Thursday, 29 July 2021

लोणारचा इतिहास

अराडा आणि कराडा ह्या दोन मातृसत्ताक स्त्रीसत्ताक समाजव्यवस्थेच्या प्रतिनिधी आणि बहिनी तर त्यांचा भाऊ लवणासुर ..

पुरुषसत्तेच्या अक्रमणांच्या सत्रात वैष्णव संस्कृतीचे आक्रमण झाले आणि आपल्या बहिणीच्या संरक्षणासाठी  लवणासुर फौजेसह धावून आला तरिही या युद्धात असुर सभ्यता हरली वैष्णव संस्कृती जिंकली. 
पण आपला इतिहास जपण्याकरिता लोकांनी त्या लवणासुराचे नाव त्या नगरिला कायमस्वरूपी लावले.ती नगरी बनली लोणार. 

आणि शैवांचे आयते मंदिरे बळकावली वैष्णवांनी.आत मंदिरात दैत्यसूदन म्हणून विष्णुची मुर्ती आहे.लोणारपासुन २० किमीवर शेंदुर्जन गाव आहे.हे नाव शेंद्रासुर असुराच्या नावावरून बनल्याचे सांगितले जाते.

 शिवाय रिसोडचे नाव ऋषीवत होते.मेहकर चे मेघंकर असुरावरुन मेहकर बनले आहे.हा आमचा न जपलेला इतिहास जो जेत्यांनी बळकावला.तूर्तास एवढेच लोणारवर सविस्तर लिहुच ...

#लोणार_सरोवर 
#जिल्हा_बुलढाणा

Saturday, 24 July 2021

आत्याबाई

 #आत्याबाई  

                      माझ्या परिचयात एक आत्याबाई आहेत. बहुतांश जन त्यांना याच नवाने ओळतात. जास्त बोलण्याच्या सवयीतून, इतरांच्या सुखदुःखाच्या चौकश्या करण्यातून, त्यांच्याकडे जास्त माहिती, ज्ञान जमा व्हायला लागल्याने त्या छोट्यामोठ्या समस्यांची सोडवणूक बसल्या बसल्या करु लागल्या. त्यामूळे आपल्या गावगाड्यात, पंचक्रोशीत त्या लोकप्रिय बनल्या आहेत. 

                       यातून ग्रामीण भागातील अनेक लोक त्यांच्याकडे सल्ला घ्यायला येतात. अनेकांच्या कुटूंबातील अडी-अडचणी सोडवण्यात आत्याबाईचा एक विशेष आसा हतकंडा आहे. त्यात त्या तरबेज आहेत. न्याय करताना त्या निरपेक्ष न्याय करतात. जवळजवळ त्यांचा न्यायनिवाडा दोन्ही पक्षाला मान्य होतो. या सर्व पायपीटीतून हळूहळू त्यांचे नेतृत्वगुण विकसीत झाले आहेत. कुटूंबातील कारभारात त्या प्रमुख बनल्यामुळे घरालाही पुढे नेण्यात त्यांचा मुख्य रोल आहे.

                त्या फार शिक्षीत नाहीत. मोबाईल नंबर कागदावर लिहुन घेवून , झाडांच्या, मंदिरांच्या खानाखुणांच्या आधारे गल्ल्या कॉलण्यांचे पत्ते त्या लक्षात ठेवतात. लांबलचक नावे असलेल्या नगरांची कॉलण्यांची नावेही त्यांना उच्चारता येत नाहीत. त्यांना चळवळ माहीत नाही. त्यांन जात्यंतक आंदोलनही माहित नाही. त्यांना समाजातील युरोपीयन वर्गीय मॉडेल माहिती नाही की मार्क्सचा द्वंद्वात्मक भौतिकवाद माहिती नाही. तरी त्या ग्रामीण भागातील सरंजामशाहीतले जात्यांतर्गत द्वंद्व सोडवत असतात. पितृसत्ताक वर्चस्ववादाला, त्याच्या हुकूमाला वेळोवेळी पायदळी तुडवत असतात. त्यांचा एक अनुभव आहे. त्यांचा अनुभवातून तयार झाला असा एक कयास आहे. त्या कमालीची व्यवहारीक आहेत.
      
                      त्या काही दिसायला नर्मदा बचाव वाल्या मेधाताईसारख्या नाहीत; बांगड्या घालयच्या की नाही, कुंकु लावायचे की नाही, या भानगडीत आडकुन पडलेल्या आदर्श स्त्रीवादीही नाहीत. काबाडकष्ट करुन गावगाड्यातील चार दोन कुटुंबियांना माणुसकीचा, प्रगतीचा रस्ता दाखवणाऱ्या आहेत. आडल्या नडल्यांना मदत करणे, दुबळ्याच्या पाठीशी उभे रहाणे, खचलेल्यांना परंपरागत कुलदैवताची, दंतकथातील उदाहरणे देवून धीर देणाऱ्या त्या एक बेस्ट काऊंसलर आहेत. उत्तम मार्गदर्शक आहेत. सल्लागार आहेत.

                     धाडसी स्वभाव, बहुतेक जगरहाटी फेस केल्यामुळे बनला. कोणत्याही भांडणात उतरल्यामूळे स्वभाव असा बनला असावा. गावातील सरपंचाच्या घरी जाण्यापासून ते कलेक्टर, तहशीलदार ते एसपी ऑफीस पर्यंत जायची तयारी ठेवणाऱ्या. प्रचंड सकारात्मक उर्जा बाळगणाऱ्या, प्रयत्नाची पराकाष्ठा करणाऱ्या, आत्याबाई आहेत.
 
गावखेड्यातल्या आत्या, नानी, खाला, दासी

                  ग्रामीण भागात आशा अनेक अत्याबाई , नानी , खाला , दादी , आक्का , भाबी आहेत. त्या गावगाड्यातल्या जातीतल्या असो, जाती-जातीतल्या असो, घरा-घरातल्या असो, नवरा-बायकोच्या वादाच्या असो; न्यायाच्या बाबतीत न्यायाधिशापेक्षाही अधिक न्याय देणाऱ्या असतात. त्यामूळेच लोक त्यांना मान देतात , दबतात , त्यांचा शब्द लोक पाळतात.

                         गावोगावी असणाऱ्या या आत्याबाईवजा महिलांचा संपूर्ण गावात एक विशेष प्रभाव असतो. त्या भर रस्त्यावर कुनालाही रागावून बोलु शकतात , कितीही मोठा असु द्या त्याला त्या सरळ करु शकतात. गावगाड्यातील ह्या बेस्ट सोशल वर्कर आहेत. सासुरवाशीण सुनांसाठी त्या मुक्तीदात्या असतात. शोषण - पीडनाचे सर्व स्तर त्या आपल्या कुवतीनुसार नाकारतात.
             
संत जनाबाई : अशीच एक आत्या

                  मध्ययुगीन भारतात संत जनाबाई आशाच एक आत्याबाईच होत्या. 
त्यांनीही डोईचा पदर कंबरेला खोसुन , भर बाजारात येवून प्रबोधनासाठी हातात टाळ विना घेतला होता. कुनी आगावची बाई म्हनेल म्हणून त्यांनी आधीच घोषणा केली होती, की कुनाला मनगटावर तेल घालून काय बोंबलायचे आहे तर बोंबला मला काही फरक पडत नाही.तुम्ही फारच टिका करणार असाल तर मीच घोषणा करते की मी विठ्ठलाचे घर निघायला तयार आहे. त्याची वेश्या होइल. हा समर्पणभाव आहे. कशासाठी अो? समाजसुधारण्यासाठीच ना!

                     काॅ. शरद पाटील यांनी अशा बायकांची ऐतिहासिक परंपरा इतिहासाच्या गर्भातून शोधून काढली. सिंधुकाळात मातृसत्ताक व स्त्रिसत्ताक समाजाचा ते उल्लेख करतात. त्यामध्ये एक कुलामधून दूसऱ्या मुलामध्ये अौषधोपचार व मातृसत्तेच्या धर्माचे प्रबोधन करणाऱ्या अशाच आत्याबाईंना त्यांनी शोधले. त्यांना कुल-टा म्हणतात. जो शब्द नंतर पुरुषसत्ताक समाजात बदनाम केला गेला.

              आत्याबाई या चालतबोलत न्यायालय आणि त्याची परंपरा मातृसत्तेतून अशी येते. सामाजिक चळवळीच्या गावीही नाही. 

                मानव मुक्ती मिशन अशा १०० आत्याबाईंचा मेळावा घेऊन त्यांना बोलते करणार. त्यांच्या अनुभवाचे डाक्यूमेंटेशन करणार. त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा प्रसार होण्यासाठी त्यावर ग्रंथ निर्माणकरणार. त्यांना नवीन कायद्यांचे ज्ञान देणार. आत्याबाई संस्था गावगाड्यात भक्कम करण्याचा हा छोटा प्रयत्न राहील, मानव मुक्ती मिशनचा.

नितीन सावंत परभणी 
संस्थापक अध्यक्ष 
मानव मुक्ती मिशन
9970744142 
दि. २२ जुलै २०२१ 

#गुरुपौर्णिमा

Friday, 23 July 2021

♦वारकरी मुहमेंट ♦

 ♦वारकरी मुहमेंट ♦

हिच व्हावी माझी आस l जन्मोजन्मी तुझा दास ll 
पंढरिचा वारकरी l वारी चुकू न दे हरी ll 
संत संग सर्वकाळ l अखंड प्रेमाचा कल्लोळ ll 
चंद्रभागे स्नान l तुकाम्हने हेची दान ll 
          - संत तुकोबाराय 

भारतीय सरंजामशाहीत वर्ग नव्हते तर सुरुवातीला वर्ण आणि नंतरच्या काळात जाती होत्या ही कॉम्रेड शरद पाटलांची मांडणी. याद्वारे भारतीय सरंजामशाहीकडे पाहिल्यावर आपल्याला भारतीय इतिहासाचे विधायक ऐतिहासिक भौतिकवादी आकलन योग्य रित्या करता येते. भारतात जिथे जिथे सुबत्ता आली तिथे तिथे ब्राम्हण या जातीच्या लोकांनी  राजेपद  नामधारी बनवून कारभार स्वताकडे ठेवला आणि आपले सांस्कृतिक वर्चस्व निर्माणकरुन दीर्घकालीन सत्ता उपभोगली. 

मध्ययुगीन भारतीय इतिहासात ज्या ज्या राज्यव्यवस्था भरभराटीला आल्या त्या राजेमहाराज्यांनी शेतकरी कष्टकरी आदिवासी जातींजमातींचे भले करण्याऐवजी मोठमोठी मंदिरे बांधली आणि ब्राम्हणी हित जोपासले.यात ब्राम्हणांच्या सांस्कृतिक राजकारणाला ते राजे बळी पडले.मंदिर संस्कृतीचे ब्राम्हणी स्तोम माजल्याने सर्वसामान्य वर्ग धर्मसंम्मत  मार्गाने शोषन पिळवणूकीला बळी पडला . 

या ब्राम्हणी सांस्कृतिक राजकारणाला मध्ययुगीन भारतात विरोध दर्शवला गेला तो संत चळवळीच्या माध्यमातून. संत चक्रधरस्वामी यांनी महानुभाव चळवळ उभी करुन ब्राम्हणी सांस्कृतिक राजकारण संपवायला सुरुवात केल्याने त्यांची रामदेवराय यादवाच्या भर दरबारात ब्राम्हणांच्या शिफारशीवर हत्या करण्यात आली. 
महात्मा बसवेश्वर यांनी याच ब्राम्हणी सांस्कृतिक राजकारणाला च्यालेंज करुन बंड पुकारल्याने त्यांच्यासह सर्वच अनुयायांच्या हत्या झाल्या.

