Tuesday, 25 May 2021

♦बुद्ध एक चिंतन ♦

 ♦बुद्ध एक चिंतन ♦

बुद्ध एक राजघराण्यातील लाडका तरुण.ग्रहत्याग करताना आपन सर्वसंगपरित्याग करत आहोत हे सिद्धार्थाने जाहीर केले होते.आणि त्यांनी तसे केलेही.आपला घोडा व आंगावरील राजवस्त्र त्यागुन त्यांनी सोबत आलेल्या सेवकाला माघारी पाठवले होते.पुढे त्यांनी चिंध्यांपासून,गोणपाटापासून बनवलेले चिवर धारण केले.पुर्वीप्रचलीत असलेल्या अनेक पंथ प्रवाहांशी चर्चा करुन,मुनी साधु यांच्याशी तात्विक घुसळण करुन पुढे तथागतांनी स्वतंत्र धम्ममार्ग निर्माण केला.आणि भिख्खुसंघासाठी एक आदर्श नियमावली बनवली. 

प्रश्न असा आहे की,भिख्खुसंघासाठी बनवलेली नियमावली तथागत बुद्धांनाही लागू होती की नाही ? असायलाच पाहिजे.कारण बुद्ध कधीही भेद करत नसत. 
मग संपूर्ण भिख्खूसंघ हा मुंडण केलेला दिसतो.दाखवला जातो.पण बुद्ध मात्र सुंदर केसांचा बुचुडा बांधलेले दाखवले जातात.असे का असावे ? 
तर केवळ दगडीमुर्ती कोरताना ती सुंदर दिसावी.कुरुप वाटु नये म्हणून मुर्तीकारांनी बुद्धाच्या डोक्यावर कुलुपे कुलुपे असनारा कुरुळ्या केसांचा बुचुडा तयार केला.लहान मुलांचे केस सौंदर्याचे प्रतिक आहेत.म्हणून बुद्धाला मुर्तीत त्या लहान मुलांच्या कुरुळ्या केसांचा बाज चढवलेला दिसतो . 

संपूर्ण आयुष्यभरात बुद्धाने धम्मात स्वतःच्या जीवनचरित्रावर चर्चा होऊ दिलेली नाही.ते धम्मच मुख्य प्रधान मानायचे व्यक्ती नव्हे.बुद्ध म्हनायचे मोहात पडू नका.कुठल्याच तृष्णेत आडकू नका.मग ती तृष्णा व्यक्तीची सुद्धा असू शकते.ते म्हणायचे धम्मदायाद व्हा ! अमीष दायद नव्हे !! 
शास्ता मार्गदाता म्हनुनही कुनाला सर्वस्व मानू नका. रुपाची तृष्णा,व्यक्तीची तृष्णा ही सुद्धा गुलामीकडे नेते.म्हणून बुद्ध असे पर्यंत तुम्हाला कुठेही बुद्धमूर्ती दिसनार नाहीत.बुद्धांच्या पश्चात बुद्ध जे नका करु म्हनाले ते करायला सुरुवात झाली.बुद्ध म्हनाले मुर्तीपुजा करु नका.जगभरात बुद्धी मुर्ती उभ्या राहिल्या.लोक धम्मदायाद व्हायचे सोडून अमिष (मुर्तीला बळी पडले ) दायाद झाले. 

बुद्धमूर्ती सौंदर्याचे प्रतीक आहे .त्याने असक्ती निर्माण होते.व्यक्ती गुंतततो .आडकतो,मोहित होतो.आणि बुद्ध म्हनायचे मुक्त व्हा ! आडकू नका ! पक्षाप्रमाणे स्वच्छंद व्हा.म्हणून बुद्धविचार सोडून बुद्धमुर्तीची असक्ती हा बुद्धाचा त्यांच्या धम्माचा आपमान आहे.जो व्यक्ती बुद्ध मुर्तीवर प्रेम करतो ,तो फक्त सिद्धार्थवादी झाला.धम्मवादी नव्हे.म्हणून तुम्हाला श्रीमंतांच्या घरात , हवेल्या बंगल्यांत सुंदर सुंदर बुद्ध मुर्त्या शोपिस म्हणून ठेवलेल्या दिसतील.ही लोकं काय धम्मवादी नव्हते. तुम्हाला सिद्धार्थाचे भक्त पावला पावलावर दिसतील,भेटतील पण  धम्माचे आचरणकर्ते महतप्रयासाने शोधुनही सापडतील की नाही मोठा प्रश्न आहे .
आणि आभूषने तर बुद्धांनी कधीही घतलेली नाहीत.आभूषणे घातलेला सुंदर बुद्ध हा मार आहे.बुद्ध नव्हे. लोक हुशार आहेत बुद्धाला दागदागिने घातले की यांनाही सुखासीन जगायला आभूषणे वापरायला मोकळीक मिळते.जैनांचे नाहीका महावीर त्याग करा म्हनाले.त्यांच्या चेल्यांनी महाविरांच्या मुर्तीला खुप सजवले दागदागिने घातले.म्हणजे जैनांना तसे वागायला मोकळीक.जे महाविर त्याग करा म्हनाले त्यांच्या धर्माचे लोक सर्वात जास्त संपत्तीला चिकटून बसले.भोगी बनले.तुम्हाला हवा तसा महावीर नाही.तुम्हाला हवा तसा बुद्ध नाही.बुद्ध बुद्धच आहेत.

बुद्ध पोर्णीमेच्या , बुद्ध जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! 

