Tuesday, 29 March 2022

संत चोखोबाराय चरित्र : प्रकरण ११ वे. विध-अविंध कोणता हा प्रकार ?

 संत चोखोबाराय चरित्र : प्रकरण ११ वे. 

विध-अविंध कोणता हा प्रकार ?

अहो करुणाकरा रुख्मिणीवच्या वरा l उदारा धीरा पांडुरंगा ll 
काय म्या पामारे वानावे जानावे | न कळे कैसे गावे नाम तुमचे ll विध अविंध कोणता प्रकार | न नेनो कळे साचार मजलागी ll
चोखा म्हणे मज काहींच न कळे । उगाची मी लोळे महाद्वारी || 
                   - संत चोखोबाराय               

                            आपल्या इंद्रियांच्या आकलणाच्या मर्यादेत सर्वकाही जानुन असणारे चोखोबाराय ब्राम्हणी क्षेत्रातील वैदिकांच्या स्पर्श- अस्पर्श संकल्पनांना उपरोधीकपणे विंध - अविंध ही काय भनगड आहे असे विचारत आहेत ?  ब्राम्हणी, वैदिक व्यवस्थेने जन्माला घातलेली अस्पृश्यता संत चोखोबाराय चर्चेच्या पटलावर आनु पहात आहेत. मी अस्पृश्य असल्यामुळे मी पामर तुमचे काय गुण गाणार ?  आम्हाला धर्मशास्त्राने ते अधिकारच दिले नाहीत. त्यामुळे यांच्या धर्मसंकल्पना माझ्या आकलनाच्या पलिकडे आहेत. मी अपला विठ्ठला तुझी भक्ती करत महाद्वारातच लोळत आहे. तेवढेच माझ्या हातात आहे.यांचे स्पृश्य अस्पृश्य तत्वज्ञान माझ्या न समजण्यापलिकडे आहे.
                              माणुस म्हणून जगण्या इतपत चोखोबांचे आकलन चांगले होते. त्यांना विटाळ, स्पर्श- अस्पृश्यता कृत्रीम मानवी देन वाटे. म्हणून याद्वारे ते तत्कालीन परिस्थीत विज्ञानवादी होते. विटाळ, अस्पृश्यत देवाची देन असती तर चोखोबरायांनी त्याबद्दल कुरबुर किंवा तक्रार केली नसती. उलट ही तक्रार करण्यासाठीच तर  चोखोबारायांसह सर्व संतांनी विठ्ठल निवडला आहे. चोखोबारायांचे कवित्व माणुसकीचे हक्क अधिकार मागण्यासाठी आहे. भेदभावाच्या विरोधात चोखोबाराय तक्रार घेऊन उभे आहेत.भाषेच्या मर्यादा राखत देवालाही आहो जाहो आदराने बोलत चोखोबाराय नेहमी तत्कालीन समस्यांकडे लक्ष वेधायला भाग पाडतात.चोखोबाराय विज्ञानवादी नसते तर त्यांनी आहे ते निमूटपणे सहन केले असते.परंतू ते विठ्ठलाचा आधार घेवुन विज्ञानाचा अग्रह धरतात आणि भौतिकवादी समस्यांना इश्वरी देन न मानता त्या सोडवल्या जाव्यात म्हणून ते अग्रही रहातात.                          
                              हे धर्मपंडीत ज्या विटाळाच्या अस्पृश्यतेच्या नावे बोंबा मारत असतात त्यांना संत चोखोबारायांनी कोण बिना विटाळावे आहे, सर्वत्रच विटाळ आदिअंती असताना माझाच तेवढा विटाळ का व्हावा , असा सडेतोड प्रश्न त्यांनी केला आहे.
संत चोखोबाराय म्हणतात वेद, शास्त्रे, पुराणे, जीव,शिव, काया, ब्राम्हा  विष्णु, शंकर हे सर्व विटाळग्रस्तच आहेत ना. माणूस जन्मताना आणि मरतानाही विटाळातच असतो ना  मग विटाळ आदिअंती असताना माझाच तेवढा विटाळ का व्हावा ? 
या जगात कोण सोवळे भाणि कोण ओवळे आहे हा प्रश्न संत चोखोबारायांचा आहे. आणि जगात कोणीच सोवळा नाही. हे स्पष्टीकरण सुद्धा चोखोबारायांनीच दिले आहे. 
             एका अभंगात संत चोखोबाराय म्हणतात मला नवल वाटले बिना विटाळाचे कोणी हे का बरे ? 
                      वेद शास्त्रे, पुराणे आणि ब्रम्ह, विष्णु, महेशाची जाहीर चिकीत्सा करणे. धर्मग्रंथां ना विटाळग्रस्त म्हणणे विद्रोहाचे , बंडखोरीचे काम आहे . एवढा विद्रोह करणारा चोखोबा नकारात्मक मांडणी करणाऱ्या आंबेडकरी चळवळीतील अलिकडच्या लेखक साहितीकांना विद्रोही वाटू नये हे त्यांच्या आकलनाच्या मर्यादा म्हटल्या पाहिजेत. चोखोबा विद्रोही होते. उपलब्ध असणाऱ्या  अगदी थोड्या अभंगातही चोखोबांचा विद्रोह सापडतो. नष्ट केलेला आणि जतन न केला गेलेला अभंगसंग्रह तर नक्कीच विद्रोही असला पाहिजेत.चोखोबा बंडखोर होते.विद्रोही होते.