सर्वात मोठी च्यालेंजेबल मुहमेंट उभी केली ती संत नामदेव यांनी. या मुहमेंटचे नाव वारकरी किंवा भागवत धर्म.यात संत नामदेव यांनी ब्राम्हणी ग्रंथ नाकारून अभंग नावाने स्वतंत्र साहित्य निर्मिती केली.ब्राम्हणी तिर्थक्षेत्रे नाकारून स्वतंत्र तिर्थक्षेत्र प्रसिद्धीस आनले.पर्याय दिला. सर्व ब्राम्हणी देव देवता नाकारून स्वतंत्र मुर्तीसह नवा देव पर्याय म्हणून पुढे केला.जुने व्रतवैकल्ये नाकारून एकादशी सारखे नवे अब्राम्हणी व्रत पुढे आनले. यात मोठा प्रचारक वर्ग तयार केला ज्याला त्यांनी संत म्हटले. ब्राम्हणी धर्मात स्त्रीला हिन लेखले जायचे. लिखानाचे आधिकार नव्हते. नामदेव यांनी स्त्रीला नेतृत्व दिले , विनेकरी बनवले , अभंग लिहायला शिकवले . 

या घटनेमुळे संत नामदेवांसह त्यांच्या घरच्या १४ जनांच्या हत्या झाल्या .पुढे सर्व प्रचारक असनारे संतही अशेच संपवले गेले. 

महाराष्ट्रात सवात जास्त आणि दीर्घकाळ आपला प्रभाव उमटवनारे हेच वारकरी आंदोलन आहे . ज्याची सुरुवात संत नामदेव यांनी केली होती. आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी हा पर्याय त्यांनीच दिला. वर्षातुन दोन वेळा पंढरपूरच्या वाळवंटात हे आधिवेषन होत असे.यात गाव पातळीवर कोनते अभंग घेऊन जागृती करायची याचे ठराव पारित होत असत. पुढल्या काळात संत तुकोबारायांसारखा मोठ्या जातीत जन्माला आलेला संत सुद्धा ब्राम्हणी सांस्कृतिक राजकारणापुढे टिकु शकला नाही . 

संत हे समतावादी होते. त्यांची आध्यात्मिक असनारी समता सहभोजन करुन जातीअंतकही बनली होती. 

उंचनिच काही नेने भंगवंत म्हनत संत तुकोबाराय म्हणतात 
आमचा देव रोहीदासाच्या सोबत चामडे रंगवतो , सज्जन कसायासोबत मांस विकतो , चोखामेळ्यासोबत ढोरे ओढतो , दासी जनी सोबत शेन वेचतो, आमचा देव सवळ्यातला नाही . तो शुद्र नामदेवांच्या घरी जेवतो , कबिराचे शेले विनतो , मीराबाईसाठी विष पितो, 

आमच्या देवाला उचनिच भेदभाव नसतो. 
कर्म हाच धर्म आहे. वर्णधर्माने कुनी ग्रेट नसते. याबद्दल तुकोबाराय म्हणतात 

" वर्णधर्माभिमाने कोन झाले पावन l ऐसे द्या सांगुन मजपाशी ll " 

सर्व संत वर्णजातीअंतक होते.त्याचे कितीतरी पुरावे देता येतील.संत मेळ्यात उच्चजातीय संत ज्ञानेश्वर महाराजांना संत चोखोबारायांच्या सोबत नामदेवरायानी जेवायला लावले होते. मग संत ज्ञानेश्वर म्हणतात 

यातीकुळ माझे गेले हरपून l श्रीरंगावाचुन नेनो काही ll  

त्याकाळी हे धाडस करणे अत्यंत जिकरीचे काम उभे.तो काळ जातीव्यवस्था वर्णव्यवस्थेच्या कडक अमलबजावणीचा काळ होता. संत नामदेव संत चोखोबारायांसारख्याना मंदिराबाहेर हाकलून दिले जात होते.तरिही संतांनी बंड केले.या संतांच्या सांस्कृतिक राजकारणाला लक्षात घेतले असते तर बऱ्याच पुरोगामी पक्ष संघटनांची सत्ता आली असती. 

आज घडीला 
जो जे वांछिल तो ते लाहो म्हनने समतावादी आहे , मार्क्सवादी आहे . 

किंवा दया करणे जे पुत्रांशी l तोची दासा आणि दासी ll ( दास दासिंवर मुलांसारखी दया करावी , वागणूक द्यावी ) 
हे तर जानिव नेनीवेसह डिकास्ट होण्याचे लक्षण आहे . 

वारकरी या अब्राम्हणी परंपरेतल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा 

ह.भ.प.धर्मकीर्ती महाराज परभणीकर 
9970744142

♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦

Monday, 19 July 2021

♦विठु पाटलाला जोहार ! ♦

        ♦विठु पाटलाला जोहार ! ♦ 

सरंजामशाही आणि श्रौतस्मार्त धर्माविरूध्द अध्यात्मिक क्षेत्राचे बंड.

              नितीन सावंत परभणी

             मो: 9970744142

जोहार मायबाप जोहार l मी विठु पाटलाचा महार ll
हिशोब देतो ताबेदार l लंकेचा कारभार की जी मायबाप ll
                     संत एकनाथ महाराज  


               भारतीय सामंतशाहीने सुरवातीला ‘प्रवाही जातीव्यवस्था’ जन्माला घातली आणि मग सरंजामशाहीने ‘बंद जातीव्यवस्था'. सरंजामशाहीत शोषित-पीडितात समान हितसंबध असते तर या सरंजामशाहीत वर्ग बनले असते.पण,या देशात जातीतही पोटजाती निर्माण झाल्याने ‘क्रमीक असमानता’ (graded inequality) जन्माला अल्याने येथे वर्ग बनु शकले नाहीत.या सरंजामशाहीच्या शोषनाच्या काळातील सर्वात महत्वाची पदे होती ती कुलकर्णी,सरदेशपांडे, सरदेसाई,देशमुख आणि पाटील यांच्याकडे.पट,पटवारी पासुन पाटील पद बनत गेल्याचा इतिहास आलीकडे उजेडात येत आहे.सुरुवातीला ही पदे ग्राम संस्कृती वसवण्यासाठी,तिचे जतन संवर्धन करण्यासाठी,शांतता,न्याय आबाधीत ठेवण्यासाठी होती.नंतर पुढे हिच पदे शोषन-पिळवणूक करणारी बनली.हे जेव्हा मध्ययुगीन काळात, शिवाजी राजांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी हे सरंजामशाहीतील चालत आलेली पदे बरखास्त करुन रोख रकमेत कारभार सुरु केला होता.रांझ्याच्या पाटलाला महाराजांनी धडा शिकवला असल्याचे आपण जानतोच. पण,शिवपुर्व काळात,या सरंजामदारांच्या विरोधात कुनालाही आवाज उठवता येत नव्हता.तसे केल्यास भिंतीत जिवंत गाडले जाई. जाहीर हत्या केली जाई.

                हे भौतिकवादी वास्तव लक्षात घेवून संतांनी आध्यात्मिक क्षेत्रात सरंजामशाही विरूध्द बंड उभे केले होते.मग हे आध्यात्मिक क्षेत्रातील बंड कुनाच्या विरूध्द होते ? तर पंढरपूरच्या विठु पाटला विरूध्द होते.यात सर्व संतांनी भूमिका अशी घेतली की आधी या विठु पाटलाला लाडिक जोहार घालून,ही सभोवतालची विषमता, भेदाभेद,अस्पृश्यता,जातीव्यवस्था, पिळवणूक लक्षात आणून द्यायचे.हे सर्व विठु पाटला समोर मांडायचे.नाही ऐकल्यास त्याच्या विरूध्द बंड करायचे.म्हणून सर्वच संतांनी आधी या विठु पाटलाला जोहार घातला.हा जोहार घालताना सर्व संत एकजात वेसकर बनले.हा लाडीक झगडा सुरु झाला तो विठु पाटलात आणि वेसकर संतांच्यात.

                    जोहार हे अभिवादन अस्पृश्य,निम्नजातीयांसाठी होते.अस्पृश्यांनी उच्चजातीयांना जोहार घालायचा असतो.आपण गुलाम, हरलेले आहोत ही त्या अभिवादनामागची भावना.आपली औकात सदैव लक्षात रहावी असे हे जोहार संबोधन.

                पण सर्वच संतांनी भेदाभेदाच्या भिंतींच मोडल्या होत्या.निम्नजातीयांचा जोहार सर्व संतांनी आनंदने स्विकारला आणि हा जोहार विठू पाटलाला घातला.सर्व संत त्या विठुपाटलाच्या दारात गेले आणि जोहार म्हनत आपले गाऱ्हाणे मांडायला लागले.जातीव्यवस्थेत जोहार घालण्याचे खरे अधिकार फक्त चोखोबांनाच, पण संत मंडळात उच्चजातीय ज्ञानेश्वर,एकनाथ यांनी सुद्धा जोहार घातला आणि समतेची वाट अधिक भक्कम केली.कुठलाही भेद ठेवला नाही.

         संत तुकोबाराय म्हणतात,

जोहार जी मायबाप जोहार I सारा साधावया आलो वेसकर ll

         संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,

जोहार मायबाप जोहार l मी कृष्णाजी घरचा पाडेवार ll

          संत एकनाथ महाराजही ३० पेक्षा जास्त अभंगांतून स्वताला वेसकर संबोधतात.ते म्हणतात,

मी निर्गुणपुरीचा महार l करिती जोहार ll  एका जनार्धनी महार l पायाशी केला जोहार ll

              पण,हे संत काही जन्माने जोहार घालनारे वेसकर नव्हते की,अस्पृश्य नव्हते.पण त्यांना विठु पाटलाच्या वाड्यावर वैदिकांची फिर्याद न्यायची होती.धार्मीक दहशत मोडीत काढण्यासाठी त्यांना विठु पाटलाला समजून सांगायचे होते.सभोवतालची अस्पृश्यता,भेदाभेद लक्षात आणून द्यायची होते.धर्मपुरोहीतांचा छळ आणि देवा धर्माच्या नावे होनारी लुट संतांना विठू पाटलाच्या कानावर घालायची होती . 

               इतर संतांच्यापेक्षा संत चोखोबाराय मात्र त्या व्यथा वेदना जाणणारे खरेच अस्पृश्य होते.त्यांना जोहार काय असतो हे अनुभवातून माहिती होते.म्हणून संत चोखोबारायांचा जोहार मानवी हक्कांसाठी आहे.

