Saturday, 30 October 2021

*मुळशी पॅटर्न*('सरंजामशाही ते सर्वहारा' एक प्रवास)

 *मुळशी पॅटर्न*
('सरंजामशाही ते सर्वहारा' एक प्रवास)

             आजपर्यंतच्या शोषण व्यवस्था राबवणाऱ्या शाह्यांमध्ये 'ब्राम्हणशाही' सगळ्यात भयानक मानली जाते पण भारतात इंग्रजांच्या आगमनाने भांडवलशाही आवतरली आणि 'खाउजा' धोरण लागू झाल्यापासून 'भांडवलशाही' कंपलसरी कर्दनकाळ बनली.विषम हितसंबंधांवर आधारलेली जातीव्यवस्था ही ब्राम्हणशाहीची देन तर समान हितसंबंधांवर आधारलेली वर्गव्यवस्था ही भांडवलशाहीची देन आहे. 

              भारतात ही भांडवलशाही आवतरली ती उच्चभ्रू मिरासदार शेतकरी जातींचे बोट धरून,राजे रजवाडे आणि सरंजामदारांना खुश ठेवूनच.उच्चजातीयांची सरंजामशाही आणि उच्चवर्गीयांची भांडवलशाहीची युती होऊन येथे मुळशी प्याटर्न सुरु होतो. 

आज भारतात ब्राम्हणशाही आणि भांडवलशाही असे दुहेरी संकट मिळून 'ब्राम्हो-भांडवलशाही' च्या अजगराच्या रूपाने 'साम्राज्यवाद' पसरवत येथील मालकाला नोकर करण्यासाठी वेळप्रसंगी संपविण्यासाठीच दिवसरात्र कार्यरत आहे.नव्हे ते त्यांच्यासाठी अपरिहार्य आहे. 

महाराष्ट्रा सारख्या राज्यात प्रस्थापित व्यवस्थेचा लाभार्थी असलेला एक उच्चभ्रू सरंजामी वर्ग ज्यावेळी भांडवलशाहीच्या जाळ्यात अडकून जगण्यासाठी लाचार होवून हातपाय हलवतो (?) नाही हातपाय जोडतो येथून त्याचा *सरंजामी तोरा ते सर्वकाही गमावुन बसलेला सर्वहारा* असा प्रवास केलेला कुणब्याच्या पोराचा विद्रोही रस्त्यावरुन हत्याराच्या जोरावर नवीन प्रवास सुरु होतो तो 'भाईगीरी'चा.हि भाईगिरी, माफियाराज,शुटर किलर,हे भांडवलशाहीचे संरक्षक कवच बनतात. 

इथूनच चालु होतो नवा पॅटर्न ... 'मुळशी पॅटर्न' ...

मुळात हा मुळशी प्याटर्न नव्हेच.हा भांडवलशाहीचा जागतीक प्याटर्न आहे.भांडवलशाही कुठल्याही देशात पाय रोवताना हेच धोरण आजमावते ... 

आधी बडे सरंजामदार व शेतकरी जातींतील उच्चभ्रू मिरासदार हताशी धरायचे,त्यांना भांडवली व्यवस्थेची गोडी लावायची,भांडवली वस्तु,शौक,व्यसणांत बुडवायचे आणि त्यांच्या द्वारे छोटे जमिनदार,शेतकरी संपवायचे.त्यानंतर ह्या बड्या मासळ्या सुद्धा भांडवलशाही खाऊन घेते आणि मग एकहाती जागतिक साम्राज्यशाहीचा प्रवास सुरु होतो ... 

नियंत्रण भुमीपुत्र असणाऱ्यांच्या किंवा कुण्याही एकजातीयांच्या हतात रहात नाही ... ते भांडवलशाहीत 'मित्तल' वगैरेंच्या हाती जाते तर साम्राज्यशाहीत 'अमेरिकेच्या' हाती ... येथे फक्त 'शिंदेंचा' त्याच्या बायको पोरींच्या समोर उड्डानपुलावर शरिराच्या तुकड्यांचा ढिग पडतो ... गरिबांच्या जमीनी लुबाडनारे 'शिंदे' आणि लुट झालेला 'रावल्या' दोघेही मरतात ... 

म्हणजेच मरतात फक्तं भूमिपुत्रच.भांडवलशाही शाबुतच रहाते.आपापसात भांडुन सरंजामशाही संपते. 

महाराष्ट्रात भांडवलशाही पहिल्यांदा अवतरली ती पश्चिम महाराष्ट्रात.तिकडेच तिने आपले पाय रोवले.तिकडले नेतेही भांडवली व्यवस्थेचे पुरस्कर्ते तथा प्रचारक राहिलेल्याने भांडवलशाहीने या बड्यांच्या साह्याने हजारो एक्कर जमीनी कवडीमोल भावाने खरेदी केल्या.प्रसंगी शेतकऱ्यांवर गोळीबार सुद्धा केले गेले. 

त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातच वर्ग बनतानाचे चित्र दिसु लागले आहे. मराठवाडा आणि विदर्भात जातीव्यवस्था कायम असल्याने अजुन वर्ग बाण्याची प्रक्रिया सुरु व्हायला अवकाश आहे.म्हणून बबन नावाच्या मराठी चित्रपटाने पश्चिम महाराष्ट्रातील एकजातीय वर्गीय संघर्ष टिपुन वर्ग बनतानाचे चित्र सुंदर उभे केले आहे. 

भांडवलशाहीमुळे बनलेला उच्चवर्ग त्याच जातीतल्या निम्नवर्गाला आपल्या बरोबरीने बसु दे नाही.हा संघर्ष बबनचा तर भांडवलशाहीत सरंजामशाहीची हार हा संघर्ष मुळशी प्याटर्नचा.जमीनी गमावलेल्या शेतकऱ्यांच्या पोरांचे भांडवलशाहीतले भविष्य म्हणजे मुळशी प्याटर्न.

मुळशी प्याटर्न ह्या मराठी चित्रपटात भांडवलशाहीचा चेहरा म्हणून पोलीस आहेत ते या सरंजामशाहीतल्या छोट्या जमीनदार वर्गातुन भाई बनलेल्या तरुणांना आपापसात लढून मारतात.ते एवढे बघे आहेत की त्यांना ही तरुणाई सुधरवायची नाही.तर आपापसात लढाई लावून त्यांना हे फक्त बघायचे आहे.त्यामुळेच पोलीस यंत्रणा ही दमन यंत्रणा आहे ती शेतकऱ्यांच्या विरोधातील किंवा त्यांच्या पोरांच्या विरोधातील.ही दमन यंत्रणा भांडवलशाहीला पोषक आहे.तर गरिबांना शोषक .

फ्यांड्री आणि सैराट ही सामाजिक सर्वहरांची कहाणी.त्यात त्यात माजीअस्पृश्य जातींचे चित्रण आहे.तर बबन आणि मुळशी प्याटर्न हा आर्थीक सर्वहरांचे वास्तववादी चित्रण आहे.आर्थिक सर्वहरा आर्थात शेतकरी जातींचे शोषण पिडण हे दोनही चित्रपट अगदी यथोचीत करतात.

येथे शेतजमीन गमावलेला शेतकरी हमाली स्विकारतो पन वास्तवात मात्र शेतकरीवर्ग हमाली ऐवजी आत्महत्या स्विकारतो आणि सर्वकाही गमावलेल्या शेतकरी जातींच्या पोरांची नेनीव त्याला भांडवलशाहीत बापासारखाच नेतृत्व करणारा बनु पहाते. पन सरंजामशाहीतली समान न्याय करणारी पाटीलकी भांडवलशाहीत गुंडगिरी बनते. ज्याचा बाप सरंजामशाहीत न्याय करणारा गावचा पाटील असतो तर हा पोरगा भांडवलशाहीत तिच मुक्त नेनीव घेवून भाई बनतो. 

हा काळ निमभांडवली निम सरंजामशाहीचा जातवर्गीय आहे.मुळशीतील संपूर्ण सरंजामशाही जाऊन काही काळातच संपुर्ण भांडवलशाही लागु होनार आहे.नव्हे होत आहे.मराठवाडा आणि विदर्भात हे आजुन व्हायचेय.

मानव मुक्ती मिशन

Wednesday, 27 October 2021

*♦️बसवधर्म महासभा♦*

 *♦️बसवधर्म महासभा♦*

बसवधर्म महाभेची भूमिका लिहीत असताना हे मुख्य उद्देश पुढे ठेवत आहोत.

★ बसवधर्म महासभा ★

   बाराव्या शतकात बसवादी शरण व शरणींनी जात्यंतक- स्रीदास्यांतक क्रांती केली त्या क्रांतीला "कायक क्रांती" अथवा "सर्वहारांची क्रांती" म्हणतात.  सर्व कायक "सामाजिक सर्वहारा" म्हणजे 'माजी अस्पृश्य जाती व आदिवासी जमाती' व "आर्थिक सर्वहारा" म्हणजे 'शेतकरी जातीतील गरीब व कारागीर जाती' आहेत.

प्रतिक्रांती होऊन लिंगायत जातिग्रस्त झाले व नवीन जाती जन्माला आल्या. आजच्या काळात आम्ही ह्या दोघांमध्ये दोस्ती घडवून क्रांतीची मशाल पेटवू इच्छितो.

◆ ध्येय ◆

जात - वर्ग - स्रीदास्य अंतक क्रांती घडवून आणण्यासाठी सामाजिक व आर्थिक सर्वहारा मधील दुरी मिटवणे, हे सौतांत्रिक मार्क्सवाद करू शकतो, ह्यावर आम्ही अभ्यासाअंती ठाम आहोत. विधायक चर्चेसाठी आम्ही आव्हान करत आहोत.

◆ धोरण ◆

१.  बसव साहित्य चळवळ उभी करणे,
बसवादी वचन साहित्याचा नव्याने बहुप्रवाही, अब्राम्हणी, विधायक भौतिकवादी अन्वेषण पद्धतीने मांडणी करणे. सुलभीकरण व निरूपण करणे.  प्रबोधन करणे

२.  विवाहसंस्था पितृसत्ताक असल्याकारणाने तीने पुरुषांना अमानवीय बनवून टाकले आहे, घरातील स्त्री कुटुंबप्रमुख असली तरी तिचे अधिकार अबाधित असणे आवश्यक आहे. स्त्रीपुरुष समता प्रस्थापित करण्यासाठी कटिबद्ध आहोत.
आंतरजातीय व आंतरधर्मीय लग्न सोहळ्याना प्रोत्साहन देणे, अशी लग्न केलेल्या कुटुंबाचा ' प्रशिक्षण मेळावा' घेण्यात यावा. जेणेकरून त्यांच्या पिढ्या समतावादी चळवळीत सातत्याने काम करत राहतील.
किन्नर व हिजडा हे मानवसमाज चा अविभाज्य घटक आहेत. इतिहासात किम-नर, वा-नर, वैश-वा-नर, किम-पुरुष इ. लिंगभेदांना मान्यता होती. आजच्या काळातही त्यांना समान वागणूक व समान संधी साठी अविरत काम करणे.

३.  युवा प्रचारक घडविणे
कम्युनिस्टांनी धर्माचे काहीच प्रबोधन केले नाही. ह्याचे कारण कार्ल मार्क्सचे पुढील वाक्यात 'धर्म लोकांसाठी अफूची गोळी आहे'  ही अर्धसमजून कारणीभूत आहे.

"धर्म हे जगाचे सामान्य सिद्धांत आहे, त्याचे तर्क लोकप्रिय स्वरूपात, त्याचे उत्साह, नैतिक मंजूरी, त्याचे गंभीरपूरक आणि सांत्वना आणि औपचारिकता यांचे सार्वभौमिक आधार आहे. मानव सारख्या अत्युत्तम सत्याची खरी कल्पना नसल्यामुळे ही मानवी अत्युत्तम कल्पना आहे. धार्मिक दुःख, एकाचवेळी आणि त्याच वेळी, वास्तविक दुःख आणि वास्तविक दुःखांविरूद्ध निषेधाची अभिव्यक्ती आहे. धर्म हे अत्याचारी प्राणी, हृदयहीन हृदयाचे हृदय आणि सौम्य परिस्थितीचा आत्मा आहे. हा लोकांचा अफीम आहे."
"धर्माचे प्रबोधन सौतांत्रिक मार्क्सवादच करणार"

४.  'गाव तेथे अनुभव *मंटप*' ह्या संकल्पेतून लोकशाहीवादी संस्कृती रुजविणे.

५.  दक्षिण भारतातील समतावादी अब्राम्हणी क्रांतिकारकांचे साहित्य मराठी मध्ये प्रकाशित व्हावे, ह्यासाठी 'दक्षिण भारतीय व मराठी साहित्यिक अभ्यासक  टीम' बनवून अब्राम्हणी कला व साहित्यात वाढ करणे.

मानवमुक्ती मिशनच्या *बसवधर्म महासभेची टीम* अनुभव मंटपच्या माध्यमातून महाराष्ट्र, कर्नाटक मध्ये
*जात वर्ग स्रीदास्य अंतक काम करेल*,
ह्यासाठी आपले मार्गदर्शन व सहकार्य आवश्यक आहे.

