखले इतिहासात जागोजागी उपलब्ध आहेत.संतांची प्रेरणा घेवुन अनेकांनी समतेचे , माणुसकीचे काम केल्याचे आपल्याला दिसेल.
संत चळवळीचा दुसरा कालखंड किंवा दुसरा टप्पा संत एकनाथ महाराज व संत तुकोबारायांचा काळ मानता येईल.संत नामदेव, संत चोखोबाराय आणि त्यांचे संत मंडळ गेल्यानंतर इ.स. १५४८ ते १५८e हा संत एकनाथ महाराजांचा कालखंड तर १६०८ ते १६५० हा संत तुकोबारायांचा कालखंड मानला जानो. नामदेवांच्या संत मंडळात 'हिन केली आमुची याती " हा प्रश्न संत चोखोबाराय आणि त्यांच्या कुटुंबियांनी विचारला होता. 'मज दूर हो' म्हनती ही चोखोबारायांची मनातील सल होती. चोखोबारायांच्या या वेदनेचा, दुखाचा संत एकनाथ महाराजांवर खूप प्रभाव पडलेला दिसुन येते. संत एकनाथ महाराजांना संत चोखोबारायांची वेदना अत्यंत दुखद वाटली होती आणि म्हणून एकनाथ महाराजांनी चोखोबारायांना प्रेरणा मानुन जातीअंताचे गुरू काम केले होते. पैठण ही सनातनी कर्मठ ब्राम्हणांची नगरी होती.या कर्मठ नगरीत संत चक्रधर स्वामींना खुप त्रास देण्यात आला होता.त्या नागरीत संत एकनाथ महाराजांनी कुनालाही न जुमानता जातीअंताचे अस्पृश्यता निर्मुलनाचे काम केले होते. जोहार हे संबोधन केवळ गावच्या माजीअस्पृश्य जातीसाठीच होते. अस्पृश्यांनी जोहार घालावा असा त्याकाळी प्रघात होता. संत एकनाथ महाराज जन्माने ब्राम्हण असुन त्यांनी ब्राम्हणत्व टाकुन देऊन ते डिकास्ट बनले होते.ते स्वतः अभंग लिहुन जोहार घालत होते. त्यांनी ३० पेक्षा जास्त अभंगातून जोहार घातलेला आहे. संत चोखोबारायांच्या जीवनातील सोसाव्या लागलेल्या वेदना त्यांचे जगणे संत एकनाथ महाराज स्वतःच्या रूपाने मोडत होते.संत एकनाथ महाराज आनेक अभंगात स्वतःला महार संबोधुन घेतात. ते आपल्या अभंगात महारांचे संबोधन जोहार घालतात.अस्पृश्यत्वाची अनुभूती ते आध्यात्मिक भक्तीपंथात घेतात. ते म्हणतात
" जोहार जी मायबाप जोहार l मी एकनाथ महार l सीगतो सारासार विचार l तो ऐका जी मायबाप ॥"
किंवा
जोहार मायबाप जोहार । मी जनार्दनाचा एका महार | सांगतो तुमचे नगरीचा समाचार । की जी मायबाप l तो ऐका की जी मायबाप ll
आशा अनेक अभंगातून संत एकनाथ महाराजांनी अस्पृश्यांची बाजू घेऊन त्यांची वेदना मांडली होती.
