बुद्धीजीवी : ब्राम्हणी, अब्राम्हणी
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात लिखानाचे,अभिव्यक्तीचे निर्बंध उठले आणि सर्वांसाठी लेखण्या अधिकृत खुल्या झाल्या.सर्वहरांच्या मुक्तीच्या तत्वज्ञानाची निर्मिती प्रक्रिया मोठ्याप्रमाणावर सुरु झाली. नवनवीन लेखक,साहित्तिक उदयाला आले.पण त्यात काही बोटावर मोजता येतील दिग्गज विचारवंत, लेखक,साहित्तिक सोडता बाकीच्यांनी आत्मसन्मानाच्या महारोगात आपली हयात घालवली आणि सर्वहरांच्या साहित्यिक संस्कृतीचा सत्यानाश केला.
एकांगी लिहीले गेलेल्या ब्राम्हणी इतिहासाला विधायक नकार देत अब्राम्हणी परंपरेतील इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचे काम सर्वहरांच्या बुद्धीजीवी वर्गावर होते.त्यांनी ही जबाबदारी घेतली पण ब्राम्हणी कलाकार,साहित्तीकांच्या सवई सुद्धा या प्रक्रियेत त्यांनी कॉपी केल्या. स्वातंत्र्यानंतर होऊ घातलेल्या या लेखक साहित्तीकांनी सर्वप्रथम आपली जमीनिशी असलेली नाळ तोडली आणि ते आत्मप्रोढी जगतात शिरले. इतरांना तुच्छ लेखने , ज्ञानाची घमेंडघोरी मिरवणे , ज्ञान लपवून ठेवने , ज्ञानाची ब्र्यांडिंग करणे , आणि पुरस्कारांच्या मागे धावणे , ब्राम्हणी छावणीशी हातमिळवणी करुण इतिहासाची अफरातफर करणे इत्यादीं कारणामे सर्वहरांच्या बुद्धीजींच्या द्वारे झाले किंवा चालु आहेत.
साहित्तीक क्षेत्रात,समिक्षकांमधे आपापसात अत्मप्रोढीचे परात्म जीवन जगणार्यांची खुप मोठी फळी स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे.ज्ञानभांडार सर्वांसाठी खुले झाल्यानंतर त्याचा उपयोग सर्वहरा वर्गाच्या मुक्तीसाठी व्हायला हवा होता तर यांनी ते ज्ञान मिरवण्यासाठी कमवलेले आहे,हे सिद्ध झाले आहे.बरे यांचे परात्म मोठेपण नंतर पुरस्कारांवरुन मोजने सुरु झालेले आहे.
त्यांच्याद्वारे नवनिर्मिती तर झालीच नाही.उलट संकलित ज्ञानाचाही त्यांनी भयानक गर्व केलेला आपल्या दिसून येइल. त्यांना विचारले पाहिजे तुम्ही बुद्धीजीवी आहात ना ? मग तुमची स्वताची नवनिर्मिती कुठेय ?
बरे साहित्यविश्वात यांची ओन क्रियेटिव्हिटी काय ?
सगळे ग्रामीण शब्द धापलेले,सर्व कथानक ग्रामीण, सर्व थेअरी,संपूर्ण पसारा ग्रामीण.मग तुम्ही जिथून कमाई केली त्या ग्रामसंस्कृतीच्या उद्धारासाठी काम का करत नाहीत ? त्या केलेल्या कमाईचा मोबदला म्हणून त्याची परतफेड का करत नाहीत ?सहित्यविश्वात तुमचे स्वताचे नवे शब्द कुठेत ?
तुम्ही नांगर,वखर, तिफन, जु शेत शिवार,उखळ,मुसळ,जाते,असे हजारो शब्द साहित्यविश्वात आनले ती काय तुमची स्वताची क्रियेटिव्हिटी आहे का ?
तुम्ही साहित्य विश्वात शेलक्या परवडेबल शिव्या स्विकारल्या ती काय तुमची कमाई आहे का ?
साहित्यविश्वात तुमचे नवे काय दिले.सगळे काही प्रतिबिंबवादीच ना ?
तुमचे स्वताचे नवे दोन शब्द तरी आहे का ?
माणुस त्याची आणि त्याची अभिव्यक्ती भौतिकवादाचीच उपज असते,त्यामुळे तुम्ही सगळे येथूनच घेनार,नवे काय निर्माण करनार? हे जरी खरे असले तरी तुम्ही त्या भौतिक जगताप्रती प्रामाणिक राहिलेला दिसत नाहीत.
फुलेंचे साहित्य वाचा.अगदी नवे शब्द जन्माला घालनारे फुले होते.तुमचे काय ?
मग हे सगळे ज्यांच्याकडून घेतले त्यांच्यावर ज्ञानाची घमेंडखोरी करनार व्हय !
मोबदला द्यायचा सोडुन तिथे जावून ज्ञान झाडनार व्हय !
सगळे गयेगुजरे तुम्हीच तेवढे शाहाने व्हय !
इतिहासकारांच्या बाबतीतही असेच इतिहासातील कागदत्रांना तुम्ही नव्याने जगासमोर आनता , पुन्हा पुन्हा त्याची मांडणी करता एवढेच.तुम्ही इतिहास घडवत नसता फक्त मांडत असता.मग त्या ज्ञानाची घमेंड कशासाठी , मिरवने कशासाठी ? लपवाछपवी कशासाठी ? हा तर ब्राम्हणीझम आहे मग .
म्हणून ग्रामसंस्कृतीच्या खऱ्या वारसदारोंन्नो,
आर्थिक सामाजिक सर्वहरांन्नो या ब्राम्हणी बुद्धीजीवीना आधी कोला ...
नितीन सावंत परभणी
9970744142
दि. 12 Oct 2020
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
No comments:
Post a Comment