                  अस्पृश्याने तोंड उघडणे, अभंग लिहीणे, काव्य तयार करणे, संत मंडळात सहभागी होणे, धर्मग्रंथांवर प्रश्न निर्माण करणे, आपल्या बायकोला अभंग बनवायला शिकविणे, पोराला विद्रोही लिहू देने , गावची कामे करण्याऐवजी उच्चजातीयांच्या सांस्कृतिक राजकारणात हस्तक्षेप करणे , हा संत चोखोबारायांचा विद्रोह नव्हे काय ?  चोखोबा विद्रोही नसले असते तर ब्राह्मणांनी त्यांचा छळ  केला असता  का ? ते विद्रोही होते, म्हणूनच तर त्यांचा छळ झाला. त्यांना नदीपलीकडे का हकलून दिले गेले मग ? विद्रोही होते म्हणूनच ना.
     संत चोखोबारायांचा विद्रोह मांडला तो शंकरराव खरात यांनी. १४ एप्रिल २००२ ला त्यांनी 'चोखोबाचा विद्रोह'  नावाचे पुस्तक लिहून संत चोखोबारायांना न्याय दिला. त्यांनी लिहिलेल्या 'चोखोबाचा विद्रोह' या पुस्तकात ६ व्या क्रमांकाचे प्रकरण चोखोबाचा धर्मशास्त्राशी विद्रोह म्हणून लिहीले आहे.त्यांनी संत चोखोबांनी घेतलेल्या विद्रोही भूमिका विषद केलेल्या आहेत. 
                          धर्मशास्त्राला, पुराणाला, ब्रम्हाज्ञान्याला 'धिष्क' म्हणणारा अस्प्रश्यातला पहिला विद्रोही,  पहिला बंडखोर संत, संत चाखोबरायच होते.
                ज्यांच्यापोटी दया, क्षमा. शांती, नाही अशा ब्राम्हणांच्या तोंडुन आलेल्या ब्रम्हज्ञानाच्या गोष्टी फालतूच्या आहेत. मोठे ब्रम्हज्ञानाच्या गोष्टी सांगणारे अनुभवांत शुन्य असतात. असल्यांचे जगणे धिक्कारणीय आहे. 'थू' तुमच्या जिंदगाणीवर, हे विठ्ठला आता कोठवर तुझी आम्ही भिड धरायची ? माझ्याच वेळी नेमका तु कुठे गेलास, या आणि आशा अनेक शब्दांत चोखोबाराय आपला विद्रोह प्रगट करतात.
                   म्हणून संत चोखोबारायांकडे आणि त्यांच्या साहीत्त्याकडे पाहताना त्या काळातील परिस्थिती, वातावरण पहिल्यांदा आपण  समजुन घेतले पाहिजे. जाती व्यवस्थेच्या गावगाड्यात हिन मानलेल्या जातीतल्या व्यक्तीने गावकीची कामे नाकारून स्वतंत्र अभिव्यक्त होणे, कवित्व करणे निश्चीतच त्या काळाच्या मानाने मोठे काम आहे.आणि धाडसी भूमिका आहे.आजही गावगाड्यात लोकं जाहीररीत्या महारं माजलीत म्हणतात.गावचे महारवाडे मांगवाडे पेटवतात.त्या काळात किती धाडसी भूमिका संत चोखोबाराय घेत होते याचा आंदाज आपण बांधु शकतोत. 
                  चोखोबरायांचा स्वभाव विनयशील होता आणि करुणही होता, पण त्यांनी प्रस्थापित ब्राम्हणशहीतल्या कुठल्याही अमानवीय प्रथा परंपरेचा गौरव केला नाही की समर्थन केले नही. धर्मग्रंथ पुरोहीतशाही आणि देव सुध्दा त्यांनी चिकित्सेच्या कटघरात उभे केले होते. वैदिकांचा, शोषकांचा त्यांनी प्रचारही केला नाही की समर्थन सुद्धा केले नाही. चोखोबांनी बाजू घेतली ती उपेक्षितांची, वांचीतांची. त्यांनी नामदेवांचा विद्रोही बंडखोरीचा मार्ग निवडला. या विद्रोही बंडखोरीच्या मार्गवर त्यांचे अतोनात हाल झाले. धर्मग्रंथावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची किंमत त्यांना मोजावी लागली.कुटुंबाला सतत अपमानाला सामोरे जावे लागले.चोरीचे आळ घेतले गेले.तरिही संत चोखोबाराय आणि त्यांचे कुटुंब डगमगले नाही. 
                      चोखोबारांचा विद्रोह मुक्याचा टाहो आहे.या मुक्या व्यक्तिमत्वाची दखल फारसी कुनी घेतलेली नाही.त्यांना फार मोठा न्याय मिळाला असेही नाही.येथून पुढे तरी हा संत काळात गुडुप होनार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे.चोखोबांचे साहित्य , त्यांचे काव्य समाजापुढे आनले पाहिजे. म्हणून गोरगरिबांच्या,सर्वहरांच्या, हिन दिन श्रमीकांच्या , बाजुने उभ्या असलेल्या महापुरूषांत चोखोबरायांचे नाव आदराने, अग्रहाने घ्यावे लागेल.माजी अस्पृश्य जातींचा पहिला विद्रोही नेता, सामाजीक सर्वहरांचे पहिले प्रेरणा प्रतिक म्हणुन चोखोबाराय अजरामर रहातील. 

