Thursday, 20 October 2022

ll शहिद सरमद ll

 ll  शहिद सरमद ll           

मर्ग अस्त दर ईं बादिया दुंबाल तुरा।
ई अस्त मआले-कार अज माल तुरा।
अब्बल मिहनत ओ आखिरश हसरत अस्त ,
ई माल कुनद हमेशा पामाल तुरा l 

( ज़रा सोचकर देख कि जिन्दगी का अंजाम मौत है। धन कमाने में दुःख सहना पड़ता है और इसके चले जाने पर भी दुःख होता है। धन-दौलत इनसान की बर्बादी का कारण बन जाती है। )
         
                  महाबलाढ्य जुलमी जेत्यांच्या उन्मत्त आणि विलासी जीवनावर थुंकणारे, त्यांच्या तोंडावर कडवे नग्न सत्य जगजाहीर करणारे अवलिये इतिहासाच्या पानापानावर जागोजागी ताठमानेने स्वाभिमान शिकवत उभे आहेत. यांच्याशिवाय इतिहास म्हणजे निरस कथांचा समुच्चय.असा एकांगी, स्वाभिमानहीन इतिहास कुनाला आवडेल ? 
                  सॉक्रेटिस, चार्वाक , मंसुर , सरमद किंवा चक्रधर घ्या, राजेमहाराज्यांच्या तोंडावर नग्न सत्य सांगताना यांनी थोडीही मान तुकविली नाही.मरने बेहत्तर पण माघार नाही असा यांचा रिवाज. 
                   असाच एक अवलिया म्हणजे सरमद.विलासी जीवन जगणार्यांच्या काळजावर घाव घालनारा.महाद्वारावर निस नागवा होऊन प्रस्थापितांच्या व्यवस्थेचे नग्न धिंडवडे काढनारा सरमद. 
                   कौरवांचा नरसंहार करुन पांडव नगरात प्रवेश करत असताना महाद्वारावर चार्वाक उभा होता.त्याने प्रश्न केला "धर्मराजा ( युधिष्ठिरा ) एवढा आनंदाने वाजतगाजत विजय संपादन करुन नगरात प्रवेश करत आहेस.या विजयाचे कौतुक करायला कुनी नातेवाईक तरी जीवंत ठेवलास की नाही ? " 
                   काळजाला बान मारावा तसा चार्वाकाचा प्रश्न होता.चार्वाकाला भरलेल्या धर्मसभेत सत्य बोलल्याबद्दल जीवंत जाळले गेले. दारा शिकोह सारख्या घरच्यांच्या हत्या करुन ,वडिलांना जेलात घालणाऱ्या आयत्या कमाईवर बादशाह बनलेल्या औरंगजेबाला " अंग का झाकत नाहीस ? "  या प्रश्नाला सर्मदने महाद्वारावर उत्तर दिले होते की " माझे अंग झाकले जाइल असे कुठलेही इमानदारीचे आणि स्वकामाईचे तुझे उत्पन्न नाही. " सर्मदला अनेक कारणे आणि आरोप लावुन त्याचे सर कलाम केले गेले. 
                   सर्मद शहिद झाला. पण संपला नाही .अजरामर झाला. विरुन गेला नाही. 
                   हेच नग्न प्रश्न दिल्लीच्या महाद्वारावर आजच्या  उन्मादी शासकांना विचारणारे सरमद उभे करायचे आहेत. 

नितीन सावंत , परभणी
9970744142

आकडेवाल्यांचे शास्त्र - मटका जुगार

आकडेवाल्यांचे शास्त्र 

 मोठ्या लोकसंख्येच्या गावांमधे आकड्यांची  दुकाने असतात . गावात सर्वच जन एकमेकांच्या ओळखीचे असतात . प्रत्येकाला एकमेकांच्या कुंडल्या माहिती असतात . आणि प्रत्येकचजन एकमेकांच्या समोर सोज्वळतेचा आव अनत आसतो . मी मोठा इमानदार आणि सरळमार्गी हे दाखवण्याचा प्रयत्न चालू असतो . 
म्हणून आकड्यांच्या दुकानात आकडे लावायला येनारा प्रत्येकजण चोरून आकडे लावत असतो . काहीजन तो आकडा चिठ्ठीवरच विचारपूर्वक तयार करून घेवून आलेले असतात . ती चिठ्ठी हळूच दुकानदाराकडे सरकवतात . कुठलेही संभाषण न होता दुकानदार ती चिठ्ठी घेतो . या दुकानदाराचे दुकान हा दुय्यम आणि देखाव्याचा व्यावसाय असतो मागे मात्र त्याची ही आकड्यांची दुकानदारी चालू असते . आकडे लावनार्यान्मधे एक पीएचडी करनारा वर्ग असतो . कागदावर चौकोन करून  , डब्बे मारून त्यांनी मोठा हिशोबच मांडलेला असतो आणि तासंतास त्याकडे बघत बसलेले असतात . हे आकडेशास्त्रातले मोठे तत्ववेत्तेच असतात . यांचा हा हिशोब वर्षातून एखादा आकाडा आणून देतो . हे आकडे लावून लावून काहीजन जागीच वाकडे होतात .तर काहिजनांच्या अंगावर आकडा येतो . काहीजण या क्षेत्रात आपले पाय कायमस्वरूपी रोवून धीरोदात्तपणे उभे असतात . चोरून आकडे लावण्याच्या प्रकारात तर आधी दुकानावर बाप येवून जातो आणि नंतर मुलगा . कधीतरी मुलाचा आकडा आला तर त्याच दिवसी त्याच्याबापाचेच आकडे चुकलेले असतात  . दोघांचेही आकडे एकाच दिवसी तेव्हाच येतील जेव्हा दोघेही एकत्र बसून सामोपचाराने दोघांचाही एकच आकडा लावतील . 

