Thursday, 24 June 2021

♦️वटपौर्णिमा मिथकीय उलगडा

♦️वटपौर्णिमा मिथकीय उलगडा 

                पावसाळा सुरु झाला की , सर्वाधिक रोपे , बिया स्त्रीया लावतात.कारले , भोपळे , दोडके , कद्दुचे वेल तर हमखास स्त्रीयाच लावतात.लसणाचे वाफे , किंवा भातशेती स्त्रीयाच करतात.
नांगरणी , कोळपणी , ही पिक उगवल्यानंतरची कामे पुरुषांना.नांगराजाच्या शोधानंतर ही बाकी कामे पुरुषांच्याकडे गेलीत.बाकी लावणी स्त्रीयांचीच. म्हणूनच तर तमाशात आलेली लावणी ही शेतीच्या लावणीतूनच सांस्कृतिक अंगाने पुढे आलेली आहे.शेती करताना गाणे म्हनने , नाचणे यातून लावणीचा विकास झालेला आहे.

               म्हणून शेतीची अद्यकर्ती स्त्री निऋती होय.स्त्री निसर्गपुजक असल्यामुळे तिच्या अनेक सण उत्सवांत निसर्गाशी एकरूपता असलेले इव्हेंट आहेत.वृक्षपुजा  सिंधूसंस्कृतीत असल्याचे निशपन्न झालेच आहे. 

            वटपौर्णिमा या सणाच्या बाबतीत पुरुषसत्ताक छावणीने डोके वर काढल्यानंतर आणि पोरोहित्य ब्राम्हणी छावणीकडे गेल्यानंतर,स्त्रीच्या निसर्गपुजनाची ही भौतिककृती नवऱ्याच्या मृत्युशी मिथकरुपाने बंदिस्त केली गेली.म्हणजे स्त्रीयांच्या निसर्गपुजनाच्या विधायक लौकिक कृतीचे ब्राम्हणी छावणीने अलौकिकत्वाशी जोडुन विकृतीकरण केले आहे. यामुळे स्त्री आनखी गुलामगिरीच्या खाइत लोटली गेली. तिला गुलाम बनवण्यासाठी, आपल्या हाताखाली भोगवस्तू बनवण्यासाठी सावित्रीची कथा बनवलेली आहे. आगदीच सात जन्मासाठी ती बंदिस्त ठेवण्याचा एवढा क्रृर सुड ब्राम्हणी छावणीने घेतला आहे.नवऱ्यामुळे किंवा नवऱ्यासाठी नव्हे तर स्त्री ही पुर्वीचीच निसर्गपुजक आहे.सर्वांना सावली देनारे आणि वर्षानुवर्षे टिकनारे वडाचे झाड तिने लावने , दरवर्षी ते वाढत जातेय हे पाहुन आनंदाने, उत्साहाने तिने ते पुजने साहजिकच आहे.त्यात पुनर्जन्म घुसवून ब्राम्हणी छावणीने सहजरित्या या निसर्गपुजनाच्या कृतीला बळकावले आहे. 

            पावसाळ्याच्या तोंडावर सर्वत्र बिया टोचुन ती धरती सजवण्यासाठी वृक्ष लागवड करत असेल तर नवऱ्याच्या गुलामगिरीला पावित्र्य भासवून तिला बंदिस्त करु पहाणाऱ्या ब्राम्हणी छावणीला उध्वस्त केले पाहिजे.नवऱ्याचा आणि तिच्या वृक्षपुजनाचा काहीही संबंध नाही.आणि पुन्हा तिला तु निसर्गाची , नवसृजणाची , नवनिर्मितीची अद्यकर्ती होतीस ही प्रेरणा दिली पाहिजे.हे आत्मभान दिले पाहिजे.

#वटपौर्णिमा
#वटसावित्री 
#मिथक 
#विधायकमांडणी

नितीन सावंत परभणी 
9970744142

♦️कबिर !

 ♦️कबिर ! 
 

कबिरा ब्राह्मण की कथा, सो चारों की नाव।
सब अंधा मिलि बैठहीं, भावै तहाँ ले जाव ll 

      कबीराला जगाचे व्यवस्थीतपणे आकलन आहे.तो जागोजागी , वेळोवेळी भूमिका घेतो.नग्न सत्य मांडतो.तथागत बुद्धाचा मार्ग  मध्यम मार्ग, त्यामुळे त्यांना नग्न सत्य मांडताना दहादा विचार करावा लागतो.कबीराचे तसे नाही ,तो थेट म्हनतो जग अंधा. किंवा दुनिया कैसी बावरी रे असे तो थेट म्हनतो.
तो जगाचे नग्न सत्य मांडताना भित नाही.तो जगाला सरळ करायची कडक भूमिका ठेवतो.त्यासाठी तो लखुटी हतात घेवून बाजारात खडा रहातो.जनाबाई नाही का अशीच बाजारात उभी रहाते डोईचा पदर कमरेला खोसुन.