♦मुख्य मुद्दे♦

१. एकूण दहा जणांची टीम असणार

२. अध्यक्षीय पीठ स्त्री अथवा तृतीय पंथी यांना असावे,
हा सामाजिक सर्वहारा ( SC / St / NT ) असावा.मानवमुक्ती मिशनच कार्यकर्ता असावा

३.  आर्थिक सर्वहारा वर्गातील ( शेतकरी व सधन वर्गातील )
४. पत्रकार/राजकीय विश्लेषक
५. मानववंशशास्त्रज्ञ अभ्यासक
६. शिक्षणतज्ञ
७. मुक्त चिंतक

*संशोधक व अभ्यासक वर्गाचे तातडीचे काम*

१. बसवधर्म महासभेचे स्वतःचे ग्रंथालय असावे,त्यातुन सर्वत्र विद्रोही / परिवर्तनवादी पुस्तके,संदर्भ ग्रंथ वाचक वर्गास उपलब्ध होतील.

२. तातडीचे काम म्हणजे *४ते५ बुकलेट्स तयार करून प्रकाशित करणे*
ह्यातून भविष्याचा वेध घेणारी भूमिका मांडणे, भविष्यात आपल्याला कोणकोणत्या विषयांवर उपाययोजना करून काम करायचे आहे. ह्यावर लिखाण करणे.नवीन लेखक,कवी घडविणे,वाचक वर्ग मिळविणे. सौतांत्रिक बसवादी भूमिका मांडणी साठी कुशल लेखक,कवी यांच्या इथे नेमुणका होणे आवश्यक आहे. बसव साहित्य चळवळीचे काम ह्या माध्यमातून पुढे नेणे.

३. *कार्यशाळांचे आयोजन करणे*
सर्वहारा समाजाच्या बौद्धिक क्षमता वाढीसाठी कार्यशाळा आवश्यक आहेत. इतिहास,धर्मशास्त्र,संस्कृती, विज्ञान,समाजकारण ह्या विषयावर प्रबोधन करणे.
बुद्धकालीन नालन्दा,तक्षशिला, विक्रमशीला,सन्नती सारखी विद्यापीठे बहुजन समाजाची ज्ञानकेंद्रे होती. त्याच पद्धतीने ही चळवळ उभी करणे.

४. संशोधन
हा विषय अतिसंवेदनशील व महत्वाचा आहे.अब्राम्हण समाजाचे, अब्राम्हणी कला व साहित्याचे मानववंशशास्त्रीय दृष्टिकोनातून संशोधन करून समाजाला ज्ञानदासोह अर्पण करणे.

५. लिंगायत मधील ३५० जातींचा शोध आणि पडताळणी करणे व त्यांना जाती अंतक बनविणे.

आपल्या भूमिका नेहमी जाणकार व विषेतज्ञ कडून पडताळणे.

बसवधर्म महासभा धर्मामध्ये अडकून काम करणार नाही
व्यापक भूमिका घेऊन संपूर्ण वंचित सर्वहारा समाजाच्या उन्नतीसाठी काम करणार आहे.
त्याग आणि स्वसमर्पित कार्यकर्ते बसवचळवळीचे चे बलस्थान आहे आणि त्यांच्या माध्यमातून *सौतांत्रिक बसवतत्व* पुढे नेतील.

*जय बसवा ! जय भारत*

*प्रदेशाध्यक्ष : कॉ.आशिष सुगत्यायण (गोवा )*
*8668973467*

*सचिव: कॉ. अभिषेक देशमाने.( सांगली )*
*9822054291*.

*समन्वयक : कॉ.नितीन सावंत ( परभणी )*
*9970744142*
♦♦♦♦♦♦♦♦

*on December 17, 2018* 

*Labels: basavdharm mahasabha, अभिषेक देशमाने, कॉ.आशिष सुगत्यायन, बसवधर्म महासभा*

♦️दिवाळीच्या निमित्ताने ..

 ♦️दिवाळीच्या निमित्ताने ..
 
आला दिवळीचा सण l कुठे चालले तळण ll
गरिबाच्या झोपडीत नव्हते सांजेचे दळण ll 
                  -  शाहीर भगवान गावंडे.

               दिवाळी आलीय , झाली का तयारी ? आगदी लिस्टच काढली असेल नाही का ? चितळेचे तुप , मोती साबण , वामन हरि पेठेंची ज्वेलरी, क्याडबरीचा चॉकलेट डब्बा दरवर्षीचे ठरलेलेच की. बाथरुम मधे विविध कंपन्यांचे ते शॉपु तेलाचे डब्बेच डबे गरज नसताना आमाप उधळपट्टी करणे, ही गरज निर्माण करुन दिलीय मेडियाने. 

           पण याच दिवाळीत काबाडकष्ट करणारे श्रमीक रोडच्या कडेला बसतात. भाजीपाला विकणारे , बुट पॉलीश करणारे, दिवे पणत्या विकणारे , केळीचे , नागवेलीची पाणे विकनारे , मोड आलेली मटकी कडधान्ये , दही विकनारे ,घरघुती मसाले , शेव चिवडा, पापड बनवून विकनारे , असे अगणित गरिब त्यांची दिवाळी चांगली जावी यासाठी धडपड करत असतात.यात आपण घासाघीस न करता प्रथम प्राधान्य देवुन त्यांच्या वस्तू घ्यायला हव्यात. थोडे नुकसान म्हणून मोती साबना ऐवजी दगडी लाइफ बॉय साबनाने ने आंघोळ केली तरी बिघडनार नाही. झाडु विकनार्या स्त्रीयांकडुन दोन झाडु जास्त नेले तर त्यांची दिवाळी चांगली जाइल.
           म्हणून मध्यमवर्गीय मानमोड्या बांधवांन्नो ब्र्यांडेड वस्तू घेतना भाव कमी करायची औकात आपल्यात नसते, ते शक्यही नसते मग रस्त्याच्या कडेवर भाव कमी करायचा खोटारडा आणि निलाजरेपणा या दिवाळीत तरी होनार नाही याची काळजी घ्या.लॉकडाऊन नंतरची गरिबांची दिवाळी सुखाने जाइल असे आपण वागा.आपण किती व्यवहारीक आहोत हे रस्त्याच्या कडेवरल्या त्या गरिब विक्रेत्यांना दाखवु नये.ऑफिसमधे , बॉस समोर , मालकासमोर , आपल्यापेक्षा श्रीमंतांच्यात दाखवावे.भेटवस्तूत आलेल्या साड्यांवर मोलकरणीची दिवाळी करणारे हजारो मध्यमवर्गीय कुटुंबे आहेत.आशांची सामाजिक इज्जत का जात नाही तर सगळा समाजच बेइज्जत आहे. कमाल आहे आपल्या समाजव्यवस्थेची... 
           या दिवाळीत आपल्यासह आपल्या आजुबाजुचे आव न आनता निट वागतील आशी अपेक्षा करुया....  

नितीन सावंत परभणी
9970744142

वाकीचे संत हज़रत बाबा सैय्यद ताजुद्दीन औलिया...

 वाकीचे संत हज़रत बाबा सैय्यद ताजुद्दीन औलिया... 

                      महाराष्ट्र हा सुफी परंपरेच्या पाऊलखणांनी काठोकाठ व्याप्त आहे.येथे थेट सुफींपासून त्यांच्या अनुयायांचे सुद्धा एक मानाचे विशेष असे स्थान आहे.हजारो किलोमीटरचा प्रवास करुन हे सुफी महाराष्ट्रात आले होते. येथे आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा शिकवली ती माणुसकी. ज्यांचा स्पर्श विटाळ मानला जातो त्यांना सुफींनी कडकडुन अलिंगन दिले , अस्पृश्यांना एका ताटात घेवुन सुफी जेवले.हलकी कामे करणाऱ्या श्रमीकांना सुफींनी नमाज करण्यासाठी , प्रवचन ऐकण्यासाठी पहिल्या रांगेत बसु दिले.राजा रंक हा भेद सुफी आणि त्यांच्या अनुयायांनी कधी केला नाही. अस्पृश्य जाती , भटक्या विमुक्त जमातींसाठी सुफी मुक्तेदाते बनुन आले.त्यांच्यासाठी ते देवच. हिंदू म्हणवून घेनारे ब्राम्हण , उच्चजातीय लोक जेव्हा अस्पृश्यांना निच, अमानुष वागणूक देत होते तेव्हा अस्पृश्य आणि गरिबांना आधार दिला तो सुफी परंपरेने.

               दर्ग्यांच्या महाराष्ट्र देशात नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील वाकी हे समतेचा वारसा सांगणारे असेच एक गाव. असाच समतेचा अग्रह धरणारे सुफी परंपरेचे शिष्य म्हणजे संत हजरतबाबा ताजुद्दीन होत.हज़रत बाबा सैय्यद ताजुद्दीन औलिया हे त्यांचे पुर्ण नाव. त्यांचा जन्म २७ जानेवारी १८६१ तर मृत्यू १७ ऑगस्ट १९२५ मानला जातो.  महाराष्ट्रातील प्रमुख मुस्लिम संतांमधे त्यांचे नाव अग्रहाने घेतले जाते.त्यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील कामठी या गावी झाला.लहानपणीच आई वडिल वारल्यामुळे त्यांचा सांभाळ अब्दुल रहमान या चुलत्यांनी केला.सलोख्याचे , सामाजिक कामे करत ते ६५ व्या वर्षी देह सोडुन गेले. मेहरबाबा यांच्या गॉड स्पिच मधे हज़रत बाबा सैय्यद ताजुद्दीन औलिया यांच्या बद्दल लिखान केलेले आहे. 
        
                   हिंदू मुस्लिम सर्वांना जोडनारे महान संत हजरतबाबा ताजुद्दीन होत.आपल्या दरबारात त्यांनी जात, धर्म विचारला नाही, स्विकारला नाही.सर्वांना पोटाशी धरले.अनेक रुग्नांवर औषध उपचार केले.अनेकांना कौटुंबिक , संसारिक सल्ले दिले.
   मानव धर्म ही मेरा धर्म है l 
और उसीका मै आशिक हुं ll 
         असे बाबा नेहमी म्हनत असत.इंग्रजांच्या काळात त्यांना सैनिकी पैशात नोकरी लागली होती.बाबांनी ती त्यागली , नोकरी करण्यास नकार दिला.त्याबद्दल ते म्हणायचे. 
         
बाबा मुझको नही करना मुलाजी मत फौज की l
मै जिंदगी गुजारुंगा मस्ती की मौज की ll 

              सुफी काय आणि सुफी परंपरेतील त्यांचे शिष्य काय ते अगदी हटके जीवन जगायचे.म्हणूनच लोक त्यांना औलीया म्हणायचे.संत हजरतबाबा ताजुद्दीन हे संत मेहरबाबा यांचे शिष्य आहेत.संत हजरतबाबा ताजुद्दीन हे अब्दुल्लाशाह यांच्या चिश्ती परंपरेचे प्रचारक होते.वाकी या गावी ३ मार्च ते ९ मार्च उरुस भरतो. 
उरुसात कव्वाली पासुन किर्तनापर्यंत प्रोग्राम , उत्सव आयोजित केले जातात. शेवटी काल्याच्या किर्तनाने  किर्तन आणि गोपाळकाल्याने समारोप होतो. वाकी या गावी बाबांचा दर्गा प्रशस्त मोठ्या आवारात आहेत. आजूबाजूला अनेक छोटेछोटे दर्गे आहेत.दर्ग्याचे पुजारी स्थानिकचे पाटील आहेत.संपूर्ण देखरेख, उत्सव , विधी त्यांच्याच नियंत्रणात होतात. या दर्ग्याच्या परिसरात रात्रीला फारच सुंदरम रोशनाई असते. येथे सदैव लोकांची वर्दळ असते. विदर्भाने जपलेले सलोख्याचे हे आगळेवेगळे ठिकाण आहे. 
मला नुकताच हा दर्गाह पहाण्याचा योग आला.दर्गा दाखवणारे मनीष कटारे  यांचे त्याबद्दल मनापासून धन्यवाद ! 

    नितीन सावंत परभणी 
    9970744142

Tuesday, 19 October 2021

ll नवत्रोत्सव रात्र आठवी llll वैशालीची जनपद कल्याणी - आम्रपाली ll

 ll नवत्रोत्सव रात्र आठवी ll
ll वैशालीची जनपद कल्याणी - आम्रपाली ll

                           नितीन सावंत परभणी 
                           9970744142

          संभोगागृह अर्थात सभागृह हा काळानुरूप अर्थ बदलत आलेला एकाच वास्तूचा शब्द. स्त्रीसत्ताक गणव्यस्थेत स्त्री ही राज्यकर्ती होती व तिच्यासमोर सभा व समीती भरली जायची. स्वैरसंभोग ही त्या काळाची नैसर्गिक उपज होती.गणवृध्दीसाठी जास्तीत जास्त लेकरे जन्माला घालने हा धर्मपुर्व धर्म होता.इतिहासात आम्रपालीला गणिका म्हटले गेले आहे. ती गणिका म्हणजे गणाची मालकीन, गणाच्या जमिनीचे मापून, मोजून (गणना) करुन आपल्या कुलात समान वाटप करणारी अर्थात गणराज्ञी होय. परंतू आजघडीला पुरूषसत्ताक ब्राम्हणी राजक व्यवस्थेने तिला वेश्या बनवून दुष्ट नेनीवेत ढकलले आहे.आज गणिका म्हणजे वैश्या असा आर्थ लावला जातो. तिने बौद्ध भिख्खुंच्या विश्रांतीसाठी आंब्याचे वन दान दिले होते आणि ती आपला रथ हाकताना राजेराजपुत्रांच्या बरोबरीने हाकायची या अधिकाराने ती मालकीन होती, बंद खोलीतली केवळ उपभोगाची वस्तू नव्हे.वैश्या नव्हे.

