Friday, 13 December 2019

सौत्रान्तिक मार्क्सवाद (सौमा) हे तत्त्वज्ञान समजून घेताना..

सौत्रान्तिक मार्क्सवाद (सौमा) हे तत्त्वज्ञान समजून घेताना..

तथागत बुद्धानंतरचा सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञ दिग्नाग आहेत.त्यांच्या  सौत्रांतिक तत्त्वज्ञानाची जोड मार्क्सवादाला दिल्याशिवाय भारतीय मार्क्सवाद्यांची अधोगती थांबणार नाही आणि त्यांना वर्ण आणि जात या संस्थांचेही आकलण होणार नाही,असे प्राच्यविद्यापंडित कॉ.शरद पाटील नेहमी म्हणत  असत.म्हणून आपल्या "मार्क्सवाद फुले आंबेडकरवाद" या तत्वज्ञानाला मागे घेत शपांनी सौत्रांतिक मार्क्सवाद हे नवे तत्वज्ञान बहाल केले.बुद्धाची सुत्रे आणि मार्क्सचा पाया इमला तथा भौतिकवाद स्विकारत शरद पाटलांनी सौत्रांतिक मार्क्सवाद उभा केला.माणसाला डिकास्ट आणि डिक्लास बनवनारे त्यांचे तत्वज्ञान जाणीव आणि नेनीवेचा विचार मांडते .

सौत्रांतिक मार्क्सवाद

या तत्वज्ञानाला फिल्डवरती किंवा डिबेटसाठी हाताळताना काही  बेसिक्स टर्मस लक्षात घेतल्या पाहिजेत.

१.हे जात-वर्ग-स्त्रीदास्यांताचे तत्त्वज्ञान असल्यामुळे वापरताने काटेकोर पणे वापरले पाहिजे. कुठे वर्ण, सरंजामीव्यवस्थेचे किंवा भांडवलशाहीचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थन तर करणार नाहीं ना, या कडे लक्ष दिले पाहिजे.  कॉ. शरद पाटील यांनी माफुआचा विकास करून सौत्रान्तिक मार्क्सवाद (सौमा) हे तत्त्वज्ञान निर्माण करतांना काय आणि किती कष्ट घेतले आहेत, ते विसरता कामा नये.

तरीही, सौमा व्यक्तिविशेष/ हिरोईझमला  महत्व देत नाही.

२.सौमा वापरत असताना तुम्हाला समग्र क्रांतिदृष्टि प्राप्त होते. म्हणजे जात, वर्ग, स्त्रीदास्य या शोषणशासन व्यवस्थेचे अविभाज्य भाग कसे आहेत, हे स्पष्ट होईल. या तीन्ही शोषणशासनसंस्थांच्या व्यवस्थांचे गतिनियम ज्ञात होतील. एकदा का हे समजले तर त्याच्या अंतासाठी घेतलेला मार्ग हा क्रांतीमार्ग बनेल. मात्र हा क्रांतीमार्ग वनवे आहे. परतीचा मार्ग नाही. हे लक्षात घेतले पाहिजे.

३. हे तत्वज्ञान, पहिली जात्यंताची  मागणी करतो. त्यामुळे तो डॉग्मा नाही तर स्वयंप्रज्ञतेचा पुरस्कर्ता बनतो.

४.तो वापरणाराला प्रदर्शनी बनू देत नसल्यामुळे रुक्ष आहे. तो त्यागाची आपेक्षा करतो, आपण त्यागाची भूमिका घेत असाल तर वापरणे कठिण नाही.

हा प्रदर्शनीय नसला तरी, वादविवादाचे सर्वात प्रबळ शास्त्र आहे. त्यामूळे जात-वर्ग-स्त्री शोषणाच्या नियंत्यांना उघडे पाडतो.

५ सौमा 'स्त्री - प्राधान्य' महत्वाचे मानतो, पुरुषी अस्तित्व दुय्यम. आजच्या व्यवस्थेच्या शोषणपिडनाची सर्वांत जास्त प्रभाविता ही स्त्री आहे त्यामुळे तिची नेणिव ही तेवढीच पेनिट्रेटींग. समाजव्यवस्थेमधील अाभासाला भेदून वास्तवापर्यंत जाण्याची तिची क्षमता हि तेवढीच प्रखर.
म्हणून विचारातही आणि कृतीतही तिलाच प्राधान्य.

६. सौमा हा निम-सरंजामी, निम-भांडवली जात-वर्ग समाजातील उत्पादन संबंधाना बदलून अौद्योगिक भांडवली लोकशाही क्रांतीसाठी नवे उत्पादन संबंध आणू पाहतो.

७. सौमा हा जात्यंतक उद्देश घेउन भारतातील अ.जाती, अ.जमाती, इ.मागास जाती, अल्पसंख्यांकातील मागास जाती-जमाती व स्त्रीयांच्या महाप्रबोधनाचा प्रमाणिक प्रयत्न नवधम्म क्रांतीसूत्रांच्या माध्यमातून करत असतो.

8.तथाकथित बुद्धीजीवी अलीकडे जातवार मेळाव्यांत , जातवार कृतीकार्यक्रमांत अग्रभागी सहभाग नोंदवून जात्यंतक क्रांतीला फाटा देवून जातोन्न्तीला प्राधान्य देत असतील तर त्यांना सौमा जवळ घेत नाहीं.

९. हे तत्वज्ञान, सर्वकष समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी सामाजिक व आर्थिक सर्वहारा वर्गाच्या निर्मितीसाठी या जातींचे काटेकोरपणे आकलन करायला लावतो. त्या सर्वहारा वर्गाच्या निर्मितीच्या प्रक्रियेतच त्यांना क्रांतीप्रवण बनवण्याची मोहीम घ्यायला लावतो. त्यांची जानीव - नेनीव कला-साहित्याच्या माध्यमातून जातीअंतक बनवतो. दोन सर्वहारांची एकजूट घडवून आणण्याची हमी देतों.

१०. ब्राम्हणी परिपोष घेवून वावरनारे आणि सर्वहारांपासुन परात्म होणारे. मध्यमवर्गिय बुध्दिजीवी, आपले एक स्वताचे विश्व मेंटेन करणारे. जाॅन शुम्पेटर ने मांडल्याप्रमाणे, ते त्यात त्यांचे कौशल्य creative destruction ने शोषकशासकांना फायदा मिळवून देतात. त्याच्या आधारे आपले विश्व सुरक्षित करतात.

सौमा अश्या बुद्धिजीवींना दुर करतो...

मानव मुक्ती मिशन

Thursday, 12 December 2019

अब्राम्हणी विधायक बहुप्रवाही अन्वेषण पद्धती

       ll विचारवेध ll

" कॉम्रेड शरद पाटांची -
अब्राम्हणी विधायक बहुप्रवाही अन्वेषण पद्धती"

सध्याला सर्व परिवर्तनवादी चळवळींच्या एकुण प्रचार प्रसाराकडे पहाता अत्यंतिक नकाराचा सुर त्यांच्याकडुन येताना दिसत आहे . आपन जेव्हा प्रबोधनाला सुरुवात करतो तेव्हा ती सुरुवात नकाराने होते . प्रस्थापीत ब्राह्मणी व्यवस्थेची कुठलीही गोष्ट खोडण्यासाठी आपण  जेवढे पुढे सरसावतो तेवढेच नव्या मांडणीसाठी आपन अग्रही नसतो . या नकारात्मकातेतून लोक तुटतात . सतत खोडत बसण्याने लोक जोडले जाण्याऐवजी तोडले जातात . हा वाइट तो वाइट मग चांगला कोन ? असा प्रश्न आपल्या अत्यंतिक नकारातुन लोक विचारतात . सध्याला बर्याच संघटना या नकारात्मक मांडणीच्या अत्यंत आहारी गेल्या आहेत . ह्या संघटणा समविचारी संघटांचे विश्लेषण सुद्धा नकारात्मकतेने करतात. एक परिवर्तनवादी गट दुसर्या आपल्याच परिवर्तनवादी गटावर या नकारात्मकातेतुनच तुटून पडतो . यातून काहीच साध्य होत नाही .

म्हणून ज्यांचे रस्ते चुकलेले आहेत . ज्यांना रिझल्ट मिळत नाहीत. त्यांनी आता तरी बदलावे .
यासाठी कॉ . शरद पाटांनी चळवळीसाठी एक अत्यंत महत्वाची अन्वेषण पद्धती दिली आहे .
तिला
'अब्राम्हणी विधायक बहुप्रवाही अन्वेषण पद्धती '
म्हणतात .

अब्राम्हणी म्हणजे पुरुषसत्ताक वर्चस्व नाकारुन समता स्वातंत्र्य आणि लोकशाही देनारी मात्रसत्ताक व्यवस्था मानने किंवा त्या दृष्टीने पहाणे होय.

विधायक हा शब्द विघातक शब्दाच्या विरुद्ध आहे . आपन विघातक टाकुन दिले पाहिजे . विघातक मांडणी करता कामा नये . आपले विश्लेषण विधायक असावे .

बहुप्रवाही म्हणजे सर्वंगाचा विचार करणारी . वर्गाचा अभ्यास ,जातीचाही अभ्यास ,जातवर्गाचाही अभ्यास आपन जिथे करतो ती बहुप्रवाही पद्धती .

अब्राम्हणी साहित्य आणि संस्कृतीच्या आधारे आपल्याला पुरुषी व्यवस्थेला नकार द्यायचा आहे . आणि तो नकार विधायक असनार आहे .

अशा पद्धतीने आपन सविस्तरपणे या पद्धतीचा अभ्यास केला पाहिजे .
या मेथडोलॉजीवर मानवमुक्ती मिशन मार्गक्रम करते 

वैदिक - अवैदिक ऐवजी ब्राम्हणी - अब्राम्हणी

वैदिक - अवैदिक ऐवजी ब्राम्हणी - अब्राम्हणी

अवैदिक म्हणजे कोण? काय? हे समजून घेण्यासाठी वैदिकचा अर्थ समजून घ्यावा लागेल. वैदिकचा अर्थ वेदाचा, वेदासंबंधी असा होतो.  वेद म्हणजे श्रुती, पठणाने जीवंत ठेवलेला इतिहास. ऋग्वेदामध्ये कोणत्याही पुरुषसूक्त (जे प्रक्षिप्त आहे) सोडता आजच्या सांस्कृतिक संघर्षासाठी, अस्मितेची लढाई लढण्याचे कोणतेही सूत्र दिसत नाही. हि पहिली गोष्ट.

दुसरी बाब हि कि अाज किंवा वेदपूर्वकाळापासून सांस्कृतिक लढाई लढणारे हे वेगळे होते आणि तो लढा संहिताबंद करणारे वेगळे होते.

