Sunday, 27 December 2020

ll निऋतीचा पट ll

ll निऋतीचा पट ll  

सप्तसिंधुत, निर्ऋती ऋती गणाच्या चार ज्ञातींची गणमुख्या होती. ती नियतकालिकांत, समया प्रमाणे (समय = ऋत = जगत्चालक नियमाप्रमाणे, order) शेतजमीनीचे, धनधान्याचे न्याय्य वाटप करत असे.

नदीच्या गाळपुराने, नदीकिनारीच्या शेतजमीनीच्या मिटवलेल्या बांधामुळे, ज्ञाती-ज्ञातीमध्ये शेतजमीनीच्या पुनर्वाटपावरुन होणारी संभाव्य भांडणे टाळण्यासाठी, ती शेतजमीनीचे ज्ञातींमध्ये पुनर्वाटप करत असे. हे शेतजमिनीचे पुनर्वाटप न्याय्य असावे यासाठी तीने पटाची, पटावरील घराची ज्ञातीच्या कुलाच्या संख्येएवढीच घरे बनवली.

शेतजमीन कमीजास्त चांगली-वाईट असू शकते. तिची प्रतवारी उत्तम, मध्यम, कनिष्ठ ठरवून प्रत्येक ज्ञातीच्या पटावर कुलांच्या तीन रांगा केल्या. प्रत्येक कुलाच्या वाटणीला उत्तम, मध्यम, कनिष्ठ अशी शेतजमिन वाटणीत येणार. एखाद्या कुलाला उत्तम तर दुसरया कुलाला कनिष्ठ शेतजमीन पुनर्वाटपात येऊन न्याय-अन्यायाचा प्रश्न उभा राहू नये यासाठी हा समतावादी पट निर्ऋतीने बनवला. चार ज्ञातींचे चार पट मिळून बनला चौपट.

याच पटाचा अर्थ उलट-सुलट लावत, व्यवहारात कधी न्यायासाठी कधी अन्यायासाठी त्याचा वापर मागील शतकांपर्यंत गावोगावी सर्रास होत आला तो हा पट, निर्ऋतीचा चौपट.

अत्रेंच्या 'गावगाड्या'तील काही संदर्भ स्पष्ट करतात की पटाचा वापर अाता-आत्तापर्यंत कसा होत आला आहे. निर्ऋतीचे वारसदार तो कसा वापरत आले आहेत.

१. कौल घेणे म्हणजे महत्वाचे निर्णय घेण्यासाठी 'इष्ट'देवतेची मदत घेणे त्याला पट्टा म्हणतात.

२. गावाच्या जमाबंदीच्या ताळेबंदाला पट्टा किंवा इजारपट म्हणतात.

तो पाटलाजवळ असतो आणि पाटिल त्याप्रमाणे वसूल करतो.

३. पाटिल, पटवारी हे जुळे - पट किंवा पट्टा या शब्दावरुन बरेच संभाव्य दिसते.

४. पट्ट म्हणजे मुख्य, या शब्दापासूनही पाटील शब्द निघाला असेल.

५. ज्यांच्याजवळ पट्टा किंवा पट असतो आणि त्याबरहुकूम जे पट्टी, सारा, अगर सार्वजनिक वर्गणी वसूल करतात ते पाटील-पटवारी.

६. तेव्हां सबंध जाती / जमातीत जो  स्मरणाचा धड (चांगल्या प्रकारचे स्मरण) असून लोकांवर ज्याचे वजन आहे अशा बुध्दिमान व मुख्य माणसाजवळच जातीचा पट राहावयाचा.

७. असे पट जातींच्या मुख्याकडे असत.

वि-राज घोगरे
मार्गदर्शक 
मानव मुक्ती मिशन

♦दत्तजयंती आणि दत्त सांप्रदाय

♦दत्तजयंती आणि दत्त सांप्रदाय

स्त्री सत्ता जात असताना ६४ योगीनींनी अनेक सांप्रदाय जन्माला घातले पुढे ते पुरुषांनी चालवले.
दत्त सांप्रदाय असाच एक मावळतीच्या स्त्रीसत्तेतुन जन्माला आलेला अब्राम्हणी सांप्रदाय.
अवधूत किंवा दत्त नावाचे कुणीतरी स्त्रीवादी व्यक्ती स्त्रीयांच्या राज्यात जावून दिक्षीत झाले त्यांनी तो सांप्रदाय  उभा केला.
पुढे ब्राम्हणांनी खोट्या कथा लिहुन त्यांचे ब्रम्हा विष्णु महेशासाशी जोडुन अलौकिक ब्राम्हणी तिन तोंडी दत्तात रूपांतर करुन तो सांप्रदाय हाइज्याक केला.

तरिही महानुभाव आजही एकमुखी दत्तालाच मानतात. 
भारतातले प्राचीन एकमुखी मूर्ती खानदेशात सिंधखेडा येथे आहे.अशी अनेक ठिकाणी एकमुखी दत्तांची मंदिरे आपल्याला पहायला मिळतील. 

एक मुखी दत्ताच्या डोक्यावरची केशाची चुंबळ हीच खरी स्त्री परंपरा राखणारी कींवा ज्या संप्रदायात थोडा स्त्री सारखं राहणं म्हणजेच स्त्रीची पाठराखण करण होय.दत्ताने स्रीयांची मुक्तता करुन त्यांना गुरु करुन घेतले अशा स्वरुपाच्या काही मिथक कथा आहेत.याचा अर्थ असा की दत्त हे स्त्रीस्वातंत्र्यांचे पुरस्कर्ते होते .
कारण दत्त या पुरषाने स्रीयांना गुरु केलं होत दत्ताचे चोवीस गुरु होते त्यात काही पहील्या स्रीया होत्या त्या स्रीया बंदीस्त होत्या त्यांची सुटका केली होती दत्ताने.

काही कथा व मिथकांच्या द्वारे भविष्यात दत्तांची अब्राम्हणी उकल करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करुत...

तोपर्यंत
अवधूत चिंतन..
गुरुदेव दत्त ...

शाक्त शैव परिषद...
♦♦♦♦♦♦♦♦♦♦

Saturday, 19 December 2020

संघटना का वाढत नाही....?

संघटना का वाढत  नाही....?

 प्रत्येकाने यात आपण कुठल्या प्रकारात बसतो याचा विचार करावा

1.तोकडा अभ्यास, सखोल अभ्यास न करता मतप्रदर्शन करणे. वस्तुस्थिती विचारात न घेणे.
2. वर्तमान घडामोडीचे अज्ञान.
3.चळवळीबाबत चिंता आणि तळमळ जास्त, परंतु प्रयत्नांत कमतरता.
4.सर्वसमावेशक भूमिकेचा अभाव
5. एकसंघ भावनेचा अभाव. 
6. वैयक्तिक कामे करण्याची धडपड.
7. संघटनेचे म्हणणे सोयीप्रमाणे मानणे.
8.स्वप्नाळू जास्त व वास्तववादी कमी.ग्रंथाळु जास्त,व्यावहारिक कमी.आदर्शवादी जास्त,भौतिकवादी कमी. 
9.जिंकू शकतो यांवर विश्वास नसणे.
10.मानापमानामध्ये झुरणे.न्यूनगंड बाळगणे.
11.जबाबदारी स्वीकारायला पुढे न  येणे.
12.सुसंवादाचा अभाव.
13. युध्दाच्या वेळी घरी बसणे व युध्द   झाल्यावर  लढण्याच्या गप्पा मारणे.
14.कामशूर कमी आणि बातशूर जास्त.
15. बोलण्यात आणि प्रत्यक्ष वागण्यात तफावत असणे.
16.काम करणा-यावर सतत टिका टिपणी करणे, मात्र स्वतः जबाबदारी न स्वीकारणे.
17.कम्फर्ट झोनमध्ये काम करणे.जीवाला तोसिस न देने.पोटातील पाणी सुद्धा न हलु देने. 
18.स्वतः चे दैनंदिन रुटिन न बिघडविता बदल करण्याची भाबडी इच्छा बाळगणे...
19.नेतृत्वाकडून मोठ्या अपेक्षा ठेवणे परंतु त्याचे आदेश न पाळणे.
20.सहजशक्य नसलेले ध्येय निवडणे आणि सोपी कामे न करणे.
21.दुस-याकडून त्यागाची अपेक्षा ठेवणे, स्वतः मात्र सुरक्षित रहाणे.
22. एकमेकांच्या चांगल्या गुणांचा सन्मान न करणे. 
23.आपल्याच विचारांची टिमकी वाजविणे व इतरांनी केलेल्या चांगल्या कामांची दखल न घेणे.
24. आपल्या नेतृत्वा बद्दल आदर न बाळगणे आणि सतत दोष काढत रहाणे.
25. संघटनेच्या कार्यपद्धतीवर विश्वास नसणे.
26.त्याग आणि समर्पण न करता क्रांतीची अपेक्षा ठेवणे.

Tuesday, 15 December 2020

मलाही जीवनरस पुरवीतात ही सांस्कृतिक प्रतिके ...

मलाही जीवनरस पुरवीतात ही सांस्कृतिक प्रतिके ...

आमचे दृविड पुर्वज अत्यंत संवेदनशील होते.माणूस असो अथवा पशु,पक्षी किंवा निसर्ग त्यांनी सर्वांना अत्यंत जीव्हाळा प्रेम लावला.वृक्ष पुजा,निसर्ग पुजा,प्राण्यांची पुजा करणारी संस्कृती आमची म्हणजे दृविडांची.याचे पुरावे भारतीय सर्व सण उत्सवांत मिळतात.बैल पोळा,नागपंचमी,दिवाळी हे सण आमच्या संवैदनशील पुर्वजांची साक्ष देतात.आमचे पुर्वज निसर्ग,प्राणी पुजक होते.चांगले काम करून मेलेल्या माणसांचे स्मारके बांधून आमच्या पूर्वजांनी त्यांच्या कार्यकतृत्वाच्या कहाण्या पिढीदरपिढीगत सांगितल्या आहेत.जाकाई , जोकाई , मेसाई,मरिआई,तुळजाई , रेणुका , सप्तशृंगी, ,खंडोबा,बहिरोबा,जोतिबा,थळोबा , बिरोबा, नरसोबा,म्हसोबा,विठोबा,या अकारहिन दगडांकडून आमचे पुर्वज प्रेरणा किंवा जीवनरस घेत आलेले आहेत.भरपूर सुगी आल्यानंतर आलेले सुख असो नाहीतर दुष्काळ पडल्यानंतर आलेले दु:ख असो, त्यांनी आपल्या पुर्वजांना आळवणे, आठवणे कधीही सोडलेले नाही.आमच्या पूर्वजांनी याच अकारहिन पुर्वजांच्या स्मारकांतून संय्यमाचा, चिकाटीचा जीवनरस पिढ्यानपिढ्या घेतला आहे.
          म्हणून ही हजारो वर्षे जीवनरस पुरवणारी स्मारके,प्रतिके आणि त्यांची अस्मिता सहजासहजी टाकून  देता येइल का ? टाकता येइल का ? आपली सांस्कृतिक  नेनीव हे सर्व सोडायला सहजासहजी तयार होइल का ? 
      ते सर्व टाकुन देवुन त्यांनी गावंढळपणा सोडावा असे म्हनत, आपण मात्र नवे पुतळे स्मारके प्रतिके उभी करत आहोत. आणि याला आपण आधुनिकता म्हनतो.हा आपल्या वर्तनातील दुट्टप्पीपणा आहे.ज्याप्रमाणे आपले पुर्वज आकरहिन दगडातून जीवनरस घेत होते,त्याचप्रमाणे आपणही चौक,पुतळे,प्रतिके यांतून जीवनरस घेत असतो.ते काही वाईट नाही.

आस्मिता आणि प्रतिकांचे राजकारण

भारतात ब्राम्हणी छावणीचे मुख्य राजकारण आस्मिता आणि प्रतिकांचेच राहिलेले आहे.त्यांना भौतिकवादाशी कधीही काहीही घेणेदेणे नसते.नव्हते.आज bjp संघ रामायणातील रामाच्या प्रतिकावर सत्ताभोगत आहे.त्याला पर्यायी सांस्कृतिक भूमिका घेण्यासाठी शंबुक , सिता , रावण , मंदोदरी , शूर्पणखा , शबरी ही प्रतिके उभी केली गेलीत.हे पर्यायी उत्तर अगदी समर्पक आहे.
नाही आम्हाला हे आस्मितांचे आणि प्रतिकांचे राजकारण मान्य नाही.आम्ही कोरड्या भौतिकवादाची लढाई लढु म्हणून चालेल का ?
डाव्यांचा ह्या अस्मिता आणि प्रतिकांच्या लढाईला कसुन विरोध राहिलेला आहे.आता आपल्याकडे एवढा पावरफुल मार्क्स असताना भारतीय प्रतिकांना इतके का घाबरून जावे की तुम्हाला त्या प्रतिकांना विरोध करायची वेळ यावी.फुले आंबेडकर आस्मिता आणि प्रतिकांच्या लढाईत अव्वल असणे का रुचावे ? सर्वांना प्रेरणा उर्जा देणारी ही प्रतिके का नको आहेत तुम्हाला ? डाव्यांच्या कुठल्याही ऑफिसमधे प्रतिके नसतात का ? असतात पण ती मार्क्सवादी अभारतीय प्रतिके मोठ्याप्रमाणावर मिरवली जातात.फक्त भारतीय प्रतिकांच्या बद्दल किंतूपरंतु केला गेला तो डाव्यांच्या पक्षातील ब्राम्हणी विचार बाळगणाऱ्या लोकांनी. 

ही प्रतिके ब्राम्हणी छावणीला सहज चित करतील ती तुम्ही कुठल्या भितीने दुर लोटत आहात ? 
म्हणून प्रचंड कोरडे जीवन जगण्यापेक्षा आपणही ही जीवनरस पुरवणारी ठिकाणे पाहिली पाहिजेत.प्रतिके स्विकारली पाहिजेत.याद्वारेच तर देश संस्कृती बचावाचा मोठा उठाव होनार आहे.
आमची लढाई पक्ष संघटना म्हणून नाही तर ही लढाई अस्तित्वाची, अस्मितेची,संस्कृतीची आहे.आम्हाला जीवनरस पुरवणारी गावे,संस्कृती ते नष्ट  करायला निघालेत , ते आम्ही कसेकाय नष्ट करु देनार ? 
आम्ही जीवनरस पुरवणारी प्रतिके संस्कृती देश वाचवण्यासाठी लढा उभारनार आहोत.आमची भाषा , वेशभूषा, आमची संस्कृती , आमच्या अस्मिता आणि प्रतिके घेवूनच आम्ही सक्षमपणे लढाई लढु शकु.त्याशिवाय आम्ही उपरे बनु.
म्हणून मलाही खुनवतात ही सर्वच सांस्कृतिक प्रतिके.मला जीवनरस बहाल करतात ही ठिकाणे. 

