Sunday, 21 November 2021

माणुसकीच्या भिंतीची निर्लज्यांची योजना

माणुसकीच्या भिंतीची निर्लज्यांची योजना 

 अलीकडल्या काळात संपूर्ण महाराष्ट्रभर "माणुसकीची भिंत" हा उपक्रम राबवला गेला आहे. ज्या भिंतींवर लिहीलेले असते, 'नको असलेले द्या आणि हवे असलेले घेवून जा' उपक्रम चांगलाच होता. 

मी व्याख्यानाला , किर्तनाला जाताना अनेक जिल्ह्यांवर या भिंती पाहिल्या आहेत. बहुतांशी ठिकाणी सुरुवातीला या भिंतीवर भरपूर कपडे अडकवलेले दिसायचे.त्यात पुरुषांचेच कपडे जास्त. स्त्रीयांच्या साड्या वगैरे तर जवळ जवळ नाहीच .म्हणजे हल्ली कपड्यांचा सुळसुळाट झाल्याने लोक तिथे कपडेच आणून टाकत असत. आलीकडे या भिंती कोऱ्या उभ्या आहेत . खुप जिर्न झालेले फाटके कपडे तेवढे आजुबाजुला पडलेले आहेत. बहुतांशी भिंती रिकाम्या आहेत .

मी याकडे कसा बघतो तर 
शहरी मध्यमवर्गीय भिक्कारचोट वर्गाचे सहानुभूतीचे सोंग उघडे पडले. आता ती भिंतच ओरडुन ओरडुन सांगत आहे , आरे या देशात नेणाऱ्याचीच संख्या जास्त आहे देणाऱ्यापेक्षा .

ग्रामीण भागत अशा मदतीचे आव्हान करणाऱ्या भिंती उभ्या केलेले कुणी पाहिलेय का ? 
त्यांना मदतीची आव्हाने करण्याची गरज पडते का ? 

मग ते लोक मदतच करत नाहीत का ? 

करतात ना ! मंदिराच्या माइकवरुन सांगितले की मंदिराच्या आंगणात ढीगभर धान्याच्या रासी जमा होतात. कुनाचे घर जळो , शेत जळो , जनावरे मरोत किंवा ॲक्सिडेंट झाला तर लगेच गाव मदत करतो असल्या देखाव्याबाज भिंतीचा बोभाटा न करता ते लोक मदत करतात.
मुस्लिम वस्तित जावून जमीनीवर रुमाल अंथरूण आव्हान करा पेशंट दवाखान्यात आहे . तासाभराच्या आत पाच पन्नास हजार रुपये जमा होतात .

येथे मात्र शहरी म्याडम नेसून नेसून खराब झालेली साडी फेरीवाल्यांना देवून त्यावर टब किंवा भांडी घेते . म्हणून त्या माणुसकीच्या भिंतीवर जास्त साड्या दिसत नाहीत. 
ज्यांची फितरत सारखे आम्हालाच येवू द्या , आम्हालाच द्या अशी असते ते काय दुसऱ्याला देनार ?
ज्यांना घरी आलेला गेलेला कुनी आवडत नाही , ज्यांच्या गेटवर भुक लागलीय भाकरी द्या म्हणणारा हाकलून लावला जातो , कुत्रे पाळले नसतानाही ज्यांच्या गेटवर पाटी असते कुत्र्यापासून सावधान आशा कुत्र्यांकडुन देण्याची अपेक्षा करणे मूर्खपणा ठरेल .....म्हणून त्या भिंती अगदी रिकाम्या ओस पडल्या आहेत .
ज्यांच्या शहरात महिलांच्या डोक्याचे केस सुद्धा शंभर रुपये छटाक ने विकले जातात ते काय नेवून टाकनार माणुसकीच्या भिंतीवर ? Abp माझा बे बातमी लावलीय आता गरिबांची दिवाळी चांगली साजरी होनार . या भिंतीवर आनुन टाकलेल्या , वापरलेल्या कपड्यांवर गरिबांना दिवाळी साजरी करायला लावता व्हय रे ? गरिबांना भिक देनार का ? आणि त्यांचा पळवलेला हक्क कोन देनार ? लुटलेले घबाड कोन देनार ? 

नितीन सावंत , परभणी
9970744142

हे सर्व हिंदू नव्हते का ?

हे सर्व हिंदू नव्हते का ? 