एका उच्चजातीय व्यक्तीने स्वतःला महार म्हणवून घेने क्रांतिकारी,धाडसाचे आहे. त्याकाळी प्रत्येक सरंजामदाराच्या हताखाली चाकरी करण्यासाठी , त्याच्या हाताखालील कामे करण्यासाठी तत्कालीन महार , मातंग आदी जातींचे लोक असत. हे रुपक वापरताना संत एकनाथ महाराज मी संत जनार्दन स्वामी यांच्या घरचा महार आहे असे म्हणवून घेतात.सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की संत एकनाथ महाराज अगदी अस्पृश्यांच्या ग्रामीण बोलीचा,गावकुसाबाहेरच्या बोलीचा जशाला तसा वापर करतात. माजी अस्पृश्य जाती पुर्वीला जी लावून बोलत असत.संत एकनाथ महाराजही अगदी जी लाऊन अभंग लिहीतात. महाराला गावकीत काय काय कामे करावी लागतात, ते सर्व वर्णन एकनाथ महाराजांनी करुण ठेवलेले आहे. या पद्धतीने त्यांनी केवळ जोहार घालून अभंगच लिहीले नाहीत तर भौतिकवादात अस्पृश्यता निर्मुलनाचे कामही केले होते. ते जसे बोलले तसे त्यांनी करुन दाखवले होते. या बद्दल बा. रं. सुष्णकर लिहीतात. " एकनाथांनी जातिभेदाविरुध्द फार मोठे बंड उभे केले होते. पितरांच्या श्राध्दाच्या दिवसी आपल्या घरी अंत्यजांना जेवू घालून, उन्हात तळमळणारे महाराचे मुल कडेवर घेऊन, आपल्या अंथरूणावर वडाऱ्याला निजायला ठेवून, राणू महाराकडे सर्वासमक्ष स्वतः जेवायला जाऊन एकनाथांनी रूढ जातिनिर्बंध झुगारून दिले. " मध्ययुगीन भारतात संत एकनाथ महाराजांनी या भेदाभेदाच्या विरोधात लिखानही केले आणि तसे जातीअंताचे प्रयोगही केले. त्याकाळी सहभोजनांचा प्रयोग करणे क्रांतीकारी म्हटले पाहिजे अस्पृश्यांच्या सहवासात राहून दाखवणे, त्यांची बोली बोलणे आणि त्यांच्या सोबत अन्न ग्रहण करणे हे धाडसी आणि माणुसकीचे काम संत एकनाथ महाराजानी करून दाखवले होते. संत एकनाथ महाराज यांच्या गुरुचे म्हणजे जनार्दन स्वामी यांचे गुरू संत चांद बोधले हे मुस्लीम होते.त्यामुळे सुफी परपरेचाही वारसा संत एकनाथ महाराजांकडे आला होता.त्यातून ते अस्पृश्य निर्मूलनाचे प्रयोग करु शकले.थोडक्यात काय वारकरी सुफी मिलाफातून संच एकनाथ महाराज जातीअंताचे -प्रयोग करू शकले होते.
संत एकनाथ महाराजांच्या नंतर या भेदाभेदाच्या विरुद्ध, ब्राम्हणी ब्यूरोक्रॉसी विरुद्ध संत तुकोबारायांनी आघाडी उघडली होती जन्माने हिन मानने तुकोबारायांना मान्य नव्हते.
" अभक्त ब्राम्हण जळो त्याचे तोंड l काय त्यासी रांड प्रवसवली । वैष्णव चांभार अन्य त्याची माता l शुद्ध उभयंता कुळयाती ll
अशी गुणकर्मावर श्रेष्ठत्वाची भुमीका संत तुकोबारायांनी घेतली होती. त्यांना अस्पृश्यतेचा, जातपात मानणार्यांचा तिटकारा होता. ते म्हणायचे "" विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ ll तुकोबारायांच्या अभंग गाथेत शेकडो अभंग जातीभेद,अस्पृश्यता पाळणाऱ्याना, जन्माने श्रेष्ठत्व मिरवणाऱ्याना खडे बोल सुनवनारे आहेत.