Tuesday, 16 March 2021

स्वाभिमानशुन्य समाज ..

स्वाभिमानशुन्य समाज .. 

एक अजुबा देखा मैने मुर्दा रोटी खाए l
समझानेसे समझत नाए,लाथ पडे  सो चिल्लाए ll 
       - संत कबीर 

   संत कबीर यांनी अनेक दोह्यांतून सभोवतालच्या समाजव्यवस्थेचे चित्रण केलेले आहे.आपल्या अजुबाजुचे लोक इतके मुर्दाड बनले आहेत की , त्यांना कितीही समजावून सांगा त्यांना कळत नाही.ही या वरील दोह्यात संत कबिरांची मांडणी आहे.याबद्दल साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात की गुलामगिरीच्या या चिखलात का रुतुन बसला ऐरावत.हा बहुजन समाज ऐरावत हत्ती सारखा महाबलाढ्य आहे.परंतू तो गुलामगिरीच्या चिखलात रुतुन बसला आहे.कबिर यासाठी मुर्दाड ही उपमा वापरतात.
  संत कबीरांचे म्हनने आहे,या मुर्दाड समाजाला आज कितीही समजून सांगा ऐकून घेनार नाहीत.बदल करणार नाहीत.पण ज्यादिवसी व्यवस्थेची , परिस्थीतीची लाथ पडते तेव्हा हाच समाज व्याकुळ होतो.ओरडतो.
    कबिरांची मांडणी आजही लागु होते.जातीव्यवस्था, वर्गव्यवस्था स्त्रीदास्यत्व, अस्पृश्यता आणि गैरबराबरी मिटवण्यासाठी आपण कृती कार्यक्रम राबवू म्हटले तर त्या समस्येने पिडीत लोक पुढाकार घेत नाहीत परंतू एखाद्या ठिकाणी तशी घटणा घडली तर मग सर्वजन ओरड करतात.
    नुकतेच उत्तर प्रदेशमधे,मंदिरात पाणी प्यायला का गेलास म्हणून आल्पवयीन मुस्लिम मुलाला जीवघेणी मारहान करण्यात आली आहे. ही झाली समस्या त्यावर वर्क करण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम राबवण्यासाठी किती संस्था, संघटना लगेच कार्यरत होतील तर उत्तर आहे शुन्य. पण हाच हळहळ व्यक्त करणारा समाज पुन्हा भविष्यात अशी समस्या घडली की मग लाथ पडे सो चिल्लाए. मग ओरडनार. 
   कबीर ज्यांना मुर्दा म्हणतात त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर गुलाम म्हणतात.बाबासाहेबांचे म्हनने आहे गुलामाला गुलामीची जानीव करुन द्या.कबीर समस्या व्यक्त करतात.समाजाचे चरित्र चित्रण करतात.तर डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्तर सांगतात.या मुर्दाड समाजाला गुलामीची जानीव करुन द्या मग तो बंड करुन उठेल.यावर मान्यवर कांशीरामजींचे देखील एक मत आहे.ते म्हणतात स्वाभिमानी लोग ही संघर्ष की परिभाषा समझते है. जिनका स्वाभिमान मरा हो वह गुलाम होते है. तिनही महापुरूष समाजाव्यबस्थेला कृतीप्रवण बनवु पहात आहेत.ॲक्टिव्ह व्हा.जागृत व्हा. हे ते सांगताहेत. 

     कबीर एकेठिकाणी म्हणतात बकर्यांचा कळप लांडगा किंवा सिहं चारत आहे. म्हणजे सामाजात तुमचे वाईट करणारे तुमचे नेते, नेतृत्व बनलेत.ते समाजाला विकुन खातीलच ना ?  पुढे कसे नेतील ?
कबिर आनखी एकेठिकाणी म्हणतात नाव मे बैठी गंगा . म्हणजे अल्पमतात बहुमत विलीन केले गेले आहे.अल्पसंख्याक लोक बहुसंख्यांक लोकांवर राज्य करत आहेत.

     कबीर सांगतात ते बरोबर आहे.आज लागु होनारे आहे. समस्याग्रस्त समाजाने लाथ पडे सो चिल्लाण्याएवजी आता सामाजिक कार्यात जगबदलासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
आजूबाजूच्या परिसरात लोकबदलासाठी काम केले पाहिजेत.जागृत सतर्क राहिले पाहिजे.
त्यासाठी कबीरांनी एक अट घातलीय ..