                       वैशाली हा अराजक संघगण होता आणि आम्रपाली त्या संघगणाची नगरवधू होती म्हणजे त्या गणाला लोकशाही मार्गाचा दर्जा बहाल करनारी, तो गण उध्वस्त न होऊ देणारी, त्या नगराचे ऐक्य अबाधीत ठेवनारी ती जनपदकल्याणी होती. स्त्रीसत्तेचे महत्व कमी होत असताना आणि पुरुषसत्ताक राजवटी उभ्या रहात असतानाच्या काळामधील आम्रपाली आहे. म्हणजे तीचा गण वा संघगण लोकशाहीप्रधान आहे, मात्र ती लोकशाही टिकून ठेवण्यास ती निमीत्तमात्र आहे.स्त्रीयांचे गणप्रमुख म्हणून असणारे हक्क आधिकार कमी होण्याच्या काळातील ती मावळतीची गणीका.
                      या अराजक संघगणात पुष्करणीत पुरुषांना अभिषिक्त सिचन विधीद्वारे गणसभासदत्व मिळविण्याची गरज उरलेली नाही तर ते आता सहज सभासद होतात. येथे मातृसत्ताक व्यवस्था क्षीण झाल्याचे दिसुन येते . परंतु तिचे अवशेष मात्र पहायला मिळतात. जसे महामाया ही एका वनात झाडाच्या फांदिला धरुन प्रसूत झाली. तिने तिच्या गणाच्या पुष्करणी जवळ जावून बुद्धाला जन्म दिला .आम्रपाली सुद्धा आंबवनात पुष्करणीजवळ सापडली म्हणून तिचे नाव आम्रपाली पडले.

                      अनेक राजे राजपुत्रांच्या जेवनाचे आमंत्रण नाकारीत, बुध्द वैशाली गणाची गणराणी आम्रपालीकडे जेवायला गेले ते ती वेश्या होती म्हणून नव्हे तर ती लोकशाही पद्धतीने संघगण चालवण्यास मदत करीत असे म्हणून. अराजक संघगणात जमीन ही एका व्यक्तीच्या मालकीचे नव्हे तर संपूर्ण संघाच्या मालकीची असे म्हणून अराजक संघगणात गणसभासदांच्या परवानगी शिवाय जमीन दान देता येत नसे येथे मात्र आम्रपाली बुद्धाला आंब्याचे वन दान देते म्हणजे गणाची ती जनपदकल्याणी असल्याने तिला तसे करता येते. 

                      प्रत्येक स्त्रीसत्तेच्या राज्याची एक वेगळी शेती होती त्यावरून त्या गणराणीची ओळख होई.
जसे सिंधू नदीच्या खोऱ्यात निर्ऋती गाळपेराच्या भाताची शेती करे.
गोदिवरीच्या किनाऱ्यावर शूर्पणखा सरकती (shifting) शेती करे 
तेरणा मांजरेच्या परिसरात तुळजाई कदंबाच्या वनात वास करी आणि गाळपेराच्या भातशेती बरोबर, सरकती शेतीही करे.
तर पंचगंगेच्या किनाऱ्यावर अंबाबाई अामराईची मालकीन होती.
                या आपल्या महान गणराण्या आज कोण्या न कोण्या मार्गाने मिथके बनून दुष्ट - सुष्ट किंवा व्यक्तीगत - सामूहिक नेनीवेत बंदिस्त आहेत.त्यांना या ब्राम्हणीकरनाच्या कैदेतून अब्राम्हणी बहुप्रवाही विधायक भौतीकवादी अन्वेषनाच्या पद्धती वापरून व जानीव नेणिवेच्या तर्कशास्त्राच्या आधारे मुक्त केले पाहीजे.
                   तिचा उद्धार तथागतांनी तर केलाच पण ती पुन्हा एका नव्याने मुक्त झाली मिथकांच्या कैदेतून वैश्येचे उलटे चाक फिरून ती जनपदकल्याणी बनली . ती नगरवधूची उलटीबाजू स्त्रीसत्तेचा वारसा ठरली.याचे श्रेय कॉ शरद पाटील यांना जाते. 

नितीन सावंत परभणी 
9970744142

ll नवरात्रोत्सव २ री रात्र ll तांत्रिकी : आंधारातील एक विश्व

 ll नवरात्रोत्सव दिवस २ रा  ll 

तांत्रिकी : आंधारातील एक विश्व

             ---- नितीन सावंत परभणी
                  9970744142

तंत्र आधी की ज्ञान आधी ? म्हणजे टेक्निक आधी की नॉलेज आधी ? 
या प्रश्नाचे उत्तर तंत्र आधी आसे आहे. आधी टेक्निक मग नॉलेज. म्हणून तंत्रज्ञान हाच शब्द योग्य आहे. तंत्राचेच पुढे ज्ञानात रुपांतरण होते. म्हणजे अगदी सोपे सांगायचे झाले तर आदिमानवाने अन्न मिळविण्यासाठी आधी तंत्र (technique) निर्माण केले आणि मग त्याने ते तंत्र इतरांना सांगत पिढीदरपिढी तंत्र विकसित केले पुढे त्याचे ज्ञानात रूपांतरन केले.

*तंत्र शब्दाचा अर्थ शेती असा होतो* '१ 
म्हणजे आधी शेतीचे तंत्र अवगत झाले. आणि पुढे त्याचे ज्ञानात रूपांतरण झाले. वेदांना ज्ञान म्हटले जाते. हे ज्ञान संकलीत आहे. आणि हे ज्ञान (विशेष) 'तांत्रिकी'तुन उसने घेतलेले आहे . 
आज आपल्याला माहिती आहे ती फक्त वैदिकी श्रृती. मार्क्सच्या द्वंद्वात्मक भौतिकवादी सिद्धांतानुसार जर एक वैदीकी श्रृती आस्तित्वात आहे तर तिचे विरोधी द्वंद्व बाळगणारी दुसरी श्रृती कुठेय ? आणि ती कोणती ?? 
या संदर्भात प्राच्यविद्यापंडीत कॉम्रेड शरद पाटील म्हणतात "आद्य धर्मसुत्रकारांपैकी एक हरीत हा, आगोदर दाखवल्याप्रमाणे मातृवंशक होता. त्याच्या वैरी ब्राम्हण धर्मशास्त्र्यांनी त्याला पुढीलप्रमाणे उध्द्वत केले आहे . *श्रृतिशच् द्विविधा, वैदिकी तांत्रिकी च् *
म्हणजेच श्रृती एक नाहीतर दोन आहेत. एक वैदिकी व दुसरी तांत्रिकी. तांत्रिकी म्हणजे स्त्रीसत्तावादी. चातुर्वर्ण्य पितृसत्ताक वैदिकीने हिंसक विजय मिळवल्यानंतर तांत्रिकीला बदनाम व विकृत केले. स्त्रीसत्ता व तांत्रिकी श्रृती नेणीवेत फेकल्या गेल्या आणि वैदिकी श्रृतीच इतिहासाची जाणीव बनली* '२

या तांत्रिकी श्रृतीचा जन्म वैराज स्त्रीराज्यातून झाला. आणि या वैराज स्त्रीराज्याची गणराणी होती निर्ऋती. ही निर्ऋती हाती धान्य घेवून केस मोकळे सोडुन चौपटावर नाचत धान्यपेरणी करत असे. पुढे पुरुषसत्ताक व्यवस्था आल्यावर मांत्रीकाने मात्र आपला वेष स्त्रीवादीच ठेवला . 
*तांत्रिकी श्रृती तंत्रावर म्हनजे प्रयोगांवर आधारलेली होती. पुढे वैदिकांनी निऋतीला क्रूरे घोरे असे संबोधुन करून व्यक्तीगत दुष्ट नेनीवेत ढकलले*.'३ 
हा तांत्रिकीचा अख्खा तंत्रयाणी लोकप्रवाह पुढे वैदिकांनी सामुहिक दुष्ट नेणीवेत ढकलला. या बाबतीत पंच 'म' कारच्या संदर्भात लोकांमध्ये  ब्राम्हणी प्रचार करुन तंत्रयाणी बदनाम केले गेले. परंतू पंच म कार हे ब्राम्हणी आहेत. ग्रहस्ती शाक्त , शैव , तंत्रयाणी कशाला पंच म कार करत असतील .

या तांत्रिकी श्रृतीचे आनेक पुरावे आजही उपलब्ध आहेत. नवरात्रोत्सव हा निर्ऋतीपुत्री दुर्गेचा उत्सव आहे. तो शाक्त परंपरेतील अत्यंत महत्वाचा सण मानला जातो. त्या परंपरेचे काही अवशेष खेड्यात बघायला मिळतात. खेड्यात जी घटस्थापना केली जाते तो सण हा प्रयोगावर आधारलेला कृषीसण आहे. म्हणजे कमी पाण्यावर, कमी उजेडात कोणते पिक यावर्षी चांगले येइल. हे या प्रयोगाद्वारे तपासले जाते. म्हणजे यावर्षी कोणत्या पिकासाठी वातावरण अनुकूल आहे हे घटस्थापना करुन नऊ दिवस तपासले जाते. या तांत्रीक प्रयोगात आंधार्या खोलीत कडधान्ये मिसळलेल्या मातीवर पाण्याने भरलेले गाडगे ठेवले जाते. गाडग्यातून पाणी पाझरुन नऊ दिवस त्या कडधान्याची रुजने, कोंब निघने, किंवा थोडी वाढही होते. शेवटच्या दिवशी जे धान्य उंच वाढले ते उपटुन काहीगावांत फेट्यात, टोप्यांत खोवून गावभर मिरवले जाते. म्हणजे दहावा दिवस अर्थात दसऱ्याला गावची पंच मंडळी ठरवते की यावर्षी सर्वाधिक फेट्यात कोणते धान्य जास्त दिसले, ते धान्य सर्वांनी पेरायचे. किंवा इतर काही धान्यांसाठी सुद्धा यावर्षी चांगले वातावरण आहे हा प्रयोगांती निष्कर्ष लावला जातो.

अशापध्द्तीने जीवनवादी गरजांना महत्व देनारा तांत्रिकी श्रृतीचा मोठा भौतिकवादी प्रवाह या देशात अस्तित्वात होता.या तांत्रिकी श्रृतीला जरी नेणीवेत ढकलेले असले तरी तिने प्रसवलेले सर्वच्या सर्व लोककलावंत आजही भौतीकवादी म्हणजे इहलोकीचेच भले करुन घेनारी गीते प्रार्थना,भारुडे, कवणें,अभंग,दोहे, गातात.पारलौकिक,आध्यात्मिक अर्थात मृत्यूनंतरच्या जीवनावर तंत्रयानी प्रवाहात फारसे काही सापडणार नाही.शेती चांगली पिकू दे,खरुज जावू दे,मुल होऊ दे,यंदा पाऊस पडु दे,अशा हिशोबाचे त्यांचे गिते कवने असतात.आदिवासी समुदायात अशा प्रार्थाना आजही गायल्या जातात.मोक्ष मिळू दे,स्वर्ग मिळु दे हे लालची लोकांचे वैदिकीचे तत्वज्ञान.भाकरीच्या तंत्रयाणी तत्वज्ञानात त्याला जागा नाही.

म्हणजे काय तर तांत्रिकी श्रृती ही भौतिकवादी तत्वज्ञानाचा भारतीय नामनिधानातला भाग.आणि वैदिकी श्रृती ही आध्यात्मवादी तत्वज्ञान.तंत्र करुन आपले जीवन सुखकर बनवनारे  प्रयोगशील म्हणजे तंत्रयाणी.

हा तंत्रिकीचा प्रवाह सिंधू नदीच्या खोऱ्यातील निर्ऋतिच्या भातशेतापासून सुरु होतो.तिथे तिने अन्यधान्याचे समान वाटप करुन समता,स्वातंत्र्य आणि मित्रता जन्माला घातली. हा प्रवाह पुढे मराठवाड्यातील तेरणा-मांजरेच्या किनाऱ्यावर तुळजाई पर्यंत चालत होता.येथेही *ही जुळजा आपल्या प्रजेला 'परडीने' धान्याचे समसमान वाटप करत असे. पुढे तिने आपल्या गणभुमीचीही आपल्या चार ज्ञांतीमधे ( लेकींमधे ) समान वाटणी केली .तुळजा म्हणजेच तुला अर्थात तुळा करनारी समान वाटप करणारी होय.महाराष्ट्रातीच ९६ कुळांची ती कुळस्वामिनी आहे. नंतर कुळांचे कुळामध्ये भ्रष्टीकरण झाले.ह्या शेतीची समान वाटणी ती चौपटावर करत असे*'४ 

म्हणजेच तांत्रिकीचा हा भौतिकवादी प्रवाह भारतभर कार्यरत होता.मध्य *आशियातील बलुचिस्तान प्रदेशातील मकराण या ठिकाणावरल्या हिंगलाज मातेपासुन*'५  ते नेपाळ पर्यंत आणि जम्मुकाश्मीर पासुन ते कन्याकुमारी पर्यंत हा भारतीय परिप्रेक्षातला तांत्रिकीचा प्रवाह कार्यरत होता.आनेक मंदिरांच्या समोर आसनारे कल्लोळ,बारवा,कुंड हे स्त्रीसत्तेची प्रतिके आणि पुरावे आहेत ज्यामध्ये पुरुषांना आंघोळ घालून गणसभासद बनवले जाई.याला अभिक्तसिंचन विधी म्हनत.पुढे या तिर्थकुंडांना पुण्य कमावण्याच्या सुष्ट नेनीवेत ढकलून मिथकबंद करण्याचे काम ब्राम्हणी व्यवस्थेने केले.

