Sunday, 26 May 2024

मानव मुक्ती मिशन भूमिका व अटी

 मानव मुक्ती मिशन भूमिका व अटी  

♦.....मानव मुक्ती मिशन.....♦

सदस्यत्वाच्या अटी :-

१)प्रतिज्ञा घेतलेली पाहिजे.                          २)डिकास्ट - डिक्लास - डिजेण्डर असला पाहिजे          ३)संघटनेचे तत्वज्ञान आणि उद्देश यांप्रती सजग असला पाहिजे.                                              ४)जनसंघटनेत कार्यरत असला पाहिजे .                      ५)घटना आणि कार्यक्रम मान्य असला पाहिजे.

           🔸उद्दीष्टे :🔸

१) भारतात सर्वात प्रधान मानल्या गेलेल्या समस्या सोडवण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम राबवने.मुख्य म्हणजे  जातवर्गस्त्रीदास्यांत करणे.त्यासाठी विवीध जनआघाड्या उघडणे.

२)सांस्कृतिक आणि सामाजिक परिवर्तनासाठी श्रमीक,शोषीत,पिडीत वर्गाला संघटीत करून त्या वर्गाची जाणीव नेणीव घडविणे.अर्थात सामाजिक सर्वहरा आणि आर्थिक सर्वहरा यांची क्रांतीदोस्ती घडवून आणणे.

 3)प्रस्थापित व विषमतामुलक संस्कृतीक मुल्यव्यवस्थेशी संघर्ष करणे व नवी मुल्ये समाजस्थापनेसाठी प्रयत्न करणे.

४)पर्यायी संस्कृतीक समाजरचना उभी करणे.

 ५)सर्वक्षेत्रात असनारा जातवर्गीय संघर्ष गतीमान करणे.

६)मानव मुक्ती मिशन हे नावातच स्पष्ट केल्याप्रमाणे *माणसाकडून माणसांची होत असलेल्या पिळणुकी विरूध्दच्या मुक्ती लढ्यात आत्मीयता बाळगते*.

७)देशांतर्गत जनतेवर लादण्यात आलेली सर्वप्रकारची विषमता अन्याय संपुष्टात आनण्यासाठी सर्वप्रकारच्या आर्थिक विषमता मोडित काढेल. आवश्यक ती जनतेच्या हिताची आणि समाजवादी धाटणीची अर्थव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक ते उपक्रम व धोरणे राबवेल.

 ८)वर्णवर्चस्ववादी आणि भांडवलदारी जातवर्गीय सामाजिक वर्चस्व मोडित काढून आणि लिंगभेदावर आधारलेले सांस्कृतिक व सामाजिक वर्चस्व मोडुन काढून मानवी समाजरचनेचा पुरस्कार करनारा सांस्कृतिक व सामाजिक बदल घडवेल व त्यासाठी आवश्यक तो उपक्रम व धोरणे राबवेल.

९)बहुसंख्येने असलेल्या भारतीय ग्रामीण व बहुजन समुदायाला ज्ञान प्रस्थापित करण्यासाठी शेतकी क्रांतिला आग्रक्रमाणे राबवेल. त्यासाठी लोकशाही मार्गाने जनअंदोलनांचा व जनचळवळींचा मार्ग स्विकारने.

१०)भारतामध्ये बहुसंख्य असनार्या शेतकरी,आदिवासी,मागासवर्गीय ,भटके,obc व अन्यशेतकरी जाती या श्रमीक घटकांच्या जीवनामध्ये गुणवत्तापूर्ण बदल घडविण्यासाठी चांगले आरोग्य,मानवी स्वरूपाचा रोजगार,आत्मसंम्मान पुर्वक सामाजिक जीवन यासाठी उपक्रम राबवेल,धोरणे घेइल आणि जनचळवळी करेल.स्वावलंबी व आत्मनिर्भर विकासाचा मार्ग खुला करणे. 

११)गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण,आरोग्य अन्न वस्त्र निवारा व करमणूक या मानवी गरजा सकसपने पुर्ण करण्यासाठी सतत कार्यरत राहिल या गरजा पूर्ण करत असताना निसर्ग व पर्यावरनाचा समतोल राखण्यासाठी भूमिका असेल हितसंबंधांचा बिमोड करेल.

 १२)समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोण समताधिष्टीत संस्कृती आणि धर्मनिरपेक्ष शासन प्रणाली कायम व्हावी यासाठी विविध उपक्रम अभियान राबविण्यात येइल आणि धोरणे आखली जातील.

