Saturday, 12 November 2016

कॉ. शरद पाटील यांचे नवे तत्वज्ञान


*************************

कुठल्याही आजाराचे अचुक निदान झाले तरच  पुढील उपचार निट करता येतात.आमचा पेशंट कोमात गेला आहे . त्याला आज दाखवू उद्या दाखवू म्हटल्याने जमेल काय ?

या देशाचेही तसेच झाले आहे . हा देश सडत चालला आहे . बेकारी बेरोजगारी आणि शिकून कामे मागनारे हात प्रचंड वाढलेत . या देशात नोकरीच्या १६ जागांसाठी विस हजार फॉम भरले जातात . ऱोज सकाळी चौका चौकात हमाल , रोजंदार खोेरे ,विळा , टोपले घेवून कामे मागत उभे आसतात . कुठलाही पेपर उघडा 'कुपोषनाने दहा बालके दगावली , आदिवास्यामधे कुपोषनाचे प्रमाण जास्त' आशा बातम्या रोज आसतात . कुपोषन हे श्रीमंतांनी दिलेले गोंडस नाव आहे .कुपोषन म्हनजे भुकबळी . या देशात माणसे भुकेने मरावीत लाजीरवानी बाब आहे . माता म्हनू म्हनू अमेरीकेच्या मार्केटमधे तिला येथेच्छ भोगण्याचे काम हे ब्राम्हण- बनिया, भांडवलदार- सरंजामदार करत आहेत .
एकीकडे  शेतात कमी पिकेना म्हनून शेतकरी अत्महत्या करत आहेत तर दुसरीकडे शेतकी विद्यापीठे एकदा वापरलेले बी परत उपयोगात येवू नये , आमच्याच कंपनीकडे बी घ्यायला शेतकऱ्यांने यावे यासाठी नवे शोध लावत आहेत . म्हने देश महासत्तेकडे वाटचाल करत आहे .

या ब्राम्हण, बनिया, भांडवलदार सरंजामदार जात-वर्ग युतीला भेदून जर येथे समाजवादी लोकशाही क्रांती करायची असेल तर तसे नवे तत्वज्ञान उभारावे लागेल .

त्याच दिशेने आपले आयुष्य पनाला लावून ज्यांनी नवे तत्वज्ञान नवी शस्त्रे बहाल केली ते प्राच्यविद्यापंडीत कॉम्रेड शरद पाटील होत .

या देशातील व्यवस्थेचे योग्य आकलन पहिल्यांदा त्यांनीच केले . हा देश निमभांडवली निमसरंजामी जातवर्गीय ब्राम्हणी व्यवस्थेत आडकला आहे . त्यातून त्याला बाहेर काढायचे असेल तर कॉ शरद पाटील यांचे :

१) मार्क्सवाद:फुले आंबेडकरवाद

२) अब्राम्हणी विधायक बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवादी अन्वेषण  पध्दती

३) अतित-सद्य-भविष्य वेधी प्रमाणशास्त्र

४) जानीवनेनीन्वेषी तर्कशास्त्र

५) सौत्रांतिक मार्क्सवाद (तत्वज्ञान)

६) अब्राम्हणी सौंदर्यशास्त्र

७) अब्राम्हणी, विधायक इतिहासलेखन शास्त्र

हे त्यांनी दिलेले समग्र तत्वज्ञान, क्रांतिशास्त्र अभ्यासावे लागेल . आणि ते तत्वज्ञान समाजाला लावत उभा करावा लागेल एक नवा क्रांतीलढा ,
वर्गजातस्त्रीदास्यांताचा !!

नितीन सावंत , परभणी
9970744142
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦

No comments:

Post a Comment