नितीन सावंत परभणी 
9970744142

संत चोखोबाराय चरित्र : प्रकरण ९ वे संत चोखोबारायांची गुरुपरंपरा

 संत चोखोबाराय चरित्र : प्रकरण ९ वे 
संत चोखोबारायांची गुरुपरंपरा

धन्य धन्य नामदेव l माझा निरसला भेव ll 
विठ्ठल मंत्र त्रिअक्षरी l खुण सांगितली निर्धारी ll 
ठेवोनी माथां हात l दिले माझे मज हित ll 
दावियेले तारु l चोखा म्हणे माझा गुरु ll 
              -  संत चोखोबाराय 

                  भारतात संत , महापुरुष गेल्यानंतर त्यांच्या कार्यकतृत्वाचे श्रेय घेण्यासाठी गुरु आणि मार्गदर्शक ही पदे बदलण्याची , नसलेले लोक इतिहासात घुसण्याची मोठी चालाखीची परंपरा आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातही दादोजी कोंडदेव आणि रामदास गुरु म्हणून घुसडण्याचे दीर्घकाळ प्रयत्न केले गेले.यादृष्टीने संत चोखोबारांच्या चरित्रात बघायचे झाल्यास, संत चोखोबारायांनी  आपल्या अभंगात आप्तस्नेह्यांचे उल्लेख केल्यामुळे त्यांच्या अभंगाच्या द्वारे आपल्याला त्यांची गुरुशिष्य परंपरा निश्चित करता येते. 
                        संत चोखोबारायांनी आपल्या अनेक अभंगात नामदेव गुरु असल्याचे स्पष्ट सांगितले आहे. याबद्दल एक नव्हे दोन नव्हे नामदेवच गुरु असल्याचे अनेक अभंगांत चोखोबारायांनी दाखले दिलेले आहेत. जसे की चोखा म्हणे धन्य नामया तू गुरु l फेडिला अंधारु जीवीत्वाचा ll  म्हणजे संत नामदेवांकडून चोखोबारायांना अनुग्रह मिळाला. नामदेवांनी चोखोबारायांना शिष्य म्हणून स्विकारले होते. संत नामदेवांनी चोखोबांना अगदी सखा म्हटले आहे. संत नामदेवांच्याबद्दल बा. रं. सुंठणकर म्हणतात
     " या सर्व संतांनमध्ये अग्रभन्य नामदेव होते..
इतर प्रांतात, जे भक्तिपंथाचे उठाव झाले, त्याला प्रेरणा देण्याचे कार्य नामदेव आणि संतयात्रा यांनी केले. मराठी संतमंडळाचे तत्त्ववेत्ते ज्ञानदेव होते, तरी खरे प्रणेते नामदेवच होय. त्यांच्या 
वैष्णव सांप्रदायात ज्ञानदेव हे उशिरा म्हणजे १२९१ च्या सुमारास उघडपणे सामील झाले. त्यापूर्वी तो सांप्रदाय नावारूपाला आणण्याचे श्रेय नामदेवांना द्यावे लागेल. "
                         सुंठणकर म्हणतात त्याप्रमाणे भागवत धर्माचे संस्थापक संत नामदेव होते.२ नामदेवांनी भागवत धर्म सुरू केल्यानंतर आणि तो धर्म बराच प्रसिद्ध झाल्यानंतर संत भोजलिंग काका यांनी संत ज्ञानेश्वरादी भावंडाना नामदेवांकडे आनले. संत ज्ञानेश्वरादी भावंडांच्या भेटीच्या आधीच संत नामदेव औंढा नागनाथ येथील विसोबा खेचर यांच्याकडून दिक्षीत झाले होते. म्हणजे संत नामदेवांचे गुरु संत विसोबा खेचर होत. नामदेवांनी 'नामयाचा खेचरी दाता' म्हणून अनेक अभंगात विसोबा खेचर यांचे उल्लेख केले आहेत.विसोबा खेचर हे लिंगायत धर्मीय होते.ते शिवाचे उपासक होते.संत विसोबा खेचर यांची गुरुपरंपरा आदिनाथ-मत्स्येंद्रनाथ - गोरक्षनाथ - मुक्ताबाई चांगा वटवेश्वर - कृष्णनाथ - विसोबा खेचर अशी दिली आहे.३ विसोबा बेचर यांचा स्वलिखीत 'षट्स्थळ' या ग्रंथात त्यांनी आपली हि गुरुपरंपरा दिली आहे.आता एकुण संत चोखोबारायांची गुरु परंपरा पुढील प्रमाणे होईल. आदिनाथ-मत्स्येंद्रनाथ- गोरक्षनाथ मुक्ताबाई - चांगा वटवेश्वर - कृष्णानाथ - विसोबा खेचर - संत नामदेव - संत चोखोबाराय. 
                       हे एवढे सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ असतानाही संत नामदेवांचे गुरुत्व बदलण्याचा प्रयत्न आजतागायत चालू आहे. वारकरी सांप्रदायातील बहुतांश किर्तनकार आणि लेखक साहित्तीक मंडळी संत नामदेवांना, ज्ञानदेवांच्या भगिणी मुक्ताबाई यांनी गोरोबाकांच्या परिक्षेद्वारे कच्चे मडके संबोधून विसोबा खेचर यांच्याकडे पाठवले असल्याचे सतत पसरवत असतात. म्हणजे विसोबा खेचर यांच्या गुरू ज्ञानदेव भगीनी आठ वर्षाच्या मुक्ताबाई आणि त्या मुक्ताबाईच्या सुचनेवरून "विसोबा खेचर यांच्यामुळे संत नामदेवांचा उध्दार झाला अशी मांडणी आजही चालू आहे.
                     ही  मांडणी संत नामदेव यांच्यावर अन्याय करणारी आहे.विसोबा खेचर यांनी दिलेल्या गुरु परंपरेत विसोबांचे गुरू कृष्णनाथ त्यांचे गुरु चांगा वटवेश्वर आणि चांगा वटवेश्वरांच्या गुरु मुक्ताबाई होत.या परंपरेत ज्या मुक्ताबाई येतात त्या संत विसोबा खेचर यांच्या गुरुच्या गुरु मुक्ताबाई होत.साधारण एका पिढी आधीच्या तरी मानाव्या लागतील. म्हणजे या परंपरेतील मुक्ताबाई वयस्क अभ्यासू योगीनी मुक्ताबाई आहेत. ह्या गुरु परंपरेत येणाऱ्या मुक्ताबाई नामदेव समकालीन संत ज्ञानदेवांच्या आठ वर्षाच्या भगणी मुक्ताबाई नव्हेत.यावर सविस्तर लिखान. रा.ची. ढेरे यांनी 'श्रीपर्वताच्या छायेत' या ग्रंथात केले आहे. म्हणुन संत चोखोबारायांच्या गुरू परंपरेची सुरवात श्रीशैलच्या स्त्रीराज्यातून होते. संत बसवेश्वर यांच्या अनुभव मंडपातील अल्लमप्रभू अक्कमहादेवी हे श्रीशैलचेच होते. चक्रधर स्वामींचाही १२ वर्षे निवास श्रीशैलवर होता. म्हणून या मातृसत्ताक, स्त्रीसत्ताक स्त्रीरातून जातीअंताची सुत्रे घेऊन सर्वच संत विविध पंथप्रवाहांच्याद्वारे कार्य करत होते. बसवाण्णांनी जातीअंताची सुरवात करून अंतरजातीय विवाह लावला. संत चक्रधर स्वामीनी मातंगांसाठी विहीर खुली केली तर संत नामदेवांनी संत चोखोबारायांना भागवत धर्माची दिक्षा दिली. अस्पृश्याला शिष्यत्व बहाल केले. बसवण्णा, चक्रधर आणि नामदेव या तिनही धर्मसंस्थापकांचा कॉमन दुवा योगीनी मुक्ताबाई होत. श्रीशैलचे स्त्रीराज्य होय.
                      संत चळवळीत सर्वात मोठा अन्याय झाला तो संत नामदेवांवर.संत नामदेवांनी सर्व जातीधर्माच्या संताना एकत्रित आनुन भागवत धर्म सुरू केला होता. परंतू नामदेवांच्या नंतर साधारण चारशे वर्षांनी जन्मलेल्या, उत्तरकालीन संत बहिणाबाईंचा अभंग घेउन 'ज्ञानदेवे रचिला पाया' हा प्रचार करण्यात आला.तो आजही चालु आहे. 
                  अगदी याचप्रमाणे संत -चोखोबारायांच्या तोंडी संत ज्ञानदेवांच्या स्तुतीचे जे अभंग आहेत ते प्रक्षिप्त आहेत. कारण संत ज्ञानेश्वरांच्या अभंगात, चोखोबांचा एकदाही उल्लेख नाही. नामदेव, जनाबाई, सोयरा, बंका, कर्ममेळा, निर्मला आदी समकालीन सर्व संत चोखोबाचा उल्लेख करतात पण ज्ञानदेव, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई चोखोबांचा एकदाही उल्लेख करत नाहीत, हे मोठे अश्चर्यच आहे. याउलट चोखांच्यासंह त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यही ज्ञानदेवांचा उल्लेख करतात. हे उल्लेख केलेले अभंग संत ज्ञानेश्वरांचे महत्व वाढवण्यासाठी  नंतर घुसवण्यात आल्याचे स्पष्ट होते.
                  संत चोखोबारायांचा, संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचा उल्लेख करणारा एक अभंग मजेशीर आहे.ज्यात संत चोखोबाराया सर्व संतांचे उल्लेख करतात पण नेमके आपल्या प्राणप्रिय गुरुचा म्हणजे  संत नामदेवांचाच उल्लेख ते करत नाहीत.मोठे आश्चर्यच आहे.अभंग खालीलप्रमाणे आहे.
                  