या क्षेत्रात थोड्याबहुत प्रमाणात महिलाही आहेत . महिला जशा तंबाखू खातात तशाच त्या आकडेही लावतात . पन त्यात व्रद्ध महिला जास्त असतात . 

या क्षेत्रात आकडे घेनारे श्रीमंत होतात . पन आकडे लावनारे श्रीमंत झाल्याचे पहाण्यात नाही . पन हे त्या आकडेशास्त्रज्ञांच्या व phd धारकांच्या लक्षात का येत नसावे . हा प्रश्न मला नेहमी पडतो . 
या अकडेशास्त्राची एक वेगळीच भाषा असते म्हणे . ती काही मला अवगत नाही आणि एकिण्यातही नाही . 
ज्या गावात या आकड्यांचे दुकान असते तिथे तिथे रस्त्याने लोळनारे चार दोन तरी सापडतात . खरे तर शुन्य आणि एक ते नऊ असे एकूण दहाच आकडे आहेत . पन हेच दहाजन आलटून पालटून आख्ख्या जगाला सतवत आसतात . आणि आपली किन्मत बदलवून घेत असतात . यामुळे आकडे लावनार्यांची मोठी पंचाईत होते . या क्षेत्रात आरक्षण आसावे काय ? या बद्दल आकडे लावनार्यांना विचारले पाहिजे . 
आकडे लावनार्यांसाठी काहीठीकाणी काही खास सुविधाही केलेल्या असतात . टेबल ,खुर्च्या , पानी ,कोरे कागद आणि पेनचीही व्यवस्था केलेली असते . जे कोनाच्याही बापाला घाबरत नाहीत आणि उजागरपने आकडे लावतात ते  बहाद्दर या सेवा सुविधांचा उपभोग आणि उपयोग घेत असतात .
आकड्यांची देवता म्हणून आपल्या ३३ कोटींमधे कुनी नाही . एखादा नविन भरम्हनुन आकडेबाबा लॉंच केला तर लॉंच करनार्यांची फुलटु कमाई होइल .हे आकडे लावनारे कुन्याही देवावर विसंबून न रहाता स्वता मेंदूचा वापर करुन आकडे लावत आसतात . हे क्रांतीकारीच म्हटले पाहिजे .

Tuesday, 18 October 2022

उत्सव बळीराजाच्या पुनरागमनाचा

 उत्सव बळीराजाच्या पुनरागमनाचा 

पुण्यवंत पाताळ लोकीं नेला ।
दरिद्री तो भाग्यवंत केला ।
चोरटयाचा बहुमान वाढविला ।
कीर्तिवानाचा अपमान केला ॥१॥
धुंद झाला तुझा दरबार ॥धृ०॥
                 - संत जनाबाई 
                 