 १३)जातीभेदावरील आधारीत विषमता याला कायमची मूठमाती देण्यासाठी अथक प्ररिश्रम नावीन्यपूर्ण उपक्रम आणि जनचळवळ राबवीण्यात येइल अशा प्रकारचे प्रयत्न करनाऱ्या सर्व जनचळवळींशी समन्वय करण्याचा व सांधा जोडन्याचा प्रयत्न करण्यात येइल. 

१४)सामान संधीसाठी विशेष संधी आणि खालच्या जातींच्या उत्थानासाठी सकारात्मक हस्तक्षेप याचा अग्रह व पुरस्कार करण्यात येइल.प्रचलित राखीव जागांचा लाभ त्या त्या घटकातील पिडीत शोषीतांपर्यंत पोहंचवा याचा अग्रह धरेल याच बरोबर वरिष्ठ वर्गातून,वर्णातून केल्याजानार्या शोषन पिडण आणि ताडण पिळवणूक याचा प्रतिकार करेल.

१५)भारतीय भौतिकवादी आणि प्रागतीक परंपरा उचलून धरण्यात येतील आणि जागतीकीकरनाच्या कालखंडातील साम्राज्यवादी शोषनाविरुद्ध कार्ल मार्क्स यांचे तत्वज्ञान आणि प्राच्यविद्यापंडीत कॉम्रेड शरद पाटील यांनी दिलेले भारतीय परिस्थीती संदर्भातील विवेचन पुढे चालवण्याची पराकाष्ठा करेल. आर्थात कॉम्रेड शरद पाटील यांनी दिलेला सौतांत्रिक मार्क्सवाद पुढे चालवला जाईल. 

१६)तत्रंविज्ञान क्षेत्रामध्ये देखील वर्गसंघर्ष गतिमान आहे.समस्त मानवजातीच्या मुक्तीसाठी भागीदारी करू शकणाऱ्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या मानवी विकासाच्या वाटा साम्राज्यवाद व कार्पोरेट भांडवलशाही रोखून धरत आहे.आनेकदा कार्पोरेट हितसंबंधासाठी तंत्रज्ञान व संशोधन देखील दडपून टाकण्यात येते.मानवी मुल्यांवर आधारित तंत्रविज्ञानाच्या विकासाच्या बाजूने मानव मुक्ती मिशन कार्य करेल.आणि सर्व प्रकारच्या कार्पोरेट हितसंबंधांसाठी विज्ञान तंत्रज्ञानाचा दुरुपयोग,विनाशकारी उपयोग,पर्यावरणाचा नाश,याला विरोध करेल.

१७)लिंगभेदावर आधारलेली सर्वप्रकारची विषमता मोडून काढण्यात मानव मुक्ती मिशन अग्रेसर राहील.स्त्रीयांना समान दर्जा आणि विकासाच्या समान संधी,निर्णय प्रक्रियेत समान वाटा आणि सामाजिक भागिदारी प्रस्थापित करण्यासाठी मिशन कार्यरत राहील.आर्थात स्त्रीवादी विचारसरणीला पुरेसा वाव राहील .

१८)आधुनिक जगातील नव्या मुल्यरचना व मुल्येव्यवस्थेसाठी कार्यरत राहील यामध्ये पारदर्शकता व सहभागी लोकशाही मूल्यांचा आग्रह राहील.

मानव मुक्ती मिशनच्या काही लोकशाखा पुढील प्रमाणे कार्यरत आहेत.

१)कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षक परिषद.    २)भगतसिंग स्टुडंट फ्रंट.                              3)राष्ट्रजागृती वारकरी परिषद,                        4)परधर्म महासभा                                    ५)राष्ट्रमुक्ती आंदोलन.                                ६)मजलिस ए इंसानियत.                          ७)जात्यांतक शेतकरी शेतमजूर महासभा.        ८)ग्रामसुरक्षा दल.                                    ९)बसवधर्म महासभा.                                  १०)शाक्त शैव परिषद.                            ११)लोपामुद्रा बोली भाषा व लिपी संवर्धन समिती     12 ) सौत्रांतिक कलां व साहित्ये संघ 


नितीन सावंत ,परभणीकर                            संस्थापक अध्यक्ष                                              मानव मुक्ती मिशन.                                9970744142