 सप्रेम निवृत्ती आणि ज्ञानदेव l मुक्ताईचा भाव विठ्ठलचरणी ll 
 सोपान सावता गोरा तो कुंभार l नरहरी सोनार प्रेम भरित ll 
 कबिर कमाल रोहीदास चांभार l आणि आपार वैष्णवजन ll
 चोखा तया पायी घाली लोटांगण l वंदितो चरण प्रेमभावे ll 
                            या अभंगात चरण वंदन करण्याच्या , म्हणजे नमस्कार करण्याच्या मुख्यवेळी संत चोखोबाराय आपले गुरु संत नामदेवांना कसे काय विसरु शकतात ? संत नामदेव यांचा  उल्लेख संत चोखोबारायांनी का टाळला असवा ?ज्यांचे जीवन संत नामदेवांनी प्रकाशमान करुन टाकले त्यांचा उल्लेख चोखोबा टाळतीलच कशाला ? आणि इतर अभंगांत तर संत चोखोबाराय म्हणतात " चोखा म्हणे या नामयाचे पाय l न विसंबे ओ माय जन्मोजन्मी ll नामयाचे पाय जन्मोजन्मी न विसंबनारे चोखोबा नेमके वरिल अभंगातच का विसरले असतील ? म्हणून  वरिल अभंग प्रक्षिप्त आहे. 
                 संत नामदेव आणि संत चोखामेळा हे जीवश्च कंठश्च मीत्र आणि गुरुशिष्य सुध्दा. हे चोखोबारायांच्या कुटुंबीयांनाही मान्य आहे. चोखोबाराय आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब चोखोबारायांची बायको सोयरा,मुलगा कर्ममेळा,बहिण निर्मळा, मेव्हणा बंका या सर्वांचा वैचारिक उद्धार संत नामदेवांच्यामुळेच झाला, हे सर्वजन मान्य करतात.तसे उल्लेख करतात.हे एवढे सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ असूनही संदर्भहीन लिखान करून आनेकांनी बनवाबनवी केल्याचे दिसून येईल.
                           'संत चोखामेळा विविध दर्शन' या ऐलिनॉर झेलियट, यांच्या ग्रंथात संत नामदेव आणि संत चोखामेळा या प्रकरणात प्रा.हे.वि. इनामदार यांनी चोखोबांची गुरु परंपरा दिलीय. त्यात ते म्हणतात

                        "नामदेव व चोखोबा हे दोघे संत एकाच गुरुपरंपरेतील आहेत. 'आदिनाथ - मच्छिंद्रनाथ - गोरक्षनाथ - गहिनीनाथ - निवृत्तीनाथ - ज्ञानदेव - विसोबा खेचर - नामदेव अशी नामदेवांची गुरूपपरा आहे " इनामदार हे विसोबा खेचर यांच्या गुरु परंपरेत ज्ञानदेव घुसवतात. इनामदारांचे म्हणने धादांत खोटे आहे,कारण विसोबा खेचर यांनी आपले गुरू ज्ञानदेव असल्याचे कुठेच म्हटलेले नाही. 'षडस्थळ' मध्ये हे उल्लेख नाहीत.षडस्थळ हा विसोबा खेचर यांचा स्वलिखीत ग्रंथ आहे.ग्रंथ उपलब्ध आहे.तोच प्रमाण. 

               संत चोखोबांसारख्या अस्पृश्याचा आणि अनेकांचा उध्दार करण्यासाठी सदैव समतेचा अग्रह धरणारे संत नामदेव होत. म्हणुन संत चोखामेळा म्हणतात. 

"चोखा म्हणे तुम्ही माय हो माउली ।
कृपेची साउली नामदेवा ।।"

                      म्हणुन विसोबा खेचर यांनी लिहिलेल्या षडस्थळ ग्रथांत त्यांनी आपले गुरू ज्ञानेश्वर किंवा ज्ञानेश्वर भगीनी मुक्ताबाई असे कुठेही म्हटलेले नाही.संत चोखोबारायांचीही गुरू-शिष्य परंपरा सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे. 

रा.चीं. ढेरे म्हणतात

                    "विसोबा खेचरांच्या 'षटस्थल' या ग्रंथाच्या उपलब्धीला जे अनन्यसाधारण महत्त्व लाभले आहे, ते त्यात ग्रथित झालेल्या परंपरा- वृत्तामुळे. आदिनाथ- मत्स्येंद्रनाथ - गोरखनाथ - मुक्ताबाई - चांगा वटेश्वर- कृष्णनाथ - विसा खेचर.4

                      राची.ढेरे यांनी दिलेल्या परंपरेला संत चोखोबारायांशी नामदेवांच्या द्वारे पुढीलप्रमाणे जोडले जाते.

आदिनाथ - मत्स्येंद्रनाथ - गोरक्षनाथ - मुक्ताबाई चांगा वटवेश्वर - कृष्णनाथ - विसा खेचर - संत नामदेव- संत चोखोबाराया. 

ही संत चोखोबारायांची आणि संत नामदेवांची गुरु परंपरा होय.

नितीन सावंत परभणी 
9970744142

Tuesday, 22 March 2022

प्रिय,#भगत जय भारत !लाल सलाम .. !!

 प्रिय,#भगत 
जय भारत !
लाल सलाम .. !!

उस दिन आप तिनो फासी के तख्त पे हसते हसते चढे और सारा काम चौपट हुवा.भागनवाला आप जाने के बाद  यह देश आझाद तो हुवा लेकीन,सत्ता गोरे अंग्रेजोंके हाथोसे निकलकर इन काले सफेदपोश बदमाशोंके हाथो मे चली गई.एक चोर चले गए तो दुसरे चोर आ गए .. 
       
भगत आपके #समाजवादी देश निर्माण का सपना सपनाही रह गया l यहा टाटा,बिर्ला,आदानी,आंबाणी स्वतंत्रता के बाद अमिर हुए और आपने गरिब के गरिब ही रह गए l आज हजारो किसान जीने के वजाय मरना पसंद करते है l #भगता किसान भी फासी चढते है लेकीन देश के लिए नही पेट की भुख के लिए l सिमा पे जितने जवान मरते नही उससे जादा किसान देशभर मे हर रोज मरते है l 
    
भगत आपके नारे आज भी गुंजते है गली गली चौबारे पे,सडक पे कॉलेज मे l आपके स्लोगण लगते है दिवारोपे,घरोमे और शहरो मे l आपकी किताबे बडी सस्तेमे बिकती है l 

ए भगता तु सब जगह है l 
फिरफी सुनी जै इस देश की सडके गलिया चौबारे कॉलेज शहर और गांव l 

आज भी भुखी सोती है भारत माता l 
दो किलो चावल चोरी करते हुए पकडे जाने पर  पिटपिटकर मार दिया जाता है भुखे बेबस लाचार को .. 

किस #आझादी के सपने देखे थे अपने भगतजी .. 

किसके वास्ते आप फासी पे चढे थे .. 

समाजवाद का सपना टुट गया. इंक्लाब झिंदाबाद कहा है ?

 इस देश के नौजवान मश्गुल लै हिंदुत्वके नारोंमे l गाय बचानी है उनको और काटने है इंसान दलीत हो या मुसलमान l 

इस देश मे बिक गए सारे इमानदार ... सब जगह चल रही है इमानदारी की नौटंकी ..

आपका बलिदान सिर्फ २३ मार्च को याद आता है .. 

कुछ फुल चढते है दर्गे की चादर की तरह .. 

गलत हुवा भगतजी .. 

आपने मांगनी चाहिए थी माफी सावरकर की तरह .. 

आपने झुकाना चाहिए था आपन सर अंग्रेजोंके सामने .. 

