♦बबन : सौमावादी आकलन ♦
बबन हा आर्थिक सर्वहरावर्गातला नायक . पश्चिम महाराष्ट्रात मिरासदारी शेतकरी जातीतील उच्चभ्रू मध्ये वर्गीय संघर्ष सुरु झालेला असल्याकारणाने दोन सरंजामदारांच्या वर्गसंघर्षात बबनचा बळी जातो . हा बबन आपले जीवन वर्गीय पध्दतीने उंचवण्याची स्वप्ने पहातो.त्याला प्रस्थापित भांडवली व्यवस्थेचे आकर्षन आहे. म्हणून तो दोन चार कंपण्यांचा मालक होण्याची स्वप्ने पहात असतो . त्याला आलीशन घर किंवा बंगला व जग्वार गाडीचे आकर्षन आहे . तो रोडच्या कडेवर पत्र्याचे घर करुन बसलेल्या भटक्या विमुक्तांच्या मुलांना दुध फ्रि मधे देतो, म्हणजे तो सामाजिक सर्वहरांशी दोस्ती करु इच्छितो . पन, ही त्याची दोस्ती क्रांतीदोस्ती ठरत नाही. तर तो दुधाच्या क्यांड कंपनीत नेण्यासाठी त्या कुटुंबाची मदतही घेतो. त्याची नेनीव मदत करनारी समतावादी आहे पन क्रांतीकारक नाही. त्याला उच्चभ्रू वर्गाचे आकर्षन आहे. म्हणून तो प्रस्थापित सरंजामदारासांरखे हात उंचावलेले ब्यानर गावच्या जत्रेत लावतो. पिस्तुलही दिल्यास तो घेतो . वरच्या वर्गात आपले वर्गीय स्तरिकरण करून घेण्यासाठी त्याची कुठलीही तयारी आहे . यातच त्याचा बळी जातो आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुधाच्या वर्गीय संघर्षात त्याचे रक्त मिसळून तो संपतो . दुध घालनारा सर्वसामान्य शेतकरी जो ब्यानरवर बबन बेंद्रे पाटिल बनु पहात होता तो संपतो. त्याचे ट्रक खाली चिरडलेले रक्त उलथलेल्या ट्यांकरमधुन सांडलेल्या दुधात मिसळते.
हा एकजातीय संघर्ष आहे. त्यांच्याच जातीतला बबन त्यांना थेट एम आय डिसीत दुध घालताना त्यांना चालत नाही. त्यांच्याच जातीतला बबन त्यांना गोऱ्या गोमट्या पोरीसोबत लव्ह करताना चालत नाही . सजातीय द्वंद्व या चित्रपटात पहायला मिळते . एकदा का आपला नवा वर्ग बनला की मग त्यात बबन सारखे आपल्या जातीतले नवे वरच्या वर्गात येवु द्यायचे नाहीत हा वर्गीय फंडा राजकारणात सुद्धा आहे . महाराष्ट्रातील ठरावीक राजकारणी घराणे आपल्या घराणेशाहीत नवे घराणे घुसु देत नाहीत . ठरावीक घराणेच नेहमीच सत्तेत असतात . बबनचा फक्त वापर .
बबन सौमाचा नायक बनु शकत नाही . त्याची आपले वर्गीय हितसंबध उंचवण्यासाठीची धडपड सौमावादी क्रांतीनायक बनवण्यास अडथळा ठरते .
म्हणून बबन हा प्रतिबिंबवादी ठरतो . बबन बघून जाताना काय घेवून जायचे ? नुसते हेलकावे ? की व्यवस्थेचा ठरलेला नाहक बळी ? तो नव्या संघर्षाची वाट करुन देत नाही . बबन प्रतिबिंबवाद सांप्रत जातवर्गीय व्यवस्थेचाच पाईक.
चित्रपटातील नायिका : बबन चित्रपटातील नायिकेचे शोषन आणि पिडन चित्रीत करत हा चित्रपट सुरु होतो आणि तिथेच संपतो. भांडवली व्यवस्थेतून आलेल्या सुबत्तेचा माज जेव्हा सरंजामदारांच्या वागण्या बोलण्यात दिसु लागतो, जेव्हा मिरासदार शेतकरी जातीतला उच्चभ्रू अश्लिलतेवर उतरतो तेव्हा बबनची नायिका परिणामाची पर्वा न करता त्याला गोळी मारते . या निमभांडवली निमसरंजामी जातवर्गीय व्यवस्थेला स्त्रीच चारीमुंड्या चित करनार आहे . त्या आधी तिचे शोषन पिडन स्त्रीदास्यत्व संपायला हवे .भारतीय भांडवली व्यवस्था सरंजामशाहीला पुढे करुन किंवा पोसुन चालते . म्हणून भांडवलशाहीचे वाहक आणि सरंजामशाहीचे दलाल त्या नायिकेच्या घरात घुसून तिची अब्रू लुटतात. शेवटी ती रस्त्याने भटकनारी वेडी होते . कुणीही यावे आणि अब्रू लुटावी अशी वेडी स्त्री . यातून तिची डिलीव्हरी भर रस्त्यात होते . तिला झालेले जातवर्गीय आर्थात सरंजामशाही भांडवलशाहीचे अपत्य ती आई आसुनही भिंतीला फेकुन मारुन संपवते . समतेच्या संघर्षात स्त्री ही पुरुषांनाही मागे टाकून जातवर्गीय संघर्षाचे देन ठरलेले आपत्य नाकरते . म्हणून कॉ शरद पाटील म्हणत असत की सत्ता स्त्रीयांना सुपूर्द करा, त्यांची नेनीव समतावादी असते. बबनची नायिका तेच करते . प्रस्थापीत उच्चभ्रू यांनी जन्माला घातलेले अपत्यच ती नष्ट करते .. हे अपत्य म्हणजे हवे तर व्यवस्थाही म्हना .. ती ही व्यवस्था नाकरतेय.