नितीन सावंत परभणी 
9970744142 
१२ डिसें. २०२०

Friday, 4 December 2020

मानव मुक्ती मिशन संपर्क यादी राज्य व विभाग

मानव मुक्ती मिशन संपर्क यादी राज्य व विभाग 
♦मानव मुक्ती मिशन ♦

मार्गदर्शक : राजकुमार घोगरे ( पुणे )

1) अध्यक्ष तथा राष्ट्रीय संसद प्रमुख :नितीन सावंत ( परभणी ) 
मो. 9970744142

प्रदेशाध्यक्ष - ॲड अण्णा पातळे 

मानव मुक्ती मिशन प्रेरीत काही कक्षांचे प्रमुख :

1) नूरजहाँ शेख ( परांडा. जिल्हा उस्मानाबाद ) :प्रदेशाध्यक्षा हरिती स्त्रीदास्यांतक संघर्षसभा. 
मो.7744074290

3)जयराम सांगळे (प्रदेशकार्याध्यक्ष जात्यांतक शेतकरी शेतमजूर सभा )
मो: 9604458756

4)इस्माईल तांबोळी ( बार्शी ) : प्रदेशाध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षक परिषद. 
मो.9689903001

5) राम सरनाईक (परभणी) :
प्रदेशाध्यक्ष भगतसिंग स्टुडंट फ्रंट. 
मो.9404504159

6)जयेश आहेर.
महाराष्ट्र राज्य संघटक,
भगतसिंह स्टुडंट फ्रंट
७०२८७१९७१३

7)आसिफ नदाफ (कराड जिल्हा सातारा): प्रदेशाध्यक्ष मजलिस ए इंसानियत.
मो.9527975286 

8) रफिक सय्यद ( प्रदेश कार्याध्यक्ष मजलिस ए इंसानियत महाराष्ट्र ) 
मो : 88069 36151

11)अजय महाराज वेलदोडे ( प्रदेश संघटक शाक्त शैव परिषद , महाराष्ट्र ) 
9307189759 

15) विकासराव चव्हाण 
पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष 
शाक्त शैव परिषद 
9653454607

16) अविनाश खाडे ( मराठवाडा विभागीय अध्यक्ष मानव मुक्ती मिशन) 
9822214310

17)अभय पाटील बुलढाणा ( अमरावती विभागीय अध्यक्ष मानव मुक्ती मिशन ) 
+91 84828 88292

18)नितीन दांदळे ( अमरावती विभागीय अध्यक्ष भगतसिंग स्टुडंट फ्रंट ) 
Mo : 9112681017

19)प्रभाकर शिंदे ( नागपूर विभागीय अध्यक्ष मानव मुक्ती मिशन ) 
Mo : 9834438685 
----------------------------------------

Sunday, 29 November 2020

सौमावाद्यान्नो भूमिका घ्या ! सामाजिक कार्यात उतरताना

सौमावाद्यान्नो भूमिका घ्या ! 

सामाजिक कार्यात उतरताना पहिला संघर्ष सुरु होतो तो स्वताशी तुकोबाराय म्हनाले होते रात्रंनदिन आम्हा युद्धाचा प्रसंग
खरे आहे.
अंतर्मनात युद्धच चालु असते. 
संघर्ष चालु होतो,तो असा की व्यवस्थेशी जी जी व्हयजी म्हनत जगावं की प्रत्येक गोस्टीला प्रश्न करत बंडखोरी करावी.स्वताची पायवाट निर्माण करावी की भाऊगर्दीत सामील व्हावे.विचारधारेचा कार्यकर्ता बनण्याआधी स्वताचा संघर्ष पुर्ण केल्याशिवाय आपण परिपूर्ण होत नसतो.स्वताच्या मनावर विजय मिळविल्यानंतरच महावीर बुद्ध बनता येते.यशोधरेला आणि राहुलला बघत ग्रहत्याग बुद्धच करु शकतो आपल्याला तर आर्ध्या कार्यक्रमातून उठून जावे लागते कारण आपण गेल्याशिवाय बायको जेवत नाही म्हणून. 
कार्यकर्ता म्हणून आपली एक भूमिका असावी.भुमीकांच्या जोरावरच तुमची व्यवस्था उभी रहाते.एक स्पष्ट भुमीका घेवुनच तुम्हाला नवी व्यवस्था उभी करायची असते.भुमीकेची स्पष्टता नसेल तर तुम्ही आहे त्या व्यवस्थेत विरघळून,मिसळून जाता.प्रस्थापित जातवर्गीय व्यवस्था तुमचे पोतेरे करते.ठोस भुमीकावाल्यांनी कित्तेक साम्राज्ये  सहज कोसळवलीत,आणि ठोस भुमीकांच्या जोरावरच नव्या राज्यव्यवस्था कार्यरत झाल्याचे आपल्याला दिसेल.भुमीकाहिन माणसे दुसऱ्याच्या आलीशान बंगल्यासमोरील अंगणातील पायपोसने असतात.जिथे भूमिका मृतप्राय होते तिथे जी,जी, व्हय जी ही वृत्ती सर्वोच्च टोकाची लाचारीची लाळ गाळाताना दिसते.यात आनखी एक असे की लेचिपेची भूमिका सुद्धा तडजोडीची इतकी सवय लावते की आयुष्य हुजरेगिरी करण्यासाठीच उरते.म्हणून भूमिका स्पष्ट आणि ठोस असावी.
तुम्हाला सौमावादी व्हायचे आहे तर ढसाळ व्हा.व्यवस्थेला कोलणारा किंवा मग ओशो व्हा.अंतर्मनात किंतूपरंतु न ठेवता झोकुन द्या स्वताला सामाजिक चळवळीत.
कोण काय म्हनेल ? माझ्या रोझीरोटीचे काय होइल ? लगीन व्हइल की नाही ? समाज भाऊकी काय म्हनेल ? कुनाला हे अवडेल की नाही ? हे सगळे फाट्यावर मारा झोकून द्या एका सामाजिक कार्यात.गरज आहे तुमच्या त्यागाची.गरज आहे तुमच्या या वेळेची.
 तुमच्या त्याग आणि समर्पनाला आज महत्व आहे.तो तुम्ही केला पाहिजे.उंटावरून शेळ्या हाकुन जमनार नाही.
आम्ही वाट पहात आहोत त्यागी आणि समर्पित व्यक्तिची जो अंतर्मनातील संघर्ष मिटवून मुक्त जगायला निर्भयपणे पुढे येइल.
सौमावाद्यान्नो 
नितीन सावंत परभणी 
9970744142

Saturday, 7 November 2020

भगतसिंग स्टुडंट फ्रंटची भूमिका

भगतसिंग स्टुडंट फ्रंटची भूमिका 

 भारताच्या क्रांतिकारी विद्यार्थ्यांना जय भारत 


जग बदलण्याच सर्वाधिक सामर्थ्य कोणात असेल तर ते आपल्यातच(विद्यार्थ्यांत) आहे.
अन्यायाच्या विरोधात मूठ आवळून,अत्याचाराच्या विरोधात पेटून उठून विद्यार्थी जेव्हा जेव्हा रस्त्यावर उतरला तेव्हा तेव्हा क्रांती झाली मग फ्रेंच क्रांती असो की रशियन राज्यक्रांती.*
 *अगदी अलीकडचे उदाहरण द्यायचे झाल्यास इजिप्त, थायलंड ह्या देशांमध्ये जी क्रांती झाली तिला कारणीभूत विद्यार्थीच होते.* 
*सध्या हीच क्रांतीसदृश्य परिस्थिती भारतात निर्माण झालेली आहे. अन्याय अत्याचाराच्या विरोधात तरुन पेटून उठत आहेत. सध्या देशात विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी रस्त्यावर उतरत आहेत.हे कशाचे संकेत आहेत? क्रांतिचेच ना!*
*थोडक्यात विद्यार्थ्यांमध्ये (युवांमध्ये) प्रचंड शक्ती आहे. हे आपण ओळखले पाहिजे. आणि अशा समस्या सोडविण्यासाठी या शक्तीचा वापर केला पाहिजे.*
 *या देशातील काही स्वार्थी लोक विद्यार्थ्यांना जात-पात-धर्म-पंत इत्यादी विषया वर भडकवतात आणि स्वतःचा स्वार्थ साधतात. विद्यार्थ्यांच्या सामर्थ्याचा असा गैरवापर देशाच्या भविष्यासाठी अत्यंत घातक आहे.*
 *क्रांतिकारी युवकानो ही प्रस्थापित व्यवस्था किडलेली आहे, सडलेली आहे. भारतातील प्रस्थापित ब्राह्मणी भांडवली व्यवस्था सामान्य जनांचे प्रश्न न सोडवता त्यांचे शोषण करणारी आहे.*
 *शहीद भगतसिंग एकदा म्हटले होते प्रस्थापित व्यवस्था जर देशातील सामान्य जनतेच्या प्रश्न सोडण्याऐवजी त्यांचे शोषण करत असेल तर ती व्यवस्था उलथून, तेथे शेतकरी-कष्टकरी-कामगार वर्गाला न्याय मिळवून देणारी व्यवस्था स्थापन करणे हे तरुणांचे कामच आहे.*
 *आज या देशात गरीब व सर्वसामान्य परिस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांनी शिकूच नये,अशी व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. LPG अर्थात liberalization-globalization-privatization  या गोंडस नावाखाली देशात शिक्षणाचे सरसकट खाजगीकरण करण्यात येत आहे. शिक्षण व्यवस्था प्रचंड महागडी झाली आहे.*
 *गरीबाच्या मुलामुलींना शिक्षण व्यवस्थेपासून वंचित ठेवण्याचा मोठा कट देशात चालू आहे. याविरोधात आवाज उठवणे अत्यंत गरजेचे झाले आहे.*
 *त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वाभिमान व सत्य परिस्थितीचे मन जागृत करून त्यांच्या सामर्थ्याचा वापर सर्वकष शोषण व्यवस्थेचा अंत करून या देशात पुन्हा समतावादी समाजरना स्थापण करण्यासाठी झाला पाहिजे.*
 *याच उद्देशाने #भगतसिंग_स्टुडन्ट_फ्रंट_BSF या संघटनेची स्थापना करण्यात आली. आपण सर्वांनी या परिवर्तनाच्या लढ्यातील शिलेदार होण्यासाठी भगतसिंग स्टुडन्ट फ्रंट या क्रांतिकारी संघटनेत सामील व्हा आणि बाबासाहेबांच्या संवैधानिक मार्गाने उद्ध्वस्त करा ही विषमतावादी अन्यायी व्यवस्था.* 🤝🏾✊🏾

*उठ विद्यार्थ्या जागा हो !*
*BSF चा धागा हो!*
*इन्कलाब जिंदाबाद*✊🏾 
*जय भारत*🇮🇳 
*लाल सलाम*🇻🇳

*जयेश आहेर*
*भगतसिंग स्टुडंट फ्रंट*
*प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य*
*7028719713*

Monday, 12 October 2020

बुद्धीजीवी : ब्राम्हणी, अब्राम्हणी

बुद्धीजीवी :  ब्राम्हणी, अब्राम्हणी
 
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात लिखानाचे,अभिव्यक्तीचे निर्बंध उठले आणि सर्वांसाठी लेखण्या अधिकृत खुल्या झाल्या.सर्वहरांच्या मुक्तीच्या तत्वज्ञानाची निर्मिती प्रक्रिया मोठ्याप्रमाणावर सुरु झाली. नवनवीन लेखक,साहित्तिक उदयाला आले.पण त्यात काही बोटावर मोजता येतील दिग्गज विचारवंत, लेखक,साहित्तिक सोडता बाकीच्यांनी आत्मसन्मानाच्या महारोगात आपली हयात घालवली आणि सर्वहरांच्या साहित्यिक संस्कृतीचा सत्यानाश केला.
एकांगी लिहीले गेलेल्या ब्राम्हणी इतिहासाला विधायक नकार देत अब्राम्हणी परंपरेतील इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचे काम सर्वहरांच्या बुद्धीजीवी वर्गावर होते.त्यांनी ही जबाबदारी घेतली पण ब्राम्हणी कलाकार,साहित्तीकांच्या सवई सुद्धा या प्रक्रियेत त्यांनी कॉपी केल्या. स्वातंत्र्यानंतर होऊ घातलेल्या या लेखक साहित्तीकांनी सर्वप्रथम आपली जमीनिशी असलेली नाळ तोडली आणि ते आत्मप्रोढी जगतात शिरले. इतरांना तुच्छ लेखने , ज्ञानाची घमेंडघोरी मिरवणे , ज्ञान लपवून ठेवने , ज्ञानाची ब्र्यांडिंग करणे , आणि पुरस्कारांच्या मागे धावणे , ब्राम्हणी छावणीशी हातमिळवणी करुण इतिहासाची अफरातफर करणे इत्यादीं कारणामे सर्वहरांच्या बुद्धीजींच्या द्वारे झाले किंवा चालु आहेत. 
साहित्तीक क्षेत्रात,समिक्षकांमधे आपापसात अत्मप्रोढीचे परात्म जीवन जगणार्यांची खुप मोठी फळी स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे.ज्ञानभांडार सर्वांसाठी खुले झाल्यानंतर त्याचा उपयोग सर्वहरा वर्गाच्या मुक्तीसाठी व्हायला हवा होता तर यांनी ते ज्ञान मिरवण्यासाठी कमवलेले आहे,हे सिद्ध झाले आहे.बरे यांचे परात्म मोठेपण नंतर पुरस्कारांवरुन मोजने सुरु झालेले आहे.
त्यांच्याद्वारे नवनिर्मिती तर झालीच नाही.उलट संकलित ज्ञानाचाही त्यांनी भयानक गर्व केलेला आपल्या दिसून येइल. त्यांना विचारले पाहिजे  तुम्ही बुद्धीजीवी आहात ना ? मग तुमची स्वताची नवनिर्मिती कुठेय ?
बरे साहित्यविश्वात यांची ओन क्रियेटिव्हिटी काय ?
सगळे ग्रामीण शब्द धापलेले,सर्व कथानक ग्रामीण, सर्व थेअरी,संपूर्ण पसारा ग्रामीण.मग तुम्ही जिथून कमाई केली त्या ग्रामसंस्कृतीच्या उद्धारासाठी काम का करत नाहीत ? त्या केलेल्या कमाईचा मोबदला म्हणून त्याची परतफेड का करत नाहीत ?सहित्यविश्वात तुमचे स्वताचे नवे शब्द कुठेत ?
तुम्ही नांगर,वखर, तिफन, जु शेत शिवार,उखळ,मुसळ,जाते,असे हजारो शब्द साहित्यविश्वात आनले ती काय तुमची स्वताची क्रियेटिव्हिटी आहे का ?
तुम्ही साहित्य विश्वात शेलक्या परवडेबल शिव्या स्विकारल्या ती काय तुमची कमाई आहे का ?
साहित्यविश्वात तुमचे नवे काय दिले.सगळे काही प्रतिबिंबवादीच ना ?
तुमचे स्वताचे नवे दोन शब्द तरी आहे का ? 
माणुस त्याची आणि त्याची अभिव्यक्ती भौतिकवादाचीच उपज असते,त्यामुळे तुम्ही सगळे येथूनच घेनार,नवे काय निर्माण करनार?  हे जरी खरे असले तरी तुम्ही त्या भौतिक जगताप्रती प्रामाणिक राहिलेला दिसत नाहीत.
फुलेंचे साहित्य वाचा.अगदी नवे शब्द जन्माला घालनारे फुले होते.तुमचे काय ?
मग हे सगळे ज्यांच्याकडून घेतले त्यांच्यावर ज्ञानाची घमेंडखोरी करनार व्हय ! 
मोबदला द्यायचा सोडुन तिथे जावून ज्ञान झाडनार व्हय ! 
सगळे गयेगुजरे तुम्हीच तेवढे शाहाने व्हय ! 
इतिहासकारांच्या बाबतीतही असेच इतिहासातील कागदत्रांना तुम्ही नव्याने जगासमोर आनता , पुन्हा पुन्हा त्याची मांडणी करता एवढेच.तुम्ही इतिहास घडवत नसता फक्त मांडत असता.मग त्या ज्ञानाची घमेंड कशासाठी , मिरवने कशासाठी ? लपवाछपवी कशासाठी ? हा तर ब्राम्हणीझम आहे मग . 