कम से कम गांधी नेहरु की तरह सत्ता तो मिलती. 
या फिर सौ साल जिने की ग्यारेंटी .. 

मेरे #शहिदे_आझम .. 
पर कुछ चिराग आज भी जल रहे है आपकी क्रांतीकारी भूमिकाए लिए .. 
कुछ नौंजवा कारवा बना रहै आपके सपनोंके भारत का .. 
फिर चलेंगे #इंक्लाब के नारे .. 
फिर जगेंगी सर्फरोशी की तम्मन्ना कई सांरे दिलो मे... 
फिर नारे लगेंगे 

#इंक्लाब_जिंदाबाद 
#इंक्लाब_जिंदाबाद .. 

आपका 

कॉ.नितीन सावंत 
9970744142

Thursday, 17 March 2022

संत चोखोबाराय चरित्र प्रकरण - 3 रे ll भुवरी वैकुंठ माननारा संत ll

 संत चोखोबाराय चरित्र 
प्रकरण - 3 रे 

ll भुवरी वैकुंठ माननारा संत ll 

बहुत हिंडलो देशांतर l परी मन नाही स्थिर झाले कोठे ll
बहुत तीर्थे फिरोनिया आलो l मनासवे झालों वेडगळाची  ll
बहुत प्रतिमा ऐकिल्या पाहिल्या । मनाच्या राहिल्या वेरझारा ll
चोखा म्हणे पाहता पंढरी भूवैकुंठ l मनाचे हे कष्ट दूर केले ll 
                -  संत चोखोबाराय 

                          संत चोखोबारायांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील मेहुणराजा गावचा, पण कर्मभुमी मात्र पंढरपुर.त्यांचे बालपण मेहुणराजा गावीच गेले होते. चोखोबांच्या  बालपणीचे कुठलेही पुरावे किंवा अभंग उपलब्ध नाहीत. अनेक संत, महापुरुषांच्या जीवनचरीत्रात त्यांच्या बालपनीचे चमत्कारीक, काल्पनीक प्रसंग असतात, काहीतरी मांडणी असते.परंतू संत चोखोबारायांच्या बालपणीचे कुठलेही उल्लेख उपलब्ध नाहीत.चोखोबा अस्पृश्य जातीतून आल्याने त्यांच्या  जीवनचरीत्रातील बालपनीच्या प्रसंगांची कोण दखल घेणार ? त्यामुळे त्यांचे बालपण कसे गेले असेल कळायला मार्ग नाही. पूर्वी ज्ञान मिळवीण्याचे सर्वात मोठे माध्यम म्हणजे भ्रमण होते. अनेक तिथे, क्षेत्रे फिरणे गावे, नवे परिसर पहात रहाणे, माणसांचा स्वभाव, बोली जाणून घेणे.यातून माणुस प्रगल्भ होत असे. संत चोखोबारायांनीही अनेक तिर्थे, क्षेत्रे पाहिली. खुप ठिकाणी ते फिरले स्वतःचा भूप्रदेश सोडून इतर भाषिक राज्यांतही ते गेले असावेत म्हणुनच तर त्यांनी 'देश देशांतर ' हा शब्द वापरला आहे. पण त्यांना भावले ते पंढरपुरच. चोखोबांनी स्वत:चे जन्मगाव का सोडले असावे ? याबद्दल अंदाज बांधण्याजोगी एक परिस्थती आहे.
                          संत चोखोबाराय पंढरपूरला आले असताना त्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात समतेची मांडणी करणारे, अस्पृश्यता जाहीर नाकारणारे संत नामदेवांचे किर्तन ऐकायला मिळाले. किर्तन संपल्यानंतर संत चोखोबारायांनी नामदेवांशी चर्चा केली.संत जातभेद मानत नसतात,असे म्हनत संत नामदेवांनी तर चोखोबांना मिठीच मारली होती.यामुळे चोखोबा भारावुन गेले.आपणही या संत मंडळात सामील व्हावे म्हणून पुढील काळात चोखोबाराय सहकुटुंब पंढरपूरला आले. यासंदर्भात पुरावे म्हणून नामदेव आणि संत चोखोबारायांच्या अभंगात याप्रकारे वर्णन सापडते.  संत चोखोबाराय म्हणतात

माझे सुख मज दाखविलें । पावन केले तीही लोकी ll
आजी सोनियाचा दिवस धन्य झाला । प्रत्यक्ष भेटला नामदेव ll
माझे मज दिले माझे मज दिलें । माझे मज दिले प्रेमसुख ll 

                        ते सहकुटूंब पंढरपुरला स्थाईक झाले. आपली बायको सोयरा, स्वतः चोबोबा हे दोघा सदस्यांचे  कुटूंब पंढरपुरात येऊन राहिले. त्या आधी बऱ्याचदा चोखोबा पंढरपुरला येऊन गेले असावेत किंवा नियमीत वार्षिक वारी तरी ते करत असावेत. त्यांना इतर तिर्थक्षेताना भेदभावाची वागणूक मिळायची पण पंढरपुरात ब्राम्हण वगळता सर्वांनी समतेने वागवल्याने, ब्राम्हण वगळता  इतरांनी भेदभाव न केल्याने,चोखोबाराय बायकोसह पंढरपूरात स्थाईक झाले.
                      म्हणूनच संत चोखोबारायांच्या वरिल स्वलिखीत अभंगातून काही गोस्टी निर्देशित होतात त्या आशा की , संत चोखोबाराय अनेक तीर्थक्षेत्रे फिरुन आले होते.त्यांचा देशभर वावर राहिलेला होता.त्यांचे अनुभव विश्व व्यापक होते.ते प्रगल्भ होते.सर्वत्र फिरुन आभ्यास करुन ते जमीनीवरच स्वर्ग असतो या मतावर येवुन पोहंचलेले होते.त्यांच्या दृष्टीने पंढरपूर हेच जमीनीवरले वैकुंठ आहे.भुवरिल वैकुंठ सोडुन स्वर्गातील वैकुंठास जाण्याची गरज नाही असा त्यामागचा एक अप्रत्यक्ष विचार संत चोखोबाराय सुचवतात. 
                                
                   नामदेवांनी वाळवंटात आपले कीर्तन संपल्यानंतर संत नामदेवांनी चोखोबारायांना, जनाबाई, गोरा कुंभार, सावता महाराज, ज्ञानेश्वर, मुक्ताई, सोपान, निवृती सर्वांची ओळख करून दिली. चोखोबारायांनी इंट्री नामदेवांच्या संत मंडळात झाली. त्यानंतर चोखोबारायांनी, मेहुणाराजा गाव  सोडले आणि बायकोसह पंढरपूरी स्थाईक झाले. कारण संतांचा सहवास त्यांना उंचीवर  नेणार होता. चोखोबाराय पुढील काळात आधिकाधीक प्रगल्भ बननार होते.
                    चोखोबा जरी पंढरपुरात येऊन राहिले तरी त्यांची बहिण निर्मळा आणि मेव्हणा बंका मेहुणराजा गावीच राहिले. पुढे संत सोयराबाईंच्या बाळंतपणासाठी आपल्या बहीणीला म्हणजे निर्मळाला आनयला चोखोबाराय मेहुणराजाला गेले असता विठ्ठल सोयराबाईचे बाळंतपण करायला आल्याची अख्याईका आहे. म्हणजे संत कर्ममेळा यांचा जन्म पंढरपुरातच झाला होता.

