Monday, 12 October 2020

बुद्धीजीवी : ब्राम्हणी, अब्राम्हणी

बुद्धीजीवी :  ब्राम्हणी, अब्राम्हणी
 
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात लिखानाचे,अभिव्यक्तीचे निर्बंध उठले आणि सर्वांसाठी लेखण्या अधिकृत खुल्या झाल्या.सर्वहरांच्या मुक्तीच्या तत्वज्ञानाची निर्मिती प्रक्रिया मोठ्याप्रमाणावर सुरु झाली. नवनवीन लेखक,साहित्तिक उदयाला आले.पण त्यात काही बोटावर मोजता येतील दिग्गज विचारवंत, लेखक,साहित्तिक सोडता बाकीच्यांनी आत्मसन्मानाच्या महारोगात आपली हयात घालवली आणि सर्वहरांच्या साहित्यिक संस्कृतीचा सत्यानाश केला.
एकांगी लिहीले गेलेल्या ब्राम्हणी इतिहासाला विधायक नकार देत अब्राम्हणी परंपरेतील इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचे काम सर्वहरांच्या बुद्धीजीवी वर्गावर होते.त्यांनी ही जबाबदारी घेतली पण ब्राम्हणी कलाकार,साहित्तीकांच्या सवई सुद्धा या प्रक्रियेत त्यांनी कॉपी केल्या. स्वातंत्र्यानंतर होऊ घातलेल्या या लेखक साहित्तीकांनी सर्वप्रथम आपली जमीनिशी असलेली नाळ तोडली आणि ते आत्मप्रोढी जगतात शिरले. इतरांना तुच्छ लेखने , ज्ञानाची घमेंडघोरी मिरवणे , ज्ञान लपवून ठेवने , ज्ञानाची ब्र्यांडिंग करणे , आणि पुरस्कारांच्या मागे धावणे , ब्राम्हणी छावणीशी हातमिळवणी करुण इतिहासाची अफरातफर करणे इत्यादीं कारणामे सर्वहरांच्या बुद्धीजींच्या द्वारे झाले किंवा चालु आहेत. 
साहित्तीक क्षेत्रात,समिक्षकांमधे आपापसात अत्मप्रोढीचे परात्म जीवन जगणार्यांची खुप मोठी फळी स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे.ज्ञानभांडार सर्वांसाठी खुले झाल्यानंतर त्याचा उपयोग सर्वहरा वर्गाच्या मुक्तीसाठी व्हायला हवा होता तर यांनी ते ज्ञान मिरवण्यासाठी कमवलेले आहे,हे सिद्ध झाले आहे.बरे यांचे परात्म मोठेपण नंतर पुरस्कारांवरुन मोजने सुरु झालेले आहे.
त्यांच्याद्वारे नवनिर्मिती तर झालीच नाही.उलट संकलित ज्ञानाचाही त्यांनी भयानक गर्व केलेला आपल्या दिसून येइल. त्यांना विचारले पाहिजे  तुम्ही बुद्धीजीवी आहात ना ? मग तुमची स्वताची नवनिर्मिती कुठेय ?
बरे साहित्यविश्वात यांची ओन क्रियेटिव्हिटी काय ?
सगळे ग्रामीण शब्द धापलेले,सर्व कथानक ग्रामीण, सर्व थेअरी,संपूर्ण पसारा ग्रामीण.मग तुम्ही जिथून कमाई केली त्या ग्रामसंस्कृतीच्या उद्धारासाठी काम का करत नाहीत ? त्या केलेल्या कमाईचा मोबदला म्हणून त्याची परतफेड का करत नाहीत ?सहित्यविश्वात तुमचे स्वताचे नवे शब्द कुठेत ?
तुम्ही नांगर,वखर, तिफन, जु शेत शिवार,उखळ,मुसळ,जाते,असे हजारो शब्द साहित्यविश्वात आनले ती काय तुमची स्वताची क्रियेटिव्हिटी आहे का ?
तुम्ही साहित्य विश्वात शेलक्या परवडेबल शिव्या स्विकारल्या ती काय तुमची कमाई आहे का ?
साहित्यविश्वात तुमचे नवे काय दिले.सगळे काही प्रतिबिंबवादीच ना ?
तुमचे स्वताचे नवे दोन शब्द तरी आहे का ? 
माणुस त्याची आणि त्याची अभिव्यक्ती भौतिकवादाचीच उपज असते,त्यामुळे तुम्ही सगळे येथूनच घेनार,नवे काय निर्माण करनार?  हे जरी खरे असले तरी तुम्ही त्या भौतिक जगताप्रती प्रामाणिक राहिलेला दिसत नाहीत.
फुलेंचे साहित्य वाचा.अगदी नवे शब्द जन्माला घालनारे फुले होते.तुमचे काय ?
मग हे सगळे ज्यांच्याकडून घेतले त्यांच्यावर ज्ञानाची घमेंडखोरी करनार व्हय ! 
मोबदला द्यायचा सोडुन तिथे जावून ज्ञान झाडनार व्हय ! 
सगळे गयेगुजरे तुम्हीच तेवढे शाहाने व्हय ! 
इतिहासकारांच्या बाबतीतही असेच इतिहासातील कागदत्रांना तुम्ही नव्याने जगासमोर आनता , पुन्हा पुन्हा त्याची मांडणी करता एवढेच.तुम्ही इतिहास घडवत नसता फक्त मांडत असता.मग त्या ज्ञानाची घमेंड कशासाठी , मिरवने कशासाठी ? लपवाछपवी कशासाठी ? हा तर ब्राम्हणीझम आहे मग . 