वैदिकपूर्वकाळापासून एक संघर्ष दोन गणार्धामध्ये होत आल्याचे काॅ. शपांनी स्पष्ट केले आहे. तो म्हणजे क्षत्र विरूद्ध ब्रम्हन. ज्यांची स्वतःची श्रुती होती, तांत्रिकी. जीला छन्दाम्सी म्हटले गेले आहे.

क्षत्र नियंत्रित व्दैवर्णी, त्रैवर्णी गणसमाजाच्या नंतर चातुर्वर्ण्यापासून म्हणजेच उर्वशी पुरुरव्यापासून ब्राम्हण नियंत्रित  परंपरा चालू होते अाणि उर्वशी वरुणापासून अब्राम्हणी प्रवाह जो क्षत्र नियंत्रित राहतो. अगदी शिवकाळापर्यंत.

हे अब्राम्हणी प्रवाहाचे लढा लढणारे क्षत्र म्हणजे स्त्रिसत्ताक समाजाचे वारसदार, कृषक समाजाचे वारसदार, समतावादी गणसमाज होते.

अशा ब्राम्हणी विरूद्ध अब्राम्हणी सांस्कृतिक लढ्याचा स्पष्ट तपशील कवष ऐलूषच्या सांस्कृतिक लढ्याच्या घटनेने ऋग्वेदाने मांडून ठेवला आहे. काॅ. शपानी तो अापल्या ग्रंथात साधार मांडला आहे.

त्यामुळे लढणाऱ्यांचा म्हणजे ब्राम्हणी विरूद्ध अब्राम्हणी हे अस्सल संघर्षसुत्र जे काॅ. शपानी मांडले, ते घ्यावे. जे वैदिकपूर्वकाळापासूनचे आहे.

संहिता लिहणा-यांचा म्हणजे अभिजनांचा - वैदिक विरूद्ध अवैदिक हे प्रतिष्ठित संघर्षसूत्र  सांस्कृतिक लढ्यासाठी, अस्मितेच्या लढ्यासाठी वापरु नये.

Tuesday, 3 December 2019

अक्करमाशी: पोटजातीची व्यथा.

अक्करमाशी: पोटजातीची व्यथा.

नितीन सावंत,परभणी
9970744142

              भारतात सर्वात भीषण कोणती गोष्ट असेल तर, अस्पृश्य म्हणून जन्माला येणे. एखाद्या वेळी दिली गेलेली कठोर आणि भयानक शिक्षाही या विशिष्ट वेळेपुरती असू शकते पण "दलितत्व" अर्थात अस्पृश्य जातीत जन्माला येणे हे आयुष्यभर आणि क्षणाक्षणाला छळणारे असते, पीडणारे असते. आपली एक पायरी बघून सतत वावरावे लागते; पायरी सोडून वागायला जमत नाही. जन्मानेच एखाद्याला, एखाद्या समुहाला दलित, हलका, नीच, अस्पृश्य मानणे आणि तशा प्रथा परंपरा चालू ठेवणे हे भारतीय संस्कृतीमधली हीनकस परंपरा आहे; ती एक विकृती आहे. ही विकृती हजारो वर्ष भारतीय लोक पिढी-दर-पिढीगत पोसत, जपत आलेले आहेत.

                कुणाला वाटेल आता कुठे राहिला आहे जातिवाद?  पण असे म्हणनारे, वरवरचा विचार करणारे लोक आहेत. आजही ग्रामीण भागात जातिवाद तसाच आहे. अस्पृश्यता जरा कमी झाली असेल, पण जातीवाद मात्र तसाच आहे. ग्रामीण भागात माजी अस्पृश्य जातींच्या लोकांना मंदिरात जाता येत नाही. वर्धा जिल्ह्यातील आर्वी गावातील लक्ष्मीबाई वार्डातील आर्यन नावाच्या आठ वर्षाच्या मातंग समाजातील मुलाला मंदिरात का गेला म्हणून त्या मुलाची पॅन्ट काढून भर उन्हात गरम टाईल्सवर(फरशीवर)  बसवले. त्यामुळे मुलगा बसण्याच्या जागेवर गंभीर जखमी झाला. या घटनेचे फोटो संबंध महाराष्ट्राने सोशल मीडियात पाहिले आहेत. हि घटना जून 2019 ची आहे. हे उदाहरण अपवाद नाही तर, अशा घटना सातत्याने घडतात. फक्त माहित होत नाहीत.

आजही ग्रामीण भागात माजी-अस्पृश्य जातींच्या लोकांना सार्वजनिक जेवणाच्या पंगतीत उच्च जातीच्या बरोबरीने सहजरीत्या बसता येत नाही. काही गावे अपवाद आहेत. आजही ग्रामीण भागात उच्चजातीय वस्तीतले विक्रिला असणारे घर दलितांना विकत घेता येत नाही. ग्रामीण भागात निवडणूकीत जागा माजी-अस्पृश्यांसाठी सुटली असेल तर नामधारी पद भरून कारभार मात्र उच्चजातीय पहातात. गावसंस्कृतीत अस्पृश्यांची 'प्राइव्हेटात' नेहमी टिंगलटवाळी केली जाते. पुर्वी मात्र जाहिररित्या केली जाई. "साले माजलेत", हे वाक्य तर माजी-अस्पृश्य जातींच्यासाठी सर्रासपणे वापरले जाते.

शहरांची परिस्थिती जरा वेगळी आहे. शहरी मध्यमवर्गीय लोक छुपा जातीवाद पाळतात. शहरांत घरे विकत घेताना शेजारी मुस्लिम, दलीत नसावेत याची दक्षता घेतली जाते. शहरांत दलीतांना उच्चजातीयांच्या कॉलनीत किरायाने घरे दिली जात नाहीत. म्हणजे शहरी जातीवाद अगदी छुप्या पध्दतीने कार्यरत असतो.

कॉ.शरद पाटील यांनी 'मार्क्सवाद फुले- आंबेडकरवाद' या ग्रंथात जातीव्यवस्थेची सहा लक्षणे दिली आहेत.
१)जातींची अनुवंशिकता २)जन्मसिद्ध व्यावसाय ३)रोटीव्यवहार निर्बंधीत ४)बेटीव्यवहार निर्बंधीत ५)जातींची उचनिचता,जातवार वस्त्या ६)जातपंचायत
यातील जातव्यवस्थेच्या लक्षणांत कमी-अधीक थोडेफार बदल झालेले असतील परंतू, नव्या लक्षणांसह जातीव्यवस्था कायम आहे. उलट जातीय अस्मितांच्यामुळे आज जातीव्यवस्था अधिक तिव्र होताना दिसत आहे.

ही आजची परिस्थिती असेल तर स्वातंत्र्यपुर्व काळात दलीत आणि भटक्याविमुक्तांचे काय हाल असतील ?

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या द्वारे  उदयाला आलेल्या विद्रोही साहित्यिकांनी लिहिलेल्या साहित्याद्वारे जातीव्यवस्था तथा अस्पृश्यत्येचे आकलन आपल्याला करून घेता येते. या जातीव्यवस्था तिचे क्रमीक स्तर, पोट जाती हे समजून घ्यायला दलित साहित्य मदत करते. दलित आत्मकथने, जातीव्यस्था, अस्पृश्यता समजून घेण्याची महत्वपूर्ण साधने आहेत. ही दलित आत्मकथने केवळ स्वानुभव न राहता उद्यासाठीचा तो इतिहास बनलेली आहेत. जातीव्यस्थेच्या आकलनात मी दलित आत्मकथनांना मैलाचा दगड मानतो. स्वातंत्र्यानंतर शिक्षणामुळे आणि आंबेडकरी चळवळींमुळे दलितांमधे आत्मभान निर्माण झाले. यातून आपले जगणे, आपल्या वेदना आत्मकथानाद्वारे जगजाहीर करण्याचा एक मोठा प्रवाहच सुरू झाला.

अशा अनेक दलित आत्मकथनांपैकी 'अक्करमाशी' हे एक गाजलेलं आत्मकथन. डॉ.शरणकुमार लिंबाळे यांनी निर्भीडपणे लिहिलेले हे आत्मकथन आहे. हे आत्मकथन त्यांनी वयाच्या २५ व्या वर्षी म्हणजे १९८४ साली लिहिलेले आहे. त्यानंतर तेच आत्मकथन त्यांनी प्रमाणभाषेत १९९९ ला 'पुन्हा अक्करमाशी' म्हणून जगासमोर आणले.
      
हे आत्मकथन निम्नजातीतही एक पोटजातीय व्यवस्था कशी कार्यरत असते याचे चित्रण करते. भारतीय समाजव्यवस्थेत हलक्या, अस्पृश्य मानलेल्या जातीतही जातीबाह्य संबंधातून झालेल्या संततीला किती हीन आणि दुय्यम वागवले जाते, हे या आत्मकथानातून निदर्शनास येते.
अक्करमाशी म्हणजे विवाहबाह्य संबंधातून झालेली संतती होय. आत्मकथनाचे नायक शरणकुमार लिंबाळे, आई महार(पूर्वाश्रमीच्या) व वडील लिंगायत पाटील यांच्या विवाहबाह्य संबंधातून जन्माला आल्याने आपली भळभळणारी जखम अक्करमाशी नावाने जगा समोर उघडी करतात.

डाव्यांच्या वर्गीय भाषेत बोलायचे झाले तर आई भूमिहीन तर वडील जमीनदार, सरंजमादार. पण हा संघर्ष एवढाच, वर्गीयदृष्टीने पाहिला तर विषमतेच्या जातीसारख्या विविध शोषण-शासनसंस्था लपून राहतात ज्या जात्यांध्य आहेत. म्हणून अक्करमाशी मधल्या नायकाचा असणारा संघर्ष जातीय आहे, वर्गीय नव्हे.

लेखकाला भोगाव्या लागणाऱ्या यातना ते भूमिहीन आहेत म्हणून नव्हे तर ते माजी-अस्पृश्य जातीतले अक्करमाशी आहेत म्हणून आहे. म्हणून निंबाळेंच्या महार वस्तीतही स्वजातीय लोक देखील त्यांना निट वागवत नाहीत, त्यांना विवाहासाठी स्वजातीय मुली देत नाहीत, त्याचे कारण ते अक्करमाशी आहेत. आणि सवर्ण, उच्चजातीय त्यांचा तिरस्कार करतात कारण ते अस्पृश्य जातीचे आहेत म्हणून. येथे लेखकाचे पिडन दुहेरी आहे. उच्चजातीयांच्या दृष्टीने अस्पृश्य तर स्वजातीयांच्या दृष्टीने अक्करमाशी. असे दुहेरी दु:ख लेखक जगतो.

