संवेदनाहीन वर्तन ..
बसस्टँड किंवा रेल्वेस्थानकातल्या चौकशी कक्षातील व्यक्ती ज्या कार्यासाठी तिथे बसवलेली आहे, नेमके तेच आणि तेवढेच कार्य चोखपणे करत नसल्याचे आपल्याला बऱ्याचदा निदर्शनास येते.रेल्वेस्थानकातल्या चौकशी कक्षातील कर्मचारी बहुतांश वेळा न बोलताच लिहीलेल्या गाड्यांच्या वेळांकडे बोट दाखवत असतो.त्याच्यासमोर माईक असतानाही त्याचा वापर तो करत नसतो.काही रेल्वे स्थनकात तर छोटी छडी केलीय, वेळा निर्देशीत करण्यासाठी.
बसस्टॉपच्या चौकशी कक्षातील सुद्धा कर्मचारी कंटाळून आणि जीवावर आल्यासारखे बोलताना आपण बऱ्याचदा पहातो. यांच्यासमोर छोटा माइक कशासाठी बसवलेला असतो.बोलण्यासाठीच न ? आणि नेमके ते हेच टाळायला बघतात.
प्रफुल्लितपणे , अगदी आनंदाने संपूर्ण माहिती देनारा , यापेक्षा आनखी काही माहिती हवी आहे का ? असा म्हननारा कर्मचारी मी आजुन चौकशी कक्षात पाहिलेला नाही.
आनाथ , अपंग , मतीमंद किंवा वृद्धाश्रमात गेल्यानंतर आपण भावनिक होतो.तिथे आपण संवेदनशील बनलेलो आसतो.नेमके तिथे संस्थाप्रमुख किंवा व्यवस्थापन करणारी व्यक्ती अगदीच रफ वागून त्या आश्रमात आनलेल्या लोकांच्याप्रती भावनाहीन बाजारु बनलेली दिसते.
देनगी कक्षातील देनगी स्विकारणारी व्यक्ती देनगी दिल्याबद्दल आभारही व्यक्त तर करतच नाही,उलट पटापट निपटुन तुम्ही लगेच चालते व्हा ! या आविर्भात तो देनगीदाराला वागवतो. देनगी , दान या शब्दाचे तो महत्व हरवून बसल्याने तो खंडणी घेत असल्याच्या अविर्भावात वावरताना दिसतो.
काही वेळेला दवाखान्यात , वकिली क्षेत्रातही असे अनुभव थोड्या बहुत फरकाने येतात.
आपल्या पेशाप्रती , नोकरी , जबाबदारीप्रती ते लोक संवेदनशील नसल्याचे वरिल उदाहरणे आहेत.कसेतरी चालतेय न , नेवु पुढे रेटत , त्याला काय होतेय ? आशा भुमीकांत ही लोकं वावरत असतात.आहे त्यापेक्षा अधिक चांगली सेवा देवु , यापेक्षा आधिक संवादी बनु , यापेक्षा आधिक मदतगार बनु ,अशी त्यांची भावनाच मेलेली असते.
यावर दोनच पर्याय आहेत.
त्या लोकांना पुन्हा नव्याने ट्रेनिंग द्या, आधिक चांगले संवादी बनवा.
किंवा त्वरित कामावरून कमी करुन त्या जागेवर उत्साही, आनंदी तरुणांची भरती करा.
आपण जे आहोत त्यापेक्षा आधिक चांगले बनु शकतो.
आपण आहेत त्यापेक्षा आधिक सुंदर संवादी बनु शकतो.
आपण याहीपेक्षा आधिक आनंदी , उत्साही , प्रेमळ आणि संवेदनशील बनु शकतो.
कुठल्याही बाबतीत आहोत त्यापेक्षा आनखी उंचीवर जाता येते.
डेव्हलपमेंटला मर्यादा नसतात.
विकसित होण्याला मर्यादा नसतात.
मग विकसित होणे , एका विशिष्ट वळनावर का थांबवावे ?
नितीन सावंत परभणी
9970744142
No comments:
Post a Comment