ll वारकरी चळवळीतील काही महत्वाच्या नोंदी ll
१)वारकरी परंपरेत सर्व प्रतिके आणि संकल्पना ठरलेल्या आहेत.काकड्यात गणपतीची आरती होत नाही.वारकरी परंपरेला सरस्वती मान्य नाही. तुकोबाराय म्हणतात.
"चोखा आमचा गणपती l राधाई आमची सरस्वती ll "
पंढरपूरात गेल्यावर आधी चोखोबांच्या समाधीचे दर्शन घेतल्याशिवाय विठ्ठलाचे दर्शन पुर्ण होत नाही. म्हणून वारकऱ्यांचा गणपती हे संत चोखोबाराय होत.
२)वासकर सांप्रदायात
ज्ञानियांचा राजा गुरु महाराव l म्हनती ज्ञानदेव तुम्हा ऐसे ll
हा अभंग घेतला जात नाही.किर्तनकाराने हा अभंग किर्तनासाठी घेतल्यास टाळकरी मंडळी टाळ खाली ठेवतात.कारण या अभंगात तुकोबाराय स्वताला पायाची वहान म्हणतात हा त्यांचा अपमान आहे.हा अभंग प्रक्षिप्त आहे ..
३)वासकर सांप्रदायात रामेश्वर भटाने लिहीलेली तुकोबारायांची आरती घेतली जात नाही.त्या आरतीवर बंदी आहे.कारण तुकोबारायांना यानेच त्रास दिला होता.गाथा बुडवली होती.
४)अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा l माझिया सकळा हरिच्या दासा l हा संत नामदेवांचा अभंग पुर्वी वारकऱ्यांचे पसायदान होते.नंतर ज्ञानदेवांचे पसायदान कधी आले आणि रुजवले गेले पत्ताच लागला नाही. नंतर संत नामदेवरायंचे पसायदान बंद करण्यात आले.
५)एक महत्वाची गोस्ट अशी की संत तुकोबारायांवर संत नामदेवांचा प्रचंड मोठा प्रभाव होता.एवढेच काय तुकोबाराय संत नामदेवरायांना खुप मानायचे, याचा पुरावा म्हणजे नामदेवरायांच्या मुलांची जी नावे होती तिच नावे तुकोबारायांनी आपल्या मुलांची ठेवली होती.
६) तुकोबाराय म्हणतात
नामदेवे केले स्वप्नामाजी जागे l सवे पांडुरंगे येवुनिया ll
तुकोबाराय नामदेवांकडे बोट करतात पण ही जोडी अजरअमर न होऊ देण्यासाठी काकड्यात एक अभंग घुसवाला आणि त्यात तुकोबारायांना बाबाजी सदगुरुने स्वप्नात दिक्षा दिल्याचे ठोकुन दिले गेले.
७)हल्ली तुकोबारायांना स्वतंत्र उभे करण्याची बऱ्याच पुरोगाम्यांची धडपड चालु आहे.पण तुकोबाराय हे नामदेवांच्या साच्यात उभे आहेत.काहींना शिंप्याचा नामा चालत नाही.म्हणुन ते तुकोबा स्वयंभु म्हणून मांडत आहेत.परंतू कीर्तन परंपरा संत नामदेवांनी सुरु करुन दिली.तुकोबाराय त्या परंपरेतीलच .
8)प्राप्त परिस्थीला भिडायचे पळ काढायचा नाही ही संतांची शिकवन.रामदास मात्र लग्न मंडपातून पळाले आणि वर दासबोधात त्यांनी लिहीले आहे की, संसार करावा नेटका l प्रश्न आहे. मग तुम्ही का केला नाही नेटका संसार ? म्हणून संत रामदास वारकरी परंपरेत बसत नाहीत.वारकरी परंपरा "अवघाची संसार सुखाचा करिन" म्हननारी आहे.
९)ब्राम्हणी पोथ्या पुरांनांनी देव महागडा केला होता आणि त्याद्वारे ते भोळ्या लोकांना लुटत असत.येथे मात्र संतांनी देव स्वस्तात उपलब्ध करुन दिला.कुनाचा तरी देव एवढा स्वस्तात उपलब्ध आसेल काय बरे ? संतांचा देव गोरा कुंभारासोबत चिखल तुडवतो,जनी सोबत दळु लागतो, सावता महाराजांसोबत मळा पिकवितो, चोखोबारायासोबत ढोरे ओढतो,सज्जन कसायासोबत मांस विकु लागतो,कबिराला शेले विनु लागतो.
१०)या देवाला मंत्र नाहीत की श्लोक नाहीत.उलट याला शिव्याही देता येतात ...
जनाई म्हनते
आरे आरे विठ्या l मुळ मायेच्या कारट्या ll
तुझी रांड रंडकी होओ l तुझे मडे बसो ll
११)हे आज जरी आऊटडेटेड झाले असते तरी. मध्ययुगीन भारतात देव आणि धर्माच्या नावे ब्राम्हणकुलोत्पन्न वर्ग जो लुट आणि शोषन करत होता त्यानुसार हे अपडेटेड तत्वज्ञान होते.