      कबिराला एकट्याला जग बदलवता येनार नाही , हे त्याला माहिती आहे.म्हणून तो म्हनतो जो आवे घर फुकन के वही चलेगा हमारे साथ.घर फुकुन या.मागे इमोशन्यालिटीचे धागे ठेवु नका.कबिर सांगतो जगाला सरळ करु आपण.तुम्ही फुल टाइमर बनुन या. 

नितीन सावंत परभणी.
9970744142

Sunday, 20 June 2021

#शहर_ए_अंबरी

  #शहर_ए_अंबरी 

दख्खनचे नैसर्गिक सौंदर्य मुस्लिम मनाला इतके भावले की या भागाला स्वर्ग म्हणून संबोधायला सुफींनी सुरुवात केली.खुल्द म्हणजे स्वर्ग.खुल्ताबाद म्हणजे जन्नत का शहर. 
औरंगाबाद सुद्धा त्या काळी नैसर्गिक साधन संपत्तीने अत्यंत देखने आणि समृद्ध शहर होते.खांब नदिच्या तिरावर नैसर्गिक सौंदर्याच्या आधारे अत्यंत सुंदर नक्षीकाम, बांधकाम करत त्या भुभागाला शहर बनवायला घेतले ते मलिक अंबर यांनी.म्हणून ते पहिले शहर , " शहर ए अंबरी " अर्थात मलिकांबराबाद होय. मलिक अंबर यांनी बांधकाम करत या निसर्गसुंदर दख्खन भुमीला ३० दरवाजाच्या आत स्वर्गीय आविष्कार बहाल केला होता.नंतर औरंगजेब यांच्या काळत ते शहर ५२ दरवाजांच्या आत संपन्न बनले.बाजुला सुंदर बागा आतुन जानारी खांब नदी आणि त्या नदी तिरावर वसला तो छोटा ताज महाल म्हणजे " बिबी का मकबरा ". शंभर एक्कर च्या परिसरात वाढवलेल्या नैसर्गिक जंगली बागेतील अनेक हत्ती अगदी बांधलेल्या महालाच्या बाजुच्या ओट्यापर्यंत येत असत.आजच्या जिल्हाधिकारी निवासाच्या मागे हे अवशेष आजही पहायला मिळतात.
जमीनीच्या अंतर्गत एक महल आणि वर दोन मजली महल अशा अनेक वास्तू आज ब्राम्हणी छावणीने पाडुन जमीनदोस्त करायला सुरुवात केलेली आहे.त्याकाळातील गरिबांच्यासाठी सुरु केलेले लंगर आजच्या ब्राम्हणवाद्यांच्या डोळ्यात इतके खुपत होते की त्यांनी कर्मठ भक्तांना हताशी धरुन ते भव्य लंगर बांधकाम पाडले आहे. 

मलिक अंबर यांनी बांधलेल्या ३० दरवाज्यापैंकी भडकल गेट हा एक भव्य दरवाजा आज पहाता आला.हा दरवाजा ६३ फुट उंचीचा आहे.
भारतात कला साहित्याचा नक्षीकाम आणि कारागिरीचा सर्वाधीक विकास याच काळात झालेला आहे.

अनेक वास्तू ,शहरे , गावे मलिक अंबर यांनी वसलेले आहेत.त्यापैकी फुलंब्री (फुल ए अंबरी ) हे शहर सुद्धा मलिक अंबर यांनी वसवलेले आहे.

ब्राम्हणी छावणीने आधी वास्तू जमीनदोस्त केल्या , मग इतिहास विकृत लिहीला, आता शहरांची नावे बदलून त्यांना भांडणे लावायची आहेत. सर्व मिटवायचे आहे.

संपूर्ण शहर फिरुन इतिहासाच्या पाऊलखुणा दाखवण्याचे काम मलिक अंबर यांचे १६ वे वारसदार ॲड.ए.आर.अंबरी यांनी केले.त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. ग्रंथप्रकाशक, प्रचारक मिर्झा अब्दुल कय्युम नदवी यांची भेटही अंबरी साहेबांच्या मुळे झाली.
हा मलिकांबराबादचा अविस्मरणीय दिवस राहिला.