                   आम्ही वाट पाहत आहोत ,बळीराजाच्या पुनरागमनाची. हजारो वर्षापासून आम्ही त्याला स्मरणात ठेवले आहे. तो हिरण्यकशिपुचा पणतू, प्रल्हादाचा नातू, विरोचनाचा पुत्र, कपिलाचा पुतण्या, बाणासुराचा पिता आणि उषेचा आज्जोबा.भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व.सुमारे साडेतीन ते पाच हजार वर्षा पूर्वी होऊन गेलेला एक महानायक, महासम्राट,एक महान तत्ववेत्ता.
                         हजारो वर्षापासून आमच्या माय-माऊल्या दसरा दिवाळीला तुझ्या आगमनाचा उत्सव साजरा करतात बळीराजा. त्या मोठ्या आनंदाने तुझा राज्य येऊ दे म्हणतात. आज भलेही वामनाचे राज्य असो,आम्ही मात्र तुझ्याच पुनरागमनाची वर्षानुवर्षे आस लावून बसलेलो आहोत. आता आम्हाला हवा आहे, वामनाला पाताळात घालणारा बळीराजा. पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे , सर्वहारांचे अभेद राज्य उभं करणारा महासम्राट बळीराजा.शेतातील नांगराचा  सोन्याचा फाळ आणि अंगणातील सोन्याचे रांजण एवढा वैभवसंपन्न शेतकऱ्यांचा राजा आम्हाला पुन्हा हवा आहे.
दैन्य दुख दारिद्र्य दुर करणारा समतेचे राज्य उभे करनारा  बळीराजा आम्हाला हवा आहे. म्हणूनच आम्ही त्याची पुन्हा पुन्हा वाट पाहतो आहोत, नक्कीच तो एक दिवस येईल एक नवा क्रांतिकारक बनवून.... नवा नायक बनून... 
                  सुखासमाधाणाने नांदनाऱ्या बळीराज्यात एकदा वामन नावाची पिडा आली आणि कपटाने यज्ञाच्या खांबाला बांधुन आमचा बळीराजा संपवला गेला.
राजामारल्यावर त्याचे मुंडके लाथेने उडवले गेले.यज्ञदेवतेला रक्ताचा नैव्यद्य दाखवण्यात आला.नरमेध यज्ञ म्हणुन ते रक्त वैदिक पित होते.काय ही दशा केली गेली आमच्या पुर्वजांची. 
                 आम्ही आसुर कुळाचे वारसदार बळीचे वंशज वामनाची वैदिक संस्कृती कधीच माननार नाहीत. आमच्या धमण्यान्मधे बळीराच्या आसुर कुळाचे रक्त वाहात आसेल तर ते आम्ही कसे नाकारायचे.
                         होय आम्ही आसुर आहोत.आसुर सम्राट हिरण्यकश्यपचा पनतु ,प्रल्हादाचा नातु ,विरोचणचा पुत्र ,कपिल यांचा पुतण्या,बाणासुराचे पिता महासम्राट बळीराजा आमचा सख्खा पुर्वज होता.
आम्ही आमच्याच पुर्वजांचा गौरव करणार .
आम्ही बळीराजाचाच गौरव करणार...

वदनी कवळ घेता | नाम घ्या बळीराजाचे || 
सहज स्मरण करा |आपल्या कुळस्वामीचे ||
कृषीक्षेत्रात राबती | मायबाप दिनरात ||
करतात श्रमकरी शेतकरी |अन्नधान्याची भरभराट ||
करून स्मरण तयांचे | करावे अन्न सेवन ||
उदरभरण आहे | संपन्न होवो जीवन ||

रास्ट्रपिता जोतिराव फुले साहेब बळीराजाची बाजु घेताना म्हनतात .

आमुच्या देशीचे अतुल स्वामी वीर ||
होते रणधीर ||मरुत्यास ||
बळीस्थानी आले शूर भैरोबा ||
खंडोबा,जोतिबा || महासुभा ||१||

सद् गुणी पुतळा राजा मुळ बळी ||
दशहरा,दिवाळी ||आठविती ||२||

क्षत्रिय भार्या "इडा पीडा जाओ ||
बळी राज्य येवो "||अशा का बा ?||३||

आर्य भट आले,सुवर्ण लुटिले ||
क्षत्री दास केले ||बापमत्ता ||४||

वामन का घाली बळी रसातळी ||
प्रश्न जोतीमाळी ||करी भटा ||५||

-रास्ट्रपिता जोतीराव फुले.

जगतगुरु तुकोबाराय सुद्धा बळीराजाची बाजु घेताना म्हणतात.. 

हरि तु निष्ठुर ,निर्गुण  !
नाही माया बहु कठिण  !! 
नव्हे ते करिशी आण !
कवणे नाही केले ते !! 

बळी सर्वस्वे उदार !
जेणे उभारिला कर !!
करोनी कहर !!
तु पाताळी घातिला !!

जय बळिराजा ...

आपल्याही गावी , शहरात , वाड्यावर, वस्तीवर, तांड्यावर  ग्रामपंचायत कार्यालयात , ओट्यावर , चौकात ऑफिसात किंवा घरात चौरंगावर बळीराजाची प्रतिमा ठेवून पुजन करावे.विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे . वारकऱ्यांना घेवुन टाळ मृदंगाच्या गजरात पालखी सोहळा काढावा किंवा बैलगाडीने मिरवून काढावी. 

ह.भ.प.धर्मकीर्ती महाराज परभणीकर 
9970744142