Friday, 23 June 2017

♦ *आम्ही अब्राम्हणी इतिहासकारांचे वारसदार आहोत* ♦

फुले आणि कॉ शरद पाटील यांनी भारतीय इतिहासाची ब्राम्हणी - अब्राम्हणी अशी विभागणी केली आहे . याच फुलेंच्या मांडणीला  बाबासाहेब पुढे नेताना क्रांती प्रतिक्रांती पुस्तक लिहून आनखी भक्कम करतात.

या ब्राम्हणी अब्राम्हणी मांडणीच्याद्वारे इतिहासकारांचे सुद्धा ब्राम्हणी इतिहासकार आणि अब्राम्हणी इतिहासकार असे दोन प्रवाह आपसूक निर्माण होतात .
एवढेच काय इतिहासाचे आणि पुराव्यांचे सुद्धा ब्राम्हणी व अब्राम्हणी असे दोन प्रकार बनून जातात.

ब्राम्हणी इतिहासात *ग्रंथप्रामाण्य* हा मुख्य पुराव्याचा प्रकार मानला जातो . आणि ब्राम्हणी इतिहासकारांचा मुख्य हेका लिखीत , समकालीन आणि ग्रंथप्रामाण्य मानणाराच असतो .

अब्राम्हणी इतिहासकार ग्रंथप्रामाण्य मुख्य पुरावा मानत नाहीत . तर चालीरिती , लोकपरंपरा, लोकगिते , शिल्पे, कथा , मिथके , स्थळे , देवालये, भौतिकवादी व्यवहार, अनुभव इत्यादींना पुरावे मानतात . कारण इतिहास लिहण्याचीच काय, केवळ मोजण्याची परंपराही अब्राम्हणात नव्हती  .

राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी
दिवाळीत बहीण भावाला ओवाळतानाचे बळी राजाचे गित पुरावा म्हणून उभे केले आहे .

क्षेत्रीय भार्या l इडापिडा जावो ll
बळीराज्य येवो l आशा का बा ? ll
वामन का घाली l बळी रसातळी ll प्रश्न जोतीमाळी l करी भटा ll

हा अब्राम्हणी पुरावा आहे. याला ग्रंथप्रामाण्य पुरावा म्हनता येत नाही . कारण ग्रंथ लिहण्याची परंपरा अब्राम्हणी प्रवाहात अजूनही म्हणावे तेवढ्या प्रमाणात नाही.

चार्वाक ते तुकाराम आणि संत नामदेव ते आजचे सर्वच किर्तनकार अब्राम्हणी पुरावे वापरतात .

चार्वाकांना ग्रंथप्रामाण्य मान्य नव्हते,म्हणजे ते ब्राम्हणी पुरावे मानत नसत .

संत तुकोबाराय म्हणतात

अनुभव येथे व्हावा आचार l न चालती चार l आम्हापुढे ll

चार म्हणजे वेद . तुकोबाराय म्हंतात आम्ही अनुभव हाच प्रमाण मानतो आम्हाला वेदांचे पुरावे नको . संत तुकोबाराय वेदांचे ग्रंथप्रामाण्य नाकरत असल्याचे अनेक पुरावे देता येतील .

आजही कीर्तनकार कीर्तन करताना संतांचे अभंग म्हणजे अब्राम्हणी पुरावे देतात. वेद पुराण अमान्य आहे .

ज्यांना ब्राम्हणी पुराव्यांचा अाग्रह असतो ते सर्व ब्राम्हणी इतिहासकार . त्यांना तुम्ही कितीही अब्राम्हणी पुरावे दिले तरी ते म्हनतील हे आम्हाला आमान्य आहे . त्यांची छावणी ब्राम्हणी असल्या कारणाने ते ग्रंथप्राण्य आणि समकालीन हेकाच लावून धरनार .

जर आपणही फक्त समकालीन आणि ग्रंथप्रामाण्य  पुरावा हाच पुराव्याव्यांचा मुख्य आधार मानला तर या देशात हजारो वर्षे आपल्या पुर्वजांकडे लिखानाचे आधिकार नव्हते म्हणून आपला अलिखीत इतिहास बाद होइल . बहुजनांच्या आर्ध्यापेक्षा जास्त इतिहासाची माती होइल .

आता या तथाकथित ब्राम्हणी इतिहासकारांनाही काही प्रश्नांची उत्तरे मागितली पाहिजेत .

तुकोबारायांच्या हत्येचा समकालीन पुरावा आहे काय ??

बळीराजा वामनाने पाताळात घातला मग त्याने न्यायाने राज्य केले . आणि तुम्ही म्हणतात त्याची हत्या झाली . याला समकालीन पुरावा काय ??

कबिरांच्या देहाची फुले झाली म्हने . देहाची फुले होतात का ? म्हणजे त्यांची हत्या झाली . आता याला पुरावा नाही म्हणून त्यांच्या देहाची फुलेच झाली म्हणायचे का ??

