महाराष्ट्र हा सुफी परंपरेच्या पाऊलखणांनी काठोकाठ व्याप्त आहे.येथे थेट सुफींपासून त्यांच्या अनुयायांचे सुद्धा एक मानाचे विशेष असे स्थान आहे.हजारो किलोमीटरचा प्रवास करुन हे सुफी महाराष्ट्रात आले होते. येथे आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा शिकवली ती माणुसकी. ज्यांचा स्पर्श विटाळ मानला जातो त्यांना सुफींनी कडकडुन अलिंगन दिले , अस्पृश्यांना एका ताटात घेवुन सुफी जेवले.हलकी कामे करणाऱ्या श्रमीकांना सुफींनी नमाज करण्यासाठी , प्रवचन ऐकण्यासाठी पहिल्या रांगेत बसु दिले.राजा रंक हा भेद सुफी आणि त्यांच्या अनुयायांनी कधी केला नाही. अस्पृश्य जाती , भटक्या विमुक्त जमातींसाठी सुफी मुक्तेदाते बनुन आले.त्यांच्यासाठी ते देवच. हिंदू म्हणवून घेनारे ब्राम्हण , उच्चजातीय लोक जेव्हा अस्पृश्यांना निच, अमानुष वागणूक देत होते तेव्हा अस्पृश्य आणि गरिबांना आधार दिला तो सुफी परंपरेने.
दर्ग्यांच्या महाराष्ट्र देशात नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील वाकी हे समतेचा वारसा सांगणारे असेच एक गाव. असाच समतेचा अग्रह धरणारे सुफी परंपरेचे शिष्य म्हणजे संत हजरतबाबा ताजुद्दीन होत.हज़रत बाबा सैय्यद ताजुद्दीन औलिया हे त्यांचे पुर्ण नाव. त्यांचा जन्म २७ जानेवारी १८६१ तर मृत्यू १७ ऑगस्ट १९२५ मानला जातो. महाराष्ट्रातील प्रमुख मुस्लिम संतांमधे त्यांचे नाव अग्रहाने घेतले जाते.त्यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील कामठी या गावी झाला.लहानपणीच आई वडिल वारल्यामुळे त्यांचा सांभाळ अब्दुल रहमान या चुलत्यांनी केला.सलोख्याचे , सामाजिक कामे करत ते ६५ व्या वर्षी देह सोडुन गेले. मेहरबाबा यांच्या गॉड स्पिच मधे हज़रत बाबा सैय्यद ताजुद्दीन औलिया यांच्या बद्दल लिखान केलेले आहे.
हिंदू मुस्लिम सर्वांना जोडनारे महान संत हजरतबाबा ताजुद्दीन होत.आपल्या दरबारात त्यांनी जात, धर्म विचारला नाही, स्विकारला नाही.सर्वांना पोटाशी धरले.अनेक रुग्नांवर औषध उपचार केले.अनेकांना कौटुंबिक , संसारिक सल्ले दिले.
मानव धर्म ही मेरा धर्म है l
और उसीका मै आशिक हुं ll
असे बाबा नेहमी म्हनत असत.इंग्रजांच्या काळात त्यांना सैनिकी पैशात नोकरी लागली होती.बाबांनी ती त्यागली , नोकरी करण्यास नकार दिला.त्याबद्दल ते म्हणायचे.
बाबा मुझको नही करना मुलाजी मत फौज की l
मै जिंदगी गुजारुंगा मस्ती की मौज की ll
सुफी काय आणि सुफी परंपरेतील त्यांचे शिष्य काय ते अगदी हटके जीवन जगायचे.म्हणूनच लोक त्यांना औलीया म्हणायचे.संत हजरतबाबा ताजुद्दीन हे संत मेहरबाबा यांचे शिष्य आहेत.संत हजरतबाबा ताजुद्दीन हे अब्दुल्लाशाह यांच्या चिश्ती परंपरेचे प्रचारक होते.वाकी या गावी ३ मार्च ते ९ मार्च उरुस भरतो.
उरुसात कव्वाली पासुन किर्तनापर्यंत प्रोग्राम , उत्सव आयोजित केले जातात. शेवटी काल्याच्या किर्तनाने किर्तन आणि गोपाळकाल्याने समारोप होतो. वाकी या गावी बाबांचा दर्गा प्रशस्त मोठ्या आवारात आहेत. आजूबाजूला अनेक छोटेछोटे दर्गे आहेत.दर्ग्याचे पुजारी स्थानिकचे पाटील आहेत.संपूर्ण देखरेख, उत्सव , विधी त्यांच्याच नियंत्रणात होतात. या दर्ग्याच्या परिसरात रात्रीला फारच सुंदरम रोशनाई असते. येथे सदैव लोकांची वर्दळ असते. विदर्भाने जपलेले सलोख्याचे हे आगळेवेगळे ठिकाण आहे.
मला नुकताच हा दर्गाह पहाण्याचा योग आला.दर्गा दाखवणारे मनीष कटारे यांचे त्याबद्दल मनापासून धन्यवाद !
नितीन सावंत परभणी
9970744142
No comments:
Post a Comment