हिच व्हावी माझी आस l जन्मोजन्मी तुझा दास ll
पंढरिचा वारकरी l वारी चुकू न दे हरी ll
संत संग सर्वकाळ l अखंड प्रेमाचा कल्लोळ ll
चंद्रभागे स्नान l तुकाम्हने हेची दान ll
- संत तुकोबाराय
भारतीय सरंजामशाहीत वर्ग नव्हते तर सुरुवातीला वर्ण आणि नंतरच्या काळात जाती होत्या ही कॉम्रेड शरद पाटलांची मांडणी. याद्वारे भारतीय सरंजामशाहीकडे पाहिल्यावर आपल्याला भारतीय इतिहासाचे विधायक ऐतिहासिक भौतिकवादी आकलन योग्य रित्या करता येते. भारतात जिथे जिथे सुबत्ता आली तिथे तिथे ब्राम्हण या जातीच्या लोकांनी राजेपद नामधारी बनवून कारभार स्वताकडे ठेवला आणि आपले सांस्कृतिक वर्चस्व निर्माणकरुन दीर्घकालीन सत्ता उपभोगली.
मध्ययुगीन भारतीय इतिहासात ज्या ज्या राज्यव्यवस्था भरभराटीला आल्या त्या राजेमहाराज्यांनी शेतकरी कष्टकरी आदिवासी जातींजमातींचे भले करण्याऐवजी मोठमोठी मंदिरे बांधली आणि ब्राम्हणी हित जोपासले.यात ब्राम्हणांच्या सांस्कृतिक राजकारणाला ते राजे बळी पडले.मंदिर संस्कृतीचे ब्राम्हणी स्तोम माजल्याने सर्वसामान्य वर्ग धर्मसंम्मत मार्गाने शोषन पिळवणूकीला बळी पडला .
या ब्राम्हणी सांस्कृतिक राजकारणाला मध्ययुगीन भारतात विरोध दर्शवला गेला तो संत चळवळीच्या माध्यमातून. संत चक्रधरस्वामी यांनी महानुभाव चळवळ उभी करुन ब्राम्हणी सांस्कृतिक राजकारण संपवायला सुरुवात केल्याने त्यांची रामदेवराय यादवाच्या भर दरबारात ब्राम्हणांच्या शिफारशीवर हत्या करण्यात आली.
महात्मा बसवेश्वर यांनी याच ब्राम्हणी सांस्कृतिक राजकारणाला च्यालेंज करुन बंड पुकारल्याने त्यांच्यासह सर्वच अनुयायांच्या हत्या झाल्या.
सर्वात मोठी च्यालेंजेबल मुहमेंट उभी केली ती संत नामदेव यांनी. या मुहमेंटचे नाव वारकरी किंवा भागवत धर्म.यात संत नामदेव यांनी ब्राम्हणी ग्रंथ नाकारून अभंग नावाने स्वतंत्र साहित्य निर्मिती केली.ब्राम्हणी तिर्थक्षेत्रे नाकारून स्वतंत्र तिर्थक्षेत्र प्रसिद्धीस आनले.पर्याय दिला. सर्व ब्राम्हणी देव देवता नाकारून स्वतंत्र मुर्तीसह नवा देव पर्याय म्हणून पुढे केला.जुने व्रतवैकल्ये नाकारून एकादशी सारखे नवे अब्राम्हणी व्रत पुढे आनले. यात मोठा प्रचारक वर्ग तयार केला ज्याला त्यांनी संत म्हटले. ब्राम्हणी धर्मात स्त्रीला हिन लेखले जायचे. लिखानाचे आधिकार नव्हते. नामदेव यांनी स्त्रीला नेतृत्व दिले , विनेकरी बनवले , अभंग लिहायला शिकवले .
या घटनेमुळे संत नामदेवांसह त्यांच्या घरच्या १४ जनांच्या हत्या झाल्या .पुढे सर्व प्रचारक असनारे संतही अशेच संपवले गेले.
महाराष्ट्रात सवात जास्त आणि दीर्घकाळ आपला प्रभाव उमटवनारे हेच वारकरी आंदोलन आहे . ज्याची सुरुवात संत नामदेव यांनी केली होती. आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी हा पर्याय त्यांनीच दिला. वर्षातुन दोन वेळा पंढरपूरच्या वाळवंटात हे आधिवेषन होत असे.यात गाव पातळीवर कोनते अभंग घेऊन जागृती करायची याचे ठराव पारित होत असत. पुढल्या काळात संत तुकोबारायांसारखा मोठ्या जातीत जन्माला आलेला संत सुद्धा ब्राम्हणी सांस्कृतिक राजकारणापुढे टिकु शकला नाही .
संत हे समतावादी होते. त्यांची आध्यात्मिक असनारी समता सहभोजन करुन जातीअंतकही बनली होती.
उंचनिच काही नेने भंगवंत म्हनत संत तुकोबाराय म्हणतात
आमचा देव रोहीदासाच्या सोबत चामडे रंगवतो , सज्जन कसायासोबत मांस विकतो , चोखामेळ्यासोबत ढोरे ओढतो , दासी जनी सोबत शेन वेचतो, आमचा देव सवळ्यातला नाही . तो शुद्र नामदेवांच्या घरी जेवतो , कबिराचे शेले विनतो , मीराबाईसाठी विष पितो,
आमच्या देवाला उचनिच भेदभाव नसतो.
कर्म हाच धर्म आहे. वर्णधर्माने कुनी ग्रेट नसते. याबद्दल तुकोबाराय म्हणतात
" वर्णधर्माभिमाने कोन झाले पावन l ऐसे द्या सांगुन मजपाशी ll "
सर्व संत वर्णजातीअंतक होते.त्याचे कितीतरी पुरावे देता येतील.संत मेळ्यात उच्चजातीय संत ज्ञानेश्वर महाराजांना संत चोखोबारायांच्या सोबत नामदेवरायानी जेवायला लावले होते. मग संत ज्ञानेश्वर म्हणतात
यातीकुळ माझे गेले हरपून l श्रीरंगावाचुन नेनो काही ll
त्याकाळी हे धाडस करणे अत्यंत जिकरीचे काम उभे.तो काळ जातीव्यवस्था वर्णव्यवस्थेच्या कडक अमलबजावणीचा काळ होता. संत नामदेव संत चोखोबारायांसारख्याना मंदिराबाहेर हाकलून दिले जात होते.तरिही संतांनी बंड केले.या संतांच्या सांस्कृतिक राजकारणाला लक्षात घेतले असते तर बऱ्याच पुरोगामी पक्ष संघटनांची सत्ता आली असती.
आज घडीला
जो जे वांछिल तो ते लाहो म्हनने समतावादी आहे , मार्क्सवादी आहे .
किंवा दया करणे जे पुत्रांशी l तोची दासा आणि दासी ll ( दास दासिंवर मुलांसारखी दया करावी , वागणूक द्यावी )
हे तर जानिव नेनीवेसह डिकास्ट होण्याचे लक्षण आहे .
वारकरी या अब्राम्हणी परंपरेतल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा
ह.भ.प.धर्मकीर्ती महाराज परभणीकर
9970744142
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
No comments:
Post a Comment