ब्राम्हणांन्नो तुमची संस्कृती फार महान होती , तुमचा धर्म फार व्यापक होता , तुम्ही जगात अव्वल होतात तर काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यावीच लागनार ? आज नाही उद्या तरी तोंड फुटेलच ह्या प्रश्नांना 
१)तुम्ही संत चोखोबारायांनी एवढी व्यापक , वैचारिक भूमिका घेवूनही मंदिरात का घेतले नाही.समस्त अस्पृश्य समाज कोनत्या कारणाने हिन होता , त्यांना माणूस म्हणून जगण्याचे कुठलेच आधिकार तुम्ही का दिले नाहीत.
३) संत नामदेव सवर्ण असूनही त्यांना औंढा नागनाथाच्या मंदिरातून का हाकलून लावले ? तुमच्या दृष्टीने शिंपी समाज अस्पृश्य आहे का ? 
४) बसवेश्वरांच्यासह त्यांच्या शरणांच्या का हत्या केल्या ?
५) महानुभव चक्रधर स्वामींचा छळ का केला ? 
६) आई वडिल नसलेल्या ज्ञानेश्वरादी कोवळ्या पोरांना अन्न भाजून खाण्यासाठी फुटके खापरही न देनारे तुम्ही तुमच्या धर्माचा माणुसकीचा मळा कुणासाठी फुलवत होतात ? 
७) संत तुकोबारायांचा गाथा का बुडवला ? शेती करणाऱ्याने तत्वज्ञान , साहित्य रचु नये का ? धर्माला दुरुस्त करु नये का ? हिच शिकवण का तुमच्या धर्माची ? 

        हि विद्वान मंडळी तुमच्या धर्माची नव्हती का ? कुनाच्या फायदाचा हा तुमचा धर्म होता ? गोरगरिबांना तर कधीही तुमच्या धर्माच्या ज्ञानाचा कणही वेचता आला नाही.ब्राम्हणेतरांना शिक्षण, बंदी ज्ञान बंदी , तर्क बंदी करायला लावणारा तुमचा कायदा केवळ ब्राम्हणांच्या फायद्याचा होता.समस्त देशाला या आंधारकोठडीत ठेवल्याबद्दल तुम्हाला आज थोडीतरी लाज वाटते की नाही ? याचा हिशोब दिलात तर आपला सांस्कृतिक ताळमेळ बसेल अन्यथा तयारीत रहावे वर्षानुवर्षांच्या सांस्कृतिक लढाईसाठी .. रोशाला सामोरे जाण्यासाठी .. 

संत चोखोबाराय दिसले की विद्वत्तेची कदर केवळ जन्माने अस्पृश्य असल्यामुळे नाकरल्याचे अतिव दुख होते ..

नितीन सावंत परभणी 
9970744142

Saturday, 13 November 2021

मसनात गवऱ्या गेल्यानंतर आलेले शाहानपण काय कामाचे ?

 मसनात गवऱ्या गेल्यानंतर आलेले शाहानपण काय कामाचे ? 

मी लहानग्यांपासुन ते अगदी ९२ वर्षाच्या वृद्धांसोबत पुरोगामी चळवळीच्या अंगाने वावरत आलो  आहे.आशांसोबत काम करणे असो नाहीत तर वैचारिक चर्चा.फिल्डवर्क असो नाहीतर एखादी मिटिंग,सर्वांसोबत वावरण्याचा योग माझ्या आयुष्यात येवुन गेला आहे.

महत्वाचा विषय माझ्यासाठी वृद्ध वयस्क वैचारिक व्यक्तिंचा आहे.मी जेवढ्या वृद्ध वयस्क व्यक्तिंसोबत वावरलो त्यांची सर्वांची एक आग्रही भूमिका " कर्मठता " ही राहिलेली आहे.
ते इतक्या कर्मठतेने बोलतात की त्यांना वाटते लवकरात लवकर लोक बदलावेत,जग बदलावे क्रांती अगदी आपल्या डोळ्यासमोरच व्हावी.एक पुरोगामी वैचारिक ग्रहस्थ खुप वृध्द होते. ते अंथरुणाला खिळून वारले.त्यांचा शेवटपर्यंत अत्यंत कर्मठपणात वावर राहिला.टोकाच्या भूमिका घेत ते मेले.जाताना एकही कार्यकर्ता घडवून गेले नाहीत.आज त्यांचा एकही आनुयाई नाही.
आत्ता लॉकडाऊनच्या आधी एका ६५ वर्षाच्या वृद्ध पुरोगामी व्यक्तींनी, एका ब्राम्हणी छावणीच्या भटाळलेल्या नामांकित चोंग्याला  विडिओ बनवून शिव्या घातल्या.त्याच्या महाराष्ट्रभरातील चेल्यांनी कॉल करुन शिव्यांची परतफेड करायला सुरुवात केली.धमक्या सुरु केल्या.या आज्जोबांचे कॉल माझ्या मोबाईलवर डायव्हर्ट करुन सर्व प्रकरण युक्तिवाद करुन माफी न मागता मी निस्तरले.
नंतर या मार्गाने लोक जोडले जानार नाहीत,उलट तुम्ही नुकसान करत आहात असे म्हणून अज्जोबांना रामराम केला.