म्हणून ग्रामसंस्कृतीच्या खऱ्या वारसदारोंन्नो,
आर्थिक सामाजिक सर्वहरांन्नो या ब्राम्हणी बुद्धीजीवीना आधी कोला ...

नितीन सावंत परभणी 
9970744142
दि. 12 Oct 2020 
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️

Thursday, 8 October 2020

जात काय असते ? ती कशी ओळखायची ?

जात काय असते ? ती कशी ओळखायची ?

१.आजही आनेक गांवामधे माजी अस्पृश्य जाती तथा काही भटक्या विमुक्त जाती मंदिरात जावू शकत नाहीत.(लातुर जिल्ह्यातील मातंग असनार्या सरपंच बाईला असेच मारण्यात आले,विदर्भातील अर्वी गावात मंदिरात का आला म्हणून ८ वर्षाच्या लहान मुलाला स्टाइलच्या गरम फर्शीवर ॲसिड टाकुन नग्न बसवले गेले )
२.ह्या जाती भटक्या विमुक्त जाती आणि माजी अस्पृश्य जाती सवर्ण मानल्या गेलेल्या मोठ्या जातींच्या लग्नात पंगतीत जेवू शकत नाहीत. 
३.आशा सामाजिकदृष्ट्या हिन मानले गेलेल्या जातीतील महिलांना मोठ्या जातींच्या वस्तीतून जाताना पायातील वहाणा हातात काढून जावे लागते.हि प्रथा राजस्थान गुजरात उत्तर प्रदेश राज्यात काही ठिकाणी आजही चालु आहे. 
४.आजही जे आम्ही जातपात मानत नाही म्हणतात ते सुद्धा खुल्या दिलाने माजी अस्पृश्य जातींच्या पंगतीत सर्वांसमोर जेवायला बसत नाहीत.
५.आजही मोठ्या जातीतल्या कुनाचे घर विक्रीला असेल तर ते पैसे असुनही पुर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातीतील व्यक्तींना विकत घेता येत नाही.माजी अस्पृश्यांनी अस्पृश्य वस्तीतच घरे घ्यावीत,हा दंडक गावापातळीवर आजही आहे. 
६.जागा माजी अस्पृश्यांना म्हणजे शेडुल्ड कास्टला सुटली तर कारभार उपसरपंच म्हणून मोठ्या जातीकडे,वरच्या जातीकडे,सवर्ण जातीकडे असतो.
७.माजी अस्पृश्य जातीतीचा किंवा भटक्या विमुक्त जातीतील एखादा शिकून कितीही मोठा झाला,गावात फोरव्हिलरमधे आला तर त्याची प्रावेटात टिंगलटवाळी केली जाते.त्याला हिनत्वदर्शक वागणूक दिली जाते.
७.आजही बऱ्याच गावांमधे माजी भटक्या विमुक्त तथा माजी अस्पृश्य जातींच्या वृद्ध व्यक्तीना मोठ्या जातीचे लहान मुले,कमी वयाचे सुद्धा आरे कारे करुन बोलतात. 
८.भटके विमुक्त तथा माजी अस्पृश्यांच्या नावाला कधीही राव,जी,साहेब,सर आशी आदरार्थी विषशने लावली जात नाहीत.
९.मोठ्या जातीच्या सार्वजनिक स्वयंपाकासाठीची भांडी, मोठे पातेले, कढया,अस्पृश्य मानले गेलेल्यांना किरायाने पैसे देवून सुद्धा दिल्या जात नाहीत.कुनी आग्रह करुन दिल्यास मोठ्या जातीतले ते भांडे परत स्विकारत नाहीत. 
१०.अस्पृश्य मानले गेलेल्या जातीनी भडक रंगाचे भारीचे नवे कपडे घातले की आख्खा गाव चिडवतो हसतो .. अस्पृश्यांची मोठ्यातली मोठी व्यक्तीही वाड्याच्या ढाळजेच्या चबुतर्याच्या ओट्याच्या पुढे येवू शकत नाही ..
११.माजी अस्पृश्य जातीतील लोकांनी भारिचे कपडे घातले की गावात म्हणतात ते माजलेत.
१२.माजी अस्पृश्य जातींना आजही उच्चजातीयांचे अभिवादन,संबोधन वापरावे लागते.जसे राम नमस्कार वगैरे परंतू उच्चजातीय कधीही दलीतांचे माजी अस्पृश्य जातींचे संबोधन घालत नाहीत.जय भीम म्हणनार्याची उच्चजातीय आपापसात टिंगलटवाळी करतात.