म्हणून ग्रामसंस्कृतीच्या खऱ्या वारसदारोंन्नो,
आर्थिक सामाजिक सर्वहरांन्नो या ब्राम्हणी बुद्धीजीवीना आधी कोला ...

नितीन सावंत परभणी 
9970744142
दि. 12 Oct 2020 
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️

Thursday, 8 October 2020

जात काय असते ? ती कशी ओळखायची ?

जात काय असते ? ती कशी ओळखायची ?

१.आजही आनेक गांवामधे माजी अस्पृश्य जाती तथा काही भटक्या विमुक्त जाती मंदिरात जावू शकत नाहीत.(लातुर जिल्ह्यातील मातंग असनार्या सरपंच बाईला असेच मारण्यात आले,विदर्भातील अर्वी गावात मंदिरात का आला म्हणून ८ वर्षाच्या लहान मुलाला स्टाइलच्या गरम फर्शीवर ॲसिड टाकुन नग्न बसवले गेले )
२.ह्या जाती भटक्या विमुक्त जाती आणि माजी अस्पृश्य जाती सवर्ण मानल्या गेलेल्या मोठ्या जातींच्या लग्नात पंगतीत जेवू शकत नाहीत. 
३.आशा सामाजिकदृष्ट्या हिन मानले गेलेल्या जातीतील महिलांना मोठ्या जातींच्या वस्तीतून जाताना पायातील वहाणा हातात काढून जावे लागते.हि प्रथा राजस्थान गुजरात उत्तर प्रदेश राज्यात काही ठिकाणी आजही चालु आहे. 
४.आजही जे आम्ही जातपात मानत नाही म्हणतात ते सुद्धा खुल्या दिलाने माजी अस्पृश्य जातींच्या पंगतीत सर्वांसमोर जेवायला बसत नाहीत.
५.आजही मोठ्या जातीतल्या कुनाचे घर विक्रीला असेल तर ते पैसे असुनही पुर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातीतील व्यक्तींना विकत घेता येत नाही.माजी अस्पृश्यांनी अस्पृश्य वस्तीतच घरे घ्यावीत,हा दंडक गावापातळीवर आजही आहे. 
६.जागा माजी अस्पृश्यांना म्हणजे शेडुल्ड कास्टला सुटली तर कारभार उपसरपंच म्हणून मोठ्या जातीकडे,वरच्या जातीकडे,सवर्ण जातीकडे असतो.
७.माजी अस्पृश्य जातीतीचा किंवा भटक्या विमुक्त जातीतील एखादा शिकून कितीही मोठा झाला,गावात फोरव्हिलरमधे आला तर त्याची प्रावेटात टिंगलटवाळी केली जाते.त्याला हिनत्वदर्शक वागणूक दिली जाते.
७.आजही बऱ्याच गावांमधे माजी भटक्या विमुक्त तथा माजी अस्पृश्य जातींच्या वृद्ध व्यक्तीना मोठ्या जातीचे लहान मुले,कमी वयाचे सुद्धा आरे कारे करुन बोलतात. 
८.भटके विमुक्त तथा माजी अस्पृश्यांच्या नावाला कधीही राव,जी,साहेब,सर आशी आदरार्थी विषशने लावली जात नाहीत.
९.मोठ्या जातीच्या सार्वजनिक स्वयंपाकासाठीची भांडी, मोठे पातेले, कढया,अस्पृश्य मानले गेलेल्यांना किरायाने पैसे देवून सुद्धा दिल्या जात नाहीत.कुनी आग्रह करुन दिल्यास मोठ्या जातीतले ते भांडे परत स्विकारत नाहीत. 
१०.अस्पृश्य मानले गेलेल्या जातीनी भडक रंगाचे भारीचे नवे कपडे घातले की आख्खा गाव चिडवतो हसतो .. अस्पृश्यांची मोठ्यातली मोठी व्यक्तीही वाड्याच्या ढाळजेच्या चबुतर्याच्या ओट्याच्या पुढे येवू शकत नाही ..
११.माजी अस्पृश्य जातीतील लोकांनी भारिचे कपडे घातले की गावात म्हणतात ते माजलेत.
१२.माजी अस्पृश्य जातींना आजही उच्चजातीयांचे अभिवादन,संबोधन वापरावे लागते.जसे राम नमस्कार वगैरे परंतू उच्चजातीय कधीही दलीतांचे माजी अस्पृश्य जातींचे संबोधन घालत नाहीत.जय भीम म्हणनार्याची उच्चजातीय आपापसात टिंगलटवाळी करतात.
१३.बऱ्याच गावांत आजही उच्चजातीय लोक माजी अस्पृश्यांच्या घरचे पाणी पित नाहीत.
घरकुल आले इस्किम आली की " साले माजलेत ..."
शिकून नोकरिला लागला की "माजलेत .."
कामावर नाही आला रेटुन बोलला की "साले माजलेत .."
या सर्व गोस्टी जातीवादात मोडतात.यालाच जातीवाद म्हणतात. 
१४)उच्चजातीय पितृसत्ताक मानसिकता बाळगनारे माजी अस्पृश्य जातीतील किंवा भटक्या विमुक्तांच्या स्त्रीयांकडे कधीही आदराने सन्मानाने पहात नाहीत. म्हणून आशा प्रवर्गातील स्त्रीयांची ते नेहमीच सामूहिक बलात्कार करुन सहजरीत्या विल्हेवाट लावतात. 
१५)गावाला मोठे सभागृह असूनही , गावाला भव्य मंदिरे असूनही भटके विमुक्त गावात आल्यानंतर त्यांना गावच्या हगंनदरीत आपला पाल , बिराड उतरावे लागते. एवढेच सरकारी स्वच्छ जागेवर जरी पाल उतरवला तर गावचे टगे त्यांना हाकलून लावतात किंवा पैसे वसुल करतात.
१६) गावच्या बाहेर सरकारी जागेत एखादे भटक्याचे बिराड जास्त काळ विसाव्याला असेल तर त्याच्या घरी कोणी नसताना त्याला न विचारता ते घर जाळले जाते किंवा पाडले जाते.एकाच गावी भटक्यांनी दीर्घकाळ थांबु नये जातीव्यवस्था पाळणाऱ्या वर्गाचा दंडक. 
१७) चोरीचा आरोप सिद्ध होण्याच्या आधीच नेहमीच भटक्या विमुक्तांना आधी सार्वजनिक गावगुंडांचा मारखावा लागतो आणि नंतर पोलीसांचा. 
१८) शुल्लक आरोपांवरून गावचावडीवर संपूर्ण बाई निरवस्त्र करुन तिला मारल्याच्या , जाळल्याच्या किंवा बलात्कार केल्याच्या घटनाही अलीकडील आहेत.कारण त्या निम्नजातीय होत्या.
आजही यंत्रयुगात, it च्या जगात आपण माणुस म्हणून जगु शकत नाहीत का ??
जात काय असते ?? कशी ओळखायची ? खरच ती निसर्गदत्त आहे आहे का ? निसर्गनिर्मित आहे का ? निसर्गनिर्मित असल्याची खुन काय ? 
बरे जात रक्तावर आधारलेली म्हनावे तर दवाखान्यात रोज हजारो बाटल्या रक्ता कुनाचेही कुनालाही दिले जाते. तेव्हा जाती भ्रष्ट होत नाहीत का ?
जात वंशशुद्धत्वावर ओळखायची तर सर्वांचेच वंश शुद्ध आहेत काय ?
मात्रसत्ताक स्त्रीसत्ताक गणव्यवस्थेत स्त्रीस्वैर संभोग करत असे.नवरा नावाचा प्रकार अस्तित्वात नव्हता.त्याही आधी आदिमानव संस्कृतीत कुठल्याही स्त्रीसोबत कुठलाही पुरुष संबंध ठेवत असे. 
मग कुनाचा वंश शुद्ध आहे बरे ?
तुमच्या जातीचा इतिहास कधीपासून सांगू शकाल ? फार तर एक हजार वर्षापूर्वीपासून, मग मनुष्य निर्मीती किती हजार वर्षापूर्वीची आहे ?? तेव्हा तुमचे पुर्वज कोन होते  ??? तुमची जात कुठे होती ???
तेव्हा गर्वच नाहीतर माज होता का तुमच्या जातीला ??
शोधली पाहिजेत प्रश्नांची उत्तरे. 
लहान मुलांना जात काय असते हे कळतही नाही त्या वयात त्यांना मारणे हे किती अमानवीय कृत्य आहे .
मुस्लिम लहान मुलांना तुझ्या घरात बॉंब बनवतात का असे अनेक शाळेंत शिक्षकांनी प्रश्न विचाराल्याचे पुढे आले आहे. तुम्ही जेहादी आहात असले शिक्षकांकडून टार्गेटिंग झाल्याचे अनेक प्रकारही लहान मुलांकडून उघड झालेले आहेत. 

नितीन सावंत , परभणी
अध्यक्ष मानवमुक्ती मिशन 
9970744142

Sunday, 4 October 2020

सरंजामशाहीची अदृष्य नियमावली

♦️सरंजामशाहीची अदृष्य नियमावली 

इ.स.६ व्या शतकापुर्वी सामंतशाही तर इ.स.च्या ६ व्या शतकापासून सरंजामशाहीला सुरुवात होते. पहिली ही वरुन शोषणव्यवस्था, दुसरी खालून शोषणव्यवस्था. पहिल्या व्यवस्थेमध्ये शेतकरी महसूल प्रत्यक्ष राजाला देतो, दुसरी व्यवस्थेत मध्यस्थामार्फत म्हणजे जमिनदारामार्फत राजाला देतो.

सरंजामशाहीत सरंजामदार खेड्यातील मोठे जमीनदार असत आणि अनेक गावे त्यांच्या नियंत्रणात असत. ते वाडेकरी असत. ते सशस्त्र फौजसुध्दा बाळगत. त्यांचा छोटेखानी डामलौल अगदी राजासारखच असे.या वाड्याच्या पायरीला धर्मव्यवस्था सुद्धा लोटांगणे घालत असे. किंबहुना ते धर्मव्यवस्था आणि सरंजामीव्यवस्था एकमेकाला पूरक काम करत.

गावातील प्रमुख सणवार उत्सवात त्या सरंजामदाराचा पहिला मान असे. धर्मप्रमुख त्यांची मर्जी सांभाळत. त्याप्रमाणेच वागत. म्हणजे ब्राम्हणशाही आणि सरंजामशाही दोघे मिळून शोषण पिळवणूक करत असत.हि शोषण पिळवणूक गरिब शेतकरी यांच्यापासून ते भुमीहीन भटके विमुक्त किंवा गावकुसाबाहेरील तत्कालीन अस्पृश्य जातींपर्यंत होई.यात धर्मव्यवस्था धार्मिक लुट करे तर सरंजामशाही अवाजवी शेतसारा किंवा खंडण्या वसुल करे. 
या दोन्हीही व्यवस्था ग्रामीण जनतेवर कठोर नियमावली बसवून लक्ष ठेवत असत. 

या दोनही व्यवस्थेच्या नियमावल्या आपण समजून घेवून त्यावर उपाययोजना म्हणून त्या कोणत्या न  कोणत्या  मार्गाने सार्वजनिकरित्या मोडीत काढण्यासाठी कार्यरत असले पाहिजे.आज सरंजामीव्यवस्थेचे अवशेष (निम-सरंजामी) उच्चजातीयांनी विशेष प्रयत्न करुन मोडले पाहिजेत. त्या नियमवल्या सांभाळून कुठलाही बदल आपन करु शकत नाहीत.कुनाचेही भले होइल असे त्या नियमावलींत काहीही नाही.आपण जेव्हा आपल्या समस्यांचे खापर आप्तस्वकियांवर फोडतो तेव्हा त्या समस्यांना कुठलाही एक व्यक्ती जबाबदार नसतो तर समाजव्यवस्थेतील ही नियमावली, आणि ती चालवनारे त्यावर अंमल करणारे जबाबदार असतात.
एखाद्या सुनेला हुंड्यासाठी जाळून मारणे या घटनेचा निषेध करताना आपण जाळून मारणाऱ्या कुटुंबाला ज्या प्रमाणे बोलत असतो,शिव्या देत असतो, त्यात हे विसरतो की  ते कुटुंब स्त्रीला हिन,दुय्यम लेखनार्या सार्वजनिक नियमावलीत वावरत आसते. आजूबाजूला एक सुन जाळून मारलीतर काय दुसरी येइल असा प्रचार करणारी सरंजामी व्यवस्था किंवा मानसिकता कार्यरत असते.एका व्यक्तीला किंवा कुटुंबाला जबाबदार धरुन चालनार नाही.अशा ज्या ज्या नियमावली आहेत,त्या मोडल्या पाहिजेत.माझ्या घरात आम्ही जातीभेद पाळत नाहीत असे ९९% लोक म्हणतात तरीही जातीव्यवस्था कशीकाय कार्यरत आहे,आजही मातंग पारावर आला म्हणून बाई असो किंवा लहान मुल असो त्यांना कठोर शिक्षा करणारी जात ही त्यांचीच आहे जे म्हणतात आमच्या घरात आम्ही जातीभेद अस्पृश्यता पाळत नाहीत.मग असे दुहेरी वर्तन का होते ? तर सार्वजनिकरित्या सर्वांनी मिळून ही सरंजामी नियमावली मोडलेली नाही.तसे जगजाहीर प्रयोग केलेले नाहीत.म्हणून सार्वजनिक जीवनात आपली पायरी बघुन न वागणाऱ्या माजी अस्पृश्य जाती किंवा भटक्या विमुक्तांना कठोर शिक्षेला सरंजामशाही आजही तयार आहे.

आत्ता सजातीय उदाहरणे बघा 
" मी खुप पुढे गेलो असतो पण भाऊकी आड आली." 
"मी प्रगती केली असती, पण भावाला माझे बघवत नाही. 
"मित्रांनी साथ दिली नाही."
"कोणी मदतीला आले नाही." 
वगैरे.हे व्यक्तिनिष्ठ आरॊप झाले.या गोस्टीला आजूबाजूला तिच सरंजामी नियमावली कार्यरत आहे.तीचा दबाव असल्यामुळे तुम्हाला आप्त किंवा मित्र धोका देताना योग्य वेळी मदतीला येताना दिसत नाहीत. पोडजात मोडुन लग्न करणे हे भाऊकीला मान्य नसते.त्यात तसे लग्न केलेल्या कुटुंबाला बहिष्काराला सामोरे जावे लागते. 
खरेतर, प्रस्थापितांची नियमावली पाळून समाजव्यवस्थेत बदल शक्य नाही.ती मोडली पाहिजे.सर्वांच्या भल्यासाठी.
म्हणून बरेच जन व्यक्तिगत जात पात लाळत नाहीत परंतू ते हे चांगले कृत्य  सार्वजनिक करत नाहीत.आमच्या नतलगात अंतरजातीय विवाह झालेला आहे हे सार्वजनिक कौतुकाने सांगण्याचे दिवस अजुन यायचे आहेत.त्याने तोंड काळे केले ही सरंजामी नियमावली आजूनही कार्यरत आहे.
कायद्याने सज्ञान असनारी मुलगी जोडीदार निवडून मुलासोबत लग्न करुन गेली तरी पळून गेली , तिच लफडं होतं असा प्रचार  करणारी नियमावली थांबवनारे धाडसी मताचे लोक  उभे करायचे आहेत. दलीतांची बाई सहज उचलून आनुन तिला ओरबडुन , रेप करताना तिने ओरडु नये म्हणून जिभ कापून किंवा पळून जावु नये म्हणून हात पाय मोडुन तिला हवे तेव्हा हवे तिथे फेकुन देता येते ही लोकशाहीतही स्वातंत्र्या नंतर वावरनारी सरंजामी मानसिकता सबकॉंसिअसली नेनीवेतून कार्यरत आहे. 
मनीषा वाल्मिकी प्रकरणात आरोपींना वाचवण्यासाठी भरलेल्या जातपंचायती, " बघु कोण काय करतय आपल्याला " या सरंजामी मानसिकतेतून कार्यरत आहेत.
 

