Wednesday, 16 November 2016

शिवरायांचा शाक्त राज्याभिषेक सोहळा

♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦

🔶शक्तीचे उपासक ते शाक्त.आर्थात स्त्रीसत्ताक ,मात्रसत्ताक गणपद्धतींचा वारसा पुढे चालवनारे शाक्त म्हनून गणले जातात.
मध्ययुगीन भारतात हा शाक्त वारसा पुढे चालवण्याचे फार मोठे श्रेय छत्रपती संभाजी महाराजांस जाते.त्यांच्या वाचन लिखानामुळे छत्रपती शिवरायांनी शाक्त विचारधारेला राजाश्रय दिला.शिवरायांच्या पहिल्या वैदिक राज्याभिषेक सोहळ्यातल्या चुका निदर्शनास आनुन देण्याचे काम संस्क्रुत पंडीत छत्रपती संभाजी महाराजांनी केले होते.आणि पुढे ते शिवरायांच्या वैदिक राज्याभिषेक सोहळ्यापासून शाक्त राज्याभिषेक सोहळ्या पर्यंत रायगडावरच होते.
वैदिक राज्याभिषेक सोहळ्यात वैदिकांचे म्हणने होते की
"राजा केवळ नामधारी आसेल अंतीम निर्णय धर्मपुरोहीत घेतील.आणि राजा चुकला तर त्याच्या माथी राजदंड मारण्याचा आधीकार ब्राम्हणांस आसेल." हा वैदिकी निर्णयास विरोध दर्शवत छत्रपती संभाजी महाराजानी निश्चलपुरी गोसावी यांच्या हस्ते शाक्त राज्याभिषेक सोह्ळा घडवून आनला.वैदिक राज्याभिषेक सोहळ्यातल्या चुका आणि आणि अंतीम निर्णय धर्मपुरोहीतांचा ह्या आसल्या गोस्टी मनाला लावून घेतल्यामुळे किंवा पैशांची ब्रम्हव्रांदांकडुन झालेली लुट म्हना किंवा अन्य कारनाने म्हना वैदिक राज्याभिषेक सोहळ्याच्या नंतर केवळ 11 दिवसांनी 17 जुन 1674 रोजी माँसाहेब जिजाऊंना या सर्व घटना सहन न झाल्याने त्यांचे निधन झाले.
छत्रपती संभाजी महाराज्यांच्या सासुरवाडीकडून त्यांस शाक्त धर्माचा वारसा मिळाला होता.29 एप्रिल 1661 ला शिवरायांनी श्रगांरपुर काबीज केले .आणि त्यानंतर त्यानी तेथील पिलाजी शिर्के यांच्या राजसबाई यांच्याबरोबर संभाजी महाराजांचे लग्न लावून दिले.राजसबाई म्हंजेच ज्यांच्या नावे भविष्यात "श्री सखी रान्यी जयती " ही राजमुद्रा निघाली त्या शाक्तराणी येसूबाई होत. श्रंगारपुर हे शाक्त धर्माचे फार मोठे केंद्र होते.आणि या शाक्त संस्क्रुतीचे वाहक शिर्के होते म्हनून वैदिकानी विनाकारण शिर्के बदनाम केले .आजही रायगडावर शिर्क्यांचे कुलदैवत शिर्काई देवीचे मंदिर आहे .शिर्केच नव्हे तर छत्रपती संभाजी महाराजही बदनाम केले गेले ते शाक्त आसल्यामुळेच.
हा राज्याभिषेक सोहळा 24 सप्टेंबर आर्थात नउरात्रोत्सवात पार पडला होता.शाक्त धर्माचा सर्वात मोठा सण हा नउरात्रोत्सव आसतो.वैदिक धर्माच्या द्रुष्टीने हा काळ अशुभ मानला जातो .कारण या काळात विष्णू झोपलेला आसतो.म्हंजे वैदिकांचा विष्णू झोपलेला आसताना शिवरायांनी  नउरात्रोत्सवात हा  राज्याभिषेक सोहळा करवून घेतला.
पुर्वीसारखाच आवाढव्य खर्च होउ नये म्हनून पुर्वीच्याच रत्नजडीत सोन्याच्या सिंहासनात आसलेली इंद्रप्रतीमा काढून त्या जागी दुसरी लाकडाची असंदी (प्रतीमा) ठेवली . आणि साध्या पद्धतीने हा शाक्त राज्याभिषेक सोहळा पार पडला.....

♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦

संदर्भ :१) वा .सी . बेंद्रे -छत्रपती शिवाजी महाराज उत्तरार्ध.
२) कृष्णाजी केळुस्कर यांचे शिवचरित्र.
३) शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोन ? मुहम्मदी कि ब्राम्हणी . - कॉ. शरद पाटिल
४)छत्रपती संभाजी महाराज - वा . सी . बेंद्रे .
५)शिवाजी शुद्र कसा ? - डॉ आशोक राणा .
६) छत्रपती शिवाजी महाराज - श्रीमंत कोकाटे .
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦

नितीन सावंत ,परभणी
9970744142

No comments:

Post a Comment