त्यांचे म्हणने होते वाण्याच्या दुकानातून गुळ आनयचा असेल तर त्याची जात आणि कुल कशाला विचारावे ? अस्प्रश्य संतांच्या वाट्याला आलेल्या दुःखद वेदना भविष्यात कुनाच्याही वाट्याला येवू नयेत म्हणून तुकोबाराय काम करत होते. आपल्या साहित्य निर्मीतून त्यांनी जगाला माणुसकी शिकवणारा संदेश दिला होता. तुकोबारायांचे अस्पृश्यतेला, जातीव्यवस्थेला विरोध करणारे अभंग पाहिले की वाटु लागते की ते संत चोखोबारायांचे अंतरीचे दुःख जाणून होते संत तुकोबारायांनी इंद्रायणीहुन आंघोळ करुन येताना दर्शन घेण्यासाठी संत चोखोबारायांचे छोटे मंदिरही बांधले होते.म्हणजे विठ्ठल , नामदेव यांच्या बरोबर संत तुकोबारायांची प्रेरणा संत चोखोबाराय सुद्धा होते.चोखोबारायांसाठी तुकोबांनी जोहार तर घातलाच शिवाय आपल्या अभंगातून चोखोबारायांचा आदरपूर्वक उल्लेखही केलेला आहे. ते उंच नीच काही नेणो भगवंत या अभंगात तुकोबाराय म्हणतात
" सज्जन कसाया विकु लागे मांस | माळ्या सावत्यास खुरपु लागे ॥ नरहरी सोनारा घडवू फुंकू लागे । चोखामेळ्यासंगे ढोरे ओढी ॥
आमचा देव ब्राम्हणांच्या सारखा उचनिच
भेदभाव करत नाही तो सज्जन कसायासोबत मांस विकु लागतो , चोखोबारायांसोबत मेलेली ढोरे ओढु लागतो. शिवाय " पवित्र ते कुळ पावन तो देश " या अभंगात चोखोबारायांचा उल्लेख करताना संत तुकोबाराय म्हणतात
चोखामेळा बंका जातीचे महार । त्यासी सवैश्वर ऐक्य करी ll
आमच्या सर्वेश्वर भेदभाव करत नाही. तो सर्वांना समान मानतो. हा संदेश तुकोबाराय देतात. संत चोखोबारायांची बाजू घेताना संत तुकोबाराय म्हणतात
" चोख्याचे अभंग करविले देवानी | स्वप्नीही येऊनी सांगितले ll चोखिया म्हणोनी निंदतील कोणी l लागोणी बरे मजला भोगीन पहाती ।।
माझ्या चोखियाचे नित्य घेती नाव l त्याच्या घरी धाव जाय माझी ॥
तुका म्हणे चोखा युगायुगीचा भक्त । म्हणोनी पंढरीनाथ ऋणी त्याचा ll
या अगातून संत चोखोबारायांनी निंदा करणार्यांना संत तुकोबारायांनी चांगलेच फटकारले आहे. जे लोक संत चोखोबारायांचे नित्य, नियमीतपणे चांगले नाव घेतील त्यांच्याकडे तुकोबाराय जाने येणे ठेवतील असे तुकोबारायांचे म्हणने आहे. त्यांचे चोखोबांच्या प्रती आदरयुक्त बोल आहेत. याचा एक अर्थ असाही निघतो की संत तुकोबारायांच्या आजूबाजूला संत चोखोबांची निंदानालस्ती चालु होती. म्हणून त्यांना ठणकावून सांगावे लागले की खबरदार चोखोबांची कुनी निंदा कराल तर. ऐके ठिकाणी तर तुकोबारायांनी 'चोखा माझा गणपती, म्हणून त्यांना प्रमुख भुमीकेत आनुन बसवले आहे. संत चोखोबारायांना एवढ्या उंचीवर नेवारे तुकोबाराय होते. महाराष्ट्रीतील मराठ्याच्या, कुणब्याच्या घरातील सर्वाधीक लोकप्रिय संताने संत चोखोबारायांचा एवढा सन्मान करणे क्रांतीकारी आहे. दोन जातींना सांस्कृतिक ऐक्याने जोडनारे प्रतिक तुकोबाराय आहेत. तुकोबाराय म्हणजे सामाजिक आर्थिक सर्वहरा जातींच्या क्रांतीदोस्तीचे तत्वज्ञान निर्माण करणारे महान व्यक्तिमत्त्व होते. ते सामाजातील शेतकरी जाती व अस्पृश्य जातींना जोडणारा दुवा आहेत. संत चोखोबारायांचे एवढे मोठेपण मांडणारे तुकोबारायच !
बघा अनखी ऐके ठिकाणी तुकोबाराय काय म्हणतात.