नितीन सावंत परभणी 
9970744142
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦

Sunday, 23 May 2021

इस्राइलचे सत्यस्वरुप

इस्राइलचे सत्यस्वरुप

♦♦Why ?? ♦♦

इस्राइल नाव एकले की आपल्याला चांगली शेती करनारा चांगला सज्जन देश आपल्या डोळ्यासमोर राहातो .पण  हे खोटे चित्र आपल्या समोर भाडखाऊ म्हणजे पैसेखाऊ बिकाऊ लोकांनी उभे केले आहे .

आम्ही यहुदी तेवढेच देवाची लेकरे बकी सगळे सैतान. इतरांना जगण्याचा अधिकारच नाही. आशा तत्वज्ञानात जगनारी माणसे म्हणजे ज्यु. ज्यांना यहुदी इस्राइली म्हंतात.भारतीय काही ब्राम्हण स्वताला यहुदीयांशी जोडतात, त्यांचे आणि आमचे रक्त DnA एकच आहे असेही ते सांगातात.असो...

जगात सर्वात क्रूर देश कोनता असेल तर तो इस्राइल आणि जगात सर्वात हिंस्र वंश कोनता असेल तर तो यहुदी म्हणजेच ज्यु वंश होय .

हिटलरने केलेले कृत्य अमानवीयच आहे, परंतु हिटलरच्या बालमनावर असा कोनता परिणाम झाला होता की त्याने एवढे शिरकान केले. एवढे यहुदी मारले . कारण असे की यहुदी वंशद्वेष करत असत. इतरांना कमी लेखत असत .

बरे हिटलर ने केलेल्या नरसंहारानंतर सहानुभूती मिळवलेले ज्यु आर्थात यहुदी पुढे माणुस बनले का ? ते माणुस म्हणून वागू लागले का ?

नाही .

यांनी पुन्हा संघटीत होऊन आरबस्तानातला पॅलेस्टाईन देश बळकावला.तेथिल भुमी ताब्यात घेतली.लोकांच्या गाव वस्त्यांमध्ये आनेक शहारान्मधे बॉंब हल्ले केले . स्वताच्याच देशातले लोक उपरे केले . पत्रके वाटून धमक्या देवून लोकांना देश सोडायला भाग पाडले .. आजही पॅलेस्टिनी लोकांचे लोंढेचे लोंढे आपला देश सोडत आहेत . कहर असा की हे यहुदी लोक लहामुलांच्या भिषन कत्तली कतात .पॅलेस्टिनी बालकांना एकत्र करुन मिसाईलने उडवतात.लहान मुलांना उंचावरुन फेकतात. ऱोज पॅलेस्टिनी भुमीत मिसाइल सोडतात. आता तर पॅलेस्टिनी बालकांना पकडुन जगभर त्यांचे डोळे किडण्या लिव्हर विकण्याचा व्यावसाय इस्राइलचे यहुदी करत आहेत .

बळकावलेल्या जमिनीत करोडो रुपये ओतल्यावर कुनाचीबी शेती चांगलीच उत्पादन देइल त्याचे कौतुक काय ??
ज्या देशाला दहा हजार पुर्वीचा धरनांचा , तळ्यांचा ,सर्वजनिक स्नानग्रहांचा , आदर्शशेतीचा वारसा आहे त्या देशाने इस्राइलचे पाय का चाटावेत .आपली सिंधु संस्कृतीत धान्याची कोठारे सापडलीत म्हणजे लोक जगुन उरेल एवढे धान्य आप पिकवायचो पण गरिबांच्या मुंढ्या मुरगाळुन नव्हे . एवढा सम्रद्ध वारसा आपल्याला असताना आपन  इस्राईली शेतीचे गुणगान का करावे ?? आपला देश एकेकाळी गरिबांच्या बाजुने उभा रहायचा.आज अपला देश इस्राइलचे गोडवे गातो  इस्रा ईली एजंट आपले भरतीय राजकारण्यांना करोडो रुपये देवून विकत घेत आहेत . आपला मेडिया , वृत्तपत्रे रोज इस्राइलचे कौतुक करत आहेत . हे कशासाठी?

लहान मुलांच्या कत्तली करनाऱ्या , लहान मुलांचे शरिराचे अवयव काढुन पैसे कमावून शेती करनाऱ्या इस्राइलचे गुनगान कुनी हैवान , सैतानच करेल माणुस नव्हे . आपन खरच गरिबांची बाजु घेनार नाहीत का ? आपन एवढे मानुसपन गमवलेलो आहोत का ? आपन का समर्थन करावे इस्राइलचे?? why ??

इस्राईलने स्वताची कृत्ये जगाला कळु नये म्हणून चोख बंदोबस्त केले आहेत परंतु काही बातम्या आणि विडिओ मात्र youtube ला आलेच आहेत आपन बघू शकतात  .काही पुस्तकेही मराठीत आहेत...  यावर सविस्तर लिहूच .... तुर्तास एवढेच .

नितीन सावंत
अध्यक्ष
मानवमुक्ती मिशन

Thursday, 20 May 2021

देशाच्या अंतर्गत अनेक देश आणि राष्ट्रे आहेत, ती कोण एकसंघ करणार ?परभणीत

देशाच्या अंतर्गत अनेक देश आणि राष्ट्रे आहेत, ती कोण एकसंघ करणार ?

