Monday, 19 September 2022

♦️श्रमाची कदर नसलेला देश

 ♦️श्रमाची कदर नसलेला देश

           नुकताच आम्ही पुर्णा तालुक्यातील सातेफळच्या कुंभार वस्तीला भेट दिली.सोबत होते महाराष्ट्र सरकारच्या मानव विकासचे आयुक्त मा.नितीन पाटील आणि त्यांचे इतर आधिकारी.विकासाच्या प्रक्रियेत न आलेल्या गरिब जाती जमातींसाठी काम करणारे हे आधिकारी कुंभार वस्तीत कुंभारकाम बघत होते.कुंभारकाम करणाऱ्या सर्व व्यावसाईकांना कशाप्रकारे मदत करता येइल जेणेकरून त्यांच्या व्यावसायात वृद्धी बरोबर नफाही जास्त कमावता येइल यासाठी सर्व आधिकारी आधिक माहिती देत होते.त्यांच्याकडील काही महत्वपूर्ण योजनाही सांगत होते.तशी चर्चाही करत होते.
                    मी अंगणात बसलेल्या एक दोन वृद्धांसोबत चर्चा करायला सुरुवात केली.बाजुला काही मडके वाळवत घातलेले होते.नवरात्रोत्सव जवळ आल्याने घटस्थापनेसाठी लागणारे ते छोटे आकाराचे गाडगे बनवले होते. मी म्हनालो " कितीला एक जाते हे मडके "
        वृद्ध आज्जोबा म्हनाले ' पाच रुपायाला एक " मी आवाक झालो फक्त पाच रुपये किंमत.हल्ली काय येतेय हो पाच रुपायाला ? "
         मी परत प्रश्न केला " यासाठी वेळ किती जातो , एक मडके बनवायला ? "
         ते म्हनाले " माती भिजवने , मुरवने , चिखल घट्ट करणे ही चार पाच दिवसाची मोठी प्रक्रिया आहे. " एक गाडग्याच्या चिखलाला आकार द्यायला विचारत असाल तर आर्धा तास जातो."
   आर्ध्या तासाच्या श्रमाचे फक्त पाच रुपये ??
ते म्हनाले " तिनशे मडके बमवायला सहा दिवस गेलेत.म्हणजे एका दिवसात ५० मडके बनवलीत.एक पाच रुपाला विकले जाते याप्रमाणे आम्हाला २५० रुपये रोज पडतो. "

मी म्हनालो " ही तर घोर निंदा आहे तुमच्या श्रमाची आणि कलेची." ते म्हनाले " साहेब या वंशाला घातलेय म्हणून करावे लागते बघा. नाहीतर कुनाला हौस आहे चिखल तुडवायची. आम्हाला पर्याय आहे का दुसरा काही , नाही ना . म्हणून हे सर्व . लोक भाव पाडून मागत्यात, उलटे रेटुन बोलतात . बरोबर वागणूक देत नाहीत. आमचे आम्हालाच माहिती आम्ही कसे जगतो ते. "

                     मी सिरिअस होतो आहे , हे लक्षात आल्यानंतर त्यांनी दुखातूनही हस्याची कमाई केलेली कला दाखवली.एक म्हातारा दुसऱ्या म्हाताऱ्याला म्हणाला " चोरी केली असती.पण आम्हाला करता येत नाही.आणि मार खाण्याजोगी तब्यतही नाही"
आम्ही सगळेचजन असलो.
तेवढ्या आपार मेहनतीतूनही ही मानसे आनंदी, सुखी रहातात.एकोप्याने रहातात.हसतात.दुख पोटात दाबुन ठेवतात.हजारो वर्षापासून अन्न खायला भांडी बनवून देनारा कुंभार आज व्यावसायाच्या रुपाने शेवटच्या घटका मोजत आहे.पाच रुपायासाठी तो चिखलाने हात भरवतो .तरी तो आनंदी रहातो. आणि इकडे नोकरदार वर्गाचा दोन महिने पगार नाही झाला तर बिपी वाढतो.

