Thursday, 20 October 2022

आकडेवाल्यांचे शास्त्र - मटका जुगार

आकडेवाल्यांचे शास्त्र 

 मोठ्या लोकसंख्येच्या गावांमधे आकड्यांची  दुकाने असतात . गावात सर्वच जन एकमेकांच्या ओळखीचे असतात . प्रत्येकाला एकमेकांच्या कुंडल्या माहिती असतात . आणि प्रत्येकचजन एकमेकांच्या समोर सोज्वळतेचा आव अनत आसतो . मी मोठा इमानदार आणि सरळमार्गी हे दाखवण्याचा प्रयत्न चालू असतो . 
म्हणून आकड्यांच्या दुकानात आकडे लावायला येनारा प्रत्येकजण चोरून आकडे लावत असतो . काहीजन तो आकडा चिठ्ठीवरच विचारपूर्वक तयार करून घेवून आलेले असतात . ती चिठ्ठी हळूच दुकानदाराकडे सरकवतात . कुठलेही संभाषण न होता दुकानदार ती चिठ्ठी घेतो . या दुकानदाराचे दुकान हा दुय्यम आणि देखाव्याचा व्यावसाय असतो मागे मात्र त्याची ही आकड्यांची दुकानदारी चालू असते . आकडे लावनार्यान्मधे एक पीएचडी करनारा वर्ग असतो . कागदावर चौकोन करून  , डब्बे मारून त्यांनी मोठा हिशोबच मांडलेला असतो आणि तासंतास त्याकडे बघत बसलेले असतात . हे आकडेशास्त्रातले मोठे तत्ववेत्तेच असतात . यांचा हा हिशोब वर्षातून एखादा आकाडा आणून देतो . हे आकडे लावून लावून काहीजन जागीच वाकडे होतात .तर काहिजनांच्या अंगावर आकडा येतो . काहीजण या क्षेत्रात आपले पाय कायमस्वरूपी रोवून धीरोदात्तपणे उभे असतात . चोरून आकडे लावण्याच्या प्रकारात तर आधी दुकानावर बाप येवून जातो आणि नंतर मुलगा . कधीतरी मुलाचा आकडा आला तर त्याच दिवसी त्याच्याबापाचेच आकडे चुकलेले असतात  . दोघांचेही आकडे एकाच दिवसी तेव्हाच येतील जेव्हा दोघेही एकत्र बसून सामोपचाराने दोघांचाही एकच आकडा लावतील . 

या क्षेत्रात थोड्याबहुत प्रमाणात महिलाही आहेत . महिला जशा तंबाखू खातात तशाच त्या आकडेही लावतात . पन त्यात व्रद्ध महिला जास्त असतात . 

या क्षेत्रात आकडे घेनारे श्रीमंत होतात . पन आकडे लावनारे श्रीमंत झाल्याचे पहाण्यात नाही . पन हे त्या आकडेशास्त्रज्ञांच्या व phd धारकांच्या लक्षात का येत नसावे . हा प्रश्न मला नेहमी पडतो . 
या अकडेशास्त्राची एक वेगळीच भाषा असते म्हणे . ती काही मला अवगत नाही आणि एकिण्यातही नाही . 
ज्या गावात या आकड्यांचे दुकान असते तिथे तिथे रस्त्याने लोळनारे चार दोन तरी सापडतात . खरे तर शुन्य आणि एक ते नऊ असे एकूण दहाच आकडे आहेत . पन हेच दहाजन आलटून पालटून आख्ख्या जगाला सतवत आसतात . आणि आपली किन्मत बदलवून घेत असतात . यामुळे आकडे लावनार्यांची मोठी पंचाईत होते . या क्षेत्रात आरक्षण आसावे काय ? या बद्दल आकडे लावनार्यांना विचारले पाहिजे . 
आकडे लावनार्यांसाठी काहीठीकाणी काही खास सुविधाही केलेल्या असतात . टेबल ,खुर्च्या , पानी ,कोरे कागद आणि पेनचीही व्यवस्था केलेली असते . जे कोनाच्याही बापाला घाबरत नाहीत आणि उजागरपने आकडे लावतात ते  बहाद्दर या सेवा सुविधांचा उपभोग आणि उपयोग घेत असतात .
आकड्यांची देवता म्हणून आपल्या ३३ कोटींमधे कुनी नाही . एखादा नविन भरम्हनुन आकडेबाबा लॉंच केला तर लॉंच करनार्यांची फुलटु कमाई होइल .हे आकडे लावनारे कुन्याही देवावर विसंबून न रहाता स्वता मेंदूचा वापर करुन आकडे लावत आसतात . हे क्रांतीकारीच म्हटले पाहिजे .

No comments:

Post a Comment