परभणीत उड्डाणपुलाच्या खालचा रेल्वेगेट ओलांडला  की ४० हजारांची वस्ती लागते.नुसती वस्ती म्हटल्यानंतर पुढचे कथानकच लक्षात येनार नाही तुमच्या.ही वस्ती म्हणजे अनेक कॉलण्या, नगरं पण कुनाची तर बहुतांश शेडुल्ड कास्टची आणि मुस्लिमांची.बोद्ध , मातंग , चर्मकार , मुस्लिम आणि तर गरिब जातींचा हा समिश्र परिसर.या भागात १० पर्यंत छोट्यामोठ्या शैक्षणिक संस्था, शाळा आहेत.आणि १० पेक्षा जास्त क्लासेस वगैरे आहेत.
भीमनगर , क्रांतीनगर,पंचशील नगर , शांतीनिकेतन नगर , प्रसावत नगर , वर्मा कॉलनी , इंदिरा गांधी नगर , विकास नगर , लुंबिनी कॉलनी , मंत्री नगर , बाबर नगर , कृषी नगर , तथागत नगर , अजिजिया नगर या ४० हजारांच्या वस्तीकडे रेल्वेफाटक क्रॉस करुन जाताना दर पंथरा मिनीटाला एक ऱेल्वे जाते.सतत गेट बंद असतो.आजरी माणसे , गरोदर महिला , डोके फुटल्यानंतर भळाभळा रक्त वहानारे पिडीत, विद्यार्थी, लहान मुले, कामावर जानारे कष्टाळू,मजुर लोक फाटक उघडेपर्यंत केविलवाणे उभे रहातात, उच्चजातवर्गीयांच्या व्यवस्थेकडे तोंड करुन.

    परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठात कर्मच्यार्यांची संख्या किती असेल बरे ? तर १० हजाराच्या वर नव्हे. या विद्यापीठात जायला दोन्हीहीकडुन चांगले रस्ते आहेत.तरिही करोडो रुपये खर्च करून या विद्यापीठात जाण्यासाठी उड्डाणपूल होत आहे.हा उड्डाणपूल काळ्या कमानिकडील गेटकडे झाला असता तर असे म्हनता आले असते की हा उड्डाणपूल केवळ कर्मचाऱ्यांच्यासाठी नाही तर सायाळा,लोहगाव मार्गे येणाऱ्या जाणाऱ्या  ग्रामीण लोकांनाही त्याचा फायदा होइल. 

पण तसे नव्हे काम चालु असलेला उड्डाणपुल अक्षदा मंगल कार्यालयाच्या बाजूने केवळ विद्यापीठात ये जा करण्याऱ्या कर्मचाऱ्यांच्यासाठी होत आहे.विद्यार्थी तर विद्यापीठातच हॉस्टेलला रहातात.बाहेरून येणारे ते किती असनार.

    ज्यांची अमूल्य वेळ वाचवण्यासाठी हा हवाईमार्ग होत आहे,त्यांचे अलीकडील काळात शेती संशोधन क्षेत्रात योगदान काय ? प्रचंड पगारी घेनारे हे कर्मचारी शेतकी शेत्रात आलिकडे काय नवीन योगदान देताहेत ? आजूबाजूच्या खेड्यातील शेतकऱ्यांच्या नऊ हजार एक्कर बळकावलेल्या जमिनी आज ९५% पडीक आहेत.सरकारी बाभळी वाढलेले जंगले झालेत या शेतकऱ्यांकडुन बेभाव बळकावलेल्या जमीनीवर.आशा सुस्त वर्गाला हा उड्डाणपुल करुन दिला जात आहे.

   करोडो रुपायांचा चुराडा करुन उच्चभ्रू वर्गासाठी उड्डाणपूल बांधणे चालु आहे.नसता झाला तिथे उड्डाणपुल तर त्या फाटकावर कुनीही गरोदर महिला , आजरी बालके , रक्त वहानारे पिडीत, कामावर जानारे मजुर उभे रहानारे नव्हते.
पुलाची गरज कुठे होती ? साकळा प्लॉट परिसर आणि  भीम नगर , मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरच्या परिसरात.

इकडे का होत नाहीत उड्डाणपूल ? गरज जास्त कोण्या भागात आहे ? 

भारतीय उच्चजातवर्गीय व्यवस्था आजही शेडुल्ड कास्ट , मुस्लिम,माजी अस्पृश्य जातींना अदखलपात्र मानते.कृतीतून तसे दाखवून देते की तुम्ही आमच्यासाठी किड्यामुंग्याप्रमाणे आहात.
येथे उड्डाणपूल , भव्य रस्ते हे उच्चजातवर्गीयांसाठी बनतात.ब्राम्हणी भांडवली व्यवस्थेचे जे वाहक आहेत आश्यांच्यासाठी तात्काळ सेवा सुविधा असतात.तुम्हाला सेवा सुविधा द्याव्यात तर पुन्हा तुमच्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर तयार झाले तर आवघड होइल या ब्राम्हणी व्यवस्थेच्या वहाकांसाठी ,म्हणून आशा वस्त्यांमध्ये जाणीवपूर्वक प्राथमिक आणि अत्यंत महत्वाच्या सेवासुविधा दिल्या जात नाहीत.
आणि काही चोंगे म्हणतात आता कुठ राहिलाय जातीवाद.
 

नितीन सावंत परभणी 
9970744142.
दिनांक 21 मे 2021

Tuesday, 11 May 2021

♦️ जातीव्यवस्थेच्या आकलनाप्रत डाव्यांच्या भूमिका आणि वास्तव.

 ♦️ जातीव्यवस्थेच्या आकलनाप्रत डाव्यांच्या भूमिका आणि वास्तव.