१३.बऱ्याच गावांत आजही उच्चजातीय लोक माजी अस्पृश्यांच्या घरचे पाणी पित नाहीत.
घरकुल आले इस्किम आली की " साले माजलेत ..."
शिकून नोकरिला लागला की "माजलेत .."
कामावर नाही आला रेटुन बोलला की "साले माजलेत .."
या सर्व गोस्टी जातीवादात मोडतात.यालाच जातीवाद म्हणतात. 
१४)उच्चजातीय पितृसत्ताक मानसिकता बाळगनारे माजी अस्पृश्य जातीतील किंवा भटक्या विमुक्तांच्या स्त्रीयांकडे कधीही आदराने सन्मानाने पहात नाहीत. म्हणून आशा प्रवर्गातील स्त्रीयांची ते नेहमीच सामूहिक बलात्कार करुन सहजरीत्या विल्हेवाट लावतात. 
१५)गावाला मोठे सभागृह असूनही , गावाला भव्य मंदिरे असूनही भटके विमुक्त गावात आल्यानंतर त्यांना गावच्या हगंनदरीत आपला पाल , बिराड उतरावे लागते. एवढेच सरकारी स्वच्छ जागेवर जरी पाल उतरवला तर गावचे टगे त्यांना हाकलून लावतात किंवा पैसे वसुल करतात.
१६) गावच्या बाहेर सरकारी जागेत एखादे भटक्याचे बिराड जास्त काळ विसाव्याला असेल तर त्याच्या घरी कोणी नसताना त्याला न विचारता ते घर जाळले जाते किंवा पाडले जाते.एकाच गावी भटक्यांनी दीर्घकाळ थांबु नये जातीव्यवस्था पाळणाऱ्या वर्गाचा दंडक. 
१७) चोरीचा आरोप सिद्ध होण्याच्या आधीच नेहमीच भटक्या विमुक्तांना आधी सार्वजनिक गावगुंडांचा मारखावा लागतो आणि नंतर पोलीसांचा. 
१८) शुल्लक आरोपांवरून गावचावडीवर संपूर्ण बाई निरवस्त्र करुन तिला मारल्याच्या , जाळल्याच्या किंवा बलात्कार केल्याच्या घटनाही अलीकडील आहेत.कारण त्या निम्नजातीय होत्या.
आजही यंत्रयुगात, it च्या जगात आपण माणुस म्हणून जगु शकत नाहीत का ??
जात काय असते ?? कशी ओळखायची ? खरच ती निसर्गदत्त आहे आहे का ? निसर्गनिर्मित आहे का ? निसर्गनिर्मित असल्याची खुन काय ? 
बरे जात रक्तावर आधारलेली म्हनावे तर दवाखान्यात रोज हजारो बाटल्या रक्ता कुनाचेही कुनालाही दिले जाते. तेव्हा जाती भ्रष्ट होत नाहीत का ?
जात वंशशुद्धत्वावर ओळखायची तर सर्वांचेच वंश शुद्ध आहेत काय ?
मात्रसत्ताक स्त्रीसत्ताक गणव्यवस्थेत स्त्रीस्वैर संभोग करत असे.नवरा नावाचा प्रकार अस्तित्वात नव्हता.त्याही आधी आदिमानव संस्कृतीत कुठल्याही स्त्रीसोबत कुठलाही पुरुष संबंध ठेवत असे. 
मग कुनाचा वंश शुद्ध आहे बरे ?
तुमच्या जातीचा इतिहास कधीपासून सांगू शकाल ? फार तर एक हजार वर्षापूर्वीपासून, मग मनुष्य निर्मीती किती हजार वर्षापूर्वीची आहे ?? तेव्हा तुमचे पुर्वज कोन होते  ??? तुमची जात कुठे होती ???
तेव्हा गर्वच नाहीतर माज होता का तुमच्या जातीला ??
शोधली पाहिजेत प्रश्नांची उत्तरे. 
लहान मुलांना जात काय असते हे कळतही नाही त्या वयात त्यांना मारणे हे किती अमानवीय कृत्य आहे .
मुस्लिम लहान मुलांना तुझ्या घरात बॉंब बनवतात का असे अनेक शाळेंत शिक्षकांनी प्रश्न विचाराल्याचे पुढे आले आहे. तुम्ही जेहादी आहात असले शिक्षकांकडून टार्गेटिंग झाल्याचे अनेक प्रकारही लहान मुलांकडून उघड झालेले आहेत. 