"रायाचे सिपाई हजाराचे बारा l लाखाचा मोहरा प्राणी एक ll सवारूपयाची येती पाच मोती | हजाराची येती जोड़ी एक ll रुपायाच्या कवड्या मधे भरे गोणी l मोहर बांधुनी पदरी न्यावी ll शंभर लोकांत सद्गुणी ऐका | तुका म्हणे चोखा पंढरीचा ॥
ग्रामीण भागात बोलताना आपण नेहमी म्हनतो आमचा गडी लाखात एक आहे. अगदी तसेच संत तुकोबाराय चोखोबारायांच्या बद्दल बोलनताना म्हणतात "आमचा चोखोबा लाखात एक आहे"
नितीन सावंत परभणी
9970744142
संत चोखोबाराय जीवनचरित्र प्रकरण २३ वे मुसलमान संताची जातीअंतक भुमीका
देवाची भक्ती चोखामेळा करी | त्यास लोक धरिती दुरी ।
"वैकुंठी महारवाडा वेगळा करी । नांदावया तयासी ? ॥
ऊँच-नीच नदीत शिरोन । बाहेर निघती कुंभ भरोन् ।
मग म्हणती, स्पर्शो नका , चला दुरोन' |
उदकांत उभयता उभी होती ॥
- संत शहामुनी, (संदर्भ:- मुसलमान मराठी संतकवी. रा. चिं. ढेरे आवृत्ती २१जुलै २०१४ पान १२२ )
भारतातील पहिली मस्जिद इ.स. ६२९ च्या कालखंडातील.ही मस्जीद केरळ राज्यात कोर्डगलूर तालुक्यातील मेयला या गावी आहे. ही मस्जीद हिंदू (द्रवीड) चेरामन पेरुमल यांच्या नावे आहे. हे चेरामन खुद्द रसुल्लला सल्लल्लाहु वल्लेही अस्सलम अर्थात मुहम्मद पैगंबर यांना भारतातून भेटायला गेले होते.भेट घेवुन भारतात येताना ते वारले.सहाबा लोक आणि चेरामन यांच्याद्वारे इस्लाम भारताच्या किनाऱ्यावर आला. त्यामुळे भारतात पहिले इस्लामचे आगमन दक्षिण भारतात झाले.ते काही नंग्या तलवारी हतात घेवुन नव्हे.त्याप्रमाणे खैबर खिंडीतूनही अनेक सुफी संत भारतात आले. राजस्थानमधील आजमेरचे सूफ़ी मोइनुद्दीन चिश्ती ख्वाजा गरीब नवाज(११४१ - १२३६ ई॰) हे थेट मक्केहून भारतात आले होते. उत्तर भारतातूनही दोन वेळा सातशे , सातशे अशा चौदाशे सुफी संतांच्या पालख्या महाराष्ट्रात आल्या होत्या.
दक्षिणेस केरळमधे आलेले सहाबा आणि उत्तर भारतात उतरलेले सुफी या ईस्लामच्या संतांनी भारतात आल्यानंतर सर्वप्रथम अस्पृश्यता ही मनुष्यनिर्मित आहे, हे जगजाहीर सांगितले. त्यांनी जातीव्यवस्था अस्पृश्यतेला कडाडून विरोध केला.ते अस्पृश्यांच्या सोबत एका ताटात जेवायला लागले.अस्प्रश्यांना कडकडून अलिंगण द्यायला लागले.अस्पृश्यांच्या जखमा धुवून त्यांना मलमपट्टी करुन त्यांची सेवासुश्रृषा करण्याचे काम सुफी संतांनी केले होते. भारतात सुफी संत येण्या अगोदर अस्पृश्यता ही ईश्वर निर्मात मानली जायची. हे सर्व पुर्वजन्मीचे भोग आहेत असे अस्पृश्यांच्या मनावर बिंबवले जायचे.त्यांना गुलाम बनवलेले होते.
सुफी संतांनी या खोट्या आफवा धुडकावून लावल्या. आणि माणुसपणाची शिकवण द्यायला सुरुवात केली.म्हणूनच जातीव्यवस्था अस्पृश्यतेला कंटाळलेल्या मोठ्या जनसमुदायांनी या देशात धर्मांतर केले.महाराष्ट्रात सुफींचे प्रचारक आणि वारकरी संत यांचा एकमेकांवर मोठा प्रभाव आहे. वारकरी सांप्रदायावर सुफींचा एकेश्वरवाद मोठा प्रभाव टाकुन गेलेला आहे. शिवाय संत तुकोबारायांनीही कबीर ,लतिफ, मोमीन या तिन मुस्लीम संतांचे आदाराने उल्लेख केलेले आहेत. व्यावसायावरुन हिन लेखु नका असे सांगताना " आमचा विठ्ठल सज्जन कसाया सोबत मांस विकू लागतो " असेही तुकोबाराय म्हणाले आहेत. संत एकनाथ महाराजांचे गुरू संत जनार्धन स्वामी. आणि संत जनार्धन स्वामी , यांचे गुरु संत चांदबोधले होते.हे संत चांदबोधले सुफी परंपरेतील होते. संत चांद बोधले यांना दोन लोकप्रिय शिष्य लाभले.एक म्हणजे संत जनार्धन स्वामी आणि दुसरे म्हणजे श्रीगोंद्याचे शेख मुहम्मद महाराज श्रीगोंदेकर होत. या शेख मुहम्मद महाराज श्रीगोंदेकर यांचे आणि तुकोबारायांचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे होते.
