Sunday, 19 August 2018

#निर्ऋतीचे_वारसदार_नैऋत_अाणि_चौपट

जय भारत

सप्तसिंधुत, निर्ऋती ऋती गणाच्या चार ज्ञातींची गणमुख्या होती. ती नियतकालिकांत, समया प्रमाणे (समय = ऋत = जगत्चालक नियमाप्रमाणे, order) शेतजमीनीचे, धनधान्याचे न्याय्य वाटप करत असे.

नदीच्या गाळपुराने, नदीकिनारीच्या शेतजमीनीच्या मिटवलेल्या बांधामुळे, ज्ञाती-ज्ञातीमध्ये शेतजमीनीच्या पुनर्वाटपावरुन होणारी संभाव्य भांडणे टाळण्यासाठी, ती शेतजमीनीचे ज्ञातींमध्ये पुनर्वाटप करत असे. हे शेतजमिनीचे पुनर्वाटप न्याय्य असावे यासाठी तीने पटाची, पटावरील घराची ज्ञातीच्या कुलाच्या संख्येएवढीच घरे बनवली.

शेतजमीन कमीजास्त चांगली-वाईट असू शकते. तिची प्रतवारी उत्तम, मध्यम, कनिष्ठ ठरवून प्रत्येक ज्ञातीच्या पटावर कुलांच्या तीन रांगा केल्या. प्रत्येक कुलाच्या वाटणीला उत्तम, मध्यम, कनिष्ठ अशी शेतजमिन वाटणीत येणार. एखाद्या कुलाला उत्तम तर दुसरया कुलाला कनिष्ठ शेतजमीन पुनर्वाटपात येऊन न्याय-अन्यायाचा प्रश्न उभा राहू नये यासाठी हा समतावादी पट निर्ऋतीने बनवला. चार ज्ञातींचे चार पट मिळून बनला चौपट.

याच पटाचा अर्थ उलट-सुलट लावत, व्यवहारात कधी न्यायासाठी कधी अन्यायासाठी त्याचा वापर मागील शतकांपर्यंत गावोगावी सर्रास होत आला तो हा पट, निर्ऋतीचा चौपट.

अत्रेंच्या 'गावगाड्या'तील काही संदर्भ स्पष्ट करतात की पटाचा वापर अाता-आत्तापर्यंत कसा होत आला आहे. निर्ऋतीचे वारसदार तो कसा वापरत आले आहेत.

१. कौल घेणे म्हणजे महत्वाचे निर्णय घेण्यासाठी 'इष्ट'देवतेची मदत घेणे त्याला पट्टा म्हणतात.

२. गावाच्या जमाबंदीच्या ताळेबंदाला पट्टा किंवा इजारपट म्हणतात.

तो पाटलाजवळ असतो आणि पाटिल त्याप्रमाणे वसूल करतो.

३. पाटिल, पटवारी हे जुळे - पट किंवा पट्टा या शब्दावरुन बरेच संभाव्य दिसते.

४. पट्ट म्हणजे मुख्य, या शब्दापासूनही पाटील शब्द निघाला असेल.

५. ज्यांच्याजवळ पट्टा किंवा पट असतो आणि त्याबरहुकूम जे पट्टी, सारा, अगर सार्वजनिक वर्गणी वसूल करतात ते पाटील-पटवारी.

६. तेव्हां सबंध जाती / जमातीत जो  स्मरणाचा धड (चांगल्या प्रकारचे स्मरण) असून लोकांवर ज्याचे वजन आहे अशा बुध्दिमान व मुख्य माणसाजवळच जातीचा पट राहावयाचा.

७. असे पट जातींच्या मुख्याकडे असत.