                  चोखोबा हे खरच वेसकर होते. जन्माने अस्पृश्य महार होते.जोहार कसा घालतात हे चोखोबांना अभंग लिहीताना अवघड गेले नसनार. चोखोबा वास्तवात जगले.संत चोखोबाराय विठु पाटलाला जोहार घालताना म्हणतात,

जोहार मायबाप जोहार l तुमच्या महाराचा मी महार ll  बहु भुकेला जहालो l तुमच्या उष्ट्यासाठी आलो ll 

बहु केली आस l तुमच्या दासाचा मी दास ll 

चोखा म्हने पाटी l आनिली तुमच्या उष्ट्यासाठी l

         किंवा,विठु पाटलाचा महार l चोखा मेळ्याचा जोहार ll सकळ संतांचा कारभार l मज नाफराचे शिरी की जी मायबाप ll

              संत चोखोबारायांचा जोहार मानवी हक्कांसाठीचा आहे.अन्न, वस्त्र, निवारा या भौतिक गरजांच्या पुर्तीसाठी चोखोबा जोहार घालत आहेत. आमच्या पाटीत उष्ट्ये आन्न तरी टाका म्हनने ही मागणी अत्यंत हृदयद्रावक आहे.आता तरी विठु पाटलाला पाझर फुटायला हवा.एक विशेष असे की येथे संत चोखोबाराय अस्पृश्य असुन सर्व संतांचा कारभार बघत असल्याने निर्भयपणे सांगत आहेत.मानवी हक्कांसाठी चोखोबाराय जोहार घालत आहेत.

हा विठु पाटील कोण आहे?

               खरे तर हा विठु पाटील म्हणजे सभोतालचे जग आहे.अन्याय अत्याचार करनारी सरंजामशाही आहे.शोषण पिळवणूक करनारे श्रौतस्मार्त (श्रुती व स्मृती या धर्मग्रंथावर आधारित धर्म ) धर्माचे दलाल आहेत.त्यांच्या समोर हे संत आधी जोहार घालताहेत.त्यांना आशा आहे ही व्यवस्था बदलेन. यांना थोडातरी पाझर फुटेल पण हे जेव्हा जोहारावर शक्य नव्हते, तेव्हा संतांनी विठु पाटला विरुद्ध बंडखोरी केली.जोहार घालुनही त्याला फरक पडत नसेल.मायबाप म्हणूनही तो बदलनार नसेल तर मग आपन पुढचे पाउल उचलले पाहिजे ही नवी भूमिका पुढे आली.

        बंडाची मुख्य कळ काढुन दिली ती संत नामदेवांनी

आणि मग, संत नामदेव म्हनाले

पतीत पावन म्हणवूनी l आलो तुझिया दारा ll

पतीत पावन नव्हेसी म्हनोनी जातो माघारा ll

झेंगट घेवून हाती l दवंडी पेटवीन तिन्ही लोंकी ll

देवा पतीत पावन नव्हेसी l तु मोठा घातकी ll

             .पुढे त्यांच्या या बंडात संत गोरोबा काका,संत सावता महाराज,संत जनाबाई,संत चोखोबाराय,संत सोयराबाई,संत निर्मळा,संत बंका,संत कर्ममेळा,संत जगमित्र,संत नरहरी सोनार,संत कबिर, संत ज्ञानेश्वर महाराज आदी वेसकरांनी (संतांनी ) हिरहीरीने भाग घेतला.

     संत जनाबाई म्हनाल्या,

आरे आरे विठ्या l मुळ मायेच्या कारट्या ll

तुझी रांड रंडकी होवो l तुझे मढे बसो ll

            संत चोखोबारायांची पत्नी संत सोयराबाई म्हनाल्या,

जन्म गेला तुमचे उष्टे खाता l लाज न ये तुझ्या चिता ll

              हे विठु पाटला तुला लाज वाटत नाही का रे ? हा संत सोयराबाईचा सवाल आहे.

             पुढच्या काळात संत एकनाथ महाराज संत तुकोबाराय यांनी सुद्धा या विठु पाटलाच्या विरोधात बंड चालु ठेवले.

         संत तुकोबाराय म्हणतात,

हरी तु निष्ठुर निर्गुण l नाही माया बहु कठीन l

नव्हे ते करसी आण l कवने नाही केले ते ll

बळी सर्वस्वे उदार l जेने उभारीला कर l

करुनी कहर l तु पाताळी घातला ll

            हे विठु पाटला तु निष्ठुर आहेस. तुझ्याकडे मायादया नाही.तु बळीराजाला पाताळात घातलेस.

या विठु पाटलाशी अजुनही बंड चालु आहे.हे बंड चालु ठेवले आहे वारकरी मंडळींनी.ते सुद्धा दरवर्षी पंढरीला जावुन त्या विठु पाटलाला जोहार घालतात.आता हे बंड लाखोंच्या संख्येने उभे राहिले आहे.प्रत्येक मंदिरात सकाळी जोहार ने बंडाचा घंटानाद होतो.हे बंड सुरु आहे जातवर्गस्त्रीदास्यांतासाठी.हे बंड सुरु आहे आधुनिक विठु पाटला विरूध्द.हा विठु पाटील म्हणजे निमभांडवली निमसरंजामी जातवर्गीय ब्राम्हणी व्यवस्था.या विठु पाटलाला आता हे महागात पडनार आहे.श्रौतस्मार्त (श्रुती व स्मृती या धर्मग्रंथावर आधारित धर्म ) धर्माव्यवस्था नामोहरम होण्याच्या मार्गावर आहे.जोहारचा लोकजागर आता प्रबोधनात्मक बनला आहे. 

म्हणून या आषाढी एकादशी निमित्ताने विठू पाटलाला आमचा जय भीम लाल सलामचा जोहार.

♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦

नितीन सावंत हे कीर्तनकार आहेत.ते धर्मकीर्ती या नावाने कीर्तन करतात.

♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦

गावगाडा - यापेक्षा रझाकारी बरी

 ⚫ यापेक्षा रझाकारी बरी..

भयाण शांतात पसरलीत खेड्यात.माणसे मरताहेत.गाव सुन्न झाला आहे.गावात पाण्याचा थेंब नाही.पारधी कैकाड्याची घरे उठून गेली कुठतरी.गावाला आवकळा आलीय.पुर्वी 72 च्या दुष्काळात म्हने गावच्या चौकातल्या जमीणीतल्या पेवा मधे आनेक खंड्या धन्या साठ्वलेले होते ते गावच्या पाटलाने फुकट वाटले होते.सध्या कोण्याही पाटलाच्या घरात कणगीभर सुद्धा धान्य नाही...ओट्यावर आकाशाकडे तोंड करुन बसलेले म्हातारे म्हनाहेत.तुमच्या आच्छे दिना पेक्षा आमची रझाकारी बरी होती...
 मालीपाटल्याचे पेरलेले धान्य उगवलेच नाही .म्हनत होता आवंदा दोनी लेकींची लग्ने एकाच मांडवात लावतो.पोरींचे लग्नाचे वय निघून जात आहे हे पाहून खालच्या आळीतल्या महादूने गळफास घेतलाय.विठ्ठबापूचा तुकाराम पैश्यापाई इंजिनिअरींग दुसरे वर्षे सोडून गावी आलाय.नुसते पारावरच्या वट्ट्यावर शुन्यात बघत बसलेला आसतो.
 शांताबाईची लेक कोनीच दवाखाण्यात नेले नाही म्हनून घरातच पोटात बाळ आडकून मेली.शांतबाई मड्यावर हात बडवून रडताना म्हनतहोती 
"मह्या लेकराला दयाखाण्यात न्यायला मला पैसा भेटला नाही ,मह्या मरु दिली आसती का तिला."
कपड्यांच्या उधारीचे पैसे का देत नाही म्हनून तालुक्याच्या मारवाड्याने मानसे पाठवून संपतनाना रस्त्यात मारले त्यांच्या कनातून रक्त येत होते. ते रुमालाने कान पुसत तसेच घरी आले.गळ्यातला सोन्याच्या समजून बेंटेक्सचा ओम काढून नेला म्हने...
 गावसारा आडलाय पैशापाई.कोणीबी नेता भेटायला येइना.पिपळाच्या झाडाखाली बसलेले शीरपतीचे वेडे पोर म्हंते मेल्यावर लोक फुटू काढायला येतात.आता तर तसे बी कोणी येइना. बाजुच्या गवचा मेलेला मानुस टिव्हीत दाखवला होता.पन या गावचा काही नंबरच आला नाही.50 वर माणसे गेली तरी.
 गावसारा सुन्न झाला आहे.येथे टि व्हीची रेंज येते.येथे रेडिओची रेंज येते.येथे मोबाइलची बी रेंज येते.कोनाला मदतीची आरोळी दिली तर ते म्हंतात रेंजच नाही.येथे फक्त मानुसकीची रेंज येत नाही.
भयाण शांतत पसरलीय...
⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫

Friday, 16 July 2021

♦️टेंगूळ - अविकसीत समाजव्यवस्थेचे

 ♦️टेंगूळ - अविकसीत समाजव्यवस्थेचे 

        नितीन सावंत परभणी 
        9970744142

           संपूर्ण शरीर नैसर्गिक वाढ झालेले , सुबक असावे असे प्रत्येकाला हवे असते. शरीराची त्वचा आणि सर्व अवयव निटनिटके असावेत हा सर्वसामान्य नियम. एखाद्या वेळी संपूर्ण सुंदर चेहऱ्यावर एखादे टेंगूळ आले असेल तर ते लगेच लक्ष वेधून घेते. ते बघताना, ते घेऊन इतरत्र वावरताना ऑड वाटते. नको तिथे , विनाकारण आलेले टेंगूळ शेवटी नकोसा भाग बनून जाते. 
            
             समाजव्यवस्थेचेही अगदी तसेच आहे. जातीव्यवस्था संपून वर्गव्यवस्था पूर्णपणे लागु व्हायला हवी होती. संपूर्ण सरंजामशाही संपून पूर्णपणे भांडवली लोकशाही लागु असायला हवी होती. त्यामुळे नव्या आलेल्या व्यवस्थेच्या नियमावलीत व्यवस्थित वागता आले असते. ही आलेली नवी व्यवस्था जरी परिपूर्ण नसली, तरी ती रेखीव-सुबक तरी असायला हवी होती. पण ही व्यवस्था पुर्ण विकसीत न झाल्याने जागोजागी वर्गस्तरामूळे अर्धविकसित टेंगूळ आलेले आहेत. आणि हा नकोसा भाग लगेच उघडा पडतो.

              वागताना, भांडवली मुल्ये पाळून निट जगता येत नाही, ना सरंजामी मुल्ये आज घडीला मिरवता येत नाहीत. असा प्रत्येकजन अर्धा शहरी असतो, अर्धा गावठी. कला साहित्यात ,भाषेत, समाजव्यवस्थेत, राजकारणात सर्वत्र हे टेंगूळ आलेले आहेत. तो भाग लगेच ओळखू येतो, दिसतो.
 
            पिकलेल्या अांब्याचा रस करता येतो , तर कच्च्या अंब्याचे लोणचे करता येते. परंतू, अर्धा पिकलेला , अर्धा कच्चा ज्याला #अर्धा_गाभुळा म्हणतात आशाचे काहिच करता येत नाही. भारतीय समाजव्यवस्थेचे नेमके हेच झाले आहे. हि समाजव्यवस्था ना पिकलेली आहे , ना कच्ची ती आर्धगाभुळी बनली आहे. 
            
             भांडवलशाहीला भारतीय भुमीवर तर खुपच वाकावे लागले आहे. कुठलाही प्रोडक्ट हा अभिजन वर्गाला नजरेपुढे ठेवून काढलेला त्यांना पाच दहा रुपायाच्या किमतीपर्यंत आनुन ठेवावा लागतो. दात घासायच्या पेस्ट , बिस्कुट पुडे , भांडे घासायची घासणी , बऱ्याच साबणा आगदी पाच दहा रुपायापर्यंत त्यांना विकाव्या लागतात. अगदी अभिजनाची म्हणावी अशी केसाची ब्रेलक्रीम, डिअोडरंट, फेअर अँड लव्हली पण सॅशेमध्ये २-५ रु.वर विकावी लागतात. बाजारपेठच जातिव्यवस्था बनवू देत नाही.

