या रिसाला बाझार परिसरात,सरकारी दवाखाण्याच्या मागे,चिश्ती परंपरेतील(सिलसिलेके) हजरत सय्यादना सिर्रे हक शाह बाबा (रेहमतुल्लाह अल्लेह )यांची मजार आहे.दर्ग्याच्या तिनही बाजूंनी छोटे छोटे तळे आहेत.यात कमळाच्या फुलांनी दाटी केलेली असते.सुंदर नक्षीकाम केलेला हा दर्गा तळ्याच्या मध्यभागी उभा आहे.दर्ग्याची आतील सजावट अप्रतिम आहे.
#हजरत_सय्यादना_सिर्रे_हक_शाह_बाबा हे कर्नाटकातील गुलबर्गा येथून खुलताबादला गेले होते.तिथून सुफींची विचारधारा घेवून ते हिंगोलीला आले.त्यांनी अयुष्याचा शेवटचा काळ हिंगोलीतच व्यतित केला.त्यांचा काळ साधारणतः साडेचारशे वर्षापूर्वीचा.ते २२ वे खाजा रेहमतुल्ल्ला अल्लेह यांच्या नंतरचे.
त्यांच्या पश्चात या दर्ग्याच्या देखरेखीसाठी त्यांच्या पुढील पिढ्या,त्यांचे वंशज कार्यरत आहेत.आज त्यांच्या ६ व्या पिढीचे वारसदार सज्जाद रजा चिस्स्ती हे दर्ग्याच्या सेवेत आहेत.त्यांच्याकडूनच ही महत्वपूर्ण माहिती मिळाली.या रिसाला बाजार परिसरात २४ एप्रिलला उरुस सुरु होतो आणि २७ संपतो.
माझ्यासोबत हिंगोलीचे जुबेर पठाण,अमोल गाढवे,अक्षय डाखोरे होते.तर जवळा बाजारचे अविनाश खाडे,समिर राज,इर्फान पठाण, होते.
No comments:
Post a Comment