या भौतिकवादी तांत्रिकी तत्वज्ञानाचा सर्वात भरभराटीचा काळ हा ६४ योगीनींचा काळ होता.ज्या काळात चौसष्ट योगीनी आपले स्वतंत्र तत्वज्ञान स्थापून भारतीय संस्कृतीला सुबत्तेच्या,सुपीकतेच्या आधिक उंचीवर नेत होत्या. मानवी मनाचे द्वैती तत्वज्ञान त्यांनीच मांडले.पुढे अनेक बौध्द पंडित आणि आनेक आचार्यांनी या चौसष्ट योगीनींशी चर्चा करुन बौद्धतत्वज्ञान कालपरत्वे अपडेट केले.सौदामिनीशी चर्चा करुन बौद्धमहापंडीत आचार्य दिग्नाग यांनी जानीव नेनीवेचा अभ्यास करुन स्वलक्षणवादाचा सिद्धांत मांडला.त्याआधी त्यांचे गुरु *चौथ्या शतकातील वसुबंधुनी त्याच्या अभिधम्मकोषात मेंदुची द्वैती रचना चित्त संप्रयुक्त (जाणीव ) व चित्त विप्रयुक्त (नेणीव) या संज्ञेखाली मांडली होती* '६
या तांत्रिकी श्रृतीचे मध्ययुगीन भारतातील सर्वात मोठे शक्तीपीठ हे श्रीशैलमला येथे होते.तिथे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा जावून आलेले आहेत.

पुढे या तांत्रिकीच्या प्रवाहातच शाक्त आणि शैव हे दोन प्रवाह बनले.गणमातांचे उपासक ते शाक्त आणि शिवाचे उपासक ते शैव बनले.

*शेतीच्या सुफलीकरणासाठी केले गेलेले विधी म्हणजे यातूविधी.हे विधी स्त्रीयांनी करायचे असतात.कारण प्राथमिक पातळीवरील शेतीचा शोध स्त्रीयांनी लावला.तंत्र या शब्दाचा अर्थ शेती हा होतो हे कॉ  शरद पाटील यांनी सिद्ध केलेले आहे. तंत्रसाधना ह्या स्त्रीप्रधान आहेत.म्हणून त्यांना वामाचारी म्हटले आहे.या साधनेने शक्ती या शब्दाला प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली.... शक्तीला माननारा तो शाक्त सांप्रदाय तंत्रमार्गाची देणगी आहे* '७

या शाक्त परंपरेत योनीपुजा होइ.योनीपुजेच्या मुर्ती केवळ भारतातच नव्हे तर जगभरात सापडलेल्या आहेत. महाराष्ट्रातील याचे उदाहरण म्हणजे लज्जागौरी.ही लज्जागौरी नांदेड जिल्ह्यातील कंदाहार तालुक्यातील भाई केशवराव धोंडगे यांच्या गावी बहाद्दरपुऱ्यातही पहायला मिळेल.स्त्रीयोनी ही सुपिकतेचे प्रतिक मानले जायचे. ही तुलना पृथ्वी आणि आकाशाशी केली जाई.म्हणजे  ज्याप्रमाणे आकाशातून जमीनीवर पाऊस पडतो त्यामुळे पिके येतात. जमीनीवर आकाशाचे विर्य पडते.आणि सुपीक जमीनीतुन पिके येतात सुबत्ता येते.अगदी त्याच प्रमाणे स्त्रीयोनी ही सुपीक मानली जाई.

पुढे जेव्हा मानवाला पाहिल्यांदा हे कळले की स्त्रीला संतती व्हायला आपन पुरुष काऱणीभुत असतो. आपल्यामुळेच हिला अपत्य होते,तेव्हा पुरुषप्रधानता यायला सुरुवात झाली.आणि यातूनच लिंगपुजा सुरु झाली. वायुपुराणात अशीच शिवाच्या लिंगाची कथा येते.शिवाच्या लिंगाचा शोध घेण्यासाठी त्याचे टोक गाठण्यासाठी ब्रम्हा आकाशाच्या दिशेने जातो आणि विष्णु पाताळाच्या दिशेने जातो. शेवटी दोघेही थकून परत येतात पन शिवलिंगाचा अंत लागत नाही.म्हणून आज मंदिरात जी शिवपिंडी दिसते तिचा खालचा भाग हा स्त्रीयोनीचे प्रतिक आहे तर वरचा भाग हा पुरुष योनीचे प्रतिक आहे. हा शैव शाक्तांच्या एकत्रीकरणाचा युतीचा काळ म्हटला पहिजे.असेच आनेक शिल्पामध्ये आपल्याला शिवाच्या मांडीवर पार्वती बसलेली दिसते.अशी शिल्पे आंबेजोगाई येथे सुद्धा आहेत.म्हणजे हे शाक्त शैव पुढे एकत्र येवून वैष्णवांच्या विरोधात लढले. 

थोडक्यात काय तर ह्या तांत्रिकीच्या प्रवाहातील शैव शाक्त हे दोन प्रवाह सुद्धा भौतिकवादी गोष्टींनाच महत्व देत होते.या प्रवाहात सुरुवातील कुठलेही आध्यात्म आणि आध्यात्मिकता नव्हती.

हा तंत्रमार्ग किती महत्वाचा होता हे डॉ आशोक राणा यांंच्या खालील विधानांवरुन लक्षात येइल. ते म्हंतात  *तंत्रमार्गाने स्त्रीयांना धर्मकार्यात महत्वाचे स्थान दिले,असच वर्णव्यवस्थेत खालच स्थान मिळेल्या शुद्र तसेच अतिशुद्रांनाही दिलं म्हणून सामाजिक समतेचा संदेश देनारा हा भारतातील प्राचीन सांप्रदाय आहे असं म्हणावं लागत*'८

अशा पद्धतीने हा तंत्रयाणी प्रवाह छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराजांच्या काळापर्यंत कार्यरत होता.अगदी तुकोबाराय यांची शिष्या बहिणाबाई पाठक शिऊरकर ह्या शाक्त असल्यामुळे संस्कृत शिकु शकल्या.

आज मात्र हा तंत्रयाणी तांत्रिकी श्रृतीचा लोकप्रवाह समुहगत दुष्ट नेनीवेत फेकलेला दिसून येतो.या प्रवाहाचे आज अवशेष आहेत ते लोककलांच्यामधे आणि बोलीमधे.गोंधळी,भारुडकार,सोंगाडे,शाहिर कीर्तनकार, वासुदेव,पिंगळा,यांनी आपल्या कलेतुन तांत्रिकीचा इतिहास पिढीदरपीढीगत जपला आहे.लोककलावंत त्यांचे पोशाख आणि त्यांनी जपलेल्या मौल्यवान कलांचा ठेवा आपन अभ्यासाला पाहिजे.त्या कलांचे जतन संवर्धन झाले पाहिजे. भारतीय वैदिकांच्या वैदिकी श्रृतीला चारी मुंड्या चित करुन  जातवर्गस्त्रीदास्यांताचे तत्वज्ञान ही तांत्रिकी श्रृती देते. तिचे हे समतावादी तत्वज्ञानच भारतात समता बंधुता आणि मित्रता आनेल.

-------------------------------------------------------------
संदर्भसूची:

१.कॉ शरद पाटील, जात्यन्तक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पूर्ती.पान क्र .१७ आवृत्ती नोव्हेंबर २००३

२.कॉ शरद पाटील, प्रिमीटीव्ह कम्युनिझम मातृसत्ता - स्त्रीसत्ता आणि भारतीय समाजवाद... पान क्र.५ आवृत्ती पहिली २०१२.

३. कॉ.शरद पाटील, रामायण महाभारतातील वर्णसंघर्ष पान क्र.दोन आवृत्ती तिसरी २०१४

४. पहा तुळजापूर येतील भारतीबूवांच्या मठातील चौपट. 

५. ऱा.ची.ढेरे.श्रीक्षेत्र तुळजापूर पान क्र.१३ आवृत्ती द्वितीय.

६. शरद पाटिल उक्त.पान क्र.२१

७. डॉ अशोक राणा,देव धर्म पान क्र.६८ आवृत्ती २०१४

८. डॉ अशोक राणा,उक्त पान क्र.५६ 
---------------------------------------------------------------

नितीन सावंत, परभणी   
9970744142

♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦

Friday, 15 October 2021

*ll नवरात्रोत्सव रात्र सातवी ll*♦️घरातील टाक आणि जानाई निर्ऋतिचा अनुबंध

 *ll नवरात्रोत्सव रात्र सातवी ll*
♦️घरातील टाक आणि जानाई निर्ऋतिचा अनुबंध 

                             नितीन सावंत, परभणी 
                             9970744142 

                 इतिहास जपण्याच्या साधणांत आणि पुराव्यांच्या प्रकारात लिखीत, कागदोपत्री हेच एकमेव साधन नसते.तसे पुराव्यांचे विविध प्रकार आहेत.त्यावर अन्यत्र चर्चा करता येइल.पुर्वजांचा इतिहास जपून ठेवण्यात एक आगळेवेगळे ऐतिहासिक साधन म्हणून ज्याचा उल्लेख करवा लागेल ते म्हणजे टाक होत. 
           आपल्या पुर्वजांची आठवण म्हणून देवघरात सोने, चांदी, पितळ, इ. धातुंचे बनवलेले प्रतिके म्हणजे टाक होत.
                आपल्या देवघरात आज्जी, पंजी, अज्जोबा, पंजोबांचे जसे टाक असतात, अगदी त्याच सारखे, खंडोबा, बहिरोबा, जोतीबा, जाकाई, जोकाई, मेसाई, जानाई यांचे देखील टाक दिसतात. म्हणजेच हे सर्व आपले कुळ पुर्वज होत. आपले सख्खे सलोहीत रक्तसंबधाचे पुर्वज होत.
                    काही  टाक हे पंचकोनी आसतात तर काही चौरस. चित्रात दिसणाऱ्या टाकातील स्त्रीला जानाई म्हटले आहे. तिच्या हातात गव्हाची ओंबी आहे. त्या हाताच्या वर  नांगर आहे. नांगरा खाली शिवलिंग आहे. तर दुसऱ्या बाजूला शेतीचे प्रतीक बैल आहे. तसेच बाजूला लहान रुपात मुलगी आहे. या ठिकाणी शेतीची प्रमुख स्त्री आहे. आणि वारसदार म्हणून मुलगी आहे. हे आहेत मातृवंशीय समाजाचे अवशेष. तिच्या एका हातात त्रीशूळ आहे. ही आयुधे, साधने आपल्यापुढे इतिहास उभा करतात. त्रिशूळ टोळी समाजाचे प्रतिनिधीत्व करतो. जानाई नाव जन म्हणजे ज्ञाती, बहिणीची ज्ञाती वा कुलांचा समूह, मातृसत्ता दाखवते. गव्हाच्या अोंब्या, शिवलिंग स्त्रिसत्ता दाखवते. नांगर, बैल पुरुषसत्ताक व्यवस्थेचा प्रतिनिधी.ती सर्वसामान्य स्त्री नाही तर तिने डोक्यावर मुकुट परिधान केलेला आहे.म्हणजे ती ज्ञातीप्रमुख आहे.आशाप्रकारे छोटासा टाक एका स्त्रीसत्ताक समाजाचा वारसा सांगतो.

                   ज्या काळात, लिखानाची कला अवगत नव्हती त्या काळात आपले पुर्वज आशा प्रतिकांच्या तथा सणवार, उत्सवांच्या आधारे इतिहास जपत होते. 

                  जुण्या नाण्यांप्रमाणेच देवघरातील टाकही इतिहासाच्या संशोधनाचे एक साधन आहे.

                      हा स्त्रीचा टाक शेतीचा शोध लावणाऱ्या निर्ऋती पर्यंत जातो. शेतीची प्रमुख हक्कदार स्त्री असल्याचे सांगतो.निऋतीची वंशजा ही जानाई आहे.महाराष्ट्राभरात अनेक ठिकाणी जानाईचे मंदिरे आहेत.
                      आजूबाजूचा हा वारसा डोळस दृष्टीने पहाणाऱ्या नजरा मेल्या की भारतीय जनता गुलाम बनेल.इंग्रजांच्या पाश्चिमात्य नकारात्मक नास्तिकवादी धारणनेने पुरोगामी चळवळींचा सत्यानाशच झाला आहे.त्यांच्याकडे सत्यान्वेषाची कोणतीही मेथडोलॉजी नाही.भारतीय संस्कृती , वारसा , लोकदैवते , ग्रामसंस्कृती , लोकगिते , लोककलावंत हे काही हेटिंगचा आणि टाकावु विषय नाही.तो विधायक उकल करत जानारा मार्ग आहे.
                      यापासून आपण उपरे होता कामा नये.   

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

ll नवरात्रोत्सव रात्र सहावी ll ♦आंबा जोगाई ♦️

 ll नवरात्रोत्सव रात्र सहावी ll
     ♦आंबा जोगाई ♦️

                        -   नितीन सावंत परभणी 
                           9970744142

                      आंबेजोगाई हे नैसर्गिक दृष्टीने अत्यंत सुंदर असे शहर.सांस्कृतिक वारसा असलेले सर्वात जुने शहर आंबेजोगाई आहे.हे शहरावर अनेक राजेमहाराज्यांच्या राजवटीखालुन गेलेले आहे.संत चक्रधर स्वामींचे प्रवचनही येथे झाल्याच्या नोंदी आहेत.या शहरासंदर्भात सर्वात जुना वारसा जोगाईच्या अंबाबाईचा. जयवंती नदीकिनाऱ्यावर वसलेली मातृसत्तेची राज्ञी म्हणजे जोगेश्वरी.मुळात ही एक योगीनी.आंबा आणि जोगीणी (योगीणी) या दोन शब्दांपासून आंबाजोगाई हा शब्द बनला आहे.म्हणजे आंबाजोगाई या शहराच्या नावातच मातृसत्तेचे पुरावे दफन आहेत.
                   हे एक मोठे नगरच.पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या प्रस्थापनेनंतरच्या काळात अशा मातृसत्ताक ठिकानांचे 'दुष्ट नेनीवेकरण' करण्यात आले आहे.म्हणून आंबेजोगाई येथे या योगीनीचे नगर स्मशानभूमीत अडगळीत टाकलेले आहे.म्हणजे नंतर त्या भागात स्मशानभूमी बनवण्यात आलेली आहे.निर्ऋतीही नरकदेवता म्हणून अशीच बदनाम करण्यात आली.तिची नैऋत्य दिशा अशुभ मानली गेली.तिचा जन्मदिवस अमावस्या, तिचे वहान गाढव,आजही अशुभ मानतात.

