♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
ll विचारवेध ll
नितीन सावंत परभणी
9970744142
शाश्वत आणि मुलभूत मुल्ये कुणालाच नको आहेत काय ?
कुणी असा आहे का की ज्याला सत्य नकोय.कुणी आहे का ?ज्याला न्याय,समता नकोय,
असा कुणी आहे काय ?ज्याला अन्याय आवडतो.
हि शाश्वत नैतिक मुल्ये जर अंतिम असतील आणि या मुल्यांच्या प्रस्थापनेशिवाय आपले काही भागतच नसेल.हिच मुल्ये एकमेव आणि आपल्यासाठी अतीमहत्वाची असतील तर त्या मुल्यांना रुजवण्यासाठी आपन का बरे संघर्ष करत नाहीत.
सत्याला सत्य मानुन सत्याची बाजू घेवून आपण सत्यासाठी संघर्ष केला पाहिजे.खऱ्याला खरे मानुन आणि खोट्याला खोटे मानुन खऱ्यासाठी आपन संघर्ष केला पाहिजे.
आपल्या श्वासाएवढे महत्व या मुल्यांना आहे.न्यायच नसेल,स्वातंत्र्य नसेल तर गुलामीतला श्वास काय कामाचा ? याच मुल्यांसाठी आपल्या पुर्वजांनी फार मोठा संघर्ष केला आहे.अनेक महापुरुषांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.ते या मुल्यांच्या प्रस्थापनेसाठी खस्ता खात मातीत गेले.केवढा संघर्ष केलाय आपल्या पुर्वजांनी.तरीही अजुनही ती मुल्ये प्रस्थापित करण्यात आपल्याला यश आलेले नाही.
काय आपल्या महापुरुषांचा संघर्ष पुर्ण झाला आहे ? काय त्यांना जे साध्य करायचे होते ते साध्या झाले आहे ? आपल्या पुर्वजांचा लढा यशश्वी झाला आहे काय ?
झाला नसेल तर तो संघर्ष पुर्ण कुणी करायचा ? त्याची जबाबदारी कुणावर आहे ? कोनी करायचे उरलेले काम ?
बायको पोरे,चिक्कार पैसा,गलेलठ्ठ पगारी,गाड्या, बंगले यामुळे हा संघर्ष आपोआप पुर्ण होनार आहे काय ?
कबिरा खडा बाजार मे काठी लिये हाथ l
जो आवे घर फुकन के वही चलेगा साथ ll
या शाश्वत मुल्यांसाठी पुर्वजांच्या त्यागाला डोळ्यासमोर आपण संघर्ष करुया.माणुसकीसाठी न्यायासाठी झगडुया.
क्रांती हा सर्वहरा वर्गच करतो
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
No comments:
Post a Comment