अनादी निर्मळ वेदांचे जे मुळ l परब्रम्ह सोज्वळ विटेवरी ll
कर दोन्ही कटी राहिलासे उभा l निलवर्ण प्रभा फांकतसे ll
आनंदाचा कंद पाऊले साजिरी l चोखा म्हणे हरी पंढरीये ll
- संत चोखोबाराय
प्रस्तुत अभंग संत चोखोबारायांच्या स्वमुखातील अत्यंत गौरवशाली उद्गार आहेत. गौरवशाली यासाठी की ब्राम्हणी व्यवस्थेने ज्या जातींना हिन, अस्पृश्य , अपवित्र मानले होते, त्याच अस्पृश्य जातीतून आलेल्या चोखोबारायांनी सर्व चाकोऱ्या मोडत अत्यंत प्रतिकुल काळात विठ्ठलाचे वर्णन करणे क्रांतिकारी आणि गौरवशाली आहे. पंढरपुरातील बडवे ब्राम्हण, संत चोखोबारायांना सतत घालून पाडून बोलत असत.त्यांना जन्मानेच वाईट मानत असत. त्यांच्या तोंडवरच त्यांना "महारा देव बाटवलास" म्हणून जातीवाचक शिवीगाळ करत असत.ब्राम्हणांनी दिलेला हा त्रास संत चोखोबारायांनी आणि इतर संतांनी लिहुन ठेवला आहे.संत चोखोबाराय हे अस्पृश्य मानल्या गेलेल्या अनेक जातींचे, त्या काळातील प्रतिनिधी होते. तर पंढरपुरातील बडवे हे विषमतावादी वैदिक श्रौतस्मार्त धर्माचे प्रतिनीधी होते.
ब्राह्मणवर्ग स्वलिखीत धर्मग्रंथांच्या आधारे आपल्या देशातील फारमोठ्या वर्गाला माणुस म्हणून जगण्यास हक्क , अधिकार दयायला तयार नव्हते. येथे शुद्र अतिशुद्रांना ज्ञानाचे, अभिव्यक्त होण्याचे दरवाजे बंद करण्यात आले होते. कुणब्याच्या घरात जन्माला आलेल्या तुकोबारायांना ' घोकावया अक्षर, मज नाही आधिकार' हे मनावे लागत असेल तर त्यांच्या आधी होऊन गेलेल्या संत चोखोबारायांचे काय हाल झाले असतील. त्यांना काय यातना भोगाव्या लागल्या असतील याचा अंदाजच आपण बांधु शकतो.
ज्ञान भांडाराच्या चाव्या स्वताच्या जानव्याला बंदिस्त ठेवणाऱ्या ब्राम्हणांना संत चोखोबारायांसारखे अस्पृश्य लोक जर ज्ञानाची अनुभुती देत असतील तर ते तत्कालीन व्यवस्थेला पचणारे असेल का ? तरिही कुनालाही न जुमानता सनातन्यांच्या नाकावर टिच्चुन संत चोखोबाराय वैदिक सनातनी व्यवस्थेला तत्वीक उत्तरे देतात.ते डिबेट करतात. ते म्हणतात
" तुम्ही ज्या वेदांना प्रमाण मानता त्या वेदाचे मुळ आमचा विठ्ठल आहे. तो अनादी अनंतकाळापासुन आहे. हा आमचा विठ्ठल अगदी निर्मळ स्वच्छ भेदरहीत आहे "
विठ्ठलाला वेदांच्याही आधीचा म्हणून उभा करणे, किंवा, वेदांचे मुळच विठ्ठल आहे, ही मांडणी करणे संतांच्या रणनितीचा भाग आहे. वेदांच्या आधारे ब्राम्हण वर्ग स्वताला देवाचा प्रतिनिधी मानायला लागला होता.त्याद्वारे सर्वसामान्यांची लुट चालू होती. म्हणुन सर्वसामान्यांना स्वस्तातला, सहज उपलब्ध होणारा ईश्वर विठ्ठल दाखवून शोषणकारी वैदिक व्यवस्था नाकारणे है संतीचे उद्दिष्ट आहे. संत चोखोबाराय याद्वारे वैदिकांच्या वर्णश्रेष्ठत्वाच्या मांडणीला सुरंग लावतात.संत चोखोबाराय पुढे म्हणतात. "तो अनादी निर्मळ विठ्ठल दोन्ही हात कमरेवर ठेवून विटेवर उभा आहे. आणि त्याच्या तेजाची निळवर्ण प्रभा सर्वत्र पसरली आहे."