लेखक बालपणी शाळेतून येतांना पोर त्याना 'महार महार' म्हणून चिडवायचे हा उच्चजातीकडून  झालेला जातीवाद आहे,आणि हा जातीवाद अक्करमाशी म्हणून नव्हे. कारण उच्च जातियांच्या दृष्टीने हीन लेखण्यासाठी अस्पृश्य जातीत जन्माला येणे पुरेशे आहे, त्यात अक्करमाशी, बारामाशी असे काही नाही. अक्करमाशी आणि बारामाशी महार हा वरच्या जातींच्या दृष्टीने अस्पृश्य आणि तिरस्कारनीयच त्यात भेद नाही, म्हणजेच शरणकुमार लिंबाळे यांनी आत्मचरित्र ला दिलेले नाव स्वजातीय वेदनेतून दिलेले आहे. उच्चजातीच्या दुःख, पिडणापेक्षा आकारमाशी म्हणून जन्माला येणे लेखकाला जास्त त्रासदायक वाटते. पुरोगामी चळवळींनी अजूनही जातीअंतर्गत द्वंद्वावर तोंड उघडलेले नाही.

अक्करमाशीत शरणकुमार लिंबाळे यांना होणारा त्रास दुहेरी आहे. एक उच्चजातीयांचा जातीवाद तर दुसरा स्वजातीयांचा पोटजातीवाद. या भयाण दमनातून लेखकाचे आत्मकथन साहित्याची महत्तम उंची गाठते.
हे आत्मकथन केवळ अस्पृशांच्या वेदनादायी जिवनाचेच चित्रण करते असे नव्हे. या आत्मकथानाला अनेक कंगोरे आहेत. लेखकाच्या आजोबांच्या भूमिकेत असणारा पण रक्ताच्या नात्याने कुणीच नसणारा 'दादा' मुस्लिम आहे. त्यांचं नाव महामुद दास्तगीर जमादार. त्याची बायको पळून गेल्याने तो एकटा असे आणि लेखकाची आज्जी संतामाय नवऱ्याने सोडून दिलेली असल्याने ती आणि मुस्लिम दादा दोघेही एकमेकांना जीव लावायचे. ह्या दादाने आपला नात्याने कोणीच नसणाऱ्या शरणकुमार नावाच्या नातवाला शेवटपर्यंत माया लावली. हमालीचे पैसे दिले. बापापेक्षाही माया लावणारा दादा लेखकाने चित्रित केला आहे. आपल्या पोटूशी घेऊन झोपणारा मुस्लिम दादा आणि शाळेत पोराला माझे नाव लावू नका म्हणून सांगणारा लिंगायत पाटील. यांचे वास्तववादी, निर्भीड चित्रण लेखक करतात. धर्माच्या अंगाने पहायचे झाल्यास बसवण्णांच्या जात्यंतक समतावादी धर्मात जन्मलेल्या हणमंत लिंबाळे पाटलाला
आपले नाव पोटच्या पोराला द्यावेसे वाटत त्यासाठी तो विरोध करतो.कारण आपण ठेवलेल्या महार स्त्रीला आपल्याकडून झालेले आपत्य पुढे आपले नाव लाविल, त्याने बापाचे नाव लावू नये म्हणून हनुमंत निंबाळे शाळेत नाव लावताना विरोध करतो.एवढेच काय, काका म्हणजे जुन्नरचा यशवंतराव सिद्रमाप्पा पोलीस पाटील यांनी मसामायला म्हणजे लेखकाच्या आईला ठेवलेली होती. त्याने आणखी एक कुंभार स्त्री ठेवली होती. त्या कुंभार जातीच्या स्त्रीला पाटलाने गळ्यात लिंग घालायला लावून लिंगायत बनवले पण, मसामाय महार असल्याने तिला मात्र पाटील लिंगायत बनवू शकला नाही. महात्मा बसवण्णांची जातीअंताची चळवळ ग्रामीण भागात रुजली नाही तर उलट ती विरोधी टोकाच्या उंचीवर गेली. याचा हा पुरावाच म्हनावा लागेल.
म्हणून लेखक आपल्याला जवळ करणार्‍या मुसलमान दादा बद्दल म्हणतो, 'जात धर्म सोडून त्यांनी मला प्रेम दिलं. मला लेकरा सारखं वाढवलं. दादाचा धर्म आडवा आला नैय की जात.'

दलित आत्मकथने आणि आंबेडकरी चळवळी हिंदू धर्माला नावे का  ठेवतात तर या धर्मात एवढी नीच जाती व्यवस्था आहे की या धर्मातली काही माणसे माणुसकी पाळत नाहीत. पाळली तर ती माणुसकी जातवार असते. उच्चजातीयांपुरतीच असते. म्हणून लेखकाला हिंदू लिंगायत पाटला पेक्षा मुसलमानच जवळचा वाटतो. अक्करमाशीतले स्त्री चित्रण म्हणजे जगण्यासाठी कष्ट उपसणाऱ्या महिलांचे शोषण पिडनकारी विश्व आहे. 'प्रत्येक गावात एक-दोन चवचाल स्त्रिया असतात' हे पितृसत्ताक सामाजव्यवस्थेचे म्हणने लेखकानी प्रस्ताविकातच खोडले आहे. स्त्रीयाच चवचाल का असतात ? हा प्रश्न करून खोडले आहे.
ही पुरुष वर्चस्ववादी समाजव्यवस्था नैतिक-अनैतिकतेच्या कसोट्या स्त्रियांच्या शुद्धतेवरून लावते. पुरुष कसाही वागला तरी चालतो. परंतु स्त्रीयांना मात्र बारीक नियमांच्या कसोट्या लावलेल्या असतात. दलित साहित्यातील स्त्री गुलामीच्या अनेक शृंखलांनी जखडलेली आहे. जातीव्यवस्था आणि पितृसत्ता ही तिची सर्वात जाचक गुलामीची शृंखला आहे. उच्च जातीयांच्या नजरा सांभाळून दलित स्त्रियांना वावरावे लागते. नाहीतर आयुष्याचे मातेरे होते ठेवलेली, रखेली  म्हणून. आणि जन्माला आलेली संतती जाचक जातीव्यवस्थेत बनते अक्करमाशी.
अक्करमाशीत ज्या स्त्रिया येतात, त्यात आयुष्याचे मातेरे झालेली लेखकाची आई मसामाय. ह्या मसामायचे विठ्ठल कांबळे सोबत लग्न झाले होते. विठ्ठल कांबळे पासून तिला तीन मुलं झाली होती. पुढे गावच्या पाटलाने विठ्ठलाचा संसार मोडला. इठ्ठलाला कायबाय लावून देवून विठ्ठलाला मसामायला सोडून द्यायला लावली. पुढे मसामायला हनुमंत पाटलानीच ठेवली. त्याच्यापासून मसामायला शरणकुमार झाले. याच मसामायला परत गावच्या यशवंतराव सिद्धाप्पा पाटलाने ठेवली. त्याच्यापासून नागुबाई, निर्मला, वनमाला, सुनंदा, प्रमिला, श्रीकांत, इंदिरा व सिद्राम एवढी मुलं झाली. ठेवलेल्या स्त्रीला सुद्धा गावात मर्यादेच्या चौकटीत राहावे लागते. तिला इतर स्त्रियां सारखे जेवणाच्या पंक्तीत येता येत नाही. कारण ती पाटलाने ठेवलेली. माजी अस्पृश्य जातीतील स्त्रीला पाटलांनी ठेवलेली म्हणून सतत रस्त्यावर बाहेर वावरता येत नाही. म्हणून मसामाय कधीही जेवनाच्या पंगतीत जात नसे. ही पुरुष वर्चस्ववादी तथा उच्चजातीय शोषण शासनव्यवस्था.

त्यानंतर स्त्री म्हणून काबाडकष्ट करणारी लेखकाची आज्जी दिसते. पुढे लेखकाच्या बहिणी सुद्धा जगण्याची धडपड करताना दिसतात.
प्रत्येक गावात बाळंतपण करणारी जी दाई असते. ती मुख्यतः अस्पृश्य जातीतली असते. लेखकाची अाज्जी संतामाय असेच उच्चजातीय स्ञीयांचे बाळंतपण करायला जायची. हि जातीव्यवस्था अडलेल्या कामात निम्नजातीय, अस्पृश्य स्ञीयांची मदत घेते पण, गावच्या महत्त्वाच्या जागेवर मात्र हे लोक, स्ञीया नको असतात. कित्येक उच्चजातीय घरात अनेक मुलां-मुलींना याच अस्पृश्य दायांच्यामुळे जिवदान मिळालेले आहे, संगळ्यांच्याच घरात मुले-मुली रक्तातूनच जन्माला येतात ना  ? मग उच्चजातीय निम्नजातीय ही भावना का पेरली जात असेल ? शरणकुमार लिंबाळे म्हणतात,"आमीबी धर्मानं हिंदू ,आमीबी माणसं हावं, गावातली सर्व पोरं देवाजवळ जातात पण आमाला देवळात जाता येतं न्हाय. मुले म्हणजे देवाघराची फुले, आमी देवाघरची फुले न्हौतो. आमी गावाबाहेरचां केरकचरा" काळजाला भिडणारी वास्तविकता आहे ही. हि वाक्ये आहेत ही निंबाळेंच्या आत्मकथनातील.

अन्याय अत्त्याचारच्या काहीतरी सीमा असाव्यात, जातशोषणाला मर्यादातरी असावी पण, भारतीय जातीव्यवस्थेत अन्याय अत्याचाराला कुठलीही मर्यादा,अट नाही. धर्मसंम्मत अन्याय, शोषण करा. लूटा, बायां ओरबडा. खुली सुट. उच्चजातीयांच्या पाणवठ्यावरून लेकुरूवाळीनीनं धूतलेल्या बाळवतांच्या गुवाचे फथुले पिढ्यानपिढ्या पाण्यासोबत पोटात रचणारे अनेक शरणकुमार अाजवर गप्पच होते, बरे झाले एक निंबाळे बोलता झाला. नाहीतर उच्चजातीय उद्या म्हणाले असते,'असल्या प्रकारचा कुठलाही अन्याय-अत्याचार आम्ही केलाच नाही.'

