Friday, 31 July 2020

♦छंदांम्सी कला आणि साहित्य महासभा ♦

♦छंदांम्सी कला आणि साहित्य महासभा ♦

या लोकशाहीत कालावंत,कलाकारांना मान सन्मान नाही.राजेशाहीत राजाश्रय होता.कलेची कदर होती.गावपातळीवर खुप सन्मान मिळत असे.गावचा प्रमुख चुकला तर त्याचेही व्यंग करून त्याला सरळ करण्याची धमक कलाकारांत होती.सारा गाव मुक्त हताने कलाकारांवर पैसे सोडत असे.धान्य देत असत.आणि आज ही भांडवलीलोकशाही उच्चभ्रू मिरासदार,बनिया भांडवलदारांना धार्जिणी आहे.कलाकारांना रस्तोरस्ती भटकंती करण्यास मजबूर करत आहे.त्यांना सन्मान नाही की कलेची कदर नाही.

आणि पुरोगामी,परिवर्तनवादी,डाव्यानीही या कलाकारांना आपल्या प्रवाहात आनलेले नाही,की सामावून घेतलेले नाही.त्यांचा उपयोग करुन मोठे काम उभे करता आले असते ते ही कुनी केले नाही.म्हणून शेवटचे दिस मोजताना काही कला आणि कलाकार तुम्हाला आजूबाजूला दिसतील.

साहित्यिक वर्गाने देखील जमिनीवरचं,वास्तववादी साहित्यचित्रण करण्याऐवजी हे साहित्यिक कल्पनेच्या जगात वावरताना भटकताना दिसतात.आपल्या आजूबाजूला शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या, लोककलावंतांची होणारी अवहेलना,स्त्रियांचे शोषण पिडण, त्यांचे जाचक जीवन यावर मात्र साहित्यिक वर्ग मौन बाळगून आहे.परिणामी पुरुष वर्चस्ववादी साहित्याचा सुळसुळाट झालेला दिसून येत आहे.अशा पार्श्वभूमीवर कलाकारांना आणि  साहित्यिकांना एकत्रित आणणे हे आम्ही आमचे आद्यकर्तव्य मानतो. या भूमिकेतून मानव मुक्ती मिशन प्रेरित आम्ही छंदांम्सी कला व साहित्य महासभा उभी करत आहोत.

आपण सहभागी होऊन हे काम वाढवण्यास मदत करावी.
     
         ♦मागण्या ♦

1)कलाकार आणि साहित्यिकांना मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनात वाढ करण्यात यावी.
2) लोक कलावंतांसाठी त्यांच्या कलेच्या जतन संवर्धनाच्या संदर्भात स्वतंत्र विद्यापीठ असावे.
३) भटक्या विमुक्त जाती, आदिवासी जमातीतील कलाकारांची व कला प्रकाराची संख्‍या प्रमाणित करण्यात यावी.
4) लोककलावंतांच्या, कलाकार आणि साहित्यिकांच्या मुलांना केजी टू पीजी हे शिक्षण मोफत देण्यात यावे.
५) लोककलावंतांची सार्वजनिक क्षेत्रात होणारी टिंगल-टवाळी, झुंडशाहीने होणाऱ्या त्यांच्या हत्या आणि समाजव्यवस्थेत त्यांना मिळणारी तुच्छतेची वागणूक हे थांबवणारा कायदा आणि कृती कार्यक्रम सरकार दरबारी लागू करण्यात यावा.
6)लोककलावंत आणि लोक साहित्यिकांना विचारपीठ मिळावं यासाठी सरकारने वार्षिक कार्यक्रमांचं आणि महोत्सवांचे आयोजन करण्या यासंदर्भात कृती कार्यक्रम हाती घ्यावा,
7)भटक्या विमुक्त जातीतील कलावंतांना प्राथमिक गरजा भागवणाऱ्या सर्व सेवा सुविधा तात्काळ देण्यात याव्यात.
8)वासुदेव,नंदिबैलवाले,अस्वलवाले,गोंधळी,डोंबारी,पोतराज,पिंगळा यांसारख्या विविध ठिकाणी भटकणाऱ्या कलावंत जाती आणि कलाकारांना कलेचे सादरीकरण करणाऱ्या ठिकाणी सरकारी निवासस्थानाची व्यवस्था करण्यात यावी.त्यांच्यासाठी कलावंत भवनाची निर्मिती करण्यात यावी.
9) किर्तन,गीत गायन,प्रवचन,वाद्यवादन,प्रबोधन करपल्लवी आणि नेत्रपल्लवी, संगीत भजन,हस्यव्यंग,नकालाकरणे आदी कुठल्याही माध्यमातून लोकांचे मनोरंजन,करमणूक,हास्य व्यंग आणि प्रबोधन करणाऱ्या सर्वच कलाकार साहित्य कलावंतांचा आजीवन कौटुंबिक खर्च सरकारने उचलावा.
१०)आधुनिक कलाकारांची आणि कलाकारांच्या कलाप्रकारांची सांगड घालून पारंपरिक कलाकारांना संधी देण्यात यावी.
११) नाटक,एकपात्री प्रयोग,सिनेमा,शॉर्ट फिल्म,पोवाडा,स्ट्यांडअप कॉमेडी शोइत्यादींच्या सादरीकरणासाठी विभागीय तथा जिल्हास्तरावर स्वतंत्र आणि कायस्वरुपी सेट,स्टेज उभे करुन देण्यात यावेत.
१२) महाराष्ट्रातील बंद असलेले सर्वच नाट्यगृह त्वरीत सुरु करण्यात यावेत.. 
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦

Thursday, 23 July 2020

राष्ट्रजागृती वारकरी परिषद - पदाधीकारी कसा असावा

*_राष्ट्रजागृती वारकरी परिषद महाराष्ट्र प्रदेश_*
           *पदाधीकारी कसा असावा*
    *_नियम_*
1)सर्व वारकरी पदाधिकाऱ्यांनी सकल संत समजुन घेणे अनिवार्य आहे.
2)राष्ट्रजागृती वारकरी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना, प्रवचनकारांना,किर्तकारांना कमीत कमी शंभर अभंग मुखोद्गत म्हणजे पाठ असावेत.
3)राष्ट्रजागृती वारकरी परिषदेचे सर्व व्यवहार करताना,जसे लेटरप्याट, ब्यानर बनवताना मुख्य लोगो वापरावा.उपशाखा काढणार आसल्यास जो मुळ लोगो अथवा चिंन्ह आहे तेच वापरावे.
4)शाखा तथा उपशाखाप्रमुख पदाधिकाऱ्यांनी कोणताही उपक्रम चालवणार असल्यास अगोदर प्रदेशाध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश प्रवक्ता यांच्या सोबत चर्चा करावी.त्यांना तशी कल्पना द्यावी.
5)पदाधिकाऱ्यांनी नेहरु शर्ट,धोतर, उपरणं, पांढरा किंवा  भगवा फेटा हा पोषाख वापरावा.
6)पदाधीकारी हा वारकरीच असावा किंवा वारकरी सांप्रदायाचे त्याला ज्ञान असावे. 
7) *एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम* या उक्तीप्रमाणे पदाधीकारी हा एकेश्वरवादी म्हणजे विठ्ठल हा एकच देव माननारा आसावा.
8) *कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पुजनाचे* या संत तुकोबारायांच्या शिकवणुकी प्रमाणे पदाधीकारी दया,क्षमा,शांती,प्रेम बाळगणारा आसावा.त्याने कुनाचा द्वेष करता कामा नये.
9)पदाधीकारी राष्ट्रजागृती वारकरी परिषदेच्या विचारांशी कटिबद्ध असायलाच हवा.
10)पदाधिकाऱ्यांना कुणा दुसर्‍या पदाधिकाऱ्या बाबत तक्रार आसल्यास लेखी अर्ज अथवा SMS द्वारे प्रदेशाध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश प्रवक्ता यांच्याकडे तक्रार करावी.
11)एखादे उपक्रम चालु असताना सर्व पदाधिकाऱ्यांनी ते फोटो , पोष्ट, व्हिडिओ त्याचा प्रसार व प्रचार करणे बंधनकारक राहील.
12)पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही इतर संघटणेच्या विचारांवर हुज्जत घालू नये उलट त्यांना आपल्या विचारधारेत  आणण्याचा प्रयत्न करावा.
13)सर्व पदाधिकाऱ्यांचे लेटर पॅड, व्हिजीटिंग कार्ड  आसने अत्यावश्यक आहे.
14)पदाधीकारी निरअहंकारी निर्व्यसनी आसने आवश्यक आहे.
15)पदाधिकाऱ्यांनी सतांची शिकवण,त्यांचे अभंग हेच प्रमाण  मानावे.त्याद्वारे जीवन मार्गक्रमण करावे.