१२)पांडुरंग,विठ्ठल,विठोबा,पंढरीनाथ,विठाई,जगजेठी ही पांडुरंगाची संत साहित्यातील नावे.तसेच त्याच्या रुपाचे म्हणजे मुर्तीचे वर्णनही संतांनी करुन ठेवलेली आहेत.सुंदर ते ध्यान उभे विठेवरी पासुन ते कटी कर चरण सम ब्रम्ह उभे पर्यंत अथवा विठेवरी उभा कटेवरी हाथ l सावळा माझा पांढरीनाथ अशी आनेक संतांची विठ्ठल मुर्तीची वर्णने करुन ठेवली आहेत .
१३)संतांनी ही वर्णने केली नसती तर ब्राम्हणांनी विठ्ठल बाजुला करुन तिथे परशुराम उभा केला असता.तरिही विठ्ठल हलवण्याचे अनेक प्रयत्न ब्राम्हणांनी केलेच.पुर्वी संतांनी केलेल्या वर्णनाप्रमाणे विठ्ठल मुर्ती बाहेरच्या अंगणातुन सहज दिसत असे. नंतर बाहेरून विठ्ठल दिसु नये म्हणून आडवी भिंत घालण्याचे कामही ब्राम्हणांनी केले.
एवढेच काय उत्तरेकडून कबिर रविदास व हिंदी भाषिक संतांच्या येणाऱ्या दिंड्या ब्राम्हणांनी बंद केल्या .
१४)वारकरी सांप्रदायात पुर्वीला एकही ब्राम्हण कीर्तनकार नव्हता . ल.रा. पांगारकर आणि वि.का. राजवाडे यांनी चर्चा केली आणि नंतर ब्राम्हण संत निर्माण करण्याचे ठरवले. हल्ली वेदांतचार्य लावनारे ब्राम्हण आणि भटाळलेले याच परंपरेतले आहेत.संत रामदास हा सुद्धा पुर्वी वारकरी सांप्रदायात नव्हता.त्याचा समर्थ सांप्रदाय होता. नंतर ब्राम्हणांनी त्याला घुसवला.
१५)म्हणजे ब्राह्मण कीर्तनकार निर्माण करुन त्यांच्याद्वारे सांप्रदायाचे ब्राम्हणीकरण करण्यात आले. वेद कर्मकांड नाकारणाऱ्या सांप्रदायाचे वैदिकीकरण करण्यात आले . आजही भिडे, चारुदत्त आफळे हे लोक सांप्रदायाचे ब्राम्हणीकरण करत आहेत.
तसे न होऊ देण्याची जबाबदारी आजच्या वारकऱ्यांवर आहे .
१६)सगळ्यात महत्वाचे म्हणजे वारकरी परंपरेत संस्कृतला चारण्याचे सुद्धा स्थान नाही. सर्व कारभार चालतो तो प्राकृतात म्हणजे मराठीत. लोकभाषेचा वापर केल्याने हा संप्रदाय मातीत आपली मुळं रोऊ शकला . संत एकनाथ महाराज म्हनाले होते संस्कृत ही जर देवापासुन तयार झाली तर मग मराठीची माय काय भुताखाली गेली होती काय ? ( संस्कृत देवाने केली , मग काय प्राकृत भुतापासोनी झाली ? )
१७)येथे प्रत्येक विधी बिना ब्राम्हणाचा असतो . तुकोबाराय म्हनाले होते, "आपली आपन करा सोडवन " म्हणजे आपले भले आपन करायचे भटजी कशाला पाहिजे ? ,
१८)वेदांना तर खुप सुनावले आहे,संत मंडळींनी . गाढवाच्या पाठीवर ओझे वाहुन नेनारे वेदपाठी आहेत.असे तुकोबाराय म्हणतात.या परंपरेत आत्मा मोक्ष अमान्य आहे . पुनर्जन्म तर नसतोच असे तुकोबाराय म्हणतात .
साखरेचा नव्हे ऊस l आम्हा कैसा गर्भवास ll
बिज भाजोणी केली लाही l
जन्म मरण आम्हासी नाही ll
१९)म्हणजे एकंदरीत हा प्रवाह अब्राम्हणी आहे . वैदिकांची टिंगलटवाळी आणि नवा पर्याय देनारा.
२०)येथे परोपकार हेच खरे पुण्य आहे आणि परपिडा पाप आहे. ब्राम्हण म्हनतो आम्हाला दान द्या पुण्य लागेल. ब्राम्हण निंदा करु नका पाप लागेल . तुकोबाराय म्हणतात असे काही नसते. गरिबांची सेवा करा हेच खरे पुण्य.तुम्हाला इतरांना दुध तुप लोणी नाही देता नाही आले तर किमान ताक तरी द्या l हे ही नाही जमले तर पाणी तरी पाजा. आपल्या सोबत परोपकारच जानार . आपन केलेला परोपकारच आपली किर्ती वाढवेल . उगच शरिराचे लाड कशाला करता .कशाला सुखाच्या मागे धावता .