                      नितीन सावंत परभणी -             9970744142 
                      (सौत्रांतिक मार्क्सवादी अभ्यासक )


      " वर्णअभिमानाने कोण झाले पावन l
       ऐसे द्या सांगोन मजपाशी ll
       अत्यंजादि योनी तरल्या हरिभजने l
       तयाची पुराणे भाट झाली ll "१ 
              - संत तुकोबाराय 

( वर्णजात या प्रधान समस्येचे आध्यात्मिक मुक्तीमार्गाने संत तुकोबारायांनी केलेले निराकरण ) 

       त्रिपुरा नंतर पश्चिम बंगालची सत्ता सुद्धा डाव्यांच्या हातून पूर्णपणे निसटली आहे.पुन्हा पुर्वीचे दिवस भारतीय डाव्यांना येइपर्यंत क्युबा प्रमाणे छोट्याशा केरळाच्या सत्तेवर भारतीय  कम्युनिस्टांना समाधानी रहावे लागनार आहे.

    कोणत्या कारणाने प्रधानमंत्री पदापर्यंत मार्गक्रमण करणारे डावे इतक्या वेगाने #पिछाडीवर आलेत ? 

      सांस्कृतिक राजकारणाच्या बाबतीत मौन बाळगणे , आस्मिता आणि प्रतिकांच्या लढाईला प्रतिगामी छावणीत लोटणे , सर्वहारांच्या बोलीभाषेत साहित्य निर्मिती न करणे, त्याभाषेमध्ये मार्क्सवाद न नेता आल्याने, डावे पिछाडीवर गेले आहेत. डाव्यांची वाताहत होण्याची यापेक्षा आनखी वेगवेगळी कारणेही आहेत.

     यातले सर्वात महत्वाचे कारण जो मुख्य चर्चेचा भाग आहे , ते म्हणजे जातीअंताच्या लढाईत प्रधान भूमिका न घेता जातीव्यवस्थेला दुय्यम मानने आहे. ऊर्ध्ववास्तू किंवा इमला मानने आहे. 

    "भारतीय कम्युनिस्ट नेत्यांनी व मार्क्सवादी पंडितांनी वासाहतिकपुर्व #वर्णजातीव्यवस्थेला ऊर्ध्ववास्तू मानायचा दुराग्रह आजूनही चालु ठेवला आहे."२ 
भारतात गणव्यवस्थेत आधी वर्णव्यवस्था आणि नंतर सामंतशाहीत जातीव्यवस्था निर्माण झाल्याने येथे वर्ग बनण्याची प्रक्रिया इंग्रजांच्या आगमणाने सुरु झाली.त्या आधी भारतात वर्ग नव्हते.ही मांडणी बहुतांश डाव्यांना मान्य नाही.भौतिक , वास्तविक असणाऱ्या जातीव्यवस्थेला डाव्यांनी ऊर्ध्ववास्तूत टाकून अभौतिक , अवास्तविक वर्ग मात्र वासाहतिक काळापूर्वी आणि आत्ताही पाया बनवला आहे. याबद्दल कॉ शरद पाटील म्हणतात,
 " जातीला आजूनही कोणत्याही प्रकारची भौतिकता द्यायला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तयार नाहीत.त्यांच्या दृष्टीने केवळ वर्गच सत्य व भौतिक आहे.तर जात भारतीय जनतेच्या केवळ मनात अस्तित्वात आहे. मार्क्सवादी तत्वज्ञानाच्या 'प्रतिबिंबवादी प्रमाणशास्त्रा'नुसार मानसिक प्रतिमा वा विचार बाहेर व स्वतंत्रपणे अस्तित्वात असलेल्या भौतिक वास्तवाचे प्रतिबिंब असतात.मग मनाबाहेर कधीही भौतिक अस्तित्व नसलेली जात भारतीय मनांमधे हजारो वर्षापासून आस्तित्वात आहे हे कसे ? "३
या महत्वपूर्ण प्रश्नाला अनुल्लेखाने मारणे, डाव्यांनी सोयिस्कर समजले आहे.

" उत्पादन प्रक्रियेत एकाच प्रकारे  काम करणाऱ्या, आर्थिक आणि हितसंबध सारखे असणाऱ्या माणसांचा समूह म्हणजे वर्ग"४
 ही शिव वर्मा यांची वर्गाची व्याख्या आहे.परंतु केवळ अर्थव्यवस्थेत संबंधांचे एक स्थान असल्याने एक वर्ग ठरु शकत नाही.तर जेव्हा ते सामूहिकपणे समाजजीवनात उतरतात तेव्हा पुर्णार्थाने तो वर्ग ठरतो. 

     भारतीय समाजव्यस्थेकडे केवळ वर्गीय दृष्टीकोणातून पहाणाऱ्या कर्मठ डाव्यांनी ही व्याख्या वासाहतिक काळाच्या आगोदर  आणि वासाहतिक काळाच्या नंतरच्या भारतीय समाजव्यवस्थेला लावून जातीग्रस्त समाजात वर्ग कसे आहेत ते सिद्ध करावे.

रोग हाल्याला आणि इंजेक्शन पकालीला हे किती दिवस चालवनार ? इग्रजांच्या आगमनापूर्वी भारतीय संघर्ष वर्णजातींचा तर इंग्रजांच्या आगमनानंतर हा संघर्ष जातवर्गीय असा बनला आहे. 

