♦अस्पृश्यता थांबवा ♦
मुस्लिमांना अस्पृश्यतेत लोटणे चालु आहे.एखादी जात अस्पृश्य काशी बनते हे बघायचे असेल तर आज मुस्लिमांच्या संदर्भात जे द्वेषजनक वातावरण आहे त्यावरुन तुम्ही अंदाज बांधु शकता.तिरस्कार अत्यंतिक द्वेष,निंदा आणि खोट्या अफवेतुन अस्पृश्यतेला सुरुवात होते.
दिल्ली मुंबई पुणे यांसारख्या अनेक मेट्रो सिटीज मधे हल्ली मुस्लिमांना उच्चजातवर्गीय कॉलण्यांत किरायाणे घरे देने बंद करण्यात आले आहे.उच्चजातवर्गीयांच्या मोठ्या कंपण्यांत मुस्लिमांना येथून पुढे नोकऱ्या न देण्याचा फतवा जाहिर करण्यात आलेला आहे.दिल्लीतील मुस्लिमांवर झालेल्या हल्यानंतर अशे फतवे जगजाहीर झाल्याचे आपण पाहिले आहे.बहुतांश ब्राम्हणी सनातन्यांनी यावर अमलबजावणी देखील सुरु केलेली आहे.हे वातावरण भविष्यात सतत चालु राहिले तर भविष्यात १००% मुस्लिम अस्पृश्य ठरतील.सध्या २५ % काम ब्राम्हणी छावणीकडुन पुर्ण झालेले आहे.कारण जो तो मुस्लिम म्हटले की आधी संशायाने बघत आहे.या बद्दल भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ राजन क्षीरसागर म्हणतात की आगोदर मुस्लिमांवर विश्वास दाखवा संशयाने बघने बंद करा.
ज्यांना मुस्लिम समुदायाला तिरस्कृत ठरवून अस्पृश्यतेत लोटायचे आहे.ज्यांना तसे करणाऱ्याला मदत करायची आहे आशांसाठी ...
किंवा थोडीतरी माणुसकी शिल्लक आहे आशांसाठी काही उदाहरणे देत आहे जी वास्तवादी आहेत ...
१)मागे काही दिवसांपूर्वी मांगाचा नागु मेला तेव्हा व्हंडी खालाने शंबर शंबर रुपये गोळा करुन त्याचा अंत्यविधी केला..( किस्सा सांगणाऱ्याच्याच शब्दात मांडला आहे )
२)हरिभक्त पारायण कुरुंदकर महाराजांच्या वडिलांना हार्टअट्याक आला.त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी उसने पैसे हवे होते.सगळ्या हिंदूंच्या घरी महालक्ष्मी पुजण चालु होते.लक्ष्म्या घरात बसल्या असताना पैशांची लक्ष्मी घराबाहेर जावु देने बरोबर नाही,म्हणून त्यांना हिंदू म्हणवून घेणाऱ्या कुनीही मदत केली नाही.बाहेर प्रचंड पाऊस चालु असताना आशावेळी त्यांनी मंगलकार्यालय चालवणाऱ्या मालकाला मदतीसाठी फोन केला.मालक पैशाची मदत करतो म्हनाले.गाडी करुन तालुक्याला येइपर्यंत मदतीची रक्कम घेवून माणूस एका कोपऱ्यावर भर पावसात उभा होता.दहा हजाराची कापडात गुंडाळलेली ऱक्कम मदत करणारा व्यक्ती मुस्लिम होता.
३)इर्शाद हा गावचा मुक्तीदाता मानला जातो.कुठलीही समस्या आसली लोक त्यांच्या दारात निवाड्यासाठी येवून बसतात.ओटी(मासिक पाळी) येत नाय म्हणून लग्नाला आलेली एक ताई आणि तिची आई इर्शादकडे येवून म्हनाली यावर काही उपचार आहेत का ? असतील तर काय खर्च होइल ते देवु तुम्ही दवाखाना आणि डॉक्टर सुचवा.इर्शादनी त्यांना डॉक्टर मिळवून दिला.
४)सोमनाथची आई ज्यांच्याकडून बांगड्या भरुन घेते तो रमु मुसलमान आहे ज्याचे खरे नाव माहिती पण नाही.तो वर्षानुवर्षे गावात महिलांना बागंड्या भरायला येतो.
यापेक्षा कितीतरी ग्रेट उदाहरणे आपल्या आजूबाजूला आहेत.ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्वरित दवाखान्यात घेवून जानारे,धान्य बाजारहाट घेवून देनारे,घरच्या लग्नात हक्काने वाढायला कामाला हजर असनारे मुस्लिम असतात.
त्यामुळे अस्पृश्यता टाळा.अत्यंतिक द्वेष पसरवणे बंद करा.साले माजलेत हे छुप्या पध्दतीने दलितांच्या बद्दल शेडुल्ड कास्ट बद्दल म्हटले जाते.त्याच जोडीला आज साले माजलेत,हकलले पाहिजेत देशातून,.. हे छुप्या पध्दतीने मुस्लिमांच्या बद्दल पसरवले जात आहे.हे थांबवा. द्वेष आणि अत्यंतिक तिरस्कार अस्पृश्यतेला जन्म देतो.
नितीन सावंत परभणी
9970744142
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