नितीन सावंत परभणी
दिनांक २० जुन २०२१

Wednesday, 16 June 2021

'भंगार' आत्मकथनाचे अंतरंग

 'भंगार' आत्मकथनाचे अंतरंग 

              नितीन सावंत परभणी 
              9970744142

            तथागत बुद्धाला एकदा एका शिष्याने प्रश्न विचारला की "भगवान जगातील सर्वात मोठे दु:ख कोणते ? " तर बुद्ध म्हनाले "दुसऱ्या चे दु:ख हे जगातील सर्वात मोठे दु:ख असते." अगदीच खरे आहे हे ,परदुख हे सर्वात मोठे दुख मानले पाहिजे.परंतू आज घडीला या भांडवली लोकशाहीत सर्वत्र मी मी आणि माझे माझे चालु आहे.या भांडवली लोकशाहीला माणुसकीची माया नाही.स्वजातीचे दबावगट आणि काहीतरी पदरात पाडुन घेण्यासाठी लागलेल्या जीवघेण्या स्पर्धा यात खरा दु:खी , शोषीत पिडीत जातसमुह मात्र तसाच होरपळत रहातो, येथील भयाण दमनकारी व्यवस्थेत.भारतात भांडवली लोकशाहीचा, व्यक्तीकेंद्रीत,अमर्याद स्वातंत्र्याचा विकास, माजीअस्पृश्य जातीपर्यंत पोहंचला.परंतू आदिवासी आणि भटक्या विमुक्तांची दयनीय अवस्था आणि भयावह शोषण पिडन आणि दमन आजही चालुच आहे.या भटके विमुक्त आणि आदिवासींचे दु:ख समजून घेण्याची तयारी आजूनही कुठल्याही शासन प्रशासनाने दाखवलेली नाही. 
' भंगार ' ही एक अशीच शोषण पिडन आणि दमनाची भटक्या विमुक्त समाजातील गोसावी जातीची आत्मकथा .
        अशोक_जाधव यांचे हे आत्मनिवेदनात्मक कथानक कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी गावचे.ते भटक्या विमुक्त जोगी गोसाव्यांतील पडियार या पोटजातीतले . त्यांनी आपल्या आत्मचरित्रातून भटक्या विमुक्तांची जगण्यासाठीची शिकस्त , भटक्या विमुक्तांची जाचक जातपंचायत आणि पितृसत्ताक मुल्ये यावर मुख्यत्वे प्रकाश टाकलेला आहे.
यात भंगार विकत घेणारे दुकानदार शोषण करतात.तर जातपंचायती व पितृसत्ताकता पिडन, दमन करते. असा सर्वच बाजुने विळखा घातलेला संघर्ष स्त्रीयांना करावा लागतो. 
       भटक्या विमुक्तांच्या साहित्याचा केंद्रबिंदू अंतर्गत द्वंद्वात्मक संघर्षाचा आहे.तिथे असनारे संघर्ष कुटूंबातील आहेत.जात पंचायतीतले आहेत.स्त्री पुरुषांतील आहेत.शत्रूभावी संघर्ष होतो तो पोलीस आणि भटक्या विमुक्तांच्यात.हा संघर्ष आजुन वर्गीय बनलेला नाही, तो जातीय, जातीअंतर्गतच आहे.म्हणून भटक्या विमुक्तांच्या साहित्यकृतीला स्वतंत्र साहित्य म्हणून पाहिले पाहिजे.तिथे गावगाडा नाही , कायमस्वरुपी मांडलेला संसार नाही, सर्व काही आहे ते आधर तरंगणारे.पाय ठेवायला इंचभर हक्काची जमीन नसने , शाळेत जायला गरजेची वह्या, पुस्तके,कपडे नसने,पोटासाठी कायमस्वरूपी कुठलेही साधन नसने, ही भटक्यांची पहिली प्राथमिक अडचण आहे.यावर आजूनही कुठल्याही सरकारने ठोस वर्क केलेले नाही.मतांच्या गणितासाठी काही भटक्यांचे बुद्धीजीवी जवळ धरण्याचे काम राजकारणी करतात पण ठोस वर्क आजूनही झालेले नाही.
            म्हणून आशोक जाधवांच्या या आत्मचित्राने जाती समाजाच्या आंतर्गत संघर्षतून बाहेर पडण्याचे बळ इतरांना नक्की मिळेल यात शंका नाही.सरंजामशाहीची पितृसत्ताक नियमावली पावलोपावली अशोक जाधव मोडुन काढुन, स्वताचे निर्णय स्वताला घेता यावेत अशी नवी मुक्त स्वातंत्र्याची पायवाट अशोक जाधव निर्माण करतात.

