मर्ग अस्त दर ईं बादिया दुंबाल तुरा।
ई अस्त मआले-कार अज माल तुरा।
अब्बल मिहनत ओ आखिरश हसरत अस्त ,
ई माल कुनद हमेशा पामाल तुरा l
( ज़रा सोचकर देख कि जिन्दगी का अंजाम मौत है। धन कमाने में दुःख सहना पड़ता है और इसके चले जाने पर भी दुःख होता है। धन-दौलत इनसान की बर्बादी का कारण बन जाती है। )
महाबलाढ्य जुलमी जेत्यांच्या उन्मत्त आणि विलासी जीवनावर थुंकणारे, त्यांच्या तोंडावर कडवे नग्न सत्य जगजाहीर करणारे अवलिये इतिहासाच्या पानापानावर जागोजागी ताठमानेने स्वाभिमान शिकवत उभे आहेत. यांच्याशिवाय इतिहास म्हणजे निरस कथांचा समुच्चय.असा एकांगी, स्वाभिमानहीन इतिहास कुनाला आवडेल ?
सॉक्रेटिस, चार्वाक , मंसुर , सरमद किंवा चक्रधर घ्या, राजेमहाराज्यांच्या तोंडावर नग्न सत्य सांगताना यांनी थोडीही मान तुकविली नाही.मरने बेहत्तर पण माघार नाही असा यांचा रिवाज.
असाच एक अवलिया म्हणजे सरमद.विलासी जीवन जगणार्यांच्या काळजावर घाव घालनारा.महाद्वारावर निस नागवा होऊन प्रस्थापितांच्या व्यवस्थेचे नग्न धिंडवडे काढनारा सरमद.
कौरवांचा नरसंहार करुन पांडव नगरात प्रवेश करत असताना महाद्वारावर चार्वाक उभा होता.त्याने प्रश्न केला "धर्मराजा ( युधिष्ठिरा ) एवढा आनंदाने वाजतगाजत विजय संपादन करुन नगरात प्रवेश करत आहेस.या विजयाचे कौतुक करायला कुनी नातेवाईक तरी जीवंत ठेवलास की नाही ? "
काळजाला बान मारावा तसा चार्वाकाचा प्रश्न होता.चार्वाकाला भरलेल्या धर्मसभेत सत्य बोलल्याबद्दल जीवंत जाळले गेले. दारा शिकोह सारख्या घरच्यांच्या हत्या करुन ,वडिलांना जेलात घालणाऱ्या आयत्या कमाईवर बादशाह बनलेल्या औरंगजेबाला " अंग का झाकत नाहीस ? " या प्रश्नाला सर्मदने महाद्वारावर उत्तर दिले होते की " माझे अंग झाकले जाइल असे कुठलेही इमानदारीचे आणि स्वकामाईचे तुझे उत्पन्न नाही. " सर्मदला अनेक कारणे आणि आरोप लावुन त्याचे सर कलाम केले गेले.
सर्मद शहिद झाला. पण संपला नाही .अजरामर झाला. विरुन गेला नाही.
हेच नग्न प्रश्न दिल्लीच्या महाद्वारावर आजच्या उन्मादी शासकांना विचारणारे सरमद उभे करायचे आहेत.
नितीन सावंत , परभणी
9970744142
No comments:
Post a Comment