   कुठल्याही समाजाचा आर्थोत्पादनाचा चौथरा जाणून घेतल्यानंतर त्यातील सामाजिक, राजकीय , धार्मिक , दार्शनिक , सांस्कृतिक इत्यादींनी बनलेल्या ऊर्ध्ववास्तूचे सम्यक आकलन होइल , हे मार्क्सच्या तत्वज्ञानाचे सारसर्वस्व आहे. या आर्थिक चौथऱ्याच्या आधारे जेव्हा भारतीय समाजव्यवस्थेच्या  वासाहतिकपुर्व कालखंडाकडे नजर टाकल्यास  सामाजिक संबंध जन्मावर ठरत असल्याचे निदर्शनास येते.

     मनुस्मृती ब्राम्हणेतरांना धनसंचय करु देत नाही.तसे केल्यास ते धन यज्ञासाठी थेट लूटुन,लुबाडुन आणावे अशी ताकीद देते.शुद्राने धनसंचय केल्यास ब्राम्हणांना बाधा निर्माण होते आशा प्रकारचा श्लोक मनुस्मृतीत आहे.अनेक राजे महाराजांच्या राज्यतही दोन बैलजोड्यापेंक्षा जास्त बैल बाळगण्याची बंदी होती. म्हणजे काय तर " वासाहतिकपूर्व जातीव्यवस्थाक समाजात शेतकरी ते शेतमजूर शुद्रजातीजमाती कायद्यानेच धनहिन होत्या.म्हणून त्यात आर्थिक भेद असु शकत नव्हते."५  
   म्हणजे काय तर भारतीय सामंतशाहीत शुद्रातिशुद्र जातीजमातींना आपला आर्थिक चौथरा कधीही बदलता येत नसे.माजी अस्पृश्य जाती तर शिजवलेल्या अन्नालाही मौताद होत्या.वर्ग हा जन्मसिद्ध नसतो.भारतात आलेली गरिबी , झालेले शोषण पिडन हे जन्मसिद्ध म्हणजे जातवार असल्यामुळे त्या जातींना कधीही आपला आर्थिक चौथरा बदलता आलेला नाही.म्हणजे वर्ग बदलता आलेला नाही.

      जातीलाच जर वर्ग मानायचे झाल्यास त्यासाठी समान हितसंबंध असावे लागतील पण तसे कुठल्याच जातीत हितसंबंध समान नाहीत.वर्ग बनण्यासाठी जातीअंतर्गत सुद्धा समानता नाही.तिथे क्रमिक असमानता आहे.जातीअंतर्गतही जन्मावर आधारलेले शोषण , शासनाचे स्तर आहेत. 

    ब्राम्हणांच्यापासून माजी अस्पृश्य जातीतील भंगी , मातंग, चर्मकार किंवा  महार यांच्यातही पोटजातींची इतकी क्रमिक असमानता आहे की तिथे समान हितसंबध कधीच निर्माण होऊ शकलेले नाहीत.आणि त्यांना एका पोट जातीतून दुसऱ्या वरच्या पोटजातीत आर्थिक निकषावर जाता आलेले नाही. 

  जातीअंतर्गत व्यवहार आणि संबंध हे काही आर्थिक चौथऱ्यावर नसतात. तिथे जन्मावर आधारित सामाजिक नियमावलीचे मापदंड हे हितसंबध निश्चित करतात.

    जसे गावगाड्यात एखाद्या जातीतील अलीकडे श्रीमंत बनलेल्या शेतकरी कुटुंबाकडे होळीचा , पोळ्याचा किंवा गावची यात्रा सुरु करण्याचा किंवा असे मुख्य मानपान त्याच्याकडे दिले जात नाहीत तर पूर्वापार चालेला मान भलेही ते कुटुंब गरिब असो त्याच्याकडे असतो.

     गावगाड्यात आर्थिक चौथऱ्यावर वरचढ बनलेला सजातीय देखील गरिब मुकादम , गरिब पाटील , गरिब देशमुख , गरिब कुलकर्णी यांच्यापुढे  आजूनही हिनदिन दुय्यमच असतो.बऱ्याच गावात बाहेरून येवून राहिलेल्या कुटुंबाला उपरे , उतरकरु , गुढेकरु , हलके मानले जाते.ते कुटुंब श्रीमंत बनले तरी त्यांना गावात मानसन्मान नसतो.

   सर्वात मोठे उदाहरण द्यायचे झाल्यास , ज्यांच्या घरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद दोनवेळा होते,असे अशोकराव चव्हाण लोकसभा निवडणूकीत पाडले जाण्याच्या अनेक कारणांत ते जातीव्यवस्थेत मुख्य जातीतही हलके माणणे हे होते. जातीतल्या क्रमिक असमानतेचा फटका आजघडीला एका नामांकित माजी मुख्यमंत्र्याला बसतो तर संपूर्ण जात वर्ग कशी मानता येइल ? 

     अमीर खान यांनी सत्यमेव जयतेच्या मालिकेत अस्पृश्यता या विषयावर एक भाग चर्चेला घेतला होता.त्यात एक चर्मकार व्यक्ती कलेक्टर बनली तरी त्या व्यक्तिला लोक " साला चमार बैठा है अंदर " म्हनत असत.ती कलेक्टर व्यक्ती म्हनते " ही नोकरी केवळ माझ्या रोजीरोटीचे साधन होती आत्मसन्मान आणि प्रतिष्ठेचे साधन बनु शकली नाही. म्हणून मी राजीनामा दिला " याच सिरिअल मधे कौसर नावाची संस्कृतची प्राध्यापिका केवळ अस्पृश्य जातीतून आल्यामुळे तिला सतत घर बदलावे लागते , घर मालक  तिच्या आईला साफ सफाई करायला लावतात.