                      त्याचप्रमाणे ही योगिनी आंबाबाई आज स्मशानभूमीत आडगळीत आहे.या भागाला बाराखांबी मंदिर परिसर म्हटले जाते.या परिसरात नव्याने काही मंदिरांचे अवशेष मिळाले आहेत.या ठिकाणी मोरावर स्वार असलेली एक योगिनी शिल्प आहे.आणि,कानात गोल रींग असलेली दाढी असनारी एक योगी पुरुषाची मुर्तीही आहे.त्याच्या पायाखाली सुद्धा मोरांची शिल्पे आहेत.
                       म्हणजे मोर ज्ञातीचिन्ह या आंबा योगीनीचे असावे. तिच्या गणाचे कुलचिन्ह मोर होते. याबद्दल, अजुन तपशील घेतला असता आंबेजोगाईचे रहिवासी विनोद उंबरे म्हणाले,या भागात मोरांची संख्या खुप आहे.बिड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात नायगावला मयुर अभयारण्य आहे. शिवाय आंबाजोगाईला लागूनच मोरेवाडी नावाचे गाव आहे. यापेक्षा सर्वांत महत्वाचे दोन पुरावे असे की या भागातील बहुतांश महिला मोरणीची नथ वापरतात.जसे यरमाळ्याच्या यडेश्वरी देवीला मानणाऱ्या स्त्रीया विशिष्ट प्रकारचे इरकलचे रेषारेषांचे लुकडे परिधान करतात.त्याप्रमाणे या आंबा जोगाईला मानणाऱ्या स्त्रीया मोरणीची नथ वापरतात.दुसरा पुरावा असा की,काही ठिकाणी परडीसोबत मोरपंख पुजले जाते.

                  या आधारे आपन योगिनी आंबाबाईचे ज्ञातीचिन्ह मोर आहे हे निश्चित करु शकतो. हे तपशील घेवून आम्ही निघताना आंबाजोगाई बसस्टॉपला मोरणीची नथ घातलेली महिला भेटली.
   
                     या बाराखांबी मंदिर परिसरात देवीचे यंत्र सापडले आहे.ते दगडावर कोरलेले आहे.यंत्र तंत्र आणि मंत्र ही तांत्रिक त्रयी आहे.म्हणजे आपल्याला अवगत झालेले तंत्र यंत्राद्वारे मांडले जाई उदा. जसे चौपट.

                       याच भागात मुळजोगाई देवीचे मंदिर आहे.ही मुळजोगाईच खरी गणमाता.पुढे तिला गावात नेवून तिचे मंदिर बाधण्यात आले.या मुळजोगाईला लागून रेणुका आहे. तिच्या पुढे तिची पुष्करणी आहे. या मुळजोगाईच्या दृष्टीक्षेपात पुढे हे बाराखांबी मंदिर आणि एका बाजुला दासोपंत यांची सामाधी आहे. ह्या दासोपंत यांच्या समाधी मागे पुर्वीच्या दोन पुष्करण्या आहेत. म्हणजे रेणुकेप्रमाणे या दासोपंत यांच्या परिसरात सुद्धा एक उपदेवता होती. तिचे नामोनिषान मिटले आहे. फक्त उरल्यात दोन पुष्करण्या. या आजूबाजूला असणाऱ्या उपदेवता जोगेश्वरीच्या ज्ञाती असाव्यात. ज्याद्वारे तिचा चौपट निश्चित होइल.
                     वंशसमाजात आती बनतो गण.त्या गणाची प्रमुख असते गणराज्ञी.गणराज्ञीच्या गणातील लोकसंख्या वाढल्यानंतर तो गण विभक्त होतो तो ज्ञातीप्रमुखांचा. ज्ञातीचे कुळे बनतात.ही कुळे पुढे नव्या शेतजमीनीच्या शोधार्थ ज्ञातीच्या गणातून विभक्त होऊन नवे गावे वसवतात. सांगली जिल्ह्यातील उदगाव हे योगेश्वरीच्या गणाचे कुळ होते.हे कुळ आंबेजोगाईच्या गणातून नव्या शेतजमीनीच्या शोधात उदगावच्या भुमीपर्यंत आले.तेथील शेतीयोग्य भुसभुशीत जमीनीत हे कुळ विस्तारले, त्यांनी आपला वंशवेल वाढवला.आपल्या गणप्रमुखाची आठवण म्हणून त्या कुळाने तिथे योगेश्वरीचे ठाणे उभे केले.आजही दरवर्षी तिथे यात्रा भरते.जोगणीचा आगळावेगळा सांस्कृतिक वारसाही त्या गावाने अजुन जपून ठेवला आहे.वंशसमाजात जातीव्यवस्था नसल्यामुळे गणराज्ञी , ज्ञाती आणि कुळे हे सर्वांचीच आहेत.देवी , नवरात्रोत्सव , घटस्थापना हा काही एका जातीचा वारसा नव्हे. 
               नितीन सावंत परभणी
               9970744142 
**********************************

ll नवत्रोत्सव रात्र आठवी llll वैशालीची जनपद कल्याणी - आम्रपाली ll

 ll नवत्रोत्सव रात्र आठवी ll

ll वैशालीची जनपद कल्याणी - आम्रपाली ll


                           नितीन सावंत परभणी 

                           9970744142


          संभोगागृह अर्थात सभागृह हा काळानुरूप अर्थ बदलत आलेला एकाच वास्तूचा शब्द. स्त्रीसत्ताक गणव्यस्थेत स्त्री ही राज्यकर्ती होती व तिच्यासमोर सभा व समीती भरली जायची. स्वैरसंभोग ही त्या काळाची नैसर्गिक उपज होती.गणवृध्दीसाठी जास्तीत जास्त लेकरे जन्माला घालने हा धर्मपुर्व धर्म होता.इतिहासात आम्रपालीला गणिका म्हटले गेले आहे. ती गणिका म्हणजे गणाची मालकीन, गणाच्या जमिनीचे मापून, मोजून (गणना) करुन आपल्या कुलात समान वाटप करणारी अर्थात गणराज्ञी होय. परंतू आजघडीला पुरूषसत्ताक ब्राम्हणी राजक व्यवस्थेने तिला वेश्या बनवून दुष्ट नेनीवेत ढकलले आहे.आज गणिका म्हणजे वैश्या असा आर्थ लावला जातो. तिने बौद्ध भिख्खुंच्या विश्रांतीसाठी आंब्याचे वन दान दिले होते आणि ती आपला रथ हाकताना राजेराजपुत्रांच्या बरोबरीने हाकायची या अधिकाराने ती मालकीन होती, बंद खोलीतली केवळ उपभोगाची वस्तू नव्हे.वैश्या नव्हे.


                       वैशाली हा अराजक संघगण होता आणि आम्रपाली त्या संघगणाची नगरवधू होती म्हणजे त्या गणाला लोकशाही मार्गाचा दर्जा बहाल करनारी, तो गण उध्वस्त न होऊ देणारी, त्या नगराचे ऐक्य अबाधीत ठेवनारी ती जनपदकल्याणी होती. स्त्रीसत्तेचे महत्व कमी होत असताना आणि पुरुषसत्ताक राजवटी उभ्या रहात असतानाच्या काळामधील आम्रपाली आहे. म्हणजे तीचा गण वा संघगण लोकशाहीप्रधान आहे, मात्र ती लोकशाही टिकून ठेवण्यास ती निमीत्तमात्र आहे.स्त्रीयांचे गणप्रमुख म्हणून असणारे हक्क आधिकार कमी होण्याच्या काळातील ती मावळतीची गणीका.

                      या अराजक संघगणात पुष्करणीत पुरुषांना अभिषिक्त सिचन विधीद्वारे गणसभासदत्व मिळविण्याची गरज उरलेली नाही तर ते आता सहज सभासद होतात. येथे मातृसत्ताक व्यवस्था क्षीण झाल्याचे दिसुन येते . परंतु तिचे अवशेष मात्र पहायला मिळतात. जसे महामाया ही एका वनात झाडाच्या फांदिला धरुन प्रसूत झाली. तिने तिच्या गणाच्या पुष्करणी जवळ जावून बुद्धाला जन्म दिला .आम्रपाली सुद्धा आंबवनात पुष्करणीजवळ सापडली म्हणून तिचे नाव आम्रपाली पडले.


                      अनेक राजे राजपुत्रांच्या जेवनाचे आमंत्रण नाकारीत, बुध्द वैशाली गणाची गणराणी आम्रपालीकडे जेवायला गेले ते ती वेश्या होती म्हणून नव्हे तर ती लोकशाही पद्धतीने संघगण चालवण्यास मदत करीत असे म्हणून. अराजक संघगणात जमीन ही एका व्यक्तीच्या मालकीचे नव्हे तर संपूर्ण संघाच्या मालकीची असे म्हणून अराजक संघगणात गणसभासदांच्या परवानगी शिवाय जमीन दान देता येत नसे येथे मात्र आम्रपाली बुद्धाला आंब्याचे वन दान देते म्हणजे गणाची ती जनपदकल्याणी असल्याने तिला तसे करता येते. 


                      प्रत्येक स्त्रीसत्तेच्या राज्याची एक वेगळी शेती होती त्यावरून त्या गणराणीची ओळख होई.

जसे सिंधू नदीच्या खोऱ्यात निर्ऋती गाळपेराच्या भाताची शेती करे.

गोदिवरीच्या किनाऱ्यावर शूर्पणखा सरकती (shifting) शेती करे 

तेरणा मांजरेच्या परिसरात तुळजाई कदंबाच्या वनात वास करी आणि गाळपेराच्या भातशेती बरोबर, सरकती शेतीही करे.

तर पंचगंगेच्या किनाऱ्यावर अंबाबाई अामराईची मालकीन होती.


                या आपल्या महान गणराण्या आज कोण्या न कोण्या मार्गाने मिथके बनून दुष्ट - सुष्ट किंवा व्यक्तीगत - सामूहिक नेनीवेत बंदिस्त आहेत.त्यांना या ब्राम्हणीकरनाच्या कैदेतून अब्राम्हणी बहुप्रवाही विधायक भौतीकवादी अन्वेषनाच्या पद्धती वापरून व जानीव नेणिवेच्या तर्कशास्त्राच्या आधारे मुक्त केले पाहीजे . 

                  तिचा उद्धार तथागतांनी तर केलाच पण ती पुन्हा एका नव्याने मुक्त झाली मिथकांच्या कैदेतून वैश्येचे उलटे चाक फिरून ती जनपदकल्याणी बनली . ती नगरवधूची उलटीबाजू स्त्रीसत्तेचा वारसा ठरली.याचे श्रेय कॉ शरद पाटील यांना जाते. 


नितीन सावंत परभणी 

9970744142

Monday, 11 October 2021

♦#पुरुषमेध

♦#पुरुषमेध 

मातृसत्तेतून स्त्रीसत्तेच्या आणि स्त्रीसत्तेतून पुरुषसत्तेच्या काळात अनेक स्थित्यंतरे झाली.स्त्रीसत्तेत स्त्रीने स्वताचे प्रशासन उभे केले होते.#गणवृद्धीसाठी ती धष्टपुष्ट #सांड (पुरुष) निवडे.गणवृद्धीसाठी जास्तित जास्त संतती जन्माला घालणे #धर्मपुर्व_धर्म होता.पण एकच पुरूष दीर्घकाळ सहवासात राहिला तर त्याला आपण शोधलेली,विकसित केलेली #कृषीमाया त्याला वागत होइल आणि आपली सत्ता हातून जाइल या कारानाने पुरुषांना ठरावीक काळच ती #गणराज्ञी सहवासात ठेवत असे.यातून ठरावीक काळानंतर गणसभेसमोर त्या राज्ञीच्या शरीराचा राजा बनलेल्या पुरुषाचा मेध होत असे. 

पुरुषसत्तेत पुढे हा विधी प्रतिकात्मक आला.जसे रेडा,बैल,घोडा,बकरे आणि कोंबडे किंवा लिंबू कापणे हे नर म्हणून प्रतिके आहेत. 

सदरील शिल्प पुरुषमेधाचे आहे.बैलाला किंवा रेड्याला  पुरुषाचे तोंड आहे.हा बैल किंवा रेडा सांड आहे.ही राज्ञी एका हताने मुंडके दाबत दुसऱ्या हाताने ती त्रिशूळ खुपसत आहे.आनखी एक हातात तिने खडग उगारलेले आहे.एका हातात तिचे टोटम,ज्ञातीचिन्ह असावे जे कमळाच्या फुलासारखे आहे.ही योगीनी आहे.कानात योग्या सारखे मोठे मोठे रिंग आहेत. 

या शिल्पाचे अगदी विरोधी शिल्प पाहायचे असेल तर सतीचा हात असलेले शिल्प होय.

