Tuesday, 31 August 2021

♦️तुटलेपणाची , एक्कलकोंडेपणाची , समाजव्यवस्थेपासून दुर गेल्याची , परात्मतेची , मणुष्यत्वापासून दुर गेल्याची लक्षणे कोणती ?

♦️तुटलेपणाची , एक्कलकोंडेपणाची , समाजव्यवस्थेपासून दुर गेल्याची , परात्मतेची , मणुष्यत्वापासून दुर गेल्याची लक्षणे कोणती ? 

१) सभ्य वागावेसे वाटणे. कमी आणि मोजकेच बोलणे. दिड दोन इंचच हसणे.खळखळून मोठ्याने हसनारे बावळट वाटणे. उनाड , मुक्तछंदी , बोलक्या लोकांचा तिरस्कार वाटणे , त्यांना हिन लेखने. अकाली म्याच्युअरिटी येने.

२)सर्वकाही नियमांत व्हावे असे वाटणे. तारखा आणि वेळेला, नितिमुल्यांना अवाजवी महत्व देने.अवेळी , न सांगता , आचनक कुनी आलेले गेलेले न आवडणे .शिस्त, आणि स्पर्धेची उदाहरणे सतत जिभेवर असणे. 

३)सर्वकाही नफ्यातोट्याच्या गणितात बसवणे , माझा फायदा काय हा पहिला प्रश्न पडणे. निखळ आनंद , मैत्री ,शेजारधर्म  निसर्गसानिध्य निव्वळ बकावास वाटणे.आजुबाजुच्यांना ते आहेत तसे न स्विकारता टोकाच्या मोजपट्टीवर तोलत रहाणे. 

४)अभिनंदन, भरभरून कौतुक न करणे. मुक्तपणे कौतुक करणारे लोक चमचे वाटने. नुकतेच मेलेल्या लोकांच्याप्रती थोडीही संवेदना न वाटणे. चांगल्या आणि जास्त शब्दांत त्यांना अभिवादनही न करणे. त्यांच्या कार्याची दखल न घेणे.तशी दखल घेणारे मुर्ख, चमचे वाटणे.

५)भांडवली झगमगाटाचा हव्यास असणे.तशी वेशभूषा , तशी बोली कॉपी करणे. ब्र्यांड व लेबलांत मोजमाप करणे .पाश्चिमात्य जग सगळेच चांगले , सायंटिफिक वाटणे . वकिली करुन तसे सतत सिद्ध करत रहाणे.भारतीय परंपरा, सन , वार , उत्सव, संस्कृती तुच्छ , टाकावू वाटणे.भारतातील लोक , बोली , त्यांचे व्यवहार रानटी वाटने.

६) कुनाच्याही मातीला न जाणे.वाढदिवस आनंद सोहळे साजरे न करणे.हे सर्व टाइम वेस्टिंग वाटणे. प्रेझेंट क्षण न जगता सतत भविष्यात डोकावणे. ऐम, लक्ष , टार्गेट , गोल आणि ॲच्युमेंट सतत डोक्यात असणे. त्यासाठी सतत धावपळ करत रहाणे . थोडक्यात काय एकजीव मिक्सअप न होने , किंतूपरंतु ठेवणे , सतत विरोधी भूमिकेत असणे. 

                    आदी गुणवैशिष्ट्ये असणारी लोक्स महारोगीट आहेत.ती सतत या एक्कलकोंड्या , परात्मतेच्या घानेरड्या रोगाची लागण इतरांना करत असतात.आणि वरुन बिनकामी टाकावू सोज्वळ सभ्यतेचा आव आनत असतात.तुसडेपणाच्या सर्वोच्च टोकावर असनारे लोक अत्यंत विघातक आहेत.त्या कामसूत्र जाळनार्या भक्तांपेक्षाही तकलादू , गएगुजरे हे काहीच न करु पहानारे आहेत. 

नितीन सावंत परभणी 
संस्थापक अध्यक्ष 
मानव मुक्ती मिशन 
9970744142

Monday, 30 August 2021

♦️आधी इंगळे मग सगळे ..

♦️आधी इंगळे मग सगळे .. 