     प्रश्न आहे आर्थिक चौथरा बदलला की सामाजिक दर्जा सुधारतो का ? उत्तर आहे नाही. वर्ग बदलला की जातीव्यवस्था अस्पृश्यता आपोआप जाते का , संपते का ?  नष्ट होते का?  उत्तर आहे नाही

मग वर्ग भौतिक आणि जात म्हणजे माया हा हेका कशासाठी ?

    म्हणून "ब्रिटिशपुर्व , भारतीय समाजात अदृष्ठ वा अदृश्य वर्गाचे अस्तित्व सिद्ध करायचा प्रयत्न हा भौतिकवादविरोधी असून अध्यात्मवादी इंद्रियातीत प्रमाणशास्त्राला शरण जाणारा आहे"६
 
   स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेने जात भौतिक आणि वास्तव मानून आरक्षणाची तरतुद केलेली आहे." डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अखिल भारतीय जी.आय.पी.रेल्वे अस्पृश्य कामगार परिषद , मनमाड येथे दिनांक १३/२ / १९३८ ला जे भाषण दिले त्यात त्यांनी ब्राम्हणशाही आणि भांडवलशाही हे कष्टकर्यांचे दोन शत्रू असल्याचे म्हटले आहे.त्यासाठी त्यांनी रेल्वेतील अस्पृश्य कामगार आयुष्यभर ग्यांगमन म्हणूनच कसा काम करतो ,तो अस्पृश्य असल्यामुळे त्याचे कधीच वरच्या पोस्टवर प्रमोशन किंवा नियुक्ती होत नाही, हे उदाहरण त्यांनी आपल्या भाषणात दिले आहे."७
 
     वर्गव्यवस्थेत व्यवसाय जन्मावर आधारित नसतात.जातीव्यवस्थेत मात्र व्यवसाय जन्मावर आधारित आहेत .ही नियमावली मोडणाऱ्याला कठोर शिक्षा केली जात असे. शिवाय हे नियम नियंत्रीत करायला जातपंचायती सतत कार्यरत असत.वर्गव्यवस्थेत जातपंचायती नसतात.

     म्हणून जात हा वर्ग होऊ शकत नाही.भारतीय डावे ज्याप्रमाणे वर्गलढ्यांत सर्वस्व पणाला लावतात त्याप्रमाणे ते जाती लढ्यांत हात राखून सहभाग नोंदवतात,हे नेहमीचे चित्र आजही बदललेले नाही.आलिकडे शेतकरी जातींमधे जातींची अस्मिता इतकी प्रबळ बनत गेल्याने ते शेतकरी न रहाता जातीग्रस्त बनले आहेत.याकडे डोळेझाक केल्याने ब्राम्हणी छावणी वरचेवर मजबूत बनत गेलेली आहे. 
   आज घडीला " वरचढ शेतकरी जातींचे राज्याराज्यातले उच्चभ्रू हे भांडवलदार - जमीनदार जातवर्गाबरोबर शासक बनले.भारतीय लोकशाही क्रांतीची व्यूहरचना केवळ वर्गीय वा केवळ जातीय रहाण्याऐवजी जातवर्गीय बनने अपरिहार्य झाले"८

    म्हणून यापुढील लढे जातवर्गीय होतील यात वाद नाही.परंतू डाव्यांनी जातीअंताची भूमिका अजेंड्यावर घेतल्याशिवाय, हे लढे त्वरित उभे केल्याशिवाय चालू असलेली वाताहत थांबनार नाही.ब्राम्हणी छावणी हिंदू नावे जी एकजूट करतात ती एकजूट दलीत आदिवासी आणि भटक्याविमुक्तांच्या विरोधात असते.

   ग्रामीण भागातील एका समान प्लॅटफाॅर्मवर लढले गेलेले शेतकरी 'वर्गाचे' लढे, गावामध्ये गेल्यानंतर जातीमध्येच व्यवहार करतात.  

शहराच्या कामगार 'वर्गाचे' लढे कामगार काॅलनीतच गेल्यानंतर जातीमध्ये रोटीबेटीव्यवहार करतात.

जात-वर्ग चरित्र असणाऱ्या मध्यमवर्गीय समाजात हाऊसिंग सोसायटीज, बेटीव्यवहार, शिफारस, जातीनिहायच असते.

यामुळे जातीव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा पुन्हा ऐरणीवर येतो.याकडे डोळेझाक करुन कसे चालेल.
*******************************
संदर्भ :
१. देहुगाथा अभंग क्र.४२७६ 
२ . मार्क्सवाद: फुलेआंबेडकरवाद - कॉ शरद पाटील द्वितीय आवृत्ती पान क्र. १९
३. उक्त पा.क्र. १८४. 
४.मार्क्सवाद परिचयमाला - शिववर्मा ,जनशक्ती प्रकाशन, पान क्र.२८
५.शरद पाटील उक्त पान क्र १८. 
६.उक्त पा.क्र.२६८.
७.कष्टकर्यांचे सनातन शत्रू ब्राम्हणशाही आणि भांडवलशाही - डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची दोन भाषणे : लोकवाङ्मयग्रह डिसेंबर २०१५ 
८.कॉ.शरद पाटील उक्त २५९ 
****************************
नितीन सावंत परभणी - 9970744142
( सौत्रांतिक मार्क्सवादी )

Friday, 7 May 2021

नेतृत्वहीन सर्वहारांच्या चळवळी...