नितीन सावंत , परभणी
अध्यक्ष मानवमुक्ती मिशन 
9970744142

Sunday, 4 October 2020

सरंजामशाहीची अदृष्य नियमावली

♦️सरंजामशाहीची अदृष्य नियमावली 

इ.स.६ व्या शतकापुर्वी सामंतशाही तर इ.स.च्या ६ व्या शतकापासून सरंजामशाहीला सुरुवात होते. पहिली ही वरुन शोषणव्यवस्था, दुसरी खालून शोषणव्यवस्था. पहिल्या व्यवस्थेमध्ये शेतकरी महसूल प्रत्यक्ष राजाला देतो, दुसरी व्यवस्थेत मध्यस्थामार्फत म्हणजे जमिनदारामार्फत राजाला देतो.

सरंजामशाहीत सरंजामदार खेड्यातील मोठे जमीनदार असत आणि अनेक गावे त्यांच्या नियंत्रणात असत. ते वाडेकरी असत. ते सशस्त्र फौजसुध्दा बाळगत. त्यांचा छोटेखानी डामलौल अगदी राजासारखच असे.या वाड्याच्या पायरीला धर्मव्यवस्था सुद्धा लोटांगणे घालत असे. किंबहुना ते धर्मव्यवस्था आणि सरंजामीव्यवस्था एकमेकाला पूरक काम करत.

गावातील प्रमुख सणवार उत्सवात त्या सरंजामदाराचा पहिला मान असे. धर्मप्रमुख त्यांची मर्जी सांभाळत. त्याप्रमाणेच वागत. म्हणजे ब्राम्हणशाही आणि सरंजामशाही दोघे मिळून शोषण पिळवणूक करत असत.हि शोषण पिळवणूक गरिब शेतकरी यांच्यापासून ते भुमीहीन भटके विमुक्त किंवा गावकुसाबाहेरील तत्कालीन अस्पृश्य जातींपर्यंत होई.यात धर्मव्यवस्था धार्मिक लुट करे तर सरंजामशाही अवाजवी शेतसारा किंवा खंडण्या वसुल करे. 
या दोन्हीही व्यवस्था ग्रामीण जनतेवर कठोर नियमावली बसवून लक्ष ठेवत असत. 