आत्ता एक वयस्क पुरोगामी नकारात्मक नास्तिक ग्रहस्थ संपर्कात आहेत. ते एका छोट्याशा खेड्यात रहातात.पुर्वी ते औरंगाबादला नोकरी करायचे.एक दोन महिण्याला आमची भेट होते, चर्चा होतात.त्यांच्या आजूबाजूच्या गावकीतल्या लोकांच्यात त्यांच्या मांडणीबद्दल नकारात्मक भावना आहेत.मी मात्र गेली तिनचार वर्षे झाले त्यांना सांगत आहे, इतकी टोकाची मांडणी करु नका,या टोकाच्या मार्गाने लोक जवळ सुद्धा येत नाहीत.सोडा हा हेका. महाशय ऐकायला तयार नाहीत. समाज किती बावळट आहे,मुर्ख आहे, नालायक आहे, हे ते दिवसरात्र सिद्ध करत असतात.
पण उपयोग काय ?

आशा लोकांना माझे काही प्रश्न आहेत.
आख्खे आयुष्यभर काय करत होतात ? किती लोक जोडले , किती आनुयाई तयार केले ? तुम्ही बदल केलेले कार्यक्षेत्र कुठेय ? ही वेगाने प्रबोधनाची हाव म्हातारपनी उपयोगात आणून काय फायदा ?
आत्ता मसनवाट्यात गवऱ्या गेल्यानंतर काय फायदा ? 
तुम्हाला लोकांचा मुक्तिदाता बनायचे आहे की दुश्मन ?

देवपुजा करत असताना पाण्यात टाकलेले देव तसेच बुडत ठेवून आमची आई , माय , आज्जी आंगणात आलेल्याला वाढायला जाते.तिला इतकेही गबाळी समजु नका. मी व्यावहारिक आहोत दैववादी नाही.
तुकोबारायांचा अभंगच आहे तसा ...
करिता देवार्चन l घरी आले संतजन ll
देव सारावे परत्वे l संत पुजावे आरते ll 

यडेचोट तुम्ही आहात , प्रबोधनाची टर्मिनोलॉजी तुम्हाला कळली नाही.ग्रामसंस्कृती यडी नाही ती अनुभवावरून चालते.तुम्ही अनुभवात शुन्य पुस्तकी कोटेशन तोंडावर फेकुन मारनारे.. 

नितीन सावंत परभणी 
9970744142

Tuesday, 9 November 2021

हिंगोलीचे सुफी :हजरत_सय्यादना_सिर्रे_हक_शाह_बाबा

 #हिंगोली येथील सर्वात सुंदर मोहक आणि निसर्गरम्य ठिकाण म्हणजे #ऱिसाला_बाजार होय. 
या रिसाला बाझार परिसरात,सरकारी दवाखाण्याच्या मागे,चिश्ती परंपरेतील(सिलसिलेके) हजरत सय्यादना सिर्रे हक शाह बाबा (रेहमतुल्लाह अल्लेह )यांची मजार आहे.दर्ग्याच्या तिनही बाजूंनी छोटे छोटे तळे आहेत.यात कमळाच्या फुलांनी दाटी केलेली असते.सुंदर नक्षीकाम केलेला हा दर्गा तळ्याच्या मध्यभागी उभा आहे.दर्ग्याची आतील सजावट अप्रतिम आहे. 
#हजरत_सय्यादना_सिर्रे_हक_शाह_बाबा हे कर्नाटकातील गुलबर्गा येथून खुलताबादला गेले होते.तिथून सुफींची विचारधारा घेवून ते हिंगोलीला आले.त्यांनी अयुष्याचा शेवटचा काळ हिंगोलीतच व्यतित केला.त्यांचा काळ साधारणतः साडेचारशे वर्षापूर्वीचा.ते २२ वे खाजा रेहमतुल्ल्ला अल्लेह यांच्या नंतरचे.
त्यांच्या पश्चात या दर्ग्याच्या देखरेखीसाठी त्यांच्या पुढील पिढ्या,त्यांचे वंशज कार्यरत आहेत.आज त्यांच्या ६ व्या पिढीचे वारसदार सज्जाद रजा चिस्स्ती हे दर्ग्याच्या सेवेत आहेत.त्यांच्याकडूनच ही महत्वपूर्ण माहिती मिळाली.या रिसाला बाजार परिसरात २४ एप्रिलला उरुस सुरु होतो आणि २७ संपतो. 
माझ्यासोबत हिंगोलीचे जुबेर पठाण,अमोल गाढवे,अक्षय डाखोरे होते.तर जवळा बाजारचे अविनाश खाडे,समिर राज,इर्फान पठाण, होते.