                   हे कशाचे द्योतक आहेत ? तर येथे आर्थिक क्रांती , उत्पादन वाढीची क्रांती न झाल्याचे , समाजव्यवस्था कुपोषित असल्याचे उदाहरण आहे. या व्यवस्थेत जागोजागी कुपोषणावर वर्गस्तराच्या खूरटलेल्या प्रगतीचे टेंगूळ आलेत. वाढ निट न झालेल्या समाजव्यवस्थेतील टेंगूळ ओळखून पडलेले आहेत . 

वेशभूषेतले टेंगूळ : 

                   बरेच जन शहारात गेल्यानंतर संपूर्ण शहरी लुक लगेच अवलंबतात. तसा पेहराव करतात.अगदी त्यात फिट्ट बसण्याचा ते खुप कसुन प्रयत्न करतात. कधीकधी असे वाटते की यांच्या किमान दोन पिढ्या तरी शहरातीलच असाव्यात.पण हे लोक जेव्हा बोलायला लागतात, तेव्हा मधेमधे एक दोन असे जुने ग्रामीण बोलीतील शब्द ते वापरतात की ते बिंग लगेच फुटते.लगेच लक्षात येते हे बेनं गावाकडचंच. भ्रमाचा भोपळा फुटुन आलेले टेंगूळ दिसते.त्यांच्या वागण्यातील विसंगती उघड होते.वेशभूषेतले टेंगूळ आलेल्याची खुप उदाहरणे आहेत.शेती करणाऱ्या नवरदेवाला भांडवली तथा इंग्रजांच्या वेशभूषेतला कोट घालून लग्नात का सजवत असतील.त्या कोटाचा पुढे आयुष्यभर तरी वापर होतो का ? प्रचंड गर्मी होत असताना तेवढा जाड कोट मिरवून कोनते सौंदर्य निर्माण होते, उलट ते ऑड वाटु लागते. बुजगावण्याला घातल्यागत तो कोट दिसतो.हा प्रकार टेंगूळच वाटु लागते. मेट्रो सिटीत रहाणाऱ्या बऱ्याच जणांच्या घरातील लिव्हिंग स्टाइल अगदी हायफाय असते.घरातील नोकरी करणारे साहेब सुट बुट टाय वापरतात.चकचकीत कपडे घालून ऑफिसला जातात.असेच कधीतरी ऑफिसची मंडळी घरी आली की घरी भारतीय बैठकीत फरशीवर बसलेली , कपाळी मोठे कुंकु लावलेली किंवा शरीरावर गोंदन असलेली आई दिसते आणि साहेब गावगाड्यातील मागास वर्गातून आल्याचे टेंगूळ उघडे पडते. 

भाषेतील टेंगूळ : 

               भाषेतील घुसलेले अ-वास्तव शब्द , मिक्स भाषा त्यातून भावना पोहंचवताना निर्माण झालेले आडथळे आणि त्यात निर्माण झालेली विसंगती. यामुळे भाषेतही जागोजागी टेंगूळ आले आहेत. बऱ्याच गावात अनेकांची टोपन नावे असेच वागण्यामुळे पडलेली असतात. 

          गावकरी विचारतात. कोणता रामा? तर शुद्ध रामा. म्हणजे गावात सर्वजण गावठी बोलत असतात तर हा एकटाच शुद्ध हनायला बघतो. त्याचे वर्तन टेंगूळ आल्यासारखे सर्वांच्या नजरेत भरते, त्यातून त्याची चिड पडते शुद्ध रामा. गावात एकाच नावाचे जस तात्या नावाचे खुप जन असतील तर, कोणता तात्या? तर इंग्लिश तात्या. यांना कुठेही इंग्लिश शब्द घुसवायची सवय असते. त्याचे टेंगूळ बनते आणि ते हसण्याचा विषय बनतात.

                 मराठीत हेड्याक शब्द इंग्रजीतून घेतला आहे.काहीजण बोलताना  म्हणतात डोक्याला लै हेड्याक झालाय." यात डोके हा शब्द दोनदा आल्याने ते अनावश्यक असल्याने येथे भाषेला टेंगूळ आल्याचे स्पष्टपणे निदर्शनास येते. "आत्ता परत रिटर्न आलो " असेही वाक्ये आपण एकेलेले असतील.परत रिटर्न हे टेंगूळ आहे. 

राजकीय क्षेत्रातील टेंगूळ : 

             सर्वच क्षेत्रात पुर्ण विकास न झाल्यामुळे, समाजव्यवस्थेतील शेवटच्या घटकाचा पूर्णपणे प्रगल्भतेने विकास न झाल्यामुळे हे विकृतीचे टेंगूळ आलेले आहे.
राजकीय क्षेत्रात बघा माथाडी कामगाराचा नेता म्हटले की ब्राम्हण , शेतकरी संघटनेचा नेता म्हटले की ब्राम्हण , शेतमजूरांचा नेता म्हटले की ब्राम्हण , पारध्यांच्या संघटनेचा नेताही ब्राम्हण, आदिवासी नेता म्हटले की ब्राम्हणच. जातीव्यवस्थेमूळे नेतृत्व गुण विकसीत न झाल्यामुळे राजकीय क्षेत्रातही जातीव्यस्थेचे टेंगूळ आपल्याला दिसते.

                 राजकीय कारभारासाठी पात्र नसलेला, समाजव्यवस्थेची काहीही जानीव नसलेला राजकारण्यांचा पोरगा वंशपरंपरेने देश चालवण्यासाठीच्या लोकशाहीच्या मोठमोठ्या पदांवर जेव्हा आरूढ होतो तेव्हा राजकीय व्यवस्थेला , समस्त देशाला टेंगूळ आलेले आहे असे समजावे. किंवा पक्षाच्या मुख्य पदावर उच्चजातीय आणि वेगवेगळ्या जातीतून आलेले मात्र त्या जातीच्या सेलवर नियुक्त करणे हे त्या अल्पसंख्य जातीला गुणवान न मानण्याचा प्रकार आहे. अल्पसंख्यांक कितीही गुणवान असला तरी तो एका सेलमधे बंदिस्त, हे विकृतीचे टेंगूळ आहे. 

कला साहित्यात : 

                 साहित्यातील विकृत मांडणी , द्वेषजनक मांडणी , तुमचे तसे तर आमचे असे ही मांडणी प्रगल्भता न आल्याचे लक्षणे आहेत. हेच आनावश्यक टेंगूळ साहित्यातही जागोजागी पहायला मिळेल. 

                 पाश्चिमात्य इंग्रजी चित्रपटे , जशाला तसे कॉपी करणे तिकडील गाणे कॉपी करणे , इंग्रजी नाटके चोरुन कांदबऱ्या आणि साहित्य लिहीने, हे कला साहित्यातील टेंगूळ आहे. 
पुर्वी ग्रामीण भागात यात्रेत चित्रपट आल्यानंतर बाहेरील पोस्टरवर आनेक चित्रपटातील पोस्टरचे तुकडे, स्टिकर एकत्र चिकटून एक मोठे पोस्टर तयार केले जायचे . पोस्टर पाहून वाटायचे एवढे भरपूर हिरो या पिक्चर मधे आहेत.खुप फायटिंग दिसतेय.पिक्चर बघून आल्यानंतर पोस्टरवरला एकही सिन त्यात नसल्याचे लक्षात येते.लोकमन ताब्यात घेनारी कलाकृती बाजारात न आल्याने , उस्फूर्त पब्लिक पिक्चरसाठी मिळत नसल्यामुळे , लोक बळजबरीने आपल्याकडे वळवण्यासाठी बनावट पोस्टर वापरून चित्रपट चालवला जाणे टेंगूळच आहे.

 गावगाड्यात ? 

              मुलगी डॉक्टर झाली. तिला जातीव्यवस्थेतीलच स्थळ आणि ते ही पारंपरिक पध्दतीने शोधायची सुरुवात झाली.मग त्या मुलीला गावातील फोटो स्टुडिओवर घरातील कर्तीधर्ती महिला सोबत पाठवून साडी नेसलेल्या स्थितला फोटो काढून आनायला लावला आणि मग बायॉडाटा आणि फोटो पुढील पार्टीकडे पाठवला गेला. 

             ती मुलगी डॉक्टर होइपर्यंत मुक्त स्वतंत्र वागली नसेल का मग  गावात वागताना एवढे बंधणे का ?  स्थळ दाखवताना साडीवरलाच फोटो का म्हणून ? ती डॉक्टर होऊन घरी येइपर्यंत साडीतच वावरली असेल का ?  शिवाय क्रॉस हायब्रडायझेशन , उत्पादन वाढीसाठी केले जानारे कलम प्रकार माहिती असलेल्या डॉक्टरिनबाईसाठी जातीतलाच आणि त्यातल्या त्यात पोटजातीतलाच मुलगा शोधने हे मोठे टेंगूळच आहे. हुंडापध्दती सुद्धा टेंगूळ आहे. 

              आशापध्दतीने भांडवलशाही, साम्राज्यशाही दाराशी उभी आहे. आणि येथे मात्र व्यापक समाजमन विकसीत झालेले नाही. सार्वजनिक समस्येसाठी लोक रस्त्यावर येत नाहीत. प्रत्येकजन व्यक्तिगत विचार करणारा असल्यामुळे , मला काय त्याचे घेने का देने हा विकृत विचार नुकसानदायक ठरलेला आहे. पिकविम्याची समस्या , शेतकरी विरोधी तिन कृषीकायदे , शेतमालाला भाव नसणे यातून शेतकरी इतका रसातळाला जावुनही तो तो एकत्र न येण्याचे कारण म्हणजे त्याच्या मनाची शेतकरी म्हणून सामुदायिक जडणघडण झालेली नाही. तो जातीगतच व्यक्तिगत महत्वाकांक्षीच राहिलेला आहे. 

                  भटके विमुक्त , आदिवासी जमाती आणि माजी अस्पृश्य जातीतही व्यापकतेचा , सर्वसमावेशकतेचा आभाव आहेच. परंतू शेतकरी जातींपेक्षा जरा कमी. हे विकृतीचे टेंगूळ जात्यंत करुन समाजव्यवस्थेचा जागोजागी आणि सर्वत्र विकास केल्यानंतरच जाइल. 

नितीन सावंत परभणी 
9970744142 
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️

Monday, 12 July 2021

ll परात्मतेचा परमोत्कर्ष ll

ll परात्मतेचा परमोत्कर्ष ll


                 नितीन सावंत , परभणी

                 9970744142

               वयाच्या पंचवीसाव्या वर्षी कोसला लिहून नेमाडेंनी आर्थिक सर्वहरा वर्गाची अर्थात शेतकरी मध्यम जातींची परात्मता मांडायला सुरुवात केली. पुढे त्यांनी झुल, हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ, बिढार, जरिला या आपल्या साहित्याविष्कारातून ही परात्मता अफलातून रेखाटली आहे. या नेमाडेंच्या समग्र साहित्याची नस पकडली ती कॉ शरद पाटलांनी *परात्मतेचा परमोत्कर्ष* या एकाच विधानात.