संत जनाबाईला सुळावर दिले . तुम्ही म्हणतात सुळाचे पाणी झाले कारण काय तर त्याला लिखीत पुरावा आहे . आता सुळाचे कुठे पाणी होते काय ??

ब्राम्हणी चोपड्यांचे पुरावे वापरुच नयेत असे नव्हे पण तो अब्राम्हणी प्रवाहात मुख्य पुरावा ठरु शकत नाही .

या संदर्भात रा. चिं. ढेरे यांनी खुप सुंदर मांडणी केलेली आहे .

श्री आनंदनायकी या राचिंढेरे यांच्या ग्रंथात त्यांची मुलाखत दिलेली आहे.  त्यात प्रश्नकर्ता म्हणतो ,
"म्हणजे तुम्हाला अस सुचवायचं आहे का , की ऐतिहासिक कागदपत्रं आथवा शिलालेख  - ताम्रपट यांसारखी नि:शंक महत्वाची जी शोधसाधनं आहेत , त्याहूनही श्रद्धागर्भ अथवा उपासनापर साधनं आधिक महत्वाची आहेत ."
यावर राचिंढेरे उत्तर देताना म्हणतात,
" हो मला असेच म्हणायचे आहे "

राचिंढेरेचा दृष्टीकोण अब्राम्हणी असल्याने ते श्रद्धेला उपासनेला सुद्धा पुरावा मानायला तयार आहेत .

यावर एक मजेशीर किस्सा याच श्री आनंदनायकीत राचिंढेरे सांगतात .

ते म्हंतात की माहूरजवळ उनकेश्वर येथे एक शिलालेख आहे त्यात लिहीले आहे की
" त्रेतायुगी रामु वनवासप्रसंगी सरभंगाचे आ आस्रमा आले . सरभंगप्रित्यर्थ हे उदक उष्ण केले . तदाकालौनि देवरचित तीर्थ हे "

यावर राचिंढेरे म्हणतात "आता तुम्हीच पहा की ही नोंद स्पष्ट कालोल्लेख असलेल्या शिलालेखात आलेली आहे . आणि त्या लेखात त्या राज्यकर्त्यांचे नावही निर्दिष्ट आहे , एवढ्यावरुन या कृतीमागे प्रेरकत्व म्हणून सांगितलेल्या घटनेची ऐतिहासिकता सिद्ध होत नाही .
त्रेतायुगात रामाने हे उदक उष्ण केले आणि तेही शरभंग ऋषीसाठी हे सांगनारा शिलालेख पुरावा म्हणून स्विकारता येइल काय ??"

म्हणून समकालीन व अव्वल दर्जाची साधने सुद्धा श्रद्धेने तर्काने चेक करावी लागतात असे राचिंढेरे मांडतात ..

या संदर्भात तथागत बुद्धांचा कालामांना दिलेला संदेश महत्वाचा ठरतो .
कोनी सांगितले म्हणून स्विकारु नका ,
एखाद्या ग्रंथात लिहीलेले आहे म्हणून स्विकारु नका ,
चालत आलेले आहे म्हणून स्विकारु नका ,
तर आपल्या तर्काच्या कसोटीवर उतरत असेल तर *आणि ते बहुजनांच्या हिताचे* असेल तरच स्विकारा ..

यात बुद्ध सांगत आसलेले शेवटचे विधान महत्वाचे आहे . तो पुरावा ती मांडणी बहुजनांच्या हिताची असेल तर स्विकारावी .

कॉ शरद पाटलांच्या शैव विवाहाच्या मांडणीला या अंगाने तपासले पाहिजे .

बुद्धाच्या भिख्खू संघात एक कसोटी होती .

भिख्खू झालेल्या व्यक्तीने स्वत:च्या अंगणात जावून भिक्षा मागायची . आपण निरपेक्ष, निरालस, अर्हत बनण्यास पात्र झालो आहोत याची ती कसोटी होती . नाहीतर आई बाप बहिण बायको बघून रडचाल हा चेक करण्याचा दृष्टीकोण होता ..

आजचे ते इतिहासकार स्वजातीप्रती इमोशनल असतील तर ते इतिहासकार असु शकत नाहीत . हे लोक स्वताच्या अंगणात जावून भिक्षा मागू शकत नाहीत . हे ब्राम्हणी जातीवादी इतिहासकार ठरतात . कारण हे स्वजातीची समीक्षा करु शकत नाहीत उलट जातीचे हितसंबध लिखानात आनतात . एकाचवेळी जातीचा अंत करणारा अाणि  जातिविषयी अभिमान बाळगणारा हा पुरोगामी कसे असू शकतो. अशांना काॅ. शरद पाटील यांनी एक नामाधिमान दिले आहे, ब्राम्हणी बुद्धिजीवी.

म्हणून आम्ही अब्राम्हणी इतिहासकारांचे वारसदार आहोत .

 नितीन सावंत,
   परभणी
   9970744142

♦♦♦♦♦♦♦♦♦♦