Wednesday, 9 February 2022

कीर्तनकार_आणि_अस्पृश्यता

#कीर्तनकार_आणि_अस्पृश्यता ...

                         भारतात संविधान लागु झाल्यानंतर कागदोपत्री अस्पृश्यता संपली .वास्तवातील आणि मनामनातील जातीव्यवस्था,  अस्पृश्यता विधायक प्रबोधनाने अजून संपायची आहे. म्हणजे ती अजुन संपलेली नाही.अस्पृश्यता तर संपली आता कुठे राहायली आहे ?  म्हणू म्हणू ती कुठे,कुठे चव्हाट्यावर येतेच.अस्पृश्यता संपली आशा बोंबा मारुनही दर एक दोन वर्षाला तशा घटना आज २०२२ सालापर्यंत घडणे चालु आहेत.जात वास्तव स्विकारल्याशिवाय तिच्या उपाययोजणांवर काम कसे करता येइल बरे.अजुन शहरी वर्ग आता कुठे राहिला आहे जातीवाद असे म्हणून जात वास्तवाला बगल देत आहे.

                         महाराष्ट्रातील किर्तन परंपरेचा पाया मात्र समता , मित्रता हा आहे.वारकरी परंपरेचा केंद्रबिंदू " कोण्याही जीवाचा न घडो मत्सर " हा आहे.किंवा " सकळांशी येथे आहे आधिकार " हा आहे.

                           सर्वच संतांनी जातीव्यवस्था आणि अस्पृश्यतेला कडाडून आणि प्राणप्रणाने विरोध केला आहे.काही संतांच्या हत्या होण्या मागचे कारण नेमके हेच होते ते जातीव्यवस्था अस्पृश्यता मोडीत काढायला निघाले होते. 

                                 #आजचे_किर्तनकार मात्र नेमके या मुळ उद्देशापासून , वारकरी परंपरेच्या केंद्रबिंदूपासून भरकटलेले आहेत.जिथे कुठे मंदिरातून अस्पृश्य मानलेल्या व्यक्तिला हाकलून लावण्याची घटना घडते तिथे एकही किर्तनकार जावुन अस्पृश्यतेला विरोध करत नाही, की प्रबोधन करत नाही.एकीकडे वारकरी परंपरेत पंढरपूरचा पांडुरंग अस्पृश्य असणाऱ्या संत सोयराबाईचे बाळंतपण करतो.बाळतंपण करणे हे विटाळाचे काम आहे.विठ्ठल दोन प्रकारचे विटाळ धडकावून लावतो.एक म्हणजे अस्पृश्य स्त्रीचे बाळातंपण करुन आणि दुसरे म्हणजे बाळंतपण काय स्त्रीयांनीच करावे का ? तो स्वता ही कृती करुन पितृसत्ताक समाजव्यस्थेला हदरा देतो.विटाळाचे बाळंतपण तो स्वता करतो.विटाळ आणि अस्पृश्यता तो धुडकावून लावतो. या विठ्ठलाच्या कथेबद्दल प्रमाणही आहे की " चोखोबाची बहिण झाला शारंगधर l वहिणी उघडा दार हाका मारी ll " 
                                 एवढेच काय इंद्रदरबारातील नासलेले अमृत शुद्ध करण्याची ताकद संत चोखोबारायांच्या एका दृष्टीत म्हणजे एका नजरेच्या कटाक्षात होती. विठ्ठल संज्जन कसायासोबत मांस विकायला बसतो.अशीही मिथकीय कथा आहे.येथे विठ्ठल आणि एकही संत अस्पृश्यता पाळत नाहीत. अस्पृश्यतेला ते विरोध करतात. 
आजचे कीर्तनकार नेमका हा मुद्दाच का गहाळ करत असावेत बरे ? 
                         #लातूर_जिल्ह्यातील मंदिरात नारळ फोडायला का गेला म्हणून गावाने #बहिष्कार टाकलेल्या माजी अस्पृश्य जातीतल्या कुटुंबाची बाजु घ्यायला बंडातात्या कराडकर आणि त्यांची सनातनी कीर्तनकार मंडळी त्या गावी का जात नसावी बरे ? यांना खरेच वारकरी किंवा कीर्तनकार म्हनावे का ? 

ह.भ.प.धर्मकीर्ती महाराज परभणीकर 
9970744142

No comments:

Post a Comment