                          या  सर्व संतांच्या विद्रोही वातावरणात कर्ममेळा यांना अस्पृश्यतेच्या विरोधात विद्रोही भुमीका प्रखरपणे घेता आली. आपली मते त्यांना निर्भयपणे मांडता आली.
                          आशाप्रकारे जातीव्यवस्था अस्पृश्यतेचा प्रखर अनुभव घेतलेले संत चोखोबाराय पंढरपुरातील बहुजन संतमेळ्यात सहभागी झाले. इतर तिर्थे- क्षेत्रांपेक्षा त्यांना पंढरपुर दिलास देणारे, आपलेसे करणारे वाटले. त्यांनी आणि सोयराबाईनी पंढरपुर कायमस्वरूपी स्विकारले. यातून हे अस्पृश्य जातीतून आलेले  कुटुंब सर्व संतांचे लाडके बनले. सर्व संतांची चोखोबारायांच्या घरी ये-जा सुरू झाली. नामदेवांच्या मार्गदर्शनाखाली त्या काळाच्या मर्यादा लक्षात घेता सर्व संत मंडळ सर्वच प्रकारच्या विषमतेवर हल्ला चढवायला लागले होते.ही बाब क्रांतिकारी होती.आजही आहे. 

                          प्रस्थापीत श्रौतस्मार्त आर्थात विषमतावादी वैदिक धर्माच्या विरोधात , त्या धर्मातील ब्राम्हणी प्रतिकांच्या विरोधात, संत नामदेवांनी विठ्ठलाला प्रेरणा म्हणुन उभे करत एल्गार पुकारला होता.काशी, मथुरा, द्वारका अशी तिर्थक्षेत्रे फिरत बसण्यापेक्षा आपले कार्य हेच ईश्वर मानावे ही प्रयत्नवादी भुमीका संत नामदेवांनी पुढे ठेवली होती. मग नामदेवांना मिळालेले सर्वच संत आपले दैनंदिन कामे करत भक्तीमार्गाच्या द्वारे अभिव्यक्त व्हायला लागले होते. शेतीची कामे करत संत सावता महाराज संत मेळ्यात सामील होत असत. संत गोरोबाकाका आपला कुंभारकीचा व्यावसाय करुन नामदेवांच्या मेळ्यात येत असत.असे विविध संत कार्य हाच ईश्वर हा संदेश देत होते. त्यामुळे संत चोखोबाराय यांना मंदिरातील ईश्वर नाकारनारे हे संत खुप भावले. 
                           चोखोबारायांचा मात्र व्यावसाय नव्हता तर लादलेली गुलामी होती. त्यामुळे त्यांना तो व्यावसाय मिरवता आला नाही, तर त्या गुलामीची घृणा वाटली. आपण जगत असलेले जगणे अमानवीय निकृष्ठ दर्जाचे आहे याची जाणीव होणे हे जागृत, डोळस माणसाचे लक्षण, चोखोबारायांना या गुलामीची जाणीव होती.
                    गुलामीचे जीने संपूनही व्यक्ती स्वातंत्र्य बहाल करणाऱ्या लोकशाहीत उच्चजातीय राजकारण्यांच्या दारात पैसे मागत मत विकणारे गुलाम पाहिले की गुलामीची जाणीव असणारा डोळस चोखोबा ग्रेट वाटु लागतो.
      
                                आम्ही अस्पृश्य का आहोत ? आमच्याच वाट्याला हे अमानवीय जगणे का यावे ? आम्हाला लोकांनी दुर हो , असे का म्हणावे? आमची घृणा, तिरस्कार का करावा ? आम्हाला इतर माणसांसारखे माणुस का मानले जात नाही ? विटाळावाचुन कोण चुकला आहे ? विटाळ काय फक्त आम्हालाच आहे का ?  आमचा जन्म काय उष्टे खाण्यासाठीच झाला आहे काय ? हे प्रश्न चोखोबारायांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या सदस्यांचे  आहेत. असे प्रश्न पडणे , हे प्रश्न व्यवस्थेला जाहीरपणे विचारणे, डोळस, वैचारीक, प्रगल्भ माणसाचे लक्षण आहे.संत चोखोबारायांचे संपूर्ण कुटुंब डोळस होते.प्रगल्भ होते.वैचारिक होते.शिवाय व्यवस्थेचे मानवनिर्मित दहाक भोग हे कुटुंब भोगत होते.त्यांनी कुठलीही चुक केलेली नसताना, त्यांना जन्मानेच वाईट मानुन त्यांचे मानवी चांगुलपण ही समाजव्यवस्था नाकारत होती.मुक्त जगण्याचे त्यांचे हक्क आधिकार काढुन घेतले जात होते.काश्मिरी ब्राम्हणांच्यापेक्षा भयानक हाल या देशात अस्पृश्य जातींचे केले जात होते.त्या अस्पृश्य जातींचा छोटासा आवाज हे कुटुंब बनले होते.अस्पृश्यांची कैफियत मांडण्यासाठी, हे कुटुंब आवाज उठवायला निघाले होते. 
              अमानवीय प्रथा नाकारण्याचे धाडस चोखोबारायांच्या कुटुंबीयांनी  केले होते. त्यामुळेच ते इतिहाहापुरूष ठरले.अजरामर झाले.

नितीन सावंत परभणी 
9970744142

Saturday, 12 March 2022

संत चोखोबाराय चरित्र ll प्रकरण १० वे ll काय भुललासी वरलिया रंगा ....

संत चोखोबाराय चरित्र 
ll प्रकरण १० वे ll 

काय भुललासी वरलिया रंगा .... 

ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा l काय भुललासी वरलिया रंगा ll  कमान डोंगी पर तीर नही डोंगा। काय भुललासी वरलिया रंगा ll
नदी डोंगी परि जल नोहे डोंगे। काय भुललासी वरलिया रंगा ll
चोखा डोंगा परि भाव नोहे डोंगा ।काय भूललासी वरलिया रंगा ।।
                      -  संत चोखोबाराय 
                      