निंबाळे यांचे आत्मकथन मला पुरावे वाटतात जाचक जातीव्यवस्थेचे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम या समतेचा पुरस्कार करणाऱ्या नामघोषाने, गजराने सुरू होणाऱ्या जेवणाच्या पंक्तीत निंबाळे सारख्या अस्पृश्यांना कधी बसताच आले नाही. या पंगती उच्चजातीयांच्या. वारकऱ्यांची समता फक्त अध्यात्मातच. गावपातळीवर वास्तवात तुळशी माळा गळा घालनारे वारकरी सुद्धा जातीव्यवस्था, अस्पृश्यता पाळतात. जेवणाच्या पंगतीत अस्पृश्यांना बसु देत नाहीत. अस्पृश्यांची पोरं दूर थुंका गिळत पंगतीकडे बघत उभी असल्याचे अक्करमाशी वर्णन आले आहे. जे आजचे सुद्धा वास्तव आहे. ही कुठली जातीव्यवस्था व अस्पृश्यता आपण जन्माला घातलेली आहे? याचे फायदे काय ? कुणाला हे  फायदे झाले ? सोइची जातीव्यवस्था अस्पृश्यता आपण का पाळतो ? म्हणजे बाळंतपणात लेकराला जन्माला घालताना अस्पृश्य दाई चालते. पुढे त्याच लेकराला अस्पृश्य स्त्रीने स्पर्श केला तर बाट का व्हावा ? अस्पृश्यांची बाई ठेवता येते तेव्हा बाट होत नाही का ? 'बहात्तर मैल एक प्रवास' या चित्रपटात नायिका म्हणते कातड्याला  कातडे घासताना तुम्हाला विटाळ होत नाही का ? अस्पृश्य स्त्रीयांच्या सोबत शारीरिक संबंध ठेवताना विटाळाचे भय वाटत नसते का ? या प्रश्नाचे उत्तर उच्चजातीय देतील का ?  दारुड्यांना अस्पृश्यांची दारू चालावी पण पाणी का चालू नये ? मोठा प्रश्नच आहे. ग्रामीण जीवनात अस्पृश्यता जातीव्यवस्थेचे चटके खाणारे शरणकुमार निंबाळे शिक्षण घेण्यासाठी जेव्हा सोलापुरात येतात तेव्हा त्यांना गुलामीची जाणीव व्हायला लागते. अशातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळु लागतात. वाचनाने त्यांना प्रगल्भता येते.आपले गावकडचे जीवन त्यांना किळसवाने नकोसे वाटु लागते. शहरात भेटायला आलेली आपली आज्जी त्यांना रुमला न्यावीशी वाटत नाही. कसले गुलाम जीवन आपण जगतो त्यांना हे उमगते. आशातच त्यांना बार्शीचे कांबळे मुलगी द्यायला तयार होतात.

बुद्ध धम्मात अक्करमाशी, बारामाशी असे काही नसते हे सांगून ते कोणाच्याही विरोधाला न जुमानता शरणकुमार यांना जावई करून घेतात. पुढे लेखकाला टेलिफोन ऑपरेटर म्हणून नोकरी लागली, त्या निमित्ताने त्यांना मराठवाडा पाहायला मिळाला, अहमदपूर, लातूर, भागात रूम शोधताना होणारा जातीवाद लेखकाने पाहिला - भोगला, कधी कधी जात लपवून राहावे लागले.
            
उच्चजातीयांचा जातीवाद तर त्यांनी भोगलाच परंतु बाबासाहेबानी दिलेल्या पवित्र धम्मातही, त्यांना पोट जातीवाद छळत राहिला, एकदा असेच बाबासाहेबांच्या जयंतीच्या मिटींगीला अक्करमाशी अध्यक्ष नको बारामाशीच हवा असे म्हणाऱ्या मंडळींच्या बोलवण्याला निंबाळे जाऊ शकले नाहीत कारण ते अक्करमाशी होते.
                  
बाबासाहेबांच्या मिरवणुकीतही लेखकाला परक्यासारखे वाटते कारण ते म्हणतात मिरवणूक बारामाशी महारांची, ते म्हणतात 'भीम जन्मला बाई सोमवंशी कुळात' हे ऐकताना मी कासावीस व्हायचो,
              
सर्वच बाजूने होरपळलेला अक्करमाशीकर खचून न जाता संकटांना सामोरे जातो, व्यवस्थेशी लढतो इथल्या जातिव्यवस्थेच्या छाताडावर नाचून मोठा लेखक म्हणून निंबाळे उभे राहातात, हे अत्यंत प्रेरणादायी आहे. व्यवस्थेला वाकवणारं हे स्फूर्तिदायक उदाहरण आहे.

डॉ.शरणकुमार लिंबाळे यांची अक्करमाशी सर्वांना अस्वस्थ करून सोडणारी आहे. शिवाय विधायक मार्गाने उभे राहायला शिकवणारी आहे. या आत्मकथनाबद्दल किंवा एकूण दलीत आत्मकथनावर ज्या वेगवेगळ्या टीका होतात त्या मला अमान्य आहेत. अशा टिका जात-वर्ग पितृसत्ताक व्यवस्थेच्या जाणीवेतून आलेल्या टीका असतात, कारण आपल्या वाट्याला आलेले दुःख,आपल्याशी झालेला, केला गेलेला जतिवादाचा बलात्कार मांडायचाच नाही, व्यक्त व्हायचेच नाही, हे सनातनी वर्तन ठरेल. भटके, आदिवासी व माजी अस्पृश्य जातींनी लिहावे, आत्मकथने ‌मांडावीत. जातीवादाचे खवंद फोडावे, पिळून काढावे, वरच्या व्यवस्थेला लाज वाटली पाहिजे किंवा जगाला तरी कळले पाहिजे या देशात लोक जनावरांच्या पलीकडे जगत होती म्हणून.

जातीव्यवस्थेकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना हे आत्मकथन नक्कीच चिमटे काढेल  किंवा जातीव्यवस्थेविषयी कोरडी आस्था दाखवणारयांना अस्वस्थ करेल.  जात्यंतक विचारसरणीवर चालणाऱ्यांना अंतर्मुख करेल, जात-पोटजातीतील विरोधाचा गुंता सोडवायला प्रज्ञावान बनवेल. या आत्मकथनामुळे नक्कीच 'गुलामाला गुलामीची व गुलाम करणाऱ्याला माणुसकीची जाणीव होईल.'

नितीन सावंत,परभणी
9970744142

Tuesday, 26 November 2019

संत कुर्मादास

वारकरी चळवळीत संतांच्या यादीमध्ये संत कुर्मादास हे सुद्धा एक नाव लोकप्रिय आहे.ज्यांची समाधी सोलापूर जिल्ह्यातील लहुळ या गावी आहे.संत सावता महाराजांच्या आरण या गावाच्या अगदी बाजुला हे संत कुर्मादासांचे समाधी मंदिर आहे.

संत कुर्मादास हे पैठणहुन पंढरपूरला निघाले होते.त्यांना हात आणि पाय नसल्याने ते फरफटत चालत आल्याची एक मिथकीय आख्यायिका आहे.या कुर्मादासांची संत नामदेव संत ज्ञानेश्वरांची एकत्र भेट झाल्याचीही एक कथा प्रचलित आहे.

मुळ मुद्दा असा आहे की हे कुर्मादास जातीने ब्राम्हण असल्याचे सांगितले जाते.त्या पध्दतीने सर्वांनी साहित्य निर्मिती केलेली आहे.महिपतीबुवांच्या भक्ती विजय ग्रंथातही ते ब्राम्हण असल्याचे सांगितले आहे..
पन आम्ही जेव्हा समाधी पाहिली तर ती कबरीच्या स्वरूपात आहे.एवढेच काय तिच्यावर सुफी परंपरेप्रमाणे पांढरी हिरवी चादर चढवली जाते.एरवी सुद्धा त्याच रंगाचा कपडा कबरीवर असतो. मुख्य सणाला त्या कबरीवर मोठी हिरवी चादर चढवतात. पुजाऱ्यांना विचारले तर ते म्हनाले ही जुनीच परंपरा आहे.

जालिंदर कदम नावाचे पुजारी म्हनाले की १९९२ ला बाबरी मशीद पाडल्यानंतर याही परिसरात अनेक कबरी होत्या त्यांची मोडतोड करण्यात आली.

हा भाग आजही अत्यंत निर्जन वस्तीचा आहे.त्यामुळे नासधूस केल्यानंतर त्या दगडांची सुद्धा विलेवाट लावण्यात मोडतोड करनारे यशस्वी झाले.

मग संत कुर्मादास खरच जन्माने ब्राम्हण होते का ?
ब्राम्हण होते तर समाधीवर चादर का ?
विशेष म्हणजे समाधीच का मुर्ती का नाही ?

बाजुच्याच गावी सामधीवर संत सावंता महाराजांची मुर्ती आहे मग येथे का नाही ?

एका सुफी संतांचे सावकाशरित्या पिढीदरपिढीगत ब्राम्हणीकरण चालु आहे..
आणि त्या सुफी संताचे वैचारिक,धार्मिक वारसदार झोपलेले आहेत..

Friday, 1 November 2019

♦ स्त्रीवाद ...

♦ स्त्रीवाद ...

सर्वांच्या आधी तिने उठायचे आणि सर्वांच्या नंतर तिने झोपायचे.कोणी आजारी असेल तर उशाला बसुन राहुन सेवा तर करायचीच शिवाय सर्व घर अवरत रहायचे.आजारी असणाऱ्याचे हगणे मुतने तिने करायचे,सर्वांचे कपडे मनगटे झिजवुन स्वताला मरण येइपर्यंत धुत रहायचे.स्वयंपाक तर तिच्या पाचवीलाच पुजलेला.त्यातल्या त्यात सर्वांची मने सांभाळायची आणि सर्वांच्या अवडीच्या भाज्या रोज करायच्या.त्या बदल्यात आई तु भाज्या छान बनवतेस हे कौतुक सुद्धा नाही. वर्षानुवर्षे जनावरांच्या सारखे पुरूष चरत असतात.पण कौतुक नाही.  स्त्रीयांचे कौतुक म्हणजे महापाप .. आई म्हणून तिचे हे सर्वात मोठे पिडन आहे.कर्तव्याच्या नावाखाली तिची घोर कुचंबणा,दडपनुक आहे.संसार नावाच्या पाट्यावर कर्तव्याच्या वरवंट्याखाली ती सातत्याने चिरडली जातेय.

हल्ली सोप्पा स्त्रीवाद आलाय . गोऱ्यागोमट्या पोरी fb ला दिसल्या की आपला स्त्रीवाद प्रगट करायचा. fb ला बाई दिसली की कुत्र्यागत लाळ गाळायची.तिला मी किती समतावादी आहे हे उगच दाखवायच्या भानगडीत पडायचे..

आणि आपल्या घरतली आई.ती राबनार तशीच.स्त्री ही गणीतातला हातचा आहे.कधीही वापरा.स्त्री हे गृहीतक आहे. हे गृहीतक आपन ग्राह्य धरायचे पण तिने  स्वताला ग्राह्य धरता कामा नये.

एखाद्या अंगणात जावून आवाज द्या. आहे का घरी कुणी. घरात कोणीही पुरुषमंडळी नसेल तर आवाज येतो. " *घरी कोनीही नाही* ".ती स्वताला कोणीच मानत नाही. तिच्या दृष्टीने ती ग्रहीतकात नाही ....

तिने मोठ्याने हासायाचे नाही, तिने चारचौघात बसायचे नाही, तिने निर्णयप्रक्रियेत सहभागी व्हायचे नाही. तिच्या नातेवाईकांकडे जाताना तिने विचारुनच गेले पाहिजे.तिने सर्वात शेवटी जेवायचे,उरलेले शिळे तिच्याच वाट्याला.शिवाय तिने कधीही आजारी पडायचे नाही.सगळ्यांची कामे अडतात ना म्हणून.

