मलाही जीवनरस पुरवीतात ही सांस्कृतिक प्रतिके ...
आमचे दृविड पुर्वज अत्यंत संवेदनशील होते.माणूस असो अथवा पशु,पक्षी किंवा निसर्ग त्यांनी सर्वांना अत्यंत जीव्हाळा प्रेम लावला.वृक्ष पुजा,निसर्ग पुजा,प्राण्यांची पुजा करणारी संस्कृती आमची म्हणजे दृविडांची.याचे पुरावे भारतीय सर्व सण उत्सवांत मिळतात.बैल पोळा,नागपंचमी,दिवाळी हे सण आमच्या संवैदनशील पुर्वजांची साक्ष देतात.आमचे पुर्वज निसर्ग,प्राणी पुजक होते.चांगले काम करून मेलेल्या माणसांचे स्मारके बांधून आमच्या पूर्वजांनी त्यांच्या कार्यकतृत्वाच्या कहाण्या पिढीदरपिढीगत सांगितल्या आहेत.जाकाई , जोकाई , मेसाई,मरिआई,तुळजाई , रेणुका , सप्तशृंगी, ,खंडोबा,बहिरोबा,जोतिबा,थळोबा , बिरोबा, नरसोबा,म्हसोबा,विठोबा,या अकारहिन दगडांकडून आमचे पुर्वज प्रेरणा किंवा जीवनरस घेत आलेले आहेत.भरपूर सुगी आल्यानंतर आलेले सुख असो नाहीतर दुष्काळ पडल्यानंतर आलेले दु:ख असो, त्यांनी आपल्या पुर्वजांना आळवणे, आठवणे कधीही सोडलेले नाही.आमच्या पूर्वजांनी याच अकारहिन पुर्वजांच्या स्मारकांतून संय्यमाचा, चिकाटीचा जीवनरस पिढ्यानपिढ्या घेतला आहे.
म्हणून ही हजारो वर्षे जीवनरस पुरवणारी स्मारके,प्रतिके आणि त्यांची अस्मिता सहजासहजी टाकून देता येइल का ? टाकता येइल का ? आपली सांस्कृतिक नेनीव हे सर्व सोडायला सहजासहजी तयार होइल का ?
ते सर्व टाकुन देवुन त्यांनी गावंढळपणा सोडावा असे म्हनत, आपण मात्र नवे पुतळे स्मारके प्रतिके उभी करत आहोत. आणि याला आपण आधुनिकता म्हनतो.हा आपल्या वर्तनातील दुट्टप्पीपणा आहे.ज्याप्रमाणे आपले पुर्वज आकरहिन दगडातून जीवनरस घेत होते,त्याचप्रमाणे आपणही चौक,पुतळे,प्रतिके यांतून जीवनरस घेत असतो.ते काही वाईट नाही.
आस्मिता आणि प्रतिकांचे राजकारण
भारतात ब्राम्हणी छावणीचे मुख्य राजकारण आस्मिता आणि प्रतिकांचेच राहिलेले आहे.त्यांना भौतिकवादाशी कधीही काहीही घेणेदेणे नसते.नव्हते.आज bjp संघ रामायणातील रामाच्या प्रतिकावर सत्ताभोगत आहे.त्याला पर्यायी सांस्कृतिक भूमिका घेण्यासाठी शंबुक , सिता , रावण , मंदोदरी , शूर्पणखा , शबरी ही प्रतिके उभी केली गेलीत.हे पर्यायी उत्तर अगदी समर्पक आहे.
नाही आम्हाला हे आस्मितांचे आणि प्रतिकांचे राजकारण मान्य नाही.आम्ही कोरड्या भौतिकवादाची लढाई लढु म्हणून चालेल का ?
डाव्यांचा ह्या अस्मिता आणि प्रतिकांच्या लढाईला कसुन विरोध राहिलेला आहे.आता आपल्याकडे एवढा पावरफुल मार्क्स असताना भारतीय प्रतिकांना इतके का घाबरून जावे की तुम्हाला त्या प्रतिकांना विरोध करायची वेळ यावी.फुले आंबेडकर आस्मिता आणि प्रतिकांच्या लढाईत अव्वल असणे का रुचावे ? सर्वांना प्रेरणा उर्जा देणारी ही प्रतिके का नको आहेत तुम्हाला ? डाव्यांच्या कुठल्याही ऑफिसमधे प्रतिके नसतात का ? असतात पण ती मार्क्सवादी अभारतीय प्रतिके मोठ्याप्रमाणावर मिरवली जातात.फक्त भारतीय प्रतिकांच्या बद्दल किंतूपरंतु केला गेला तो डाव्यांच्या पक्षातील ब्राम्हणी विचार बाळगणाऱ्या लोकांनी.
ही प्रतिके ब्राम्हणी छावणीला सहज चित करतील ती तुम्ही कुठल्या भितीने दुर लोटत आहात ?
म्हणून प्रचंड कोरडे जीवन जगण्यापेक्षा आपणही ही जीवनरस पुरवणारी ठिकाणे पाहिली पाहिजेत.प्रतिके स्विकारली पाहिजेत.याद्वारेच तर देश संस्कृती बचावाचा मोठा उठाव होनार आहे.
आमची लढाई पक्ष संघटना म्हणून नाही तर ही लढाई अस्तित्वाची, अस्मितेची,संस्कृतीची आहे.आम्हाला जीवनरस पुरवणारी गावे,संस्कृती ते नष्ट करायला निघालेत , ते आम्ही कसेकाय नष्ट करु देनार ?
आम्ही जीवनरस पुरवणारी प्रतिके संस्कृती देश वाचवण्यासाठी लढा उभारनार आहोत.आमची भाषा , वेशभूषा, आमची संस्कृती , आमच्या अस्मिता आणि प्रतिके घेवूनच आम्ही सक्षमपणे लढाई लढु शकु.त्याशिवाय आम्ही उपरे बनु.
म्हणून मलाही खुनवतात ही सर्वच सांस्कृतिक प्रतिके.मला जीवनरस बहाल करतात ही ठिकाणे.
नितीन सावंत परभणी
9970744142
१२ डिसें. २०२०
No comments:
Post a Comment