Wednesday, 9 February 2022
कीर्तनकार_आणि_अस्पृश्यता
Thursday, 3 February 2022
♦*राष्ट्रजागृती वारकरी परिषद*♦
♦*राष्ट्रजागृती वारकरी परिषद*♦
🔸प्रेरणास्थान 🔸
संत नामदेव , संत जनाबाई , संत चोखोबाराय , संत कबीर , संत रविदास,संत मीराबाई, संत नरहरी महाराज , संत सावता महाराज , संत गोरोबाकाका , संत सज्जन कसाई , संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, संत निवृत्तीनाथमहाराज , संत सोपानकाका ,संत एकनाथ महाराज , संत चांदबोधले , संत तुकोबाराय ,संत शेख मुहम्मद महाराज , संत शहामुनी , संत निळोबाराय , संत बहिणाबाई , संत तुकडोजी महाराज , संत गाडगेमहाराज, संत कैकाडी महाराज. आदी .
🔸उद्देश :
१)वारकरी सांप्रदायाची सामाजिक विषमता मोडणारी शिकवण आचरणात आणायला शिकविणे .
२)संत नामदेव ते संत तुकोबाराय , संत कबीर ते संत गाडगेमहाराज, प्रणित सर्व संतांचे तत्वज्ञान जनतेत रुजविने .
३)हिंसा ,अनाचार,व्यसानिधीनता ,यांविरुद्ध सामाजिक प्रेरणा सक्षम करने आणि सामुदायिक कृतीला प्रोत्साहन देने .
४)संकटाच्या कालखंडात ,नैसर्गिक आपत्ती,सामाजिक ताणतणाव,अशा काळात जनतेचे मनोधैर्य टिकवून ठेवणे ,आपत्कालीन परिस्थीतीत स्वप्रेरनेने शांतता प्रस्थापित करणे .
५)कृषी संस्कृतीची प्रागतिक मुल्ये जनतेपर्यंत पोहंचविने
6)वारकरी सांप्रदायात कार्यरत असनार्या प्रागतिक समाजाला पुढे नेनारे वारकरी, कीर्तनकार,प्रवचनकार , भजनी व टाळकरी संघटीत करणे .
७) किर्तर्ने ,प्रवचने , परिषदा ,प्रकाशने ,संम्मेलने भरवने
८)महिला वारकरी वर्गाला प्रोत्साहीतकरणे व सक्षम बनवने . व त्यांना वारकरी विचारपीठ उपलब्ध करुन देने .
९)सर्वधर्म , तीर्थक्षेत्रेस्थळी अमानवीय ,प्रथा ,अस्पृश्यता ,जातीय विषमता संपुष्टात आणून राज्यघटनेने दिलेल्या मानवी नगरी हक्कांचे रक्षण करणे .
१०)अनिष्ठ,चुकीच्या आणि विषमतामुलक बाबींपासून समाजाचा बचाव करने
११)भजनी , प्रवचनकार, वारकरी, कीर्तनकार यांच्यासाठी आरोग्य , अपघात, वार्धक्य यासाठी उपक्रम राबवने व सामाजिक सुरक्षा देने .
१२)संतपीठाला सामुदाईक चेतनेचे विचारपीठ बनवने . त्यासाठी शिक्षण, संशोधन,पथदर्शक प्रकल्प राबवने व संतपीठाच्या सहकार्याने ते चालवने .
१३)आशाच प्रकारचे कार्यकरनार्या देशाच्या आणि देशाबाहेरील प्रवाहांशी सुसंवाद ठेवने , विचारांचे आदान प्रदान करने .
१४)ग्रंथालये,वस्तुसंग्रहालये , संदर्भग्रंथालये , स्थापित करने , शासनाच्या मदतीने स्वंयप्रेरनेने हे चालवे .
१५)ही वारकरी परिषद मानवमुक्ती मिशनशी सुसंगत उद्दीष्टाने कार्यरत राहिल .
♦ ऱचना ♦
🔸सभासदत्वाच्या अटी 🔸
१)घटना व नियम मान्य पाहिजेत
२)प्रतिज्ञा घेतलेली पाहिजे
३)मुखपत्राचे वर्गणीदार असाले पाहिजे
४)एका जन आघाडीत सक्रिय असले पाहिजे
५)जनतेत सामाजिक,सांस्कृतिक आणि राजकीय भुमीकेत ठाम कार्यरत असले पाहिजेत .
🔸कृती आराखाडा🔸
१)नामदेव - तुकोबाराय जागृती अभियान दरवर्षी राबवने.
२)वारकरी,कीर्तनकार, टाकळरी ,भजने ,प्रवचनकार भारुडकार , वारकरी गायक यांना पेन्शन लागू करणे .
३)वारकरी तीर्थक्षेत्रे, धर्मस्थळे अशाठिकाणी मदत केंद्रे चालवने .
४)संतपिठा मार्फत वारकरी, भजणी ,प्रवचनकार,कीर्तनकार,भारूडकार ,टाळकरी यांची नोदणी करा ,प्रमाणित करा .
५)नोंदणीकृत वारकऱ्यांना समाजजाजृती अभियानात सहभागी करा .
६)सर्व धार्मिक स्थळांचा निधी सामाजिक उत्थान व विकासासाठी वापरा ,देवस्थान व तिर्थक्षेत्रांच्या निधीमधील अनागोंदी ,भ्रष्टाचार दुर करा आणि कायमस्वरूपी नियंत्रण स्थापीत करा .
७) तीर्थक्षेत्र स्थळावरील छोटे व्यावसाय करनारे आणि उपजीविका करनारे सर्वच यांना किमान सुविधा उपलब्ध करा . नियोजित विकास करा .
८)जिल्हास्तरावर व तीर्थक्षेत्रस्थळी सुसज्ज वारकरी भवन उपलब्ध करा.
ताई महाराज मंगळवेढेकर प्रदेश कार्याध्यक्षा , महाराष्ट्र राज्य
+91 93091 87616
ह.भ.प धर्मकीर्ती महाराज परभणीकर.
संस्थापक अध्यक्ष
9970744142
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️