या दोनही व्यवस्थेच्या नियमावल्या आपण समजून घेवून त्यावर उपाययोजना म्हणून त्या कोणत्या न  कोणत्या  मार्गाने सार्वजनिकरित्या मोडीत काढण्यासाठी कार्यरत असले पाहिजे.आज सरंजामीव्यवस्थेचे अवशेष (निम-सरंजामी) उच्चजातीयांनी विशेष प्रयत्न करुन मोडले पाहिजेत. त्या नियमवल्या सांभाळून कुठलाही बदल आपन करु शकत नाहीत.कुनाचेही भले होइल असे त्या नियमावलींत काहीही नाही.आपण जेव्हा आपल्या समस्यांचे खापर आप्तस्वकियांवर फोडतो तेव्हा त्या समस्यांना कुठलाही एक व्यक्ती जबाबदार नसतो तर समाजव्यवस्थेतील ही नियमावली, आणि ती चालवनारे त्यावर अंमल करणारे जबाबदार असतात.
एखाद्या सुनेला हुंड्यासाठी जाळून मारणे या घटनेचा निषेध करताना आपण जाळून मारणाऱ्या कुटुंबाला ज्या प्रमाणे बोलत असतो,शिव्या देत असतो, त्यात हे विसरतो की  ते कुटुंब स्त्रीला हिन,दुय्यम लेखनार्या सार्वजनिक नियमावलीत वावरत आसते. आजूबाजूला एक सुन जाळून मारलीतर काय दुसरी येइल असा प्रचार करणारी सरंजामी व्यवस्था किंवा मानसिकता कार्यरत असते.एका व्यक्तीला किंवा कुटुंबाला जबाबदार धरुन चालनार नाही.अशा ज्या ज्या नियमावली आहेत,त्या मोडल्या पाहिजेत.माझ्या घरात आम्ही जातीभेद पाळत नाहीत असे ९९% लोक म्हणतात तरीही जातीव्यवस्था कशीकाय कार्यरत आहे,आजही मातंग पारावर आला म्हणून बाई असो किंवा लहान मुल असो त्यांना कठोर शिक्षा करणारी जात ही त्यांचीच आहे जे म्हणतात आमच्या घरात आम्ही जातीभेद अस्पृश्यता पाळत नाहीत.मग असे दुहेरी वर्तन का होते ? तर सार्वजनिकरित्या सर्वांनी मिळून ही सरंजामी नियमावली मोडलेली नाही.तसे जगजाहीर प्रयोग केलेले नाहीत.म्हणून सार्वजनिक जीवनात आपली पायरी बघुन न वागणाऱ्या माजी अस्पृश्य जाती किंवा भटक्या विमुक्तांना कठोर शिक्षेला सरंजामशाही आजही तयार आहे.

आत्ता सजातीय उदाहरणे बघा 
" मी खुप पुढे गेलो असतो पण भाऊकी आड आली." 
"मी प्रगती केली असती, पण भावाला माझे बघवत नाही. 
"मित्रांनी साथ दिली नाही."
"कोणी मदतीला आले नाही." 
वगैरे.हे व्यक्तिनिष्ठ आरॊप झाले.या गोस्टीला आजूबाजूला तिच सरंजामी नियमावली कार्यरत आहे.तीचा दबाव असल्यामुळे तुम्हाला आप्त किंवा मित्र धोका देताना योग्य वेळी मदतीला येताना दिसत नाहीत. पोडजात मोडुन लग्न करणे हे भाऊकीला मान्य नसते.त्यात तसे लग्न केलेल्या कुटुंबाला बहिष्काराला सामोरे जावे लागते. 
खरेतर, प्रस्थापितांची नियमावली पाळून समाजव्यवस्थेत बदल शक्य नाही.ती मोडली पाहिजे.सर्वांच्या भल्यासाठी.
म्हणून बरेच जन व्यक्तिगत जात पात लाळत नाहीत परंतू ते हे चांगले कृत्य  सार्वजनिक करत नाहीत.आमच्या नतलगात अंतरजातीय विवाह झालेला आहे हे सार्वजनिक कौतुकाने सांगण्याचे दिवस अजुन यायचे आहेत.त्याने तोंड काळे केले ही सरंजामी नियमावली आजूनही कार्यरत आहे.
कायद्याने सज्ञान असनारी मुलगी जोडीदार निवडून मुलासोबत लग्न करुन गेली तरी पळून गेली , तिच लफडं होतं असा प्रचार  करणारी नियमावली थांबवनारे धाडसी मताचे लोक  उभे करायचे आहेत. दलीतांची बाई सहज उचलून आनुन तिला ओरबडुन , रेप करताना तिने ओरडु नये म्हणून जिभ कापून किंवा पळून जावु नये म्हणून हात पाय मोडुन तिला हवे तेव्हा हवे तिथे फेकुन देता येते ही लोकशाहीतही स्वातंत्र्या नंतर वावरनारी सरंजामी मानसिकता सबकॉंसिअसली नेनीवेतून कार्यरत आहे. 
मनीषा वाल्मिकी प्रकरणात आरोपींना वाचवण्यासाठी भरलेल्या जातपंचायती, " बघु कोण काय करतय आपल्याला " या सरंजामी मानसिकतेतून कार्यरत आहेत.
 

नितीन सावंत परभणी 
९९७०७४ ४१४२ 
दि.४ आक्टोबर २०२०