ll अब्राम्हणी परंपरेतील स्त्रीअभिव्यक्ती ll
नितीन सावंत,परभणी
9970744142
भारतीय संस्कृतीत स्त्रीचे स्थान काय ? तिची अभिव्यक्ती, तिचे मन,तिचे मत काय ? हे जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी पुस्तकांच्या जगाच्या बाहेर धुंडाळा घ्यावा लागतो. कालपर्यंत,तुमच्या आईपर्यंत या देशात स्त्रीशिक्षणाची तजवीजच नसेल तर पुस्तकी जगात तुम्हाला स्त्रीवाद काय ढेकळाचा सापडेल काय ? मनुस्मृती आणि चार पुरुषी पुस्तकांच्या आधारे स्त्रीवाद कसा मांडता येइल.त्यासाठी लोकसाहित्य,लोकगिते,शिल्पशास्त्र,मिथके,कथा,रुढी , परंपरा,म्हणी,वाक्यप्रचार,भाषा,शब्द,जत्रा,गावांची नावे,नद्यांची नावे,असा मोठा भौतीकवादी पसारा आपल्या अभ्यासक्षेत्राच्या कवेत घ्यावा लागतो.या अब्राम्हणी प्रवाहांच्या शिवाय स्त्रीवाद मांडनारा अंधाऱ्या खोलीत नसलेले काळे मांजर शोधनाराच म्हटले पाहिजे.
मनुस्मृतीकाराने जरी स्त्रीला 'न स्त्री स्वातंत्र्य मर्हती' म्हणजे स्त्रीला स्वातंत्र्याचा आधिकार नाही असे म्हटले असेल तरी त्याच वर्णाश्रम धर्माच्याच काळात वैदिकांच्या नाकावर टिच्चून आमच्या शिल्पशास्त्राज्ञांनी विरहिणी सारखी लिखानकरणारी स्त्रीशिल्पे मंदिरांवर कोरुन आपली अब्राम्हणी नेनीव अभिव्यक्त केली आहे.अब्राम्हणी प्रवाह हा स्त्रीयांचा सन्मान करनारा आहे.तो स्त्रीला आई राजा उदो उदो म्हणून समन्यायाने वाटप करनाऱ्या आईला राजाची उपमा दोतो.
तरी स्त्रीअभिव्यक्ती येथील व्यवस्थेप्रती कधीच चांगली रहिलेली नाही.ही व्यवस्था तिला मान्य नाही. तिला इडापिडा जाऊन बळीचे राज्य हवे आहे.स्त्रीमन हे सदैव जाचात आणि कोंडमार्यात सापडलेले आहे. त्या स्त्रीला माहेरची आस आहे तर सासरचा तिटकारा.संसार ओझे आहे तर मृत्यु सुटका.
एक कवयित्री म्हनते
आह्यवपणी मरण आले l
आजीच्या माझे सोने झाले l
नवऱ्याच्या आधी आपल्याला मरण यावी.पांढऱ्या कपाळाने जगुन काय उपयोग असली ती धारणा.
स्त्रीची सन्मानजनक लोकपरंपरा आज समुहगत सुष्ट नेनीवेत बंद आहे. ती पुन्हा उजळवून काढली पाहिजे. तिला लकाकी दिली पाहिजे.
आजही मला आठवते की आम्ही मामाच्या गावाहून निघताना सर्व महिला आमच्या आईला वाटे लावायला यायच्या.त्याआधी आमच्या मामी आईचे पाय धुत असत.पायाच्या नखाच्या बोटाना कुंकू लावले जाई.नंतर आईला कुंकु लावले जाई. ही माहेरातुन जानार्या लक्ष्मीची आणि तिच्या पायाची पुजा होती.
लक्ष्मीच्या पाऊलनी ये,भरल्याघरातुन लक्ष्मी गेली,असले वाक्यप्रयोग आपन ऐकतोच की.शुभप्रसंगी स्त्रीयांची ओटी भरणे हे सुबत्तेचे प्रतिक आहे.आणि धनधान्याची ती निर्माती असल्याचे प्रतिक आहे.शेतातील धान्याच्या रासीलाही लक्ष्मीची रास म्हंतात.
