संत भौतिक जगताप्रती अगदी एकजीव होते.त्यांना इहलोकीचेच जीवन हवे होते.इहलोकीचे जीवनच सुखकर , सुंदर बनवण्यासाठी त्यांनी हयात घालवली.तसा इतरांना संदेशही त्यांनी दिला. हे जे जीवन आपल्या वाट्याला आले आहे ते पुरेपूर जगा हे संतांचे सांगणे होते.निसर्ग , सौंदर्य संतांच्या मनाला भावाचे , आवडायचे.म्हणूनच सुफी संत बघा अगदीच ते उंचावर किंवा निसर्गरम्य ठिकाणी राहत असत.
वारकरी परंपरेतील संत तुकोबाराय सुद्धा जगण्याचे आणि जीवनाचे महत्त्व सांगताना म्हणतात " सुखाचा वाटा सोडुन मुक्ती मागणारा किती करंटा आसेल ? " ह्या जीवणात आपल्या वाट्याला आलेले सुख उपभोगले पाहिजेत ते सोडून मुक्तीच्या मागे लागु नये.हातचे सोडुन पळत्याच्या मागे लागणाऱ्याला करंटाच म्हनावे लागेल.
वैदिक ग्रंथ आणि ब्राम्हण मंडळी , धर्मपुरोहीत काहीही म्हनो, आम्ही मात्र इहलोकीचेच जीवन सुंदरतेने जगण्याचा प्रयत्न करनार आहोत.आम्ही का बर जन्म घ्यायचा नाही ? आम्ही जन्म घेनारच. जन्माला येने , जीवन जगणे वाईट नव्हे.वैकुंठास जावुन काय मिळते ? तिथे समता आहे का ? दही भात आहे का ? समतेचा गोपालकाला आहे का वैकुंठात ? आमच्याकडे आम्ही एका ताटात समतेचा काला जेवतो.ते तुमच्या वैकुंठात नाही. त्यामुळे आम्हाला मुक्ती , मोक्ष , सायुज्यता नको.इहलोकीचे जीवन आणि त्यात वाट्याला आलेले सुख आम्ही उपभोगनार आहोत. वाट्याला आलेले क्षण आम्ही जगणार आहोत.
सांडुनि सुखाचा वांटा । मुक्ति मागे तो करंटा ॥१॥
कां रे न घ्यावे हे जन्म । काय वैकुठा जाऊन ॥ध्रु.॥
येथें मिळतो दहीं भात । नाहीं वैकुंठीं ते मात ॥२॥
तुका म्हणे मुक्ती नलगे । राहेन संतांची संगे॥३॥
नितीन सावंत परभणी
9970744142