Wednesday, 3 November 2021

सावरकर पुरंदरेचे वंशज आणि फुले शाहु आंबेडकरांचे वारसदार

सावरकर पुरंदरेचे वंशज आणि फुले शाहु आंबेडकरांचे वारसदार 

त्यांच्यात त्यांच्या लेखक, संशोधक, वक्ते,साहित्तिक, शाहिर एवढेच काय लहानांपासून मोठ्यापर्यंत कदर करण्याची , सन्मान देण्याची सवय आहे,परंपरा आहे.तुमचे काय ? 
ब्राम्हणी परंपरेत त्यांची विषमतावादी व्यवस्था मजबूत करण्यासाठी जे जे झटले , झटतात त्यांना ते वाऱ्यावर सोडुन देत नाहीत.
आयुष्यभर तर सन्मान तर करतातच पण मेल्यानंतरही त्यांचे नाव जतन करुन ठेवण्यासाठी ते सतत झटतात.
ड्याम फुटुन पुण्यात पाणी शिरल्यानंतर मेलेल्या ब्राम्हणांच्यासाठी दरवर्षी ते कार्यक्रमाचे आयोजन करुन शहीदांना आदरांजली ते वहातात.यात ते कविता कथा रचतात.साधारण लोकांच्यासाठी ते एवढे करु शकतात  तर सावरकर ते बा.मो.पुरंदरे हे तर त्यांचे महाबलाढ्य प्रतिके. ती जपण्यासाठी ते कार्यरत रहानारच ना ? 

प्रश्न तुमचा आहे ? तुम्ही लेखक साहित्तिक वक्ते शाहिरांच्याप्रती किती संवेदनशीलता दाखवता ? त्यांचा किती आदर करता ? तुमच्यातील वैचारिक , बुद्धीजीवींना किती सहकार्य, साहाय्य करता ? तुमच्या विचारधारेप्रती आणि पूर्वजांच्याप्रती तरी तुम्हाला आस्था प्रेम तरी आहे का ? राष्ट्रपिता जोतीराव फुलेंची नात आणि सुन भुकने मंदिराच्या दारात मेल्या.जपले का फुलेंचे कुटुंब ? कुटुंब सोडा हो , शाळा तरी जपली का सावित्रीमाईंची ? 
बहुजन , पुरोगामी,फुले शाहु आंबेडकरवादी म्हणवून घेतो आपण मग आपल्या पुर्वजांच्याप्रती त्यांच्या विचारधारेप्रती प्रामाणिक,सजग, सतर्क, क्रियाशील का बरे रहात नाहीत ? ऐच्छिक हवे तसे का वागतो आपण ? 
महापुरुषांची कुठली कुठली प्रतिके आपण जपलीत बरे ? डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक संस्थांची काय आवस्था आहे आज ? आण्णाभाऊ साठेंचा शेवट किती वाताहातीत झाला तेव्हा जवळीक साधायला का कुनी आलेले नाही ? 
 आज घडीला बहुजन काही कफल्लक नाही राहिलेले. असे म्हणतात "एकेकाळी ज्यांचे हतावर पोट होते आज स्वातंत्र्यानंतर त्यांच्या गांडिवर चरबी चढली आहे." आसा वर्ग किती संवेदनशीलता दाखवतो आपल्या विचारधारेप्रती , पुरोगामी चळवळीप्रती ? 
  सावरकरांच्या , पुरंदरेच्या समाजाने त्यांना काहीही कमी पडु दिलेले नाही.ते सुखाने मेले.फुले शाहु आंबेडकरांचा समाज कुठे आहे ? हा प्रश्न आहे . ब्राम्हणांच्या घरात जन्माला आला, पुरंदरेचे सोने झाले ! 

नितीन सावंत परभणी
9970744142