याच सुफींच्या प्रभावक्षेत्रातील आनखी एक नाव म्हणजे संत शहामुनी होत. संत शहामुनींचा जन्म श्रीगोंदा तालुक्यातील पेडगावला इ.स. १६४८ला झाला आणि त्यांचा शेवट शहागड (जि. जालना ता. अंबड) ला १८०८ला झाला. शहागडला त्यांची समाधी आहे. है संत शहामुनी मुस्लीम संत होते त्यांनी महानुभावांच्या शिकवणुकीला साजेल असा सिद्धांतबोध हा ग्रंथ लिहीला आहे. हा ग्रंथ महानुभव पंथात सर्वाधीक लोकप्रिय आहे. आजही महानुभव या ग्रंथाचे पारायणे करतात.
याच महानुभव मुस्लीम संताने वारकरी परंपरेवरही लिहीले आहे.सुफी, महानुभव आणि वारकरी यांच्यातला समन्वय साधनारे संत शहामुनी होत. संत शहामुनी यांनी आपले कार्य आणि साहित्यनिर्मीती करताना भारतीय उच्चजातीयांचे जातीवादी मुल्ये थेट नाकारली आहेत.अस्पृश्यता ही, ईश्वर निर्मीत नाही.हे त्यांनी ठणकावुन सांगितले. जातीभेदाला, अस्पृश्यतेला त्यांनी विरोध केला होता.अस्पृश्य जातीतून आलेल्या संत चोखोबारायांची त्यांनी सन्मानपूर्वक बाजु घेतली.जातीवाद करणाऱ्या समुहाला संत शहामुनी यांनी काही प्रश्न विचारले आहेत.ते म्हणतात की " ईश्वर भक्ती करणाऱ्या संत चोखामेळ्याला वैकुंठात वेगळा महारवाडा असेल काय ?" उच्च -निच भेदभाव पाळता, स्पर्श करू नको दुर हो म्हणता मग ईश्वर भेदभाव पाळतो का? त्याच्याकडे स्वर्गात अस्पृश्यांसाठी वेगळी वस्ती आहे का?.नदीच्या पाण्यात भेदभाव असतो का ? तिथे तर सर्वजातीपातीचे बुडतात , ओले होतात.नदी आणि पाणी भेदभाव करत नाही.एकाच पाण्यात स्पृश्य आणि अस्पृश्य आंघोळ करतात.आणि वर आल्यानंतर म्हणतात तु अस्पृश्य आहेस मला शिवु नकोस.हे कसे चालेल ? हे संत शहामुनी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. एक मुस्लीम संताने अस्पृश्यांची बाजू घेऊन व्यक्त केलेला निर्भीडपणा वाखाणण्याजोगा आहे. त्यावेळी उच्चजातीयांना नक्कीच हे झोंबले असेल. स्पेशली धर्मपुरोहीत वर्गाच्या काय प्रतिक्रिया असतील याचा अंदाज आपन बांधु शकतोत.
संत शहामुनींच्या आधी साधारण पाचशे ते साडे पाचशे वर्षापूर्वी होऊन गेलेल्या संत चोखोबारायांवर अभंग लिहुन त्यांची वेदना समाज पटलावर ठेवणे हे मोठे गौरवाचे काम आहे. संत चोखोबारायांचा, संत नामदेवांचा जातीअंताचा "लढा संत शहामुनी पुढे चालवत होते. एक मुस्लिम संत अस्पृश्यांसाठी लढत होते.प्रस्थापीत मिरासदार, सरंजामदारांच्या व ब्राम्हणशाहीतील कर्मठ ब्राम्हणवाद्यांच्या विरोधात जावे लागले तरी हरकत नाही या भुमीकेतून त्यांनी संत चोखोबारायांचे दुःख, पिडन पुन्हा चर्चेत आनले होते.