आनंदांचे डोही आनंद तरंग l
आनंदची अंग आनंदाचे ll 
      - संत तुकोबाराय 
     
             महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेला स्वातंत्र्या नंतर सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी वर्गात लोकप्रिय करण्याचे आद्य श्रेय जाते ते विनोदाचार्य ह.भ.प.बाबासाहेब इंगळे महाराजांना.आयुष्यभर आनंद वाटणारे , आनंदात जगणारे महान कीर्तनकार म्हणजे विनोदाचार्य हरिभक्त परायण बाबासाहेब इंगळे महाराज होत. तत्वज्ञानाचे अवडंबर न माजवता सर्वसामान्यांना समजेल आशा मधूर भाषेतून आणि दैनंदिन जीवनातील दृष्टांताच्या आधारे संतांची भक्ती परंपरा इंगळे महाराजांनी घरोघर पोहंचवली.सोशल मेडिया , youtube चा जमाना नसताना त्या काळात महाराज विदाऊट प्रसिद्धी लोकप्रसिद्ध होते.सर्वसामान्य जनतेने त्यांना जिवेभावे आपले मानले होते.
संपूर्ण आयुष्यभर ते प्रफुल्लित आणि हसतमुख राहिले.आनंदी जीवनाचा सार सांगताना " काय सोबत नेनार आहात हो तुम्ही , आनंदी रहा"  हा संदेश महाराज देत असत.  
                    विनोदाचार्य हरिभक्त पारायण बाबासाहेब महाराज इंगळे यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला.त्यांचे जन्मगाव बिड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील चिंचवडगाव आहे.त्यांचा जन्म ५ एप्रिल १९५४  चा.वडिलांचे नाव बाबूराव कोंडीबा इंगळे, महाराजांसह एकूण पाच भाऊ व चार बहिणींचा हा परिवार.परिवारात महाराज सर्वात मोठे होते.एकूण इंगळे परिवारात सर्वच जन अत्यंत प्रेमळ , मनमिळाऊ स्वभावाचे आहेत.विनोदाचार्य ह.भ.प.बाबासाहेब इंगळे महाराजांना तिन मुले आहेत.सर्वात मोठे ज्ञानेश्वर महाराज , दोन नंबरचे रामेश्वर महाराज आणि तिन नंबरचे सोपान महाराज इंगळे होत.ह.भ.प.सोपान महाराजांचे शिक्षण ऋषीकेशला झाले आहे.आज विनोदाचार्य ह.भ.प. बाबासाहेब इंगळे महाराजांच्या नंतर गाधीवर सोपन महाराज विराजमान आहेत.महाराजांची वारकरी सेवेची परंपरा सोपान महाराज पुढे चालवतील. 
 
         संबंध महाराष्ट्राची संतांच्या विचारांच्या द्वारे सेवा करणाऱ्या बाबासाहेब इंगळे महाराजांच्या चुलते पुतणे आणि मुलाबाळांच्या या मोठ्या परिवारात सर्वजन वेल एज्युकेटेड आणि अत्यंत प्रभल्भ विचारसरणीचे आहेत.जागतिक घडामोडींपासून ते सर्व सामान्यांच्या दैनंदिन समस्यांपर्यंतचा लेखाजोखा हा संपूर्ण परिवार ठेवतो.कुनातही अहंभाव नाही की गर्व ताठा नाही.

          महाराजांच्या किर्तनाचे वैशिष्ट्ये म्हणजे अत्यंत प्रेमळ सात्विकभाव त्यांनी निर्माण केला.ग्रामीण म्हणी , वाक्यरना , शब्दप्रयोग कसे निर्माण होत गेलेत, याचा उलगडा महाराजांनी केला.दृष्टांत आगार नावाचे पाच भागाचे पुस्तकही महाराजांनी काढले आहे. ते आपल्या किर्तनात सर्वच संतांचे प्रमाणे,दाखले देत असत.चाल उचलण्याची त्यांनी एक खास पध्दती होती.महाराजांनी गायलेला काकडा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे.नामस्मरण भक्तिमार्ग , आई वडिलांची सेवा करा हा संदेशही ते स्पष्टपणे देत असत.त्यांनी कधीही कुनाचाही आपमान केला नाही, उलट कीर्तन सुरु होताना प्रत्येकाचे नाव घेवून टाळकरी , मृदंगाचार्य , बाजुला बसलेले दिग्गज यांची नावे घेवून महाराज प्रत्येकाची दखल घेत असत.त्यांनी सदैव आनंद वाटला.सर्वांच्या पदरात सुख टाकले.शब्दांच्या कोट्या आणि भाषेवर प्रचंड प्रभुत्व ही महाराजांची खास ओळख.दैनंदिन जीवनातही ते सहज विनोद करत असत. यातून लोक त्यांना भेटायला येत, निधी मानधन देत त्यातून त्यांनी भव्यदिव्य असा मोठा आश्रम गावी उभा केला आहे.
         आपल्या खास विनोदी शैलीमुळे महाराष्ट्रातील वारकरी जनतेने त्यांना विनोदाचार्य ही बदवी बहाल केली आहे .विनोदाचार्य ह.भ.प.बाबासाहेब इंगळे महाराजांच्या जीवनात अक्षय तृतियेला फार महत्व.त्यांचे लग्न अक्षय तृतियेला झाले होते.कुठल्याही कार्याची सुरुवात ते अक्षय तृतियेला करत असत.२०२१ च्या वर्षी त्यांनी अक्षय तृतियेलाच आपला देह ठेवला.निमित्य मात्र कोरोनाचे.दिनांक १४ मे २०२१ रोजी सकाळी ९:३० ते १० वाजेच्या दरम्यान महाराज सर्वांना सोडुन गेले.६८ व्या वर्षात महाराजांचे पदार्पण झाले होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील वारकरी परंपरेचे प्रचंड नुकसान झाले आहे.वैचारिक धाक असणारे महान व्यक्तिमत्त्व निघून गेल्याने वारकरी वर्ग पोरकाच झाला म्हनावे लागेल.