आनेक शुर धाडसी सुंदर स्त्रीया बघून नेहमी वाटते की असल्या बावळटाच्या गळ्यात ह्या कशा काय पडल्या असतील. नंतर कळते की कसाई बापाने ही गाय या खाटकाच्या  खुंट्याला बळजबरीने बांधलेली आहे. नवरा निवडीचे स्वातंत्र्य फारच कमी हो.

सर्व चित्रपटे मग हिंदी असोत नाहीतर मराठी असोत.
त्याच्यात स्त्री गुलामीचे चित्रण जाहीररीत्या केलेले दाखवले जाते. नवरा घराबाहेर पडताना तिने घडी घातलेला रुमाल हातात देताना,घरी आल्यावर त्याचा कोट काढुन घेताना, हातात पाणी चहा देताना,जेवन लावताना/ वाढताना, जेवायला त्याची वाट बघताना,असले चित्रने सहजरीत्या केली जातात.यात कुनाचेही ओब्जक्षण नसते.बाई ग्रहीतक आहे ना म्हणून ..

तरिही त्या स्त्रीयांनी स्वताला खुप मल्टिपल बनवून घेतलेले तुम्हाला दिसेल.सिलाई मशिनवर ती शिवतेय, चुलीवर दाळ शिजत घातलीय,लेकरु अंगणात खेळतेय,आणि उन्हाला काहीतरी वाळवत घातलेय .. आशा आनेक घटकांत तिचे लक्ष चौफेर असते.ती  दाळ उतू जावु देत नाही की मुलाला माती खानार नाही यावरही तिचे लक्ष असते .. वाळवत घातलेल्या धान्यावर कुत्रे किंवा जानावर येनार नाही याचीही ती काळजी घेते आणि शिवनकामही चोखपणे चालु असते.हे पुरुषांना एकत्रितपणे जमनार नाही.

मला स्त्रीवादात एक स्त्री खुप भावली ती म्हणजे संत जनाबाई ..
ती म्हनते *स्त्रीजन्म म्हणोनी न व्हावे उदास*

स्त्रीयांचा जन्म मिळाला म्हणून उदास होण्याचे कारण नाही.तर

*डोक्यावरचा पदर कमरेला खोसुन भर बाजारात यायचे,कुनाच्याही बापाला घाबरायचे नाही,कुनाला काय मनगटावर तेल घालून बोंबलायचे असेल बोंबलु द्या .. लोक म्हनतील ही वाया गेलेली बाई आहे.मी तर घोषनाच केलीय मी वेश्या होऊन  विठ्ठलाचे घर निघनार आहे*

स्त्री जीवनात अब्रू महत्वाची असते. आमची जनाबाई ती सुद्धा दावनीला बांधतात.तुम्ही वाया गेलीय काय म्हणतात.मी वैश्याच होतेय,कोण काय म्हननार बोला हाय हिम्मत.

हाच सर्वोच्च स्त्रीवाद आहे.लोकलाज सोडने.पुरुषी नियमावली मोडने ... हाच आमचा स्त्रीवाद....

नितीन सावंत
राष्ट्रीय संसद प्रमुख
मानव मुक्ती मिशन
ntnsawant31gmail.com
9970744142

♦♦♦♦♦♦♦♦♦♦

Thursday, 31 October 2019

एच्छिक #पुरोगामीत्वाची लक्षणे ..

एच्छिक #पुरोगामीत्वाची लक्षणे ....

१)माझ्या घरी मी प्रतिगामीच असेल.... पुरोगामीत्व चौकटीच्या बाहेर .
२)रस्त्यात भेटलात बायको सोबत असेल तर मी प्रतिगामी असेल.
३)शनिवार रवीवार पुरोगामी असेल.
४)माझ्यावर बेतले,आणीबाणी असेल मी संकटात असेल तर मी प्रतिगामी असेल.
५)सत्तांतर झाले तर मी आतून पुरोगामी असेल.बाहेरून प्रतिगामीच !
६)हापिसात,उच्चजातीयांत,श्रीमंत नातेवाईकांत मी मौनधारी #पुरोगामी असेल.
७)निधी मागायला आलात तर मी प्रतिगामी असेल.
८)दुसऱ्याला मोजपट्ट्या लावायला मी पुरोगामी असेल,माझ्या घराला कुटुंबाला मला मोजपट्टी लावली तर मी प्रतिगामी रूप घेइल.
९)मला हवे असलेले नियमच पुरोगामी.म्हणजे मी म्हनेल ते पुरोगामीत्व.जसे विपश्यना पुरोगामी आहे.गांधीला स्विकारा वगैरे.
१०)आधी माझ्या सोइचे कृतीकार्यक्रम आणि मला प्राधन्य दिले तर मी पुरोगामी ...
११) मला स्वतंत्र व्यक्त होऊ द्या,मला स्वतंत्र विचार करु द्या,माझी अभिव्यक्ती हेच पुरोगामीत्व.. ब्राम्हणत्व वगैरे सब झुट .. आड ना विहीर .. घर ना घाट .. मला दोलायमान राहु द्या .. सावरकर बी आंबेडकर बी .... दोन्ही .. मी सगळ्यांचा ...यालाच महत्व द्या हेच #पुरोगामीत्व .... म्हनारे सर्व आले त्यात
१२) एकजन तावातावाने म्हनाला "त्याला एका बाईने कुरवाळले काय मेला पुरोगामी चळवळच सोडुन गेला ..."
१३)आपल्याला जेव्हा त्रास होइल तेव्हाच ती समस्या चर्चेला घ्यायची .. ऐच्छिक पुरोगामीत्वाचे लक्षण ..

आपल्या ओळखीतल्या अशा एखाद्या पुरोगाम्याला आवर्जून मेंशन करा ...

Tuesday, 15 October 2019

♦अण्णाभाऊंच्या संदर्भात केल्या गेलेल्या अफवा आणि वास्तव.

♦अण्णाभाऊंच्या संदर्भात केल्या गेलेल्या अफवा आणि वास्तव.

         नितीन सावंत परभणी
         9970744142
     (सौत्रांतिक मार्क्सवादी अभ्यासक)