कबिरा खडा बाजार मे लिए लखुटी हाथ l 
जो आवे घर फुकन के वही चलेगा हमारे साथ ll  

नितीन सावंत परभणी 
9970744142
दि.१४ मार्च २०२१

Tuesday, 2 March 2021

ग्रामसंस्कृतीला संजीवनी पुरवनारे लोकलावंत

ग्रामसंस्कृतीला संजीवनी पुरवनारे लोकलावंत 

आमचा कुठलाही लोककलावंत घ्या, मग तो पिंगळा असो नाहीतर वासुदेव असो,गोंधळी असो नाहीतर राइंदर असो.नवनाथाच्या वेषातील डवरी गोसावी असो नाहीतर जोतीषी असो, हा लोककलावंत जे काही सांगतो ते इहलोकीचे जीवन सुखसंपन्न होइल , भरभराट होइल याबद्दलचा तुमचा आशावाद वाढवतो.पॉझिटीव्हनेस सांगतो.अनेक खचलेल्या, हारलेल्या शेतकरी , कष्टकरी , श्रमीकाला हे कलावंत मोटिव्हेशन पुरवतात. 
यंदा सुगी लै हुइल , घरात पाळणा हलेल , लेकीचं लगिन होइल , घरातले आजार कमी होतील , दु:ख दारिद्र्य घरतील दैना जाइल  , यंदा वारि घडेल वगैरे. तसे हे कालावंत एकेकाळीचे दुरदर्शनच.रोगराई होइल , साथीचा रोग आलाय काळजी घ्या , कुठल्या भागात चांगली सुगी आलीय , कुणाचे पोर लग्नाला आलेय असे अनेक सांगावे सांगनारे हे कलावंत होते.
यांच्या कलाप्रकाराने ग्रामीण भागाला नवसंजीवनी पुरवीली गेलीय.हजारो वर्षे ग्रामीण भाग यांच्याकडून जगण्याचा प्रेरणेचा जीवनरस घेत आला आहे.यांच्याच सांस्कृतिक संचितामुळे कधीही शेतकरी वर्गाने आत्महत्या केलेलेल्या नाहीत.हेही दिवस जातील हा संदेश ही कलावंत मंडळी देत असे. 
यांचे ठोकताळे आणि अंदाजही प्रचंड पर्फेक्ट असत . आजचे तुमचे वैधानिक हावामान खाते हजारो वेळा दरवर्षी चुकते.आमच्या ग्राम संस्कृतीचे हे दुत कधी चुकत नसत. यांनी इहलोकीचे जीवन सुखकरच बनवले.उत्पादन वाढवले.
      याउलट ब्राम्हणांनी लालूच दाखवली ती मृत्यूनंतरच्या जीवनाची.स्वर्ग मिळेल , मोक्ष मिळेल किंवा पुनर्जन्म चांगला मिळेल वैगरे. त्याचबरोबर आम्हाला दान नाही दिले तर नर्कात जाल , पाप करु नका , वगैरे.
परंतू लोककावंतांनी मात्र कधीही भिती घातलेली नाही.

    आज घडीला त्या लोककलावंतांच्या प्रती आदराच्या भावनेतून उतराई होण्याची वेळ आली असताना, त्यांची टिंगल करणे , ते कसे विज्ञानवादी नाहीत, यडे आहेत हे दाखवने म्हणजे खाल्लेल्या ताटात हागणे होय.तुमच्या माय बापाला यांनीच निराश होऊ दिलेले नव्हते.त्याचे उपकार आपण या कलावंतांची टिंगल करुन त्यांना हिन लेखून फेडनार आहात का ?
    पाश्चिमात्य विज्ञानाच्या जोरावर एवढ्या उड्या मारनार का ? बरे ही वैज्ञानिक कमाई तुमचीही नव्हे. 
     ग्रामीण भागात आज सांस्कृतिक संचित आटल्यामुळेच आत्महत्या वाढलेल्या आहेत.
रात्रभर चालनारे गोंधळ बंद झाल्याने , बहुरूपी करमणूक करण्यासाठी गावी येने बंद झाल्यामुळे , सोंगे घेनारे , भरुडकार वगैरे आज कमी झाल्यामुळे तुम्ही परात्मतेची राख  स्वताला फासुन घेत आहात.
मरा एकलकोंड्यान्नो.. 
लोककलावंतांची टिंगल ,त्यांची अवहेलना तुम्हाला तुमच्या ग्रामसंस्कृतीला भस्म करनार आहे.सोइरिकी न जमने हा शाप लागलाच आहे तुम्हाला. आजुन लै उध्वस्त व्हायचे बाकी आहे..
सुंब जळालेय पण पिळ काही जाइना ..

नितीन सावंत परभणी
9970744142