माहेरात एवढा सन्मान असल्याने.स्त्रीला ते हवेहवेसे वाटने सहाजीक आहे.विवाहसंस्था सुरु होताना नवरा नवरीच्या मागे उभे रहानारे दोन्ही मामे हे मातृसत्तेचे पाठीराखे आहेत . कारण पाठीमागे उभा रहानारा मामा हा आईचा भाऊ आहे.स्त्रीला आधिकार नाकारल्यावर तिचा प्रतिनिधी म्हणून भाऊ उभा केल्याचे आपन म्हणू शकतोत.
माहेरचे वर्णन लोकगितांत आणि जात्यावरल्या ओव्यांत खुप येते.
आपला भाऊ कसा वाटतो तिला तर ...
विसाची चंची तिसाचा कात,
शंभाराची पानं,लवंगा सात l
बंधू रस्त्याने चालला पान खात ll
नगरच्या नारी ग बघती भिरीभिरी
भाऊराया बद्दल किती कौतुक आणि गोडवा आता हेच पहा ना ..
आम्ही दोघी बहिनी दोन बाजूच्या बारवा l
मधे जोंधळा हिरवा,भाऊराया ll
आई वडिलांचे राज्य कसे होते आणि भाऊजय आल्यावर कसी आपली सत्ता चालत नाही त्यावर डोळस स्त्रीमन अभिव्यक्त होताना म्हनते.
"आई बापाच्या राज्यात तांब्या तुपाचा केला रिता l
भाऊजयीच्या राज्यात नाही पाण्यावर सत्ता ll
आपल्या माहेरच्या वाटेचे सुद्धा किती कौतिक आहे बरे स्त्रीच्या अभिव्यक्तीत.
"ही नव्हे माहेरची वाट,इथं बाभळी बन बहुदाट l
माझ्या ग माहेरच्या वाटे,केळीचं बन बहु दाट ll
आन सासरच्या वाटेबद्दल विचाराल तर ..
सासरच्या वाटे कुचु कुचू काटे.
पुरुष म्हंतात एवढी माहेरची गोडी आहे तर सासरी का नांदायला येता मग.
त्यावर उत्तर देताना जात्यावरली स्त्री म्हनते ..
दे रे योग्या ध्यान,ऐक काय मी सांगते l
लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते ll
शेजारणीशी कधीमधी कुरबुर होत असेल पन स्त्रीला मन मोकळे करायला शेजारीन हवी आहे.म्हणून ती म्हनते.
शेजारणीबाई एका दाराने वागू l
ओसरीला खेळे तुझी मैना माझा राघू ll
हे झाले स्त्रीचे स्त्रीबद्दलचे मत किंवा माहेरबद्दल मत पन ग्रामीण स्त्रीला पुरुषाबद्दल काय वाटते.
कडु विंद्रावन डोंगरी त्यांचा रहावा l
पुरुषाचा कावा,मला यडिला काय ठावा ll
कडु विंद्रावन आपुल्या जागी नटे l
त्याच्या अंगिचे गुण खोटे ll
ही आहेत पुरुषीव्यवस्थेबद्दलची स्त्रीयांची मते.
जीवाला जिव देते जीव देवून पाहिला l
पाण्यातला गोटा अंगी कोरडाच राहिला ll
कावळ्यान कोट केल,बाभूळबनामंदी l
पुरुषाला माया थोडी,नारी उमज मनामंदी ll
लोकसाहित्यात रामापेक्षाही सिता मोठी आहे.तिचे मोठेपण आमच्या मायमाऊलींनी गाइले आहे.
राम म्हणून राम नाही ग सिता मातेच्या तोलाचा l
सिता मोठी हिरकणी राम हलक्या दिलाचा ll
अशा अनेक लोकसाहित्य आणि साधनांच्याद्वारे भारतीय स्त्रीमन आपन समजून घेवु शकूत.
मिरा,जना,कान्होपात्रा, चोखोबारायांची पत्नी सोयराबाई,संत नामदेवांच्या कुटूंबातील राजाई, गोनाई,लाडाई,लिंबाई,या सर्व स्त्रीअभिव्यक्ती समजुन घेवून आलीकडे खुप मोठे संशोधन पुढे आले आहे.या स्त्रीपात्रांच्याद्वारेही आपन मध्ययुगीन भारतातील भौतिकवादी मांडणी करु शकुत.नव्हे ती मांडणी मोठ्याप्रमाणावर व्हायला हवी.
********************************
No comments:
Post a Comment