        सांप्रत वर्ष साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून अनेक ठिकाणी साजरे होत आहे.या जन्मशताद्बी वर्षाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी अनेक चळवळी,पक्ष,संघटणा अण्णाभाऊंचे हे जन्मशताब्दी वर्ष साजरे करत आहेत.याच धर्तीवर अण्णाभाऊवरची डाव्यांची सुटलेली पकड पुन्हा मजबूत करण्यासाठी कॉ.सुबोध मोरे यांचा एक लेख लोकसत्ता या दैनिकात येवून गेला आहे.त्यांचा आनखी एक लेख त्या आधी बार्टीच्या पुस्तकातही आलेला आहे.दोनही लेखांची मांडणी आणि केंद्रबिंदू जवळपास सारखीच आहे.
या दोनही लेखात कॉ.सुबोधजी मोरे यांनी डाव्या चळवळीवर अण्णाभाऊंच्या संदर्भाने घेतले जाणारे आक्षेप खोडण्याचा प्रयत्न केलेला आहे.यात त्यांना लोकांचे आक्षेप अनेक मुद्दे पुरावे देवून खोडता आले असते त्या ऐवजी त्यांनी अण्णाभाऊंच्या जीवन चरित्रात जे घडलेच नाही ते अवास्तव मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला दिसुन येइल.त्यांच्या दोनही लेखातील काही अक्षेपांवर येथे चर्चा करण्याचा माझा मानस आहे.
मोरे आपल्या दैनिक लोकसत्ताच्या लेखात म्हणतात,
" याच राजकारणाचा एक भाग म्हणून, डॉ. आंबेडकरांच्या प्रभावाखालील दलित चळवळीला कमजोर करण्यासाठी आणि मातंग समाजाला त्यातून वेगळे पाडण्यासाठी तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी १९७५-७६ सालानंतर अण्णा भाऊंची ‘मातंग समाजाचे नेते’ अशी प्रतिमा पुढे आणण्याचा प्रयत्न केला;"
खरे तर १९७५ - ७६ नंतर  विविध आंबेडकरवादी सामाजिक चळवळींनीच अण्णाभाऊ हे प्रतिक फुले शाहू आंबेडकरवादी चळवळीत अंतर्भूत करण्यास सुरुवात केली होती.विविध जात समुहाला आपल्या पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीत आणण्यासाठी नेहमी फुले शाहु आंबेडकर सांगण्या ऐवजी त्याच जातीतले पुरोगामी प्रतिक उभे करण्याचा प्रयत्न कांशीरामजींनी केलेला आहे.या धर्तीवर अण्णाभाऊंच्या गावी त्यांनी अण्णाभाऊंच्या कुटूंबातील सदस्यांना घरही बांधून दिलेले आहे.त्यानंतर स्वता आंबेडकरवादी चळवळींनीच अण्णाभाऊ हे प्रतिक चळवळीत सामावून घेतले,सर्वच महापुरुषांच्या फोटोंच्या रांगेत अण्णाभाऊ दिसायला लागले.यात सुबोध मोरेंना राजकारणाचा भाग कसाकाय दिसतो याचा उलगडा होत नाही.आणि जर अण्णाभाऊ हे प्रतिक मातंग समाजाला वेगळे पाडण्यासाठी आनण्यात आले होते तर सर्वाधिक मातंग समाज अण्णाभाऊंच्या प्रतिकाच्या द्वारेच फुले शाहु आंबेडकरवादी बनला.अनेक मातंगांनी तर बोद्ध धम्माची दिक्षाही घेतली.आंबेडकरांच्या प्रभावाखालील दलीत चळवळीत मातंग आले ते आण्णाभाऊंचे प्रतिक स्विकारुन यामुळे ती निष्प्रभ झाली नाहीच,मात्र डाव्यांच्या हातुन अण्णाभाऊ निसटले हे म्हनता येइल.कारण डाव्यांनी सामाजिक सर्वहरा जातीतील महापुरुषांना प्रतिक बनवायचे नाकारल्यामुळे हे घडले. 
लोकसत्ता दैनिकाच्या लेखात त्यांनी अण्णाभाऊंना घरी सोडले वगैरे जे लिहीलेले आहे अगदी तसेच बार्टीच्या पुस्तकातील लेखातही मोरे म्हणतात,
"कॉ.अण्णाभाऊ गेले त्या वेळेस मी अकरा वर्षाचा होतो.अण्णाभाऊ साठे ज्या गोरेगावातील सिद्धार्थनगर क्रमांक २ मधील गृहनिर्माण वसाहतीत रहात होते."
पुढे कॉ.मोरे यांनी शुद्ध नसलेल्या अण्णाभाऊंना त्या ट्याक्सीवाल्याला रस्ता दाखवत गोरेगातील घरी नेऊन सोडल्याचे विस्ताराने लिहीलेले आहे.यात ते म्हणतात
नंतर टॅक्सीत पुढे बसून मी अण्णाभाऊंच्या घरापर्यंत गेलो व घरातील पुरुष मंडळींना सांगून अण्णाऊंना टॅक्सीवाल्याच्या मदतीने घरात सोडले."
याबद्दल काही प्रश्न निर्माण होतात त्या बद्दल मोरे यांनी स्पष्ट मांडणी करायला हवी.मोरे जेव्हा अण्णाभाऊ यांना घरी सोडायला गेले तेव्हां अण्णाभाऊ यांच्या घरात अनखी कोन कोन पुरुषमंडळी होती ?
          कॉ.सुबोधजी मोरे यांना माझा प्रश्न असा आहे की अण्णाभाऊ यांच्या घरातील ही पुरूष मंडळी कोण ? कारण अण्णाभाऊ यांच्या सोबत त्यांचा मुलगा रहात असे आणि तो नेमका मे महिण्यात गावी गेलेला होता.आणि त्या नंतर त्यांचा मुलगा आणि अण्णाभाऊंचे भाऊ शंकर साठे हे अण्णाभाऊंच्या अंत्यविधीला मृत्यूच्या दुसऱ्यादिवसी पोहंचले.मग मोरे सोडायला गेल्यानंतर अण्णाभाऊंच्या घरी असलेली ही पुरुषमंडळी कोण ?
बार्टीच्या पुस्तकातील दिलेल्या याच लेखात पुढे कॉ.सुबोधजी मोरे म्हणतात
"त्याच काळात गोरेगावला अण्णाभाऊंचे भाऊ शंकर बापू साठे,आण्णाभाऊंची द्वितीय पत्नी जयंताबाई व मुलगी शकुंतला,शांताबाई राहत होत्या."
मोरे आपल्या लेखात शंकर साठे हे गोरेगावला रहात असल्याचे जे  सांगत आहेत हे धादांत खोटे आहे.शंकर साठे हे स्वता माझा भाऊ अण्णाभाऊ या स्वलिखीत ग्रंथात आपण गावी रहात असल्याचे वर्णन करतात.शेवटी अंत्यसंस्काराला सुद्धा ते आणि आण्णाभाऊंचा मुलगा दोघेही सोबत गावाकडून मुंबईला आल्याचे त्यांनी नमूद केले आहे.आता खुद्द शंकर भाऊ साठे मी गावी रहात होतो हे आत्मचरित्रपर  निवेदन कथन करत असतील तर मोरेजी खुद्द प्रत्यक्षदर्शी शंकर भाऊ साठेंपेक्षा कोणत्या नव्या पुरावा पध्दतीचा वापर करत आहेत ?
विपर्यास होणारा सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की मोरे हे अण्णाभाऊ गोरेगावातील सिद्धार्थ नगर मधे रहात असल्याची आणि तिथेच ते गेल्याची जी माहिती देत आहेत ती चुकीची आहे.
मोरे जेव्हा ११ वर्षाचे होते तेव्हा चंद्रकुमार नलगे नावाचे लेखक अण्णाभाऊंशी तासंतास चर्चा करत असत,एवढ्या ते म्याच्युअरिटीचे होते.म्हणून त्यांच्या सर्जा नावाच्या पहिल्या कथासंग्रहाला अण्णाभाऊंनी प्रास्तावना दिली आहे.अण्णाभाऊंनी दिलेली ही एकमेव प्रास्तावना आहे.आता एवढे म्याच्युअर्ड चंद्रकुमार नलगे आपल्या लेखात म्हणतात
"मी अण्णाभाऊंना म्हटलं, " तुम्हाला तर मंत्री राजारामबापू पाटलांनी फ्लॅट दिला आहे,असं मी ऐकलं आहे. तुम्ही इथं कसं काय रहाता ?" अण्णाभाऊ म्हनाले , " मी तो नाकारला. कारण माझी माणसं इथं आहेत.ही मोठ्या दिलाची माणसं आहेत. त्यांचे जगणं खर आहे.या जगण्यावर माझा जीव आहे.या जिवंत माणसांना सोडून गेलो तर माझी प्रतिभा अटेल.सुखदुखाशी झोंबाडून जीवनाशी लढा देनारी इथली माणसं मी सोडुन गेलो,तर मी जीवंत रहाणार नाही.माझी लेखणी थंडावून जाईल."
नलगे जे सांगताहेत ते सत्य मानायचे की मोरे यांचा घरी नेऊन सोडलेला प्रसंग सत्य मानायचा ?
प्रा.चंद्रकुमार नलगे सध्याला जीवंत आहेत.ते दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे संस्थापक आहेत.एवढा मोठा माणूस खोटे बोलत आहे का ? किंवा का खोटे बोलत असावा ? निवृत्त प्राध्यापक नलगे यांना कॉल करुन चौकशी केली तर ते म्हणाले अण्णाभाऊ चिराग नगरातील घरीच वारले ते गोरेगावला कधीच रहायला गेलेले नाहीत.अण्णाभाऊंच्या भावकीतले जवळचे विलास साठे हे सध्या पुण्यात रहातात ते सुद्धा म्हणतात की अण्णाभाऊ चिरागनगरलाच वारले.
कॉ.सुबोध मोरे यांना खोटी माहिती देण्याची वेळ का यावी ?
सुबोध मोरे हे अण्णाभाऊ सुव्यवस्थीत जीवन जगत होते, वगैरे ही जी मांडणी करत आहेत ती चुकीची आहे.कारण अण्णाभाऊंनी नलगे यांना पत्र लिहून मुलगा मधुला मदत करण्याचे कळविले आहे.सुव्यवस्थित जीवन जगणारा माणूस मदत मागेल का ?
मग अशी मदत त्यांनी मोरे यांच्याकडे हक्काने मागयला हवी होती.किंवा कम्युनिस्ट पार्टीकडे तरी ही मदत त्यांनी मागायला हवी होती.अण्णाभाऊ तसे का करत नाहीत ? अण्णाभाऊंना पार्टीतील लोकांनी अप्रत्यक्षरित्या वेगळे किंवा एकटे पाडले होते.
शाहीर द.ना.गव्हाणकर यांनी कलापथक मोडल्यानंतर पुन्हा तिच माणसे घेवु कार्यक्रम करणे सुरु केले.म्हणजे तुम्हाला नेमके अण्णाभाऊच नको होते का ? याबद्दल माझे भाऊ अण्णाभाऊ मधे शंकर साठे म्हणतात
"फक्त अण्णाभाऊच त्या पथकात नव्हते.अण्णाभाऊंची गाणी,पोवाडे,छक्कड,लावणी हे सर्व पाहिजे होते.पण त्यांना अण्णाभाऊ नको होते."
मग डाव्यांनी अण्णाभाऊंची उपेक्षा केली हा जो लोक आक्षेप आहे तो खरा नव्हे का ? गव्हाणकर यांनी अण्णाभाऊंना डावलून पुन्हा कला पथक चालवणे म्हणजे अण्णाभाऊंना एकटे पाडणे होय.यातून अण्णाभाऊ मानसिक तनावाखाली गेले.एक माजी अस्पृश्य जातीतून आलेला व्यक्ती आता बुद्धीजीवी म्हणून नावारूपाला येत आहे हे गव्हाणकरांसाख्यांना सहन तर झाले नसावे ना ?
कम्युनिस्ट चळवळीला आर्थिक सर्वहरातून आलेले शेतकरी जातीतलेले कॉ.शरद पाटील बुद्धीजीवी म्हणून चालले नाहीत,आजही चालत नाहीत मग त्यांना सामाजिक सर्वहरातील माजी अस्पृश्य जातीतले अण्णाभाऊ बुद्धीजीवी म्हणुन चालतील का ?
अण्णाभाऊ कम्युनिस्ट होते.त्यांनी वर्गीय साहित्यनिर्मिती केली.त्याचबरोबर ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लढे आणि चळवळींच्या अकलनातून जातीअंताच्या भुमीकेपर्यंत आले.त्याद्वारेच त्यांनी बुद्धाची शपत,उपकाराची फेड ह्या कथा लिहील्या.अण्णाभाऊ जसे वर्गीय साहित्य निर्मिती करत होते तसेच त्यांनी जात हे वास्तव दाखवत जातीअंताची भूमिका घेणारी साहित्यनिर्मिती केली,माजी अस्पृश्य व शेतकरी जातींना जोडणारे दुवे बनवणारी भूमिका सुद्धा घेतली.त्यामुळे ते मार्क्सवादी आंबेडकरवादी होते असे म्हणण्यात काहीही चुक नाही वाईट नाही.अण्णाभाऊंवर डाव्या विचारांचा प्रभाव होता हे म्हणण्याला आमचा विरोध नाही.पण ते आंबेडकरवादी सुद्धा होते हे डाव्यांनी मान्य करायला हवे.म्हणून अण्णाभाऊ फक्त मार्क्सवादीच होते.त्यांना कॉम्रेड लावलेच पाहिजेत हा अग्रह कशासाठी ? त्या अग्रहातून मोरेंनी सुद्धा बाहेर येण्याची गरज आहे.
इंग्रजांकडून मिळालेल्या स्वातंत्र्याबद्दल अण्णाभाऊंची भूमिका कॉ.मोरे यांना समजून घेता आलेली नाही.ही भूमिका कोंबडीचोर कथेतून अगदी स्पष्ट झालेली आहे.त्यामुळे अण्णाभाऊ मिळालेल्या स्वातंत्र्याचे अगदीच समर्थक होते वगैरे हा दावा कोंबडीचोर कथा निकाली काढते. " यह आझादी झुटी है देश जनता भुकी है " हे शब्द नसतील पण भाव आणि केंद्रबिंदू तोच असणारी कथा म्हणजे कोंबडीचोर होय.अण्णाभाऊं बद्दल जनमानसात झालेले प्रबोधन आणि त्यातले आपल्याला न पटलेले मुद्दे खोडण्याच्या नादात अण्णाभाऊंनी  साहित्यातून दिलेले संदेश आणि त्या साहित्याचे अंतरंगच हरवले जानार नाही याची दक्षाता मोरेंसारख्या जुण्या कम्युनिष्टांनी तरी घ्यायला हवी.

