Sunday, 5 November 2017

ll वांझ गावची पाटीलकी काय कामाची ll

शेतकरी आत्महत्येच्या सत्राबरोबर आता त्यांच्या मुलीही आत्महत्या करत आहेत . लातुर जिल्ह्यातील वडिलांची अगतीक अवस्था बघवेना म्हणून एका मुलीने आत्महत्या केली . अगदी त्याच पध्दतीने  पाथरी तालुक्यात नापिकी  आणि कर्जाला कंटाळून एका शेतकर्याने आत्महत्या केली . आपल्या चुलत्याप्रमाने बापही  आत्महत्या करिल या भीतीपोटी लग्नला आलेल्या  मुलिने सुद्धा काल  आत्महत्या केली. भांडवलशाहीत शेतकरी  जातिमध्ये परात्मता आली आहे . एक तुटलेपना  आला आहे. ईमोशन्यालिटिचे बुडबुडे कितीही उभे केले तरीही ते शेवटी  फुटनारच . त्यातुन शेतकऱ्यांच्या भुकेचा प्रश्न काही सुटू शकत नाही.

जातिचे मेळावे घेवून जातीचा  गर्व करायला लावने , जातीची अस्मिता उभी करने , दुरच्या आरबी समुद्रातील शिवस्मारकाने सर्वांचे भले होइल हा भास निर्माण करणे , स्वजातीच्या विकास महामंडळांच्या निधीवर संतोष मानायला शिकवने ही बुडबुडे आहेत .यातून शेतकरी म्हणून काय फायदा होनार आहे ?? भले होनारच आहे काय ?? ही बुडबुडे आहेत . शेवटी फुटनारच .

भालचंद्र नेमाडेंच्या देशीवादाचा हाच अर्थ आहे . ज्या गावात काहीहीच नविन निर्माण होत नाही . नविन काहीच जन्माला येत नाही .काहीच फायदा होत नाही . ना विकास , ना प्रगती त्या वांझ गावची पाटीलकी मिरवण्यात काय अर्थ आहे ?? त्या गावचा पाटील होन्यात काय अर्थ आहे . हा आशाय नेमाडेच्या मांडणीचा असतो .

आपन जर  जात म्हणून एकत्र येतो , सकळ जात समाज म्हणून मिरवतो , तर दोन दोन हजार रु गोळा करुन अशा गरिबांना का मदत करु शकत नाहीत .जातभाई म्हणून स्वजातीत तरी समता बंधूत्व का प्रस्थापित करत नाहीत . स्वजातीय लोकांना संस्था कॉलेजस मधे फुकटात शिक्षण का देत नाहीत  ? डॉ लोक्स स्वजातीय बांधवांस फुकट विलाज करतील का ??
हे सोडा किमान पोट जात तरी मिटेल काय ?? लग्न कार्यात सोयरिकीच्या वेळेला पोस्टजात का पाळतो . हलके भारित्व का मधे आनतो . आपल्याच जातीच्या वधुबापाकडुन भरमसाठ हुंडा का घेतो ? त्याला आडून मारल्यसारखे सतत त्रास का देतो ??

नेमाडेंच्या समृद्ध हिंदुतली हिच अडगळ आहे . दिसायला , सांगायला भले मोठे गणगोत, भलेमोठे घराणे , बापजाद्यांचे भलेमोठे नाव आणि भलीमोठी जात , पन वक्ताला कोनीबी कामाचा नाय . म्हणतात ना सारा गाव मामाचा एक नाही कामाचा .

स्वजातीतला अंतर्गत विरोध , त्यातले द्वंद्व कधी मिटवनार .
हिच तर वांझगावची पाटीलकी आहे . काल मुंबईत झालेल्या मोर्च्यानेही हेच वांझपन हाती दिले . स्वामिनाथन आयोगाचे नावही नाही . मराठा समाजातील गरिब मराठ्यांच्या , शेतकरी मराठांच्या हाती काय लागले ?? वांझ गावची पाटीलकीच ना .

नितीन सावंत परभणी
9970744142

No comments:

Post a Comment