नितीन सावंत परभणी
9970744142
दिनांक २० सप्टेंबर २०२२ 

हस्तश्रमाने काम करणार्यांचे मोल करा

 "ताई कितीला दिला हा फडा?"
" भाऊ हा ५० आणि हा ६० रुपायाला"
त्यांनी उत्तर दिल्यानंतर मी परत प्रश्न केला 
"दोन्ही तर सारखेच दिसताहेत फरक काय ?" 
" भाऊ पानोळ्या,वजन सारखेच आहे फरक फक्त बांधण्यात असतो.दोरी गच्च कमी अधीक होते भाऊ म्हणून" 

मी दोनही फडे हातात घेवून बघत होतो.अगदी दोनही बाजूने.
त्या मायमाऊलीचे हृदय खालीवर होत होते.एखाद्याने मोठ्या श्रमाने हताला घाव सहन करुन एखादी सुंदर कलाकृती बनवावी आणि माझ्या सारख्याने क्षणात तिच्या उनीवा काढुन नावे ठेवून निघून जावे काय वाटत असेल त्या पोटासाठी रस्त्याच्या कडेला बसलेल्या जीवाला. 
 
रस्त्यावर संपूर्ण अंधार झालेला आहे. आणि तिला एवढा माल खपवून घरी जायचेय.फक्त दोनच फडे उरलेले आहेत.आणि ते ही मी बघत आहे. 

" भाऊ दहाविस कमी द्या,एवढे काय पहायले" 
"अहो ताई मी किंमत कमी करनार नाही " 

त्या रखुमाईला वाटले, मी किंमत करनार नाही म्हणजे आता मी निघून जातो का काय की.शेवटचा उरला सुरला माल असल्याने कदाचित मी घेनार नाही असा तिचा समज. 

परत ती म्हणाली "भाऊ मया स्वता हताने बनवलेले फडे हाइत.एक भी खराब नाही." 

"अहो मी त्या फड्याच्या पानोळ्या नाही बघत.त्या झिजूनच जानार आहेत ना.मी बघत आहे मुठ मजबूत असावी."
 "भाऊ मी स्वता बळ लाऊन आवळल्यात मुठी.. " 

" भाऊ कोनता घेता मग ? " 
"ताई दोनीबी" 
तिच्या चेहऱ्यावर हस्य उमलले. 
"हे घ्या एकशे दहा रुपये"  
भाव न करता फडे घेवून मी माझ्या घरी निघालो आणि ती तिचा पसारा आवरायला लागली .. घरी जाण्यासाठी ..

मी विचार करत होतो. कुठल्यातरी डोंगराळ भागातुन डोक्यावर भारे आना.मग त्या पानांचे बारिक बारिक पाते कट करा. त्याला एका गोलाकार पध्दतीने विना.ते कितीतरी वेळा हताला टोचते.नखात टोचल्यावर जिभाळी लागते.कुठेच जीव लागत नाही इतकी आग होते.तळहावर ते सर्व विनायचे.मग मुठीला घट्टपणे दोरी बांधायची.यावेळी स्त्रीयांना सर्व जीव एकवटून ती मुठ बांधावी लागते. त्या मुठेला नायलॉनची दोरी.मुठ ढिली असेल तर गिर्हाइक निघून जाते. 
एवढ्या बेजारीतुन त्या फड्याची किंमत किती तर 
पंन्नाससाठ रुपये.. 
आन यांच्या मॉल मधला झाडु कितीला तर एकशे दहा पासुन बोली ... 

एका दिवाळीत भाव न कमी करता तुम्ही सुद्धा एखाद्याच्या श्रमाचे मुल्य करु शकतात ... 

फार सोपी कृती आहे. करुन बघा. 
थेट शेतात पिकवलेले माळवं भाजीपाला घेवून आलेले शेतकरी पहाटेच रोडच्या कडेला बसतात.भाव न करता घ्या बर .. काय बिघडत नाय.. 

उन्हाळ्यात गरिबांचा फ्रिज घेवून बसलेले कुंभार... हंडा घेताना भाव कमी करु नका,  काय बिघडत नाय .. 

लोहाराकडुन विळा, कुऱ्हाड शेवटुन घेताना .. कुलपाची नवी चावी बनवुन घेताना भाव कमी करु नका काय बिघडत नाही ..

भाव कमी करायचा प्रयत्न मॉल मधे करुन बघा बरे .. 

दोन रु सुट्टे नाहीत म्हणून चॉकलेट का घेतो आपन .. त्याला ते दोन रुपयेच दे म्हनावे .. वाटलेच तर घेतलेले सामान वापस करा ..
दुसरीकडे घ्या ..
पन हस्तश्रमाने राबनार्यांच्या श्रमाचे मोल करा ..

नितीन सावंत परभणी 
9970744142