Sunday, 21 November 2021

हे सर्व हिंदू नव्हते का ?

हे सर्व हिंदू नव्हते का ? 

ब्राम्हणांन्नो तुमची संस्कृती फार महान होती , तुमचा धर्म फार व्यापक होता , तुम्ही जगात अव्वल होतात तर काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यावीच लागनार ? आज नाही उद्या तरी तोंड फुटेलच ह्या प्रश्नांना 
१)तुम्ही संत चोखोबारायांनी एवढी व्यापक , वैचारिक भूमिका घेवूनही मंदिरात का घेतले नाही.समस्त अस्पृश्य समाज कोनत्या कारणाने हिन होता , त्यांना माणूस म्हणून जगण्याचे कुठलेच आधिकार तुम्ही का दिले नाहीत.
३) संत नामदेव सवर्ण असूनही त्यांना औंढा नागनाथाच्या मंदिरातून का हाकलून लावले ? तुमच्या दृष्टीने शिंपी समाज अस्पृश्य आहे का ? 
४) बसवेश्वरांच्यासह त्यांच्या शरणांच्या का हत्या केल्या ?
५) महानुभव चक्रधर स्वामींचा छळ का केला ? 
६) आई वडिल नसलेल्या ज्ञानेश्वरादी कोवळ्या पोरांना अन्न भाजून खाण्यासाठी फुटके खापरही न देनारे तुम्ही तुमच्या धर्माचा माणुसकीचा मळा कुणासाठी फुलवत होतात ? 
७) संत तुकोबारायांचा गाथा का बुडवला ? शेती करणाऱ्याने तत्वज्ञान , साहित्य रचु नये का ? धर्माला दुरुस्त करु नये का ? हिच शिकवण का तुमच्या धर्माची ? 

        हि विद्वान मंडळी तुमच्या धर्माची नव्हती का ? कुनाच्या फायदाचा हा तुमचा धर्म होता ? गोरगरिबांना तर कधीही तुमच्या धर्माच्या ज्ञानाचा कणही वेचता आला नाही.ब्राम्हणेतरांना शिक्षण, बंदी ज्ञान बंदी , तर्क बंदी करायला लावणारा तुमचा कायदा केवळ ब्राम्हणांच्या फायद्याचा होता.समस्त देशाला या आंधारकोठडीत ठेवल्याबद्दल तुम्हाला आज थोडीतरी लाज वाटते की नाही ? याचा हिशोब दिलात तर आपला सांस्कृतिक ताळमेळ बसेल अन्यथा तयारीत रहावे वर्षानुवर्षांच्या सांस्कृतिक लढाईसाठी .. रोशाला सामोरे जाण्यासाठी .. 

संत चोखोबाराय दिसले की विद्वत्तेची कदर केवळ जन्माने अस्पृश्य असल्यामुळे नाकरल्याचे अतिव दुख होते ..

नितीन सावंत परभणी 
9970744142

No comments:

Post a Comment