Thursday, 15 December 2016

अर्नेस्टो चे गव्हेरा एक क्रांतीवादळ

♦♦♦♦♦♦♦♦♦♦
ll व्यक्तीवेध आणि क्रांतीस्त्रोत ll
      
         १)अर्नेस्टो चे गव्हेरा

१९५९ मधे क्युबाच्या राष्ट्रीय ब्यांकेचे अध्यक्ष आणि त्यानंतर क्युबाचे उद्योगमंत्री तसेच क्युबाचे राष्ट्रीय नेते फिडेल केस्ट्रो यांच्या नंतर दोन नंबरवर आपले स्थान पटकवनारे ,आपली मायभुमी सोडुन  फिडेल केस्ट्रो बरोबर क्युबाच्या स्वातंत्र्यासाठी दम्याचा आजार शिगेला पोहंचला आसतानाही लढा देनारा एक तरुण म्हणजे चे गव्हेरा.अर्नेस्टो चे गव्हेरा.

बरे क्युबा स्वंतत्र झाला . त्या देशाने चे ला नागरिकत्वही बहाल केले . एवढी मोठ मोठी पदेही दिली. पन हा तरुण पुन्हा सर्व सोडुन निघाला गरिब देशांच्या मदतीला स्वातंत्र लढा उभा करण्यासाठी
कुणी आसेल का बरे की सुखासीन जिवन सोडुन पुन्हा दलदलीत भुके कंगाल जीवन जगण्यासाठी आपलाला आजार घेवुन दर्याखोर्यांत फिरणारा. बोलिव्हियाच्या स्वांतत्र्यासाठी जंगलात आणि नद्यांच्या महापुरात हा तरुण स्वातंत्र्यचा लढा उभारत होता . सडलेले कुत्र्यांचे ,प्राण्यांचे मांसही या तरुणाला खावे लागले.अन्नाची वनवन, कुणाचेही सहकार्य नाही . फिडेलशी आणि क्युबाशी संपर्क तुटलेला . आशा भायाण वातावरणात चे पकडला गेला. त्याला बोलिव्हीयन सैनिकांनी एका शाळेत नेले . बरेच प्रश्न विचारले आणि शेवटी धाडधाड गोळ्या घातल्या . प्रेतासग्गट ती शाळा उडवून दिली. आज अर्नेस्टो चे गव्हेराची कुठे साधी समाधी सुद्धा नाही . पण हा तरुण जगाच्या तरुणांची प्रेरणा बनला आहे . आनेक देशांतल्या तरुण तरुणींच्या टिशर्टवर चे दिसतो . आनेकांच्या फेसबुक प्रोफाइलवर किंवा whatsup dp वर चे आसतो. चे हे जग सोडुन क्रांतीस्त्रोत बनुन गेला तो ३९ व्या वर्षी.

फिडेल चे बद्दल म्हंतात
" चे सारखा माणुस एकच . चे गव्हेरा "
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
नितीन सावंत परभणी
9970744142
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦     


शास्वत मुल्यांसाठी संघर्ष करा

♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
    
           ll  विचारवेध ll

     नितीन सावंत परभणी
     9970744142
शाश्वत आणि मुलभूत मुल्ये कुणालाच नको आहेत काय ?
कुणी असा आहे का की ज्याला सत्य नकोय.कुणी आहे का ?ज्याला न्याय,समता नकोय,
असा कुणी आहे काय ?ज्याला अन्याय आवडतो.
हि शाश्वत नैतिक मुल्ये जर अंतिम असतील आणि  या मुल्यांच्या प्रस्थापनेशिवाय आपले काही भागतच नसेल.हिच मुल्ये एकमेव आणि आपल्यासाठी अतीमहत्वाची असतील तर त्या मुल्यांना रुजवण्यासाठी आपन का बरे संघर्ष करत नाहीत.
सत्याला सत्य मानुन सत्याची बाजू घेवून आपण सत्यासाठी संघर्ष केला पाहिजे.खऱ्याला खरे मानुन आणि खोट्याला खोटे मानुन खऱ्यासाठी आपन संघर्ष केला पाहिजे.
आपल्या श्वासाएवढे महत्व या मुल्यांना आहे.न्यायच नसेल,स्वातंत्र्य नसेल तर गुलामीतला श्वास काय कामाचा ? याच मुल्यांसाठी आपल्या पुर्वजांनी फार मोठा संघर्ष केला आहे.अनेक महापुरुषांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.ते या मुल्यांच्या प्रस्थापनेसाठी खस्ता खात मातीत गेले.केवढा संघर्ष केलाय आपल्या पुर्वजांनी.तरीही अजुनही ती मुल्ये प्रस्थापित करण्यात आपल्याला यश आलेले नाही.
काय आपल्या महापुरुषांचा संघर्ष पुर्ण झाला आहे ? काय त्यांना जे साध्य करायचे होते ते साध्या झाले आहे ? आपल्या पुर्वजांचा लढा यशश्वी झाला आहे काय ?
झाला नसेल तर तो संघर्ष पुर्ण कुणी करायचा ? त्याची जबाबदारी कुणावर आहे ? कोनी करायचे उरलेले काम ?
बायको पोरे,चिक्कार पैसा,गलेलठ्ठ पगारी,गाड्या, बंगले यामुळे हा संघर्ष आपोआप पुर्ण होनार आहे काय ?

कबिरा खडा बाजार मे काठी लिये हाथ l
जो आवे घर फुकन के वही चलेगा साथ ll

या शाश्वत मुल्यांसाठी पुर्वजांच्या त्यागाला डोळ्यासमोर आपण संघर्ष करुया.माणुसकीसाठी न्यायासाठी झगडुया.

क्रांती हा सर्वहरा वर्गच करतो
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