सौमावाद्यान्नो भूमिका घ्या !
सामाजिक कार्यात उतरताना पहिला संघर्ष सुरु होतो तो स्वताशी तुकोबाराय म्हनाले होते रात्रंनदिन आम्हा युद्धाचा प्रसंग
खरे आहे.
अंतर्मनात युद्धच चालु असते.
संघर्ष चालु होतो,तो असा की व्यवस्थेशी जी जी व्हयजी म्हनत जगावं की प्रत्येक गोस्टीला प्रश्न करत बंडखोरी करावी.स्वताची पायवाट निर्माण करावी की भाऊगर्दीत सामील व्हावे.विचारधारेचा कार्यकर्ता बनण्याआधी स्वताचा संघर्ष पुर्ण केल्याशिवाय आपण परिपूर्ण होत नसतो.स्वताच्या मनावर विजय मिळविल्यानंतरच महावीर बुद्ध बनता येते.यशोधरेला आणि राहुलला बघत ग्रहत्याग बुद्धच करु शकतो आपल्याला तर आर्ध्या कार्यक्रमातून उठून जावे लागते कारण आपण गेल्याशिवाय बायको जेवत नाही म्हणून.
कार्यकर्ता म्हणून आपली एक भूमिका असावी.भुमीकांच्या जोरावरच तुमची व्यवस्था उभी रहाते.एक स्पष्ट भुमीका घेवुनच तुम्हाला नवी व्यवस्था उभी करायची असते.भुमीकेची स्पष्टता नसेल तर तुम्ही आहे त्या व्यवस्थेत विरघळून,मिसळून जाता.प्रस्थापित जातवर्गीय व्यवस्था तुमचे पोतेरे करते.ठोस भुमीकावाल्यांनी कित्तेक साम्राज्ये सहज कोसळवलीत,आणि ठोस भुमीकांच्या जोरावरच नव्या राज्यव्यवस्था कार्यरत झाल्याचे आपल्याला दिसेल.भुमीकाहिन माणसे दुसऱ्याच्या आलीशान बंगल्यासमोरील अंगणातील पायपोसने असतात.जिथे भूमिका मृतप्राय होते तिथे जी,जी, व्हय जी ही वृत्ती सर्वोच्च टोकाची लाचारीची लाळ गाळाताना दिसते.यात आनखी एक असे की लेचिपेची भूमिका सुद्धा तडजोडीची इतकी सवय लावते की आयुष्य हुजरेगिरी करण्यासाठीच उरते.म्हणून भूमिका स्पष्ट आणि ठोस असावी.
तुम्हाला सौमावादी व्हायचे आहे तर ढसाळ व्हा.व्यवस्थेला कोलणारा किंवा मग ओशो व्हा.अंतर्मनात किंतूपरंतु न ठेवता झोकुन द्या स्वताला सामाजिक चळवळीत.
कोण काय म्हनेल ? माझ्या रोझीरोटीचे काय होइल ? लगीन व्हइल की नाही ? समाज भाऊकी काय म्हनेल ? कुनाला हे अवडेल की नाही ? हे सगळे फाट्यावर मारा झोकून द्या एका सामाजिक कार्यात.गरज आहे तुमच्या त्यागाची.गरज आहे तुमच्या या वेळेची.
तुमच्या त्याग आणि समर्पनाला आज महत्व आहे.तो तुम्ही केला पाहिजे.उंटावरून शेळ्या हाकुन जमनार नाही.
आम्ही वाट पहात आहोत त्यागी आणि समर्पित व्यक्तिची जो अंतर्मनातील संघर्ष मिटवून मुक्त जगायला निर्भयपणे पुढे येइल.
सौमावाद्यान्नो
नितीन सावंत परभणी
9970744142