Sunday, 25 April 2021

वाळलेल्या खोडालाही नवे धुमारे फुटतील .

वाळलेल्या खोडालाही नवे धुमारे फुटतील .

जगात सर्वाधिक वेगाने भारताचे भांडवलिकरण चालु आहे.अगदीच सेंकद काट्यासारखे #भांडवलशाहीची_मुल्ये समाजमनावर दिवसरात्र फिरवणे चालु आहे.एकदा का ती #मुल्ये समाजस्विकृत झाली की मग सत्याची बाजु घेनारे देशद्रोही, गद्दार वगैरे.
पुर्वीला एखादे मुल्ये समाजात प्रस्थापित व्हायला दोन तिन पिढ्यांचा काळ लागायचा.पण आज मात्र अगदी कमी वेळात , काही तासांच्या आत सबंध देशाचा #माइंड_सेट करायचे प्रयोग भारतात झालेत.होताहेत. 
  टोकाची व्यवहारीकता आणि व्यक्तिस्वातंत्र्य बहाल करणारी भांडवलशाही #परार्थीकरणासह_परात्मतेची राख प्रत्येकाला पुसत जात आहे, याचे कुनालाही स्वयरसुतक नाही. 
    माथ्यावर चार गवऱ्या सुद्धा ठेवायला कुणी नसावे , शेवटचे पाणी पाजायला मुलगा असावा म्हणून केलेला उपद्व्याप शेवटी तो ही प्रेत दुरुन बघुन पळ काढनारा निघावा,सोयरीक ठरवताना ,लग्नसमारंभात  सतत आडवी येनारी भाऊकी सुतक पाळायलाही असु नये. हे उद्ध्वस्त झालेल्या भारतीय गावड्याचे शेवटचे चित्र आहे.एकमेकांपासून किती तुटावे तर दुरुनच नमस्ते करा इतके.
एकटे पडलेले लोकं जास्तप्रमाणात भांडवली जगताचे ग्रहाक बनतात. 
हा काळ जग जवळ येण्याचा आणि माणसे दुर जाण्याचा आहे .. 
आम्ही मात्र #फाटलेल्या_आभाळाला पुन्हा उमेदीची #गवसनी_घालु.वाळलेल्या खोडालाही नवे धुमारे फुटतील .
थांबा जरा ..

नितीन सावंत परभणी
9970744142

Saturday, 3 April 2021

बनिया भांडवलदार आणि जातिग्रस्त भांडवल

 बनिया भांडवलदार आणि जातिग्रस्त भांडवल 

बनियान जातीचे प्रमुख सहा जातीसमुह आहेत.
१. अगरवाल (वैश्य वर्षातून आलेल्या जाती) बिस अगरवालही म्हणतात. वीस जातीचा समुह. दस अगरवालांना हीन लेखतात.
२. अगरवाल (दस किंवा गाता अगरवालही म्हणतात)
3. सरलिया बनीया हे वीस अगरवालची एक ब्रँच मानली जाते. जी सरलीया, हरीयानामध्ये सेटल झाली.
4. सरोयगी (जैन धर्म मानतात)
5. माहेश्वरी (शैव धर्म अनुसरतात)
6. ओसवाल


प्रत्येकाची १८ कुले किंवा पोटजाती आहेत. हिंदू ८८% आहेत. १०%जैन. काही शिखही आहेत. त्यांच्या जातपंचायती असतात. उदा. अगरवाल महासभा

बन्सल, बिंदल, धलन, धेरन, एरण, गर्ग, गोएल, जिंदल, कांचल, सिंगल, मित्तल, नागल, तायल, गोंदल, गुप्ता, खंडेलवाल, बिर्ला, बजाज, इ. आडनावे येतात.


राजस्थान, हरियाना, गुजरात, इतर राज्यात दिसून येतात. अगरवाल खंडेलवाल माहेश्वरी झुणझुणवाला, इ. मारवाडी आहेत. राजस्थानी.



नॅशनल स्टाॅक एक्सचेंज मधील १५३० मोठ्या कंपन्याचे डायरेक्टर बोर्डमध्ये अगरवाल हे नाव २८६ वेळा आले. अगरवाल, पाठोपाठ गुप्ता यांचे वर्चस्व.
स्त्रोत: प्राईम डाटाबेस

तर कार्पोरेट बिझनेस, इंडस्ट्रीज मध्ये ४६% बनीया जाती व ४४.६% ब्राम्हण जाती, अर्धा टक्के क्षत्रीय जाती, ३.५% अोबीसी, एस सी एस टी जाती.
स्त्रोत: EPW

भाजपच्या कार्यकारीणीमध्ये 50 सदस्य राष्ट्रीय कार्यकारीणी, 97 national executive सदस्य, 36 अध्यक्ष 29 राज्याचे and 7 केंद्रशासित प्रदेशाचे, 752 जिल्हाध्यक्ष  24 राज्यातील. ६५% ब्राम्हण-बनिया जातीचे.