येथल्या ब्राम्हणी व्यवस्थेने माणुस म्हणून त्यांच्या जगण्याची सर्व साधने हिसकावून घेतली होती . आपल्याला हिशोबशीर धर्म निर्माण करुन त्याचे धर्मपुस्तकही त्यांनी काढले होते . त्याद्वारे ते कारभार करत . आपल्या जगण्याची सर्व साधने हिसकावून घेतलेली हडामासांची माणसासारखी माणसे पाच नव्हे दहा नव्हे हजारो वर्षे मेलेल्या जनावरांचे मांस खात होते .
कार्यकतृत्व सुद्धा आम्हीच गाजवनार , कलाकारी आदाकारी आमचीच मक्तेदारी ज्ञानभांडाराच्या चाव्या आमच्याच जानव्याला म्हननार्या जात्यांध वर्गाने या देशाचे सांस्कृतिक कुपोषण केले .
तरी आमच्या माणसांनी आपली कलाकारी आदाकारी दाखवलीच . त्यांनी आपला जीव धोक्यात घालून अस्वलाशी मैत्री केली त्याला आपल्या रोजीरोटीचे साधन बनवले . माकडालाही माणुसकी आली आणि तो गरिबांना कमाई करुन देवू लागला. मंद नवऱ्याला बायकोचा नंदीबैल म्हटले जाते . पन स्वताला संस्कृती चालक म्हनवनार्या ब्राम्हणांच्यापेक्षा नंदीबैल बरे . ते सुद्धा परोपकार करतात एकदोन कुटुंबे निस्वार्थीपने जगवतो तो नंदीबैल .
लखाई , जाखाई , जोखाई , मरीआई जा जागर करनारा आंगावर फटके मारुन घेनारा आमचा पोतराजही या ब्राम्हणी कालखंडात टिकून राहिला कसातरी जगला .
किती पिढ्या बरबाद झाल्या .
शिक्षणापासून वंचित ठेवले गेले . जानीवपुर्वक लोक भिके कंगाल केले गेले . देशाचा विकासाच होऊ दिला गेला नाही . या देशात हजारो चार्ली चापलीन राईंदर , बहुरूपी म्हणून रस्त्याने आपले दुखाश्रृ पुसत लोकांना हसवत फिरत आहेत . कुठलीही सेवा सुविधा साधने न देता उलट त्यांची रोजीरोटी हुसकावून घेवून सुद्धा आमचे लोक कलाकारितेत ब्राम्हणांच्या पेक्षा सरसच राहिलेले आहेत . स्पर्धा बरोबरीत लावावी आम्हाला हाजारो वर्षे मागे फेकले आहे . तरी आम्हीच भारी . मेलेल्या प्राण्यांच्या कातड्यावर आम्ही हजारो धुन बनवल्या, गायल्या . लग्नातल्या घोगर गळ्याच्या मंगळाष्टीकेशिवाय ब्राम्हणांना येतेच काय ?
उडत्या पक्षाला एका निशान्यात पाडनारे , चपळ सस्याला सुद्धा हाताने पकडनारे पोरे आमच्या पारध्या कैकाड्यात आहेत .पन हे आमचे एकलव्य स्पर्धेबाहेरच . तेव्हा तुमचे द्रोणाचार्य पुरस्कार तुम्हालाच लखलाभ ...
लोहहृदयाच्या काळ्याभोर दगडावर मनगटे झिजवत पिढ्यानपिढ्या कोरल्यात बुद्ध लेण्या आमच्या बापांनी. नवनिर्मिती आइतखाऊंची नाय. आमची , सर्वहरांची कष्टकर्यांची .
नितीन सावंत , परभणी
राष्ट्रीय संसद प्रमुख
मानव मुक्ती मिशन .
9970744142
--्---्---्---्---्---्---्---्---्------------------