अहमदनगर, बिड, जालना या भागात संत शहामुनी यांनी अस्पृश्यतेला विरोध करणारे प्रबोधन केल्याचे वरील अभंगावरून लक्षात येते. माणुसकीचा उपदेश त्यांनी सर्वांना केला होता. संत जगाबरोबर वहात जात नाहीत , तर त्यांना दिसलेल्या खोट्या गोष्टींना ते विरोध करतात. ते जग बदलवतात.जगाला दिशा देतात. संत चोखोबारायांचे थेट नाव घेवुन संत शहामुनी यांनी आपली नाळ वारकरी परंपरेशी जोडली आहे. जातीअंताचा मार्ग त्यांनी चोखोबारायांना चर्चेत आनुन निवडला आहे. संत नामदेव , संत चोखोबारायांसारखाच माणुसकीचा धर्म शहामुनी सांगत होते. आपणही संत चोखोबारायांचा, संत शहामुनी यांचा भेदभाव विरहीत माणुसकीचा धर्म जोपासुया, वाढवूया.
नितीन सावंत परभणी
9970744142
Sunday, 10 July 2022
संत चोखोबाराय जीवनचरित्र - प्रकरण २२ वे l चोखोबाराय आणि आंबेडकरवादी चळवळ
२६ जानेवारी १९५० रोजी भारतात संविधान लागू झाले. खऱ्या अर्थाने सर्व शोषीत, पिडीत,अस्पृश्यांना स्वतंत्र्य मिळाले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मुक्त संचार स्वातंत्र्य, दर्जा आणि समान संधी अशा कित्तेक मानवी हक्काच्या गोष्टी, हजारो वर्षे मुक्तीदात्याची वाट पाहुन अस्पृश्य जातींच्या पदरात पडल्या होत्या. 'अभिव्यक्तीचे' स्वतंत्र्य काय असते हे नव्या पिढीला कळणार नाही.केवळ देवाच्या दारात उभे राहुन अभंग का म्हनतो म्हणून अनेक यातना दिले गेलेले संत चोखोबाराय डोळ्यासमोर ठेवले की किंवा "घोकाव्या अक्षर मज नाही अधिकार " म्हणनारे तुकोबाराय डोळ्यासमोर ठेवले की अभिव्यक्त होण्यावर सुद्धा या देशात बंदी आसल्याचे, अभीव्यक्तीवर कडेकोट पहारे बसवले गेल्याचे आपल्या लक्षात येते. मराठ्याच्या , कुणब्याच्या घरात जन्माला आलेल्या तुकोबारायांना जर अक्षरे घोकु दिली जात नसतील तर संत चोखोबारायांसारख्या अस्पृश्यांचे काय हाल असतील ? याचा अंदाज आपण बांधु शकतो. म्हणून मध्ययुगीन भारताच्या जातीव्यवस्था कठोर असल्याच्या काळात संत चोखोबांच्या परिवाराने अभिव्यक्त होने धाडसाचेच म्हणावे लागेल. भागवत धर्माच्या वाटेने एकच चोखोबा अभिव्यक्त होऊ शकला, त्याचा उद्धार संत नामवादी संतांनी केला. पण हजारों अस्पृश्य, हजारो चोखोबा अभिव्यक्तीसाठी, बरोबरीचा दर्जा मिळण्याची वाट पहात होते.
पुढील काळात संविधान देवून , करोड़ो चोखोबारायांना समतेच्या प्रवाहात आनुन, सर्वांच्या बरोबरीला बसवण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. करोडो चोखोबारायांना अस्पृश्यतेच्या जाचक गुलमगिरीतून बाबासाहेबीना मुक्त केले. "आम्ही अस्पृश्य का ? " आमचा विटाल का पाळता? असे म्हणनाऱ्या चोखोबारायांना बाबासाहेबांनी न्याय मिळवून दिला. २६ जानेवारी १९५० रोजी संत चोखोबारायांना न्याय मिळाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत चळवळीचे नाते जवळचेच होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी आंबेडकर हे कबीरपंथी होते बाबासाहेबांच्या लहानपणी त्यांच्या घरामधे अभंग, दोहे यांचे वाचन होत असे. त्यामुळे संत चळवळीची पहिली ओळख बालवयातच बाबासाहेबांना झाली होती. "त्यामुळे त्यांनी बुद्ध आणि फुले आपले गुरु मानले, त्यात संत कबीर यांना सुद्धा गुरू म्हणुन " स्थान देऊन संत चळवळीशी आपला धागा कायम ठेवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या अनेक भाषणांत 'संतांचे अभंग दाखले देण्यासाठी वापरत असत. २० जुलै ११९४२ ला नागपुर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अहिंसेची समर्पक व्याख्या सांगताना