                 याबद्दल कॉ.राजकुमार घोगरे म्हणतात " परात्मभाव शेतकरी वर्गातील मध्यम जातींच्या कोषातील घुसमटीचा अविष्कार आहे. नेमाडेंच्या अभिजात कादंबऱ्यातून तो ज्या पध्दतीने चितारला गेला तो थोरच आहे. क्रांत्योत्सूक काॅ. शरद पाटील, जात्यंतक तत्वज्ञ, ते न टिपतील तर नवलच झाले असते. आपण तर काॅ. शरद पाटलांच्या जात्यंतक तत्वज्ञानाचे वारसदार. आपण आपल्या प्रबोधनाची मुख्य धारा या शेतकरी समुहातील मध्यम जातींच्या परात्मतेला बनवली, हा प्रयास आर्थिक सर्वहारांच्या सामाजिक सर्वहारा जातीसमुहाशी 'ग्रँड युनियन' बनन्याकडे आपल्याला घेउन जाईल.हे ग्रँड युनियन बनवण्याचे महान कार्य भारताच्या अपूर्ण क्रांतीचा न टाळता येणारा टप्पा आहे."

                    शरद पाटील यांच्या मांडणीला पुढे नेताना कॉ घोगरे शेतकरी मध्यम जातींच्या या परात्मभावाला जाणून घ्यायला शिकवतात. वर्णजातीव्यवस्थेत परार्थीकरण तर भांडवलशाहीत परात्मीकरण. आणि ह्या परात्मीकरणाचा सर्वात मोठा बळी पडलेला वर्ग म्हणजे शेतकरी मध्यम जाती होत. त्यांच्या भावभावनांचे तंतोतंत चित्रण नेमाडे या व्यक्तिने प्रथमच न संकोचता, तथा हाथ आखडता न घेता, मुक्तपणे ही मांडणी केलेली आहे. 

                      परात्मतेबद्दल राम बापट यांनी संपादित केलेल्या ग्रंथात 'परात्मभाव' या प्रकरणात संजय पळशीकर भांडवलशाहीत झालेले बदल मांडताना म्हणतात " १) माणूस निसर्गापासून दुरावला आहे. २) माणूस स्वताला पारखा झाला आहे. ३) माणूस त्याचे वैशिष्ट्य गमावून बसला आहे.४)माणूस इतर माणसांपासून तुटला आहे. " बापट म्हणतात त्याप्रमाणे परात्मभावाची हिच प्राथमिक लक्षणे आहेत. 

            कोसलाच्या समिक्षेत कॉ शरद पाटील म्हणतात *कोसला म्हणजे सुरवंटाचा कोष.पांडुरंग सांगवीकरला वर्गीय- जातीय समाज कोषातच मारतो. त्याच्या मध्यम जातीयतेमुळे तो जातीविद्रोहाचे फुलपाखरू बनून बाहेर पडु शकत नाही. देवाचे अन्न सर्वत्र पसरलेले आहे. पण तो प्रेत बनल्याने त्याला ते खाता येत नाही*

            भालचंद्र नेमाडे , रा.ची. ढेरे, कॉ शरद पाटील सोडता बाकी मध्यम जातवर्गीय साहित्यीकांचे साहित्य सुद्धा परात्मभाव निर्माण करते. एकांगीपणा आनते. त्याला ते गोंडस शब्दात निकोप जीवनशैली वगैरे म्हणतात. असल्या निकोप जीवनशैलीवाल्या साहित्तीकांचे साहित्य वाचून विद्रोही बंड तर होऊ शकत नाही उलट वाचक स्वार्थी, स्वकेंद्री बनतात. म्हणून राजकुमार घोगरे म्हणतात की शेवटी शरद पाटील म्हणायचे नेमाडेंना जपा. त्यांना डिवचू नका. त्यांची साहित्याची पुढची मांडणी त्यांना करु द्या. नेमाडे,ढेरे शपा एकाच काळात एकमेकांना न भेटलेले तिन महारथी आहेत.

           कोसला या शब्दाचे यथोचित वर्णन करुन शरद पाटील नेमाडेंच्या मांडणीचा केंद्रबिंदू पकडतात. परात्मता म्हणजे तुटलेपणा, व्यवस्थेपासुन स्वताचे झालेले अलगीकरण. ही परात्मता अलीकडल्या काळात शेतकरी जातीमंध्ये परमोत्कर्षाला पोहंचली आहे. मावळतीच्या सरंजामशाहीतून शेतकरी जातींच्या नव्या पिढ्या जेव्हा महाकाय भांडवलशाहीत प्रवेश करतात आणि ते नव्या जगाला जुळवून घेता घेताच हा परात्मतेचा संसर्ग त्यांना होतो. गावगाडा आणि त्यातील चिवचिवाट संपत जावून भांडवली शिक्षण व्यवस्थेतून शिकुन आलेल्या नव्या पिढ्या गावोगाव ओट्यावर बसुन एकलकोंडेपणाचा, तुटलेपणाचा रोग गावाला लावत आहेत. मग नेमाडे वेगळं काय मांडतात ? हेच तर पारंपरिक साहित्यप्रकाराला धक्के देत काहिच वेगळे न मांडता, आहे तेच मांडणे हे नेमाडेंचे वेगळेपण आहे. 

            कोसलातला पांडुरंग सांगवीकर परात्मता आल्यावर शेवटी लग्नाच्या बोहल्यावर उभे रहायला तयार तरी होतो. तो गावी जावून रहातो तरी. पण आज मात्र शेतकरी जातीतील तरुणांना विचारा काय करतोस सध्या ? तरुणांची उत्तरे  mpcs , upcs ची तयारी करतो किंवा स्पर्धा परिक्षेची तयारी करतो अशी उत्तरे असतात. ग्र्याज्युअशन करुन परात्मता आलेले बहुतांश तरुण पुणे , औरंगाबादला तयारीच्या नावे वयाची बत्तीशी ओलांडे पर्यंत एकात्म एकलकोंडे जीवन जगत असतात. गावी जावे तर ग्रामीण जीवन, ती संस्कृती आपल्याला स्विकारत नाही. त्यात आपण संस्कार झाल्यामूळे फीट होत नाही. हे परात्म जीवन त्याला नको झाले आहे. म्हणून शहरातच रहाणे पसंत करुन तो कुटुंब, लग्न याला पिडा मानायला लागतो. हे पीडन काळीज तोडून टाकणारे आहे. त्याची एक स्वतंत्र व्यथा आहे. शोषितांच्या-पिडीतांच्या शोषणपीडनाच्या पातळीवर ती सामाजिक सर्वहाराची १ ते१० मध्ये १० असेल तर आर्थिक सर्वहाराची ती ५ तरी असेल का नाही. सामाजिक चळवळींना ही व्यथा समजून घ्यावी लागेल.

          दुसरी परात्मता आलीय ती मध्यमवर्गीय टामटुम शहरी वर्गात. त्यांनी व्यवस्थेची झुल पांघरली आहे. नेमाडेंच्या झुल मधे आहेच की हे. झुल म्हणजे तरी काय ? बैलाच्या पाठीवर झुल टाकून त्याला कधीतरी नावाजायचे , कौतुक करायचे आणि मग वर्षभर तो आहे तसे चालु ठेवनार. कोसायचे नाही , कुथायचे नाही, आहे ते गोड मानुन बैलासारखे राबायचे. हे  विद्रोह मारण्याचे काम शिक्षणव्यवस्थेतूनच होत आले आहे. याबद्दल नेमाडे झुलमधे ऐके ठिकाणी म्हणतात *हि शिक्षणपद्धती म्हणजे देशातल्या तरण्याबांड पोरांना हिजडे बैल बनवनारी धुर्त युक्ती आहे* आणि अगदीच खरे आहे हे. म्हणून प्राध्यापक हे झुल पांघरलेले ,आंडे ठेचलेले बैलच आहेत. त्यांच्या आंगावर टाकलेली सत्काराची शाल, पारितोषिके ही झुलच आहे. नक्षीदार झुल .

            आदिवासी,दलीत जातीमध्ये गावोगाव ही परात्मता आलेली नाही. या जातवर्गातील ज्यांचे शहरीकरण, ब्राम्हणीकरण झालेले आहे, ते मात्र परात्मच जीवन, तुटलेले जीवन जगतात.

           मी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील गिरणा धरणाच्या परिसरात व्याख्यानाला गेलो होतो. तिथे मुक्कामी थांबलो होतो.सकाळी उठल्यावर आयोजकांच्या आंगणात बसलो असता,समोरून एक अहिराणी भाषा बोलत एक व्यक्ती आली.हतात रिकामी पाण्याची बाटली होती.बोलण्याच्या हावभावरुन कळले की त्यांना पेट्रोल हवे आहे.गाडी बंद पडली आहे. मी ज्यांच्याकडे थांबलो ते राजेंद्र पगार यांनी आपल्या गाडितील पेट्रोल काढून त्यांना दिले.ते व्यक्ती  निघून गेले.त्यांनी मदत म्हणून मोबदला न घेता स्वताच्या गाडीतले पेट्रोल काढून समोरच्याला दिले,त्यांना स्वताच्या गाडित पेट्रोल टाकायचे झाल्यास तालुक्याला जावे लागते. या न-तूटलेल्या, अ-परात्मभावात मदतीची, सहकार्याची भावना आणि उत्साह असतो. आता मी हा प्रोग्राम करुन आल्यावर दुसऱ्याच दिवसी आमच्या नातेवाईकांना भेटायला गेलो.तिथे मधल्या खोलीत स्कुटी झाकून टाकली होती. कारण स्कुटीवाल्या ताईंची डिलीव्हरी झाली होती. घरात इतर दोन- तीन जन स्कुटी वापरु शकत असूनही कौटुंबिक तूटलेपणातून, या परात्मभावातून ती स्कुटी झाकून टाकून प्याक करुन टाकली होती. भांडवलीकरणाच्या आघाताने निर्माण नव्या जात-वर्ग  झालेल्या समाजात परात्मभाव येतो आणि तिथे प्रत्येक गोष्टीत नफ्यातोट्याचा व्यवहार असतो. त्यामूळे, इतरांना मदत, सहानुभूती, सहकार्य या तर दुरच्या गोस्टी. 

             आदिवासी भागात मदतीसाठी सहज पुढाकार घेतला जातो. येथे मात्र शहरीकरण झालेल्यामध्ये कुटुंबात सुद्धा मदतीची भावना राहिली नाही. हे भयावह वास्तव आहे.

             एकाच कुटुंबात शिकलेले शहरी भाऊ -भाऊजई आणि शेती करणारे गावाकडे रहानारे शेतकरी जोडपे. ही अ-परात्म व परात्मभावाची उदाहरणे आहेत. जीवजाईपर्यंत राबनार्या गावाकडच्या जावू बाईं आणि त्यांचा शेतकरी नवरा  शहरात गेल्यानंतर शहरी भाऊ आणि शहरी जावूबाई ह्या ग्रामीण भागातून आलेल्या त्या जोडप्याला कशा वागवतात, तर अगदीच चहा पोहे एवढ्यावर भागवून सर्व मोजमापात असते. या उलट त्याच शहरी जाउबाई आणि त्यांचे शिकलेले मिस्टर गावाकडे गेल्यावर त्यांना गावकडील भाऊ भाऊजाई किती आनंदाने रोजच्यापेक्षा वेगळे स्पेशल जेवन करुन घालतात. ग्रामीण जोडपे उत्साही असते. शहरी जाऊबाई गावाकडे आल्यानंतर स्वयंपाकात मदतही करत नाहीत. शहरी जाऊबाई गावाकडे गेल्यानंतर त्या फक्त मिरवतात कुटूंबातील कामे , चुलीची कामे त्यांना नसतात. ही एकाच कुटूंबातील शहरी ग्रामीण परात्मता - अपरात्मतेची उदाहरणे आहेत. 