       भटक्या विमुक्त जातीत कडवी आणि संपूर्ण पितृसत्ता येवूनही कुठेकुठे मातृसत्तेचे अवशेष आपल्या पहायला मिळतात.अशोक जाधव यांच्या भंगार मधे सुद्धा शिमग्याच्या सणाला स्त्रीयांचे सांस्कृतिक आधिपत्य असने,हे लेखकाने उत्तमरीत्या निदर्शनास आनुन दिलेले आहे.लेखकाची नेनीव ह्या आदिबंदापर्यंत घेवून गेली हे महत्वाचे आहे.त्याद्वारे भटक्यांचा मातृसत्तेकडुन पितृसत्तेकडे झालेला प्रवास उलगडने सोपे जाइल.
          या आत्मचरित्राचे कथासूत्र भयानकतेकडुन तथा आसाहायतेकडुन सुरक्षीततेकडे, प्रगतीकडे मार्गक्रमण करते.प्रचंड कष्टदायक संघर्ष करत भटका विमुक्त गोसावी समाज हळूहळू कसा मुख्य धारेत येतो याचे चित्रण लेखक जागोजागी करतात.
         या आत्मचित्रात जागोजागी जीवघेणे कष्ट करणाऱ्या स्त्रीया दिसतात , यातूनही त्या सांस्कृतिक सणवार साजरे करण्यासाठी उत्साही दिसतात.संसार मोडणे , मारहान , व्यसने , स्त्रियांचे बळजबरीने पुनर्विवाह , हे गोसाव्यांतील सुरुवातीचे चित्रण लेखकाच्या शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या संघर्षातून बदलताना दिसते.समाजात फार मोठा बदलाचा हिस्सा लेखक बनतात.
          हे आत्मचरित्र व्यवस्थेला कोसत नाहीत तर मार्गकाढत जाते.लेखकाने उघड्या केलेल्या भळभळणाऱ्या जखमा दोषारोप करण्यासाठी नाहीत तर आज्ञानातून, अंधश्रद्धेतून , रुढी परंपरेतून मार्ग काढत पुढेजाण्यासाठीच्या आहेत. 
          भारतीय संस्कृती पुनरवापराची, रिसायकलिंगची आहे .त्यामुळे भंगार हा शब्द इंग्रजांच्या आगमनाने आला.त्यापुर्वीला भंगार वेचणी होत असल्याचे प्राचीन साहित्यात दिसत नाही.म्हणून लेखकाची गोसावी जात पुर्वीला फार मोठ्या वारस्याची हकदार असली पाहिजे. तो वारसा कुठला हे मात्र लेखक या आत्मचरित्रात मांडत नाहीत.उदरनिर्वाहासाठीची भंगार वेचनारे ही भांडवली व्यवस्थेने दिलेली ओळख आहे.भंगार वेचुन एक व्यक्ती संघर्ष करत उभा तर रहातो पण त्याच भंगार गोळा करणाऱ्या सर्वांना प्रेरणा देतो विकासाच्या प्रवाहात आनतो, हे मोठे काम आशोक जाधव यांनी केले आहे.

       अशोक जाधव यांचे हे आत्मचरित्र निश्चितच भटक्या विमुक्तांच्या साहित्यातील एक वेगळा दखलपात्र साहित्यआविष्कार आहे.त्याशिवाय कुणालाही पुढे जाता येनार नाही.
प्रत्येकाने वाचावे असे हे आत्मकथन आहे. 
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️

Thursday, 10 June 2021

नैतिकतेची नियमावली ..