वि-राज घोगरे

मानव मुक्ती मिशन
Satyashodhak caste-annihilationist kashtkari sabha

Monday, 13 August 2018

ll संतांची वारकरी मुहमेंट ll

ll संतांची वारकरी मुहमेंट ll


हिच व्हावी माझी आस l जन्मोजन्मी तुझा दासll पंढरिचा वारकरी l वारी चुकू न दे हरी ll                  संत संगे सर्वकाळ l अखंड प्रेमाचा कल्लोळ ll              चंद्रभागे स्नान l तुकाम्हने हेची दान ll

          - संत तुकोबाराय

भारतीय सरंजामशाहीत वर्ग नव्हते तर सुरुवातीला वर्ण आणि नंतरच्या काळात जाती होत्या,ही कॉम्रेड शरद पाटलांची मांडणी.याद्वारे भारतीय सरंजामशाहीकडे पाहिल्यावर आपल्याला भारतीय इतिहासाचे विधायक ऐतिहासिक भौतिकवादी आकलन योग्य रित्या करता येते.भारतात जिथे जिथे सुबत्ता आली, तिथे तिथे ब्राम्हण या जातीच्या लोकांनी राजेपद नामधारी बनवून कारभार स्वताकडे ठेवला आणि आपले सांस्कृतिक वर्चस्व निर्माण करुन दिर्घकालीन सत्ता उपभोगली होती.

मध्ययुगीन भारतीय इतिहासात ज्या ज्या राज्यव्यवस्था भरभराटीला आल्या, त्यात राजे  महाराज्यांनी शेतकरी, कष्टकरी, भटके,आदिवासी जातींजमातींचे भले करण्याऐवजी मोठमोठी मंदिरे बांधली आणि ब्राम्हणी हित जोपासले.यात ब्राम्हणांच्या सांस्कृतिक राजकारणाला अनेक राजे बळी पडले होते.मंदिर संस्कृतीचे ब्राम्हणी स्तोम माजल्याने सर्वसामान्य वर्ग धर्मसंम्मत मार्गाने शोषन पिळवणूकीला बळी पडला होता.

         या ब्राम्हणी सांस्कृतिक राजकारणाला मध्ययुगीन भारतात विरोध दर्शवला गेला तो संत चळवळीच्या माध्यमातून. संत चक्रधरस्वामी यांनी महानुभाव चळवळ उभी करुन ब्राम्हणी सांस्कृतिक राजकारण संपवायला सुरुवात केल्याने त्यांची रामदेवराय यादवाच्या भर दरबारात ब्राम्हणांच्या शिफारशीवर हत्या करण्यात आली होती.

महात्मा बसवेश्वर यांनी याच ब्राम्हणी सांस्कृतिक राजकारणाला च्यालेंज करुन बंड पुकारल्याने त्यांच्यासह सर्वच अनुयायांच्या हत्या झाल्या.

सर्वात मोठी च्यालेंजेबल मुहमेंट उभी केली ती संत नामदेव यांनी. या मुहमेंटचे नाव वारकरी किंवा भागवत धर्म होते.यात संत नामदेव यांनी ब्राम्हणी विषमतावादी ग्रंथ नाकारून अभंग नावाने स्वतंत्र साहित्य निर्मिती केली होती.ब्राम्हणी तिर्थक्षेत्रे नाकारून पंढरपूर हे स्वतंत्र तिर्थक्षेत्र प्रसिद्धीस आनले होते.प्रत्येक गोस्टीला त्यांनी पर्याय दिला होता. सर्व ब्राम्हणी देव देवता नाकारून संत नामदेव यांनी स्वतंत्र मुर्तीसह विठ्ठल हा देव पर्याय म्हणून पुढे केला होता.जुने व्रतवैकल्ये नाकारून एकादशी सारखे नवे अब्राम्हणी व्रत पुढे आनले होते. यात मोठा प्रचारक वर्ग त्यांनी तयार केला ज्याला त्यांनी संत म्हटले. ब्राम्हणी धर्मात स्त्रीला हिन लेखले जायचे. लिखानाचे अभिव्यक्त होण्याचे आधिकार नव्हते. नामदेव यांनी स्त्रीला नेतृत्व दिले , विनेकरी बनवले, अभंग लिहायला शिकवले .

       या घटनेमुळे संत नामदेवांसह त्यांच्या घरच्या १४ जनांना खुप त्रास सहन करावा लागला .पुढे सर्व प्रचारक असनारे संतही वेळोवेळी व्यवस्थेने त्रस्त केले गेले.