येथे संत चोखोबारायांचा विठ्ठल निलवर्ण आहे. गौरवर्णीय नाही.गौरवर्ण वैदिकांचा तर निलवर्ण द्रविडांचा, भारतीय भुमीपुत्रांचा आहे.
म्हणून विठ्ठल हे द्रविड , शेतकरी कष्टकरी काळ्यांचे अब्राम्हणी परंपरेचे प्रतिक आहे. वेदांचे मूळ असूनही, विठ्ठल वैदिकांचा नाही.त्यांच्या कुठल्याच मुख्य धर्मग्रंथात विठ्ठलाचे वर्णन नाही. या द्वारे संत ब्राम्हणी व्यवस्थेचा जाचक अन्याय नाकारून, अब्राम्हणी परंपरेचा सांस्कृतीक पर्याय उभा करत होते. म्हणून संत चोखोबारायांचे म्हणने आहे. " आमच्या आनंदाचे, उत्सवाचे प्रतिक पांडुरंग आहे. हा हरी, हे प्रतिक पंढरीचा पांडुरंगच, इतर ठिकाणचे दैवते नव्हेत "
अस्पृश्य मानले गेलेल्या संताने वेदांचे मुळ पांडुरंग आहे, हे मांडणे , बोलुन दाखवणे , काव्यबद्ध करणे दुर्लक्षून कसे चालेल.यद्वारे विठ्ठलाची उंची वाढवणारे महान काम संत चोखोबारायांनी केले आहे. वेदाचे मुळ विठ्ठलाला मानने, तोच वेदीपेक्षाही श्रेष्ठ, आनादी आहे, हे म्हणने.खऱ्या अर्थाने हे वैदिकांच्या हेकेखोरपणाला उत्तर देने आहे. कारण एक प्रश्न पडतो, तो असा की संत चोखोबारायांनी वेद वाचले असतील का? वैदिक तत्त्वज्ञान त्यांना श्रवण करायला तरी मिळाले असेल काय ? याचे उत्तर नाही असे द्यावे लागते. कारण अस्पृश्य जातींना ज्ञानबंदी, स्पर्शबंदी होती. त्यामुळे संत चोखोबारायांना धर्मग्रंय पहायला किंवा ऐकायला सुद्धा मिळाले नसणार आहेत. कारण या धर्मग्रंथालील बोजड तत्वज्ञान नाकारणारा तसा त्यांचा एक अभंग आहे.
"आम्हा न कले ज्ञान, न कमे पुराण | वेदाचे वचन न कळो आम्हा ॥
आगमाची आठी, निगमाचा भेद | शास्त्रांचा संवाद न कने आम्हा ll
योग याग तप,अष्टांग, साधन । न कळेची दान, वृत्त तप ll
चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा l गाईन केराबा नाम तुझे ll
" धर्मग्रंथातील शब्दीक बाष्काळपणाला संत चोखोबारायांनी स्पष्ट नकार दिला आहे.शब्दप्रमानाच्या जगातील , ब्राम्हणी परंपरेतील, वैदिक परंपरेतील काहीच नको म्हणत त्यांनी भक्तीला प्राधान्य दिले आहे.अर्थात वैदिक वर्ग समाजव्यवस्थेत वागताना जातीभेद, करत असेल, अस्पृश्यता पाळत असेल, तुसडेपणाने वागत असेल तर ते ज्या धर्मग्रंथांवर चालतात 'ते वाचायची गरज काय ? ही चोखोबारायांची भुमीका आहे. आम्हाला तुमचे काहीच नको , तुमच्या शब्दीक वैदिक ज्ञानपरंपरेपेक्षा आम्हाला विठ्ठलभक्ती परंपराच वंदनीय आहे. हा संत चोखोबारायांच्या मांडणीचा मध्यबिंदू म्हणावा लागेल आणि म्हणुन संत चोखोबाराय आपल्या भक्तीच्या जोरावर बाष्कळ पोथीपंडीतांची नियमावली ते नाकारतात.त्यांना तात्विक भाषेत च्यालेंज करतात.त्यांचीच खडिया त्यांच्यावर खडी करतात.तुमच्यापेक्षाही आमची परंपरा जुनी ग्रेट आहे.हे ते सांगतात.
नितीन सावंत परभणी
9970744142