                                    'गुलामगिरी' हा जगभर थैमान घातलेला मानवी आजार . आपल्याच सारख्या माणसाला तो फक्त मरणार नाही एवढ्यात जाचक अटी लावून, त्याला प्रचंड श्रम करायला लावून, त्याचे शोषण करणे म्हणजे गुलामगिरी होय. युरोप,अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड या देशात तर अत्यंत घृणास्पद गुलामगिरी 2000 साला पर्यंत वेगवेगळ्या स्वरूपात अस्तित्वात होती. प्रचंड गर्दी होईल एवढाल्या गुलामांच्या बाजारपेठा होत्या. गुलामाला बोली लावून, चाचपुन पाहिले जाई. काही दिवस त्याला शारीरिक श्रम करायला लावून म्हणजे आजमावून विकत घेतले जाई. गुलाम स्त्रियांचे जीवनही महाभयंकर, नरक यातनामय होते. सतत होणारे बलात्कार आणि तिने जास्त आपत्य जन्माला घातली तर आपल्याला काम करायला फुकट माणसे उपलब्ध होतील या धारणेतून गुलाम स्त्रियांचे जीवन नरकमय बनवून टाकलेले होते.माय लेकरांची सतत ताटातूट केली जाई , बलावयात ते लकरं गुलाम म्हणून विकले जात. 
                    गुलामांना दिल्या जाणाऱ्या शिक्षांमध्ये त्याला सतत चाबकाने फोडून काढले जाई, कामाच्या वेळे व्यतिरिक्त त्याला साखळदंडाने बांधून ठेवले जाई. गुलामांच्या आपापसात झुंजी लावल्या जाई, एका गुलामाने दुसऱ्या गुलामाला जीवे मारेपर्यंत ह्या झुंजी चालत असत. गुलामांना विष्ठा खायला लावली जाई, एखाद्या गुलामाने पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास तप्त सळयांनी किंवा चपट्या काँईनने शरीरावर डागले जाई,खुणा केल्या जात असत. गुलामांना सामुदायिक फासावर लटकवून ते प्रेत तसेच ठेवले जाई. जळालेल्या गुलामांचे हाडे गोळा करून मजाक आणि चेष्टा म्हणून दुकानात विकले जात असत. म्हातारी माणसे, स्त्रीया आणि लहान मुले जे गुलाम असत ते बर्फात नेवून फेकून दिले जात असत. तिथेच ते तडफडून मरत असत. कोळशांच्या हिऱ्यांच्या खाणीत त्यांना अत्यंत कमी अन्न देऊन राबवून घेतले जाई, त्यामुळे एक-दोन वर्षातच ते गुलाब खानितच मरायचे. काम करताना सर्वत्र वास सुटायचा, रोगराई पसरायची. ही जगभरातील गुलामगिरी होती. काळे-गोरे  या भेदावर ही गुलामगिरी उभी राहिलेली होती. जगभरात कामाला आणि युद्धाला जुंपून करोडो काळे मारण्यात आले होते. दोन्हीकडून ही युद्धातील सैन्यात काळे गुलाम वापरले जात असत.काळयांचे सामूहिक शिरकानही कित्येक वेळा गोऱ्यांनी केले आहे. काळ्यांचे लढे उभे करणारे अनेक नेते पकडून गोळ्या घालून ठार करण्यात आले,तरीही लाखोंच्या बलीदानानंतर काळ्यांना गोर्यांच्या बरोबरीने हक्क अधिकार मिळाले आहेत.अलीकडे काळे-गोरे भेद आणि गुलामगिरी जवळपास संपत आली आहे.

                                  भारतातही गुलामगिरीची अमानवीय प्रथा स्वातंत्र्य मिळेपर्यंत चालू होती. परंतु भारतीय गुलामगिरी धर्माच्या आधारे, मानसिक खच्चीकरण करून लादली गेलेली गुलामगिरी होती. जागतिक गुलामगिरी पेक्षा भारतीय गुलामगिरी जातिव्यवस्थेवर आधारलेली असल्याने येथे एखादी व्यक्ती किंवा कुटुंब किंवा एखादा समूह नव्हे तर जातीच्या जाती गुलामगिरीत ढकलल्या गेल्या होत्या. अनेक, जातींना हीन, तुच्छ लेखून त्यांच्याबद्दल धर्मसंम्मत कायदे करण्यात आले होते. बुद्धाच्या काळात दास प्रथा होती.तथागत बुद्धांच्या सामाजिक जागृतीमुळे दास प्रथा नष्ट झाली.  त्याकाळी दासांना दिल्या जाणाऱ्या शिक्षा आणि वागणूक भीषण होती.दासाला फक्त एकच वस्त्र वापरायला दिले जाई आणि ते फक्त कमरेच्या खाली गुडघ्यापर्यंत असे.दासांना डागले जाई, चुकल्यास तप्त सळई कानातून घालून दुसऱ्या कानातून काढली जाई, दासांना जमिनीला कान टेकवायला लावून वरून दुसऱ्या कानातून बांबू किंवा टोकदार लाकडाने ठेचले जाई, गणातील लोक जमून याप्रकारे दासावर सामुहिक हल्ला केला जात असे. वर्णव्यवस्थेत भंगी ,चांडाळ यांना गुलामा सारखीच वागणूक असल्याचे दाखले त्रिपिटकात सापडतात.
                  पुढील काळात जातीव्यवस्था आली.जातीव्यवस्थेत अनेक जाती अस्पृश्यतेत लोटल्या गेल्या आणि या अस्पृश्यांचे संपूर्ण जीवन उच्चजातीयांच्या हातात असे. या अस्पृश्य जातींमध्ये महार,मांग,चर्मकार, ढोर,भंगी,खाटिक अशा अनेक जातींचा समावेश होतो.या जातींना काळ्या गुलामांपेक्षाही भयानक अत्याचाराला सामोरे जावे लागलेले आहे.

                     या गुलाम जातींना हिनत्वदर्शक कामे वाटून दिलेली असत.भंगी या जातीला तर परंपरागत पिढ्यानपिढ्या उच्चजातीयांची संडास हाताने उचलायला लावली जायची.गावातील उच्चजातीय स्वताच्या घरातील संडासात हगत असत आणि नंतर ती संडास बाहेरील खड्ड्यातून भंगी समाजाचे बांधव आपल्या डोक्यावर घेवुन तो मैला गावाबाहेर नेवुन टाकत असत. यावर अनटचड इंडिया ही डॉक्युमेंटरी सुद्धा आहे. या अस्पृश्य जातींना कुठलेच हक्क अधिकार नव्हते. अन्न म्हणून त्यांनी मेलेल्या जनावरांचे मांस खायचे. तळलेले अन्न अस्पृश्यांना खाण्यास बंदी होती. हे मनुस्मृतीत नमूद आहे. कच्चे,सडलेले ,विटलेले, बुरशी चढलेले अन्न अस्पृश्यांना खाण्यास दिले जाई. त्यांना गावगाड्यातील मुख्य पाणवठ्यावर पाणी भरु दिले जात नसे.अस्पृश्य स्त्रियांनी लाज झाकली जाईल एवढेच कपडे वापरावेत, त्यांचे कपडे धुतलेले स्वच्छ व पांढरे असू नयेत हा दंडक होता.अस्पृश्य पुरुषांनी कमरेखाली,गुडघ्यापर्यंत लंगोट किंवा धोतर वापरावे. एका प्रथेत तामिळनाडूत तर स्त्रियांना स्तन उघडे ठेवायला लावले जात असत. उच्चजातीय रस्त्याने जाताना अस्पृश्यांनी रस्ता रस्ता सोडून बाजूला उभे राहावे. अस्पृश्यांनी चूक केल्यास त्याला जिवंत जाळले जाई. अनेक अस्पृश्यांना बांधकामासाठी नेऊन भिंतीत किंवा बांधकामाच्या पायात जिवंत गाडले जाई. अस्पृश्यांच्या स्त्रीयाही उचलून नेऊन ओरबडल्या जात. अब्रू लुटली जाई.स्वातंत्र्यानंतरही खैरलांजी हे रेकॉर्ड वर आलेले उदाहरण आहे.अशा भीषण अस्पृश्यतेच्या गुलामगिरी विरोधात बंड करणे धार्मिक गुन्हा मानला जाई. तरीही मध्ययुगीन भारतात संत चोखामेळा संत सोयराबाई, संत बंका, संत कर्ममेळा, संत निर्मळा आणि संत रविदास हे संत अस्पृश्यतेच्या गुलामगिरी विरोधात बंडासाठी उभे राहिले होते.यांनी केवढा मोठा विद्रोह केला होता हे गुलामगिरी काय असते हे अभ्यासल्या शिवाय लक्षात येनार नाही. 
                               अस्पृश्याने मुक्तपणे अभिव्यक्त होणे भजन,अभंग,दोहा लिहने, म्हणजे हा तर धर्मद्रोह होता. या अस्पृश्य जातीतल्या संतांनी प्रथम अभंग,दोहे लिहायला सुरुवात करून धार्मिक गुलामगिरी मोडीत काढायला सुरुवात केली होती.
  संत रविदास म्हणायचे,
रैदास न ब्राम्हण पूजीए ।जो हो गुणहीन ।
पूजीए चरण चांडाल के। जो हो गुणप्रविण ।। 
 
