वंशसमाजात शिकारीतून शेतीत उतरले त्यांच्यात आधी गण तयार झाले. मग गणाचे ज्ञातीत विभाजन झाले. त्यानंतर, प्रत्येक ज्ञातींत कुले बनत गेले. पुढे सात पिढ्यांच्या नंतर कुले विभाजीत होऊन नवे कुल तयार होत असे.
साळंतून व सरंजामी समाजात आल्यावर कुळाची जागा कुटुंबाने घेतली. कुटुंबातून पुढे भाऊकी.भावकी आणि वाडे यांची संख्या सात पिढ्याइतके वाढली की बेट फुटून ११ मैलावर नवा गाव वसवला जाई.
या वंशसमाजातील सा-लोहित अर्थात रक्तसंबधाने बांधलेल्यांत विवाह होत नाहीत. त्यासाठी कुलचिन्ह देवक परंपरा होती. ज्यांचे देवक कुलचिन्ह सेम ते भाऊबंद मानले जातात.पुढे जाती समाजात आडनावेही आली.समान आडनावे असनारे भाऊबंद मानले जावुन तिथेही बेटीव्यवहार होत नाहीत.ते भाऊबंद असल्यामुळे त्यांच्यात राम राम घालत नाहीत.
परभणी हिंगोली जिल्ह्यांच्या सिमा #पुर्णा_दुधना नद्यांनी बांधलेल्या आहेत. यातील दुधना नदीकिनारी धार, समसापुर, दुरडी आणि मुरुंबा या चार गावी चोपडे आडनावाचे सकुल्य पण असपिंड्य बांधव आहेत. चारही गावी पोळ्याचा मान चोपडे यांच्याकडे आहे.चारही गावी होळीचा मान चोपडे यांच्याकडे आहे.मुख्य गढी आणि वहितीखाली जास्त जमीन चोपड्यांकडेच.ही गावे चोपडेंनी वसवल्याचे लक्षात येते. समसमान वाटणी करनारे गाव समसापुर, नदिच्या अगदीच धारेत ( कडेवर ) वसवलेले गाव म्हणजे धार, नदिने वळण घेतल्यानंतर त्या दुरडीच्या आकाराच्या किनाऱ्यावर वसवलेले गाव दुरडी तर आंबेचे ठाणे असलेले मुरुंबा. अंब शब्द पाण्याशी सुद्धा नाते सांगणारा आहे.
ही एकाच भावबंदकीची वा कूळाची आपत्ये आहेत. महापूर आल्याने किंवा गणाची संख्या वाढल्यामुळे नवीन गावे वसवून नवी जमीन वहितीखाली आणण्याचे काम चोपडेंनी केलेले आहे.
#पुर्णा नदिच्या किनारी तर दोन दोन नावांची सेम गावे आहेत.म्हणजे एकच गाव महापुरात तुटून वेगळा झाला असेल तर नाव कायम राहिले गावे वस्त्या दोन झाल्या.जसे पोटा ही गावे दोन आहेत.परळी (काळे आणि दशरथे) पिंपळगाव (कदम आणि टोंग) सावंगी (पंढरकर आणि गरुड ),नांदगाव ( जवंजाळ आणि भालेराव ) ही एकाच नावाची दोन गावे आहेत.ही गावे नदिच्या परस्पर विरोधी तिरावर एकमेकांडे तोंडे करुन उभी आहेत.मटकर्हाळा आणि सावंगी या गावी गरुड आडनाची सकुल्य म्हणजे एकाच कुळाची बांधव आहेत.
या गावांचा अधिक विस्ताराने अभ्यास केला तर गावे कोण्या काळात वसवली गेलीत, हे सहज लक्षात येइल.
यांना एककूळी गावे म्हणता येते.
नितीन सावंत परभणी
9970744142
दि १ जुलै २०२०
No comments:
Post a Comment