नैतिकतेची नियमावली 

 १. जगण्याची नियमावली शोषक शासकांची, उच्चजातवर्गीय व्यवस्था बनवत असते.आणि ती त्यांच्या सोईची तर असतेच शिवाय ती शोषीत शासीतांना गुलाम ठेवनारी त्यांचे शोषण करनारी असते.ही दमनकारी नियमावली  पाळता पाळता निम्नजातवर्गीयांची म्हणजे शोषीत शासीतांची घुसमट होते.
नैतिक अनैतिकतेच्या कसोट्या शोषक शासक म्हणजे उच्चजातवर्गीय ठरवतात.काय नैतिक आणि काय अनैतिक हे उच्चजातवर्गीयच ठरवनार.ह्यात नैतिक अनैतिकतेच्या शिक्षा आणि पुरस्कारही जात आणि तोंड बघून ठरते.सजातीय श्रीमंताने किंवा आपल्यापेक्षा वरच्या जातीच्याने केलेले महापाप माफ केले जाते.ते चव्हाट्यावर आनायचे धाडस समाजव्यवस्था करत नाही.पण सजातीय गरीबांची किंवा आपल्यापेक्षा निम्नजातीयांची छोटीसी चुक सुद्धा टोकाच्या शिक्षेला तयार असते.कठोरातल्या कठोर शिक्षेचा अग्रह निम्नजातवर्गीयांसाठी असतो.न्यायाच्या बाबतीत कमीत कमी वेळेत आणि सर्व यंत्रणा वापरुन उच्चजातवर्गीयांना न्याय दिला जातो.तर माजीअस्पृश्य जाती , भटक्या विमुक्त जाती आणि आदिवासी जमातींना न्यायासाठी सतत उंबरठे झिजवावे लागतात, वर्षानुवर्षे त्यांना ताटकळत ठेवले जाते.शक्यतो त्यांना नाय नसतोच.
*********************************
२.बलात्कार हा शब्द संविधान आणि लोकशाही आल्यानंतर सर्वाधिक उच्चारला गेला आहे.लोकशाही येण्याआधी सगळं काही धर्मसंम्मत होतं.सन्माननीय अपवाद वगळता लोकशाही येण्याआधी बाई कितीही ओरडली,दाद मागायला कुनाच्या दारात गेली तरी बलात्कार नव्हेच.
*********************************

३.नैतिक अनैतिकतेच्या कसोट्या हल्ली श्रीमंतीवर पद प्रतिष्ठेवर बदललेल्या आहेत.जेल भोगुन आलेला,भ्रष्टाचार करतो हे जगजाहीर असनारा,लुटनारा,श्रीमंत तथा राजकारणी आल्यानंतर त्या अप्रामाणिकाच्या स्वागतासाठी लोक उभे रहातात तर प्रामाणिक असनारा सच्या मनाचा,तत्वांना माननारा,गरिब आल्यानंतर मात्र त्याच्या आदरार्थ उठण्याची प्रथा नाही असेल तर हल्ली मोडली म्हनावी लागेल. 
*********************************
४.लहानपणी भांडणात कुणीच कुनाला ऐकनारे नसेल,एकमेकांना भारी पडनारे असतील आणि दोघेही समबळ असतील तर मारामारी ऐवजी आया बहिण काढुन हतापायी धकवली जाते.आय बहीण काढली की दोन्हीही पार्ट्या मारामारीपेक्षा जास्त घायाळ होतात.हतबल होतात.हा भांडणांतला मानसशास्त्रीय नियम आता राजकारणात आनला गेला आहे.
शेवटी काय बाई वरुन टिका पुरुषवर्चस्ववादी मानसिकता बळकट करत जानारे आहे. 
********************************
नितीन सावंत परभणी
9970744142

Saturday, 5 June 2021

पुरोगामी प्रतिगामी म्हणजे काय

 पुरोगामी म्हणजे :
जुण्या चुकीच्या प्रथा परंपरा सहज टाकून देनारा , नव्या बदलाला , नव्या जगाला सहज स्विकारणारा, कुठल्याही बाबतीत हेच अंतिम न मानता लवचिक रहाणारा , हे जग नैसर्गिक नियमांवर चालते असे माननारा , जातीवाद अस्पृश्यता नाकारनारा 
सर्वात महत्वाचे म्हणजे तो स्वताची तर्कबुद्धी वापरनारा विज्ञानवाद माननारा तो पुरोगामी ..

प्रतिगामी यालाच सनातनी असेही म्हणतात.

हा धर्म आणि धर्मग्रंथाला अंतिम मानतो.त्या आधारेच जग चालावे असे त्याला वाटते.तर्क करत नाही.जुन्या परंपरा पुढे नेनारा असतो.आजच्या समस्यांची उत्तरे जुण्या धर्मग्रंथात शोधनारा , विज्ञानवाद , तर्कबुद्धी नाकारनारा , अस्पृश्यता जातीवाद पाळनारा , स्त्रीयांना हिन लेखनारा त्यांचे दमन करनारा , गरिब श्रीमंती निसर्गनिर्मित आहे असे माननारा , 
नव्या बदलला विरोध करनारा 
सनातनी प्रतिगामी धर्मांध मानला जातो ..