स्त्रीसत्तेत वृद्धस्त्रीयांच्या भरलेल्या  गणसभेत पुरुषमेध होत असे तर पुरुषसत्तेत स्मशानभूमीत सर्व बाजूने उभे असलेल्या पुरुषांच्या मधे लाकडांनी ढकलू ढकलु ढोलताशे बडवत स्त्रीला सती म्हणून जाळले जाई .. 
आशाप्रकारे #इतिहासाचा_उलटा_सुड पुरुषसत्तेने उगवला.
 
नितीन सावंत परभणी 
9970744142

ll नवरात्रोत्सव रात्र पाचवी ll कौल देनारी आंबाबाई

*ll नवरात्रोत्सव रात्र पाचवी ll* 
   *कौल देनारी आंबाबाई*

  -  नितीन सावंत परभणी 
                     9970744142

अखंड ज्योत तेवते , तुझ्या निरांजणातली l 
आपार भावभक्तीने तुझीच मुर्त पुजीली ll
त्रिशूळ खडग घेवुनी, विनाशन्या असुर ये l
बनुनी रौद्रकामीनी प्रकाशन्या तिमीर ये ll 

  शाक्त अर्थात स्त्रीवादी परंपरेतील एकूण शक्ती पिठांपैकी प्रमुख चार शक्तीपीठे महाराष्ट्रातील आहेत.चार आकडा सम सख्येत येतो. विषमतावाद्यांना समता नको होती म्हणून त्यांनी साडेतिन शक्तीपीठे हे विषमतावादी नामकरण रुढ केले.आर्धपिठ असे काही नसतेच मुळी, प्रत्येकीचे एक स्वतंत्र आधिष्ठान,एक गणराज्य होतेच.त्यात कुनीही अपूर्ण नाही.आर्धे नाही. 
      या प्रमुख चार शक्तींनी महाराष्ट्र उभा केला. मातृसत्ताक स्त्रीसत्ताक परंपरेतील वंशसमाजातील या चौघींनी विविध प्रकारच्या शेतीपद्धतीचे प्रयोग करुन आपला गण जगवला, पोसला,जपला,वाढवला.या चौघींचीच लेकरे आपण.शेतीचा सण घटस्थापना असल्याने त्यांचे नित्य स्मरण नवरात्रोत्सवात  शेतकरी कष्टकरी वर्गाने करणे साहजिकच आहे. 
                 
  *त्या चौघी खालीलप्रमाणे.*👇 

१) तुळजेने तेरणा मांजरेच्या सुपीक गाळात भातशेती केली. तिची ही शेती गाळाच्या खोऱ्यातली. खोलगट भागातील.तिचे टोटम कदंब वृक्ष. 

२) रेणुकेचा गण सरकती शेती करणारा. शेतीसाठी सुपीक जमीन शोधुन,तेथील उतारावर काही काळ शेती करुन पुन्हा पुढे सरकणारा तो गण.डोंगराच्या उतारावर आजही बऱ्याच राज्यांत अशी शेती केली जाते. 

३) सप्तशृंगी : उंच डोंगर माथ्यावर कमी पाण्यावर शेती यशस्वी करुन दाखवलेली राज्ञी सप्तशृंगी होय.सात डोंगरांचा मुकुट धारण केलेली ती .. 

४) आंबाबाई : अत्यंत दलदलीच्या भागात , जलमय प्रदेशातही शेती यशस्वी करुन दाखवून आपला गण जगवणारी , पोसणारी, टिकवणारी नव्हे तो वाढवनारी आंबाबाई होय. 

*आज आपण आंबाबाई बद्दल पाहुया.* 

*कौल देनारी ती अंबाबाई :* 

     अंब म्हणजे पाणी जसे पंजाब पाच नद्यांचा प्रदेश.अगदी त्याचप्रमाणे पंचगंगेच्या जलमय आणि दलदलीच्या भागात शेती यशस्वी करुन दाखवणारी अंबा ( येथे अर्थ आई ) म्हणजे कोल्हापूरची अंबाबाई. त्या काळात लेकरे जगवणे , गणवृद्धी करणे हे काम जिकरीचे होते.आशाकाळात तिने किंवा तिच्या ज्ञातीने विविध भाज्यांचा शोध लावला तशी शेती विकसीत केली. म्हणून कोल्हापुरात शांकभरी ही भाज्यांची देवीचे सुद्धा ठाणे आहे. महाराष्ट्रभर अनेक भाज्यांची मिळुन मिक्स भाजी करण्याचा जो प्रकार आहे तो या गणातून आलेला.मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसी भोगीला ही भाजी केली जाते. आलेल्या सुबत्तेचा भोग घेनारी ती भोगी, आपल्या गणातील विविध सदस्यांनी पिकवलेल्या विविध भाज्यांची सामूहिक एकत्रित शिजवून भाजी बनवण्याचा तो उत्सव भोगीचा.शाक हे भाजीसाठीचे नाव सांगली जिल्ह्यात वापरतात.
    आंबा हे पद आहे त्या पदावर विविध राज्ञी होऊन गेलेल्या आहेत. त्रिपुरसुंदरी त्या अनेक आंबांपैकी एक कोल्हापूरच्या सर्व लोकप्रकारांत रिवाज आणि परंपरात हा इतिहास आजही दफन आहे.तो आपण पुढे आणला पाहिजे. कोल्हापूरत आनेक राज्ञी विविध ठिकाणी ठाण मांडुन बसलेल्या आहेत. गारगोटी रोडला कातळ दगडाच्या कपारीत कात्यायनी आहे. तर कोल्हापूर शहरासह कोल्हापूरच्या सिमेपर्यंत तिच्या विविध ज्ञातींची ठाणे आहेत.ज्यामध्ये त्र्यैंबोली,विठलाई देवी, मायक्का देवी ( कोल्हापूर बॉर्डर ), टेंबलाई देवी, भवानी देवी किल्ले पन्हाळा, काळम्मा देवी,महाकाली मंदिर,थिरंगाई देवी, कमळजादेवी,पदमावती , निनाई ( शाहूवाडी ), अनुकामीनीका देवी ,जोमकाई देवी, यमाई देवी ( ज्योतिबा पायथा ),भावेश्वरी देवी,हुलकाई देवी ( जंगलाची देवी, डोंगराची देवी ),मरगुबाई माता, यल्लूबाई आदी देवींची ठाणे होत.  शिवाय अंबेचे संरक्षक म्हणून जी नावे येतात ती रंकभैरव आणि काळभैरव.रंकभैरवाच्या नावे रंकाळा तलाव आहे.
    गणात सुबत्ता वाढल्यानंतर तिने न्याय निवाडा देनार्या भुमीका घेवुन , सर्वांना पदराखाली घेऊन आपलेसे केल्याने,देवीचा कौल प्रकार रुढ झाला.कौल देने म्हणजे निर्यण देने , न्याय देने , पिकांचे , पावसांचे आदाज व ज्ञान देणे. देवीने कौल दिला की सर्व गण कामाला लागे.घरावरच्या छप्पराला कौल काही उगीच म्हनत नाहीत. देवीचा आमच्यावर वरदहस्त आहे.कौल आहे म्हणून तिच्यामुळे मिळालेले हे छप्पर कौलारु घर. 
    विर-रसाचे सर्वाधिक शब्द आणि गित रचना आंबाबाईच्या बद्दल पहायला मिळतात.उदो उदो म्हणजे तिचा जयजयकार किंवा गुणगाण.तिच्या समोर उद जाळणे , भंडारा उधळणे , दिवटी पेटवने , मळवट भरणे , बेभान होऊन नाचत आनंद व्यक्त करणे ही सुबत्तेची , भरभरून उत्पन्न दिल्याचे लक्षणे आहेत. उदो उदो म्हणजे उत्पादन वाढीची क्रांती. गोंधळ म्हणजे रात्रभर चालणारे पुर्वजांची किर्ती सांगणारे लोककथन.ती एक रात्रीची शाळाच! आज गोंधळ शब्द किती विकृत आर्थाने आपण वापरत असतो.कुनी धिंगाणा मस्ती केली की आपण म्हनतो काय गोंधळ घालताय.हा विकृत वाक्यप्रयोग कुनी रुढ केला असावा ? ज्यांना ही रात्रीची शाळा डोळ्यात खुपत होती , गोंधळातून लोक हुशार करणे पुर्वजांचे मोठेपण सांगणे आवडत नव्हते आशा ब्राम्हणी परंपरेने आणि पहिल्या टप्प्यातील ब्राम्हणी शिक्षकांनी काय गोंधळ घालताय शब्दप्रयोग रुढ केला. 
    कोल्हापूरच्या नावातच ती अब्राम्हणी परंपरेची आंबाबाई आहे.ती काही विष्णुची लक्ष्मी नव्हे.ती नारायणी नव्हे. तिचे ब्राम्हणीकरण करण्याचा प्रयत्न सतत चालु असतो पण लोकपरंपरा तिला लक्ष्मी न म्हनता आजही आंबाबाईच म्हणतात. सर्वच्या सर्व लोकगितांत ती आंबाबाई आहे. तुळजा रेणुका आणि आंबाबाई ह्या दक्षिण भारतीयांच्या दृविडांच्या सांस्कृतिक वारसा आहेत.संबंध महाराष्ट्रच दृविडांचा , दक्षिण भारतीयांचा.पण संस्कृती हरवलेले भटाळलेले लोक , गुलाम बनलेले लोक हे सर्व विसरुन गेलेले आहेत.कोल्हापूर भागातील गावांची नावे , गावोगावच्या लोकपरंपरा यांत हा इतिहास आजही जीवंत आहे. जसे हिंगोली जिल्ह्यातील चौंढी आणि आंबा दोन्ही गावे जी अगदी एकमेकांना लागुन आहेत, ही गावे कोल्हापूरच्या आंबाबाईच्या गणाच्या वारसदारांनी वसवलेली आहेत.
     कोल्हापूरची आंबाबाई ते करविर संस्थापिका ताराराणी हा हजारो वर्षाचा मातृसत्ताक स्त्रीसत्ताक परंपरेचा समतेचा वारसा.हे शहरच समतेची भुमी.माणसाला माणूस माननारा प्रगतीशील वारसा कोल्हापूरचा. 

नितीन सावंत परभणी 
9970744142
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

Sunday, 10 October 2021

♦️ll नवरात्रोत्सव चौथा दिवस ll हारितीचे स्त्रीराज्य 🌾

 ♦️ll नवरात्रोत्सव चौथा दिवस ll
         -  हारितीचे स्त्रीराज्य 🌾

         -  नितीन सावंत परभणी
            9970744142

               अब्राम्हणी परंपरेत रात्र हे विचार विनीमयाचे , डिबेटचे , औषधे कुठण्याचे,तयार करण्याचे , रसविद्येचे थोडक्यात संस्कृती आणि आध्यात्मवादाचे केंद्र. मातृसत्तेत, स्त्रीसत्तेत हे सर्व रात्री चाले. म्हणून दिवटी, दिपमाळा यांना स्त्रीवादी सणवार उत्सवांत फार महत्व आहे. या कारणाने नवरात्रोत्सवात आजही आराधी , जोगती , गोंधळी रात्रभर जागरण करतात.गाणी म्हणतात लोककथांचे कथन करतात.पितृसत्ताक पुरुषवर्चस्ववादी परंपरांनी नंतर उलटा सुड घेताना रात्र अशुभ मानली.अमावस्या अशुभ मानली. तसा प्रचार केला.म्हणून ब्राम्हणी व्यवस्थेचे विधी दिवसा होतात.त्यांच्या दृष्टीने दिवस शुभ तर तांत्रिक मांत्रिक विधी रात्री होतात.अब्राम्हणी परंपरेत रात्र शुभ , काळा रंग शुभ. 
               दक्षिण भारतीय संस्कृती काळ्या रंगाची दृविडांची.या भागाची सर्वाधिक जुनी गणराज्ञी हरिती होय.
 
हरिती : 
                  हरिती ,श्रीशैलच्या स्त्रीसत्ताक गणव्यवस्थेची गणमुख्या. कृष्णा नदीच्या खोरयातील निर्ऋतीच्या परंपरेतील वैराज्याची ती राष्ट्री होती.भारतात फळे भाज्यांच्या शोधापासून ते मानवी मनाच्या आवस्थांपर्यंत , चमड्याच्या रोगांपासून शस्त्रक्रियांपर्यंत संशोधनाचे काम या श्रीशैल्यच्या स्त्रीराज्यात उभारीस आले होते.
पुढे विविध क्षेत्रात तरबेच, निष्णात ६४ योगीनी आणि ८४ सिद्ध परंपरा या हरितीच्या स्त्रीराज्याच्या श्रीपर्वताच्या छायेतून उदयाली आली.

                   हे स्त्रीराज्य एकेकाळी वैचारिक आणि तत्वज्ञानात्मक बाबतीत अतिच्च आणि एक आगळावेगळा दबदबा ठेवून होते. म्हणून भारतीतील कुठल्याही तत्वज्ञाला आपल्या ज्ञानाची खोली तपासायची असेल तर तो अंतिम डिबेटसाठी या हारितीच्या स्त्रीराज्यात येत असे. येथे अनेक विचारवंत महिनोमहिने किंवा कित्तेक वर्षे महाडिबेट करत असत. हे हारितीचे स्त्रीराज्य दक्षिण भारतातील कृष्णा नदीच्या खोरयातील द्रविडांची गणभुमी. 
  