 नेतृत्वहीन सर्वहारांच्या चळवळी...

भांडवलशाहीतला संपूर्ण व्यवहार नफ्या तोट्याचा विचार करुन असतो.जनता , समाज, माणसे  भांडवलशाहीत फक्त आणि फक्त ग्रहाक म्हणून पाहिले जातात.आपला माल खपवण्यासाठी इझीली उपलब्ध होनारा समुदाय त्यांना सतत हवा असतो.साम्राज्यशाहीत तर संपूर्ण देशच्या देशच उध्वस्त केले जातात.भांडवलशाहीत,साम्राज्यशाहीत माणुसकी,मुलाहिजा वगैरे नसतो. सामंतशाहीत एखाद्या राजाला दयामाया तरी यायची त्यातून एखादी व्यक्ती , एखादे गाव किंवा राज्य मोठ्या हानीतून वाचत असे.
परंतू या भांडवलशाहीत नैतिक मुल्यांना बाजारु स्वरुप आल्यामुळे ती नैतिक अनैतिकता येथे रद्दबातल असते.

आत्ता भारताचा विचार करायचा झालाच तर येथे शेतकरी जाती , माजी अस्पृश्य जाती , भटके विमुक्त जाती , आदिवासी जमाती हे सर्वजन संकटात सापडले आहेत.प्रचंड वेगाने जंगले , डोंगर , नद्या , जलाशये बळकावल्यामुळे आदिवासी , भटक्या विमुक्तांचे अत्यंत हाल होताना आपण पहात आहोत की नाही ? ह्या जाती संकटात नाहीत का ? 

त्यानंतर माजी अस्पृश्य जातींचे शोषण पिडन आजुन थांबले आहे का ? गावगाड्यात भौतिक सेवा सुविधा आणि सामाजिक दर्जा सुधारल्याचे खात्रीपूर्वक चित्र आजुन दिसते आहे का ? अस्पृश्यता पूर्णपणे संपली का ? नाही ना.येथेही आजूनही शोषण पिडन तसेच चालु आहे.

अगदी याच धर्तीवर शेतकरी जातीही अत्यंत संकटात सापडल्या आहेत. आरक्षण असनार्या शेतकरी जाती आणि आरक्षण नसनारी मराठा ही शेतकरी जात सुद्धा आर्थिक सार्वहरा वर्गचौकटीत समान शोषन पिडन घेवून वावरत आहे.भांडवलशाहीच्या जगात भुमीहीन , अल्पभूधारक, शेतमजूर हा सर्वहरा समूह काय मराठेत्तरांचाच आहे का ? किंवा विशिष्ट जातींचाच आहे का ? 

आशा वेळेला समान दुख आणि शोषण पिडन घेवून वावरणाऱ्या आर्थिक सर्वहरा आणि सामाजिक सर्वहरा जातींची क्रांतीदोस्ती करण्याची हीच वेळ असताना संकटात सापडलेल्या , मुक्तीदाता शोधणाऱ्या सर्वहारा जातींना तुमचे तुम्ही बघा , आम्हाला काय घेनेका देने म्हनने म्हणजे संबंध देशाच्या तुटत चाललेल्या एकसंघपणाला स्वताहून हातभार लावणे होय. संबंध देशात आराजकता , आंधाधूंदी माजवण्यासाठी आपण होऊन त्यात तेल ओतने होय.

जागोजागी, गावोगावी, सर्वहरांचे समूह वाट पहात आहेत मुक्तीदात्यांची , कुशल नेतृत्व करणाऱ्या लिडरची.आणि नेतृत्वाच्या बाबतीत मात्र  सर्वच चळवळीत अपयशी ठरलेल्या आहेत.मोठ्या समुहाचे नेतृत्व करण्यासाठी आजूनही मोठ्याप्रमाणावर नेतृत्व गुण विकसत झालेला लिडर वर्ग पुढाकार घेताना दिसत नाही.जातींच्या डबक्यातील नेतृत्व इतरांशी जवळीक न करु शकल्याने संकटाच्या वेळी कुनीच दोस्त नसल्यामुळे निमभांडवली निमसरंजामी व्यवस्थेचे नियंते जागोजागी एकांगी समुहाला ठोकून हतबल करताना आपण पहात आहोत. 
सर्वांचे नेतृत्व करायला , सर्वांशी क्रांतीदोस्ती करायला पुढे यारे बुद्धीजीवी आणि नेतृत्व करु इच्छिनार्यांन्नो ..

नितीन सावंत परभणी 
9970744142 
*********************************************
सर्वांचे व्यापक नेतृत्व करणारा राजा , माजी अस्पृश्य जातीत नेतृत्व तयार झाल्यानंतर तुम्हाला तुमचा नेता मिळाला आहे असे सांगून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पुढील नेतृत्व सुपूर्द करनारा लाडका शाहुराजा ..

Sunday, 2 May 2021

महाराष्ट्राची जडणघडण - कारागिरांचे योगदान..

महाराष्ट्राची जडणघडण - कारागिरांचे योगदान.