                  जातिव्यवस्थेच्या असमान वागणुकीवर संत रविदास यांनी अत्यंत परखड टीका केलेली आहे. संत रविदास यांच्या अगोदर संत चोखोबा यांचा जन्म झाला म्हणून अस्पृश्यतेच्या विरोधात धार्मिक क्षेत्रात पहिले बंड करणारा पहिला गुलामांचा नेता म्हणजेच संत चोखोबाराय होय.संत चोखोबाराय भारतीय अस्पृश्य मानलेल्या गुलामांचे पहिले नेते मानले पाहिजेत. 
संत नामदेवांच्यावर भरोसा ठेवून चंद्रभागेच्या तीरावर सर्व संतांत मुक्तपणे सहभागी होण्याचे धाडस संत चोखोबारायांनी केलेले आहे. त्यांनी अभंग लिहून  धार्मिक गुलामगिरी मोडण्यासाठी पहिले पाऊल टाकले.आजच्या दृष्टीने ही गोष्ट, ही कृती नगण्य, छोटी जरी वाटत असेल तरी ते धाडस खूप मोठे होते. संत चोखोबाराय यांनी अभंगातून अभिव्यक्त होऊन गुलामांचे नेतृत्व केले तर संत सोयराबाई आणि कर्ममेळा यांनी व्यवस्थेला थेट प्रश्न करून बंडखोरी केली.
                  बाहेरच्या जगात गुलामांचा बंडखोर नेता म्हणून स्पार्टकस अजरामर झाला. स्पार्टाकसला ती लढाई तलवारीनेच लढावी लागली .भारतीय गुलामगिरीत अस्पृश्यांना तलवारी घेवुन बंड करता येनार नव्हते.तसे प्रयत्न झालेही परंतू उच्चजातीय समाजव्यवस्थेने अस्पृश्य वस्त्या जाळल्या , सामूहिक शिरकान केले गेले. म्हणून भारतीय गुलामगिरी शस्त्रास्त्राने संपणारी नव्हती, नाही.ही गुलामगिरी वैचारिक प्रभोनात्मक मार्गानेच संपणार असल्यामुळे येथे तलवारीची लढाई लढता येनार नाही. म्हणून संत चोखोबाराय जी भूमिका घेतात ती स्पार्टाकसच्या तोडीचीच आहे.भारतीय गुलामगिरी ही वैचारिक प्रबोधनानेच संपनार आहे.तो बरोबर मार्ग संत चोखोबाराय पकडतात. ते गुलामगिरीच्या इतिहासात अभिव्यक्त होणारे अस्पृश्यांचे प्रतिनीधी म्हणून मैलाचा दगड बनले आहेत. 
                       संत चोखोबारायांची प्रेरणा पुढील काळात अस्पृश्यांसाठी काम करणाऱ्या सर्वच नेत्यांना मिळाली. विदर्भातील किसन फागुजी बनसोड हे स्वातंत्र्यपूर्व काळात संत चोखोबा यांच्या नावे वृत्तपत्र चालवत असत.त्यांनी संत चोखोबारायांच्या नावे वसतीगृहही काढले होते.  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा आपला एक ग्रंथ संत चोखामेळा यांना अर्पण केला आहे.दोन्ही उदाहरणांच्या द्वारे हे सिद्ध होते की संत चोखोबाराय हे अस्‍पृश्‍यांवर लादलेल्या  गुलामगिरी विरोधात लढणारे नेते होते. ते अस्पृश्यांचे पहिले बुद्धिजीवी होते. अस्पृश्यतेच्या गुलामगिरीत खितपत पडलेल्या समुदायाचा नेता म्हणून चोखोबारायांची अनेकांना दखल घ्यावीच लागेल.
                   भारतात ब्राम्हणी व्यवस्थेने माणुस म्हणून एका जातवर्गाची जगण्याची सर्व साधने हिसकावून घेतली होती.आपल्याला हिशोबशीर धर्म निर्माण करुन त्याचे धर्मपुस्तकही ब्राम्हणी जातवर्गाने  काढले होते. त्याद्वारे ते कारभार करत.आपल्या जगण्याची सर्व साधने हिसकावून घेतलेली हडामासांची माणसासारखी माणसे पाच नव्हे दहा नव्हे हजारो वर्षे मेलेल्या जनावरांचे मांस खात होते.
                    कार्यकतृत्व सुद्धा आम्हीच गाजवनार , कलाकारी आदाकारी आमचीच मक्तेदारी,ज्ञानभांडाराच्या चाव्या आमच्याच जानव्याला म्हननार्या जात्यांध वर्गाने या देशाचे हजारो वर्षे सांस्कृतिक कुपोषण केले.तरी संत चोखोबारायांच्यासारखे संत ही मक्तेदारी मोडुन काढण्यासाठी पुढे आलेच.त्यांनी आंधारात एक प्रकाशकिरण निर्माण केलाच. वरिल अभंगात संत चोखोबाराय म्हणतात " ऊस वाकडा असला म्हणून काय त्याचा रसही तसाच असेल का ? म्हणून वरच्या रंगाला भुलू नका.धनुष्य बानाची कमान वाकडी असते म्हणून काही तिर वाकडा नसतो.नदी वेडीवाकडी वळने घेत प्रवाही रहाते म्हणून काही तिचे पाणी वाकडे नसते.म्हणून वरवरच्या देखाव्याला भुलू नये.हा चोखोबा तुम्हाला हिन अस्पृश्य वाटत असेल पण त्याचा भाव तुम्ही पहावा.त्याची गुणवत्ता लक्षात घ्यावी.जातीवरुन हिनवु नये.

नितीन सावंत परभणी 
9970744142