नितीन सावंत परभणी 
९९७०७४ ४१४२ 
दि.४ आक्टोबर २०२०

Sunday, 27 September 2020

कार्यकर्ता कसा आसावा :

कार्यकर्ता कसा आसावा : 
1)  संघटनेची तत्वप्रणाली-
त्याला मान्य असावी. संघटनेचे अंतीम ध्येय, उद्दिष्ट त्याला माहित असावे.
2)  समाजाबद्दल आपुलकी असावी.
संघटनेच्या कार्कर्त्यांबध्दल त्याच्या मनात सद्भावना, प्रेम, आदरभाव असावा.
3)  स्वत:च्या समाजाचा पूर्वेतिहास त्याला माहित असावा. कारण जो इतिहास विसरतो तो इतिहास घडऊ शकत नाही असे म्हटले जाते.
4)  कार्यकर्ता हलक्या कानाचा नसावा. संघटनेचा नेता आणि उध्दीष्ठ यावर त्याचा ठाम विश्वास असायला हवा.
5)  कार्यकर्त्याच्या ठायी अहंभाव नसावा. दुसरया कार्यकर्त्याचा व त्याच्या कामाचा सन्मान/आदर करणारा असावा.
6)  पदलोभी नसावा-
पदाची लालसा असलेले कार्यकर्ते शत्रुंपेक्षाही घातक असतात. ते स्वतःही संघटन वाढवीत नाहीत आणि इतरांनाही वाढवू देत नाहीत. संघटन फक्त लेटरपॅडवर शिल्लक राहते.
7)  आकलनशक्ती-
नेत्याच्या 'सूचक' शब्दांचा अर्थ समजला पाहिजे. Read between the lines दर्जाची आकलन क्षमता असावी.
8)  सूक्ष्म निरीक्षण-
कार्यकर्त्याकडे सूक्ष्म निरीक्षण शक्ति असावी. सर्वच समाजात घडणा-या लहानमोठ्या घटनांची त्याने नोंद घ्यायला हवी.
9)  भाषण व संभाषण चातुर्य- आपल्या मधुर वाणीने मुद्दा पटवून देण्याचे चातुर्य कार्यकर्त्याने अवगत करावे.
10)  आत्मविश्वास-
निराश मनोवृत्ती नको.अपयशाचे यशात रूपांतर करतो, तोच खरा लढवय्या, नाहीतर 'रडवय्या'.
कार्यकर्त्याच्या डिक्शनरीत 'निराशा' हा शब्दच नसतो. दुर्बल परिस्थितीशी जुळवून घेतात. पराक्रमी परिस्थिती हवी तशी बनवण्यासाठी लढा देतात.
11)  परिश्रम, चिकाटी आणि सातत्य-
ध्येय गाठण्यासाठी इतरांपेक्षा जास्त परिश्रम करण्याची तयारी हवी. प्रयत्नांत सातत्य हवे.धरसोड नको.
12)   कार्यकर्ते जोडणारा-
कार्यकर्ते जोडणारा असावा. तोडणारा नको. प्रभावी संघटन हिच संघटनेची शक्ति असते.
13)  कार्यकर्ते हेरणारा व व्यक्तीपरीक्षक-
कर्तृत्वशाली, सदाचारी आणि प्रभावी व्यक्तींना हेरून त्यांना संघटनेत सामील करण्याचे कौशल्य कार्यकर्त्याकडे हवे.
चांगले काम करणारा कार्यकर्ता पुढे जात असेल तर त्यावर खोटे आरोप करुन त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न कदापी करु नका...
14)  शिस्त व वेळ पाळणारा पाहिजे.
15)  त्याला उपलब्ध साधनांचा काटकसरीने व कौशल्याने वापर करता यावा.
16)  श्रेय लाटण्याची मनोवृत्तीचा नसावा. धोकेबाज नसावा.
17)  कार्यक्रमाचे आयोजन करता यावे. संघटनेचे विविध उपक्रम राबविण्याची जबाबदारी स्वीकारावी. पुढाकार घ्यावा. किमान संघटनेच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये त्याचा सक्रीय सहभाग असावा.
18)  समताप्रेमी व समर्पित मनोवृत्तीचा असावा. श्रमाची लाज वाटू नये.
19)  अभ्यासू, चिकित्सक व संशोधक वृत्तीचा असावा.
20)  गुप्तता- 
संघटनेतील काही गुप्त गोष्टी गुप्तच ठेवणारा असावा.
21)  कार्यकर्त्याला संघटनेचा व स्वतःचा विचार दुस-यांस पटवून देता यायला हवा.
22)  प्रसिद्धी व प्रतिष्ठा यांस हपापलेला नसावा.
23)   अंधश्रद्धाळू नसावा.
24)  संघटनेसाठी वेळ, बुद्धी, श्रम, कौशल्य आणि पैसा हे 'पंचदान' देणारा असावा.
25)  संघटना समाजातील सर्वांच्या भल्यासाठी आहे.स्वत:च्या भल्यासाठी नाही...
त्यामुळे संघटनेसाठी सातत्याने पंचगुणांचे योगदान करणारा असावा.
 ज्या संघटनेकडे वरील गुणधर्म असलेले कार्यकर्ते असतात; त्या संघटनेला जगात तोड नसते.
 आपल्यालाही आपलं संघटन मजबूत बनवायचं असेल तर वरील गुणधर्म कार्यकर्ता म्हणून अंगी बाणवणं अत्यावश्यक आहे.
==================================◼️

Thursday, 17 September 2020

मानव मुक्ती मिशन औरंगाबाद

मानव मुक्ती मिशन औरंगाबाद 

१) ॲड.सुनील इंगळे ( जिल्हाध्यक्ष मानव मुक्ती मिशन,औरंगाबाद ) 
 80070 04951

२)ह.भ.प.अजय महाराज दाभाडे ( जिल्हाध्यक्ष राष्ट्रजागृती वारकरी परिषद,औरंगाबाद) 
88055 13757

३)अक्षय मिटकरी ( जिल्हाध्यक्ष छंदांम्सि कला साहित्य महासभा , औरंगाबाद )
76208 38883

४)विजयाताई सोनवने ( जिल्हा उपाध्यक्षा ,राष्ट्रजागृती वारकरी परिषद,औरंगाबाद )
77559 90509

५)पवन महाराज खाडे ( महानगराध्यक्ष ,राष्ट्रजागृती वारकरी परिषद औरंगाबाद ) 
74993 08083

६)ह.भ.प.अजय महाराज वेलदोडे ( राज्य संघटक शाक्त शैव परिषद महाराष्ट्र )
93071 89759

Monday, 31 August 2020

♦पुणे - मानव मुक्ती मिशन ♦

♦पुणे - मानव मुक्ती मिशन ♦

ज्ञानेश्वर राखोंडे 8379010175
पंकज बाविसकर 9209160437
गजानन देशमुख 9890409171
कुष्णा देशमुख  88059 67809 
स्वप्नील लांडगे 95119 36213
सन्नी राठोड  9511747781
सोनाई पाटील 8805631396
यशवंत शिंदे -9420045996
रिद्धी जाधव - 9167846157 
शिवाजी रनवरे ( शिरूर ता अध्यक्ष m3 ) 9766993214
प्रशांत गडपिले - 8806666050
रहिम शेख - 8999680779
सलमान मौला - 95278 60313
संजय शिवकर उरळी कांचन 96238 31891

♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦

Saturday, 22 August 2020

सरकारी नोकरदारांचा प्रामाणिकपणा ..

#सरकारी_नोकरदारांचा_प्रामाणिकपणा ..

तुम्ही तुमच्या क्षेत्रात प्रामाणिक असने कौतुकास्पद कसे होऊ शकेल? प्रामाणिकपणा हा तुम्हाला मिळालेला उपजत गुण आहे.तो तुम्ही पाळलाच पाहिजे.तुम्ही प्रामाणिक असायलाच हवे ना. तुम्ही इमानदार नाहीतर काय बेइमान होनार का ? स्पेशली सरकारी क्षेत्रात काम करनाऱ्या एखाद्याला मेडिया ते खुप ईमानदार आहेत,प्रामाणिक आहेत म्हणून जर पब्लिसिटी देत असेल तर समजावे काहीतरी लफडा आहे. 
त्याला पगार कशासाठी मिळतो ? इमानदार आणि प्रामाणिक असण्यासाठीच ना ? कि बेइमान वागावे म्हणून ? 

सरकारी क्षेत्रात काम करनार्यांचा इमानदारी हा गुण कौतुकाचा विषय होऊ शकत नाही जरी भांडवलशाही त्यांचे कौतुक करत असेल तरी... 

हल्ली वकिलीच्या क्षेत्रात आमका ईमानदार म्हणून विशिष्ट व्यक्तिला पब्लिसिटी आशा प्रकारे दिली जाते जणू काय सर्व वकिल बेइमानच आहेत. पोलीस खात्यातातही विशिष्ट मेकअप केलेला चेहरा भांडवलशाही ईमानदार म्हणून दाखवते जणू काय सर्वच सावळे काळे खरबड्या तोंडाचे बेइमानच असतात. यात आयुक्त असो नाहीतर कलेक्टर ते लै ईमानदार आहेत म्हणून भक्ताड आणि ते आपल्या जातीचे हाइतवाले रोज पारायणे करत असतात.मग तुमच्या साहेबाला पगार न घेता इमानदार प्रामाणिक रहा म्हनावे? जनु काय आख्खे जग बेइमान झाले आहे. आणि हे दोनचारजनच तेवढे प्रामाणिक, इमानदार उरले आहेत.

कर्तव्यात इमानदारी आणि या प्रामाणिकपणा या गुणांचे कौतुक होत असेल तर समजावे देश विनाशाच्या दिशेने जात आहे. कारण हे गुण दुर्मिळ होत असल्याचे लक्षण आहे. 

नितीन सावंत परभणी 
9970744142

Sunday, 16 August 2020

भटक्यांच्या स्वतंत्र्याचे काय ?

भटक्यांच्या स्वतंत्र्याचे काय ? 

पोट आणि भुक जन्माला घेवून येणारी माणसे म्हणजे भटके विमुक्त.गावच्या हगनदरीत बिराड उतरवून कोरकुटक्यासाठी आयुष्य पनाला लावणारी ही माणसांची टोळी.
आपल्याच सारखी दिसनारी हडामासाची माणसे किती भिषण आणि वेदनादाई जीवन जगतात ना ? 
फक्त आणि भक्त अन्नासाठी जीव धोक्यात घालून कुठल्याही जीवघेण्या प्रयोगाला ते सामोरे जातात. छातीवर दगड ठेवून मोठ्या हतोड्याने दगड फोडताना दगडी मनाचे कुनीच का त्यांना थांबत नसावे ? ती गोलाकार झुंड किती निर्दयीपणे पहात असते.डोळ्याच्या बुबुळात दोरीची गाठ खुपसून मोटारगाडी किंवा दगड ओढनारे ते प्रयोगकर्ते आणि त्यांच्या त्या शरिराला आणि टोळ्यांच्या खाचांना त्रास होताना बाजुचे नुसतेच  पहातात. त्या जीवघेण्या वेदनेला कुनीच का थांबत नसावे ? खड्डा खोदून त्यात स्वताला तासंतास पुरुन घेवून गुदमरून जायची रिस्क घेनारे त्या मातीच्या ढीगार्यावर चार चिल्लर पैसे कुनी टाकतील याची वाट पहात असतात.कित्तेक मधेच गुदमरून मेले सुद्धा पहाणाऱ्याला फारसी दया आल्याचे अजुन पहाण्यात नाही.
हे तर महाभयंकर आहे की आपल्या पोटाचा गोळा,! अगदीच केविलवाणी पहाणारी ती बाहुलीच जनु,काठीवर बांधून तिला लोकांच्या समोर प्राण्याप्रमाणे खेळवणे, मृत्यूच्या दारातून तिची ने आन करणे आणि सभ्यतेचा आव आणणाऱ्या संस्कृतीने ते करमणूक म्हणून पहाने किती अमानवीय आहे. 
करोडो भटक्यांना अजुन बुड टेकवायला हक्काची जागाही नसावी किती दयनीय जीवन आहे हे !
या देशात संधी गुण किंवा कार्यकतृत्व बघुन मिळत नाही तर जात,वस्त्या,रहणीमान आणि तोंड बघून दिली जाते.आम्ही गुणवान नाहीत हे साफ खोटे आहे.आम्हाला संधी दिली जात नाही हे वास्तव आहे.संधी दिली तर त्यांचे रेकॉर्ड मोडले जातील,त्यांना शरमेने माना खाली घालाव्या लागतील म्हणून प्रस्थापित व्यवस्था सदैव संधी नाकारत असते तरिही एखादी हिमा दास त्यांच्या थोबाडीत एडिडासचा बुट मारतेच.
सर्कसीत अशक्य कोटीतले प्रयोग करुन दाखवणारे सारे  पोटाच्या भुकेचे व्याकुळ कलाकार एकच संदेश देत असतात आम्हाला संधी द्या रे आम्हीही काही कमी नाहीत.
मानवी शरिराचा संपूर्ण तोल टांगलेल्या दोरीवर तासंतास संभाळून धरणे,छातीवर दगड फोडणे,बैलाला,माकडाला,अस्वलाला,कबुतराला,कुत्र्याला सर्व कौशल्य पनाला लावून ट्रेन करणे,उंच आकाशातील उडत्या पक्षाला एकाच नेमात जमीनीवर पाडणे आणि ते ही भटके विमुक्त तुमच्या भाषेत अज्ञानी जमातींनी, अचाट आहे हे. 
देशाच्या कलाकारी आणि करमणुकींच्या क्षेत्रात देखील तुम्हाला माजी अस्पृश्य,भटके विमुक्त,आदिवासी,दलीत,शेतकरी जातीतले चालु नयेत दुखद आहे.
         या देशात पारधी,बेलदार,कैकाडी,वडार,डक्कलवार , उचल्या वासुदेव आणि आदिवासी यांसारख्या असंख्य जाती,जमाती ह्या आजही भटकंती करत जीवन जगतात.त्यांच्या नावावर स्वताची हक्काची इंचभरही जमीन नाही.काही जातींना एखाद्या गावी आपला पाल ठोकावा लागला तर त्यांना गावच्या हगनंदरीत रहावे लागते. 
आशा जाती जमातींची मुले शाळेत गेल्यानंतर भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा रोज त्यांना म्हनायला लावतात.
भारताला माझा म्हणण्याइतपत त्यांच्याकडे हक्काचे काय आहे? 
प्रतिज्ञेतील माझा या शब्दावर माझा आक्षेप आहे. 
भारत एक देश आहे.त्या देशातील सर्वजन माझे बांधव आहेत.माझे त्या देशावर प्रेम आहे.अशी ती प्रतिज्ञा भटक्या विमुक्तांसाठी असावी.
       ज्यांच्या नावे पाय ठेवायला इंचभर जमीनही नाही,ज्यांना पाणी प्यायला हक्काचा पानवठा नाही,ज्यांना मुक्त वावरायला एक हक्काचा गाव नाही, त्यांना अख्खा भारत माझा म्हनायला लावने ही त्यांची क्रृर थट्टा आहे.
       तरीही नकट्या नाकाने आम्ही वर्षामागून वर्षे स्वातंत्र्याचे सोहळे साजरे करत आहोत. 