       महाराष्ट्रात सर्वात जास्त आणि दीर्घकाळ आपला प्रभाव उमटवनारे हेच वारकरी आंदोलन आहे. ज्याची सुरुवात संत नामदेव यांनी केली होती. आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी हा पर्याय त्यांनीच दिला होता. वर्षातुन दोन वेळा पंढरपूरच्या वाळवंटात हे आधिवेशन होत असे.यात गाव पातळीवर कोनते अभंग घेऊन जागृती करायची याचे ठराव पारित होत असत. पुढल्या काळात संत तुकोबारायांसारखे महान व्यक्तिमत्त्व सुद्धा ब्राम्हणी सांस्कृतिक राजकारणापुढे त्रस्त करुन सोडले गेले.संत तुकोबारायांना सुद्धा खुप त्रास देण्यात आला.

        संत हे समतावादी होते. त्यांची आध्यात्मिक असनारी समता सहभोजन करुन जाती अंतकही बनली होती.

उंचनिच काही नेने भंगवंत म्हनत संत तुकोबाराय म्हणतात

आमचा देव संत रोहीदासाच्या सोबत चामडे रंगवतो , सज्जन कसायासोबत मांस विकतो , चोखामेळ्यासोबत ढोरे ओढतो , दासी जनी सोबत शेन वेचतो, आमचा देव सवळ्यातला नाही. तो शुद्र नामदेवांच्या घरी जेवतो , कबिराचे शेले विनतो, मीराबाईसाठी विष पितो,

आमच्या देवाला उचनिच भेदभाव नसतो.

कर्म हाच धर्म आहे. वर्णधर्माने कुनी ग्रेट नसते. याबद्दल तुकोबाराय म्हणतात

" वर्णधर्माभिमाने कोन झाले पावन l ऐसे द्या सांगुन मजपाशी ll "

सर्व संत वर्णजातीअंतक होते.त्याचे कितीतरी पुरावे देता येतील.संत मेळ्यात उच्चजातीय संत ज्ञानेश्वर महाराजांना संत चोखोबारायांच्या सोबत नामदेवरायांनी जेवायला लावले होते. मग संत ज्ञानेश्वर म्हणतात

यातीकुळ माझे गेले हरपून l श्रीरंगावाचुन नेनो काही ll 

त्याकाळी हे धाडस करणे अत्यंत जिकरीचे काम होते.तो काळ जातीव्यवस्था वर्णव्यवस्थेच्या कडक अमलबजावणीचा काळ होता.संत नामदेव संत चोखोबारायांसारख्यांना मंदिराबाहेर हाकलून दिले जात होते.तरिही संतांनी बंड केले.या संतांच्या सांस्कृतिक राजकारणाला लक्षात घेतले असते तर बऱ्याच पुरोगामी पक्ष संघटनांची सत्ता आली असती.

            आज घडीला जो जे वांछिल तो ते लाहो म्हनने समतावादी आहे , मार्क्सवादी आहे .

किंवा दया करणे जे पुत्रांशी l तोची दासा आणि दासी ll ( दास दासिंवर मुलांसारखी दया करावी , वागणूक द्यावी) हे तर जानिव नेनीवेसह डिकास्ट होण्याचे लक्षण आहे.

       वारकरी या अब्राम्हणी परंपरेतल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

ह.भ.प.धर्मकीर्ती महाराज परभणीकर

9970744142


♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦

Saturday, 4 August 2018

ll घुसखोरी ll

घुसखोरी l 

                  अबिर गुलाल उधळीत रंग l या अभंगाचा पेटीवर परिचय देने सुरु होते. एक मोठे संगीतकार आपल्या विद्यार्थ्यांना तो अभंग वेगवेगळ्या पद्धतीने गाऊन दाखवत होते.

अबिर गुलाल उधळीत रंग l
नाथा घरी नाचे सखा पांडुरंग ll

             एका विद्यार्थ्याने म्हनण्याचा प्रयत्न केला.त्याला थांबवत गुरुजी म्हनाले, "अभंग चोखोबांचा आहे.भावविभोर होऊन गायला हवा.अगदी उत्कटता दिसली पाहिजे."

         पोरगा चेहऱ्यावर उत्कटता आणु पहात  होता आणि मी पयारीला उत्कट भाव घेवुन उभा असलेला चोखोबां डोळ्यासमोर अनत होतो.

उंबरठ्याशी कैसे शिवु आम्ही जातीहीन l
रुप तुझे कैसे पाहु त्यात आम्ही दीन ll

            पांडुरंगाच्या पायरीला उभा राहुन चोखोबा आर्जवं करत वास्तवाचे भान करुन देत आहे. सांग पांडुरंगा उंबरठ्याला कसे शिवु ?आम्हाला तु हिन जातीचे केलेस.सांग विठोबा तुझे रुप कसे पाहु? आम्ही दिन आहोत.