            वसुबंधू, दिग्नाग या महायानी स्कूलच्या तत्वज्ञानी, विचारवंतांनी मांडलेला द्वैती मनाचा सिध्दांत याच स्त्रीराज्याची देन आहे.मानवी मन द्वैती असते हा शोध हरितीच्या स्त्रीराज्याचा. या हारितीच्या श्रीशैलमच्या स्त्रीराज्यात अनेक बौद्ध आचार्य डिबेटसाठी येत असत. शुन्यवादाचे जनक नागार्जुन सुद्धा कित्तेक वर्षे या परिसरातील पर्वतावर ज्ञानार्जन करत होते.म्हणून हरितीची मुर्ती नालंदा विद्यापीठाच्या समोर होती ,हे चिनी प्रवाशांनी आपल्या नोंदीत नोंदवून ठेवले आहे.नालंदा विद्यापीठ हरितीला ज्ञानाचे प्रतिक मानत असल्याचे निदर्शनास येते.  

           चक्रधरस्वामी तर १२ वर्षे येथे राहुन गेलेले आहेत.याबद्दल राचिंढेरे यांनी श्रीपर्वताच्या छायेत या ग्रंथात मांडणी केलेली आहे. स्त्रीराज्यातील विचार पुढील काळात चक्रधर स्वामी उजागर सांगत असत. मासिक पाळी वाईट नसते हा त्यातलाच एक विचार.जसा माणसाला शेंबुड तसी मासिक पाळी हे जाहिररित्या चक्रधर स्वामींनी सांगितलेले आहे.

              श्रीशैलच्या योगिनी मुक्ताबाई यांच्या शिष्यपरंपरेची एक शाखा विसोबा खेचरांच्याद्वारे संत नामदेवांपर्यंत येते. आयुष्यात एकदातरी श्रीशैलमला जावुन मनाचा बळी देइल असे संत नामदेव आपल्या अभंगात म्हनालेले आहेत.

                नाथ सांप्रदायाचे संस्थापक मच्छिंद्रनाथ या स्त्रीराज्यात कित्तेक वर्षे राहिले. पुढे गोरक्षनाथ त्यांना भेटायला आल्यानंतर दोघांनी भारतभर नाथ सांप्रदाय वाढवला. म्हणजे नाथ आणि वारकऱ्यांची एक शाखा हरितीच्या स्त्रीराज्याचा जीवनरस घेवून विकास पावत होती. 

लिंगायत धर्माच्या अनुभव मंड्डपचे पहिले आचार्य अलामप्रभु आणि दुसऱ्या आचार्या अक्कमहादेवी हे दोघेही श्रीशैलमचे होते. त्यांच्या समाध्या तिथेच कर्दळीच्या बनात आहेत.हरितीच्या स्त्रीराज्यातून लिंगायत धर्माला दोन महान आचार्य मिळाले. 

           म्हणजे नाथ, वारकरी, लिंगायत, महानुभाव यांचा श्रीशैलमच्या स्त्रीराज्याशी थेट संबंध आहे. याच स्त्रीराज्याने  हे समतेचे, जातीअंताचे भक्ती सांप्रदाय जन्माला घातले.
  
               कालिदास हा ब्राम्हणी छावणीचा कवी मेघदुताला निरोप देताना म्हनतो, दक्षिणेत गेल्यानंतर तुला स्त्रीराज्य लागेल तिथे क्षणभरही थांबु नकोस पुढे जा ! 

                      म्हणजे ब्राम्हणी छावणीला हे समतेचे तत्वज्ञान निर्माण करनारे स्त्रीराज्य डोळ्यात खुपत होते. याच स्त्रीराज्यातून कालिदासाला पराभूत करनारे तत्वज्ञ जन्माला आलेले होते.
१४ विद्या आणि ६४ कलांत एकापेक्षा एक निष्णात स्त्री पुरुष या स्त्रीराज्याने दिलेत. तरिही ब्राम्हणी व्यवस्थेने तिला लेकरे पळवून नेनारी राक्षसी वगैरे म्हणून रंगवले आहे.तिचे दुष्ट नेनीवेकरण केलेले आहे. 

                येथे मृत शरिरांवर प्रयोग केले जात. रसविद्या, औषधोपचार शिकविले जात. खाण्यासाठी लागणाऱ्या नव्या भाज्यांचा शोध लावला जाई.  
  
           नालंदा विद्यापिठाच्या समोर हारितीची भव्य मुर्ती होती आणि तिची पुजा करुन विद्यापीठ सुरु होई, असे चिनी प्रवासी फाइहान नोंदवून ठेवतो. म्हणजे ज्ञान परंपरेची जननी हारिती आहे. सरस्वती नव्हे. 
   
             हा ढोबळमानाने हारितीची मुलगी हरिती, जी वैय्याकरण होती, तिच्या स्त्रीराज्याचा आढावा ! वैचारिक आढावा. 

             तिचा कुलपट , वाढत गेलेला गण , त्याचा विस्तार हे आजुन उकल व्हायचे बाकी आहे.  

नितीन सावंत परभणी 
9970744142

************************************

Saturday, 9 October 2021

ll नवरात्रोत्सव दिवस तिसरा ll तेरणा मांजरेची गणमुख्या - कुलस्वामिनी तुळजा

ll नवरात्रोत्सव दिवस तिसरा ll 
तेरणा मांजरेची गणमुख्या - कुलस्वामिनी तुळजा 

                 जगभरातील स्थिरस्थावर मानवी सभ्यतेची सुरुवात स्त्रीयांपासुन होते.गरोदरपणात भटक्यांच्या टोळीतील स्त्रीया लांब आणि जास्त प्रवास करु शकत नसत.त्यातून त्यांनी पाण्याच्या , जलाशयाच्या आसर्याने नैसर्गिक गुफा आणि झाडांच्या मोठ्या खोडात रहाणे पसंत केले.या प्रारंभिक स्थिर होण्यातून पुढे शेती , नृत्य , रेखाटन , रंगरंगोट्यांचा शोध स्त्रीयांनी लावला.सुरुवातीला संपूर्ण गण एकत्र रहायचा.पुढे गणातून ज्ञाती फुटुन वेगळ्या बनल्या.ज्ञातींची कुळे झाली आणि नंतर कुळाचे कुटुंब बनत गेले. आशीच महाराष्ट्रातील अनेक कुटुंबे आणि कुळांची पुर्वजा म्हणजे तुळजाभवानी होय. 

                 तुळा म्हणजे तोलने,मोजने,मापणे किंवा वाटुन देने होय.तुळजा म्हणजे मोजुन देनारी , समान वाटुन देनारी ,तुळा करणारी होय.तेरणा मांजरेच्या किनाऱ्यावर आपल्या वाढत जाणाऱ्या गणाला पोसण्यासाठी जमीन वाटून देनारी. तसेच सामूहिक गणाने काढलेल्या पिकाचे परडीने समसमान हिस्यांत गणात वाटप करणारी गणमुख्या म्हणजे तुळजाई होय.आजच्या भौगोलिक प्रदेशात बालाघाट डोंगर रांगामध्ये समुद्र सपाटीपासून २७० फुट उंचीवर वसलेले गाव म्हणजे तुळजापूर होय . उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुक्याचे हे ठिकाण.धर्मग्रंथात दंडकारण्य म्हणून या भागाचा उल्लेख सापडतो. 
                     पुढे तिने वाढत गेलेला गण आपल्या चार ज्ञातींना विभागून दिला. एका ज्ञातिच्या वाट्याला २४ कुळे आली.या चौघींची २४ कुळे मिळुन संख्या बनली ९६ कुळांची.म्हणून महाराष्ट्राची ९६ कुळे वसवणारी आद्य गणराज्ञी म्हणजे तुळजा भवानी होय.
                  परंतू हा काळ वंशसमाजाचा.येथे अजुन जातीव्यवस्था जन्माला आलेली नाही.त्यामुळे ही कुळे एकजातीय नाहीत.आजच्या जातीव्यस्थेत दाखवली जानारी कुळे वंशसमातील कुळांची कॉपी किंवा भ्रष्ट स्वरुप आहे.आज कुनाचेही कुळ शुद्ध उरलेले नाही.
तुळजेचा काळ हा शिल्पकलेचा शोध लागण्याच्या आधिचा.त्यामुळे तिचे मुख्य प्रतिक आकारहीन दगडाचे.तुळजापूरची घाटशिळा हेच खरे तिचे स्मृतीस्थळ.पुढे मुर्तीकलेच्या शोधानंतर तुळाजाईमुर्ती स्वरुपात आली. आजही सर्व ग्रामदेवता आकारहीन दगडातच आहेत.
                     ब्राम्हणी छावणीच्या उन्मादा नंतर अनेक पुर्वजांचे , ग्राम संरक्षक मातृकांचे मानवी स्वरूप लपवून त्यांना पुढे अलौकिक दैवत्व बहाल केले गेले आहे. 
या प्रकारात एक तर त्यांच्याबद्दल दुष्ट आफवा परवल्या गेल्या किंवा अलौकिकत्व देवुन त्यांचे सुष्ट नेनीवेकरन करण्यात आले आहे.
मराठीतल्या रंडकी चंडकी ह्या शिव्या रंडी चंडी स्त्रीयांच्यावरुन निर्माण झालेल्या आहेत.कुलटा म्हणजे या गणातून त्या गणात व्यापार व्यवहार औषधउपचार करण्यासाठी फिरनारी राज्ञी होय.आज कुलटा शब्दाला वाईट अर्थ निर्माण करुन दिला गेला आहे.गणीका म्हणजे नाचनारी नव्हे.गणाची प्रमुख ती गणीका.आशा अनेक शब्दांच्या द्वारे पितृसत्ताक समाज व्यवस्थेत स्त्रीयांची टिंगल टवाळी केली गेलेली आहे.साज घडीला सर्वाधिक शिव्या स्त्रीयांवरुनच आहेत.शिवी सुद्धा शिवाच्या बायकोचे नाव आहे. 
                    अगदी याच प्रमाणे आज तुळजाभवानीचा पट जुगाराचा पट म्हणून सांगितला जातो.
तुळजाभवानी भारती बुवांच्या मठात जुगार खेळायला जाते अशाप्रकारे भाविकांत एक मिथक पसरवण्यात आलेले आहे.जे चुक आहे. तुळजाभवानीचा चौपट हा गणभुमीचे समान वाटप करनारा पट आहे.
म्हणून वंशसमाजात आधी गण त्यांची मुख्या गणराज्ञी मग ज्ञाती होय. पुढे ज्ञातीची कुले बनली.त्यानंतर कुलांची कुटुंब बनत आणि एक कुटुंब काही मैलांवर जावून नवे गाव वसवी. 
त्यामुळे अनेक नदीकिनारी समान आडनावाची अनेक गावे सापडतात.ज्यांचे देवक कुलचिन्ह एक असल्यामुळे त्यांच्यात विवाह होत नाहीत.हि झाली भाऊबंदकी.
जाती समाजात आज कुटुंबव्यवस्था परार्थीकरणातून परात्म बनत चालेली आहे.त्यामुळे एक व्यवस्था जाऊन नवी व्यवस्था येने अपरिहार्यच आहे.तुळजाईच्या विविध ज्ञाती पुढे अनेक नदीकिनाऱ्यावर शेतीयोग्य जमीन शोधत नवे गावे वसत गेल्याचे असल्याला दिसून येते.गावे वसवताना तिच्या गणाच्या , ज्ञातिच्या वंशजांनी आपल्या पुर्वजा भवानीचे ठाणे जागोजागी उभे केले.तिचा इतिहास विविध मार्गाने जपून ठेवला.असेच देवीचा इतिहास जपून ठेवनारे गोंधळी , आराधी , भोपे , पोतराज,तृतीय पंथी होत. 

♦#एककुळी_गाव ♦

                  मानव समाज वंशसमाजात शिकारीतून शेतीत उतरला आणि  त्यांच्यात आधी गण तयार झाले. मग गणाचे ज्ञातीत विभाजन झाले.  त्यानंतर, प्रत्येक ज्ञातींत कुले बनत गेले. पुढे सात पिढ्यांच्या नंतर कुले विभाजीत होत. नवे कुल तयार होत असे.

                     साळंतून व सरंजामी समाजात आल्यावर कुळाची जागा कुटुंबाने घेतली. कुटुंबातून पुढे भाऊकी.भावकी आणि वाडे यांची संख्या सात पिढ्याइतके वाढली की बेट फुटून ११ मैलावर नवा गाव वसवला जाई. 

                   या वंशसमाजातील सा-लोहित अर्थात रक्तसंबधाने बांधलेल्यांत विवाह होत नाहीत. त्यासाठी कुलचिन्ह देवक परंपरा होती. ज्यांचे देवक कुलचिन्ह सेम ते भाऊबंद मानले जातात.पुढे जाती समाजात आडनावेही आली.समान आडनावे असनारे भाऊबंद मानले जावुन तिथेही बेटीव्यवहार होत नाहीत.ते भाऊबंद असल्यामुळे त्यांच्यात राम राम घालत नाहीत.

