Thursday, 24 June 2021

♦️वटपौर्णिमा मिथकीय उलगडा

♦️वटपौर्णिमा मिथकीय उलगडा 

                पावसाळा सुरु झाला की , सर्वाधिक रोपे , बिया स्त्रीया लावतात.कारले , भोपळे , दोडके , कद्दुचे वेल तर हमखास स्त्रीयाच लावतात.लसणाचे वाफे , किंवा भातशेती स्त्रीयाच करतात.
नांगरणी , कोळपणी , ही पिक उगवल्यानंतरची कामे पुरुषांना.नांगराजाच्या शोधानंतर ही बाकी कामे पुरुषांच्याकडे गेलीत.बाकी लावणी स्त्रीयांचीच. म्हणूनच तर तमाशात आलेली लावणी ही शेतीच्या लावणीतूनच सांस्कृतिक अंगाने पुढे आलेली आहे.शेती करताना गाणे म्हनने , नाचणे यातून लावणीचा विकास झालेला आहे.

               म्हणून शेतीची अद्यकर्ती स्त्री निऋती होय.स्त्री निसर्गपुजक असल्यामुळे तिच्या अनेक सण उत्सवांत निसर्गाशी एकरूपता असलेले इव्हेंट आहेत.वृक्षपुजा  सिंधूसंस्कृतीत असल्याचे निशपन्न झालेच आहे. 

            वटपौर्णिमा या सणाच्या बाबतीत पुरुषसत्ताक छावणीने डोके वर काढल्यानंतर आणि पोरोहित्य ब्राम्हणी छावणीकडे गेल्यानंतर,स्त्रीच्या निसर्गपुजनाची ही भौतिककृती नवऱ्याच्या मृत्युशी मिथकरुपाने बंदिस्त केली गेली.म्हणजे स्त्रीयांच्या निसर्गपुजनाच्या विधायक लौकिक कृतीचे ब्राम्हणी छावणीने अलौकिकत्वाशी जोडुन विकृतीकरण केले आहे. यामुळे स्त्री आनखी गुलामगिरीच्या खाइत लोटली गेली. तिला गुलाम बनवण्यासाठी, आपल्या हाताखाली भोगवस्तू बनवण्यासाठी सावित्रीची कथा बनवलेली आहे. आगदीच सात जन्मासाठी ती बंदिस्त ठेवण्याचा एवढा क्रृर सुड ब्राम्हणी छावणीने घेतला आहे.नवऱ्यामुळे किंवा नवऱ्यासाठी नव्हे तर स्त्री ही पुर्वीचीच निसर्गपुजक आहे.सर्वांना सावली देनारे आणि वर्षानुवर्षे टिकनारे वडाचे झाड तिने लावने , दरवर्षी ते वाढत जातेय हे पाहुन आनंदाने, उत्साहाने तिने ते पुजने साहजिकच आहे.त्यात पुनर्जन्म घुसवून ब्राम्हणी छावणीने सहजरित्या या निसर्गपुजनाच्या कृतीला बळकावले आहे. 

            पावसाळ्याच्या तोंडावर सर्वत्र बिया टोचुन ती धरती सजवण्यासाठी वृक्ष लागवड करत असेल तर नवऱ्याच्या गुलामगिरीला पावित्र्य भासवून तिला बंदिस्त करु पहाणाऱ्या ब्राम्हणी छावणीला उध्वस्त केले पाहिजे.नवऱ्याचा आणि तिच्या वृक्षपुजनाचा काहीही संबंध नाही.आणि पुन्हा तिला तु निसर्गाची , नवसृजणाची , नवनिर्मितीची अद्यकर्ती होतीस ही प्रेरणा दिली पाहिजे.हे आत्मभान दिले पाहिजे.

#वटपौर्णिमा
#वटसावित्री 
#मिथक 
#विधायकमांडणी

नितीन सावंत परभणी 
9970744142

No comments:

Post a Comment