      काल विनोदाचार्य ह.भ.प.बाबासाहेब महाराज इंगळे यांच्या बिड येथील आणि वडवणीच्या आश्रमाला भेट दिली. महाराजांचे आणि माझे अगदी चांगले संबंध होते.वैचारिक मांडणीला ते पाठिंबा देत असत.त्यांच्या कुटुंबातील बिड येथील घरी रामेश्वर महाराज इंगळे यांनी महाराजांच्या अनेक आठवणी सांगितल्या.महाराजांची पाहुणार करण्याची पध्दतीची आठवणही त्यांनी करुन दिली तर जन्मगावी चिंचवडगावला ह.भ.प.सोपान महाराज इंगळे यांनी संपूर्ण आश्रम फिरुन दाखला आणि दोन आडिच तास त्यांनी अत्यंत अभ्यासुपणे चर्चा केली.महाराजांची परंपरा पुढे नेण्याची त्यांची समर्पक तयारी दिसुन आली.यावेळी माझ्यासोबत ह.भ.प.गंगाधर महाराज कुरुंदकर होते. 
        महाराष्ट्रातील जनता , वारकरी, किर्तनकार वर्ग विनोदाचार्य ह.भ.प.बाबासाहेब इंगळे महाराजांच्या कार्याला सर्वजण सदैव स्मरणात ठेवतील.त्यांच्या शिकवणुकीच्या मार्गाने सर्वजन चालतील.महाराष्ट्रात आधी इंगळे मग सगळे. 
विनोदाचार्य ह.भ.प.बाबासाहेब इंगळे महाराजांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन....

ह.भ.प.धर्मकीर्ती महाराज परभणीकर 
9970744142
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️

Thursday, 12 August 2021

♦️आपण एकसंघ कधी बनलोच नाहीत

 ♦️आपण एकसंघ कधी बनलोच नाहीत... 

           राष्ट्रवादाची प्रबळ भावना इतर राष्ट्रांसारखी भारतीयांत मोठ्याप्रमाणावर नाही.तसे पुरावे पावलापावलावर दिसून येतील.हे आपले आहे.आपल्या सर्वांचे आहे , देशाचे आहे असे कधीही आपल्याला वाटत नाही.

१)सरकारी रोडसाठी टाकलेली खडी रात्रीला उचलून नेने.  
२)सरकारी शाळेकडे,शाळेच्या आजूबाजूला हगायला जाने.
३)बसच्या सिट फाडने,किंवा बसमधे सिटखाली थुंकणे.
४)सरकारी कार्यालयांत भितींवर थुंकणे.सरकारी कार्यालयांत धुम्रपाण करणे.तेथील वस्तू ,टेबल कापटे अगदी रफ पध्दतीने वापरने. 
५)त्याला काय होतय म्हणून सतत कुठले न कुठले नियम मोडणे,पायदळी तुडवने,
६) आपल्या घरातील,लाइट गेल्यानंतर शेजारी कशीकाय आहे यावर दुख व्यक्त करणे.किंवा त्यांचीही लाइट गेल्यानंतर,गेल्याचे दुख न बाळगता त्यांचीबी गेली म्हणून संतोष मानने.
७) एखादी लाभार्थी योजना त्यांनाच कशीकाय ? त्यांनाही नको,कुनालाच नको अशी भावना बाळगणे.
८) करोडोंचा फंड न वापरता वापस पाठवने , सरकारी संपत्ती वाळु , खनिजे उपसने, लुटने .
९) कचरा , घान कुठेही टाकायला लाज न वाटने. 
१०) राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर गुणवत्तेच्या जोरावर कर्तबगारी गाजवलेल्या खेळाडुंबद्दल तो भारतीय असल्याची भावना,पुरेशी न वाटता त्याची जात,धर्म, प्रांत,भाषा किंवा त्याचा कोच तरी आपला आहे का याचा शोध घेने. 

