Wednesday, 24 February 2021

♦️दागिने आडकवायचा स्ट्यांड

  ♦️दागिने आडकवायचा स्ट्यांड 

       श्रीमंतांच्या घरातील स्त्रीया लग्नसमारंभ प्रसंगी ज्या पध्दतीने अंगभर दागीने लपेटून येतात तेव्हा त्या मला दागीने आडकवून ठेवायचा स्ट्यांडच वाटतात. 
स्ट्याडला नाही का त्या दागीन्यांचे आडकवुन ठेवण्यापलीकडे काहिच करता येत नाही.अगदी काही स्त्रीयांचेही असेच आहे,त्या फक्त दागिने घालून मिरवु शकतात पण त्या दागिण्यांवर त्यांची मालकी नसते.पितृसत्ताक समाजव्यवस्थेत आमची बाई छान दिसावी म्हणून तिला नाजुक साजूक भरपूर दागिने बनवून दिले जातात. बहुतांश वेळा या दागिन्यांचा खर्च पुरुषांनी उचललेला असल्यामुळे बाईचे काम ते दागिने लपटने एवढेच असते.तिला त्यातला एकही दागिना मोडता येत नाही.त्यावर तिचा मालकी हक्क नसतो.म्हणून मला ती स्त्री दागिने आडकवायचा स्ट्यांड वाटते. 
       ग्रामीण भागातली मोठ्या घरची स्त्री परावलंबी आहे.तिला दागिने भरपूर असतात पण त्यावर तिची मालकी नसते.त्यामुळे ती जेव्हा भरपूर दागिने घालून कुठल्या तरी लग्न समारंभ किंवा  उत्सवात हजर असते तेव्हा तिला इतके जपून वागावे लागते की एखादा दागिना हरपेल पडेल याच्याच धाकधुकीत ती वावरते.घरचे काय म्हनतील ही सदैव टांगलेली तलवार तिच्या डोक्यावर असते.
       माझ्या दृष्टीने आशा सर्व स्त्रीया दागिने आडकवायचा स्ट्यांड आहेत.
हल्ली दागिने हे सौंदयाचे कमी पण प्रतिष्ठेचे मोठे लक्षण बनले आहे.घरात संडास नसला तरी चालेल दागिने जास्त असले पाहिजेत ही मानसिकता कालपर्यंत होती.सरकारच्या दबावामुळे हल्ली संडास बांधावे लागलेले आहेत.नाहीतर स्त्रीयांचा विचार करुन स्वखुशीने पुरुष वर्गाने संडास काही बांधले नसते. 

   कधीकधी तर स्त्रीया अंगावर भयानक आजार रोग काढतात परंतू दागिने मोडु देत नाहीत.बाई मेली तरी चालेल पण घरातील दागिने नाही मोडले पाहिजे.हा रिवाज ग्रामीण भागात आजही पाळला जातो. 
सगळ्या बाजूने पत गेली तरी दागिन्यांत पत शोधनारे आजूनही असावेत अजबच आहे ना जरा ..

नितीन सावंत परभणी 
9970744142

♦#एककुळी_गाव ♦

 ♦#एककुळी_गाव ♦

          वंशसमाजात शिकारीतून शेतीत उतरले त्यांच्यात आधी गण तयार झाले. मग गणाचे ज्ञातीत विभाजन झाले.  त्यानंतर, प्रत्येक ज्ञातींत कुले बनत गेले. पुढे सात पिढ्यांच्या नंतर कुले विभाजीत होऊन नवे कुल तयार होत असे.
      साळंतून व सरंजामी समाजात आल्यावर कुळाची जागा कुटुंबाने घेतली. कुटुंबातून पुढे भाऊकी.भावकी आणि वाडे यांची संख्या सात पिढ्याइतके वाढली की बेट फुटून ११ मैलावर नवा गाव वसवला जाई. 

         या वंशसमाजातील सा-लोहित अर्थात रक्तसंबधाने बांधलेल्यांत विवाह होत नाहीत. त्यासाठी कुलचिन्ह देवक परंपरा होती. ज्यांचे देवक कुलचिन्ह सेम ते भाऊबंद मानले जातात.पुढे जाती समाजात आडनावेही आली.समान आडनावे असनारे भाऊबंद मानले जावुन तिथेही बेटीव्यवहार होत नाहीत.ते भाऊबंद असल्यामुळे त्यांच्यात राम राम घालत नाहीत.

         परभणी हिंगोली जिल्ह्यांच्या सिमा #पुर्णा_दुधना नद्यांनी बांधलेल्या आहेत. यातील दुधना नदीकिनारी धार, समसापुर, दुरडी आणि मुरुंबा या चार गावी चोपडे आडनावाचे सकुल्य पण असपिंड्य बांधव आहेत. चारही गावी पोळ्याचा मान चोपडे यांच्याकडे आहे.चारही गावी होळीचा मान चोपडे यांच्याकडे आहे.मुख्य गढी आणि वहितीखाली जास्त जमीन चोपड्यांकडेच.ही गावे चोपडेंनी वसवल्याचे लक्षात येते. समसमान वाटणी करनारे गाव समसापुर, नदिच्या अगदीच धारेत ( कडेवर ) वसवलेले गाव म्हणजे धार, नदिने वळण घेतल्यानंतर त्या दुरडीच्या आकाराच्या किनाऱ्यावर वसवलेले गाव दुरडी तर आंबेचे ठाणे असलेले मुरुंबा. अंब शब्द पाण्याशी सुद्धा नाते सांगणारा आहे.
ही एकाच भावबंदकीची वा कूळाची आपत्ये आहेत. महापूर आल्याने किंवा गणाची संख्या वाढल्यामुळे नवीन गावे वसवून नवी जमीन वहितीखाली आणण्याचे काम चोपडेंनी केलेले आहे.

         #पुर्णा नदिच्या किनारी तर दोन दोन नावांची सेम गावे आहेत.म्हणजे एकच गाव महापुरात तुटून वेगळा झाला असेल तर नाव कायम राहिले गावे वस्त्या दोन झाल्या.जसे पोटा ही गावे दोन आहेत.परळी (काळे आणि  दशरथे) पिंपळगाव (कदम आणि टोंग) सावंगी (पंढरकर आणि गरुड ),नांदगाव ( जवंजाळ आणि भालेराव ) ही एकाच नावाची दोन गावे आहेत.ही गावे नदिच्या परस्पर विरोधी तिरावर एकमेकांडे तोंडे करुन उभी आहेत.मटकर्हाळा आणि सावंगी या गावी गरुड आडनाची सकुल्य म्हणजे एकाच कुळाची बांधव आहेत.
या गावांचा अधिक विस्ताराने अभ्यास केला तर गावे कोण्या काळात वसवली गेलीत, हे सहज लक्षात येइल.

  यांना एककूळी गावे म्हणता येते.

नितीन सावंत परभणी
9970744142
दि १ जुलै २०२०