भारतीय इतिहासात वंशसमाजातून जातीसमाजाकडे झालेले स्थित्यंतर इतके वेगाने किंवा कमी काळात सहजासहजी झालेले नाही. 
भारतीय शोषण शासनाच्या संस्था वेळोवेळी वेगवेगळ्या स्वरूपात आपल्या इतिहासात दिसून येतील.
  इंग्रजांच्या आगमणाने भारतात वर्गव्यवस्था आली,त्याआधी भारतात जातीव्यवस्था आणि तिच्याही आधी वर्णव्यवस्था कार्यरत होती. 
वर्णव्यस्थेची स्थित्यंतरे द्विवर्णव्यवस्था ( क्षत्रिय - ब्रम्हण ), त्रैवर्णव्यवस्था ( क्षत्रिय , ब्राह्मण आणि दास ),चातुर्वर्ण्य व्यवस्था ( ब्राम्हण क्षत्रिय वैश्य शुद्र ) अशी झालेली आहेत.
यातही ही वर्णव्यवस्था विविध प्रकारच्या संघगणात वेगळे रुप धारण करुन कार्यरत होती.
बुद्धपुर्व कालखंडात समाजव्यवस्थेतीची झालेली स्थित्यंतरे कॉ शरद पाटील पुढीलप्रमाणे देतात.
१) शोषणविरहीत समाज व स्त्रीसत्ताक गणराज्ये - द्वैवर्णीक समाजव्यवस्थेला जन्म देतात.
२)दासप्रथाक मात्रवंशक राजर्षीशासित गणराज्यांत त्रैवर्ण्यव्यवस्था आणि शोषणव्यवस्था उदयाला येते. कार्यरत होते.
३)दासप्रथाक पितृवंशक राजर्षीशासित गणराज्ये चातुर्वर्ण्य व्यवस्था जन्माला घालतात.
४)दासप्रथाक अराजक संघगण व बुद्धकाळात जातीव्यवस्था उदयाला येते.

म्हणून वंशसमाज - वर्णसमाज - जातीसमाज आणि आज जातवर्गीय समाज हे ढोळमानाने केलेले सोपे वर्गीकरण.

  बुद्धोत्तर कालखंडात, इसवीसनाच्या ५ शतकापर्यंत जातीव्यवस्थेत रूपांतरीत होणारे विविध प्रवाही समूह देशाची उत्पादन वाढ करत होते.
ज्यामध्ये गण , पाषांड , पुग , व्रात व श्रेणी होत.
गण हे सुतारांचे वा ब्राम्हणांचे समूह होत.
पाषांडी हे अब्राम्हणी परंपरेच्या बोद्ध व जैनांचे समुह होते.
पुग हे विविध जातींचे विविध व्यवसाय करणारे मात्र एकाच ठिकाणी रहाणारे समुह होते.
पुग मुख्यतः व्यापाऱ्यांचे होते. तर श्रेणी मुख्य कारागिरांच्या होत्या.
पक्क्या मालाचे उत्पादन कारागिरांच्या श्रेणी करत तर त्या मालाचे क्रयविक्रय व्यापाऱ्यांचे पुग करत.

भारतातील अत्यंत महत्वाच्या वास्तू , शिल्पे , मंदिरे , विहारे , लेण्या , शिलालेख , स्तुप , स्तंभ , हे श्रेणी व पुगांच्या दानधर्मातून किंवा पुढाकाराने बनलेले आहेत.
ह्या पुग समूह इतके श्रीमंत असत की त्या छोट्या राजांना , सामंतांना कर्ज देत असत.आडचणीला पैशांची मदत करत असत.

महाराष्ट्रातील जडणघडणीत अनेक श्रेणी गावगाड्यात उतरल्याचे आजही पुरावे उपलब्ध आहेत.
घिसाडी ( गाडी लोहार ) यांच्या श्रेणी राजर्षी शाहु महाराजांच्या काळापर्यंत महाराष्ट्रात उतरत होत्या.नंतर त्यांच्यातील एक एककारागीर कुटुंब गावगाड्यात शेतीच्या कामासाठी आवजारे बनवून देण्यासाठी दाखल होत असे.शेतकरी लोक यांच्या आगमनाची अतुरतेने वाट पहात असत.विळे,कोयते , खुरपे , खोरे , टिकास , फावडे , गाडीचे लोखंडी चाक , शिवळा , दाराच्या कड्या , इत्यादीं वस्तू हे घिसाडी बनवत असत. 
घिसाड्यांच्या ( गाडी लोहारांच्या )  आगमनानेच शेतीच्या कामाची सुरुवात व्हायची.

हेच आमचे गावड्याचे कामगार , यांनी महाराष्ट्र फुलवला , पिकवला , बहरवला ,आकार दिला. त्याबद्दल त्यांना गावगाड्यात काय मिळाले ? 
त्यांना गावगाड्यात मानसन्मान तरी मिळाला का ? 
कधी स्वागत केले का ग्रामपंचायतीने ? या कामगारांना गावात हक्काची जागा दिलीय का ? आगीसमोर तप्त लोखंडाला आकार देण्यात उगड्यावर पिढ्यानपिढ्या खर्ची पडल्या . 
हल्ली लॉकडाऊनच्या काळात आनेक गावांत घिसडी कुटुंबाला गावात प्रवेश दिलेला नाही.
त्यांना एखाद्या ठिकाणी  राशन मिळालेच  तर चक्कीवर दाळु सुद्धा दिले नाही.ह्या कारागीर कामगारांची आजही दैना चालु आहे.बेइमान समाज गरज संपल्यानंतर त्यांना गावातही घेत नाही.सर्वाधिक भक्ती चळवळींचा वारसा असनारे राज्य आहे म्हने हे.

#महाराष्ट्रदिन 
#कामगारदिन 
#घिसाडी 
 
नितीन सावंत परभणी
9970744142
१ मे २०२१