         आशा अनेक उदाहरणांच्या द्वारे "#भारत_माझा_देश_आहे" असे कुनीही मनापासून मानतानाचे दिसत नाही.मग कशीकाय रुजेल लोकशाही ? सगळे जन मिळून आपापल्या अस्मितांच्या द्वारे भारतभुमीचे लचके तोडत आहेत . उलट मात्र 
 प्रतिगामी छावणी राष्ट्रवादाचा वापर खुबीने करुन सत्तेत आहे. प्रतिगामी छावणी कशीकाय करते राष्ट्रवादाचा वापर ? 
तर प्रतिगामी छावणीने एकसंघतेसाठी व्यापक आस्मितेची बाळगुट्टी पाजली ती धर्माची.धर्म वाजवा , देश वाचवा हे त्यांचे सुत्र.कुनापासुन वाचवा तर मुसलमानांपासुन वाचवा,हा त्यांचा राष्ट्रवाद. धर्मीक अस्मितावादाला आलिकडील काळात राष्ट्रवादाची शेपटी जोडुन ते राजकीय क्षेत्रात अजोड उभे राहिलेले आहेत.तरी त्यांचा राष्ट्रवाद स्वातंत्र्य लढ्यात तुम्ही कुठे होतात या एकाच प्रश्नाने थेट जमिनदोस्त होतो. 

        त्यामुळे या भक्त जनतेला राष्ट्रवादाचा नवा पर्याय सुद्धा एकत्र करु शकेल का याची शास्वती नाही.जे लोक शेजारच्या आणि आपल्या अंगणात फरक करतात.सडा टाकताना,अंगणात पाणी मारताना आपल्या अंगणांच्याच बॉंड्रीपर्यंत पाणी टातात ते काय भारत माझा देश आहे ही एकसंघ भावना बाळगतील.#सारे_भारतीय_माझे_बांधव_आहेत, हे तर केवळ स्वप्नाळू पुस्तकी विधान .

नितीन सावंत परभणी 
9970744142

Monday, 2 August 2021

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य समीक्षा

♦साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या शुभेच्छा ... 

           अण्णाभाऊ समग्र अंगाने चर्चा न झालेले लेखक.ती चर्चाही न होण्याचे कारण ते उच्चजातीय नसने हे महत्वाचे.

             तरिही हे नाव सर्वहरांच्या साहित्य विश्वाचे अग्रणी आहे.वर्गीय साहित्यनिर्मिती करताना जात्यांतक भाव पेरत जानारे आणि समतेचे दुवे हेरून नैतिक तथा मानवी मुल्यांची प्रेरणा उभी करत जानारे अण्णाभाऊ आहेत.त्यांचे साहित्यविश्व भौतिकवादी आहे.जे दिसते ते लिहायचे.यात उसनवारी नाही की उगीच उधारीचे भाव प्रकट केलेले नाहीत.अस्सल दर्जेदार सभोताल अण्णाभाऊंच्या साहित्यविश्वाचा केंद्रबिंदू आहे.

              अण्णाभाऊंचा जन्म सामाजिक सर्वहरा जातीतील, तरिही ते साहित्यनिर्मिती करताना आर्थिक सर्वहरांसाठी म्हणजे शेतकरी , कारागीर जातींसाठी  प्रेरणादायी साहित्यनिर्मिती करताना,आपल्या साहित्याचे नायक शेतकरी जातीतले उभे करतात.म्हणून अण्णाभाऊ हे आर्थिक सर्वहरा आणि सामाजिक सर्वहरां जातवर्गीयांना जोडनारा महान दुवा आहेत. 

            त्यांचे सौंदर्यशास्त्र अब्राम्हणी आहे.त्यांच्या साहित्यातील पात्रांची नावे,रंग,वेशभूषा आणि बोली अब्राम्हणी आहे.देखावा किंवा ओढून ताणून असे काहीही नाही. 

            आपल्या कथा कादंबऱ्यातून स्त्रीयांना नेतृत्व देनारे , आब्रृ इज्जतीला जपत फाटका संसार करणाऱ्या स्त्रीयांची नैतिकता चित्रीत करणारे , अण्णाभाऊ महान असे स्त्रीवादी लेखक आहेत.

               एका सामाजिक सर्वहराच्या साहित्यनिर्मितीची दखल घेवून त्यांच्या नावे मराठीभाषा दिन साजरा करणे खाऱ्या अर्थाने भाषेचा सन्मान होइल.आपल्या गौरवशाली सभ्यतेला ते उंचीवर नेनारे ठरेल.हजारो वर्षे सामाजिक सर्वहरांना अभिव्यक्त न होऊ दिल्याने आता एका सामाजिक सर्वहराच्या नावे मराठीभाषा दिन साजरा करून एक गौरवशाली इतिहास उभा करण्याची संधी कुणीच सोडु नये.म्हणून अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस एक ऑगस्ट हाच खरा मराठी भाषा दिन.

अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मसोहळ्याच्या एकशे एकव्या वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा ...

नितीन सावंत परभणी
9970744142
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