" दया तिचे नाव भुतीचे पालन ।
आणिक निदालन कंटकाचे "
या अभंगाच्या ओळी वापरल्या होत्या. संत तुकोबारायांच्या याच्या ओळी वापरून डॉ. बाबासाहब आंबेडकर त्यांनी सविस्तर भुमिका सुध्दा मांडली होती. या देशात शुद्र अतिशुद्र मुके आहेत. त्यांना अभिव्यक्ती स्वतंत्र्य सुद्धा नाही, हे लक्षात घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मुकनायक' हे वृत्तपत्र सुरू केले. मुकनायक हे पाक्षीक होते. या मुकनायकाचा पहिला अंक ३१ जानेवारी १९२० ला काढण्यात आला होता. मुकनायक या शिर्षकाचा शब्द डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संत तुकोबारायांच्या अभंगातून घेतला होता. त्या अभंगाची ओळ या मराठीतील पहिल्या पाक्षीवर छापली गेली ती अशी
काय करू आता धरूनिया भीड । निशंक हे तोंड वाजविले ॥
नव्हे जगी कोण मुकियाचा जाण । सार्थक लाजोनी नव्हे हित ।।
आशा पध्दतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्यांचा नायक बनले. त्यानंतर त्यांनी ३ एप्रिल १९२६ रोजी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र काढले. या वृत्तपत्राच्या हेडींगला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या स्वलिखीत ओळी दिलेल्या असायच्या.
आशा रितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संत चळवळीशी चांगला संबंध होता. त्यांनी या संत चळवळीतील अस्पृश्य ठरवलेल्या संतांचाही अभ्यास केला होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांचे पहिले प्रतिनीधी म्हणून संत चोखोबाराय, संत रवीदास तथा संत नंदनार या तिन संतांचा उल्लेख करुन त्यांची ओळख जगाला करून दिली. त्यांनी आपला अनटचेबल्स हा ग्रंथ या तिन संतांना अर्पण केला आहे. त्या आपण पत्रिकेत बाबासाहेब म्हणतात
" आपल्या निष्ठायुक्त कृत्य, संयमी व न्यायी वृत्ती यामुळे ते सर्वांपेक्षा उच्चतम आदरास पात्र ठरले. त्या तीन संताच्या स्मृतीस अर्पण "
यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत चळवळीचा एवढा व्यापक संबंध होता लक्षात येते.परंतू ही संतांची चळवळ जनमानसात रुजल्यानंतर ती समतावादी न राहू शकल्यामुळे बाबासाहेबांनी चोखोबारायांच्या भक्तीपंथाच्या आध्यात्मिक मार्गाने जाने नाकारले. वारकरी पंथात पाळली जाणारी अस्पृश्यता, भेदाभेद ,जातीभेद पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वारकरी, भागवत धर्म सोडून बोद्ध धम्म स्विकारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई यांनी पंढरपुरला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिथे मंदिरात येऊ दिले जात नाही, भेदाभेद पाळला जातो, हे बाबासाहेब जानुन होते. म्हणुन बाबासाहेबांनी रमाईला पंढरपुरला नेण्यास नकार दिला आणि आपण आपले स्वतंत्र पंढरपुर उभे करू असा असा शब्दही दिला होता. त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला नागपुरला बौद्ध धम्माची दिक्षा घेऊन स्वतंत्र पंढरपुर वसवून दाखवले.हे बघायला रमाई मात्र नव्हत्या.पुण्यातील देहू रोडला चोखोबारायांचे मंदिर बांधण्याची तयारी करत असलेले काही अस्पृश्य कामगार " बाबासाहेबांकडे गेले होते. तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धाचे मंदिर बांधायला लावले आणि उद्घघाटनाला गेले सुध्दा. बाबासाहेबांनी भक्तीच्या मार्गाने जाने नाकारून बुध्दाच्या मार्गाने अस्पृश्य जातींना मुक्ती मिळवून दिली.