Sunday, 12 June 2022

♦मुलं म्हणजे देवाघरची फुलं !

 ♦मुलं म्हणजे देवाघरची फुलं ! 

                        मुलं म्हणजे देवाघरची फुलं , पण कुनाची मुलं ? या देशात म्हणी वाक्यप्रचार सुद्धा जातबंदिस्त आहेत.पुर्वीला दर रवीवारी माजीअस्पृश्य जातीतली किंवा भटक्या विमुक्तांचे मुलं शाळा सारवायचे.शाळा सारवायला उच्चजातीयांचा नंबर यायचा नाही.तेव्हाच सिद्ध झाले उच्चजातीयांची मुले म्हणजे देवाघरची फुले.बाकी भटके विमुक्त आदिवासी माजीअस्पृश्य गावाबाहेरचा केरकचरा .

                             दिल्लीत शाळेत जाणाऱ्या एका लहान मुस्लिम मुलाला प्रश्न विचारण्यात आला होता तुझ्या घरी शस्त्रास्त्रे आहेत का ? 
किंवा एका संघटनेने सुद्धा आवहाल दिला होता की शाळेत जाणाऱ्या लहान निरागस मुस्लिम मुलांना हेटिंगपुर्ण वागवले जाते किंवा देशभक्ती सिद्ध करायला लावण्यात येते,तशी वक्तव्ये केली जातात.. 
याही वेळी लक्षात येते मुले म्हणजे देवाघरची फुले पण मुस्लिमांची सोडुन ... 

                             bjp ने नुकतेच एका बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांला मंत्री केले आहे.तो बजरंग दलाचा व्यक्ती राज्यप्रमुख असताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी एक ख्रिश्चन नवराबायकोला आणि त्यांची अगदी लहान लहान मुले कारमधे कोंडुन ती गाडी पेट्रोल टाकून जाळली.लहान मुले  धर्म वगैरे काहीही माहिती नसताना मारली गेली ...
तेव्हाही सिद्ध झाले मुले म्हणजे देवाघरी फुले पण ख्रिश्चनांची सोडुन ...
 
                           १.एका पारधी समाजाच्या पालांवर त्यांनी त्या जागेतून उठावे म्हणून पोलीसांचा ताफा आला होता.पारधी समाजाकडुन आम्ही उठनार नाहीत म्हणून दगडफेक चालु झाली.काही पोलीसांनी देखील प्रतीउत्तर दिले त्यात एक लहान मुल चाळ्यात दगड लागून जागीच मेले.
२.आत्ता म्याक्स महाराष्ट्र न्युज च्यायनल ने न्युज दाखवली आहे. मुंबईत पुलाखाली बसलेल्या भटक्या विमुक्तांचे पाल उठवून लावण्याचे काम पुलीस करत होते.त्या भटक्यांच्या मागे इतके जोरात पळत होते की ट्राफिक मधून आपले बाळ घेवून पळनार्या बाईचे बाळ रोडवर पडले आणि (चिरडून ?) मेले.. येथेही सिद्ध झाले मुले म्हणजे देवाघरची फुले पण पारधी वडार कैकाडी घिसाडी बेलदार सगळे भटक्यांची मुले सोडुन ... 

                         उच्चजातवर्गीयांची मुले पटापट शिकुन विदेशात गेली.त्याला कारणीभूत त्यांची गुणवत्ता नव्हे तर बालपणीपासुनच त्यांना शाळेत प्रेरणादायी वादावरण दिले गेले.त्यांना पुढील बाकड्यावर बसवुन, विशेष लक्ष देवुन, सतत संधी दिली गेली.ती मुलं परिपाठात , कला गुण गाजवण्यात सतत पुढे ठेवली गेली. तर याउलट सर्वहरा जाती जमातींना सतत हिनत्वदर्शक वागणूक देवुन मागल्या कोपऱ्यात बसवुन , मारुन पिटाळून घरी लावले गेले.

म्हणून मुले म्हणजे देवाघरची फुले असे म्हणणे जातीवादी आहे  ... 

नितीन सावंत परभणी
संस्थापक अध्यक्ष 
मानव मुक्ती मिशन 
9970744142

No comments:

Post a Comment