नितीन सावंत परभणी 
9970744142
दि.१५ ऑगस्ट २०२०

Saturday, 15 August 2020

♦बर नाही आज जरा खर बोलू ♦


♦बर नाही आज जरा खर बोलू ♦

पी.एच.डी. म्हणजे ब्राम्हणी डिग्री.समजापासून १००% तुटल्याचे आधिकृत व मान्यताप्राप्त प्रमाणपत्र. 
जगाचे सर्व ज्ञान मलाच मिळाले आहे आणि मीच एकमेव ज्ञानवंत आहे हा अविर्भाव निर्माण करुन देनारा पेशा म्हणजे प्राध्यापकी. ग्रामीण भागातील साध्या लोकांना, शेतकरी, शेतमजुरांना हिडीस फिडीस भावनेने पहानारा तसे वागवनारा व मळकट कळकट रंगधारी गरिब शेतकऱ्यांना जास्तकाळ जवळ सुद्धा फिरकू न देनारा,त्या रंगाप्रती घृणा बाळगनारा हा आइतखाऊ महाभाग म्हणजे प्राध्यापक .

आपल्या बुद्धीमत्तेचा वापर केवळ आणि केवळ ब्राम्हणी आणि भांडवली व्यवस्थेच्या हितासाठी तिच्या जतन संवर्धनासाठी करनारा तो मध्यमवर्गीय बुद्धीजीवी होय . त्यात हे प्राध्यापक अग्रभागी . 
तुम्ही कधी एकलेय का ? की चार प्राध्यापकांनी धरने आंदोलनात जावून मार्गदर्शन केले .
तुम्ही कधी एकलेय का ? 
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला ५० प्राध्यपाकांकडून आर्थीक मदत. किंवा 
हे  प्राध्यापकांनी घेतले दोन अंध मुले दत्तक .

आपल्याच सारख्या प्रध्यापकी पेशातल्या किंवा नोकरदार वर्गातच जाणेयेणे ठेवने त्यांच्याशीच सन्मानाच्या संकल्पनांत आयुष्य घालवने, अतिउच्च वर्गातील सवई ,वस्तू फ्याशन आयात करन्याचा प्रयत्न करने ,बायको एके बायको करत मिरवने हे त्याचे आयुष्यातील इव्हेंट असतात . मी phd केलीय , मी डॉ आहे , हे त्याला मिरवण्यात मोठे स्वरस्य असते .

बर यांच्या पिएचड्या तरी इमानदारीच्या असतात का ?काहीजण
हो phd साठी मोजतात , phd प्रबंध चोरतात , phd लिहून घेतात , लागणारी माहिती गोळा करायला पैसे देवून माणसे लावतात .... असे अनेक phd चे प्रकार आहेत ...

phd धारक किंवा प्राध्यापक झाले की एका भयाणक आत्मकेंद्रि  , आत्ममग्न आत्मप्रोढी विश्वात त्यांचा प्रवेश होतो .

या वर्गाला सामाजिक भान राहिलेलं नाही. लठ्ठ पगारामुळे वाचन,लेखनही थांबलेलं. वर्गाबाहेर जाउन कुणाचं दुख समजून घ्याव,दूर करण्यासाठी मदत करावी,गावाची,भावाची,माय,बापाची हे तर त्यांच्या मनीही येत नाही.
किमान यांनी शेतकरी शेतमजूरांच्या बाजुचे साहित्य तरी लिहावे . आधी साहित्य क्रांती मग समाज क्रांती पन ते ही यांना जमले नाही . फिडेल गेला किती प्राध्यापकांचे लेख आले ??

यांना
आपल्या दारावर कुनी आलेला गेलेला त्याला खपत नाही . डुप्लीकेट स्माइल हा त्याचा ,महतप्रयासाने शिकुन कमवलेला अनमोल दागीणा . सर्वांची घरे हुडकून काढता येतात पन यांची घरे शोधने जरा अवघडच . समाजव्यवस्थेपासून कोसो दुर रहतात ही लोक .
दुष्काळ येवो , सुनामी येवो , कुनी मरो कुनी खपो आम्हाला त्याचे सोयर न सुतक ...

गावात जावून पारावर , चौकात चार शेतकरी , शेतमजूर ,हमाल गोळा करुन कधी मार्गदर्शन सुद्धा या लोकांनी केल्याचे मी पाहिलेले नाही . बरे किमान आपल्या धंद्याच्या बाहेर कधी चार विद्यार्थ्याना सुद्धा हे लोक मार्गदर्शन केल्याचे दिसत नाहीत .

आनेक शिक्षकांचे त्यांच्या हताखालून शिकुन गेलेले विद्यार्थी मोठे झालेले बघायला मिळतात तशा ब्यातम्या झळकतात . पन प्राध्यापकांना विद्यार्थीच असतात का नाही कुनास ठावूक . कारण कुणीही विद्यार्थी हे माझे मार्गदर्शक आहेत असे मनापासून मानयला तयार नसतो शिक्षकांप्रती असलेली आत्मीयता यांच्याप्रती का नसते कुनास ठावूक .

चार पाहुने आल्यावर आर्ध्या अर्ध्या कपात चाहा आणि चौघांमधे ट्रेमधे दोन बिस्किटे ठेवून पाहुनचार करनारे पुण्यातील सदाशिवपेठी ब्राह्मण परवडले पन हे लोक नको .प्राच्यापकांनी केला मोठा पाहुनचार , आज अमुक प्राध्यापकाने आम्हाला तुडुंब जेवायला घातले , आज आमच्या गावी प्राध्यपकाची जेवायची पंगत होती , प्राध्यापकांनी केले अन्नदान अशी विधाने तर मोठी हास्यास्पद वाटतात .तुम्ही सामाजिक देने लागता या भावनेने एकदाच निधी माघायला जावून बघा एकग्लास पाण्यावर त्यांचेच मोठेपन , कुजकेपन आइकुन रिकामे या किंवा शेपाचशे घेवून या .प्रचंड कंजूष ही जमात . प्राध्यापकांना एवढाल्या पगारी असुन सुद्धा मोठमोठ्या बिल्डींगच्या गेटवर , भिंतीवर पाटी लावलेली असते येथे पिकोफॉल करुन मिळेल म्हणून ... बायकोला सुद्धा पिकॉफॉल करुन पैसे कमवायला लावते ही जमात .. 
समोर अन्याय अत्याचार होत असताना गप्प बसने , लोक अज्ञानात रुढी परंपरांत तडफडात असताना त्यांना योग्य रस्ता न दाखवने , ही कपाळ करंटेपनाची लक्षने आहेत . यापेक्षा अधिक न बोललेले बरे ...
यासंदर्भात आपल्याला ८ तासाचा पगार २ तास शिकविण्यासाठी ६ तासाच्या तयारी साठी दिला जातो . पन हे तास कुठलाही तयारी न करता बेइमानी करण्याचे काम आजचे प्राध्यापक करत आहेत . 
प्राध्यापक हेरंब कुलकर्णी हे एक अशे प्राध्यापक आहेत की ज्यांनी सहाव्या वेतन आयोगाची पगार घेन्यास सक्त नकार दिला. सरकारने नकार दिल्यास ते त्यांची पगार डोनेट करतात .

त्यांनी प्राध्यपकांचे अशैक्षणिक जोडधंदे या विषयावर संशोधन केलेले  आहे आणि त्यावर पुस्तकही आहे . त्यात त्यांनी प्राध्यपकांचे जोडधंदे दिलेत 
" चड्डी बनियान विकने , प्लॉटिंगचा धंदा करने , विम्याची दलाली खाने , चैन मार्केटिंगचे धंदे करने , मनिसर्क्युलेशन चे स्किमा चावने ,मटका लावने , इत्यादी वैध अवैध अशैक्षनिक जोडधंदे तथाकथित प्राध्यापकांतील महाभाग अग्रेसर आहेत. आणि संस्थाचालकाच्या वाढदिवसाच्या  होर्डिंगावर यांचेच धोबाडं असतात . लाचारी आणि हुजरेगिरीचे पुनरुत्पाद्न महाविद्यालांमधुन करने बंडखोरीच्या प्रेरणा मारुन टाकने  यासाठीच प्रस्थापित व्यवस्स्था यांना ७ व्या वेतनाची लाच देत आहे . हा आजच्या प्राध्यपकांचा धंदा आहे ..
बरे हे नेहमी यांच्या बुद्धीमत्तेचे स्तोम नेहमीच मजावतात.

या देशात खडतर शारीरिक श्रमसाठी रोहयोवर १९२ रु रोज दिला जातो अशेच  कुशल श्रमासाठी रुपये ४ शे रोज आणि तथाकथित बौद्धिक श्रमासाठी या प्राध्यापक वर्गाला रुपये ३ हजार रोज. असा भेद करुन आणि विनाकारण बोद्धीक श्रमाचे स्तोम माजवून श्रमीक वर्गाच्या हिताचे बोद्धीक कार्य होऊ नये याची दक्षता प्रस्थापित व्यवस्था घेते.
भालचंद्र नेमाडे कोसलामधे म्हणतात "ही शिक्षणपद्धती म्हणजे तरुण मुलांना झूल पांघरलेली हिजडे बैल बनवणारी षंढ व्यवस्था होय."

आणि हे प्राध्यापक राबतात तरी किती 
वर्षाच्या तिनशे पासष्ट दिवसांत एकूण रविवार ५२ सरकारी सणांच्या सुट्या २० दिवस,दिवाळीच्या सुट्या २० दिवस,महापुरुषांच्या जयंत्या २० दिवस,परिक्षांच्या सुट्या २० दिवस आणि स्वताच्या हक्काच्या रजा २० दिवस शिवाय उन्हाळी सुट्या दोन महिणे म्हणजे ३६५ दिवसांत तुम्ही फक्त १५३ दिवस कॉलेजात असता तर  ३०६ तास शिकवता.आणि तोरा केवढा तर जागतिक दर्जाचा.

म्हणून इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेचे काम केल्याबद्दल कुठलेही आंदोलन ,मोर्चा न करता त्यांची सरकारने पगारवाढ केली आहे.ही शेतकऱयांची,बेकार बेरोजगारांची थट्टाच आहे.अंगणवाडी सेविका,विनाअनुदानावर काम करणारे शिक्षक,कंत्राटी ग्रामसेवक,पोलीस पाटील, सफाई कामगार,न्यायालयात काम करणारे कंत्राटी सेवक दिसत नाहीत काय?हे लोक जीव ओतून काम करतात.नेमाडें म्हणतात त्याप्रमाणे प्राध्यापकांना अज्ञानच शोभून दिसते.यांनी यांच्या हाताखालून एकही क्रांतिकारक घडवला नाही.संशोधक,शास्त्रज्ञ,तत्वज्ञ तर सोडूनच द्या.

मला सांगा ...

प्रत्येक श्रमाला बुद्धी लागतेच .. ना 
शेवटचा वाफा कधी भिजेल आणि यासाठी कधी मोटार बंद करायची हे आमच्या गुराख्याला कळते . त्यालाही बुद्धी लागतेच ना . तो ती योग्य वापरतो .

शेतकरी शेतमजूर हमाल यांच्या अमुर्त श्रमाची किती रक्कम देता ? ऊसतोणी करताना , शेती करताना , हमाली करताना , कारखान्यात काम करताना बुद्धीचा वापर होत नाही का ?? आणि पाठांतर वाचन आणि लिखान म्हणजे बुद्धीवान का?

कुंभार मडके घडवताना हाताने श्रम करतो.हे झाले शारीरिक श्रम. त्याच जोडिला मेंदुचा वापर होतो.लक्ष द्यावे लागते. नक्षीकाम करताना, आकार देताना , बोद्धीक तान द्यावा लागतो .. म्हणजे हे बोद्धीक श्रम ..

मग प्राध्यापक कोनते वेगळे शारिरीक श्रम करतो ..

मग बुद्धीजीवी प्राध्यापकच कसे ?

(आर्थात काही अपवाद असतात ,आणि अपवाद हा नियम नसातो )

नितीन सावंत, परभणी 
9970744142

Friday, 31 July 2020

♦छंदांम्सी कला आणि साहित्य महासभा ♦

♦छंदांम्सी कला आणि साहित्य महासभा ♦

या लोकशाहीत कालावंत,कलाकारांना मान सन्मान नाही.राजेशाहीत राजाश्रय होता.कलेची कदर होती.गावपातळीवर खुप सन्मान मिळत असे.गावचा प्रमुख चुकला तर त्याचेही व्यंग करून त्याला सरळ करण्याची धमक कलाकारांत होती.सारा गाव मुक्त हताने कलाकारांवर पैसे सोडत असे.धान्य देत असत.आणि आज ही भांडवलीलोकशाही उच्चभ्रू मिरासदार,बनिया भांडवलदारांना धार्जिणी आहे.कलाकारांना रस्तोरस्ती भटकंती करण्यास मजबूर करत आहे.त्यांना सन्मान नाही की कलेची कदर नाही.

आणि पुरोगामी,परिवर्तनवादी,डाव्यानीही या कलाकारांना आपल्या प्रवाहात आनलेले नाही,की सामावून घेतलेले नाही.त्यांचा उपयोग करुन मोठे काम उभे करता आले असते ते ही कुनी केले नाही.म्हणून शेवटचे दिस मोजताना काही कला आणि कलाकार तुम्हाला आजूबाजूला दिसतील.

साहित्यिक वर्गाने देखील जमिनीवरचं,वास्तववादी साहित्यचित्रण करण्याऐवजी हे साहित्यिक कल्पनेच्या जगात वावरताना भटकताना दिसतात.आपल्या आजूबाजूला शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या, लोककलावंतांची होणारी अवहेलना,स्त्रियांचे शोषण पिडण, त्यांचे जाचक जीवन यावर मात्र साहित्यिक वर्ग मौन बाळगून आहे.परिणामी पुरुष वर्चस्ववादी साहित्याचा सुळसुळाट झालेला दिसून येत आहे.अशा पार्श्वभूमीवर कलाकारांना आणि  साहित्यिकांना एकत्रित आणणे हे आम्ही आमचे आद्यकर्तव्य मानतो. या भूमिकेतून मानव मुक्ती मिशन प्रेरित आम्ही छंदांम्सी कला व साहित्य महासभा उभी करत आहोत.

आपण सहभागी होऊन हे काम वाढवण्यास मदत करावी.
     