           ही आर्थिक सर्वहारा जाती अंतर्गत परात्मता कोण मांडनार की नाही? त्याशिवाय जात्यंताची कोंडी फुटू शकत नाही.

           कोसलाच्या समिक्षेत शरद पाटील म्हणतात "मध्यमजातीयांपाशी विद्रोहाच्या अंगाराएवजी राहिली आहे परात्मतेची राख ! निमभांडवली विकासात कुटुंबबंध विघटीत झाले असून मध्यम जातींचे प्रस्थापित हे जातीवादाचा उपयोग केवळ स्वगोतावळ्याच्या स्वार्थासाठी करीत आहेत. अशा अनंत व असहाय पोकळीत पांडुरंग सांगवीकर व चांगदेव पाटलांसारखे मध्यम जातीय उभे असल्याने त्यांच्या परात्मतेचा परमोत्कर्ष झालेला आहे.

           पुढे शरद पाटील म्हणतात,"मध्यम जातीयांच्या या षंढ परात्मतेचा अभूतपूर्व व अनन्य साहित्यिक आविष्कार नेमाडेंनी केला आहे. त्यांचा प्रतिनायक (antihero) वर्गजाती व्यवस्थांतक पॉझिटिव्ह हिरोमध्ये परकायाप्रवेश करण्यासाठी भटकतो आहे भूत बनून."

           हा शपांना अपेक्षीत असलेला वर्गजातीव्यस्थांतक पॉझिटिव्ह हिरो आम्ही घडवनार सौत्रांतिक मार्क्सवाद घेवून मानव मुक्ती मिशनच्या माध्यमातून. 

आणि तुम्ही नेमके नेमाडेलाच वगळायला निघालात. मग या मराठी साहित्यविश्वात  सामाजिक व आर्थिक सर्वहाराच्या ग्रँड युनियन बनविण्यासाठी नेमके काय उरेल तिथे ? तुमच्या नकारात्मक शेरेबाजीच्या परात्मतेची राख, किती जनांना पुसणार ही नकारात्मकतेची राख ? 

             लक्षात घ्या. कोणतीही एक जात जातीअंत करुन जातीव्यवस्थेतून सुटका करुन घेऊ शकत नाही. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा Castes अनेकवचनात मांडण्याचा प्रयत्न आपण नकारात्मकतेने दूर्लक्षिला नाही पाहिजे. या! जरा मैदानावर, शेतकरी मध्यम जातीयांना फुलपाखरू बनायला मदत करु. नवनिर्मीतीत आनंद आहे. मुक्तीचा मार्ग आहे.


नितीन सावंत परभणी.                                             9970744142

Saturday, 10 July 2021

जागोजागी आबा व्हा ! सांप्रदाय वाचवा !!

 जागोजागी आबा व्हा ! सांप्रदाय वाचवा !! 

बिड जिल्ह्यातील एका रोडवरल्या गावी रात्री नामांकित हभपचे किर्तन संपन्न झाले.रात्रीच्या जवळपास १०:३० वजाता हभपने सोबत आनलेला चेला माइकवर म्हनाला किर्तनाची सेव्हा संपन्न झालीय महाराज लगेच पुढे प्रस्थान करणार आहेत.कुनीही दर्शन घेतल्याशिवाय जावु नये.किर्तनकाराला बाजुच्या उंच ओट्यावर खुर्ची टाकुन बसवण्यात आले.आणि बघता बघता किर्तनकाराच्या दर्शनाला रांग लागली.लोक ओट्याच्या खालुन जायचे आणि उंचावर असणाऱ्या महाराजाच्या पायला डोके लावुन पुढे निघायचे.महाराजाच्या चेल्यांनी सुरुवातीला दर्शन घेवून महाराजाच्या पुढ्यात शंभर पाचशेच्या नोटा टाकल्या.नंतर जो तो दर्शन घेवून पैसे टाकून पुढे सरकायला लागला.रोडवले गाव असल्याने हॉटेले किराणा दुकाने वगैरे असा चालु घडीचा नगदी व्यावहार करणारे गावकरी यांनी महाराजाच्या पुढ्यात गुढघ्या एवढा नोटांचा ढिगारा बघता बघता उंचावर नेला. 
हे चित्र दुर बसलेले गावातील आबा नावाचे ग्रहस्थ बघत होते.डोक्याला हात लावत विठ्ठला काय पहातोय रे मी म्हनत होते.तेवढ्यात एक म्हातारी महिला आबा जवळ आली आणि म्हणाली "आबा पन्नास रुपये द्या बर तोपर्यंत ? घरी गेल्यानंतर मी तुम्हाला देते."
आबा म्हनाले " कशासाठी ? " 
म्हतारी म्हनाली " रिकाम्या हताने महाराजाचे दर्शन कसे घेवू , महाराजांच्या पुढे पन्नास रुपये तरी टाकते ."
आबा जाग्यावरले ताडकन उठले 
आणि समोरच्या त्या किर्तनकाराला आणि जमावला ऐकू जाईल आशा मोठ्या आवाजात त्या म्हातारीला म्हनाले 
" हे माझे खेटर घे आणि त्या महाराजाच्या दोन थोबाडीत मार , मागून दुसरे खेटर मारायला मी येतो " 
महाराजाच्या चेल्याने धोतराच्या घोळात लगेच जमलेल्या नोटा भरल्या गाडी काढली आणि किर्तनासाठी आलेली ही हभप मंडळी बघता बघता पसार झाली.
आबांनी गावतल्या लोकांच्या समोर 
संत एकनाथ महाराजांचा अभंग म्हटला

प्रत्यक्ष ती कथा जगासी माऊली l 
विक्रय करिती वाहिली दोषी देखा ll
आपुलीची माता आपण भोगीता l 
प्रायश्चित्त सर्वथा काय द्यावे ll 

गावातील लोक खाली माना घालून निघून गेले ...
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ 
ह.भ.प.धर्मकीर्ती महाराज परभणीकर

मसनात गवऱ्या गेल्यानंतर आलेले शाहानपण काय कामाचे ?

 मसनात गवऱ्या गेल्यानंतर आलेले शाहानपण काय कामाचे ? 

मी लहानग्यांपासुन ते अगदी ९२ वर्षाच्या वृद्धांसोबत पुरोगामी चळवळीच्या अंगाने वावरत आलो  आहे.आशांसोबत काम करणे असो नाहीत तर वैचारिक चर्चा.फिल्डवर्क असो नाहीतर एखादी मिटिंग,सर्वांसोबत वावरण्याचा योग माझ्या आयुष्यात येवुन गेला आहे.

महत्वाचा विषय माझ्यासाठी वृद्ध वयस्क वैचारिक व्यक्तिंचा आहे.मी जेवढ्या वृद्ध वयस्क व्यक्तिंसोबत वावरलो त्यांची सर्वांची एक आग्रही भूमिका " कर्मठता " ही राहिलेली आहे.
ते इतक्या कर्मठतेने बोलतात की त्यांना वाटते लवकरात लवकर लोक बदलावेत,जग बदलावे क्रांती अगदी आपल्या डोळ्यासमोरच व्हावी.एक पुरोगामी वैचारिक ग्रहस्थ खुप वृध्द होते. ते अंथरुणाला खिळून वारले.त्यांचा शेवटपर्यंत अत्यंत कर्मठपणात वावर राहिला.टोकाच्या भूमिका घेत ते मेले.जाताना एकही कार्यकर्ता घडवून गेले नाहीत.आज त्यांचा एकही आनुयाई नाही.
आत्ता लॉकडाऊनच्या आधी एका ६५ वर्षाच्या वृद्ध पुरोगामी व्यक्तींनी, एका ब्राम्हणी छावणीच्या भटाळलेल्या नामांकित चोंग्याला  विडिओ बनवून शिव्या घातल्या.त्याच्या महाराष्ट्रभरातील चेल्यांनी कॉल करुन शिव्यांची परतफेड करायला सुरुवात केली.धमक्या सुरु केल्या.या आज्जोबांचे कॉल माझ्या मोबाईलवर डायव्हर्ट करुन सर्व प्रकरण युक्तिवाद करुन माफी न मागता मी निस्तरले.
नंतर या मार्गाने लोक जोडले जानार नाहीत,उलट तुम्ही नुकसान करत आहात असे म्हणून अज्जोबांना रामराम केला.

आत्ता एक वयस्क पुरोगामी नकारात्मक नास्तिक ग्रहस्थ संपर्कात आहेत. ते एका छोट्याशा खेड्यात रहातात.पुर्वी ते औरंगाबादला नोकरी करायचे.एक दोन महिण्याला आमची भेट होते, चर्चा होतात.त्यांच्या आजूबाजूच्या गावकीतल्या लोकांच्यात त्यांच्या मांडणीबद्दल नकारात्मक भावना आहेत.मी मात्र गेली तिनचार वर्षे झाले त्यांना सांगत आहे, इतकी टोकाची मांडणी करु नका,या टोकाच्या मार्गाने लोक जवळ सुद्धा येत नाहीत.सोडा हा हेका. महाशय ऐकायला तयार नाहीत. समाज किती बावळट आहे,मुर्ख आहे, नालायक आहे, हे ते दिवसरात्र सिद्ध करत असतात.
पण उपयोग काय ?

आशा लोकांना माझे काही प्रश्न आहेत.
आख्खे आयुष्यभर काय करत होतात ? किती लोक जोडले , किती आनुयाई तयार केले ? तुम्ही बदल केलेले कार्यक्षेत्र कुठेय ? ही वेगाने प्रबोधनाची हाव म्हातारपनी उपयोगात आणून काय फायदा ?
आत्ता मसनवाट्यात गवऱ्या गेल्यानंतर काय फायदा ? 
तुम्हाला लोकांचा मुक्तिदाता बनायचे आहे की दुश्मन ?

देवपुजा करत असताना पाण्यात टाकलेले देव तसेच बुडत ठेवून आमची आई , माय , आज्जी आंगणात आलेल्याला वाढायला जाते.तिला इतकेही गबाळी समजु नका.
तुकोबारायांचा अभंगच आहे तसा ...
करिता देवार्चन l घरी आले संतजन ll
देव सारावे परत्वे l संत पुजावे आरते ll 

यडेचोट तुम्ही आहात , प्रबोधनाची टर्मिनोलॉजी तुम्हाला कळली नाही.ग्रामसंस्कृती यडी नाही ती अनुभवावरून चालते.तुम्ही अनुभवात शुन्य पुस्तकी कोटेशन तोंडावर फेकुन मारनारे.. 

नितीन सावंत परभणी 
9970744142

Thursday, 8 July 2021

गुरु शिष्य परंपरा..

 वारकरी सांप्रदायाला गुरु शिष्यपरंपरा मान्य आहे.एवढेच काय ही परंपरा महानुभव व लिंगायत धर्मातही आहे.या तिनही सांप्रदायात गुरु शिष्यपरंपरा आली ती नाथ सांप्रदायातून.