रोमान्स आणि रोम्यांटिझम : शेतकरी जातीतला रोमान्स हा न्याचरल असतो . त्यात सर्वकाही वास्तवादी असते . बबनही नायिकेशी तसाच वागतो . ग्रामीण खेळ खेळतो चिखलाच्या डव्हात दोघेही अंग भरुन घेतात . गावरान गप्पागोष्टी करतात . ब्राम्हणी चित्रपटातील नायकासारखे बबन काही सुर्य चंद्र तारे तोडुन आनुन देइल असले वादे काही करत नाही . वास्तवात तो जगतो तसेच त्याचे प्रेमही व्यक्त होते . एकूणच रोमान्स नॅचरल असला तरी रोम्यांटिझम मात्र अनावश्यकपणे आलेला आहे.
उत्पादन साधने व संबंध यांतील संघर्ष :
बबन हा ब्राम्हणी चित्रपट सृष्टीतील चित्रपटांसारखा प्रेमासाठीचा संघर्ष नाही. तो उत्पादन संबंध व उत्पादन साधनांच्यावरील वर्चस्वाचा संघर्ष आहे. बबनचे उत्पन्न वाढले तर त्याचा वर्गीय स्तर उंचावेल , तो आपल्यात येवून बसायला लागेल म्हणून सरंजामी व्यवस्था आणि उच्चभ्रू त्याला दाबत असतात . सैराटचा संघर्ष हा विजातीय समाजतला प्रेमप्रकरणातला होता. बबनचे तसे नाही. तो वर्गीय जीने जगतो. आणि स्वजातीय उच्चभ्रू वर्गाशी लढत असतो . त्याच्या पोटाच्यापाण्याच्या व्यावसायावर घाला घालताना जेव्हा त्याची गाडी मोडली जाते तेव्हा तो चिडून दुधाच्या क्यांडीने सरंजामदारांचे दलाल बदडून काढतो . सरंजामी व्यवस्था आधी तुमच्या नाड्याच बंद करते . उत्पादन साधनांवर मालकी प्रस्थापित करुन तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न होतो . बबनचाही दुध घालण्याचा ॲटोच जाळला जातो आणि त्याला पुन्हा खालच्या वर्गाचे जगणे जगायला सोडुन दिले जाते.
देशीवादी एकप्रवाही आकलन :
काही देशीवादी निरिक्षकांनी बबनचे एकप्रवाही निरीक्षण फेसबुकला मांडले . पन देशीवादी अंग हे परात्मता मांडण्यापलीकडे न जावु शकल्याने बबनला या व्हिव ने न्याय मिळु शकत नाही. सौमाच्या बहुप्रवाही अंगाने याकडे बघावे लागेल . बबन हा चित्रपट स्त्रीयांचे शोषन पिडन मांडतो . यात दोन आईंचे पिडन , एका बायकोचे शोषन पिडन तर एका प्रियसीचे शोषन पिडन चित्रीत झालेले आहे .आपल्या पोटच्या गोळ्यासाठी माय किती व्याकुळ असते याचे अप्रतिम चित्रण बबन करतो . खरेतर चित्रपटाचे नाव स्त्रीवादी हवे होते . पन चित्रपट बनवनारी पुरुषी व्यवस्था बबनला नायकत्व बहाल करते .
सामाजिक सर्वहरांतला एक प्रसंग खुप छान चित्रित करण्यात आला आहे . ब्यानवर टाकलेला आपला फोटो बघून खुश झालेली सरपंचबाई शेळी ओढत नेताना दाखवली आहे . सामाजिक सर्वहरा वर्ग फक्त तोंडी लावण्यासाठीच वापरला जातो . सरपंच असुनही हाती काही न ठेवलेल्या बाईंना शेवटी शेळी ओढावी लागते ही तथाकथित लोकशाही गावच्या सरंजामी व्यवस्थेसमोर अपयशी ठरते . पोलीस यंत्रणाही भांडवलशाही सरंजामशाहीसाठीच काम करताना दिसते . ती दमन यंत्रणा आहे . बबनच्या बापावर हात उचलनारी दमन यंत्रणा.
हा बबनचा बाप मावळती सरंजामशाही तथा विस्तारत जानारी भांडवलशाही साम्राज्यशाहीच्या कडेवरुन प्रवास करनारा आहे . तो निंबाच्या काडीला कोलगेट लावून दात घासतो. त्याला कॉंडोम माहिती नसतो . तो दारुत बुडालेला जुना सरंजामी तोरा सांभाळून असतो . त्याच आविर्भावात सर्वांना वागवतो .
अब्राम्हणी सौंदर्यशास्त्र :
भारतीय सर्वहरांचे सौंदर्यशास्त्र अब्राम्हणी सौंदर्यशास्त्र असल्याने चित्रपटाची नाइका जाडजूड आहे . ती झिरो फिगरवाली नाही . सणवार उत्सव सुद्धा अब्राम्हणी आहेत . दोघेही दर्शन घेताना शिवाच्या मंदिरात दाखवलेले आहेत ज्यात साईबाबाची शपथ असे काही नाही . मेकअप नाही की कृत्रिम सेट नाही असा बबन तरिही उठून दिसतो ..
नितीन सावंत परभणी
9970744142
♦♦♦♦♦♦♦♦♦♦