         ♦मागण्या ♦

1)कलाकार आणि साहित्यिकांना मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनात वाढ करण्यात यावी.
2) लोक कलावंतांसाठी त्यांच्या कलेच्या जतन संवर्धनाच्या संदर्भात स्वतंत्र विद्यापीठ असावे.
३) भटक्या विमुक्त जाती, आदिवासी जमातीतील कलाकारांची व कला प्रकाराची संख्‍या प्रमाणित करण्यात यावी.
4) लोककलावंतांच्या, कलाकार आणि साहित्यिकांच्या मुलांना केजी टू पीजी हे शिक्षण मोफत देण्यात यावे.
५) लोककलावंतांची सार्वजनिक क्षेत्रात होणारी टिंगल-टवाळी, झुंडशाहीने होणाऱ्या त्यांच्या हत्या आणि समाजव्यवस्थेत त्यांना मिळणारी तुच्छतेची वागणूक हे थांबवणारा कायदा आणि कृती कार्यक्रम सरकार दरबारी लागू करण्यात यावा.
6)लोककलावंत आणि लोक साहित्यिकांना विचारपीठ मिळावं यासाठी सरकारने वार्षिक कार्यक्रमांचं आणि महोत्सवांचे आयोजन करण्या यासंदर्भात कृती कार्यक्रम हाती घ्यावा,
7)भटक्या विमुक्त जातीतील कलावंतांना प्राथमिक गरजा भागवणाऱ्या सर्व सेवा सुविधा तात्काळ देण्यात याव्यात.
8)वासुदेव,नंदिबैलवाले,अस्वलवाले,गोंधळी,डोंबारी,पोतराज,पिंगळा यांसारख्या विविध ठिकाणी भटकणाऱ्या कलावंत जाती आणि कलाकारांना कलेचे सादरीकरण करणाऱ्या ठिकाणी सरकारी निवासस्थानाची व्यवस्था करण्यात यावी.त्यांच्यासाठी कलावंत भवनाची निर्मिती करण्यात यावी.
9) किर्तन,गीत गायन,प्रवचन,वाद्यवादन,प्रबोधन करपल्लवी आणि नेत्रपल्लवी, संगीत भजन,हस्यव्यंग,नकालाकरणे आदी कुठल्याही माध्यमातून लोकांचे मनोरंजन,करमणूक,हास्य व्यंग आणि प्रबोधन करणाऱ्या सर्वच कलाकार साहित्य कलावंतांचा आजीवन कौटुंबिक खर्च सरकारने उचलावा.
१०)आधुनिक कलाकारांची आणि कलाकारांच्या कलाप्रकारांची सांगड घालून पारंपरिक कलाकारांना संधी देण्यात यावी.
११) नाटक,एकपात्री प्रयोग,सिनेमा,शॉर्ट फिल्म,पोवाडा,स्ट्यांडअप कॉमेडी शोइत्यादींच्या सादरीकरणासाठी विभागीय तथा जिल्हास्तरावर स्वतंत्र आणि कायस्वरुपी सेट,स्टेज उभे करुन देण्यात यावेत.
१२) महाराष्ट्रातील बंद असलेले सर्वच नाट्यगृह त्वरीत सुरु करण्यात यावेत.. 
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦

Thursday, 23 July 2020

राष्ट्रजागृती वारकरी परिषद - पदाधीकारी कसा असावा

*_राष्ट्रजागृती वारकरी परिषद महाराष्ट्र प्रदेश_*
           *पदाधीकारी कसा असावा*
    *_नियम_*
1)सर्व वारकरी पदाधिकाऱ्यांनी सकल संत समजुन घेणे अनिवार्य आहे.
2)राष्ट्रजागृती वारकरी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना, प्रवचनकारांना,किर्तकारांना कमीत कमी शंभर अभंग मुखोद्गत म्हणजे पाठ असावेत.
3)राष्ट्रजागृती वारकरी परिषदेचे सर्व व्यवहार करताना,जसे लेटरप्याट, ब्यानर बनवताना मुख्य लोगो वापरावा.उपशाखा काढणार आसल्यास जो मुळ लोगो अथवा चिंन्ह आहे तेच वापरावे.
4)शाखा तथा उपशाखाप्रमुख पदाधिकाऱ्यांनी कोणताही उपक्रम चालवणार असल्यास अगोदर प्रदेशाध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश प्रवक्ता यांच्या सोबत चर्चा करावी.त्यांना तशी कल्पना द्यावी.
5)पदाधिकाऱ्यांनी नेहरु शर्ट,धोतर, उपरणं, पांढरा किंवा  भगवा फेटा हा पोषाख वापरावा.
6)पदाधीकारी हा वारकरीच असावा किंवा वारकरी सांप्रदायाचे त्याला ज्ञान असावे. 
7) *एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम* या उक्तीप्रमाणे पदाधीकारी हा एकेश्वरवादी म्हणजे विठ्ठल हा एकच देव माननारा आसावा.
8) *कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पुजनाचे* या संत तुकोबारायांच्या शिकवणुकी प्रमाणे पदाधीकारी दया,क्षमा,शांती,प्रेम बाळगणारा आसावा.त्याने कुनाचा द्वेष करता कामा नये.
9)पदाधीकारी राष्ट्रजागृती वारकरी परिषदेच्या विचारांशी कटिबद्ध असायलाच हवा.
10)पदाधिकाऱ्यांना कुणा दुसर्‍या पदाधिकाऱ्या बाबत तक्रार आसल्यास लेखी अर्ज अथवा SMS द्वारे प्रदेशाध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश प्रवक्ता यांच्याकडे तक्रार करावी.
11)एखादे उपक्रम चालु असताना सर्व पदाधिकाऱ्यांनी ते फोटो , पोष्ट, व्हिडिओ त्याचा प्रसार व प्रचार करणे बंधनकारक राहील.
12)पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही इतर संघटणेच्या विचारांवर हुज्जत घालू नये उलट त्यांना आपल्या विचारधारेत  आणण्याचा प्रयत्न करावा.
13)सर्व पदाधिकाऱ्यांचे लेटर पॅड, व्हिजीटिंग कार्ड  आसने अत्यावश्यक आहे.
14)पदाधीकारी निरअहंकारी निर्व्यसनी आसने आवश्यक आहे.
15)पदाधिकाऱ्यांनी सतांची शिकवण,त्यांचे अभंग हेच प्रमाण  मानावे.त्याद्वारे जीवन मार्गक्रमण करावे.


Monday, 29 June 2020

♦राष्ट्रजागृती वारकरी परिषद संपर्क यादी ....

♦राष्ट्रजागृती वारकरी परिषद महाराष्ट्र प्रदेश

ह.भ.प धर्मकीर्ती परभणीकर (मार्गदर्शक)

1)ह.भ.प शिवाजी महाराज    शिरसगावकर (प्रदेशाध्यक्ष)+919370333975

2)ह.भ.प रविकांत महाराज वसेकर (प्रदेश उपाध्यक्ष)(संत सावता महाराज ह्यांचे वंशज)
+919922569769

4)ह.भ.प गणेश महाराज अंबाजोगाईकर(मराठवाडा विभागीय अध्यक्ष)+917522987949

5)ह.भ.प शंकर महाराज बाभुळगावकर (तालुका अध्यक्ष भोकरदन)+919890831744

6)रामेश्वर महाराज नालेगावकर (राष्ट्रजागृती वारकरी परिषद मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष)
मो 9970204714,7507416148

7)ह.भ.प.निवृत्ती महाराज कांगणे
( जिल्हाध्यक्ष जालना )
मो. 9923760877

8)गजानन ईलग (मंठा तालुका अध्यक्ष,राष्ट्र जागृती वारकरी परिषद ) मो.9763083454

9)ह.भ.प.शिवाजी महाराज चौधरी
(मराठवाडा विभागीय कार्याध्यक्ष)
9421867840

10)ह.भ.प अजय महाराज दाभाडे (जिल्हाध्यक्ष औरंगाबाद)+918805513757,+919021667591

11)ह.भ.प पवन महाराज खाडे (महानगर अध्यक्ष औरंगाबाद)+917499308083

12)ह.भ.प अजय महाराज वेलदोडे( जिल्हा कार्याध्यक्ष औरंगाबाद)+919307189759

14)ह.भ.प.ताई महाराज मंगळवेढाकर (प्रदेश कार्याध्यक्ष महिला आघाडी)

+919309187616

Sunday, 7 June 2020

काही पुस्तकांची शीर्षके

*शीर्षक* हा आरसा असतो. म्हणजे शीर्षकाने आधी अर्थबोध होतो की नेमका हा काय प्रकार आहे. पत्रकारितलेले शीर्षके गुढ असतात.लोकांनी  ती बातमी वाचावी म्हणून. हिंदी आणि मराठी चित्रपटवाल्यांची प्रतिभा आटल्याने हल्ली त्यांना काय शिर्षके द्यावीत हाच प्रश्न पडलेला आहे. काहीच्या काही नावाची चित्रपटे येत आहेत. काही चित्रपटांत तर शीर्षकाचा आणि आतल्या स्टोरीचा तिळमात्रही संबंध नसतो.

आसो मुद्दा आहे पुस्तकांच्या शिर्षकांचा.लेखक म्हटल्यावर प्रतिभा वगैरे असतेच.आणि ही माणसे जरा हटके आसतात म्हणून मला पुस्तकांच्या शीर्षकाबद्दल नेहमीच कुतुहल राहिले आहे.
एकदा असेच भारी भक्कम वाचनालयात इंट्री माराली. समोर लिहीलेले होते १ते १० क्रमांकाची कपाटे आमदारसाहेबांकडुन. मी मनल हे लोक मात्र आपली प्रसिद्धी करुन घ्यायला पुस्तकांच्या कपाटाच्या काचा पन सोडत नाही. मागे तर एका संडासच्या भिंतीवर आमदार साहेबांचे नाव होते आणि खाली लिहीलेले *साहेबांची कृपा*

आसो पुस्तकांच्या कपाटतल्या त्या ग्रंथांची नावे बघून यानां असाली नावे कशी काय सुचतात हा प्रश्न मला नेहमी पडतो.
एका ऱ्याक मधे
गंगेचे गगन वितळे नावाचा ग्रंथ मोठा दिमाखाने उभा होता. इतका कोरा होता की कुणीही हात लावल्याचे दिसत नव्हते. आता गंगेचे गगण वितळे म्हणजे काय मला तर मेळही लागला नाही. गगन कुठे वितळते का ? किंवा गंगेला पाणी असते गगन कुठे असते काय ?

लेखकाच्या या नाव सुचण्याच्या प्रतिभेला स्याल्युट करुन पुढल्या कपाटात डोकावलो तर शापीत सौंदर्य नावाचा पुस्तोकोबा दिसत होता. सौंदर्यही आणि शापीतही हे ही जरा ऑडच.

मला सर्वात मजेशीर नाव वाटले ते म्हणजे
कुरतडलेला सुर्य.
सुर्याला कुनाची बरे कुरतडायची हिम्मत.पण लेखकोबा मात्र काहीही करु शकतात.महातेजस्वी सुर्यालाही कुरतडायला हे लोक कमी करत नाहीत.असेच मला एका हिंदी चित्रपटाचे नाव आठवले सुरज का सातवा घोडा.

म्हणजे पहिला घोडा नाय, दुसरा नाय,लक्ष कोण्या घोड्यावर तर सातव्या.

याच्या अमर कहाणी ,त्याची अमर कहाणी असल्या अमर कहाण्या तर लै झाल्यात.एका ग्रंथावर नाव होते बापुजांची अमर कहाणी.हे बापुजा कोन होते आपल्याला (आज्ञानाला ) माहिती नाय.

पुढे तर कहरच विनोदी कथा कांदबरीच्या ऱ्याक मधे भारतीय संस्कृती कोष खंड क्रमवार लावलेले होते.

म्हटले अगदी योग्य जागी लावलेत हे खंड आमची संस्कृती हल्ली हसण्याचाच भाग झालीय.म्हणून त्या खंडांची गणना विदोनी साहित्यात केलीय.ही संस्कृती विष्णुच्या बेंबटातून निर्माण झालीय म्हटल्यावर ती विनोदी साहित्यातच येनार ना.

नवनीत इयत्ता ४ थी चे मार्गदर्शक पुस्तक रहस्यमय कांदबरीत लावलेले सापडले.मुळ पुस्तकांचा अभ्यास करावा वाटेना गेला की पळवाट म्हणून नवनितचा अभ्यास करुन पास होण्याचे धवपळीचे मार्ग म्हणजे हे रहस्यमयच म्हटले पाहिजे.

मराठवाडा मुक्ती संग्रामचा लढा च्या साहित्याचा रकाना होता.त्यात एक पुस्तक होते पोटदुखी विसरा.
हा लढा एक पोटदुखी आहे आणि तो विसरा.हा हा हा 

पुन्हा मर्ढेकर नावाचे एक बुक दिसले. तोच तो लेखक कवी लोक कशाला वाचतील बरे.पुन्हा म्हटल्यावर नको रे बाबा असेच म्हनतील लोक.आवारा मसिहा आणि टिळकांचे चरित्र अगदी जवळ जवळ लावलेले होते.या दोनही पुस्तकांचा एकमेकांशी काहीही संबंध नव्हता.पण मला मात्र टिळक म्हणजेच आवारा मसिहा वाटला.

असो सर्वात हास्यास्पद नाव काय असेल तर खालील पुस्तकाचे शिर्षक होते.मी तर खळखळून हसलो.

क्रांतीसुर्य म्हटले की जोतीराव फुले आठवतात,किंवा बाबासाहेब यांनाही ती उपाधी देता येइल.पण शिर्षक होते
"क्रांतीसुर्य सावरकर"

नितीन सावंत परभणी 

दि.७ जुन २०२० 


Wednesday, 3 June 2020

ll राष्ट्रजागृती वारकरी परिषदेची वैशिष्ट्ये आणि भूमिका ll

ll राष्ट्रजागृती वारकरी परिषदेची वैशिष्ट्ये आणि भूमिका ll

♦ *राष्ट्रजागृती वारकरी परिषद* ♦

🚩प्रेरणास्थान 🚩

संत नामदेव, संत जनाबाई, संत चोखोबाराय, संत सोयराबाई, संत निर्मळा, संत बंका महाराज, संत कुर्मादास, संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपानकाका, संत मुक्ताबाई, संत कबीर, संत रविदास, संत मीराबाई, संत दामाजीपंत, संत नरहरी महाराज, संत सावता महाराज, संत गोरोबाकाका, संत सज्जन कसाई, संत शेख मुहम्मद, संत सखुबाई, संत चांगदेव, संत विसोबा खेचर, संत महायोगिनी मुक्ताबाई, संत भानुदास महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकोबाराय, संत शहामुनी, संत लतिफशाह मंगळवेढेकर, संत कान्होपात्रा, संत सेनामहाराज, संत परिसा भागवत, संत बहिणाबाई,संत धन्ना जाट, संत गुरु नानक, संत दादू पिंजारी, संत गोरक्षनाथ, संत मच्छिंद्रनाथ, संत बसवाण्णा, संत चक्रधरस्वामी, संत तुकडोजी महाराज, संत गाडगेमहाराज.            