अण्णाभाऊ 1958 ला झालेल्या दलित साहित्य संम्मेलनाच्या उद्दघाटनपर भाषणात म्हणतात
" हे जग,ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून दलितांच्या तळहातावर तरलेली आहे."
या विधानातील दलीत शब्द काढून कष्टकरी श्रमकरी हा वर्गीय शब्द प्रचारित करण्यामगे डाव्यांचे काय प्रयोजन होते ? फक्त लढाई वर्गीयच जात्यांतक नको या प्रयोजनातून त्या विधानाला सोइसकररित्या बदलण्यात आलेले आहे.याबद्दल आज डावे स्पष्टीकरण देतील का ?
खरे तर अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या साहित्यातील विविध प्रतिके,दुवे यावर चर्चा व्हायला हवी.तसी न करता कुठलातरी असंयुक्तीक वाद निर्माण करुन चळवळी विस्तारणार आहेत काय ?
सामाजिक सर्वहरा आणि आर्थिक सर्वहरांना जोडणारा सर्वात मोठा दुवा हे अण्णाभाऊ आहेत.त्यांना सर्वच सामाजिक चवळींनी प्रतिक मानने चांगलेच आहे.भाषेची निर्मिती राबनारे करतात.शब्दांची निर्मीती कष्टकरी,श्रमकरी,शेतकरी करतात.ऐतखाऊ किंवा अभिजन नव्हे.आणि अण्णाभाऊ याच भाषेची, शब्दांची नवनिर्मीती करणाऱ्या जात,जमात समुहाला ते आपल्या साहित्याचे नायक बनवतात.स्त्रीयांना त्यांनी नाइका बनवले.भटके विमुक्त,आदिवासी,दलित-अस्पृश्य आणि शेतकरी जातीतले लोक अण्णाभाऊंनी  नायक म्हणून उभे केले.त्यांच्या स्वस्त्तित्वाचा प्रश्न उभा करत त्या नायकांना विद्रोह शिकवीला.म्हणून भाषेची निर्मिती करणाऱ्या सर्वहरांचे (सामाजिक,आर्थिक) साहित्यिक क्षेत्रातील नेतृत्व म्हणून अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस एक ऑगस्ट हाच खरा मराठी भाषा दिन म्हणून साजरा झाला पहिजे.या मागणीला डाव्यांनी स्विकारले पाहिजे.पाठिंबा दिला पाहिजे.अण्णाभाऊंच्याच नावे मराठी भाषा दिन घेतला पाहिजे.
कॉ.शरद पाटील अण्णाभाऊंच्या फकिरा कादंबरी बद्दल म्हणतात.
"अण्णाभाऊंची फकिरा ही महान दृष्टी कादंबरी आहे.ही कांदबरी क्रांतीकारी नेनीवेचा विजय आहे."

( @ लेख आहे तसा वापरा,पोस्ट,शेअर करा )
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦

Monday, 14 October 2019

डॉ.अशोक राणा लिखीत शोध आदिमायेचा ग्रंथाचे परीक्षण.

डॉ.अशोक राणा लिखीत शोध आदिमायेचा ग्रंथाचे परीक्षण ....

         नितीन सावंत,परभणी
         9970744142

मानवाने आपल्या अवतीभोवतीच्या गोष्टी गूढ आणि कल्पना रम्य पध्दतीने कथांच्याद्वारे एका पुढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रसारित केल्या.अशा सर्व  चमत्कारिक अतिमानवी कथांना 'मिथके' असे म्हणले जाते. या मिथकाना विविध नावे आहेत. कल्पितकथा, मिथ, दिव्यकथा, पवित्रकथा, पुराकथा, दैवतकथा ही मिथकांचीच समानार्थी नावे आहेत. 'मानवी जीवन, त्याचा इतिहास, त्याचा धर्म, त्याचे सांस्कृतिक जीवन इत्यादींचे चित्रण या मिथकामध्ये येत असल्याने ही मिथके किंवा पुराकथा त्या त्या मानवी समूहाचे सांस्कृतिक प्रतिनिधित्व करतात.'
म्हणून या मिथकांकडे डोळेझाक करता येणार नाही किंवा अमानवी, चमत्कारिक आजच्या भाषेत अवैज्ञानिक म्हणून त्या कथांना अदखलपात्र ठरवता येणार नाही. या पुराकथा अलीकडील काळात इतिहासाच्या संशोधनाशास्त्रात महत्त्वाच्या मानल्या जाऊ लागल्याने जगभरात 'मायथॉलॉजी' नावाचे शास्त्र विकसित झाले आहे.या धर्तीवर भारतात देखील अलीकडील काळात मोठे काम झाले आहे. मिथकशास्त्राच्या आधारे सत्य इतिहासाचे धागेदोरे उलगडणाऱ्यांमध्ये धर्मनांद कोसंबी, कॉ.शरद पाटील, इरावती कर्वे, रा.ची.ढेरे, रोमिला थापर, सुकन्या आगाशे आदींची नावे अगक्रमाणे घ्यावी लागतात.
या मिथकशास्त्राला इतिहास संशोधनाच्या, विविध, विधायक अन्वेषण पद्धतीद्वारे विकसित करण्याचे काम कॉ शरद पाटील यांनी केले आहे. याचं धर्तीवर वेद, पुराणे, उपनिषदातील विविध मिथकांचा उलगडा करून, भारताच्या अत्यंत प्राचीन, आर्वाचीन मातृसत्ताक, स्त्रीसत्ताक वारशाची ओळख करून देण्याचे काम गेली 25 ते 30 वर्षापासून डॉ.अशोक राणा करत आहेत.त्यांच्या विविध ग्रंथापैकी मातृसत्ता तथा स्त्रीसत्तेचा वारसा सांगणारा महत्वाचा ग्रंथ म्हणुन  'आदिमाया' चा आवर्जून उल्लेख करावा लागतो. प्राजाक्त प्रकाशनाने प्रकाशित केलेला 26  मातृदेवांचा हा ग्रंथ अतिशय महत्वपूर्ण, प्रेरणादायी इतिहास पुढे ठेवतो.
आपल्या सभेवतालचे संपूर्ण मानवी जीवन विविध संस्कारांनी वेढलेले आहे. हे संस्कार बहुतांश धर्मग्रंथील मिथक कथाचेच आहेत. रामायण, महाभारत या महाकाव्याचा तर समाज मनावर प्रचंड मोठा पगडा आहे. आपण काही शिकलेले  लोक, विज्ञानवादी जरी बनलो असलो तरी आजूबाजूचे लोक जुनेच सणवार, उत्सव करताना दिसतात.या सर्वच सणवार उत्सव तथा मानवी मनावर राज्य करणाऱ्या काल्पनिक कथांचा उलगडा करून वास्तवापर्यंत नेण्याचे काम डॉ अशोक राणा हे आपल्या ग्रंथातून करताना दिसतात.
कॉ शरद पाटील म्हणतात, 'श्रुतिशच्  द्विविधा , वैदिकीच तंत्रिकीच !' म्हणजे श्रुती (एक नाही तर) दोन आहेत, (एक) वैदीकी व (दुसरी) तांत्रिकी, तांत्रिकी म्हणजे स्त्रीसत्तावादी. चातुवर्ण पितृसत्ताक वैदिकीने हिंसक विजय मिळवल्यानंतर तंत्रिकीला नामशेष करण्यात यशस्वी झाल्यानंतर तिने तंत्रिकीला बदनाम केले.
तांत्रिकी श्रुतीचा प्रवाह हा भारतीय भूमिपुत्रांचा आहे. फुलेंच्या भाषेत हा अब्राम्हणी प्रवाह आहे. याला वैदीकी श्रुतीच्या ब्राम्हणी म्हणजे पुरुषवर्चस्ववादी वारसदारांनी अत्यंत निच पातळीवर बदनाम केल्याने भारतीय लोक गुलाम बनले. यात बदनाम केलेल्या तांत्रिकी श्रुतीच्या मातृदेवांना डॉ.अशोक राणा यांनी विस्ताराने उजेडात आणले आहे. आणि त्या मातृदेवतांचा मूळ व खरा इतिहास जगापुढे ठेवला आहे. आजही या तांत्रिकी श्रुतीच्या प्रचारक मातृदेवतामध्ये निऋती, दिती, होलिका अलक्ष्मी, सटवी, माया, पुतना, हिंडीबा आदी मातृदेवता जनमानसात बदनामच आहेत.डॉ अशोक राणा म्हणतात, 'दोन प्रकारच्या संस्कृती मधील संघर्ष भारतात गेल्या पाच हजार वर्षापासून चालूच आहे. त्यापैकी एक आर्य संस्कृती तर दुसरी द्रविड संस्कृती.'
कपटाने जिंकत गेलेल्या आर्य संस्कृतीच्या वरसदारांनी हरवलेल्या द्रविड सांस्कृतिला तिरस्कारनिय ठरवून नेणिवेत दफन केले. तरीही इतक्या नेणिवेच्या दफन भूमीतला इतिहास शब्दांच्या , अदीबंधांच्या उकलीतुन डॉ अशोक राणा आपल्या पुढे ठेवतात. या आदिमाया ग्रंथात त्यांनी जागतिक मातृदेवांचाही आढावा घेऊन, मातृपूजन, भुमिपूजन जगभर होत असल्याचे मांडले आहे.
'बॅबिलोनिया, असिरिया, इजिप्त याही देशात एकेकाळी मातृसत्ताक समाजरचना अस्तित्वात होती.आणि साहजिकच तेथे स्त्री- पुरोहितांना  महत्वाचं स्थान होत.'
एकंदरीत डॉ अशोक राणा यांनी घेतलेला हा जागतिक मातृदेवतांचा आढावा डाव्या, पुरोगामी इत्यादी चळवळीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. मानवी विकासाच्या टप्यात मातृसत्ताक तथा स्त्रीसत्ताक समाजव्यवस्था ही जगभरात असल्याने आदिम साम्यवादाची मांडणी करणारे डावे आणि आंबेडकरवादी मात्र याकडे अजूनही दुर्लक्ष करताना दिसतात. एवढेच काय डॉ.अशोक राणा यांनी भारताचा गौरवशाली जो इतिहास आपल्यामुळे ठेवला आहे. या इतिहासाची साधने म्हणून वापरली जाणारी वेद, पुराणे, स्मृती याकडे नकारात्मक भावनेने पाहणाऱ्या चळवळी अजूनही विधायक बदल स्वीकारायला तयार नाहीत.रा.ची.ढेरे सुद्धा म्हणतात.'पुराणे ही धर्मेतिहासाच्या आणि मुख्यतः दैवतशास्त्राच्या अभ्यासात आद्य महत्वाची साधने आहेत याचे भान आमच्या अभ्यासकाना अजूनही घडत नाही, ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे.'