आणि या सर्व पंथांच्या गुरुशिष्यपरंपरेचा उदय होतो तो श्रीपर्वतावरुन.म्हणजेच श्रीशैल्यमवरुन.(पहा श्रीपर्वताच्या छायेत - रा.ची.ढेरे ) 

आमच्या वारकरी परंपरेत गळ्यात जी तुळशीची माळ असते त्या माळेच्या दोनही टोकांना जोडनारा गुरुमणीच असतो. म्हणजे माळीतील एकशे सात मणी शिष्य आणि एकशे आठावा मणी गुरु.

गुरु शिष्यपरंपरा काही वाईट नाही.काही ठिकाणी,काही काळ त्या नावे चाललेला आनाचार मात्र निषिद्ध मानला पाहिजे.परंतू आपल्याला काही गोस्टी वाचून , बघून , ऐकून समजत नसतील तर त्यासाठी सहवासात जावे लागते . आचरणाने ते शिकावे लागते.हे सर्व कुणाचे तरी मार्गदर्शन घेवूनच शिकावे लागते .आर्थात गुरु करावा लागतो. 

नेहमीपेक्षा स्वभावात बदल झाला की 

लोक म्हणतात याला कोणीतरी गुरु भेटलाय. 

गुरु म्हणजे तरी काय ??

जिथून प्रेरणा मिळते,उर्जा मिळते तो गुरु.ज्याच्याकडुन काहीतरी शिकायला मिळते तो गुरु.

वारकरी परंपरेत संत तुकोबाराय यांनी आनाचारी साधुंच्यावर टिका केलेली आहे.त्यासाठी त्यांच्या गुरु शिष्यांना कुत्र्याची उपमा दिली आहे.म्हणून काही त्यांना समग्र गुरुशिष्यपरंपरा अमान्य होती असे होत नाही.

ते म्हणतात 
नामदेवे केले स्वप्नामाजी जागे l
सवे पांडुरंग येवूनिया ll

ते संत नामदेवांची प्रेरणा घेतात.त्यांचा आदेश शिरसवंद्य मानतात. 

तुकोबारायांना गुरुशिष्य परंपरा मान्य होती.वरिल संत नामदेव यांच्याच उल्लेखिलेल्या अभंगाला अनुसरून  ते म्हणतात...

गुरुकृपे मज बोलविले देवे l होइल हे घ्यावे हित काही ll 

त्यांना गुरुशिष्य परंपरेबाहेर काढून ,तुकोबाराय एकटे पाडून ते काही स्वतंत्र उंचीवर जानार नाहीत.परंपरेची उंचीच त्यांना मोठेपण देते.संत तुकोबाराय वारकरी परंपरेने आधिक उंचीवर जातात. 

आजही गुरुशिष्य परंपरेचे अवशेष खेड्यात आहेत. खेड्यातील सार्वजनिक जेवनाची पंगत गुरुनी (गोसावी) आगारी भरल्याशिवाय सुरुच होत नाही.गुरु पहिला घास घेनार मग सर्वजन.

कबिर आणि सर्व सुफी संतांचे गुरु शिष्यपरंपरेतील खुप मजेशीर किस्से आहेत.एकदा दक्षिण भारतातील एका मठातिल गुरुने उत्तर भारतात निरोप पाठवला आमच्या आश्रमात एक शिष्य पाठवा.

त्यांनी १०० पाठवले.दोन तिन  महिण्यानी निरोप आला. तुमचा पाठवलेला एक शिष्य सुखरुप पोहंचला.

पाठवनार्या आश्रमातील इतर शिष्य म्हनाले.१ मागितला शंभर का पाठवले ? आणि १०० पाठवले एकच कसा पोहंचला ? 
मठाचे गुरु म्हनाले जगातील लोभ मोह विषय लालसा यात काहीजन अडकतील.यातून तरुन निघेल तो खरा शिष्य.तो खरा पोहंचला आश्रमात 
बाकी ९९ रस्त्यात मोह मायात अटकले. 

म्हणून कोणाकडून काही शिकायला मिळत असेल तर ते काही वाइट नव्हे.

चांगल्या माणसाचे अंगण झाडीन आसे तुकोबाराय म्हनालेत.


नितीन सावंत परभणी

म्हातारपणी व्यक्त करावे लागणारे काही प्रश्चाताप

म्हातारपणी व्यक्त करावे लागणारे काही प्रश्चाताप आजच व्यक्त करुयात.स्वताला काही प्रश्न विचारुया.

१) आपल्याला हे जीवन अत्यंत #योगायोगाने मिळाले होते ही संधी आपल्याला परत कधीच मिळनार नाही.प्रश्न आहे काय केले आपन या अमूल्य जीवनाचे ? 

२) आपन #जीवनात परिपूर्ण फुललात का ? बहरलात का ? आपन कमावलेल्या ज्ञानाचा आजूबाजूच्याना काही फायदा झाला का ? समाजाला देशाला तुम्ही असण्याचा काही फायदा झाला का ? बालपण ते वृध्दत्व हा प्रवास कसा केलात ? 

३) तुम्ही जीवनात जे कमावलं ते लोकांत वाटलं का ? शेअर केलं का ? कधी लोकांत माणसांत मिसळलात का ? 

४) तुम्ही कधी स्वसुखापलिकडे दुसऱ्याच्या सुखाचा आणि स्वदुखापलीकडे दुसऱ्याच्या दुखाचा विचार केला आहे का ? 

५) आयुष्यात माणसे जोडली की माया ? रस्त्यात फुले टाकली काटे ? प्रबोधन केले की दंगली ? 

६) आपल्यातही काही चांगले गुण आहेत याची जानीव तुम्हाला होती का ? जीभ बोलण्यासाठी होती आणि आयुष्य जगण्यासाठी ती जीभ मौनात आणि आयुष्य कोषात तर नाही जगलात ना ? 

७) परंपरागत तेच तेच बोरींग जगलात की खुलके चाकोरी मोडुन मुक्त जगलात ? 

८) चांगल्या संध्या उचलल्या का ? फायदा घेतला का ? का घाबरलात रिस्क घ्यायला ? 

९)मदत,सहकार्य,शेजारधर्म,चौकशी,विचारपूस,माणुसकी या शब्दांना जगलात का ? ही शब्दे माहिती आहेत का ? 

१०) घरात कुत्रे नसतानाही गेटवर मात्र *कुत्र्यापासुन सावधान* ही पाटी लावलीत का ? कधी कुनाला कपभर चहा पाजलात का ? 

हे काहीही केले नसेल तर जीवन व्यर्थ गेले .. 
वेळ गेलेली नाही नव्याने सुरुवात करा ...

नितीन सावंत परभणी
9970744142
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦

Wednesday, 7 July 2021

बंडखोर नामदेव ...

 बंडखोर नामदेव ...
 

तुम्हीच बंडखोरी करुन उभे केले होते संतांचे आंदोलन.तुम्हीच होतात भागवत धर्माचे संस्थापक.तुम्हीच तर म्हनाला होतात "आम्हा सापडले वर्म l करु भागवत धर्म ll "
तुमचा विना भारतभर बोलला.तुमचा टाळ त्रैलोक्यात निनादला.तुमच्या किर्तनात तथागत विठ्ठल दंग झाला.तुमच्या किर्तनरुपी रात्रीच्या शाळेमुळे लोकप्रबोधनाची आरोळी सर्वत्र घुमली.प्रत्येक जातिजमातीचा शब्दशस्त्रे घेवून समाजात क्रांतीची बिजे पेरायला लागला.
तुम्हीच मध्ययुगीन भारताच्या क्रांतीचे पथदर्शक ठरलात.डोइचा पदर खांद्यावर घेवून लोकलाज सोडून प्रबोधनासाठी भरबाजारात येण्याची भाषा करणारी जना तुमचीच  शिष्या.मंगळवेढ्याच्या वेशीत हाडांच्या ढिगार्यात तळमळणारा तुमचा सखा जिवलग चोखोबा.चोखोबा  धन्य झाला पंढरपुरात विठठलचरणी केवळ तुमच्याच मुळे.

पन आज रस्त्याने माऊली माऊली म्हनून जातिव्यवस्थेला सुरुंग लावनारे तुमचे वारकरी घरी ,गावी अस्प्रश्यता पाळतात.चोखोबांच्या समाधीवर डोके टेकवणारे वारकरी गावी अस्प्रश्यता पाळतात.हल्लीचा विना आता पहिल्यासारखा बोलत नाही.किलोकिलोचे टाळ वाजवून वाजवून छटाकावर आले.आणि टाळ वाजवणार्याने मनगटे झिजून गेली.ओरडून ओरडून घसा बसला.पन विठ्ठल काही किर्तनात नाचेना.हा काही आमुचा धंदा नव्हे किंवा हे काही पोटासाठी नव्हे आसे म्हननार्या किर्तनकारांच्या पोटाला रुमाल बांधूनही त्या  रुमालावर पोट लोंबायला लागले.देती घेती ते नरका जाती .आसे आसुनही किर्तनाची फिस तमाशापेक्षाही जास्त झाली.नामदेवा तुमचा वारकरी वारीकरी झाला.तुमचा वारकर्यांचा मेळा भरकटला...पुन्हा या. पुन्हा..एका नव्या रुपाने. नव्या पर्वाच्या सुरुवातीसाठी. नव्या क्रांतीसाठी.वैदिकांच्या व्यवस्थेला हादरा देण्यासाठी.संपुर्ण भारत नामामय करण्यासाठी..
नामदेवे रचिला पाया तुका झालाशी कळस...म्हणन्यासाठी..तुम्ही याच....

नितिन सावंत परभणी 
9970744142
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Friday, 2 July 2021

दास्यविमोचन विधी

दास्यविमोचन विधी - 

 वंशसमाजात कुलांच्या रचनेत कुलप्रमुख हा स्वतंत्र असे तर त्या कुलातील सर्वजन दास. म्हणजे सर्व निर्णय घेनाऱा कुलप्रमुख असे. सध्याला ग्रामीण भागात त्याला कारभारी म्हणतात. घरातील कारभारीच शेतीचे सर्व निर्णय घेतो. बाकी घरातील भाऊबंद फक्त राबतात. हे भाऊबंद स्वतंत्र नसतात. ते दासा सारखेच असतात. त्यांना सेवक म्हटले गेले आहे. त्यांचे कर्म सेवकत्व.

खेड्यामधे वेगळे निघताना प्रत्येक घरात मोठ्या मुलाकडे देवघर आणि आई-वडिल जातात. आणि तो नवा  कारभारी बनतो.

#कुलप्रमुख बनण्याची एक पध्दती असे.
कुलातील कुलप्रमुख मेल्यानंतर स्मशानभूमीत उत्तराधीकारी जो दास आहे, तो आपल्या खांद्यावर पाण्याने भरलेला माठ घेतो. त्या माठाला पाठीमागून छिद्र पाडले जाते. त्यातून जी पाण्याची धार लागते त्या धारेचे तो दास चितेला वेढे मारतो. नंतर मागे न पहाता ते गाडगे मागच्या मागे सोडुन दिले जाते. नंतर तो दास मनगट तोंडाला लावून बोंबलतो. पुढे तो कपड्यांसह आंघोळ करतो. नंतर डोक्यावरचे केसही काढून टाकले जातात. 