♦उद्देश :
१) कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, ही वारकरी सांप्रदायाची सामाजिक विषमता मोडणारी शिकवण आचरणात आणायला शिकविणे.
२) संत नामदेव, संत तुकोबाराय ते संत तुकडोजी, गाडगेबाबा या सर्व संतांचे तत्वज्ञान जनतेत रुजविणे.
३) हिंसा, अनाचार, व्यसनाधीनता, या विरुद्ध आवाज उठवून सामाजिक प्रेरणा सक्षम करणे आणि सामुदायिक कृतीला प्रोत्साहन देणे.
४) संकटाच्या कालखंडात, नैसर्गिक आपत्ती, सामाजिक ताणतणाव, अशा काळात जनतेचे मनोधैर्य टिकवून ठेवणे, आपत्कालीन परिस्थीतीत स्वप्रेरणेने शांतता प्रस्थापित करणे.
५) कृषी संस्कृतीची प्रागतिक मूल्ये जनतेपर्यंत पोहचविणे.
6) वारकरी सांप्रदायात कार्यरत असणाऱ्या प्रागतिक समाजाला पुढे नेणारे वारकरी, कीर्तनकार, प्रवचनकार, भजनी व टाळकरी संघटीत करणे.
७) किर्तने, प्रवचने, परिषदा, प्रकाशने, संम्मेलने भरवणे.
८) महिला वारकरी वर्गाला प्रोत्साहीत करणे व सक्षम बनवणे. त्यांना वारकरी विचारपीठ उपलब्ध करुन देणे. महिला कीर्तनकार, प्रवचनकार बनवणे.
९) सर्वधर्म, तीर्थक्षेत्रेस्थळी अमानवीय, प्रथा, अस्पृश्यता, जातीय विषमता संपुष्टात आणून राज्यघटनेने दिलेल्या मानवी नागरी हक्कांचे रक्षण करणे.
१०) अनिष्ट, चुकीच्या आणि विषमतामूलक बाबींपासून समाजाचा बचाव करणे. भेदाभेद भ्रम अमंगळ हे तत्व समाजात रुजवणे.
११) भजनी, प्रवचनकार, वारकरी, कीर्तनकार यांच्यासाठी आरोग्य, अपघात, वार्धक्य यासाठी उपक्रम राबवणे व सामाजिक सुरक्षा देणे.
१२) संतपीठाला सामुदायिक चेतनेचे विचारपीठ बनवणे. त्यासाठी शिक्षण, संशोधन, पथदर्शक प्रकल्प राबवणे व संतपीठाच्या सहकार्याने ते चालवणे.
१३) अशाच प्रकारचे कार्य करणाऱ्या देशाच्या आणि देशाबाहेरील प्रवाहांशी सुसंवाद ठेवणे, विचारांचे आदान-प्रदान करणे.
१४) ग्रंथालये, वस्तुसंग्रहालये, संदर्भग्रंथालये, स्थापित करणे, शासनाच्या मदतीने व स्वंयप्रेरणेने हे चालवणे.
१५) ही राष्ट्रजागृती वारकरी परिषद पूर्णपणे मानवमुक्ती मिशनशी सुसंगत उद्दीष्टाने कार्यरत राहील.        

 ♦ ऱचना :

१) सभासदत्व फिस :५ शे रु वार्षिक.
२) राज्यस्तरीय कार्यकारीणी एक निमंत्रक, पाच सहनिमंत्रक आणि एक खाजिनदार राहील.
३) ही परिषद दर ३ वर्षाला भरेल. जुन्या कार्यकारीण्या बरखास्त होऊन, नवनियुक्त्या होतील.  

🚩सभासदत्वाच्या अटी 🚩

१) घटना व नियम मान्य पाहिजेत.
२) प्रतिज्ञा घेतलेली पाहिजे.
३) मुखपत्राचे वर्गणीदार असले पाहिजे.
४) एका जनआघाडीत सक्रिय असले पाहिजे.
५) जनतेत सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय भूमीकेत ठाम कार्यरत असले पाहिजे.

🚩कृती आराखाडा 🚩

१) संत नामदेव-संत तुकोबाराय जागृती अभियान दरवर्षी राबवा.
२) वारकरी,कीर्तनकार, टाकळरी, भजनी, प्रवचनकार, भारुडकार, वारकरी गायक यांना पेन्शन लागू करा.
३) वारकरी तीर्थक्षेत्रे, धर्मस्थळे अशाठिकाणी मदत केंद्रे चालवा.
४) संतपीठामार्फत वारकरी, भजनी, प्रवचनकार, कीर्तनकार, भारूडकार, टाळकरी यांची नोंदणी करा, प्रमाणित करा.
५) नोंदणीकृत वारकऱ्यांना समाजजागृती अभियानात सहभागी करा.
६) सर्व धार्मिक स्थळांचा निधी सामाजिक उत्थान व विकासासाठी वापरा, देवस्थान व तिर्थक्षेत्रांच्या निधी मधील अनागोंदी, भ्रष्टाचार दूर करा आणि कायमस्वरूपी नियंत्रण स्थापित करा.
७) तीर्थक्षेत्र स्थळावरील छोटे व्यवसाय करणारे आणि उपजीविका करणारे सर्वच यांना किमान सुविधा उपलब्ध करा. नियोजित विकास करा.
८) जिल्हास्तरावर व तीर्थक्षेत्रस्थळी सुसज्ज वारकरी भवन उपलब्ध करा.
९) वारकऱ्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ द्या.
१०) प्रत्येक संताच्या जन्मगावाचा विकास करा. रस्ते बांधा आणि भव्य भक्तनिवास उभे करा.
११) शिक्षक मतदारसंघासारखा वारकरी मतदारसंघाची तरतूद करण्यात यावी.
१२) ब्राम्हण पुरोहीतांप्रमाणे वारकऱ्यांना दरमहा मासिक वेतन सुरु करण्यात यावे.
*******************************
on January 04, 2017

ह.भ.प.शिवाजी महाराज  इंगळे सिरसगावकर,
(प्रदेशाध्यक्ष राष्ट्रजागृती वारकरी परिषद)
मो:9370333975 

Monday, 1 June 2020

♦अनादि निर्मळ वेदांचे जे मुळ l

वेदांचे मूळच आमचा पांडुरंग आहे .. 


अनादि निर्मळ वेदांचे जे मुळ l                            परब्रम्ह् सोज्वळ विटेवरी ll                                      कर दोन्ही कटी राहिलासे उभा l                         नीलवर्ण प्रभा फांकतसे ll                               आनंदाचा कंद पाऊले साजिरी l                            चोखा म्हने हरी पंढरीये ll                                                     - संत चोखोबाराय

            प्रस्तुत अभंग संत चोखोबारायांच्या स्वमुखातील अत्यंत गौरवशाली उदगार आहेत.गौरवशाली यासाठी की ब्राम्हणी व्यवस्थेने ज्यांना हिन अस्पृश्य अपवित्र मानले त्या चोखोबारायांनी विठ्ठलाचे वर्णन करणे क्रांतिकारी आणि गौरवशाली आहे.मध्ययुगीन भारतात जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता अत्यंत काटेकोर आणि टोकाची बनली होती.मंदिरांवर देव आणि धर्मावर पूर्णपणे ब्राम्हणांचे नियंत्रण प्रस्थापित झालेले होते. अस्पृश्य जातीत जन्माला आलेल्यांना मंदिराचे दरवाजे बंद होते.त्यांना ज्ञानबंदी होती, शिकायचे नाही , लिहायचे नाही , वाचायचे नाही . एवढेच काय आपल्यापेक्षा उच्चजातीय व्यक्तिला ज्ञानाच्या वक्तव्यात बोलायचे नाही. अस्पृश्यांसाठी जी जी आणि व्हय जी एवढेच.आशा काळात पंढरपूरात संत चोखोबाराय चक्क वेदांच्या पलीकडील भाष्य करतात मोठे क्रांतिकारी आहे हे. पंढरपुरातील बडवे ब्राम्हण चोखोबारायांना हिन अस्पृश्य मानतात.हे बडवे वैदिक व्यवस्थेचे प्रतिनिधी आहेत.जे वेदांना प्रधान प्रमुख मानतात.आशांना अस्पृश्य जातीतून आलेला संत ज्ञानाची अनुभूती देतो आणि म्हनतो

"तुम्ही ज्या वेदांना प्रमाण मानता त्या वेदाचे मुळच आमचा विठ्ठल आहे.तो अनादि अनंतकाळापासुन आहे.अगदी निर्मळ स्वच्छ भेदरहित."

         एका अस्पृश्य संतांचे तत्वज्ञानाच्या पातळीवर प्रतिछावनीला उत्तरे देने फारच धाडसाचे आहे.विठ्ठलाचे मुळ शोधणे आणि वैदिकांच्या आधीचे म्हणून वैदिकांच्या मांडणीला सुरुंग लावने रणनीतीचा भाग आहे.तुम्ही वेद काय सांगता आमचा विठ्ठल त्याच्याही आधिचा आहे.युक्तिवाद करावा तो असा.

पुढे चोखोबाराय म्हणतात

"तो अनादि निर्मळ दोन्ही हात कमरेवर ठेवून विटेवर उभा आहे.आणि त्याच्या तेजाची नीलवर्ण प्रभा सर्वत्र पसरली आहे"

           येथे संत चोखोबाराय पांडुरंगाची प्रभा नीलवर्ण म्हणून मांडतात.ती गौरवर्णीय नाही.गौरवर्ण वैदिकांचा तर नीलवर्ण द्रविडांचा.कृष्ण महादेव खंडोबा निलवर्णीयच.अगदी विठ्ठलही नीलवर्ण प्रभा घेवून सर्वत्र प्रसिध्दीस पावला आहे.

या पध्दतीने वैदिकांच्या असमानतेच्या विषमतेच्या विकृतीला संत चोखोबाराय पर्यायी संस्कृती निर्माण करत होते.

म्हणून ते म्हणतात "आमच्या आनंदाचे उत्सवाचे प्रतिक हा पांडुरंग आहे. हा हरी पांढरीचा आहे.तो इतर ठिकाणचा नव्हे."

              ही मांडणी चोखोबाराय करतात.हे सर्व दुर्लक्षुन कसे चालेल.

अस्पृश्य मानलेल्या व्यक्तीने विठ्ठलाचे मुळ शोधने खऱ्या अर्थाने विठ्ठलाला पवित्र करण्यासारखे आहे ..

चोखोबारायांची वैचारिकता किती ग्रेट होती.            म्हणून आम्ही राष्ट्रजागृती वारकरी परिषदेसाठी लोगोखाली संत चोखोबारायांच्या ह्या अभंगाची ओळ निवडली आहे..

धर्मकीर्ती महाराज परभणीकर               9970744142

Tuesday, 26 May 2020

♦गांधी शिवाय मार्क्सवाद चालवता येतो.

♦गांधी शिवाय मार्क्सवाद चालवता येतो.

जाती व्यवस्था समर्थक, वेदांती विचाराचे प्रचारक गांधी पुरोगामी चळवळीचे प्रतिक म्हणून स्विकारा हा अट्टाहास का ? कशासाठी ?

या देशातील जातीवाद असा की
आजच्या या जात-वर्गीय ब्राम्हणी व्यवस्थेतील निम्नजातीय व्यक्तीने जागतिक दर्जाचे काम केले तरी ते सर्वांना अनुकरणीय, व्यापक प्रतिक बनु दिले जात नाही. बनवले जात नाही. उदा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जे जागतिक दर्जाचे विचारवंत,भारतीय अस्पृश्यता, जातीव्यवस्था ही समस्या प्रथम प्राधान्यक्रम देवून जागतिक पटलावर चर्चेला आननारे महान व्यक्तीमत्व. त्यांच्याबद्दल लैच मजबुरीने हात आखडता घेवून, नाविलाजाने जयंतीच्या शुभेच्छा वगैरे दिल्या जातात.

पण, ज्या गांधीचे संपूर्ण जीवन जात-वर्गीय व्यवस्थेच्या समर्थनार्थ गेले. अस्पृश्यता निवारण्यासाठी द्यायच्या उपायाच्या संभ्रमावस्थेत गेले. त्या गांधीजीला ओढून ताणून तत्वज्ञ बनवून त्यांच्या विचारसरणीला गांधीवाद वगैरे बनवून मिठ मसाला लावून बळजबरीनेच प्रतिक म्हणून थोपवणे पुरोगामी चळवळीत आजही चालु आहे.

#गांधीनी_तुकोबांचे_अभंग इंग्रजीत भाषांतरीत केल्याने ते लगेच पुरोगामी होतात. लिखानाचा विषय बनतात. पण तुकोबांच्या संकल्पनेतला मुक्यांचा नायक ठरलेला मूकनायककार मात्र उपेक्षित असतो. कारण काय ? जातीव्यवस्थाच ना ?

डॉ आंबेडकर हे निम्नजातीय प्रतिक नको ..

काहीजण म्हणतात संपूर्ण गांधी नाकारता येनार नाही. गांधी थोडेफार चांगले होतेच की.

आता बहुजनांच्यात तथा सर्वहारांत हजारो प्रतिके, महापुरुष एकापेक्षा एक गुणसंपन्न असताना थोड्यास्या गुणसंपन्न व्यक्तीला प्रतिक म्हणून स्विकारा हा अाग्रह का ? कॉग्रेस टिकली पाहिजे जगली पाहिजे असे ज्यांना वाटते त्यांनी आपली आयडॉलॉजी बदलून घ्यावी. प्रतिके बदलून घ्यावेत. इतकुसाकच चांगला असलेला गांधी बाजुला ठेवून फुले आंबेडकर प्रतिक म्हणून स्विकारावेत.

#जातीव्यवस्था_वर्णव्यवस्थेचे_समर्थक तथा डाव्या पक्षांचा कधीच साधा सदस्यही नसलेले गांधी आज डाव्यांच्या आयडॉलजीचा कणा बनलेले आहेत. पण डाव्या चळवळीचे सदस्य तथा स्टार प्रचालक असणारे आणि  जातवर्गांतक साहित्य लिहीनारे अण्णाभाऊ मात्र डाव्यांचे गांधीएवढे तात्विक प्रतिक बनलेले नाहीत.
कारण काय ?

अण्णाभाऊ माजी अस्पृश्य जातीतुन आलेले तर गांधी #उच्चजातीय_प्रतिक...
गांधीला विरोध म्हणजे संघाला मदत अशी एक भिती दाखवली जाते.
मग गांधी स्विकारणे म्हणजे आंबेडकरी विचारधारेशी द्रोह नव्हे का ?

पण डॉ आंबेडकर विचारात कोण घेतोय ....

त्यांचे म्हनने असते तुम्हाला गांधी समजलेच नाहीत. तुम्ही गांधीवरली ही ही पुस्तके वाचा. मग त्यांना विचारले तुम्ही आंबेडकर वाचले का तर ते नाही म्हणतात.

#गांधी समजून घेण्यासाठी आंबेडकर सुद्धा वाचावे लागतात हे त्यांना मान्य नसते. हा मोठाच आंतर्विरोध.

गांधी प्रतिक म्हणून स्विकारा हा अट्टाहास का ?
आमची पण प्रतिके स्विकाराकी ...
--------------------------------------------------------------------------

भारतामधे आलेली मार्क्सवादी चळवळ ही उच्चजातीयांनी आणल्यामुळे ती जात्यांतक न रहाता केवळ वर्गांतक हा एकेरी लढा लढत राहिल्याने आज मार्क्सवादी पक्षांची फार मोठी सरशी झालेली आहे.
तरिही फुले आंबेडकरवादाचा व्यावहारिक जोड डाव्यांना अजूनही घ्यायचा नाही.फुले आंबेडकर व्यावहारिक जात्यांतक पण ते शुद्र आतिशुद्र जातीतले तर गांधी बनिया उच्चजातीय तो चालवायला सोपा जातो म्हणून अजूनही ज्याचा कुठलाही तत्वज्ञानात्मक वाद नाही तो गांधीवाद ब्राम्हणी डावे सोडायला तयार नाहीत.