तुकोबाराय म्हनाले
" कोन आहे सांगा सुखाचा सांगाती ? "
एवढेच की हा सांप्रदाय एकेश्वरवादी आहे त्यांना निरइश्वरवादी बनावने महाकठीण ...
२१)आरती प्रकाराचे जनक संत नामदेव होत . नामदेवांच्या आधी आरती गाईली गेल्याचे वाचनात नाही. वैदिक परंपरेत यज्ञ तर वारकरी परंपरेत नामस्मरण फारतर आरती .
२२)या वारकरी परंपरेत गणपतीला स्थान नाही . म्हणून मंदिरात होणाऱ्या भजनांत, काकडा आरतीच्या अभंगामधे गणपतीची आरती गाईली जात नाही .
२३)दास रामाचा या शब्दांनी गणपतीच्या आरतीचा समारोप होतो . म्हणजे रामदास स्वामीच्या कुठल्यातरी शिष्याने ही आरती अलीकडे लिहीली असावी . गणपतीचे महत्व पेशव्यांनी वाढवले .
२४)तसेच दिंड्यांमधेही सुरुवातीची मुळ तिंडी तुकोबारायांची. त्याच दिंडीत वारकरी मंडळी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका नेत असत. नंतर ब्राम्हणांनी वाद घालुन संत ज्ञानेश्वर महाराजांची दिंडी वेगळी केली .आज सर्वांत जास्त कव्हरेज ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडीला दिले जाते.
२५) संत नामदेव महाराजांनी वैदिकांच्या ब्राम्हणी व्यवस्थेला जेव्हा पर्याय म्हणून विठ्ठल हे प्रतिक स्विकारले तेव्हा त्यांनी त्या विठ्ठलाचे महत्व वाढवनारे अनेक अभंग लिहीले .शाक्त ,शैव, वैष्णव या सर्वांचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या दारात अनुन उभे केले . गमतीशीर बाब म्हणजे सकाळी काकडा आरतीच्या अभंगात हे सर्व उल्लेख येतात . पहाट झाली आहे आणि पांडुरंग काही उठेना . त्याच्या दर्शनासाठी दारात विष्णुचे वाहान गरुड आणि रामाचे वाहान ( सेवक ) हनुमंत उभा आहे . सभा मंडपापासुन बाहेरच्या महाद्वारापर्यंत दाटी जमली आहे . पुढे ही गर्दी पार वाळवंटापर्यंत म्हणजे चंद्रभागेपर्यंत वाढत जाते . विठ्ठलाला उठवण्यासाठी चौघडे वाजंत्री वाजत आहेत . तरी काही विठ्ठल उठेना . शेवटी त्रिशूळ डमरू वाजवत गिरजेचा कांत म्हणजे महादेव येतो . तोही आपला दाराशी उभा रहातो .पांडुरंग उठेनात म्हणून मग रुखमाईला विनवण्या सुरु होतात .
राही रुखमाबाई तुम्हा येवु द्या दया l शेजे हलवूनी जागे करा देवराया ll
काय मोठेपण आहे या पंढरीच्या राणाचे .. इतके दाराशी जमलेत आणि हा भाव खातोय .
शेवटी
झाले मुक्त द्वार लाभ झालासे रोकडा l विष्णुदास नामा उभा घेवूनी काकडा ll
नामदेवराय आरती करतात . मागे डोळे झाकुन जणी उभी आसते .
हे एवढे महत्व वाढवल्यामुळे इतर पंथ सांप्रदायाकडे जानारा भोळाभक्त वर्ग विठ्ठलाशी एकरुप झाला ..
२६)मग या सांप्रादायात आनेकजन गडेलगुप झाले . म्हणजे सामवले . आलीकडे जन्माला आलेले आनेक साधु संत सुद्धा या सांप्रादायात दिंडीच्या रुपाने पंढरीला जायला लागले . गजानन महाराज सुद्धा शेवटी या सांप्रादायात विलीन झाले . त्यांची शेगावहुन पंढरपूरला दिंडी असते . फक्त स्वामी समर्थ आणि साईबाबा मात्र इतके अखडु आहेत की ते या सांप्रदायाला शरण यायला तयार नाहीत. ते आपली स्वतंत्र ओळख टिकवून आहेत.
२७) ह्या दिंड्यान्मधे आलीकडे आनेक नव्या महाराजांच्या दिंड्यांची भर पडत आहे . भविष्यात आजुन एक दिंडी वाढनार आहे , ती म्हणजे एकदाही किर्तन न केलेल्या ह.भ.प मनोहरपंत भिडे महाराज सांगलीकर यांचाही दिंडी सोहळा पांढरीकडे निघेल .
ह.भ.प.धर्मकिर्ती महाराज परभणीकर
9970744142
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
कॉपीराईट आपल्याकडेच. मुद्दे चोरु नयेत .
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