हा विधी दास्यातून मुक्त होनारा विधी आहे. दास्यविमोचन विधी. कुलप्रमुख गेल्यानंतर घरातील एक दास (मोठा मुलगा ) एवढे विधी करुन दास्यातून मुक्त होतो. आणि नवा कुलप्रमुख बनतो. जो स्वतंत्र असतो. म्हणूनच तो गाडगे फोडल्यानंतर कुनाला काही ऑब्जेक्शन आहे का हे विचारतो. आणि त्याच्या कारभारीपणाचा उद्घोष  मनगटाने बोंब मारत करतो. 

#दास्य_विमोचन विधीतून तो नवा कुलप्रमुख बनतो. त्याला मेलेल्या कुलप्रमुखाच्या ज्या जमीनीचा मालक आहे त्याचे उत्तराधिकारित्व मिळते.

आजही ग्रामीण भागात मृत व्यक्तीला पाणी पाजणाराला ही जमीन दिली जाते, त्यालाच उत्तराधिकारी मानले जाते. 

आपल्या विधीमधे आपला इतिहास वसलेला असतो. आजच्या काळाचे संदर्भ त्याला बदलून आपल्यापूढे विकृत स्वरूपात मांडतात. त्याच्या उकलण्याची योग्य मेथडाॅलाॅजी आपल्याकडे असेल तर अशा पद्धतीने कर्मकांड, विधीतूनही वारसाहक्काचा इतिहास आपल्याला प्राप्त होतो. हि अब्राम्हणी, बहूप्रवाही, विधायक ऐतिहासिक भौतिकवाद या अन्वेषणपद्धतीने प्राप्त झालेली उकल आहे, अंत्यविधीतील कर्मकांडाची.

नितीन सावंत परभणी
९९७०७४४१४२ 
दि.३ जुलै २०२०

♦️माहुर - दर्शन

 ♦️आईचे हृदय - माहुर 

       माहुर हे मनुष्यवस्तीखाली आलेले अत्यंत प्राचीन ठिकाण आहे.सपाट मैदानी प्रदेश हे पुर्वीला दलदलीखाली किंवा बहुतांश जलमय असताना,त्या काळात मनुष्य वस्ती ह्या उंचावर , डोंगर माथ्यावर झालेल्या आहेत.नाशिक जिल्ह्यातील वनी येथे सप्तशृंगीने सात डोंगररांगांच्या उंचभागावर शेती करून आपला गण जगवला होता.तुळजापूरही उंचावर आहे.तेथील तुळजा घाटाच्या खाली शेती करत असे.वस्ती मात्र घाटावर होती . 
आगदी त्याप्रमाणेच माहुर उंच डोंगरमाथ्यावर वसलेले सर्वात प्राचीन मनुष्यवस्तीचे ठिकाण आहे.सौंदत्तीची राज्ञी रेणुका आपल्या गणासह माहुर भागात येवून टेरेस फार्मिंग म्हणजे डोंगरावरची टप्याटप्याची शेती करुन आपला गण वाढवत होती.माहुर हा उंच डोंगर आणि त्यावर सपाट भूभाग असलेले ठिकाण आहे.खाली जवळच पैनगंगा वहाते.ही पैनगंगा याच डोंगर रांगांना धडकुन पात्र वळवून पुढे निघून गेलेली आहे.हा भाग कितीही जलमय असला तरी वर लोकजीवन सुरळीतपणे चालेल अशी नैसर्गिक व्यवस्था माहुरची आहे. माहुर हा शब्द मा उर असा बनला आहे.माउर म्हणजे आईचे हृदय.जिने आपल्याला जगवले वाढवले तिच्याप्रती उतराई म्हणून तिच्या वस्तीला माउर हे नाव तिच्या वंशजांनी दिलेले आहे.देवीचे भोपी हे मुख्य पुजारी तर गोंधळी हे प्रचारक मानले जातात. 
      माहुरच्या भूमीवर पुढील काळात अनेक स्थित्यंतरे झाली.अनेक राजवटीखालुन हा भूप्रदेश गेलेला आहे.व्यापाराचे , अनेक संस्कृतीचे हे केंद्र बनले होते.
   याव्यतिरिक्त माहूरवर मातृतिर्थ आर्थात रेणुकेची पुष्करणी देखील आहे.शिवाय येथे अनेक एतिहासीक संदर्भ असलेले ठिकाणे , वास्तू देखील आहेत.माहूरचा किल्ला गौंड राजापांसून ते नंतर देशमुख  घराण्यापर्यंत शौर्य पराक्रम गाजवत गडाचे सौंदर्य जपत होता.माहुरच्या अत्यंत पराक्रमी स्त्री असणाऱ्या रायबागण देशमुख यांच्यावर दत्ता जाधव यांची पीएचडी देखील आहे.त्यावर त्यांचे पुस्तकही आलेले आहे. 
************-**********************************

♦️पांडवलेणी नव्हे बुद्धलेणी 
      
         माहूर हे इतके मोठे सांस्कृतिक केंद्र होते की येथे पुढील काळात बोद्ध धम्मप्रचारक येवून राहिले होते. वावरले होते.किंवा या मार्गे व्यापर चालत होता.त्यामुळे याच माहुरच्या डोंगर कपारीत बुद्धलेणी आसल्याचे आपल्याला पहायला मिळते.माहुरमधेच शहराला लागून दोन किमी अंतरावर ही बुद्धलेणी आहे. ह्या बुद्धलेणीत बुद्धकालीन मुर्तीशास्त्रातील द्वारावरील मुर्ती आणि स्तूपाच्या आधारे स्पष्ट निर्देशित करता येते की ही लेणी बुद्धलेणीच होय.परंतू आलिकडील काळात या लेणीला शेंदूर फासुन मुळ वारस्यापासून लपवने चालू आहे.या लेनीचे नामकरणही पांडव लेणीच केले गेले आहे.पांडव लेणी हा शब्द पांडू लेणी या शब्दापासून वाढवत नेलेला आहे.पांडूलेणी म्हणजे प्राचीन लेणी.जसे पांडू लिपी म्हणजे प्राचीन लिपी होय.त्याचप्रमाणे पांडू ( प्राचीन ) या शब्दाला पांडवांशी जोडून ती लेणी ऐतिहासिक वारस्यापासून तोडली गेली आहे. ती पांडव लेनी नव्हे.म्हणून या लेणीला बुद्ध लेणीच संबोधून तिला तिचा पुर्वीचा दर्जा तिला मिळवून दिला पाहिजे.लेनीचे विकृतीकरण थांबवले पाहिजे. 
***************************************
♦️सोनपीर दर्गा - माहुर 

            सुफीं संतांना निसर्गरम्य ठिकाणे खुप आवडायची.सुफींचे सर्व दर्गे अत्यंत निसर्गरम्य ठिकाणीच आपल्याला पहायला मिळतील. हे दर्गे उंच डोंगरावर , डोंगर कपारीत , तळ्याच्या काठावर , दाट जंगलात , आशा ठिकाणीच आहेत. माहुर एकेकाळीचे जन्नतच.अत्यंत निसर्गरम्य ठिकाण.या माहूरच्या या निसर्गसौंदर्याने नटलेल्या भुमीवर सुफी संतांचे लक्ष न जाता राहिल तर आश्चर्यच.

           महुरच्या इतिहासात आधी मातृसत्ताक स्त्रीसत्ताक कालखंडात मनुष्यवस्ती वास्तव्यास आली.नंतर अनेकांना ही भुमी आपलीशी वाटाली.त्यात बोद्ध परंपरेने सुद्धा या भागावर आपली छाप टाकलेली होती. बोद्धांच्या नंतर पुढील काळात या भूमीवर सुफींनी प्रेम केले होते.

             अरबस्तानातून ख्वाजा नवाज शरिफ यांच्या सोबत आलेल्या सुफी पालख्यांपैकी सय्यद सनाउल्लह ( रहे. ) हे खुलताबाद मार्गे माहुरला आले होते.खुल्ताबादला दोन वेळा ७ शे म्हणजे एकूण १४ शे सुफी संतांच्या पालख्या आल्या होत्या.त्यातील  सय्यद सनाउल्लह ( रहे. ) हे कादरी परंपरेतील होते.ते माहुरच्या भूमीवर शहराजवळील डोंगराच्या एका टोकाला स्थाईक झाले होते.याच भागात त्यांचा दर्गा आज घडीला सोनपीर दर्गा म्हणून ओळखला जातो.
             त्याकाळी त्यांनी अगदी माहुरच्या डोंगराच्या एका बाजुला निसर्गरम्य ठिकाणी आपली वस्ती केली होती. हा सोनापिर दर्गा सय्यद सनाउल्लह ( रहे. ) यांची मजार स्वरूपात आहे.या दर्गाचे बांधकाम मोगल राजवटीत झालेले आहे.हा भाग निजाम राजवटीत असूनही या दर्ग्याला मोगलांनी जमीन आणि गावे दान दिल्याचे सांगितले जाते. 
       उंच आणि भव्य दगडी बांधकाम अत्यंत जुने असल्याचे पहाताक्षणी लक्षात येते.येथे 5 मार्चला दरवर्षी मोठा उरूस भरतो.ज्यांना अस्पृश्यता जातीव्यवस्थेचा अत्यंत त्रास सहन करावा लागत होता, त्यांचे समुपदेशन करुन ,आपल्या मार्गात,पंथात,धर्मात या सुफींनी घेतल्यामुळे ,ज्यांना साथीचे रोग , चर्मरोग होते आशांना  रोगराईतून मुक्त करण्यासाठी औषध उपचार करुन अनेक लोक बरे केल्यामुळे ,अनेक लोक अनेक कारणांनी सुफींच्या द्वारे इस्लामात दाखल झाले होते.म्हणून हे दर्गे हिंदू मुस्लिमांना दोघांनाही प्रिय आहेत.ह्या सोनपीर दर्ग्याला एकदा आवश्य भेट द्या.. हा भाग नक्कीच तुम्हाला हवाहवासा वाटेल .. 

नितीन सावंत , परभणी 
9970744142
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
*****************************

Thursday, 1 July 2021

हिंगलाजमाता इतिहास

 #हिंग्लाजमाता ही पाकिस्तानातील बलुचिस्तान भागातील मकराण येथे वास्तव्याला असनारी गणराणी.हिंगुळादेवी हे सुद्धा तिचे एक उपनाव.हिंगुळा म्हणजे रक्तवर्णी.भारताचा जगभर होनारा व्यापार याच हिंगुळादेवीच्या परिसरातून खैबरखिंडीमार्गे होत असे.उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरचा व्यापर युरोपात होत असल्याचे पुरावे उपलब्ध झालेले आहेत.त्यामुळे परकीय आक्रमणे थोपवनारी ही युद्धराज्ञी.या देवीच्या हतात जास्तित जास्त आयुधे आहेत.म्हणजे सरक्षंण देवता.व्यापर करणाऱ्या लोकांना संरक्षण देनारी ही राज्ञी पुढे व्यापारी लोकांची देवता बनली.आणि त्या व्यापाऱ्यांनी तिला देशभरात नेले.तिथे ठाणे स्थापन केले.मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात या हिंग्लाजमाता देवींची मंदिरे आहेत.आज व्यापारी जातींपैकी स्पेशली भावसार समाज या देवीचा उपासक आहे.हिंगोली जिल्हाचे नाव सुद्धा या देवीच्या नावे आहे.कोल्हापूरचा गडहिंग्लाज तालुका सुद्धा याच देवीचे नामनिर्देशन करतो...