जातवर्गस्त्रीदास्यांतक तत्वज्ञान उभारणारे कॉ.शरद पाटील
गांधीबद्दल म्हणतात...

1)काँग्रेसचे सर्वोच्च नेते टिळक व गांधीजी हे चातुर्वर्ण्य समर्थक वेदांती होते.
(जात्यांतक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पुर्ती पेज नंबर १७९ )

2) आणि खुद्द बनिया भांडवलदार जातवर्ग बुद्धकालीन मेंडकासारख्या गहपती भांडवलदारांचा क्रांतिकारी वारसा चालवणारा कधीच नव्हता. त्यांचे महत्तम राजकीय प्रतिनिधी गांधीजी.निळउत्पादक भारतीय शेतकऱ्यांची ब्रिटिश प्लॅटर्सविरुद्ध  बाजू घेऊन लढणारे गांधीजी एक होते. तर सत्याग्रहींनी जमीनदारांचा खंड द्यायचे बंद करण्यापर्यंत जाऊ नये म्हणून चौरीचौरा ची पोलीस चौकी जाळली गेल्याचे निमित्त करून सत्याग्रहसंग्राच बिनशर्त मागे घेणारे गांधीजी दुसरे होते.ब्रिटिश सरकारने दिलेला कम्युनल ॲवॉर्ड मान्य करणारे गांधीजी एक होते. तर तो अस्पृश्यांना लावावा या आंबेडकर यांच्या मागणीला जिवावर उदार होऊन विरोध करणारे गांधीजी दुसरे होते.पण हे दोन्ही विरोध मिळून गांधीजी बनले होते.कारण भांडवलदार जातवर्गाला जातीव्यवस्था अबाधित ठेवून स्वातंत्र्य पाहिजे होते.आज या जातवर्गाला वरचढ शेतकरी जातींच्या उच्चभ्रूकडील वरकड जमिनींचे अतिशुद्रांत फेरवाटप करून संपन्न ग्रह बाजारपेठ निर्मायाला विरोध आहे. आणि म्हणूनच औद्योगिक विकास ठप्प होऊन  बेकारी व दारिद्र्य वाढले आहे.

(जात्यांतक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पुर्ती पेज नंबर 188 )

3)गांधीजींनी जरी स्वातंत्र्यचळवळीत शेतकऱ्यांप्रमाणे स्त्रियांना आणले तरी त्यांनी आंबेडकरांची जातीअंताची मागणी न स्वीकारल्यामुळे उच्च जात वर्गीय स्त्रियांच्या पलीकडे स्वातंत्र्यचळवळीत स्त्री आल्या नाहीत.
( जात्यांतक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पुर्ती पेज नंबर १९४)

------------------------------------------------------------------------

१)गांधी हे वर्णव्यवस्थेचे समर्थक होते.जातीव्यवस्था त्यांना इश्वरदत्त वाटे.त्यामुळे ते मार्क्सवाद:फुले आंबेडकरवादी गटाचे तथा सौत्रांतिक मार्क्सवादी गटाचे प्रतिक नाही बनु शकत..

२) डॉ बाबासाहेब आंबेडकर गांधीला नेहमी मिस्टर गांधी म्हणायचे.त्यांनी संबंध आयुष्यात गांधीला कधीही महात्मा म्हटले नाही

३) व्हाट गांधी ॲंड कॉग्रेस ह्याव डन टु अनटचेबल्स

हा ग्रंथ लिहून बाबासाहेबांनी तेव्हाच गांधी पुर्ण उघडे पाडले आहेत.
ते सर्वहरांच्या जात्यांतक लढ्याचे प्रतिक बनु शकत नाहीत .

४)इंडिया टुडे नावाच्या सर्वाधीक खपाच्या मासिकाने सुद्धा गांधीजींच्या ब्रम्हचर्यत्वाच्या प्रयोगांवर निर्भयपणे लिहीलेलेले आहे ..

५)गांधीवाद तत्वज्ञान वगैरे होऊ शकत नाही.तरी त्याला ओढून ताणून तत्वज्ञान बनवने म्हणजे बळजबरीनेच उच्चजातीय प्रतिक स्विकारणे होय.

6)हजारो वर्षापासून उपेक्षीत असणारे माजीअस्पृश्य लोक जेव्हा हक्क अधिकार मागत होते तेव्हा त्यांना स्पेशल मताधिकार मिळु नये म्हणून उपोषण करुन खोडा घालनारे गांधी मानने म्हणजे माजी अस्पृश्य जातींची क्रूर थट्टा आहे.हे म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जखमेवर मिठ चोळणे होय.
--------------------------------------------------------------------------

गांधीवादाचा रस्ता जातीव्यवस्था,वर्णव्यवस्थेच्या समर्थाने उच्चजातवर्गीयांची निमसरंजामी निमभांडवली व्यवस्था मजबुत करणाऱ्या राजकीय ध्येयस्थळी पोहंचतो.हा सबरमतीचा संत ज्यांच्या कृतीत आहे ते जय भीमचे नारे फक्त स्टेजशोसाठी देतात.त्यांच्या उक्तीत आणि कृतीत अंतर आहे.आम्हाला कृतीत ॲनहिलेशन ओफ कास्टवाले,ह्युमिनीटीला प्रधान माननारे आंबेडकर हवेत. इश्वर अल्लाह तेरो नाम ही समरसता झाली.ती आम्हाला नकोय.गांधी आंबेडकरवादाचा तात्विक मेळ बसु शकत नाही.त्याचे निर्माते परस्परविरोधी विचारधारेचे एकाच काळातील प्रतिनिधी आहेत.जात्यांध की जात्यांतक हा आमचा प्रधान निकष आहे.आता पुन्हा इमोशन्यालिटीची लाट गांधीच्या रुपाने आनने म्हणजे  पुन्हा पुर्वीचीच उच्चजातवर्गीयांचीच ब्राम्हणी व्यवस्था स्वताहून मागणेच ठरेल.हा काळ प्रखर भूमिका घेण्याचा आहे.अन्यथा पुर्वीचे पाढे पन्नास..

♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
#फुले_आंबेडकर_अपरिहार्य
#अब्राम्हणी_कम्युनिझम 

नितीन सावंत परभणी 

9970744142 


Thursday, 21 May 2020

भांडवली ईमानदारी आणि प्रामाणिकपणा

भांडवली ईमानदारी आणि प्रामाणिकपणा

जागतिक समाजव्यवस्थेचे मार्क्सवादाने एकूण सहा कालखंड केलेले आहेत.
आदिम साम्यवाद, सरंजामशाही,भांडवलशाही,साम्राज्यशाही,कम्युनिझम,आणि असे राज्य तिथे शासनसंस्था नसतील तो साम्यवाद.

प्राच्यविद्यापंडीत कॉ.शरद पाटील यांनी आदिम साम्यवादामधे मातृसत्ता आणि स्त्रीसत्ता तर सरंजामशाही मधे तुर्कपुर्व आणि तुर्क आल्यानंतर खालून वरुन अशा सामंतप्रथा उभ्या केल्या आहेत.

भारतीय सरंजामशाहीमधे वर्णजातीय अभ्यास करताना अंतर्गत द्वंद्व, शोषणाची यंत्रणा याच बरोबर काही गुणविशेषही आपल्याला अभ्यासण्याची आवश्यकता आहे. त्याशिवाय भांडवलशाहीचे डावपेच आपल्याला कळनार नाहीत.

सरंजामशाहीमधे प्रामाणिकपणा, इमानदारी, नैतिकता, सदाचार, हे सर्व गुण प्रत्येकाला कंपलसरी पाळणे बंधनकारक आहे. कारण हि सरंजामशाही आपसी सालोहीत संबधाने, वस्तुविनिमय पद्धतीने बांधलेली आहे. एखादा गुण एखाद्या व्यक्तीने सोडला किंवा तो वाईट वागला,चुकला तर सामूहिक बहिष्काराद्वारे किंवा इतर शिक्षेद्वारे तो गुण पाळण्याची नियमावली पुन्हा प्रस्थापित केली जाते. सरंजामशाहीत 'जान जाय पर वजन न जाए' अशी यंत्रणा आहे. तिथे शब्दांचा आदर आहे. दिलेला शब्द आणि वचन पाळले जाते.

म्हणून सरंजामशाहीत 'पुरस्कारवितरण सोहळे' तुम्हाला दिसनार नाहीत.अत्यंत प्रामाणिक असल्याबद्दल,पैसे कमावताना टार्गेट पूर्ण केल्याबद्दल, उत्तम संवादकौशल्याबद्दल, नोकरी, काम प्रामाणिकपणे करत असल्याबद्दल पुरस्कार वगैरे. असले पुरस्कार सरंजामशाहीत तुम्हाला दिसनार नाहीत. हि देन भांडवलशाहीची. सरंजामदाराप्रती निष्ठा असणे अत्यंत महत्वाचे.

भांडवलशाहीत एकमेकांचे संबंध व्यावहारिक आहेत.त्यात पैशांच्या स्वरूप देवान घेवान होते,आणि पर्याय उपलब्ध असतात.शिवाय नफा हा उद्देश प्रधान बनल्यामुळे प्रामाणिक असणे,ईमानदार असने दुर्मिळ होत चालल्यामुळे त्यांना असले पुरस्कार देवून भांडवलशाहीला प्रामाणिक असल्याचे चित्र उभे करावे लागते. मोठा झालझोल करनाऱ्याला पुरस्कार देवून त्याला प्रामाणिक असल्याचे भांडवली यंत्रणा दाखवत असते.हे पुरस्कारही त्यांनीच निर्माण केलेले असतात.पुरस्कार वितरनाचे निकषही त्यांचेच असतात. किंवा मेडियाद्वारे पब्लिसिटी देवून भांडवली व्यवस्था एखाद्याला हिरो बनवते जो भांडवलदारांच्या ओंजळीने पाणी पित असतो.

तुम्ही तुमच्या क्षेत्रात प्रामाणिक असने कौतुकास्पद कसे होऊ शकेल? प्रामाणिकपणा हा तुम्हाला मिळालेला उपजत गुण आहे.तो तुम्ही पाळलाच पाहिजे.तुम्ही प्रामाणिक असायलाच हवे ना. तुम्ही इमानदार नाहीतर काय बेइमान होनार का ? स्पेशली सरकारी क्षेत्रात काम करनाऱ्या एखाद्याला मेडिया ते खुप ईमानदार आहेत,प्रामाणिक आहेत म्हणून जर पब्लिसिटी देत असेल तर समजावे काहीतरी लफडा आहे.
त्याला पगार कशासाठी मिळतो ? इमानदार आणि प्रामाणिक असण्यासाठीच ना ? कि बेइमान वागावे म्हणून ?

सरकारी क्षेत्रात काम करनार्यांचा इमानदारी हा गुण कौतुकाचा विषय होऊ शकत नाही जरी भांडवलशाही त्यांचे कौतुक करत असेल तरी...

हल्ली वकिलीच्या क्षेत्रात आमका ईमानदार म्हणून विशिष्ट व्यक्तिला पब्लिसिटी आशा प्रकारे दिली जाते जणू काय सर्व वकिल बेइमानच आहेत. पोलीस खात्यातातही विशिष्ट मेकअप केलेला चेहरा भांडवलशाही ईमानदार म्हणून दाखवते जणू काय सर्वच सावळे काळे खरबड्या तोंडाचे बेइमानच असतात. यात आयुक्त असो नाहीतर कलेक्टर ते लै ईमानदार आहेत म्हणून भक्ताड आणि ते आपल्या जातीचे हाइतवाले रोज पारायणे करत असतात.मग तुमच्या साहेबाला पगार न घेता इमानदार प्रामाणिक रहा म्हनावे? जनु काय आख्खे जग बेइमान झाले आहे. आणि हे दोनचारजनच तेवढे प्रामाणिक, इमानदार उरले आहेत.

कर्तव्यात इमानदारी आणि या प्रामाणिकपणा या गुणांचे कौतुक होत असेल तर समजावे देश विनाशाच्या दिशेने जात आहे. कारण हे गुण दुर्मिळ होत असल्याचे लक्षण आहे.

नितीन सावंत परभणी
9970744142
३१/१२/२०१८

Wednesday, 20 May 2020

ll संत चोखोबारायांचा समाधी सोहळा दिवस ll

ll संत चोखोबारायांचा समाधी सोहळा दिवस ll

सर्वच संतांवर सर्वात मोठा अन्याय कोणता झाला असेल तर त्यांची मते विकृत करुन खपवली गेल्याचा.किंवा संत जे म्हनालेच नाहीत ते त्यांच्या नावे खपवले जाने.काही संतांवर तर त्यांचे श्रेय दुसऱ्यालाच देवुनही अन्याय झालेला आहे.
वारकरी सांप्रदायाचे पहिले आणि मुख्य नेतृत्व संत नामदेव होत.त्यांनीच उत्तरेकडे दौरे काढले,सांप्रदायाचे अभंगरुपी तत्वज्ञान निर्माण केले आणि विठ्ठलाची आरती लिहीली.तरी त्यांना अडगळीत टाकण्याचा मोठा कट महाराष्ट्रात आजतागायत झाला आहे.
संत चोखोबारायांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भात संत नामदेव यांनी वेळोवेळी भूमिका घेतली होती.पंढरपूरातील ब्राम्हण बडव्यांनी चोखोबारायांना पंढरपूराच्या बाहेर हकलल्यानंतर चोखोबाराय चंद्रभागेच्या पलीकडे जावुन राहिले असताना,संत नामदेव संपूर्ण संतमंडळाला तिथे घेवून गेले.सर्वांनी संत चोखोबारायांच्या घरी सहभोजन केले.मोठा उत्सव साजरा केला गेला.संत चोखोबाराय वेस पडुन गतप्राण झाल्यानंतर मंगळवेढ्याच्या वेसीच्या ढिगार्यातून  त्यांची हडे गोळा करुन पंढरपूरातील विठ्ठल मंदिराच्या पायरीला समाधी बांधण्याचे मोठे धाडस संत नामदेव यांनी केले होते.या संपूर्ण सोहळ्याचे नेतृत्वच संत नामदेव यांच्याकडे होते.तरी त्यांना मुख्य नेतृत्व म्हणून मानण्यास ब्राम्हणी छावणीचा विरोध आहे.
संत चोखोबारायांचा समाधी उत्सव वैशाख महिन्यात साजरा केला जातो. या उत्सवाचे नियोजन संत नामदेव महाराजांचे  वंशज असलेल्या नामदास मंडळींकडे असते. वैशाख वद्य पंचमी हा चोखोबारायांचा निर्वाण दिवस तर वैशाख वद्य त्रयोदशी हा चोखोबारायांचा समाधी बांधली तो दिवस. समाधी सोहळ्यानिमित्त छोटा मांडव घातला जातो. वैशाख वद्य पंचमीपासून अखंड वीणा उभा रहातो. वैशाख वद्य त्रयोदशीला कीर्तन व महाप्रसाद होतो.

नितीन सावंत परभणी
दि.20/5/2020