क्रृरे घोरे म्हणून जिची यज्ञातून हकालपट्टी केली, जिला नरकदेवता म्हणून बदनाम केले गेले त्या निऋतिला 'वैराज' स्त्री राज्याची गणराणी म्हणून कॉ शरद पाटील यांनी उजेडात आणले आहे.त्यानंतर विविध मिथकांत बंद केलेल्या निरुतीला डॉ. अशोक राणा यांनी सुद्धा सखोल संशोधनाद्वारे विधायकरित्या पुढे आणले आहे. विविध नावाद्वारे धर्मग्रंथात, लोकसाहित्यात वावरणारी  निऋती एवढ्या विस्ताराने मांडली ती डॉ अशोक राणा यांनीच. अलक्ष्मी, श्री, षष्टी, सखी, सिरिमा,गजलक्ष्मी, शालभंजिका, असुरलक्ष्मी, जेष्ठा या विविध नावाने विस्तारात गेलेली निऋती डॉ.अशोक राणा यांनी या ग्रंथात मांडली आहे.
ही सर्व नावे, या सर्व मातृका निरूतीचेच विविध रूपे असल्याचे डॉ.अशोक राणा मांडतात. उत्खननात सापडलेल्या शिल्पांच्या, पुराव्यांच्या द्वारे रा.ची. ढेरे यांनी जी लज्जगौरी मांडली आहे ती उर्वशी असल्याची मांडणी स्वीकारण्यात अथार्थता आहे. कारण सुंदर मांड्या असलेली उर्वशी असा अर्थ नावातच ध्वनित होतो. लज्जगौरीची सर्व शिल्पे तशीच आहेत.
अमावष्येच्या संदर्भात जनमानसात पसरवण्यात आलेल्या अफवा आणि अंधश्रध्दा यांचा विचार करता डॉ.अशोक राणा यांनी 'अमावास्या' नावाचे प्रकरण लिहले आहे ते अत्यंत महत्वाचे वाटते. ही अमावास्या का बदनाम झाली तर 'जैनांच्या
कल्पसूत्रानुसार अमावस्या ही स्वतः निऋतीच होती.'
ग्रामीण भागात, लोकबोलीत गाढवावरून शिव्या देण्याचा प्रघात मोठ्या प्रमाणावर दिसून येतो, गाढवावरून धिंड काढणे असो किंवा शिल्पशास्त्रातील गधेगाळ असो, गाढव एवढा बदनाम का तर 'शितला, जेष्ठा आणि निऋती  या तिन्ही अशुभ व विघ्नकार  देवतांशी गाढवाचा संबंध आहे.' वरील रा.ची.ढेरे यांची विधाने निऋती आणि गाढवांचा संबंध स्पष्ट करतात. विधायक उकलाची उन्वेषण पद्धती अवगत नसल्याने रा.ची.ढेरे मात्र निऋतीला अशुभ आणि विघ्नकारच म्हणतात.
म्हणजे ग्रामीण भागात आजही निऋती शिव्यांच्या द्वारे बदनामच आहे.ही निऋती विधायक ऊकली तुन अशोक राणा यांना कशी प्राप्त झाली? डॉ.अशोक राणा यांच्या संशोधनाच्या अन्वेषण पद्धतीत याचे ऊत्तर आहे. रा.ची.ढेरे यांनी मांडलेली निरूती नकारात्मकच राहिली. जोतीराव फुले गणपतीला ढंबुढेऱ्या म्हणतात. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राम-कृष्णाचे कोडे हे पुस्तक हिंदुत्ववाद्यांत नकारात्मक प्रभाव गाजवत आहे. यातून विधायक प्रबोधनाची वाट काढली ती कॉम्रेड शरद पाटील यांनी. याद्वारे डॉ.अशोक राणा यांच्या लिखाणाची मेथोड म्हणजे अब्राम्हणी बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवादी अन्वेषण पद्धती होय. नकारात्मक मांडणी करत जाण्याऐवजी आपली विधायक मूल्ये वाढवत जाणे हा त्यातला महत्वाचा गाभा. या मेथोडद्वारे डॉ.अशोक राणा यांनी संपूर्ण 'आदिमाया' विधायक रीतीने मांडली आहे.
'स्वर्ग हा आकाशातला नसून, तो तिबेटचा भाग आहे.देव म्हणजे गॉड किंवा ईश्वर नसून आर्य टोळ्यातील एका गटाचे नाव होते.दानव,राक्षस,असुर, दैत्य, पिशाच्य, भूत हे वाईट, अक्राळविक्राळ नसून भारतीय भूमिपुत्र अर्थात चांगली माणसे होत.' अशी अत्यंत महत्वाची मांडणी डॉ.अशोक राणा 'आदिमायेत' करतात.
भारतीय स्त्रीयांच्या मनावर सर्वात खोलवर रुजवलेले पौराणिक पात्र म्हणजे सीता होय. पण या पौराणिक साहित्यातील सीता ब्राम्हणी साहित्याने दुय्यम दर्जा देऊन शोषित मांडली. या सीतेबद्दल डॉ.अशोक राणा सीता नावाच्या 18 व्या प्रकरणात जी माहिती देतात ती भारतीय स्त्रीयांना प्रेरणादायी आहे. सीता म्हणजे रामायणाची मुख्य नाईका. मातृसत्ताक-स्त्रीसत्ताक गणव्यवस्थेतून प्रवास करत आलेला अहल्येचा गण मखादेव नावाचा जनक सीतेला पुरुष गणात नांदायला पाठवून आपल्या ताब्यात घेतो. सीतेच्या रूपाने द्विवर्ण व्यवस्था संपवून, रामाच्या रूपाने चातुर्वण्याची स्थापना होते. राम चतुर्वण्याच्या स्थापणेसाठी दक्षिण भारतातली स्त्रीराज्ये  नष्ट करून पुरुषसत्ता स्थापित जातो. या जाचक पुरुषसत्तेला कंटाळून शेवटी सीता यज्ञात उडी घेते या बद्दल कॉ.शरद पाटील म्हणतात, 'महाकवी असत्य बोलला ! भूमीकण्या सीतेने पुरुषोत्तम रामाच्या अंतिम विटंबनेला वैतागून आत्महत्या केली.'
डॉ.अशोक राणा यांनी अगदी संक्षिप्त मांडलेली सीता विस्ताराने  विधायक रित्या मांडली पाहिजे. सीतेचे दुय्यमत्व नाकारून तिचे नायकत्व तिला परत मिळवून दिले पाहिजे. रा. ची. ढेरे यांनी श्री. आनंदनायकी या ग्रंथात शेवटचे प्रकरण सीतेची मांडणी करणारेच लिहले आहे. ते म्हणतात, 'सीतेच्या मिथकांत कारणीभुत झालेली भारतीय स्त्री ची वेदना, सीतेच्या विद्रोही हौतात्म्यातून रामाचा मूल्यविवेक सावरला तर संपू शकेल. हौताम्य स्वीकारणारी 'सत्यक्रिया' आचरून त्या रामायनीय सीतेने युगसापेक्ष शक्तीच्या कक्षेत बसणारा विद्रोह केला आहे.
          डाव्या चळवळीतुन आलेला पाश्चिमात्य स्त्रीवाद असून सामाजिक सर्वहारातील स्त्रीयांचे शोषण, पिंडन समजून घेऊ शकलेला नाही. आपले वर्तन पाश्चिमात्य पद्धतीने मुक्त जगणारे बनवले की आपण स्त्रीवादी बनलो किंवा स्त्रीयांनी बॉबकट करून पुरुषी वर्तन केल्यानेही आपण स्त्रीवादी बनलो असे होत नाही. तर भारतीय स्त्रीवाद हा अत्यंत भिन्न आहे. भारतीय स्त्रीयांची दास्यत्वाची, गुलामीची मुक्ती भारतीय स्त्रीवादानेच होणार आहे. या भारतीय स्त्रीवादाची प्रतीके आणि प्रेरणा उभे करण्याचे काम डॉ. अशोक राणा यांच्या साहित्याच्या रूपाने होणार आहे. भारतीय स्त्रीवादाचा पाया घालण्याचे काम कॉ.शरद पाटील यांच्या नंतर डॉ.अशोक राणा करत आहेत.
आदिमायेतल्या  प्रत्येक मातृदेवता ह्या स्वतंत्र, मित्रता आणि समतेच्या प्रतीक आहेत. या मातृसत्ताक स्त्रीसत्ताक गणराण्यांच्या उकलीतूनच भारतीय स्त्रीवाद सुरू होतो. त्यावर आपले आयुष्य वेचून डॉ.अशोक राणा यांसारखे विद्वान काम करत आहेत हे अत्यंत प्रशंसनीय आहे.
खरे तर अशोक राणा यांचे समग्र साहित्य पुरोगामी तथा डाव्यांनी आपल्या चळवळींचा बेसिक अभ्यासक्रम म्हणून स्वीकारला पाहिजे.आदिमाया तर सांस्कृतिक चळवळ उभी करण्यासाठी दिशादर्शक ग्रंथ ठरणार आहे.यात कुठलीही शंका नाही.
         लोकभावना श्रद्धा, आस्था ह्या प्रबोधनाच्या चळवळी चलवणार्यानी समजावून घेतल्या पाहिजेत .डॉक्टर अशोक राणा यांची मांडणी लोकमानाचा, श्रद्धा, अस्थांचा विचार करते. कठोर मांडणी करून लोक मने दुखावणारे काम त्यांनी कधीही केलेले नाही आणि चिकित्सा तर्क करताना मात्र आस्थेपेक्षही संसोधनाला पुरव्याना महत्व दिलेले आहे. हा आदिमाया ग्रंथ भविष्यात नक्कीच लोकमानाची व साहित्तीकांच्या मांडणीची पकड होईल यात किंतू परंतु बाळगण्याचे कारण नाही
पुराणकथा आणि वास्तवता या ग्रंथात धर्मानंद कोसंबी म्हणतात "भारतीय धार्मिक तत्वज्ञानाची मुळे आदिम समाजव्यवस्थेत आहेत हे मान्य करण्याची आणि आदिम काळातून  टिकून राहिलेल्या श्रद्धांचे अस्तित्वास सामोरे जाण्यास असणारी देशातील भारतीय विचारवंतांची स्वाभाविक नाखुशी ही बहुदा साम्राज्यशाही काळात सहन करावे लागलेल्या आणि अद्यापही तिची स्मृती जिवंत आहे अशा दडपशाहीची सहज प्रतिक्रिया असणे शक्य आहे."

         कोसंबी मंहतात ती विधाने आज तंतोतंत लागू झालेली आहेत. देशभर चाललेला धार्मिक उन्माद,धर्माच्या नावाखाली चाललेल्या दंगली हे पुरोगामी वर्गाने धार्मिक तत्वज्ञानाकडे डोळे झाक केल्याने उदभवले आहे.महत्वाचे म्हणजे  याच धार्मिक तत्वज्ञानाकडे डॉ अशोक राणा वळले आणि त्यांनी कोसंबी ची खंत भरून काढली. त्याबद्दल डॉ.अशोक राणा यांचे अभिनंदन ! त्यांच्या पुढील लेखनास शुभेच्छा आणि 'आदिमाया' सर्वांनी अवश्य वाचावी असे वाचकांना नम्र निवेदन...
*********************************