अस्पृश्यता जातीव्यवस्था नाकारणाऱ्या धम्मात त्यांनी अस्पृश्य मानले गेलेल्या जातींना नेवुन मुक्ती दिली. परंतू एक गोस्ट चर्चेत कार्यक्षेत्रात येने महत्वाचे आहे की , बाबासाहेब संत चळवळीला आणि संत चोखोबारायांना नाकारणारे होते का ? त्यांचे योगदान त्यांना मान्य होते की नाही ? तर बाबासाहेब चोखोबारायांना नाकारणारे नव्हते. केवळ पून्हा त्या मार्गाने जाने त्यांनी नाकारले.अस्पृश्यांचा उध्दार करणारी भक्ती परंपरा नको तर संपूर्ण अस्पृश्यांचा उद्धार करणारा धम्म बाबासाहेबांनी पुढे केला.अलिकडच्या काळात अनेक पुरोगाम्यांनी, चोखोबारायांना जाहिर नाकरले आहे. आशांना एक प्रश्न आहे. त्याकाळातीले जातीव्यवस्था अस्पृश्यता वाईट होती की चोखोबाराय ? ब्राम्हणी व्यवस्था नाकारणार की चोखोबाराय ? बाबासाहेबांनी चोखोबारायांना ग्रंथ आर्पण केला पण चोखोबारायीचा मार्ग नाकारला होता.तुम्ही पुरोगामी चोखोबाराय नाकारणार की तो मार्ग ? त्या काळातील जातीव्यवस्था,अस्पृश्यता, ब्राम्हणी विटाळ या संकल्पना जाहीरपणे मांडणे हे पाप होते का ? हे मांडल्या बद्दल चोखोबारायांचा सन्मान व्हायला हवा की त्यांना दुर्लक्षित करुन मारणार. त्यांना दुर्लक्षीत करून ब्राम्हणी छावणीला मदतच करण्याचे काम पुरोगामी काही करत आहेत. संत चोखोबाराय चर्चेत आनले आसते तर जातीवादी समाजव्यवस्था उघडी पडली असती.हे पुरोगामी लेखक मंडळीला करावेसे वाटले नाही.उलट संत चोखोबारायांना चर्चेत आनुन जातीव्यवस्थेच्या विरोधात लढाई उभी करता आली असती.आज घडीला दलित आत्मकथने चर्चेला घेतली जातात.त्यावर समीक्षा येतात.मोठे धुमसान होते. पण देशातील पहिले दलीत आत्मकथन लिहीनारा चोखोबा मात्र दुर्लक्षीत असतो.भारतातील पहिले दलीत आत्मकथन संत चोखोबारायांचे आहे. याकडे दलीत आत्मकथाकारांनी कानाडोळा केला आहे. दलीत कवितेचा इतिहास चोखोबारायांपासूनच खुरु होतो. तर दलीत स्त्रीवाद संत सोयराबाई, संत निर्मळा यांच्यापासून सुरु होतो. परंतु यावर पुरोगामी म्हणूवुन घेनारे फुले शाहु आंबेडकरवादी प्रवाह चर्चेला तयार नाहीत. संत चोखोबाराय त्यावेळी बाहेर ठेवले ते ब्राम्हणवाद्यांनी आणि आता वाळीत टाकले ते चोखोबारायांच्या आप्तस्वकीयांनी.
म्हणून स्वच्छ मनाने एकदा विचार करुया. त्याकाळी मिळतील त्या साधनांचा वापर करून, अतिशय बिकट परिस्थितीत आपला विद्रोह मांडल्या बद्दल आपण चोखोबारायांचा सन्मान करूया. त्यांना जातीअंताच्या मर्गावरील एक प्रतिक म्हणून स्विकारूया.अस्पृश्यतेचा गंभीर प्रश्न सर्वात आधी उभा केल्या बद्दल त्यांचे साहित्य स्विकारूया.चोखोबारायांना घेवून समतेच्या हक्क अधिकारांसाठी प्रस्थापीत ब्राम्हणी व्यवस्थेशी भांडुया. वारकरी पंथात सर्व संतांप्रमाणे अधिकृत, नोंदनीकृत गुणवान,वैचारिक, प्रगल्भ महान संत म्हणुन चोखोबाराय सर्व संतांनी मान्य केलेले आहेत. त्या चोखोबारायांनी अस्पृश्यांच्या शोषण, पिडण, दमन आणि वेदनेचे डॉक्युमेंटेशन केल्या बद्दल त्यांच्याप्रती नतमस्तक होऊया. तसे न करणे आपल्या इतिहासपुरुशासी बेईमानी केल्यासारखे होईल. चांगले काम केलेल्या आपल्या पुर्वजाची आठवण सुद्धा न काढणे नतदृष्टेपण ठरेल. तसे आपण करू नये एवढेच !
नितीन सावंत परभणी
9970744142