गावे कसे वसतात किंवा वसवली गेलीत त्याचे एक उदाहरण पाहुया : 

                    परभणी हिंगोली जिल्ह्यांच्या सिमा #पुर्णा_दुधना नद्यांनी बांधलेल्या आहेत. यातील दुधना नदीकिनारी धार, समसापुर, दुरडी आणि मुरुंबा या चार गावी चोपडे आडनावाचे सकुल्य पण असपिंड्य बांधव आहेत. चारही गावी पोळ्याचा मान चोपडे यांच्याकडे आहे.चारही गावी होळीचा मान चोपडे यांच्याकडे आहे.मुख्य गढी आणि वहितीखाली जास्त जमीन चोपड्यांकडेच.ही गावे चोपडेंनी वसवल्याचे लक्षात येते. समसमान वाटणी करनारे गाव समसापुर, नदिच्या अगदीच धारेत ( कडेवर ) वसवलेले गाव म्हणजे धार, नदिने वळण घेतल्यानंतर त्या दुरडीच्या आकाराच्या किनाऱ्यावर वसवलेले गाव दुरडी तर आंबेचे ठाणे असलेले मुरुंबा. अंब शब्द पाण्याशी सुद्धा नाते सांगणारा आहे.
ही एकाच भावबंदकीची वा कूळाची आपत्ये आहेत. महापूर आल्याने किंवा गणाची संख्या वाढल्यामुळे नवीन गावे वसवून नवी जमीन वहितीखाली आणण्याचे काम चोपडेंनी केलेले आहे. यासाठी पांढरीच्या जमीत धान्य पुरुन ठेवून कोंभ नाही आले तर ती जमीन गाव वसवण्यासाठीची असे मानले जाते . काळीची सुपीक जमीन पिकांसाठी तिथे गाव वसवणे निषिद्ध.  

                 #पुर्णा नदिच्या किनारी तर दोन दोन नावांची सारखी गावे आहेत.म्हणजे एकच गाव महापुरात तुटून वेगळा झाला असेल तर नाव कायम राहिले गावे वस्त्या दोन झाल्या.जसे पोटा ही गावे दोन आहेत.परळी (काळे आणि  दशरथे) पिंपळगाव (कुटे आणि टोंग) सावंगी (पंढरकर आणि गरुड ),नांदगाव ( जवंजाळ आणि भालेराव ) ही एकाच नावाची दोन गावे आहेत.ही गावे नदिच्या परस्पर विरोधी तिरावर एकमेकांडे तोंडे करुन उभी आहेत.मटकर्हाळा आणि सावंगी या गावी गरुड आडनाची सकुल्य म्हणजे एकाच कुळाची बांधव आहेत.
या गावांचा अधिक विस्ताराने अभ्यास केला तर गावे कोण्या काळात वसवली गेलीत, हे सहज लक्षात येइल.
यांना एककूळी गावे म्हटले जाते.

नितीन सावंत परभणी
9970744142

Thursday, 7 October 2021

ll नवरात्रोत्सव तिसरा दिवस ll♦घटस्थापना आणि हिंगुळजा ♦

ll नवरात्रोत्सव तिसरा दिवस ll
♦घटस्थापना आणि हिंगुळजा  ♦

                  
              नवरात्रोत्सव हा मातृसत्ताक गणव्यवस्थेचा सर्वात मोठा सण आहे.शक्ती म्हणजे स्त्री. म्हणून शक्तीचे उपासक ते शाक्त. नवरात्र उत्सवात मातृदेवतेची आराधना केली जाते.या सर्व मातृदेवता एकेकाळच्या गणराण्या होत्या.सिंधुनदीच्या किनाऱ्यावर निर्ऋतीचे राज्य होते. गोदावरीच्या किनाऱ्यावर शूर्प-णखा कृषीप्रधान स्त्री-राज्य चालवत होती.पंचगंगेच्या किनाऱ्यावरच्या अंबवनाची गणराणी अंबाबाई होती. आपल्या चार लेकींना (ज्ञाती) समान चार भागात म्हणजे ९६ कुळात शेती वाटुन देणारी तुळजाई,हा तेरणा-मांजरेचा देश समतेवर चालवत होती. या शाक्त परंपरेत भेदाभेद नाही, की असमानता नाही.प्राच्यविद्यापंडीत कॉ शरद पाटील म्हणतात "शाक्तांची ठाणी अस्पृश्य (मातंग) वस्तीत सापडतात." म्हणजे बहुतांश स्त्रीदेवतांच्या मुख्या पुजारीण मातंग स्त्रीया होत्या. 
             अगदी त्याच प्रमाणे आजही नवरात्रोत्सवात मातंग स्त्रीची परडी भरल्याशिवाय वरच्या जातीतल्या स्त्रीया जेवन सुद्धा करत नाहीत.गावात गोंधळी आला तर तो आधी मातंगाच्या घरी वाजवतो,मग इतरांच्या.कवडी हे प्रजननाचे प्रतीक आहे. नवनिर्मीतीचे प्रतीक म्हणून कवडी ही शाक्त संस्कृतीत पुजनीय मानली गेली आहे.आपली आई आपल्याला सर्वकाही देते.ती कशाचीही कमी पडू देत नाही. ती धान्य भरभरून देते या अर्थाने परडी (धान्य देण्याचा टोकरा) पुजनीय मानली जाते. लेकरे जगत नसतील,वाचत नसतील तर मातंग आईच्या पदरात घातले जातात. ते पोर मातंगवाड्यात जेवते,रहाते, दुध पिते, मग पुन्हा आपल्या मुळ घरी दिले जाते. हे वंशसमाजातील लोकोत्सव असल्याने येथे भेदभाव नव्हता.पुढे जाती समाजात मातंग अस्पृश्यतेत लोटले गेले. 
                     या नवरात्रोत्सवात अशा अनेक अब्राम्हणी परंपरा आपल्या दिसतील.ज्यांमधे इतिहास आहे. तुम्हाला काही मिथके दिसतील,त्याला तत्काळ नकार देण्याऐवजी मिथकांची सोडवणूक केली पाहिजे.मिथके उलगडली पाहिजेत. या नवरात्रोत्सवाला ब्राम्हणी छावनीत लोटुन आपल्याला काहीही साध्य होनार नाही.आता अब्राम्हणी- करणाची प्रक्रिया जोमाने राबवली पाहिजे.

                   नवरात्रोत्सवात आपण आनेक गणराज्ञ्यांचा , गणमातेचा आढावा घेत आहोत. त्यात आज बघुया हिंगुलांबीका किंवा हिग्लाजमाता. 

                   हिंग्लाजमाता :
    ही पाकिस्तानातील बलुचिस्तान भागातील मकराण येथे वास्तव्याला असनारी गणराज्ञी.कराची पासुन २५० किमीवर उत्तर पश्चिम भागात ही वास्तव्यास आहे. आजही तिला आकारहीन दगडात पुजले जाते. म्हणजे तिचा काळ मुर्तीकलेचा शोध लागण्याच्या आधीचा.ती ५६ शक्तीपिठांपैकी एक आहे. हिंगोल नदीच्या किनाऱ्यावर तिचे साम्राज्य उदयाला आले.हिंगुलांबीका ,हिंगुळादेवी हे सुद्धा तिचे उपनावे आहेत.आजच्या काळातील पाकिस्तानी जनता तिला नानी देवी सुद्धा म्हणतात. हिंगुळा म्हणजे रक्तवर्णी.रक्तवर्णी का तर चोर दरोडेखोरांपासुन , परकीय आक्रमणापांसुन प्रजेचे व्यापाऱ्यांचे संरक्षण करताना रक्त सांडणारी लढाऊ राणी. भारताचा जगभर होनारा व्यापार याच हिंगुळादेवीच्या परिसरातून खैबरखिंडीमार्गे होत असे.उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरचा व्यापर युरोपात होत असल्याचे पुरावे उपलब्ध झालेले आहेत.त्यामुळे परकीय आक्रमणे थोपवनारी ही युद्धराज्ञी.या देवीच्या हतात जास्तित जास्त आयुधे आहेत.म्हणजे सरक्षंण देवता.व्यापर करणाऱ्या लोकांना संरक्षण देनारी ही राज्ञी पुढे व्यापारी लोकांची देवता बनली.आणि त्या व्यापाऱ्यांनी तिला देशभरात नेले.जिथे जिथे व्यापारी केंद्रे होती तिथे तिथे या हिंगुळजेचे ठाणे स्थापन केले गेलेत.मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात या हिंग्लाजमाता देवींची मंदिरे आहेत.आज व्यापारी जातींपैकी स्पेशली भावसार समाज या देवीचा उपासक आहे.हिंगोली जिल्हाचे नाव सुद्धा या देवीच्या नावे आहे.कोल्हापूरचा गडहिंग्लाज तालुका सुद्धा याच देवीचे नामनिर्देशन करतो.नाथ सांप्रदायाचा आणि गुरु गोरक्षनाथ यांचा वावर या परिसरात दीर्घकाळ राहिलेला आहे.सुकन्या आगाशे नावाच्या लिखिकेने मागोवा मिथकांचा या ग्रंथात या संदर्भात लिखान केले आहे. 

नितीन सावंत परभणी 
9970744142

तरिही मी उभा .. कविता निऋती,तुळजा,रेणुका l

तरिही मी उभा .. कविता 

निऋती,तुळजा,रेणुका l
आंबाबाई,शूर्पणखा,मवळाई ll
शप्तशृंगी,ताटका, आम्रपाली ll
मावळतीची मातृसत्ता...स्त्रीसत्ता..
 
वाढत जानारी भव्य नगरे,
पर्याय म्हणून उभे केलेले,
पाटील,पटवार्यांचे मावळतीचे लहानगे ग्राम... 

घुमणारा घंटानाद,
पांढरे फटक चेहरे,
आणि दुष्काळाच्या करुण कहाण्या 
सांगणारे जुणी माणसं

सतीशिळेच्या आर्तकिंकाळ्यांचे अवशेष,
 उगवतीच्या भांडवलशाहीत 
सरंजामशाहीची मावळतीची वेस..

तरिही मी उभा पडलेल्या 
गढ्याबुरुजांचे भाऊबंदकीचे द्वंद्व घेवून... 
देशीवादाची समृद्ध आडगळ शोधत ... 

नितीन सावंत,परभणी
9970744142

Wednesday, 6 October 2021

संवेदनाहीन वर्तन ..

संवेदनाहीन वर्तन .. 

बसस्टँड किंवा रेल्वेस्थानकातल्या चौकशी कक्षातील व्यक्ती ज्या कार्यासाठी तिथे बसवलेली आहे, नेमके तेच आणि तेवढेच कार्य चोखपणे करत नसल्याचे आपल्याला बऱ्याचदा निदर्शनास येते.रेल्वेस्थानकातल्या चौकशी कक्षातील कर्मचारी बहुतांश वेळा न बोलताच लिहीलेल्या गाड्यांच्या वेळांकडे बोट दाखवत असतो.त्याच्यासमोर माईक असतानाही त्याचा वापर तो करत नसतो.काही रेल्वे स्थनकात तर छोटी छडी केलीय, वेळा निर्देशीत  करण्यासाठी.
                 बसस्टॉपच्या चौकशी कक्षातील सुद्धा कर्मचारी कंटाळून आणि जीवावर आल्यासारखे बोलताना आपण बऱ्याचदा पहातो. यांच्यासमोर छोटा माइक कशासाठी बसवलेला असतो.बोलण्यासाठीच न ? आणि नेमके ते हेच टाळायला बघतात.
                 प्रफुल्लितपणे , अगदी आनंदाने संपूर्ण माहिती देनारा , यापेक्षा आनखी काही माहिती हवी आहे का ? असा म्हननारा कर्मचारी मी आजुन चौकशी कक्षात पाहिलेला नाही.
                  आनाथ , अपंग , मतीमंद किंवा वृद्धाश्रमात गेल्यानंतर आपण भावनिक होतो.तिथे आपण संवेदनशील बनलेलो आसतो.नेमके तिथे संस्थाप्रमुख किंवा व्यवस्थापन करणारी व्यक्ती अगदीच रफ वागून त्या आश्रमात आनलेल्या लोकांच्याप्रती भावनाहीन बाजारु बनलेली दिसते.
                  देनगी कक्षातील देनगी स्विकारणारी व्यक्ती  देनगी दिल्याबद्दल आभारही व्यक्त तर करतच नाही,उलट पटापट निपटुन तुम्ही लगेच चालते व्हा ! या आविर्भात तो देनगीदाराला वागवतो. देनगी , दान या शब्दाचे तो महत्व हरवून बसल्याने तो खंडणी घेत असल्याच्या अविर्भावात वावरताना दिसतो.
काही वेळेला दवाखान्यात , वकिली क्षेत्रातही असे अनुभव थोड्या बहुत फरकाने येतात.
                आपल्या पेशाप्रती , नोकरी , जबाबदारीप्रती ते लोक संवेदनशील नसल्याचे वरिल उदाहरणे आहेत.कसेतरी चालतेय न , नेवु पुढे रेटत , त्याला काय होतेय ?  आशा भुमीकांत ही लोकं वावरत असतात.आहे त्यापेक्षा अधिक चांगली सेवा देवु , यापेक्षा आधिक संवादी बनु , यापेक्षा आधिक मदतगार बनु ,अशी त्यांची भावनाच मेलेली असते.
यावर दोनच पर्याय आहेत.
त्या लोकांना पुन्हा नव्याने ट्रेनिंग द्या, आधिक चांगले संवादी बनवा.
किंवा त्वरित कामावरून कमी करुन त्या जागेवर उत्साही, आनंदी तरुणांची भरती करा.
आपण जे आहोत त्यापेक्षा आधिक चांगले बनु शकतो.
आपण आहेत त्यापेक्षा आधिक सुंदर संवादी बनु शकतो.
आपण याहीपेक्षा आधिक आनंदी , उत्साही , प्रेमळ आणि संवेदनशील बनु शकतो.
कुठल्याही बाबतीत आहोत त्यापेक्षा आनखी उंचीवर जाता येते.
डेव्हलपमेंटला मर्यादा नसतात.
विकसित होण्याला मर्यादा नसतात.
मग विकसित होणे , एका विशिष्ट वळनावर का थांबवावे ? 

नितीन सावंत परभणी
9970744142