इकडे गुरुजी हरकती काढत होते आणि हरकत कशी काढावी हे खुबीने सांगत होते.आणि मी विचार करत होतो ,काय हरकत होती चोखोबांना मंदिरात घेतले असते तर.जगबुडी येनार होती का ? गुरुजी ओरडले लय सोडु नका.त्यांना विद्यार्थ्यांनी लय सोडलेली अवडत नव्हती आणि मला चोखोबाची ती अर्त करुणा सहन होत नव्हती.तो सुद्धा मर्यादांची पायरी ओलांडत नव्हता. 
पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग l

       "आरे वर जा वर , उरचा स्वर घे " ,  सर ओरडले.मी ही मनात ओरडलो "अरे चोखोबा जा ना वर,वर जा,घे वरची भूमिका.आरे तुझा बंका बरा,शिव्या घालतो तो.काय रे ही केलवानी आर्जव .." 

वाळवंटी गाऊ आम्ही , वाळवंटी नाचु l
चंद्रभागेच्या पानने आम्ही अंग अंग न्हाऊ ll

        याला मंदिरात जा म्हनालो तर हा वाळवंटात गेला चंद्रभागेच्या तिरी किर्तनाला . बघ ती जनी शिव्या घालते रे चोखोबा, अरे अरे विठ्या मुळ मायेच्या कारट्या.तुझी रांडरंडकी होवो,तुझे मढे बसो. आणि तु तर हार मानलीस.वाळवंटात गेलास तिकडे .

सांगिताचे सरही विद्यार्थ्यांना असेच रागवले लय का सोडुन गेले म्हणून .

विठ्ठलाचे नाम घेवु होऊनी निसंग l

या चोखोबाला कोनाचाच संग नाही म्हणून म्हनतो होऊनी निसंग.अरे काय हे जीने.घुस ना त्या संतमंडळात. तुझ्या भक्तीबद्दल आम्हाला काहीही शंका नाही. बघ तिक्डे नामदेव आहेत ,जनाबाई आहेत, गोरा कुंभार आहेत , संत कबिर आहेत , संत सावता महाराज आहेत.

आषाढी कार्तीकी भक्तजन येती l
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती ll
चोखा म्हने नाम घेता भक्त होती दंग l

माझे मन लागेना , मी बाहेर आलो . विचार करु लागलो , वारकरी सांप्रदायात नाथ फक्त एकनाथ महाराजांना म्हणतात. मग या अभंगातले नाथ तेच का ?
नाथाच्या घरी पांडुरंगाने पाणी भरल्याचे,घरची कामे केल्याचे मी आइकलेय.पन तो नाचल्याचे एकले नाही.आणि नाथमहाराजांना हा नाचलेला अवडेल का ? बरे चोखोबांच्या नंतर ३०० शे वर्षांनी हे नाथ महाराज होऊन गेले.चोखोबा आधीच हे कशाला म्हनतील. म्हणजे हे ते नाथ नव्हेत.
मग मी विचार करु लागलो , पांडूरंगाने चोखोबांचे ढोरे ओढले , त्याने जनी सोबत शेनाच्या गवऱ्या लावल्या , त्याने सज्जन कसायासोबत मांस विकले , मग तो नाचला कुणाकडे ..

अरे हो तो नामदेवांच्या किर्तनात नाचला.तो दोन जनांच्या सोबत नाचला एक मिरे सोबत पद घुंगरू बांध के आणि दुसरा नामदेवांच्या किर्तनात.
संत जनाबाईच म्हनतात
नामदेव कीर्तन करी l पुढे देव नाचे पांडुरंग ll

कोण्यातरी घुसखोराने नामा घरी नाचे सखा पांडुरंग चे नाथा घरी केले .

नामा काढुन नाथा घुसवले. कारण चोखोबाराय नामदेवांना नाथ म्हनतच नव्हते .तिथे नामाच. नाथा नव्हे.

काय ही दुर्दशा रे चोखोबा तुझी मरण्यापूर्वीही आणि मेल्यानंतरही ...

ह.भ.प. धर्मकीर्ती महाराज परभणीकर
9970744142

♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