Saturday, 12 November 2016

कॉम्रेड शरद पाटलांची - अब्राम्हणी विधायक बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवादी अन्वेषण पद्धती

♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
         ll विचारवेध 5 ll

" कॉम्रेड शरद पाटलांची -
अब्राम्हणी विधायक बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवादी अन्वेषण पद्धती"

सध्याला सर्व परिवर्तनवादी चळवळींच्या एकुण प्रचार प्रसाराकडे पहाता अत्यंतिक नकाराचा सुर त्यांच्याकडुन येताना दिसत आहे . आपन जेव्हा प्रबोधनाला सुरुवात करतो तेव्हा ती सुरुवात नकाराने होते . प्रस्थापीत ब्राह्मणी व्यवस्थेची कुठलीही गोष्ट खोडण्यासाठी आपण  जेवढे पुढे सरसावतो तेवढेच नव्या मांडणीसाठी आपन अग्रही नसतो . या नकारात्मकातेतून लोक तुटतात . सतत खोडत बसण्याने लोक जोडले जाण्याऐवजी तोडले जातात . हा वाइट तो वाइट मग चांगला कोन ? असा प्रश्न आपल्या अत्यंतिक नकारातुन लोक विचारतात . सध्याला बर्याच संघटना या नकारात्मक मांडणीच्या अत्यंत आहारी गेल्या आहेत . ह्या संघटणा समविचारी संघटांचे विश्लेषण सुद्धा नकारात्मकतेने करतात. एक परिवर्तनवादी गट दुसर्या आपल्याच परिवर्तनवादी गटावर या नकारात्मकातेतुनच तुटून पडतो . यातून काहीच साध्य होत नाही .

म्हणून ज्यांचे रस्ते चुकलेले आहेत . ज्यांना रिझल्ट मिळत नाहीत. त्यांनी आता तरी बदलावे .
यासाठी कॉ . शरद पाटांनी चळवळीसाठी एक अत्यंत महत्वाची अन्वेषण पद्धती दिली आहे .
तिला
'अब्राम्हणी विधायक बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवादी अन्वेषण पद्धती '
म्हणतात .

अब्राम्हणी म्हणजे पुरुषसत्ताक वर्चस्व नाकारुन समता स्वातंत्र्य आणि लोकशाही देनारी मात्रसत्ताक व्यवस्था मानने किंवा त्या दृष्टीने पहाणे होय.

विधायक हा शब्द विघातक शब्दाच्या विरुद्ध आहे . आपन विघातक टाकुन दिले पाहिजे . विघातक मांडणी करता कामा नये . आपले विश्लेषण विधायक असावे .

बहुप्रवाही म्हणजे सर्वंगाचा विचार करणारी . वर्गाचा अभ्यास ,जातीचाही अभ्यास ,जातवर्गाचाही अभ्यास आपन जिथे करतो ती बहुप्रवाही पद्धती .

ऐतिहासिक भौतिकवाद म्हणजे भौतिकवादी पद्धतीने इतिहासाचे विश्लेषण करणे .

अब्राम्हणी साहित्य आणि संस्कृतीच्या आधारे आपल्याला पुरुषी व्यवस्थेला नकार द्यायचा आहे . आणि तो नकार विधायक असनार आहे .

अशा पद्धतीने आपन सविस्तरपणे या पद्धतीचा अभ्यास केला पाहिजे .
या मेथडोलॉजीवर मानवमुक्ती मिशन मार्गक्रमण करते .

♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
नितीन सावंत , परभणी 9970744142
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦

No comments:

Post a Comment